Naa kavle kadhi - 2 - 21 books and stories free download online pdf in Marathi

ना कळले कधी Season 2 - Part 21

ऐ काय रे आयुष मघाच पासून बघतोय मी, का खेचतोय रे तिची? ती बिचारी काही बोलत नाही म्हणून अस वागायचं का तिच्याशी? सिद्धांत आयुष ला नाटकी रागावून म्हणाला.

ऐ जिजू this is not fare हा तू माझ्या पार्टीतला आहेस ना मग तिच्या कडून काय बोलतोय ?

आज ह्याला माझा इतका पुळका का येतोय strange! नाही चांगलच आहे at least सिद्धांत माझ्या बाजूने बोलला तरी.

अरे मग काय! मोठी बहीण आहे ना तुझी ती ? मग अस वागतात तिच्याशी......

अरे तुला काय झालं अचानक..... आमचं चालूच राहत.

हो मग काय झाल म्हणून तू तिला अस बोलणार आणि मला नाही आवडत बर तिला कुणी अस बोललेल.

सॉरी तुला राग आला असेल तर....

त्याला मधेच थांबवत हा आता नाही कळत एखाद्याला जोक्स म्हणून काहीही बोलायच. तो आयुष ला टाळी देत म्हणाला.

अरे जिजू तू पण ना घाबरलो ना मी! तरी म्हटलं हा कसा पलटला?

काय रे सिद्धांत !!! तुम्ही दोघे पण सारखेच आहात.

ते दोघेही हसत होते.

'ऐ दीदी तुझा फोन बघु ग', आयुष तिला म्हणाला.

आता मात्र आर्या आणि सिद्धांत दोघांचाही चेहरा पाहण्या सारखा झाला.

कशाला हवा तुला, काय रे तुझ्या कडे तुझा आहे ना? मी मागते का तुला कधी. आर्या त्याला काही कळू द्यायचं नाही म्हणून बोलत होती.

अरे तुला फोनच हवा ना माझा घे ना, ती नाही देत तर का तिच्या मागे लागलाय सिद्धांत त्याला म्हणाला.

बघ शिक त्याच्या कडून काही तो किती पटकन हो म्हणाला, नाहीतर तू! थँक्स जिजू पण मला तुझा नको आहे, मला तिचाच हवा आहे. कारण त्या मध्ये मी काही बुक्स डाउनलोड केले आहेत ते मला हवे आहेत.

अरे बापरे! अस आहे का? तू एक काम कर ना तू पुन्हा डाऊनलोड कर त्यात काय! सिद्धांत त्याला म्हणाला.

अरे पण का? हिच्या कडे आहे ना दिला तर काय होतो.

अरे का हा इतका जिद्दीलाच पेटला, सिद्धांत मनातच विचार करत होता.

हे बघ आयुष तू तुझे कुठले बुक्स आहेत सांग मी मेल करते तुला.or PD मध्ये देते पण संध्याकाळी आता नाही.आर्या त्याला म्हणाली.

बर ठीक आहे , पण तू थोड्यावेळ दिला असता तर काही झालं असत का? असेच असतात मोठे.

अरे ठीक आहे देते म्हणाली न ती, सिद्धांत त्याला म्हणाला.

बिचारा आयुष किती चेहरा पडला त्याचा, पण काय करू त्याला काय सांगणार? त्याला जर फोन दाखवला असता तर त्याने शंभर प्रश्न विचारले असते. आणि त्याला संशय जरी आला असता ना की आमच्या भांडणातून फुटला तर झालंच होत मग! ती तिच्याच विचारात होती.

आऊच.......…!!!! तिच्या आवाजाने दोघेही तिच्या जवळ आले.

काय झालं? आर्या अग किती रक्त येतंय.

अरे काही नाही माझं लक्षच नव्हतं म्हणून बोट कापल.

wait !मी first aid kit आणतो.सिद्धांत म्हणाला.

दीदी दुखतंय का ग? अस कस ग तुझं लक्ष नसत.

बघू , आण त्याने तिचा हात घेतला आणि बँडेज करू लागला.

आर्या, अग बघ किती लागलंय कस ग किती रक्त गेलय. माझंच चुकलं मी उगाचच तुला हे काम दिल.

अरे काहिच नाही झाल सिद्धांत तू इतका का पॅनिक होतय. आणि अस बघ आता थोड्यावेळात बर होईल. आर्या त्याला म्हणाली.

काही नाही काय काही नाही तुला काही कळत नाही ! आर्या कस होईल ग तुझं? अस कस लक्ष नव्हतं तुझं.

दीदी त्रास तर नाही होत आहे न आपण डॉक्टर कडे जायचं का?

नाही रे मला काहीच नाही झालं तुम्ही दोघही इतके काय ओव्हर रिऍक्ट करताय मला तेच कळत नाही आहे.थांबा मीच इथून बाजूला जाते नाहीतर तुम्ही दोघे तर मला admit च कराल. अस म्हणून ती तिथून निघून गेली.

हीच न असच काम आहे कधीच स्वतःकडे लक्ष देत नाही अरे अस असत का? तुला सांगू का मला न आता तिला थोडाही त्रास झालेला पाहवत नाही. खूप सफर केलंय तिने ऑलरेडी आता कुठे सगळ नीट झालं.

अरे हो आयुष बर होईल तू नको इतका विचार करू सिध्दांत त्याला म्हणाला.

हो रे बर होईल मी त्याबद्दल बोलतच नाही आहे. मला न काळजी वाटते तिची म्हणून, म्हणजे आम्ही कितीही भांडत असलो ना तरीही नाही करमत मला तिच्या शिवाय म्हणजे मी राहूच नाही शकत माझी सोपोर्ट सिस्टीम आहे यार ती! जेव्हा तुझा अकॅसिडेंट झाला होता ना तेव्हा तिला बघायचं असत ती जगणंच विसरली होती. पण आज मला तिला अस नॉर्मल बघून खूप छान वाटलं. and the best part is that तू आता तिच्या सोबत आहे.त्या मुळे कसलीच चिंता नाही.

सिद्धांत त्याच्या कडे बघून फक्त हसला.

चल मी निघू मला उशीर होतोय आता.

तू बोल आर्या सोबत, तोपर्यंत नाश्ता रेडी होतोच आहे.....

तितक्यात आर्या आलीच तिथे, मी करू का काही मदत तुला.ती म्हणाली.

नको अजिबात नको! तू काहीही करू नको तो म्हणाला.

काय रे नेहमी अस करतो मला मी मुद्दामून नाही कापून घेतलं झालं चुकीनी. ती म्हणाली.

हो ठीक आहे मी तुला च बर वाटावं म्हणून म्हणतोय,आता तू बोलत बस ना त्याच्या सोबत.

थोड्या वेळाने तिघेही जण नाश्ता करायला बसले. काय सॉलिड टेस्ट आहे रे तुझ्या हाताला म्हणजे वाटत नाही तुझ्या कडे पाहून तू इतका छान कूक असशील.

don't judge book by its cover !
आर्या म्हणाली.

hmm जस तुझ्या कडे पाहून वाटत की हिला सगळं येत असेल पण....... आयुष म्हणाला.

तुझे सगळे टॉपिक्स माझ्या वरच close होतात हो ना आयुष! आर्या त्याला म्हणाली.

हे बघ जे खरंय ते खरंय! आयुष तिला म्हणाला.

सिद्धांत ला त्यांची पुन्हा चालू झालेली भांडणं पाहून मजा येत होती.

चला माझं झालंय मी निघतो आता उशीर होतोय. तो दोघांनाही बाय म्हणून निघाला.

आर्या काय झालं इतकी शांत का आहेस ? बर वाटत नाही आहे का?

नाही रे मला वाईट वाटतय त्याला आज मी पहिल्यांदा कशाला तरी नाही म्हणाले. काय वाटलं असेल त्याला किती rude आहे मी ! पण काय करणार दुसरा काही ऑपशनच नव्हता.

सॉरी, माझ्याच मुळे झालं हे सगळं! मी जर रागात फोन फेकलाच नसता तर! सॉरी आर्या, तुझी काहीच चुकी नाही ह्यात.

नाही माझं पण चुकलंच मी पण थोडं जास्तच बोलले.

नाही ग! माझ्या कडून नेहमीच अस होत पण ह्या नंतर नाही होणार. आणि त्याला त्याचा डेटा देवू त्याच टेन्शन नको घेऊ तू ! तो म्हणाला.

आर्याची किती काळजी आहे आयुष ला तो लहान असूनही किती जपतो तिला. आणि त्याचा किती जास्त विश्वास आहे माझ्यावर. त्याला जर कळाल असत आमच्या भांडणाच तर काय झालं असत? आर्याची खरच जबाबदारी आहे माझ्यावर आणि तिच्या घरच्यांचा किती विश्वास आहे. ती फक्त माझ्या सोबत आहे म्हणून निश्चिंत असतात ते! आणि मी किती चुकीचा वागतो तिच्या सोबत. माझ्या साठी गोष्टी जरिही स्विकारायला कठीण असतील तरी त्यात तिचा काहीच दोष नाही, हे सत्य मला नाकारून चालणार नाही. मी तिला बायको म्हणून कधी स्विकारेन माहिती नाही पण एक मित्र म्हणून तर मी तिच्या सोबत चांगला राहूच शकतो.
क्रमशः
©Neha R Dhole


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED