Naa kavle kadhi - 2 - 24 books and stories free download online pdf in Marathi

ना कळले कधी Season 2 - Part 24

तिने सिद्धांत कडे पाहिलं, तिला वाटलं त्याची परवानगी घ्यावी.
सिद्धांत ला कळलं ते तो म्हणाला,
'माझ्या कडे बघूच नको ह!' 'आपले decisions आपण घ्यायचे'.'आणि मला पण पटत की कुठलीच गोष्ट try केल्याशिवाय चांगली वाईट ठरवू नये'.

'मग हे तुला पण लागू होत ना तू का नाही करत try??आर्या म्हणाली'.

'of course, मलाही applicable आहे, पण तुझ्या माहिती साठी मी आधीच केलीये try and then I have decided'.

आर्याचा तरीही विचार चालूच होता.

'अग किती विचार करणार आहेस आर्या?' मंदार म्हणाला.

'अग आर्या इतका विचार नको करू आणि ईच्छा नसेल तर सरळ नाही म्हण त्यात काय एवढं!'. विक्रांत म्हणाला.

ठीक आहे i will try! आर्या म्हणाली.

ये हुई ना बात!!! मंदार आणि विक्रांत खुष होऊन म्हणाले.

त्यांनी पेग बनवून आर्या ला दिले.आर्या ही ते सगळं एन्जॉय करत होती. आणि तिला थांबाव जरी वाटलं तरी तिला विक्रांत आणि मंदार अजून आग्रह करीत होते.

आर्या पुरे हा आता तू ऑलरेडी खूप ड्रिंक घेतलीये आता नको, सिद्धांत म्हणाला.

'ऐ आर्या,तू काही ह्याच ऐकू नको घे अजून एक काही होत नाही,. विक्रांत म्हणाला.

'तू ह्यांच काही ऐकु नको तुला सवय नाही आहे त्रास होईल' सिद्धांत तिला म्हणाला.

अरे यारर सिद्धांत थांब ना !घेऊ दे ना एक काय होत, तूच म्हणत होता ना try करावं मग आर्या म्हणाली.

घे!माझं असही आता तुम्ही कुणीच ऐकणार नाही! आणि मुळात तुम्हाला कुणालाच बोलून फायदा च नाही कारण तुम्ही शुद्धीतच नाही आहात. सिद्धांत चिडून म्हणाला.

'झालं चिडला हा', विक्रांत म्हणाला.

त्याला दुसरं येत काय? आर्या म्हणाली. त्यावर सिद्धांत सोडून सगळे हसले. सिद्धांत चा चेहरा मात्र पाहण्या सारखा झाला होता.

'Aarya don't talk like this he is your husband' मंदार म्हणाला.

hmm only officially, कारण तो मानतच नाही न! आर्या म्हणाली, तिचा चेहरा आता एकदम उतरला होता.

सिद्धांत पण आर्या च बोलणं ऐकून एकदम शॉक झाला, काय बोलतीये आर्या आणि ह्यांच्या समोर का? आता थांबून उपयोग नाही ती शुद्धीत नाही आहे तीला नाही कळत ती काय बोलतीये पण नंतर प्रॉब्लेम नको व्हायला.

what.....? तो मनात नाही म्हणजे? विक्रांत म्हणाला.

अरे म्हणजे..... आर्या बोलत होती, तितक्यात सिद्धांत मधेच बोलला. 'आर्या उशीर होतोय ना आपल्याला आता पुरे'.

अरे पण त्याला सांगू तर दे ! आर्या म्हणाली.

'ते उद्या सांग आता चल',

'अरे काय यारर हा काहिच करू देत नाही मनासारखं'.

अग सगळच तर तुझ्या मनासारखं चाललं आता अजून काय? and it's too late. सिद्धांत म्हणाला.

'अरे तिला बोलू तर दे ती काय म्हणतिये 'विक्रांत म्हणाला.

'ignore कर तिला काहीही बोलतीये ती'. आर्या चल तू, सिद्धांत म्हणाला. तो तिला थोडं जबरदस्तीनेच तेथून घेऊन निघाला.

तिला चालणेही अशक्य झाले होते सिद्धांत तिला यव्यस्थित सांभाळत पार्किंग पर्यंत घेऊन आला.

"सिद्धांत", एक विचारू ती म्हणाली.

'मी नाही म्हंटल तर काही तू माझं ऐकणार आहे का? विचार!' .

सिद्धांत, तू मला सोडणार नाही न??? तिच्या डोळ्यात पाणी, भीती,प्रेम सगळच होत.

सिद्धांत ने तिच्या कडे पाहिलं तो थोडा स्तब्ध च झाला.

'आर्या काय झालं असं एकदम .......'

तू आधी माझ्या प्रश्नाच उत्तर दे!

सिद्धांत निःशब्द होता त्याला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं.

सिद्धांत बोल ना रे! सांग न तुला मला नाही सोडणार ना कधीही!! तुला माहिती आहे का मी नाही जगू शकणार तुझ्याशिवाय. तिने त्याला घट्ट मिठी मारली, मला भीती वाटते रे सतत तू मला सोडून जाशील, तूला जर आठवलच नाही तर मग,आणि तू मला स्वीकारलं च नाही तर? मी काय करायचं मग? कस जगायचं? तुझ्या शिवाय मी एक क्षण पण नाही imagine करू शकत.खूप इनसेक्युर फील करते मी ! तू सोबत नसताना. सतत दडपण सतत भीती घेऊन मी नाही जगू शकत अजून. तू बोल ना, माझं काही चुकतंय का, चुकत असेल तर ते सांग मी नक्की दुरुस्त करेन पण प्लीज मला सोडून जाऊ नको.ती बोलतच होती.

बापरे ! किती साठवून ठेवलय आर्यानी मनामध्ये, मला कधीच का नाही समजलं, कस समजणार मी तिच्या मनाचा विचारच करत नाही, तिला हवं तरी काय आहे जगण्यासाठी फक्त थोडस प्रेम आणि ते ही मिळू नाही, किती मोठ दडपण मनावर ठेवून जगतीये ती! मान्य आहे ती शुद्धीत नाही आहे, नाही तर तिने हे कधीच बोलुन नसत दाखवलं आणि मला कधी कळाल ही नसत.पण मी काय करू??? माझं चुकतंय? मला आठवत नाही हे चुकतंय ? ह्याचा त्रास किती होतोय तिलाही आणि आता मलाही. बर झालं आज आर्याच्या मनातलं कळाल तरी.

सिद्धांत....... आर्याच्या आवाजाने तो भानावर आला. अरे काहीतरी बोल ना! सांग न नाही सोडणार न!

त्याने तिला त्याच्यापासून थोडं बाजूला केलं तिच्या फोरहेड वर किस करत तो म्हणाला" नाही" कधीच नाही. आणि तिचे डोळे पुसले.

ह्याही परिस्थिती मध्ये तिचा चेहरा एकदम खुलला, ती तिच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले. तिने परत त्याला मिठी मारली.

किती तरी वेळ ती फक्त रडत होती, ह्या वेळेस सिद्धांत ने तिला शांत करण्याचा प्रयत्न नाही केला. त्यालाही वाटलं इतक्या दिवसांपासून साठवलेल बाहेर पडतंय!

"आर्या निघायचं",तो तिला हळुवारपणे म्हणाला.

"hmm चल"

सिद्धांत ने तिला गाडीत बसवल, ते निघाले.

आर्याला ड्रिंक थोडी जास्तच झाली होती, त्यामुळे तिला बराच त्रास होत होता. सिद्धांत ने तरिही तिला बरच सावरलं.

आर्या तू झोप म्हणजे तुला बर वाटेल, त्याने तिला बेड वर झोपवलं, तिच्या पायातल्या सँडल्स काढल्या. त्याच लक्ष तिच्या पायातल्या अंकलेट वर गेलं. तिच्या गोऱ्या पायांमध्ये खरच खूप शोभून दिसत होत नकळत त्याला ते ही आवडलं. तिच्या अंगावर ब्लँकेट टाकताना त्याला दिसल की तीच एअरिंग्ज तिच्या केसांमध्ये अडकतय, त्याने हळूच तिने एअरिंगस ही काढले, आणि बाजूला ठेवले.

आज किती शांत झोप लागली आहे आर्या ला. रोजही अशी झोप लागत असेल? त्याच्या मनात सहज विचार येऊन गेला. त्याने एकदा तिच्या डोक्यावरून हात फिरवला, पुन्हा एकदा तिच्या फोरहेड वर किस केलं आणि आणि तो ही झोपला.

क्रमशः
© Neha R Dhole


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED