Gudi Paadva books and stories free download online pdf in Marathi

गुढी पाडवा

गुढी पाडवा

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढी पाडवा
शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे.
वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे.
या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी केल्या जातात.
दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.
ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) आणि वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत वसंत ऋतू कुसुमाकरी असतो .
या वेळी हवामान समशीतोष्ण आणि उत्साहवर्धक असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
पालवी वारे वाहत असतात .

रामाने वालीचा वध या दिवशी केला होता .
ज्या दिवशी राम रावणवधानंतर आयोध्येला परत आला, त्या दिवशी रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली होती. विजयाचे प्रतीक हे उंच असते, म्हणून गुढी उंच उभी केली जाते.
राम आपला वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परत आले त्यावेळी प्रजेने त्यांचे गुढ्या, तोरणे आणि ध्वज उभारून स्वागत केले. आणि तो दिवस गुढीपाडव्याचा होता असे मानले जाते.
या दिवशी प्रभू राम देवी जानकी यानां सोबत घेऊन अयोध्या नगरीत परतले म्हणून विजय पताका लावून त्यांचे स्वागत करण्यात आले

सृष्टीची निर्मिती म्हणजेच सत्ययुगाच्या प्रारंभाचा दिवस

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.

गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन
गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया आणि दसरा म्हणजे प्रत्येकी एक अन् कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे अर्धा, असे साडेतीन मुहूर्त आहेत. या साडेतीन मुहूर्तांचे वैशिष्ट्य असे की, इतर दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी मुहूर्त पहावा लागतो, या दिवशी मात्र मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवसांतील कोणतीही घटिका शुभमुहूर्तच असते.

भारतीय संस्कृतीत 'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे.
महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण 'गुढीपाडवा' म्हणून साजरा करतो.
दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.

गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या (गडू) बसवून. ह्यादिवशी बांबूच्या लांब काठीच्या एका टोकाशी तांब्याचा कलश, एक वस्त्र, कडुलिंबाची पाने आणि साखरेचे बत्ताशे लावून, पूजा करून घराबाहेर दाराजवळ ही गुढी उभारली जाते.
गुढीची काठी प्रवेशद्वारी अथवा गच्चीत नीट बांधतात.
गुढीभोवती रांगोळी काढली जाते आणि गंध फुले अक्षता वाहिली जातात. व निरांजनाने उदबत्तीने ओवाळले जाते .
गुढीची पूजा करतात.
दूध साखरेचा, पेढ्याचा वगैरे नैवेद्य दाखवतात
नैवैद्यासाठी गोडधोड बनवले जाते.
. दुपारी गुढीला गोडा-धोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताचे वेळी पुन्हा हळद-कुंकू, फुले वाहून व अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची प्रथा आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे सेवन केले जाते.
त्यामागे शास्त्रीय महत्व असे आहे की कडुलिंबाची पाने खाल्ल्यास पचनास मदत होते आणि ती आरोग्यासाठीही चांगली असतात.
चैत्र महीन्यामध्ये हिवाळ्याचा थंड आल्हाददायक काळ संपून उन्हाळा सुरु होतो. कडुलिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घातल्याने शरीराला थंडावा मिळतो. गुढीपाडव्याच्या दिवशी दारी उभारलेली गुढी हीपावित्र्य, मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक असते.

गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून लोक पारंपरिक पेहराव करून एकत्र जमतात, एकमेकांना शुभेच्छा देतात.
गुढीचा आकार हा मानवी शरीर प्रतीत करतो. गुढीवरील कलश हा गोलाकार असून तो मानवी मस्तक आणि कळक(बांबू) हा माणसाचे शरीर किंवा पाठीचा कणा दर्शवतो.
नव्या गोष्टींचा आरंभ म्हणजे पाडवा. पाडव्याच्या दिवशी नवीन कामांना सुरुवात करणे आध्यात्मिकरित्या शुभ मानले जाते. पाडव्याच्या दिवशी सुरु केलेली कामे यशस्वी होतात असे मानले जाते.

ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतिक मानली जाते. ती विजयाचा संदेशही देत असते.

चैत्र शुद्ध प्रतीपदेपासूनच श्री शालिवाहन राजाने शके गणनेला सुरुवात केली. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला पुतळ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले.
होते. त्यांच्यात पौरुष व पराक्रम जागृत झाला आणि त्यांनी शत्रूंचा पराजय झाला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे.
या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरु होऊन नवीन वर्षाची सुरुवात

चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात.

वर्षभरातील साडेतीन शुभ मुहूर्तापैकी हा पुर्ण दिवस एक महत्वाचा मुहूर्त मानला जातो. याच दिवशी वसंत ऋतू सुरु होतो.
सर्व रुतुत वसंत मीच आहे अस भगवान गीतेत सांगतात. वसंत निसर्गाला नव बहार देतो.
वातावरण आरोग्यदायी असते. या दिवशी नवजीवन सुरु करण्याच्या द्रुष्टीने मन सकारात्मक झालेले असते. या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने रज तम गुण एक लक्षांश एवढे कमी होतात व तेवढ्याच प्रमाणात सतोगुण वाढलेले असतात.

या दिवशी कडुलिंबाची पाने खाऊन दिवसाची सुरुवात करावी. घरावर गुढी उभारून, उदबत्ती, धूप इत्यादीने वातावरण सुवासिक ठेवावे. दिवसभर भजन-कीर्तन व शुभ कार्य करत आनंदाने वेळ घालवावा. सर्व जीव व प्रकृतीसाठी मंगल कामना करावी. ब्राह्मणाची अर्चना करत लोकहितासाठी प्याऊ (पाणी पिण्याचे रांजण) स्थापित करावे.

गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली. त्या दिवसापासून काळाने चालणे सुरू केले. म्हणजे जो काळ आपण आज मोजतो, त्याचा आरंभबिंदू हा होता.

प्राचीन मानवाने जेव्हा देवाची कल्पना केली आणि पूजा करायला सुरवात केली तीच देवीच्या, स्त्रीच्या रूपात सुरु केली. ती स्त्री म्हणजे आदिशक्ती, आदिमाता पार्वती असे मानले जाते.
पार्वती आणि शंकराचे लग्न पाडव्यादिवशी ठरले.
पाडव्यापासून तयारीला सुरवात होऊन तृतीयेला लग्न झाले. पाडव्याच्या दिवशी पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात.
यालाच चैत्र नवरात्र म्हणतात.

महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली.
या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्त्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात .
ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले, असे वेदात सांगितले आहे
सिंधी समाजात भगवान झुलेलाल यांचा जन्मदिवस अर्थात चेट्रीचंड याच दिवशी असतो. सप्तऋषी संवत अनुसार काश्मीरमध्ये नवरेह म्हणून नववर्षाचा प्रारंभ होतो.
इतिहासात याच दिवशी सम्राट चंद्रगुप्त, सम्राट विक्रमादित्य यांनी शकांवर विजय प्राप्त केला. म्हणून विक्रम संवत सुरू करण्यात आले.
भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच.

या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू पातशाहीचे भगवा विजय ध्वज लावून हिंदू साम्राज्याची नीव ठेवली होती.
असा हा अनेक शुभ गोष्टी घडलेला गुढी पाडवा
भारतीय सण हे आपल्या समृद्ध परंपरेचे प्रतीक आहेत. आपण आपले सण खूप मोठ्या उत्साहात साजरे करतो. हे सण आपल्यामध्ये एकोपा निर्माण करण्यास मदत करतात.

समाप्त

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED