Mala Kahi Sangachany - 26 books and stories free download online pdf in Marathi

मला काही सांगाचंय... - २६

२६. जाणीव

अनिरुध्द बॉक्स जवळ बसून असतांना डोळे भरून आल्याने त्याचे दोन चार आसवं त्यावर पडली ... पटकन खिश्यातून रुमाल काढून त्याने ते आसवं पुसले अन ओल्या पापण्या हि रुमालाने पुसल्या ... मग अलगद बाहेर काढून त्यावर डाग तर पडला नाही ना म्हणून पाहण्यास त्याने जवळ घेतले . परत एकदा हलक्या हाताने ते वेष्टन साफ केले . निरखून पाहिल्यावर त्याला समजले की ते सोनेरी रंगाचे वेष्टन सर्व बाजूंनी चिटकवून पॅकिंग केले आहे ... अन त्याला प्रश्न पडला की आता काय करायचं ? आत काय ते उघडून पाहायचं कि नाही ? कुमारला काय वाटेल ? तो स्वतः भेट म्हणून कधीतरी देणार तर आहे ... मग आता राहू द्यायला हवं जसेच्या तसे कुमार ठीक झाला की स्वतःहून तो जेव्हा मला देईल तेव्हाच मी वाचणार ..


असं स्वतःलाच समजावून तो ते परत बॉक्स मध्ये ठेवणार तोच त्याला बॉक्समध्ये आणखी तसेच काहीतरी असल्याचं दिसून आले , फक्त To , नंतर सुजितचं नाव लिहिलं होतं त्याने कुतूहलाने ते पॅकिंग केलेलं गिफ्ट बाहेर काढलं तर त्याखाली पुन्हा एक असल्याचं दिसून आले यावेळी तिथं आर्यनचं नाव होतं ... त्याने ते गिफ्ट वर काढलं तर आणखी एक पण त्यावर Rj अस लिहिलं होतं ... हे सगळं पाहून खरं म्हणजे आश्चर्याच्या धक्क्यांची परिसीमा केव्हाच ओलांडून गेली होती ... कुमारने काय काय गुपितं आजवर सांभाळून ठेवली त्यालाच ठाऊक ! पण मला आता हे जे काही कळलं ते मी माझ्या मनात कितीवेळ ठेवू शकेल ? एखादी गोष्ट माहित झाल्यानंतर जाणीवपूर्वक इतरांपासून लपवून ठेवणं काही सोप्प काम नाही ...


स्वतःशीच काहीतरी असा पुटपुटत त्याने सारे गिफ्ट जसेच्या तसे बॉक्समध्ये ठेवले पण जेव्हा त्याच्या नावाचं गिफ्ट ठेवायची वेळ आली तेव्हा परत आत ठेवू कि नको असं त्याला होऊन गेलं ... बराच वेळ विचार करून त्याने ते हि आत ठेवून दिलं आणि बॉक्स बंद करून कपाटावर ठेवून दिला ... मग तो जरावेळ बिछान्यावर बसला पण राहून राहून त्याच लक्ष त्या बॉक्सकडे जात होतं ... एक क्षणासाठी त्याच्या मनात आलं की नसती उठाठेव केली आणि नको ते माहित करून घेतलं आता कशी झाली पंचाईत ?


तो विचार करत मग्न झाला ... बाहेर कुणीतरी आवाज देत आहे असं त्याला ऐकू आला अन तो भानावर आला ... खोलीतून बाहेर पडला तर ऋतुराज त्याला हाक मारत होता ... दोघे समोरासमोर आले ...


" अनिरुध्द , तू कुठे होता ? किती वेळ पासून तुला शोधत होतो ? "


स्वतःला सावरत " अरे मी , मी आत खोलीत होतो ... "


" बराच वेळ झाला म्हणून ... "


" जरा डोळा लागला होता ... "


" ठीक आहे , चल बाहेर बसू , सगळे अंगणात बसून आहेत ... "


" बरं चल जाऊ .. "


रात्रीचे जवळपास 8 वाजत आले , निळं निळं आभाळ , आकाशात चटक चांदणं , सोबतीला चंद्राची कोर ... गार वारा सुटला . बराच दिवसानंतर असे सगळे निवांत एकत्र बसले . कसं काय सुरु आहे ? या एका प्रश्नाने संवाद सुरु झाला या एकाच प्रश्नावर प्रत्येकाने त्यावर आपले उत्तर सांगितले... कुणी आपली खुशाली तर कुणी काही नाही तेच तेच रोजची चार भिंतीतली जिंदगी असे काही बोलता बोलता - मध्येच आर्यन " चला भावांनो जेवण तयार आहे ... "


" आर्यन , ये बस सोबत काही वेळ ... " सुजित


" हो , नंतर जेवण करू ... " ऋतुराज


" तू काय म्हणतो अनिरुध्द ? " आर्यन


तो अजूनही तिथेच सोनेरी क्षणाच्या दुनियेत हरवलेला ... त्याचं इकडे मुळीच लक्ष नव्हतं तर नवं जाणून घेतलेलं अश्यावेळी नकळत बाहेर येत काम नये म्हणून तो जर अलिप्त राहण्याचा प्रयत्न करीत होता ...


" अनिरुध्द , अरे तू ठीक तर आहे ना ..? " त्याच्याजवळ जाऊन ऋतुराज म्हणाला .


विचारातून बाहेर येऊन " हं काय काय झालं ...? " अनिरुध्द


" तेच तो तिला विचारत आहे , काय झालं ? " सुजित


" काही नाही ? " अनिरुध्द


" अन इतका कशाचा विचार करत होता ?" आर्यन


" काही नाही ? तू सांग काय म्हणतो ? " अनिरुध्द


" मी म्हटलं जेवण तयार झालं आहे , तर जेवण करायचं का ? " आर्यन


मध्येच त्याच बोलणं पूर्ण झालं की नाही तर " मी म्हटलं जेवू नंतर काही वेळाने .." ऋतुराज


" बरं बस आर्यन जरावेळ आणि काकूला पण बोलावं गार वारा सुटला ... " अनिरुध्द


जरावेळ आणखी ते बाहेर बसले , काही वेळातच जेवण आटोपले आणि जेवण झाल्यावर थोडं नुसतंच चालायचं म्हणून चौकातून एक दोन चक्कर फिरून घरी आले .... पुन्हा बाहेर अंगणात बैठक भरली , जेवणाआधी आर्यन तिथे हजर नव्हता म्हणून आता काहीवेळ आर्यनच्या जीवनात काय चाललंय याबद्दल चर्चा चालली ... ती माउली आज कुमारला डोळे भरून पाहिल्याने स्थिरावली , मनावरचं दडपण कमी झाल्याची तिला जाणीव झाली ... गप्पा मारत असतांना ते तिलाही त्यात सामील करून घेत होते,

प्रशांत दमल्याने त्याचा लवकरच डोळा लागला , ती माउली त्यांच्यासोबत बोलतांना कुमारच्या काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि ती भावूक होऊन त्याचे काही बालपणीचे कधी कॉलेजला असतांना तो कसा होता सांगत होती ... बोलत असतांना कधी कधी नकळत तिच्या पापण्या ओल्या झाल्या तेव्हा सर्वांनी मिळून तिला सावरलं ...


" काकू , बराच वेळ झाला , तुम्ही आराम करायला हवा ... " आर्यन


" हो तुम्ही आराम करा .. " सुजित


" आम्ही सगळे थोड्या वेळाने झोपू .. " ऋतुराज


तर अनिरुध्द मुद्दाम बोलायचं टाळत होता , यासाठी तितकंच ठोस कारण होतं आणि ते म्हणजे बोलता बोलता जर त्या बॉक्सबद्दल एकजरी शब्द बाहेर पडला तर काय होईल याची त्याला जरा कल्पना होती ... पण तो शांत आणि अबोल राहिल्याने आणखी तोच तो विचार त्याच्या मनात येत राहिला , मध्येच त्याला कुमारची डायरी आठवली अन अचानक आलेल्या या विचाराने तो हळूच पण स्पष्ट बोलला ... " डायरीबद्दल कुणालाच कसं आजवर कळलं नाही ? "


बस झालं , सर्वांना आतापर्यंत डायरी चा जणू विसर पडला होता पण अनिरुध्द ते वाक्य बोलला आणि सगळ्यांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला ... कुमारचं ऑपरेशन सुरु झालं तेव्हा याच विषयावर चर्चा सुरू होती म्हणजे " डायरी आहे कुठं ? "


कुमारचं ऑपरेशन झालं , त्याला रूममध्ये आणलं तेव्हा सगळे डायरी बद्दल बेफिकीर झाले मग जेव्हा कुमार शुध्दीवर आला तसं डायरी सर्वच विसरले होते ... पण अचानक यावेळी अनिरुध्द बोलला आणि डायरीचं कुतूहल प्रत्येकाच्या मनात नव्याने पेटलं ... सर्व सुजितला नजर रोखून पाहू लागले ...


" सुजित , तू पण डायरी विसरला ..? " आर्यन


" तू आम्हांला काल रात्री काय म्हणाला होता की आज सकाळी ती डायरी दाखवणार ... " ऋतुराज


" हो ना .. " अनिरुध्द जरा मोजकंच बोलून थांबला .


" आणि सकाळपासून तू डायरी कुठं आहे ते सांगितलंच नाही ..." आर्यन


" बरं ते जाऊ दे , काय लिहिलं आहे ते तरी सांग ... " अनिरुध्द


" अरे , माझं ऐकून तरी घ्याल कि नाही ? " सुजित


" हं बोल .. कुठं आहे डायरी ? " आर्यन , ऋतुराज सोबतच


" पहिलं तर डायरी सध्या माझ्याकडे नाही तर चुकून आकाशने तिच्या बॅगमध्ये टाकली .. . दुसरं असं की माझ्या सांगण्यापेक्षा तुम्ही डायरी परस्पर वाचली तर छान होईल ... " सुजित


" ठीक आहे ... " अनिरुध्द


" ठीक आहे , काय ठीक आहे ? भावा डायरी कुठे आहे ? " आर्यन


" सांगितलं ना तिच्या बॅगमध्ये आहे आणि ती उद्या सकाळी कुमारला भेटायला येणार तेव्हा सोबत घेऊन येणार आहे .." सुजित


" ती म्हणजे कोण ? " ऋतुराज


" उद्या आल्यावर माहित होणारच ... " सुजित


" अरे हे बाकी बरोबर नाही ... आधीच तर कुमारने न सांगता डायरी लिहिली हे एक नवलाची गोष्ट ... त्यात आणखी भर पडली डायरी वाचायला मिळत नाही .. " आर्यन


" एक आणखी नवीन , ती कोण ? तर भाऊ म्हणतो ते उद्या माहित पडेल ... म्हणजे लवकरच आम्हाला पण ऍडमिट व्हावं लागेल बहुतेक ..." ऋतुराज


" काही सांगता येत नाही ... एक एक नवीनच समोर येत आहे .." अनिरुध्द शब्दांना आवर घालून मध्येच थांबला .


पण तो ज्या भावनेनं बोलला ते कुणालाच कळलं नाही आणि त्यासाठी त्याने स्वतःचेच मनोमन आभार मानले ...


" बरं उद्या नक्की ना ... " ऋतुराज


" हो एकदम नक्की ... " सुजित


" नाहीतर पुन्हा विसरशील ... " आर्यन


" अनिरुध्द , तू लक्षात ठेव बरं उद्या काहीही होवो ती डायरी वाचायची आहे ..." आर्यन


" हो भावा , तू काळजी करू नको मी विसरणार नाही ... " अनिरुध्द


असं बोलत असता ते सर्व तिथेच आडवे झाले , वर आकाशाकडे नजर लावून कुमार सोबत असतांना जे क्षण सर्वांनी मिळून घालविले ते आज आठवून डोळ्यांवर झोप येण्याची वाट पाहत होते ... आज मन शांत होतं , कुमारला जाग आली तेव्हापासून सगळेजण काळजीतून जरा मुक्त झाले , एक नवीन आशा दिसत होती ... आता लवकरच कुमार बरा होईल असं सर्वांना वाटत होतं ... असा विचार करत सगळ्यांना झोप लागली पण अनिरुध्द अजून जागाच होता ... जशी आज त्याची झोप उडाली , जणू त्याच्यावर आज झोप रुसली अस त्याला जाणवलं ... तो बेचैन झाला , इकडून तिकडे कूस बदलत मध्यरात्र उलटून गेली ...

पण त्याला काही झोप येत नव्हती , डोळे मिटून तो तसाच पडून राहिला ... तो बॉक्स त्याच्या नजरेसमोर येत होता जणूं त्याला जवळ येऊन त्या बंदिस्त रहस्याला मुक्त कर असं सांगत होता ... शेवटी कुमारने जे काय लिहिलं ते तुझ्या बद्दलच ना मग ते तू त्याच्या मागे वाचलं तर काय बिघडणार ... आणि त्याने तुझ्यासाठीच लिहून ठेवले आहे ना मग इतका विचार कश्यासाठी ? का स्वतःला त्रस्त करून घेतोस ?


खरे पाहता हे सारे विचार त्याचेच , त्याच्याच मनातले जे तो त्या बॉक्सच्या रूपाने समोर आणले आणि स्वतःची बाजू भक्कम करू लागला ... त्याच मन अस्वस्थ झालं म्हणून तो विचारांच्या आहारी जाऊन बसला ...


आपण तसंच काहीसं करतो नाही का ? जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनावर ताबा मिळवते , मन द्विधा अवस्थेला जाते लय करावं काय नाही ? यात निर्णय घेता येत नाही तेव्हा जे मनाला योग्य वाटतं तिकडे आपण कलतो पण दुसऱ्या कोणत्यातरी बहाण्याने , निमित्याने मनासारखं करायला, वागायला पाहतो ...


तरी तो तसाच पडून राहिला कारण आता रात्र खूप झाली याची जाणीव त्याला होती यावेळी उठून पुन्हा तो बॉक्स खाली काढून ते कुमारने लिहिलेलं वाचत बसणं त्याला योग्य वाटलं नाही ... मोठ्या धीराने ते विचार दूर सारत तो शांत झाला आणि कोण्या एका क्षणाला त्याची समाधी लागली ... तो सुध्दा झोपला ...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED