Prem ? books and stories free download online pdf in Marathi

प्रेम...?

सर्वांनाच नजरेची भाषा समजते असं नाही. प्रेमात संवाद हा महत्त्वाचा आणि प्रेमात संवाद झालाच नाही तर?....


शाम हा उत्साही, थोडासा स्वप्नाळू आणि बराचसा हळवा,
नुकतीच दहावीची शाळा संपवून अकरावीत नविन शाळेत, नव्हे नविन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता.
नविन कॉलेज गावातून काही किलोमीटर अंतरावर असल्याने तो आणि त्याचे मित्र सायकलने जात.
बाल्यावस्था संपून आयूष्यातील सूवर्णकाळ म्हणजे तारूण्यात प्रवेश केलेला.या वयात मन अनेक गोष्टींत गुंतत जातं.या वयात वाटणारं आकर्षण स्वाभाविक आहे.त्यात कुणी झाडावर चढवलं तर मग विचारायलाच नको.

नविन कॉलेजचा पहिला दिवस मन पाखरासारखं भिरभिरायला लावणारा होता.नविन मित्र भेटत होते.नविन ओळखी होत होत्या.त्यात त्याला लहाणपणीची क्लासमेट प्रियांका कॉलेजमध्ये भेटली.नविन कॉलेज मध्ये ओळखीचं कोणीतरी भेटल्यामुळे थोडा धीर आला.

कॉलेजचा पहिला दिवस संपल्यावर शाम आणि त्याचे मित्र घरी येताना एका पानटपरीवर थोडं थांबले.समोरून येताना एक सुंदर मुलगी दिसली,तसं मित्रांनी शामला चढवायला सुरू केलं.एकजण बोलला,
"शाम तुझ्यात दम असेल तर त्या समोरून येणाऱ्या मुलीच्या डोळ्यात डोळे घालून बघून दाखव."

"नको, उद्यापण कॉलेजमध्ये यायचं आहे."

बाकीचे मित्र म्हणाले,"याच्यात दमच नाही."

तसा शामचा स्वाभिमान जागा झाला.
"काय व्हायचं ते होऊ दे,तू बघच माझा दम", असे म्हणून तो त्या मुलीकडे बघत राहिला.ती मुलगी लांब होती पण तीचं सौंदर्य इतकं सुंदर होतं की कोणीही तिच्याकडे बोलायचं सोडाच पण बघायचंही धाडस करत नव्हते.
ते धाडस शाम करत होता.ती जसजशी जवळ येतेय तसतसे मित्र हळूहळू सायकल घेऊन बाजूने जात होते.पण शाम एक टक बघत राहिला.
ती मुलगी खेड्यातली होती पण तीचं वागणं,चालणं, बोलणं शहरी मॉडर्न टायप होतं.तिला जाणवलं,की आपल्याकडे हा नविन मुलगा एकटक पाहतोय.तीनेही त्यांच्याकडे एकटक पहायला सुरू केलं.तिची चाल हात्तीच्या चालीसारखी मदमस्त चाल तिची होती.ती जवळ येत होती.मुलगी जसजशी जवळ येत होती, तसतसे हृदयाची धडधड वाढत होती,श्वासातील अंतर कमी जास्त होत होते.हे काय होतंय त्याला समजत नव्हते.
साधारणतः, खेडे गावातील मुली कुणी अनोळखी लोकांच्या समोर खाली मान घालून जातात.पण इथं सगळंच उलट होत होतं.तो तिच्याकडे पहातच होता आणि तीही त्यांच्याकडे पहात पढे पुढे येत होती.
ती आली, अगदी त्याच्या जवळ चालत आली, एक पाऊल अंतरावर आली आणि जवळून निघून गेली.निघून जाताना ती हळूच बोल़ली,

"खाली बघ पडशील".

शामला कुणीतरी जवळ येऊन थोबाडीत खण्णकन लावल्यासारखं झालं.
त्याचा फाजील आत्मविश्वास मोडून पडला.त्यानं ठरवून टाकले 'इथून पुढे मुलींच्या नादी नाही लागणार'.

दुसऱ्या दिवशी,शाम कॉलेजला गेला पण कालच्या प्रकरणामुळे कोणत्याही मुलीकडे तोंड वर करून बघायची हिंमत होत नव्हती.त्याची लहानपणीची क्लासमेट लहानपणी जशी होती तशीच टापटीप राहणारी,अतिशय स्पष्ट आणि धिटपणे बोलणारी,डॅशिंग प्रियांका क्लास संपल्यावर त्याला भेटली.तिला त्याचा स्वभाव माहीत होता.
ती बोलली,
"शाम,आजारी आहेस का?,आज काय कुणाशी बोलला नाहीस."

"नाही, तसं काही नाही, घरी जरा काम आहे.नंतर बोलू.चल,येतो मी."
, असे म्हणून तो सायकलवर बसुन निघून गेला.ती विचार करत राहिली,तो पहिल्या दिवशी जसा मनमोकळ्यापणाने बोलला तसा नंतर कधी बोललाच नाही.मग तिने ठरवले ,'त्याला बोलतं करायचं'.काही दिवस गेले.
ती अधूनमधून किरकोळ बोलायची.कधी अपसेंट राहिली तर त्यालाच नोट्स मागायची.
तोही तिला नोट्स दयायचा.हळूहळू तो निट होऊ लागला , मनमोकळ्यापणाने तिच्याशी बोलू लागला.एक दिवस तिने 'पप्पांनी घरी बोलावले आहे'असा निरोप दिला.
शाम आणि प्रियांकाचे वडीलही मित्र होते.त्यादिवशी पौर्णिमेचा सण होता.त्याने तिला नक्की येण्याचं आश्वासन दिले.पण त्याच्या एका मित्राने 'उमेशने' त्याला भिती घातली,

"जाऊ नकोस, तुला तिच्याशी रोज बोलताना अनेकांनी पाहिलंय.तुला घरी बोलावून मारतील."

शाम पुन्हा घाबरुन गेला काय करावे हे समजेना.एक मन म्हणायचं,'असं नाही करणार प्रियांकाचे वडील'. दुसरं मन म्हणायचं,'जर घरी बोलावून मारलं तर कॉलेजमध्येच नाही तर गावातही फिरायला लाज वाटेल.त्यापेक्षा न गेलेलं बरं'. तिच्या घरी जायचं मनात असताही तो गेला नाही.

नेहमी प्रमाणे शाम कॉलेजला जाऊ लागला पण प्रियांका नेहमी सारखी बोलत नव्हती.मग शाम पुर्वी सारखाच लाजरा, बुजरा,जरासा हळवा राहू लागला.आत्तापर्यंत ती कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांच्याशी बोलायची पण हा कधीही तिच्याशी स्वतःहून कधी बोलला नाही.आता तो बोलायचा प्रयत्न करत होता पण बोलू शकत नव्हता.त्याचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत चालले.
फक्त तिला मनमोकळ्यापणाने बोलायचं असा विचार करून कॉलेजमध्ये यायचा.त्याची प्रियांकाप्रतीची ओढ एक मैत्रीण म्हणून राहिली नव्हती.कारण ती तिच्या स्वभावानूसार आपुलकीने विचारपूस करायची.त्यामुळे ती एक मैत्रीण न राहता त्याच्या मनाला प्रेमाची भुरळ घालणारी परी वाटू लागली.तो रोज तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता पण जाऊन थेट,मोकळ्या भाषेत बोलू शकत नव्हता.आपण प्रेम करतो म्हणजे चुकीचे काहीतरी करतोय असे तो समजत असायचा.
प्रेमात नकार मिळेल याची फार मोठी भिती.त्याचाआत्मविश्वास कमी पडत होता तर कधी त्याचे विचार. पण काय उपयोग तीने अचानकच कॉलेज बदलले.भेटणं,बोलणं सगळंच थांबलं.मनातल्या भावना मनातच राहील्या.
काही वर्षांनी ती गावात भेटली.सुकलेलं तोंड करून खाली मान घालून समोरून जात होती.शामला कधी स्वप्नातही वाटले नव्हते की ती पुन्हा भेटेल.ती कुठे होती, काय करत होती ,तीचं कसं चाललंय हे न विचारता.

"तू मला सोडून कुठे गेली होतीस?."

असे पहिल्यांदाच ठणकावून विचारले.
ती रडायला लागली.तीने रडत रडत बोलायला सुरुवात केली,

"आठवतंय,तुला माझ्या पप्पांनी घरी बोलावले होते.मी माझ्या मनातले प्रेम त्यांना सांगून टाकले होते.आणि पप्पांनी मला सांगितले,'तो घरी नाही येणार.मी त्याला ओळखतो.घाबरट आहे तो.'मी पप्पांना सांगितले, की 'त्याला एक मित्र म्हणून बोलावले आहे.आणि माझा पुर्ण विश्वास आहे, तो येणार.'पण तू आला नाहिस.माझा माझ्यावरचा आणि जीवनावरचा विश्वासच उडाला.माझे आभाळच फाटले आणि ठरवले.'पप्पा म्हणतील त्यांच्याशी लग्न करायचं.आणि मी ते केलं."

"आणि तू ते केलं?.
मला न विचारता?.
कधी माझ्या भावनांचा विचार केलास?
मी का नाही आलो,मला विचारलेस?
इतकी कमजोर आहे का आपली मैत्री?
ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीसाठी रडावसं, त्याच्यासाठी हसावं,त्यांच्यासाठी साऱ्या दुनियेशी वैर पत्कराण्याचं बळ आपल्यात संचारावं,एवढंच काय तर त्यांच्यासाठी उभं आयुष्य वेचावं.इतकी ताकद असते प्रेमात."
तिला भावना आवेग आवरेना. ती बोलली,"बोल शाम, मी तुझी अपराधी आहे, तुला बोलण्याचा पुर्ण हक्क आहे.बोल.आज मन मोकळं कर."
त्याच्या डोळ्यांतून पाणी कधी आघळले त्यालाच समजले नाही.तो हुंदके देत देत स्वतःचे डोळे पुसत होता.तीही मोठमोठ्याने हुंदके देत होती.जशा दोन नद्यांचा संगम होत होता.
त्याच्या मनात असूनही तो तिचे. डोळे पुसू शकत नव्हता.कारण तिचं लग्न झालं होतं.

"आता तुझं लग्न झालंय, सगळं विसरून जा. जोडीदाराला सुखी ठेव आणि तू समाधानी रहा."
"मी विसरेन,पण तू विसरशील मला?"
त्याच्या मनाच्या अथांग सागराला भरती आली होती.त्याला जाणवलं तो आसवांना सावरू शकणार नाही.तो निशब्द झाला आणि निमूटपणे मागं वळून न पाहता तसाच निघून गेला.
रस्त्याकडेला ती एकटीच गहिवरून रडत होती.तो दूर निघून गेला होता, मात्र तो नजरे आड होईपर्यंत ती तशीच त्याच्याकडे पाहत उभी होती.
डोळे मिटून पाहीलेल्या स्वप्नांना,उघड्या डोळ्यांनी तुटताना पाहत होती.........

_सुभाष मंडले
(9923124251)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED