मला काही सांगाचंय.... - ४० - १ Praful R Shejao द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला काही सांगाचंय.... - ४० - १

४०. एक घाव आणखी - 1

कुमारने असं लिहिलेलं वाचत असता प्रत्येक पानागणिक पुढे काय ? हि उत्सुकता तिच्या मनात कायम राहिली , ती पुढे पुढे वाचत असताना कधी तिला प्रश्नांनी जाळ्यात ओढलं , तर कधी विचारमग्न केलं ... कधी तिला खूप हसू आलं ती आठवणीत हरवून गेली , भानावर आली की पुन्हा एकदा कुमारची डायरी या वेगळ्या दुनियेत एकरूप होऊन गेली ... डायरी जसजशी वाचून पूर्ण व्हायला लागली तेव्हा ती डायरी संपायला नको असंही तिला वाटायला लागलं , डायरीचे शेवटच्या पानातील काही प्रसंग तिला इतके अधीर करून गेले की तिच्याही पापण्या ओलावल्या , अश्रू अनावर झाले गालावरून खाली ओघळले ... सायंकाळचे ७ वाजून गेले , सूर्य मावळला तेव्हा तिने शेवटचं पान वाचून डायरी मिटली आणि अखेर डायरीचं गुपित उघड झाले पण ते गुपित होते तेच बरं होतं असं तिला राहून राहून वाटलं ... रोज नजरेसमोर असणारा हॉल तिला जास्त मोठा वाटायला लागला आणि एकटंपण इतक्या तीव्रतेनं जाणवलं की ती बेडरूम मध्ये गेली , तिने बिछान्यावर अंग टाकलं तसं विचारांनी तिला चारही बाजूंनी घेरलं ... असं का झालं ? खरंच कुमारने किती दिवस हे सारं काही गुपित ठेवून जगणं कबूल केलं ? त्याची चूक झाली होती का ? कि आणखी कुणाची ? कुमारला समजून घ्यायला हवं होतं ... प्रश्न तिचा पाठलाग करत होते , वारंवार मनात येणाऱ्या प्रश्नांनी तिला भंडावून सोडले , डोकं पार जड झालं , अखेर स्वतःला कसतरी सावरून तिने ओल्या पापण्या पुसल्या ती डायरी तिथेच ठेवून ती हॉलमध्ये येऊन सोफ्यावर बसली ...

ती भावूक होऊन हॉलमध्ये कितीतरी वेळ तशीच बसून राहिली , अजूनही ती त्या डायरीच्या जगात वावरत होती , बाहेर सूर्यास्त होऊन अंधार पडला तरी तिने लाईट सुरु केले नव्हते ... दारावर लावलेली बेल वाजली ती भानावर आली , ती जड पावलांनी सोफ्यावरून उठली , तिने हॉलमधील लाईट सुरु केले आणि दार उघडले ... पतीला एक नजर पाहून तिने त्याच्या हातातील बॅग आणि टिफिनची पिशवी हाती घेतली , रूममध्ये जाता जाता तिने टिफिन किचनमध्ये ठेवला , त्याची ऑफिस बॅग रूममध्ये ठेवून हॉलमध्ये आली , तो घरी परत आल्याने तिचं एकटंपण नाहीस झालं , तिच्या बेचैन मनाला जरा आधार मिळाला ...

" मी पटकन हातपाय तोंड धुतो , लवकर गरमागरम चहा बनवं , आज ऑफिसला इतकं काम होत कि डोकं असं जड झालं की काय ? "

तिने हसऱ्या मुखाने त्याला होकार दिला आणि तो सोफ्यावरून उठून हातपाय धुवायला गेला , ती किचनमध्ये चहा बनवायला ... थोड्या वेळातच ती दोन कप चहा आणि थंडगार पाण्याची बॉटल घेऊन हॉलमध्ये आली , दोघांनी हाती कप घेतले , त्याने चहा प्यायला सुरुवात केली ... एक घोट चहा पिल्यानंतर - " वा ! तु आज काय चहा बनविला ! लाजवाब , बऱ्याच दिवसांनी हि चव जिभेला लागली ... "

तिने अजून कप हातातच धरलेला , ती विचारात बुडालेली , त्याच्या बोलण्याने तिला भान आलं " दररोज जसा बनविते , तसाच आजही बनविला ... "

" पण आजचा चहा जरा विशेष वाटतोय , तू प्यायली नाहीस का ? "

" जरा थंड झाल्यावर पिणार ... म्हणून "

" झाला असेल की थंड , खरंच खूप मस्त चहा ... वाहवा ..! " म्हणत त्याने एक घोट आणखी घेतला .

तिनेही कप ओठाला लावला , एक घोट घेतल्याबरोबर तिला कळलं की चहात साखर टाकलीच नाही आणि म्हणूनच तो तिची मस्करी करतोय , " सॉरी हं , चहात साखर टाकली नाही , माझ्या लक्षातच आलं नाही ... "

" असू दे , कधी कधी लक्ष नाही राहत ! "

तिने दोन्ही कप किचनमध्ये परत नेले आणि पुन्हा एकदा चहा घेऊन ती हॉलमध्ये आली , दोघांनी चहा घेतला ... " my dear wife , काय झालं ? आज शांत का ? बरं वाटत नाही का ? "

" मी बरी आहे , मला काहीही झालं नाही .."

" आज खूपच शांत आहेस आणि चेहरा जरा उतरल्यासारखा दिसतोय ... "

" इतक्यात उन्ह खूप तापत आहे ना म्हणून ... "

" ठीक आहे ... रोजच्या कामात हि चुकभुल होते , चहाचं मनाला लावून घेऊ नकोस .... "

" चहाचं काय मनाला लावणार , आलेच .. " असं त्याच्याशी बोलून तिने स्ट्रे उचलला , ती किचनकडे निघाली ... चहा प्यायला वर तिचंही डोकं जरा शांत झालं , तिला क्षीण कमी होऊन तरतरी आल्याचं जाणवलं ... मग ती काही वेळ पतीसोबत टी व्ही पाहत बसली , त्याच्या सहवासात ती पुन्हा बोलकी झाली आणि तीच मन परत ताळ्यावर आलं ... तिने किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करायला सुरुवात केली ....

continue...