मला काही सांगाचंय.... - ४० - २ Praful R Shejao द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मला काही सांगाचंय.... - ४० - २

४०. एक घाव आणखी - 2

इकडे रुग्णालयात ---

जेव्हा जवळपास ६:३० वाजलेले , डॉक्टर देवांश वैद्य आणि नर्स यांनी कुमारला तपासलं , त्याच्या तब्येतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली हे त्यांना कळलं आणि त्याचा त्यांना आनंदही झाला पण तो आनंदाचा क्षण कुमारच्या आई वडील , भाऊ , नातेवाईक , मित्र यांना सांगण्याआधीच जागीच विरला , एका चिंतेचा तिथे उगम झाला . सुरुवातीला डॉक्टर वैद्य यांना विश्वासच बसेना जे अनुभवास आलं ते इतकं अनपेक्षित होत की त्यांनी पुन्हा पुन्हा ती गोष्ट खरी आहे याची खात्री करून घेतली आणि लवकरात लवकर कुमारच्या कुटुंबियांना या गोष्टीची कल्पना देणे आवश्यक आहे हे जाणून आधी तिन्ही वडील मंडळींना केबिनमध्ये बोलावलं .... त्यांना धीर देत समोर बसवून शांततेने , मन घट्ट करून ऐकायला हवं असं सांगून कुमारची अशी अवस्था का झाली ? तो कुणाशीही काहीच का बोलत नाही ? या प्रश्नाचं उत्तर देताना त्यामागचं कारणही सर्वांना पटवून दिले . डॉक्टरांचं म्हणणं ऐकून जणू कुमारच्या वडिलांवर आभाळच कोसळलं , त्यांना डॉक्टर काहीतरी चुकीचं तपासणी करून अस बोलताहेत , अस वाटणं स्वाभाविक होते ... पण डॉक्टर जेव्हा म्हणाले की कितीही नाकारलं तरी वास्तव बदलणार नाही आणि मी तुम्हाला जे काय सांगितलं ते सर्व मी खात्री केल्यावरच कळवलं ... याक्षणी तुम्ही खचून जाऊ नका कारण कुमारचं ऑपरेशन करून त्याला वाचवणं जितकं मोठ्ठ आव्हान वाटलं होतं त्यापेक्षा जास्त मोठं आणि अगदी अनपेक्षित अस आपल्या समोर येऊन उभं आहे . फक्त तुम्ही सर्व धीराने या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहा , बाकी आम्ही तुमच्या सोबत आहोतच ..

ते तिन्ही वडील मंडळी केबिनमधून चेहऱ्यावर आलेली चिंतेची लहर लपविण्याचा प्रयत्न करत बाहेर पडले , त्यांना खरंच अजूनही कानाने जे ऐकलं ते विश्वास ठेवण्यासारखं वाटत नव्हतं आणि म्हणूनच ते बाकीच्यांना सांगाव कि नाही हे त्यांना कळत नव्हतं , तर त्यांना सांगावं तरी कसं ? हाही एक प्रश्न होता ... त्या तिघांना केबिनबाहेर आल्याचं पाहून कुमारची आई , प्रशांत , आकाश , आर्यन , अनिरुध्द , सुजित आणि ऋतुराज सर्व ते इकडे जवळ यायची वाट पाहत होते , ते कुमारच्या रुमजवळ पोहोचण्यापूर्वी हे सर्वजण त्यांच्याजवळ जाऊन बाजूने गोळा झाले .. बराच वेळ एकमेकांना पाहून मग सुजित आणि आकाश यांच्या वडिलांनी दोघांनी मिळून डॉक्टर काय म्हणाले ते त्यांना सांगितलं , सुरुवातीला कुणालाच काही कळलं नाही तर जेव्हा कळलं तेव्हा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता ... डॉक्टरांनी बरोबर तपासलं नसणार , ते रिपोर्ट आणखी कुणाचे तरी असतील , असे सर्व त्यांना सांगत होते .. कुमारच्या वडिलांनी त्यांना डॉक्टर जे म्हणाले ते सर्व खरं आहे आणि पूर्ण खात्री केल्यावर त्यांनी आम्हाला बोलावून सांगितलं ... नशिबानं हा खेळ चालवला आहे , कुमारशी , आपल्याशी ... यावेळी त्यांच्या डोळ्यांत आसवं आले , सर्वजण त्यांना धीर देत जे घडलं ते मान्य करून निराश झाले .

ती माऊली आशेनं कुमार ठीक होईल आपल्या मुलाच्या पुनर्जन्माचं सुख पदरात आलेलं परतून गेलं म्हणून टाहो फोडायला लागली , प्रशांत आणि बाकी सर्व तिला आणि स्वतःला सावरायला लागले . वास्तव समजून घ्यायला सर्वांना बराच वेळ लागला मग काय पुन्हा दुःखाची नव्याने बोचल्याची जाणीव झाली . सर्वांना आज वास्तव हे नेहमीच कल्पनेपेक्षा वेगळं असतं याची खात्री पटली , नशीबासमोर सगळे हतबल झाले , बाहेर सूर्य मावळला , इकडे रुग्णालयात कुमारच्या कुटुंबासह , मित्र परिवाराचे आशेचे किरणं लोपले तिथे जणू स्मशान शांतता पसरली . कुमारच्या रुमजवळ तिन्ही वडील मंडळी उभे , बाजूच्या खुर्च्यांवर ती माउली , प्रशांत , आकाश .. तेथून पुढे काही अंतरावर आर्यन , सुजित , अनिरुध्द आणि ऋतुराज मनात विचारांचं वादळं उठलेलं असून गप्प उभे राहिले . वेळेचं भान आल्यावर बाहेर चांगलाच अंधार पडला त्यांना समजलं , रात्री आपण सर्व इथे थांबू शकणार नाही म्हणून लवकर निघायला हवं या विषयाने शांतता भंग पावली , तेव्हा तिन्ही वडील मंडळी कुमारजवळ थांबणार आणि बाकीचे सर्व परत जाणार अस ठरवून तिथून घरी जायला निघाले , जी वेळ कुमार वर आली किंवा नियतीने आणली , त्याच्या कुटुंबाला आधाराची आता खरी आवश्यकता आहे हे समजून सगळे कुमारच्या घरीच पोहोचले . ते सर्व घरी आले तेव्हा संध्याकाळचे ७:३० वाजून गेले होते , सर्वजण हातपाय धुऊन घरात बसले तर ती माऊली डोळ्यांत पाणी आणि कुमार बरा होऊ दे अस मागणं देवाकडे करून मनोभावे पूजा करून , देवघरात बसली ... अशी वेळ का म्हणून आमच्या आयुष्यात यावी ? का कुमारला हे सारं सोसावं लागत आहे ? तुला कधी काहीच कमी केलं नाही तरी तू आमच्यावर का म्हणून रुसला ? असे प्रश्न विचारून तिने मनातलं गाऱ्हाणं देवापुढे मांडलं पण तरी तोच मदत करेन या आशेने नतमस्तक होऊन पाया पडली ... .. .