शोध चंद्रशेखरचा! - 20 suresh kulkarni द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

शोध चंद्रशेखरचा! - 20

शोध चंद्रशेखरचा!

२०---

राकेश ऑन लाईन होता. कंट्रोलरूमला डिफेन्स सेलचा स्पेशल मेसेज होता. 'बक्षी भिवंडी एरियात पीटर नामक माणसाच्या कोल्ड स्टोरेजच्या गोडाऊन जवळ आहे. अलर्ट रहा!.' राकेशने झटक्यात इरावतीच्या फोनचे लोकेशन चेक केले. कारण तिने, चंद्रशेखरच्या प्रकरणात बक्षी असल्याची शंका राकेश जवळ व्यक्त केली होती. बापरे! इरावतीच्या मोबाईलचे लोकेशन, भिवंडीच्या त्याच 'पीटर कोल्ड वेयर हाऊस' दिसत होते! त्याने तिच्या पोलीस स्टेशनला फोन लावला. शकील ने त्याचा कॉल उचलला.

"शकील, इरा धोक्यात आहे! ताबडतोब तिला कव्हर करा! मी तुझ्या मोबाईलवर ते लोकेशन पाठवतो. असतील तेव्हडे निघा. बाकी कुमक काही वेळात पोहचेल."

शकील आणि शिंदेकाका लगेच निघाले.शकीलने गि पि यस वर, राकेशने पाठवलेले लोकेशन टाकून मोबाईल स्टँडला लावला. आणि व्हॅन सुरु केली. मागच्या बाजूला दोन रायफली ठेवल्या होत्या. बुलेची पेटी शिंदे काकांच्या हाती होती.

राकेशने जोग साहेबाना हॉट लाईनवर स्पेशल रिपोर्टींग केले. धाड-धाड फोन खणखणत होते. भिवंडीच्या आसपासच्या सगळ्या पोलसांच्या गाड्या, त्या कोल्ड स्टोरेजच्या रोखाने धावत होत्या! त्यासाठी इमर्जन्सी रोड ट्राक्स मोकळे केले जात होते. त्याच बरोबर चार ऍम्ब्युलन्स, दोन फायरब्रिगेडच्या गाड्या त्या कोल्डस्टोरेजच्या दिशेने धावत होत्या! कारण बक्षी म्हणजे आग, आणि मुडद्याची रास असणार हे सांगायला, जोगांना ज्योतिष्यांची गरज नव्हती! याच घाईत राजेंनी सुद्धा जोगांशी संपर्क साधून, हवी ती मदत करण्याची तयारी त्यांनी दाखवली होती!

इरावतीने जखमी दंडाला पायातला सॉक्स बांधला. कस्तुरीचा खिशातला चिंटूर्ना लेडीज रुमाल उपयोगाचा नव्हता. ती उभी राहिली. अंगावरचा तो थर्मल ओव्हरकोट व्यवस्थित लपेटून घेतला. माणिक समोर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तियाच्या जवळ गेली त्याचे मनगट हातात घेऊन त्याची नाडी तपासली. खूप मंद चालत होती. उम्मीद कमीच होती. त्याच्या खिशातून डोकावणारा मोबाईल, तिने काढून घेतला आणि आपल्या खिशात सरकवला! माणिक पडला होता तो पॅसेज ओलांडून ती आत गेली आणि गचकन जागीच थांबली! ती येण्यापूर्वी येथे भलतेच नाट्य घडून गेल्याचे पुरावे, समोर पडले होते! दोन ताजे मुडदे आणि पलीकडे, एक गोठलेले प्रेत, भिंतीलगतच्या कोपऱ्यात होते! हाच तो चंद्रशेखर असणार हे तिने ताडले! तिच्या पायाला गरम हवेची जाणीव झाली. ती हवा एका रॅक मागून येत होती. तिने त्या रॅक मागे डोकावले, एक माणूस कसाबसा जाऊशकेल इतका, गोडाऊनच्या सहा इंच जाड लोखंडी पॅनलचा पत्रा कापला होता! गोडाऊनच्या भिंती अशाच सहा इंच रुंदीच्या मेटल सीटच्या बनवल्या होत्या! या मार्गही कोणी तरी येऊन गेले होते! कोण?

बाहेर ऑटोलोक झालेल्या, गोडाऊनच्या दारावर धडका बसत होत्या. ती, ते दार उघडल्या साठी धावली, ती तेथवर पोहचायच्या आत, पोलिसांनी ते दार मोडून पडले आणि बंदुका घेऊन आत प्रवेश केला होता. सगळ्यांनी आपापली हत्यारे तिच्यावर रोखली होती! तिने दोन्ही हात वर केले. दंडाला रक्ताने माखलेले फडके बांधलेली हि जखमी पोरगी, या येथे काय करतीयय? हाच प्रश्न प्रत्येकाच्या डोळ्यात होता. तेव्हड्यात शकील पुढे सरसावला.

'मॅडम, तुम्ही ठीक आहेत ना?"

हि पोरगी इन्स्पेकटर असल्याचे कळल्यावर, सर्वानी बंदुकी खाली केल्या. एम्बुलन्स मधल्या एका डॉक्टरने तिच्या जखमेवर तेथेच मलमपट्टी केली.

गोडाऊन मधून तीन बॉडीज आणि एक जखमी स्ट्रेचरवरून हलवण्यात आले. फिंगर प्रिंट, पंचनामा वगैरे कामे सुरु होती.

थोडी सवड मिळाली तशी, इरावतीने अर्जुनाला रिंग केली. नुसतीच रिंग वाजत होती! 'आपण संपर्क करू इच्छिता ती व्यक्ती उत्तर देत नाही! थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा!' हेच उत्तर येत होते. काय झालं असेल? शिंदे काकांवर राहिलेली जवाबदारी सोपवून ती निघाली. गोडाऊन मधून बाहेर पडताना, तिने अंगावरचा ओव्हरकोट, तेथील भिंतीवर परत ठेवताना, तिचे लक्ष्य शेजारच्या रिकाम्या हुक्स कडे गेले. तिने लटकवलेला हुक सोडून चार हुक रिकामे होते. दोन डेड बॉडीवर दोन ओव्हरकोट, जखमी माणिकच एक, म्हणजे एकूण तीन झाले, मग चौथा हुक रिकामा कसा? आजून कोणी तरी गोडाऊन मध्ये आहे किंवा होते! ती झटक्यात माघारी फिरली. असलेल्या फोर्सच्या मदतीने, तिने तासभर त्या गोडाऊनची इंच ना इंच चाळून काढली. कोणीच सापडले नाही. हा पाचवा माणूस कोण होता? आणि गेला कोठे? हा भुंगा तिचे डोके पोखरू लागला.

०००

इरावतीने अर्जुनाला पुन्हा फोन लावला. नो रिप्लय! कस्तुरीचा मोबाईल तर, इरावतीजवळच होता, त्यामुळे तिला लावता येत नव्हता, आणि तिचा दुसरा नंबर इरावतीकडे नव्हता! तिने पोलीस व्हॅन ताब्यात घेतली आणि सुसाट वेगाने कस्तुरीचा घराकडे निघाली.

कस्तुरीचा फ्लॅटचे दार उघडेच होते! तिने आत पाऊल टाकले आणि स्ट्याच्यु सारखी उभी राहिली. समोर जे दिसत होते, त्याचा ती स्वप्नातही विचार करू शकत नव्हती! दोन्ही टवळ्या दारू पिऊन वेड्या वाकड्या पसरल्या होत्या! कार्पेटवर! टी पॉय वर अर्धवट भरलेली जीनची बाटली दिसत होती. इरावतीने घड्याळात पहिले रात्रीचे आकरा वाजून गेला होते. येथून घरी जाण्या पेक्षा इथंच थांबावं असा तिने निर्णय घेतला. आधी फ्लॅटचे दार बंद करून घेतले. जीनची बाटली तोंडाला लावली आणि तेथेच सोफ्यावर कलंडून झोपली! दिवस भराची दगदग झाली होती. तिलाही विश्रांतीची गरज होतीच!

०००

तो जुनाट टेट्रा ट्रक सावकाश मेन रोडला लागला. कसलीही घाई न करता, आपल्या इस्पित ठिकाणी पोहंचला. ते ठिकाण एका ओसाड जागेतल्या एका टेकडीवर होते. एक बंगली वजा घर! आणि त्या टेकडीच्या पायथ्याशी, जेथून टेकडीवर जाण्यास वाट होती, तेथे एक बोर्ड लिहला होता. "अंडर पझेशन ऑफ मिलिटरी!" आणि त्या बंगलीच्या दारात मिस्टर राजे, आपला आवडता पाईप ओढत उभे होते! तो टेट्रा ट्रक येताना पाहून, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरेल होते! कमांडोज त्याचा टास्क पूर्ण करणार हे त्यांना माहित होते! आपल्याच देशात कमांडो वापरण्याची, हि त्यांच्या हयातीतली पहिलीच वेळ होती. बक्षी कडून अतिरेकी कारवायांची बरीच माहिती मिळणार होती!

०००

चैत्राली ऑफिस मधून तिच्या छोट्याश्या फ्लॅट मध्ये परतली होती. तोंडावर गार पाण्याचा हबका मारून तिने जवळच्या मऊ, सुती नॅपकिनने चेहरा साफ केला. साडी बदलून गाऊन घालून, ती नेहमी प्रमाणे वेताच्या झोपाळ्यात, फिल्टर कॉफीने भरलेला, स्टीलचा उभा ग्लास घेऊन बसली. त्या कडवट कॉफीचा गरम घोट घश्याखाली जाताना, गायत्रीची आठवण देऊन गेला. जीवनाचा चित्रपट चैत्रालीच्या नजरे समोर तरळत होता.

गायत्री खरे तर तिच्या पेक्ष्या, दोन वर्षांनी लहानच होती. तरी तिचा प्रेमळ स्वभाव, आणि इमोशनल इंटेलिजंसी वादातीत होती. काहीशी लाजाळू गायत्री, निर्णयाला मात्र पक्की होती. चैत्रालीच्या 'त्या' निर्णया मागे ती खंबीर पणे उभी राहिली होती!. तेव्हा पासून चैत्राली तिला, 'दीदी' म्हणू लागली. काय होता तो निर्णय?

तिच्या जन्मा नंतर, मशीन मेंटेनंस करताना तिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. छोट्या रुद्रकान्तला आईने सांभाळे. आजी आजोबा (आईचे आई बाबा) दुसऱ्या लग्नासाठी तरुण मुलीचे मन वाळवत होते. पण तिला रुद्रकांतची काळजी होती. 'आम्ही रुद्राचे संगोपन करू, त्याची काळजी करू नकोस.' म्हणून तिचे लग्न एका उद्योगपतीशी करून दिले. तिने पहिल्याच रात्री रुद्रकान्त विषयी आपल्या नवऱ्याला सांगितले. तो हि मोठ्या मनाचा, 'माझी हरकत नाही. रुद्रकान्त आला तर ठेवून घेईन!' म्हणाला. पण आजी आजोबा म्हणाले होईल तोवर आम्हीच सांभाळतो! गायत्रीचा जन्म झाला. रुद्रकान्त होस्टेलला राहून शिकत होता, कारण आजीच्या खेड्यात चांगल्या शाळा नव्हत्या! शाळेचा खर्च गायत्रीचे पपाच करत. अधून मधून गायत्री आणि आई रुद्रकांतला भेटत, घरी येण्यासाठी त्याचे मन वाळवत. पण तो टाळत असे. आईने दुसऱ्याच्या घरी राहायला गेल्याचे त्याला आवडले नव्हते. तो तिला टाळायचा, पण गायत्री बरोबर तो छान मिक्स झाला. दोघांचे वय वाढत गेले. नियतीचे आघात होत गेले. आजी आजोबाला वार्धक्याने नेले. आणि आईच्या हार्ट आट्याकने रुद्रकान्त, गायत्री आणि गायत्रीचे पप्पा पोरके झाले! रुद्रकांतचे दैव, काही वेगळी योजना करत होते. रुद्रकान्त लहानपणा पासून नाजूक अन लाजाळू होता. मैदानी खेळा पेक्षा त्याचे घरगुती खेळातच ज्यास्त लक्ष असायचे. क्रिकेट पेक्षा बाहुला - बाहुलीचे लग्न या खेळात त्याला ज्यास्त रस वाटायचा. आठवी नववी पर्यंत त्याची फेमाईन बाजू ज्यास्त विकसित होत गेली! पुरुष देहात एक स्त्री मन, नियती वाढवत होती! गायत्री जवळ त्याने आपले मन मोकळे केले. होणारी घुसमट काबुल केली. गायत्रीने लिंग परिवर्तन करून घेण्याचा नुसताच सल्ला दिला नाही तर, त्या मागे ठाम राहिली! गायत्रीच्या पप्पानी, एका हि शब्दाने न विचारता आर्थिक बळ उभा केले! रुद्रकान्त 'चैत्राली' नावे कविता करायचा. तेच नाव, नव्या व्यक्तीमत्वा साठी योग्य असल्याचे गायत्रीने सुचवले. रुद्रकान्त 'चैत्राली' बनून इंग्लंडला मॅनेजमेंटच्या कोर्स साठी रवाना झाला! तेथून चैत्रालीने एका आफ्रिकन डायमंड कंपनीची ऑफर स्वीकारली. गायत्रीने चंद्रशेखर बरोबर असलेल्या प्रेमा पासून ते लग्नापर्यंतचा वृत्तांत चैत्रालीला कळवळा होता. त्यानंतरच्या घडामोडी तिने शोधून काढल्या. गायत्रीचा अपघात झाला, त्याच्या दुसरे दिवशी ती मुंबईत उतरली होती! 'चंद्रशेखरला धडा शिकवायचा आणि दीदीला तिचा हक्क परत मिळवून द्यायचा!' हा प्रण करूनच! खचलेल्या दीदीने आत्महत्या केली! ज्या चंद्रशेखरमुळे दीदीने आत्महत्या केली,त्या चंद्रशेखरला जगण्याचा अधिकार का म्हणून द्यायचा? चैत्रालीने आपले आफ्रिकेतील भारतीय कॉन्टॅक्टसचा वापर करून चंद्रशेखरच्या गॅलॅक्सित प्रवेश करून घेतला! आणि ती कामाला लागली.

तिच्या फोनच्या रिंगने तिची तंद्री भंग पावली.

******