Shodh Chandrashekharcha - 22 - last part books and stories free download online pdf in Marathi

शोध चंद्रशेखरचा! - 22 - अंतिम भाग

शोध चंद्रशेखरचा!

२२---

इरावतीने ते पाकीट हातात घेतले. हीच ती वस्तू असण्याची शक्यता होती, जी चंद्रशेखर कडून विकीने घेतली होती! तिने ते पाकीट आलटून पालटून पहिले, सामान्य प्रकारचे ते पाकीट होते. अशी पाकीटे, शेकडोंच्या संख्येने फुटपाथवर मिळाली असती. पण असे काहीतरी यात विशेष आहे, कि ज्यासाठी दुबईतून बक्षी सारखा खतरनाक माणूस, मुंबईत आला होता! या पाकिटाचा संबंध जर अतिरेक्यांशी असेलतर? तर हि गोष्ट राजेंच्या कानी घालणे गरजेचे होते.

तिने राजेंसरांचा पर्सोनल नंबर फिरवला.

राजेंनी तो फोन कट केला. क्षणभरात तिच्या मोबाईलची रिंग वाजली.

"इन्स्पे. इरावती. एक गोष्ट लक्षात ठेवा. मला डायरेक्ट फोन करत जाऊ नका! कारण हे कॉल लीक होऊ शकतात. त्या साठी विशिष्ट सोय असते, ती करावी लागते. आता सांगा काय काम होत? का फोन केलात?"

"सॉरी सर, मला याची कल्पना नव्हती. माझ्या हाती एक लेदरच पाकीट आलाय. ते चंद्रशेखरच्या खिशातून, बहुदा विकीने काढून घेतलं होत. चंद्रशेखर अपघातापूर्वी दुबईला गेला होता! आणि त्या पाकिटावर 'अफगाण लेंडर्स, दुबई' हा लोगो एम्बॉस केलेला आहे! हे पाकीट, बक्षी आणि दुबई यांचा काहीतरी संबंध असावा, असा माझा संशय आला. म्हणून तुम्हाला डिस्टरब केलं!"

पलीकडे सन्नाटा होता!

"सर! काय झालं? आहेत ना लाईनवर?"

"इरावती, तुम्ही कोठे आहेत?"

"मी, माझ्या स्टेशनला आहे?"

"गुड! तुमच्याकडे बुलेटप्रूफ जॅकेट असेलच!"

"हो, पण का?"

"प्रश्न विचारू नका! ते आधी अंगात घाला. माझी बॉम्ब विरोधी कार वीस मिनिटात तुमच्या स्टेशन समोर असेल. ते पाकीट घेऊन गाडीत बसा! भेटू!" राजेंनी फोन कट केला.

काहीतरी भयानक घडत होत!

फोन कट झाल्याच्या अठराव्या मिनिटाला, इरावतीच्या पोलीस स्टेशन समोर, पांढरी दणकट गाडी उभी राहिली! ती गाडीत मागच्या बाजूला बसली तशी, गाडीच्या खिडक्या आणि ड्राइव्हर सीट मागचा पडदा काळ्या आच्छादनाने झाकला गेला. आपण कोठे जात आहोत हे इरावतील कळेना!

००००

इरावती राजेंच्या ऑफिस मध्ये पोहंचली तेव्हा तेथे काही पांढऱ्या ऍप्रन मधली काही मंडळी उभी होती. इरावतीने न बोलता ते पाकीट त्यांच्या हवाली केले. ते लोक ते पाकीट घेऊन शेजारच्या रूम मध्ये गेले. तेथे एक छोटीशी लॅब होती.

"बसा, इन्स्पे. इरावती! कॉफी घेणार?" राजेंनी विचारले.

"चालेल सर, पण एक रिक्वेस्ट होती. मला नुस्त 'इरा' म्हटलं तरी चालेल. तुम्ही आहो, जाहो, म्हणता त्याने मला, आवघडल्या सारखं होत!"

" स्त्रियांना आदराने वागवावे अशी आपली संस्कृती सांगते. मग पाळायला हवी ना? तरी ठीक, तुमची परवानगी असेल तर, 'इराच' म्हणेन. नाही तरी तू माझ्या मुली सारखीच आहेस!"

कॉफी आली. ती पिताना इरावतीच्या वागण्यात मोकळेपणा आला होता .

"सर! सर्पराईझ! पाकिटातून एक कोडेड मेसेज निघालाय!" शेजारच्या रूम मधून तो धावत आलेला माणूस म्हणाला.

"बापरे! या वेळेस वेगळाच मार्ग शोधलाय हरामखोरानी! जाधव, तो मेसेज डी-कोड करून मला फॉरवर्ड करा!" राजे आपल्या खुर्चीतून उठत म्हणाले.

"चल इरा, तुला जात-जाता घरी सोडतो!" ते इरावती कडे वळून म्हणाले. इरावती क्षणभर घुटमळली. राजेंच्या ते लक्षात आले.

"इरा, तस मला बंधनकारक नाही, पण तुला त्या मेसेजची माहिती जरून सांगेन! अर्थात योग्य वेळी!"

इरावती राजेंच्या पाठोपाठ गाडीत बसली.

०००

दोन दिवस आख्या भारतभर धाड सत्र सुरु होते. किलोंशी आरडिक्स, जिलेटीनच्या कांड्या, एके सत्तेचाळीचे बॉक्सेस, देशी -विदेशी करंन्सीजचे साठे, उकरून काढले जात होते. अनेक नामवंत पुढारी, आणि उच्च दर्जाचे अधिकारी चौकशीच्या, कारणा साठी पकडले गेले होते!

०००

इरावतीने चंद्रशेखरच्या केस वरून शेवटचा हात फिरवला. मुख्य आरोपी चैत्राली होती. अपघाती खुनाचा कट रचणे, हा तिच्यावरचा मुख्य आरोप होता. विकीवर अपघातात सापडलेल्या व्यक्तीस वैद्यकीय माहिती पासून वंचित ठेवणे, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे, आदी आरोप होते. पण त्यात दम नव्हता. एखादा चांगला वकील त्याचा बचाव करू शकणार होता. यातील बक्षी सहभागाचा निर्णय, राजे सरांच्या कक्षेतला होता. या प्रकरणात विचित्र घटनांनी इरावतीची चांगलीच दमछाक झाली होती.

०००

इरावतीच्या टेबलवर 'गॅलॅक्सि सोलुशनशन्स'च्या नाव बदलण्याच्या कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका पडली होती. प्रेषक होती कस्तुरी! शिवाय तिचा कार्यक्रमास येण्याचा आग्रही फोन पण आला होता.

इरावतीस, राजे सरांनी पोलीस हेडकार्टरला भेटीस बोलावले होते. जाता जाता कस्तुरीला 'हाय' करून जाण्यासाठी, ती हॉलवर पोहंचली. व्यासपीठावर 'गॅलॅक्सि सोल्युशन्स नाऊ विल वर्क्स ऍज 'गायत्री सोल्युशन्स' हे बॅनर पाहून तिला सुखद धक्का बसला. इरावतीकडे फारसा वेळ नव्हता. घाईत तिने कस्तुरीला गाठले. कस्तुरी खूप गोड दिसत होती. तिच्या जवळ एक आठ - नऊ वर्षाचा काळा सावळा मुलगा उभा होता.

"काय कस्तुरी, हे काय पाहतीयय मी? तू चंद्रशेखरची कंपनी घेतलीस? आणि तीच नाव पण बदलती आहेस आणि ते सुद्धा 'गायत्रीचे' नाव ठेवती आहेस! माझा विश्वासच बसत नाही!"

"इन्स्पे. इरावती! तुम्ही आलात, तुमची वाटच पहात होते. तासाभरात डिनर आहे. जेवल्याशिवाय जायचं नाही!" कस्तुरीने आग्रह केला.

"सॉरी. डिनर पुन्हा केव्हातरी. मी खूप घाईत आहे. तुझं अभिनंदन करण्यासाठी आणि हे कस झालं आणि का केलं हे जाणून घेण्या साठी आली आहे!"

कस्तुरीने खूण करून इरावतीसाठी कोल्डड्रिंक मागवले.

"मॅडम, मला हवी तर वेडी म्हणा, आजचे 'गॅलॅक्सि' हि चंद्रशेखरने गायत्रीच्या लुबाडल्या पैशाची कमाई आहे! चंद्रशेखरची बायको म्हणून, आज ती कंपनी माझ्या हाती आली आहे. मला आणि गायत्रीला त्याने वापरून घेतले, याची मला जाणीव झाली आहे. थोडं तीच उतराई व्हावं म्हणून मी ह्या दोन गोष्टी केल्यात!"

"ग्रेट! रियली, मला, तूझ, एक स्त्री म्हणून तुझं कौतुक आणि अभिमान वाटतो! बाय द वे, एक, हे नाव बदल कळलं, तुझी दुसरी गोष्ट?"

"तुंम्हाला माहित आहे का नाही, हे मला ठाऊक नाही. गायत्रीने एक मुलं, अपघाता नंतर मन रमवण्यासाठी दत्तक घेतलं होत, तो हा नंदू!" सोबतच्या त्या मुलाकडे निर्देश करत कस्तुरी सांगत होती, " याच पालकत्व आता मी घेतलंय!"

या पैशासाठी वेड्या झालेल्या कस्तुरीची, हि लोभस बाजू बघून इरावतीला भरून आले.

"झालं? आजून काही बाकी ठेवलस का?!" इरावतीने गहिवरला आवाजात विचारले.

"थोडस आहेच! त्या चैत्रालीची ऑफिस मधली खुर्ची, मी तिच्यासाठी तशीच ठेवणार आहे! तिचे चंद्रशेखरचे काही हि असू देत, 'गॅलॅक्सिला' तिने सांभाळे आहे. ती जेव्हा सुटेल तेव्हा सुटेल, पण त्या नंतर, ती उघड्यावर पडणार नाही!"

इरावतीने कस्तुरीला कडकडून मिठीच मारली! इरावतील तिचे दोन्ही निर्णय खूप भावले होते.

बाजूला खाड्कन बूट आपटून एक कडक सॅल्यूट मारणारी व्यक्ती उभी राहिली. इरावतीचा डोळ्यावर विश्वासच बसेना.

"या, आमच्या नव्या सेक्युरिटी इन्चार्ज! मिस अर्जुना!" कतुरीने ओळख करून दिली.

०००

भारावलेली इरावतील पोलीस हेडक्वार्टरला केव्हा पोहंचली, हे तिलाच कळले नाही. राजे सर तिची तेथे वाट पहात होते.

"ये इरा! अभिनंदन! तुझ्या मुळे खूप मोठे संकट टाळले आहे!"

"म्हणजे सर? मी समजले नाही! आणि हो त्या बक्षीची काही ट्रेस पण नन्तर लागला नाही!"

"त्याला सोड! त्या पाकिटात भारतातील काही मंदिरे ब्लास्ट करण्याचा प्लॅन कोडवर्ड मध्ये, येथील छुप्या अतिरेक्यांना कळवला होता. या मंदिरात बऱ्याचश्या इस्कॉन मंदिरांचा समावेश आहे! गेल्या दोन वर्षा पासून तयारी झाली होती! पैसा, भारतातील गुंड, थोडा - थोडा करून जमवलेला दारू गोळा, हत्यारे याचा उल्लेख त्यात आहे. शिवाय लाईन ऑफ ऍक्शन होतीच!"

"पण सर, इतकी आधुनिक सुविधा असताना, हा पत्राद्वारे संपर्काचा उद्योग त्या अतिरेक्यांनी का करावा?"

"हाच प्रश्न मला पण पडला होता. आपले आयटी विझाडास, अफलातून आहेत. त्यांच्या नजरेतून काही सुटत नाही, हे अतिरेकी संघटनांच्या लक्षात आलं आहे. म्हणून त्यांनी हा मार्ग काढला होता. फक्त चुकून हे पाकीट चंद्रशेखरच्या हाती आलं! म्हणून बक्षी त्या साठी भारतात आला होता! आणि हे पाकीट आपल्याला मिळाले नसते तर, खूप मोठा उत्पात झाला असता. शिवाय आंतरराष्ट्रीय संबंधावर परिणाम झाला असता तो वेगळाच!"

" बापरे! टेररिस्ट बॅक पुटवर येऊन शॉट मारणार होते म्हणायचे!"

"हो! पण आज तुला मुद्दाम येथे बोलावलंय, सेक्युरिटी फोर्सची एक गुप्त जवाबदारी तुला देण्याचा विचार आहे! आपले बरीचशी सरकारी खाती, आतून या अतिरेक्यांनी पैशाच्या जोरावर पोखरली आहेत. आत्ताच्या या कारवाईत हि बाब पुन्हा स्पष्ट झाली आहे. त्यावर तू लक्ष ठेवायचे! तुझी आत्ताची पोस्ट तशीच असेल, आमच्या कामा साठी वेगळे मानधन, गरजेनुसार सपोर्ट आणि साधन मिळतील!"

"ओके अँड थँक्स सर!" इरावतीने राजे सरांना कडक सॅल्यूट मारला!

जय हिंद!

(समाप्त)

सु र कुलकर्णी

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED