kaatkasar books and stories free download online pdf in Marathi

काटकसर

काटकसर:
आपल्याला म्हणजे सर्वांना माहिती असेलच काटकसर म्हणजे काय?.
शब्दकोश प्रमाणे काटकसर म्हणजे मितव्यय. कमी खर्च करणे किंवा खर्चात काटछाट करणे. ज्यांची सांपत्तिक स्थिती चांगली आहे त्याना ह्याची गरज वाटणार नाही, पण जे मध्यम वर्गाचे आहेत त्यांना काटकसर हा अत्यंत गरजेचा आहे. 80 टक्के लोक मध्यम वर्गातील दिसतात, म्हणून ह्या विषयावर चार शब्द लिखाण करावा असे वाटत होता. आज शुभारंभ केला.
संसार नवरा, बायको आणि मुल या सर्वांचा असतो.काटकसरीने संसार फक्त बायकोनीच करायला पाहिजे असे नाही. काटकसर कोणी, कसे आणि कुठे करायचा आपण पाहूया.
१) जाँइंट (एकत्रित) काटकसर
२) वैयक्तिक काटकसर
१) एकत्रित काटकसर: लाईट बिल कमी करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी प्रयत्न करावे. अनावश्यक दिवे चालू असेल तर ताबडतोब बंद करावे. आई किंवा बाबाच करेल म्हणून बसूनये.मुल पण करू शकतात.
तसेच पाणीच अपव्यय थांबवणे. सगळे नळ्या बंद आहेत की नाही ह्याचा वर सगळ्यांचा नजर पाहिजे.पाण्याचा आणि लाईट बिलाच्या काटकसरमुळे वैयक्तिक फायदा होतोच तसेच समाजालाही उपयोग पडतो.
किराणा आणि दूध, ह्याच्यात सुुध्दा काटकसर चे
तत्व वापरू शकतो. किराणा जेवढे पाहिजे तेवढीच खरेदी करायचे. खूपच जास्त आणि अनावश्यक वस्तू मागवू नये. दूध सुध्दा जास्त लावू नये.ह्या दोन्हीत चांगलाच बचत होवू शकतो.
नंतर महत्त्वाचे विषय म्हणजे कर्ज न करणे. हल्ली माणसाला नवीन नवीन गोष्टींचा इच्छा वाढत चालले. त्यामुळे ते पूर्ण करण्यासाठी नवरा किंवा बायकोला कर्ज काढावा लागते. कर्ज काढलेल्या कुटुंबाला खूप कष्ट सोसावा लागते. म्हणून कर्ज काढताना खूप विचार करून कर्ज काढावे. ज्याचा मुळे कर्जदार होणार ती वस्तू खरच गरजेचे आहे काय हे मनाला विचारा. उदाहरणार्थ वाहनासाठी कर्ज. मुलगा हट्ट करतो म्हणून मोटारसायकल घेवून देणे. मुंबई त लोकल असल्याने वाहनांची वापर कमीच असते. मुलगा तरी शिक्षण घेत असतो. घरासाठी लाखो रूपयांची गरज असते, तेंव्हा कर्जाशिवाय चालणार नाही. ते सुद्धा आपल्या उत्पन्न बघून, झेपणारा हफ्तेचा विचार करून कर्ज काढावे. वाहनासाठी, सोन्याच्या दागिने साठी , मुलांच्या शिक्षण व लग्नासाठी कर्ज अज्जिबात काडू नये.
हा खूपच मोठा काटकसर म्हणायला हरकत नाही.
२) वैयक्तिक काटकसर: घर म्हणजे आई,वडील आणि मुल. फक्त एकाने काटकसर केले आणि उर्वरित सदस्य मनमानी खर्च केले तर त्याला अर्थ राहत नाही. प्रत्येकानी काटकसर केलेतरच खरोखर फाईदा होणार.
वडील: कपडे मधे खूप काटकसर करणे अपेक्षित नाही. ते आँफिस ला जाणार असतात. लोकांना भेटायचं असतो.समाजात स्टंडर्ड ठेवावा लागतो. म्हणून बाहेर वापरले जाणारे कपडे चांगलेच पाहिजे. पण खूप खूप महागाचे नको. त्या मुळे थोडा फार काटकसर होऊशकतो.
अनावश्यक सोने आणी वाहन खरेदी त्याग केले तर चांगली काटकसर होतो. हे मी स्वतः अनुभवलेले आहे.
तसेच टूर्स टाळणे सुध्दा पैसे वाचविण्याचा एक पर्याय आहे.
फालतू पार्ट्या करण्यात बरेच लोक पैसे घालवतात. काही कारण नसताना पार्टी देणे महागाचे आनंद आहे. ते केले नाही तर पैसे वाचू शकतात आणि योग्य कारणासाठी ते पैसे उपयोग होऊ शकतो.
वाईट व्यसनात उदाहरणार्थ पत्ते आणि दारु मधे होणारा अपव्यय थांबवले तर काटकसर बरोबर घरचा कल्याण ही होईल.
आई: ही व्यक्ती मात्र काटकसरी असायलाच पाहिजे नाहीतर चांगले, आनंदी आणी सुखी संसार होणारच नाही. मी अभिमानाने आणि आनंदाने सांगतो की माझी बायको सौ.वैशाली मंद्रवाडकर नंबर एकची काटकसरी, सद्ग्रहिणी , सुंदर संसार करणारी आहे. वर सांगितल्याप्रमाणे कपडे, सोने, दागिने, टूर्स इत्यादी कुठल्याही गोष्टी चा जिद्द न करता आलेल्या कमी पगाराची चांगले उपयोग केली. दोन्ही मुलांना कँप्यूटर इंजिनिअर बनवून आईची रोल सार्थक केली.
मी तर तिला डॉक्टर इन काटकसर पदवी देवू इच्छितो.
मुले: काटकसर करण्यात मुल सुद्धा आई वडिलांना चांगली मदत करू शकतात. फालतू हट्ट करणे सोडणे,महागाचे खेेेळणे व वस्तू् घेतली नाही तर पैैैसे वाचतील. मला वाटते काटकसर किंवा बचत याची धडे शाळेेे पासून सुुरू करायला हवी.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED