मानसकन्या Shivani Anil Patil द्वारा बाल कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मानसकन्या

पारावरती पक्षांचा किलबिलाट चालू होता.सगळे पक्षी मिळून आज खूप दिवसांनी गप्पा मारत होते.
तेवढ्यात एक पोपट तिथे आला. चेहऱ्यावरून तो खूप उदास वाटत होता. त्या पक्षांपैकी एका पक्षाने त्याला तो उदास असल्याचे कारण विचारले.
त्यावर तो पोपट पक्षी म्हणाला..., मी आत्ताच एका बंदिस्त पिंजऱ्यातून सुटून आलोय. मी गेले कित्येक वर्षे त्या पिंजऱ्यात बंदिस्त होतो.माझी ती इच्छा ती मानसकन्येमुळे पूर्ण झाली. पण माझ्यासाठी तिने स्वता:चा जीव धोक्यात घातला, त्यामुळे मी उदास आहे.
त्या दुसर्या पक्षाने मोठ्या कुतूहलाने विचारले..,ही मानसकन्या कोण? आणि तिचा काय संबंध या सगळ्याशी...? अशा प्रकारे घडलेली सर्व हकीकत पोपट पक्षी सर्व पक्षांना सांगू लागला.

एके दिवशी समुद्रात मानसराजा नावाच्या राजाला एक सुंदर अशी मानसकन्या झाली.तिचं नाव त्याने "मत्स्या" असे ठेवले.मत्स्या ही खूप सुंदर आणि खोडकर असल्यामुळे ती सर्वांचीच लाडकी होती.
एक दिवस ती तिच्या भावंडांसोबत खेळता-खेळता पाण्याच्या प्रवाहाने खूप लांब निघून गेली.ती तिच्या भावंडांना इकडे-तिकडे शोधू लागली.
त्याचवेळी त्या समुद्रात काही मच्छीमार मासे पकडण्यासाठी आले होते.मत्स्या अचानक एका जाळीत ओढली गेली.तिला काही कळेच ना...!
तिच्या बरोबर अनेक मासे त्या जाळीत अडकले. मत्स्याचा जीव गुदमरू लागला.ती त्या जाळीतून सुटायचा नितांत प्रयत्न करू लागली.
शेवटी कशीबशी ती त्या जाळीच्या छिद्रातून बाहेर एका भांड्यात जाऊन पडली.आता तिला जरा बरं वाटलं होतं. पण तेवढ्यात तिथे एक मच्छीमार आला आणि मत्स्याकडे कुतूहलाने पाहू लागला.मत्स्या होतीच एवढी सुंदर की कोणीही तिच्याकडे पाहत राहिल.मत्स्याला वाटले आता हा माणूस मला समुद्रात सोडून देईल. पण कसलं काय...!

त्या मच्छीमाराने तिला बाजारात नेऊन एका माणसाला विकले.त्या माणसाने तिला आपल्या घरी नेऊन एका काचेच्या भांड्यात ठेवले.ती एक शोभेची वस्तू म्हणून सगळे तिच्याकडे कुतूहलाने पाहत.
मत्स्या तिच्या समुद्रकुटुंबापासून खूप दूर आली होती.एकटी पडली होती.मुक्त अशा अखंड समुद्रात राहणार्या मत्स्याला त्या काचेच्या भांड्यातले जीवन आता असह्य वाटत होते.
असं एकटं-एकटं जगण्यापेक्षा मरण आलेलं बरं असा विचार ती करू लागली आणि अचानक तिने त्या काचेच्या भांड्यातून बाहेर एक मोठ्ठी उडी मारली.मत्स्या जमीनीवर पडली, तळमळू लागली तेवढ्यात त्या घरमालकाने तिला उचलून भांड्यात टाकले. मत्स्याने परत तशीच उडी मारली.घरमालकाने तिला रागारागाने उचलले आणि भांड्यात टाकले आणि त्या भांड्यावर झाकण ठेवले.आता मत्स्या अजून एका बंधनात अडकली.
ती ढसा-ढसा रडू लागली. तेवढ्यात तिचा हा आवाज त्या घराच्या खिडकीतल्या पिंजऱ्यात असणार्या पोपट पक्षाने एैकला आणि मत्स्याला विचारू लागला की तू का रडतेस.., काय झालं...? मला सांग मी तुझी काही मदत करू का..?

यावर मत्स्या म्हणाली....,आता माझी मदत कोणीच करू शकत नाही.मला हे बंदिस्त जगने नकोसे वाटते.मला माझ्या समुद्राची, कुटुंबाची खूप आठवण येतेय.

यावर तो पोपट म्हणाला...., अगं तू तर इथे काही दिवसांपासून बंदिस्त आहेस. मी तर गेले कित्येक वर्षे या पिंजऱ्या बाहेरचे जग पाहीले सुध्दा नाही. मग मी किती रडायला हवं...!

त्या पोपटाचे बोलने एैकून मत्स्या थोडावेळ शांत होते. आणि पोपटाला म्हणते.., मी तुझी या पिंजऱ्यातून सुटण्यासाठी मदत करेन.
त्यावर तो पोपट तिला मोठ्या कुतूहलाने विचारतो...! काय..? मदत आणि तू...! आणि ते कसं काय करशील.

यावर मत्स्या म्हणते.., माझ्याकडे एक उपाय आहे. जेव्हा घरमालक तुला पाणी द्यायला तुझ्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडेल, त्याच वेळी मी एक खूप मोठ्ठी उडी मारेन आणि या भांड्याच्या बाहेर पडेन. मग घरमालक माझा जीव वाचवण्यासाठी येईल , त्याच वेळी तू लगेच उडून जा.
तिची ही युक्ती पोपट पक्षाला आवडली.पण त्या यासाठी साफ नकार दिला , कारण यात मत्स्याच्या जीवाला धोका होता. पण मत्स्याने हट्टच धरला , त्यामुळे त्याला नाईलाजाने तिचे एैकावे लागले.
आता घरमालक यायची वेळ झाली.मत्स्या आणि पोपट पक्षी दोघंही तयार होते. घरमालक पोपटाला पाणी देण्यासाठी पिंजऱ्याजवळ गेला.त्याने जसे पिंजऱ्याचे दार उघडले तसे लगेच मत्स्याने काचेच्या भांड्याबाहेर उडी घेतली.
मत्स्याने घेतलेल्या उडीमुळे ती भांड्यावरच्या झाकणासहीत खाली पडली.
अचानक घरमालकाचे लक्ष मत्स्याकडे गेले. तो तिच्याकडे धावला तेवढ्यात तिकडे पोपट पक्षी पिंजऱ्यातून उडून गेला.

इकडे मत्स्याने तडफडून शेवटी अखेरचा श्वास सोडला. हे सर्व दृश्य पोपट पक्षी खिडकी बाहेरून पाहत होता. त्याला खूप दुःख झाले. मी का एैकले मस्त्याचे, माझ्यामुळेच तिचा जीव गेला. या सर्व गोष्टींचा तो पश्र्चाताप करत होता.

"मत्स्या पोपट पक्षाला मुक्त करून स्वता: अनंतात विलीन झाली."
खरं तर तिच्या जन्मा मागचे रहस्य काय होते. माहिती नाही...?पण कदाचित तिचा जन्म हा त्या पोपट पक्षाची पिंजऱ्यातून सुटका करण्यासाठी झाला असावा.....!

🌼💙🌼


✍️@शिवानी पाटील.