अंतःपुर - 6 Suraj Gatade द्वारा गुप्तचर कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अंतःपुर - 6


६. गैर सावज (ऑफ-टार्गेट)...

सोमेश रुपी शक्तीला आणि डॅनियलला भेटून पाच दिवस झाले होते. पण डॅनियलकडून शक्तीला अजून काहीच काम मिळालेलं नव्हतं. ना शक्तीला हवी ती माहिती प्राप्त झाली होती...
दोघे रोज क्लबला भेटत होते. एकत्रच बसत होते... सोबत डॅनियलच्या विश्व-सूंदर सोबतीणी असायचाच... रात्रीच्या वातावरणात तीच भडक लायटिंग... कस्टमर देखील जवळजवळ तेच... डॅनियलच्या समोर टेबलवर तेच स्ट्रिंक... डॅनियलच्या हातात तेच त्याचं एक्सपेन्सिव्ह सिगार... पण समोर गाणारी तरुणी मात्र वेगळी... नाचणाऱ्या मात्र त्याच...
"डॅनियल, काम कधी देणार आहेस?" शक्तीने स्पष्ट विचारलं.
"वाय आर यु इगर् टू किल?" हातातील सिगार नाचवत शक्तीला डॅनियलने विचारलं.
"बिकॉज दॅट इज माय जॉब!" शक्ती त्याला 'बिकॉज' 'दॅट' 'इज' 'माय' 'जॉब' या प्रत्येक शब्दांवर इम्पोज करत ओरडला.
शक्तीच्या बोलण्याचं डॅनियलला हसू आलं,
"बट नॉट माईन्!" तो समोरील टेबलवरील स्कॉचचा ग्लास उचलत म्हणाला,
"वी आर बिझनेसमन, नॉट अ मर्डरर्स्!" डॅनियलने स्कॉचचा घोट घशाखाली ढकलला.
"देन व्हॉट आबाऊट मी?" शक्तीने रागात विचारलं.
"वी आर फ्रेंड्स नाऊ. विल टेक केअर ऑफ यु!" डॅनियल त्याला म्हणाला.
"मला फुकट खाण्याची सवय नाही!" शक्ती रागाने ओरडला.
"आय कॅन रियलाईझ दॅट! ऍडजस्ट फॉर नाऊ. इट इज अन्सर्टन! बट ट्रस्ट मी, वी हॅव टू डू लॉट्स ऑफ जॉब्स! सो रिलॅक्स फॉर बिट!" डॅनियल शांतपणे शक्तीला आश्वस्त करत म्हणाला.
हे ऐकून शक्तीनं उगाचच झिटलल्यासारखं केलं.
डॅनियल मात्र पुढं चालू असलेलं गाणं, हातातील ड्रिंक व सिगार एन्जॉय करण्यात गुंगला...


काही कारणास्तव तात्पुरते आऊट ऑफ सर्व्हिस असलेल्या उजळाईवाडी एयरपोर्ट, कोल्हापूरला एक मिनी प्रायव्हेट जेट उतरलं. त्यावर कोणत्या तरी बिझनेस ग्रुपचा लोगो होता. पण त्यातून कोणी बिझनेसमन बाहेर पडला नाही. बाहेर पडले ते साठी पार केलेले ब्लू सिल्क फुलस्लिव्ह कोट घातलेले कोणी राजकारणी. पॅन्ट देखील निळ्या रंगाचीच. कोटाच्या आतला शर्ट प्योर् कॉटन. डोळ्यांवर गोल्डन फ्रेमचा चष्मा. अगदी आदर्श राजकारण्याला शोभेल असाच त्या पोलिटीशियनचा पेहराव होता.
बाजूलाच येऊन लागलेल्या एसयूव्ही मध्ये ते बसले. सोबत 'स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप'चे दोन एजंट्स आणि त्यांच्या कमरेला बेल्जियम कंपनी 'एफएन हर्स्टल्' निर्मित 'फाईव्ह-सेवन' सेमी ऑटोमॅटिक पिस्टल्स!
माननीय पंतप्रधानांनी आपण ओळखलं जाऊ नये म्हणून कितीही दक्षता ठेवली असली, तरी त्यांच्या कपड्यांवरून आणि सोबत असणाऱ्या त्या सोबतच्या दोन पर्सनल्समुळे त्याची ओळख लपत नव्हती.
कारण या 'स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप'चे कामच मुळी भारतीय पंतप्रधानाचं संरक्षण करणं असतं!
कोणतेही कार्य पार पाडत असताना आधी आपली झुल उतरवून ठेवावी लागते, मग ती स्वत्वाची, मीपणाची असो, ज्ञानाची असो, किंवा आणखी कशाची. पण मोह आवरणे देखील कठीण ना... म्हणून आयडेंटिटी लपवण्यासाठी कमी लवाजमा घेऊन कोणत्या तरी बिझनेसमनचं प्रायव्हेट जेट आणणं तर त्यांना सुचलं होतं, पण उंची वस्त्र त्यागणं त्यांना जमलं नव्हतं...
शिवाय त्यांचे एसपीजी स्पेशल एंजट्स साधारण कपड्यांत असले, तरी त्यांच्याकडील पिस्टल्स सुद्धा त्यांच्या खऱ्या ओळखीची ग्वाही देऊन जात होत्या.

त्यांची एसयुव्ही जशी उजळाईवाडी एअरपोर्टमधून बाहेर पडली, तशी तेथे बाहेर नजर लावून बसलेला एम मनुष्य कानातील वायरलेसमध्ये पुटपुटला...
"ही हॅज आराईव्हड्!"
थोड्या पॉज नंतर,
"ओके!" म्हणत त्याची टू-व्हीलर त्या गाडीच्या मागे धावली.
संभवत: त्याला पंतप्रधानांच्या गाडीचा पाठलाग करायचा हुकूम मिळाला असेल... ज्याची तो तामिल करत होता.
काही काळ हा पाठलाग असाच चालू राहिला...

एसयूव्हीमध्ये पंतप्रधान पुनीत चिंतपल्ली यांच्या शेजारी बसलेल्या इसपीजी एजंटचे रिअर व्ह्यू मिररवर लक्ष गेलं. त्याच्या दक्ष असण्याची ती परिणीती होती. कोणीतरी आपला पाठलाग करतंय हे त्याच्या ध्यानी आलं.
"सर, वी हॅव बिन फॉलोव्हिंग!" तो मिरर व्ह्यू पाहतच म्हणाला.
त्याची दृष्टी समोरच्या आरशावर खिळलेली पाहून पीएमनी पण समोरच्या आरशात पाहिलं. एक टू-व्हीलर त्याच्याच मागे लागून येत असल्याचं त्यांनाही जाणवलं.

पण लगेचच ती टू-व्हीलर एका वळणारवर उजव्या बाजूला वळली.
पाठलाग करणाऱ्या त्या व्यक्तीला समजले होते, ती गाडीतील लोकांना त्याचा संशय आला आहे आणि तो असाच पाठलाग करत राहिला, तर त्याला कॅप्चर केलं जाईल!

पाठलाग करत आहे असं वाटणारी बाईक वळलेली पाहून गाडीत मग पीएमसह सगळे रिलॅक्स झाले.

पण अजून ते सुटले नव्हते. वळणार थोडं अंतर आल्यावर पाठलाग करणाऱ्या त्या माणसाने आपलं रिस्टवॉच टोपण उघडल्यासारखं उघडलं. आत एक मायक्रो ड्रोन होता. त्याने तो मोबाईलशी कनेक्ट केला. मोबाईल बाईकला माऊंट केला आणि ड्रोन सुरू करून त्याने तो पीएमच्या गाडीच्या मागे धाडला.
पीएमच्या गाडीचा मार्ग त्याने असा धुंडाळला होता... गाडी मार्गस्थ होईल तसा ड्रोन देखील हवाई मार्गे गाडीच्या मागून जात होता...

ड्रोन लहान असला तरी त्याची सिंगल व फ्लाईंग रेंज खूप जास्त होती... याचा फायदा त्या व्यक्तीला पुरेपूर झाला.
पंतप्रधानांची गाडी एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या बाहेर थांबली. ती जागा या व्यक्तीने बरोबर हेरली. आणि त्याने ड्रोन परत बोलवून घेतला.

शक्ती त्याच्या हॉटेल रूममध्ये असतानाच मिहीरचा त्याला फोन आला... शक्ती आणि नम्या दुपारचं जेवण घेत होते. मिहीरचं नांव बघून तो बाहेर गेला. रूममध्ये त्याच्यासोबत असलेल्या नम्याला या कॉलबद्दल कळू नये हा त्याचा उद्देश. तो अजूनही तिच्यावर विश्वास ठेवू शकत नव्हता.
'एखादं ध्येय पार पाडत असताना माणसानं दक्षता बाळगणं कधीही चांगलच!' शक्तीही तेच करत होता.

"बोल!" खोलीबाहेर आल्यावर शक्तीने कॉल रिसिव्ह केला.
"पीएम कोल्हापूरमध्ये आलेत! त्यांनी एसपींना भेटायला बोलावलंय. सिक्रेट मिटिंग आहे. पीएम कोल्हापुरात आहेत हे कोणालाच माहीत नाही!" मोबाईलवरून मिहिरने माहिती पुरवली.
"ठीक आहे थँक्यू!" शक्तीने मोबाईल खिशात सारला.
तो खोलीकडे वळला. त्याने ती लॉक करून घेतली. आणि गंतव्याकडे निघाला...

माननीय पंतप्रधान पुनीत चिंतपल्ली यांच्या प्रशस्त अशा रूमवर एसपी सारंग गोखले आणि पंतप्रधान चिंतपल्ली आमने-सामने बसले होते...
"केसची काय प्रोग्रेस?" पीएमनी एसपीला पृच्छा केली.
"चालू आहे सर..." एसपी अडखत म्हणाला.
कारण त्यालाही माहीत होतं, काम कुठंवर चालू आहे...
"वाचस्पतींच्या मारेकऱ्याला मारणारा मारेकरी पण मेला असं ऐकलं आम्ही. इथल्या पूर्व एसपींचा अकस्मात मृत्यू! त्यांनी तर स्वतःला गोळी घालून घेतली असं आम्ही ऐकलं. त्या सगळ्याचं काय झालं?" कठोर स्वरात पीएम जाब विचारत होते.
"भूतपूर्व एसपी सुशेन मित्र हे वाचस्पती यांच्या मारेकऱ्यांना सामील होते असं समोर आलं आहे. त्यांनीच प्रयत्न करून त्या मारेकऱ्याला हॉस्पिटलमध्ये संपवला. 'बोटुलिनम टॉक्सिन' इंजेक्ट करून त्याला मारलं गेलंय. त्याला मारणारा मारेकरी पण तेच इंजेक्शन घेऊन मेलेला सापडला.
"मृत एसपी सुशेन यांची परवानगी असल्याने गार्ड्सनी त्या असॅसिनच्या वॉर्डमध्ये डॉक्टरच्या वेशातील त्या मारेकऱ्याला सोडले होते. पण त्यावेळी कोणालाच माहीत नव्हते, की सुशेन गुन्हेगारांना सामील होते. म्हणून गार्ड्सनी सुशेन यांची परवानगी पाहून मारेकऱ्याला वॉर्डमध्ये प्रवेश दिला होता... सुशेन यांच्या आत्महत्येनंतर सगळा प्रकार उघडकीस आला."
"एवढं तुम्हाला समजलंच आहे, तर ते कोण आहेत हे तुम्हाला का कळालेलं नाही अजून? मग ते खरे सूत्रधार अजून सापडले का नाहीत?"
एसपीकडे उत्तर नव्हतं. तो गप्पच राहिला.

तिकडे नम्याचं जेवण झालं, तरी शक्ती रूममध्ये परतला नाही म्हणून तिने बाहेर पाहण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. तिला दरवाजा बाहेरून लॉक आढळला. शक्ती पुन्हा तिलाच लॉक करून कुठेतरी गेलाय हे तिला समजायला वेळ लागला नाही. तिने तातडीने फोन जवळ केला...
"हॅलो डॅनी! सोमेश मला बंद करून कुठे निघून गेलाय!" तिने शक्तीची माहिती दिली. शक्तीची सत्यता अजूनही तिच्यासमोर आली नव्हती. म्हणून ती अजूनही शक्तीला सोमेशच समजत होती.

"तुमच्या तपासाचं काय झालं? तुम्ही दिलेल्या महितीतवर रॉ ऑपरेट होणार होती. पण तुमच्याकडून काहीच रिपोर्ट डेटा नाही!" इकडे बऱ्याच वेळाच्या शाततेनंतर पीएमनी एसपी सारंगला विचारलं.
"सॉरी सर!" एसपी खजील झाला.
एक तर तो कोल्हापूरात नवीनच अपॉईंट झाला होता. वस्तुस्थिती समजून घेण्याचाही त्याला वेळ मिळाला नव्हता आणि सगळे जण त्यालाच जबाबदार धरत होते म्हणून तो अधिकच वैतागला होता.
"सॉरी हे कांबळीवरच्या ठिगळ्यासारखं आहे!" पंतप्रधान चिंतपल्ली एसपी गोखलेला झापत बोलले,
"ठिगळ्याने कांबळीचं सौंदर्य जसं नष्ट होतं, तसं सॉरी न बिघडलेली नाती किंवा गोष्टी पूर्ववत होत नाहीत!"
ते त्यांच्याच मागे असलेल्या खिडकीकडे चालत गेले. सारंग गोखले पण नम्रपणे उठून उभारला. पीएम बाहेर पाहत थांबले,
"तुम्हाला जरा तरी कल्पना आहे गोखले, की मी कोणत्या परिस्थितीतून जातोय? आधीच ही पंतप्रधानाची गादी म्हणजे काटेरी आसन! त्यात निवडणूकीला एक वर्ष बाकी असताना हे असं! माझ्या बरोबर माझ्या पक्षाची रेप्युटेशन सुद्धा खराब झाली आहे. आणि तुम्ही तातडीने काम करायचं सोडून माझ्या चिंतेला तुमच्या सॉरीच ठिगळ जोडू पाहताय? आय वॉन्ट रिजल्ट्स एमिडीएट्ली!" पीएमने ऑर्डर सोडली.
"येस... येस सर..." एसपी सारंग गोखले चाचरत म्हणाला.
"या!" मागे न पाहताच पीएमनी सारंगला निघण्यास सांगितले.
सारंग पीएम पुनीत चिंतपल्लीच्या पाठमोऱ्या आकृतीला सल्युट करून रूमबाहेर पडला. पीएम तसेच बाहेर पाहत उभे राहिले...

सारंग गोखलेला आपल्या पोलीस अधीक्षकासाठी असलेल्या सरकारी गाडीतून जाताना पंतप्रधानांच्या मागावर असलेल्या व्यक्तीने पाहिले.
तो हॉटेलच्या समोरील फुटपाथला लागून हॉटेलपासून बराच मागे हॉटेलकडे नजर लावून बसला होता. सारंगला जाताना बघून तो माणूस तडकला. त्याने लगेच डॅनियलला फोन लावला...
"डॅन! हा पीएम एसपीला भेटला आहे! प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय तो गप्प बसेल असे वाटत नाही! शुड आय किल हिम? ही इज अलोन नाऊ! ओन्ली टू पर्सनल्स. बट आय कॅन टेक देम!" एवढं बोलून तो डॅनियलच्या परवानगीची वाट बघू लागला.

"आर् यु आऊट ऑफ युअर माईंड? तो कोणी साधारण माणूस आहे का त्याला इतक्या सहज उडवायला यु फुल? आणि त्याला संपवला तर माझा सगळा प्लॅन फसेल! ही हॅस टू लिव्ह ऍट लिस्ट टिल नेक्स्ट इयर! सो बी काम!
"जस्ट कीप अ वॉच! आईल् लेट यु नो, इफ इट इज नेसेसरी!" आपल्या पन्हाळ्याच्या फार्महाऊसवर रूममध्ये बसलेला डॅनियल त्या माणसाच्या आततायीपणावर रागवत, पण वाचा शांत ठेवत म्हणाला.

"फाईन!" तो माणूस नाराजीनेच डॅनियलचा हुकूम मानत बोलला.
पण त्याला स्वतःला सिद्ध करायचं होतं. आपण काहीतरी करण्यासाठी कॅपेबल आहोत हे त्याला सर्वांना, खास करून डॅनियलला दाखवून द्यायचं होतं. तो त्याच्या बाईकवरून उतरला. पळत रस्ता क्रॉस करून तो हॉटेलच्या बाजूला आला.
कोटाच्या आत असलेली '50 बीएमजी ट्रिपल एक्शन थंडर' हँडगन त्याने कोटाच्या आतून बाहेर काढून. खिडकीतून बाहेर पाहत उभा पीएम त्याच्या बंदुकीच्या टप्प्यात होता. नॉर्मल हँडगन पेक्षा तिप्पट लांबीची (24.21″) आणि सातपट वजनी (7.2 कि.ग्रॅ.) एका सायन्स फिक्शन फिल्ममध्ये शोभेल अशा या हँडगनची एक गोळी पीएम पुनीत चिंतपल्लीच्या शरीराची लख्तरं करण्यासाठी पर्याप्त होती.
ही ब्रीच लोडिंग सिंगल शॉट हँडगनची त्या माणसाने मागील बाजू ओपन करून हँडगनमध्ये 50 बीएमजी गोळी सारून लोड केली. हो तीच गोळी ज्याने वाचस्पतीचा मारेकरी जेल बाहेर उडवलं होता... आणि त्याने गनची मागील बाजू पुन्हा सील केली.
त्याने नेम धरला. ती अजस्त्र हँडगन उंचावून तो भर दिवसा रहदारीच्या ठिकाणी उभा होता. आपण पकडले जाऊ याची त्याला जराही चिंता नव्हती. हे काम त्याला पूर्ण करायचेच होते. माहीत नाही कोणती धुंदी त्याच्या डोक्यावर आणि मनावर स्वार झाली होती... डॅनियलने नको सांगून त्याला काही करून पंतप्रधानाला संपवायचे होते.
त्याचे बोट ट्रिगरवर कसले जात होते. तोच तिथं पोहोचलेला शक्ती त्याच्या चालू कावासाकीला तशीच पाडून त्या माणसाकडे धावला होता. त्याने त्याचा हात बाजूला केला.
फायर झालंच! ट्रिपल एक्शन थंडरच्या मोठ्या रिकॉईलच्या इम्पॅक्टने दोघे लडखडले. पण दोघांना एकमेकांचा आधार असल्याने ते पडण्यापासून सावरले. पण हा आधार मैत्रीपूर्ण नक्कीच नव्हता. शक्तीने त्याचा हात पकडल्याने त्यांना आधार मिळाला होता. दोघे तडख एकमेकांपासून दूर झाले. त्या माणसाची गन शक्तीच्या हाती आली होती. ती त्याने रिकाम्या डाव्या होलस्टरमध्ये ठेऊन घेतली. आणि मग त्यांच्यामध्ये फाईट सुरू झाली...!
बंदुकीच्या भल्या मोठ्या आवाजाने आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमा झाली होती.
वर पंतप्रधान वाचले होते. गोळी त्यांच्या खिडकीच्या वर भिंतीला थडकून भलंमोठं छिद्र पाडून त्यात अडकून राहिली होती. आपल्यावर हल्ला झालाय हे पंतप्रधानांच्या लक्षात आलं आणि त्यांनी झटकन पडदा ओढून घेऊन ते आत गेले.

पंतप्रधान यांच्या रूमबाहेर उभारलेले एजंट्स अशस्त्र आत प्रवेशले. गोळीचा आवाज त्यांनीही ऐकला अवासा. एकाने पीएमला कव्हर केलं आणि एक खिडकीकडे धावला. त्याने पडदा जरा बाजूला करून पाहिलं. बाहेर त्याला कोणी दोघे हातापायी करताना दिसत होते. तो तातडीने आत झाला. तो बाहेर जाण्याच्या प्रयत्नात असताना पीएमनी त्याच्या हाताला धरून त्याला अडवलं व मान हलवून खाली न जाण्यास सुचवलं. तो एजंट मग रिलॅक्स झाला...

इकडे बाहेर पंतप्रधानांना मारण्याच्या प्रयत्नात असलेला युवक शक्तीला संपवण्याचा प्रयास करत होता. त्याच्यावर हल्ला करत होता. पण शक्ती त्याला तेवढाच प्रतिसाद देत होता, जेवढा एका पिसाटलेल्या रेड्याच्या वाटेतून दूर होण्यासाठी दिला जातो! आणि यामुळे तर त्या माणसाच्या राग अधिकच भडकत जात होता...
शेवटी शक्तीने त्याच्या मॅग्नमने त्या माणसाच्या पायात फायर केलं. गोळीमुळे रस्ता छेदला गेला. शक्तीने मग नेम धरला तो त्या माणसावर!
"गो बॅक! डॅनियल वाट बघत असेल!" शक्तीने त्याला हुकूम सोडला.
तो माणूस हलला नाही. शक्तीकडे रागाने पहात उभारला.
"गो!" शक्ती मोठ्याने ओरडला.
तसा आपल्यासमोर शक्तिशाली मेंढा आल्यावर आपल्या शक्तीच्या मदात मदमस्त झालेला जसा मागे न वळता मागे-मागे सरकतो, तसा तो माणूस शक्तीच्या नजरेला नजर देतच काही पावले मागे वळला.
आणि फिरून आपल्या बाईकवर स्वार होऊन निघून गेला...
आणि मग शक्तीने आपला मोर्चा हॉटेलकडे वळवला.

काहीवेळातच लिफ्टने शक्ती पंतप्रधान असलेल्या फ्लोअरवर होता. पंतप्रधान तेथे वास्तव्यास असल्याने त्यांच्या सुविधेसाठी ते आख्ख्यं हॉटेल रिकामं करण्याचा मॅनेजरची मनीषा होती, पण पंतप्रधान यांनीच त्याला तसे न करण्यास सुचवले. कारण अशाने ते कोल्हापुरात आलेत हे बहुदा उघड झालं असतं. तरीही त्यांच्यासाठी ते राहत असलेला फ्लोअर रिकामा केला गेलाच होता!
शक्ती पंतप्रधान यांच्या रूमसमोर उभारला, तेव्हा त्याला एजंट्सकडून अडवण्यात आलं.
तत्काळ शक्तीने त्याला दिलेली 'स्पेशल आयडी' ब्लेझरच्या छोट्या चोर कप्प्यातून काढली आणि एका एजंट्स समोर धरली. ते काय हे माहीत नसल्याने त्यांच्या चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहील.
"प्रधानमंत्रीजी को दिखाओ। वे पेहेचान लेंगे!" शक्ती त्यांना म्हणाला.
नुकताच त्यांच्यावर हल्ला झाला आणि खाली हाच एकाशी भांडण करत होता हे त्यांतील एजंटने ओळखलं. त्याने पटकन शक्तीला गनपॉईंटवर घेतलं. हे पाहून दुसऱ्या एजंटने देखील शक्तीवर गन रोखली.
शक्तीने आयडी वरच्या खिशात ठेवत विजेच्या चपळाईने त्यांच्या दोघांच्याही गन्स हिसकावल्या. त्या एजंट्सना देखील समजलं नाही, की त्यांच्या हातून गन्स नाहीशा झाल्या आहेत आणि त्या आता शक्तीच्या हातात आहेत. ते नेम धरलेले हात उंचावूनच होते. जेव्हा त्यांना हे लक्षात आलं, की आपले हात तर रिकामे आहेत, आणि शक्ती आपल्याच गन्स आपल्यावर पॉईंट करून उभा आहे. ते हतबुद्ध झाले.
शक्तीने पुन्हा त्याची आयडी एजंट्स समोर धरली, आत जाऊन ते कार्ड पीएमना दाखवण्याची खूण केली. शक्ती खूप गंभीर होता.
'नो नॉनसेन्स टाईप' त्याचा चेहरा पाहून शक्तीच्या उजव्या बाजूच्या तो एजंट प्रकरणाची गंभीरता समजला आणि तो शक्तीकडून कार्ड घेऊन आत गेला.

"एक्स्क्यूज मी सर, बाहर कोई आया हैं!" तो सोफ्यावर चिंतेत बसलेल्या पीएम पुनीतला म्हणाला.
"कोन हैं?" पीएमनी गुश्श्यात त्याला विचारलं.
"मालूम नहीं सर. उसने आपको ये दिया है।" ते कार्ड त्याने पुढं होत पीएम समोर धरले.
पीएमने ते घेताच एजंट मागे होऊन अदबीने उभारला. पीएमनी ते कार्ड निरखून पाहिलं.
"भेज दो!" एजंटकडे बघत चिंतित चेहऱ्यानेच पीएमने एजंटला हुकूम केला.
"येस सर!" तो बाहेर निघून गेला.

"सर, आपको अंदर बुलाया है।" बाहेर येऊन तो म्हणाला.
शक्तीने फक्त मान हलवली आणि त्याने दोघांच्या हँडगन्स परत केल्या. तो खोलीत प्रवेशला.

जसा शक्ती आत चालत आला, पीएम त्याच्याकडेच पाहत होते. तो त्यांच्यासमोर थांबला.
"काय तूच शक्तीसेन नाईक आहेस?"
"हो सर!"
"काय रिपोर्ट?"
"मी इथं रिपोर्ट द्यायला नाही! चौकशी करायला आलो आहे!" शक्ती कठोरपणे म्हणाला.
"कसली चौकशी?" पीएमनी तडकून विचारलं.
"वाचस्पतींच्या खूनाची! आणि त्यांच्या संबंधित सर्व दुर्घटनांची!" शक्ती पीएमच्या नजरेला नजर रोखत म्हणाला.
"तुला पण आमच्यावरच संशय आहे?" पीएमने त्याला विचारपूर्वक पृच्छा केली.
"पुरावे तर तसेच आहेत!" शक्ती दोषारोप करत म्हणाला.
"काय आहेत पुरावे?" पीएमने कठोर स्वरात विचारलं.
"वाचस्पतींच्या खून्याची चौकशी तर होऊ शकली नाही. त्या आधीच त्याला मारला गेला. आणि त्याला ज्या रायफलने उडवलं ती पॅरा स्पेशल कमांडोज् आणि फोर्स वन कमांडोज वापरतात!"
"आणि फक्त एव्हढ्यावरून आम्ही दोषी सिद्ध होतो? हे फॅब्रिकेटेड एव्हीडेन्स असू शकत नाहीत?" पीएम शक्तीच्या तर्काची कीव करत म्हणाले.
"ती रायफल बनवणाऱ्या कंपनीचा डेटाबेस चेक केला आहे. त्यांच्याकडून कोणतीच इल्लीगल डिलिंग झाली नाही!"
"दुसरं कोणीच ही रायफल वापरत नाही? जो देश अमेरिका ही रायफल विकतो तोही हीचा वापर करतो. हेही तुम्हाला माहीत असेल. नाही?!" पीएमने विचारलं.
"वापरतो!"
"मग दोष आमच्यावर कसा?" पीएमने शांतपणे विचारलं.
आपल्या तर्काने आपण शक्तीच्या तर्काला हरवले आहे असं वाटून त्यांच्या आवाजात ही शांतता उतरली होती.
"वाचस्पती हे भारतात मोठे राजकारणी असतील, पण जागतिक राजकारणात त्यांची विशेष ओळख नाही! अमेरिकाच नाही, तर मोठ्या ती रायफल वापरणाऱ्या कोणत्याही देशाला त्यांचा खून करण्याचे काहीच कारण मला दिसत नाही!" शक्तीने तात्पर्य सांगितलं.
"आणि जर अमेरिकेला आम्हीच गादीवर असू नये असे वाटत असेल तर?! या शक्यतेचा विचार आपण केला आहात?" पीएमने विचारलं.
शक्ती विचार करू लागला... त्याला चित्र काही अंशी स्पष्ट होत चाललं होतं... याचं स्पष्टीकरण होतं, त्याच्या कपाळावरील मोकळ्या होआंर्या आठ्या!
"बसा!" पीएमनी शक्तीला विराजमान होण्याचा आग्रह केला.
शक्ती समोर बसला.
"सॉरी सर! मला माहीत होतं, आपण या कारस्थानामागे नाही. पण खात्री हवी होती. शिवाय इंद्रदत्त वाचस्पतींच्या मारेकऱ्याला ज्या एम 107 रायफलने जीवे मारलं, ती पाच देशांना विकली जाते. म्हणून मला आपल्याकडून सत्य जाणून घ्यायचं होतं..."
"म्हणून हे दोषारोप?" शक्तीच्या हुशारीला आणि धाडसाला दाद देत पीएम हसत म्हणाले.
"माफ करा!" शक्ती म्हणाला.
पीएम पुन्हा हसले.
"पण हे तुम्ही मला स्पष्ट विचारू शकला असता, ही नसती उठाठेव कशासाठी?" त्यांनी विचारलं.
"आपल्याला राग यावा म्हणून. स्पष्ट विचारलं, तर माणूस खोटंही बोलू शकतो! पण रागात माणूस खोटं काहीच बोलत नाही!" शक्तीने स्पष्ट केलं!
पीएम मघाशी झालेल्या जीवनावरील आघाताला आणि चिंतांना विसरून प्रसन्न हसले.
"हुशार आहात! उगाच म्हणत नाहीत, क्रोध हा मदिरेसारखा सर्वमुळ नाशाचं कारण आहे!"
"तुम्ही खूप छान मराठी बोलता!" शक्तीने त्या गंभीर संवादातूनही कॉम्प्लिमेंट दिली.
पीएम पुन्हा हसले. म्हणाले,
"एट्थ ते टवेल्थ पर्यंतच शिक्षण पुण्यात झालं. आणि पुण्याची माणसं काय मराठी शिकवल्या शिवाय सोडतायत होय!" पीएमनी वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला.
शक्ती देखील हसला. पण क्षणभर! त्याला काही स्ट्राईक झालं होतं!
"सिन्स थिस इज सिक्रेट पण तरी आपण इथं येणार असल्याचं कोणा-कोणाला माहीत होतं?" शक्तीने चेहरा गंभीर करत पीएमना विचारलं.
"माझा पर्सनल सेक्रेटरी फक्त!"
"उचला!"
शक्तीला काय अधोरेखित करायचं आहे हे पीएम समजून चुकले. त्यांनी लगेच नंबर घुमवला...


"सोमेश राजमाने पीएमला भेटायला गेला आहे! त्याने माझ्यावर हल्ला पण केला!" पीएमला मारायला उद्युक्त झालेला माणूस पन्हाळ्याला डॅनियलच्या फार्महाऊसला पोहोचला होता.
"कारण?" डॅनियलने विचारलं.
"माहीत नाही!"
"मग इथं काय करतात आहेस?" बाल्कनीत सूर्यास्ताकडे पाहत स्कॉचचा आस्वाद घेणारा डॅनियल त्या माणसाकडे वळून म्हणाला.
"स... सॉरी डॅन! पण त्याने माझ्यावर बॅकफायर केलं आणि मला तेथून निघून जायला सांगितलं. मला थांबता आलं नाही तिथं..." तो घाबरत म्हणाला.
डॅनियलने लगेच मोबाईल खिशातून बाहेर काढला. फोन लावला; नम्याला...

तिकडे नम्या हॉटेल रूममध्ये अडकून बसली होती. ती तिला बाहेर काढण्यासाठी रूम सर्व्हिसला सांगूही शकत नव्हती. कारण जर तिने तसं केलं असतं, तर त्याचीही काही सोय तिच्या दृष्टीने सोमेश असणारा शक्ती करू शकत होता. म्हणून ती खोलीत बंद गपचूप बसली होती. लँडलाईन वाजला...
गडबडीने नम्याने कॉल घेतला,
"हॅलो!" ती अधीरतेने म्हणाली.
"हॅलो नम्या! सोमेश आला परत?" डॅनियलने फोनमधून विचारलं.
"नाही!" नम्याने हताश उत्तर दिलं.
"ओके!" डॅनियल म्हणाला.
"प्लिज डॅन! ड्रॅग मी आऊट ऑफ थिस! थिस मॅन इज टॉर्चर! प्लिज डॅन!!!" नम्या कळवळून म्हणाली.
"सॉरी बेबी! बट यु हॅव टू बेअर थिस फॉर अ व्हाईल! बाय!" डॅनियलने पलिकडून फोन हन्ग अप केला...
नम्या असहाय्यतेने शून्यात पाहत वेड्यासारखी अश्रू गाळू लागली... पण काही घटकांच! कारण ती रडणारी मुलगी नव्हती. तिने झटकन उठून खोलीत शोधाशोध सुरू केली...

"काय झालं डॅन?" त्या माणसाने विचारलं.
"तो अजून परतला नाही."
"कॅन आय गो अँड किल हिम?"
"वेट! ही विल रिटर्न!" डोळे बारीक करत डॅनियल म्हणाला. तो त्या माणसाकडे वळला,
"रिमेंबर, यू डोन्ट हॅव टू राईड ऑन दि ऍस ऑल्व्हेज!" डॅनियलने त्याला ताकीद केली!
आणि त्याने स्कॉचचा शिप घेतला.


पंतप्रधानांचा 'मुख्य सचिव' येईपर्यंत शक्तीची आणि पंतप्रधानांची त्यांच्या पथिकाश्रमातील कक्षात मंत्रणा चालू होती...
"मला हाईड आऊट बदलावं लागेल. माझ्या इथं राहण्याने इथल्या लोकांचा जीव धोक्यात येईल! तू कोणती चांगली जागा ओळखतोस?" पीएमनी शक्तीला विचारलं.
"रादर मी तुम्हाला सुचवेन, की तुम्ही इथंच रहावं! ते लोक आता परत येणार नाहीत! दे डोन्ट अफोर्ड टू किल यु! त्यामुळे इथले लोक उलट सेफच आहेत. तरी मी काळजी घेईनच! आय विल हँडल दि कंविकट्स!" शक्तीने पीएमना आश्वासित केलं व पुढं म्हणाला,
"पण मॅनेजर खूप घाबरले असणार. त्यांचे गेस्ट घाबरून निघून जाण्याच्या तयारीत असणार आणि तुम्ही खुद्द पंतप्रधान असल्याने त्यांना तुम्हाला निघून जायला सांगणं अवघड वाटेल. त्यामुळे तुम्ही मॅनेजर यांची प्लिज जरा समजूत काढा!"
"हो. मी बोलतो त्यांच्याशी!" पंतप्रधान विचारांती म्हणाले.
"जर आपल्याला हरकत नसेल, तर मी एक विचारू सर?" शक्तीला आता काही शंका निरसन हवं होतं...
"हं!" पंतप्रधान यांनी संमिती दर्शवली.
"अमेरिकेबद्दल तुम्ही इतके शोअर कसे आहात? म्हणजे तुम्हाला असं का वाटतंय, की अमेरिका तुम्हाला पदच्युत करण्यासाठी इतकी उत्सुक आहे?"
"एक लक्षात घ्या. सरकार कुणाचंही असूदे. एका सरकारची इंटरनॅशनल पॉलिसी दुसरं सरकार पुढं नेत असतं. ही पॉलिसी म्हणजे त्या त्या देशाची आंतरराष्ट्रीय गरिमा व प्रतिमा ज्या त्या आहे तशा राखणे. अमेरिका याला अपवाद नाही! सरकार कोणतंही असू दे. त्यांना स्वतःला सर्वश्रेष्ठच ठेवायचं आहे! यासाठी अमेरिका भारतात मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करणार होती. पण मी त्यांची इन्व्हेस्टमेंट पॉलिसी रिफ्युज केली! यामुळे त्यांना मला पदावरून खाली करून त्यांना सपोर्ट करणारं कोणीतरी त्यांना भारताच्या पंतप्रधान पदावर बसवायचं आहे!"
"पण इन्व्हेस्टमेंटमध्ये गैर काय आहे? आणि भारतात इन्व्हेस्टमेंट केल्याने त्यांना काय फायदा होणार आहे?" शक्ती चकित झाला.
"माझ्या सूचनेनुसार आपल्या इकनॉमिक अफेअर्सने गठीत केलेल्या कमिटीमार्फत अमेरिकेसाठी बनवलेले रुल्स आणि रेग्युलेशन्स अमेरिकेने मान्य केले नाहीत. मग मी त्यांना परवानगी कशी देऊ? आणि म्हणूनच अमेरिकन पोलिटीशियन्स् आणि बिझनेसमेन माझ्यावर रुष्ट आहेत!" पीएम पुनीत त्यांची भूमिका उघड करत गेले.
"चीन आणि नॉर्थ कोरियावर वचक बसवण्यासाठी अमेरिकेला भौगोलिक दृष्ट्या आशियातील तिसरा मोठा देश असलेल्या भारताची मदत होईल अशी त्यांची कल्पना आहे. रशिया काही त्यांना मदत करायचा नाही. जपान लहान असला, तरी तो शक्तिशाली आहे. पण तरी त्यांच्याकडेही अमेरिकन्स जाणार नाहीत हे उघड आहे. मग राहतो आपणच! त्यांचा अंदाज खराही आहे, कारण जमिनीसोबत आपल्याकडे युथपावर पण आहे! फिजिकल स्ट्रेंथ प्लस ब्रेन!
"आणि त्यासाठी त्यांना भारतात डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करायची आहे. चीनची जागतिक बाजारात असलेली मक्तेदारी अशाप्रकारे अमेरिकेला मोडीत काढायची आहे! सोबत नॉर्थ कोरियाला सुद्धा धाकात ठेवायचे आहे!"
"पण याचा भारतालाच फायदा होईल. मग प्रॉब्लेम काय आहे?"
"फायदा नाही नुकसानच जास्त होईल! हे करत असताना आपली तेवढी उत्पादक क्षमता आहे का हे आधी तपासायला हवं. त्यासाठी आधी योग्य शिक्षण हवं. आपल्याकडे बुद्धीमत्ता आहे, बुद्धिमान लोकं आहेत. पण किती पर्सेन्ट? आपली जादातर तरुणाई नीट शिक्षण घेत नाही. ना कोणते स्किल डेव्हलप करते. यांना कर्तव्यांची जाणीव नाही. आणि याला फक्त तरुणांची उदासीनता कारणीभूत नाही, तर आपली शिक्षण व्यवस्था पण तितकीच दोषी आहे. आणि ती सडलेली व्यवस्था न बदणारं आपलं शासन देखील तेवढंच जबाबदार आहे!
"सी! परफेक्ट इन्फ्रास्ट्रक्चर शिवाय तुम्ही बिझनेस उभा करू शकत नाही. आणि आता आपल्या देशाची शिक्षणाच्या दृष्टीने काय अवस्था आहे तू जाणून असशीलच. आधी तरुण सक्षम बनवायला हवेत. सर्वांना फायनान्शियल एज्युकेशन मिळालं तरच आपल्या जनतेला फायनान्शियली फ्रीडम मिळेल. पैसा मिळवण्याआधी तो खर्चायचा कसा याचं ज्ञान घेतलं पाहिजे. हे शाळेतूनच व्हायला हवं. त्यासाठी आधी एज्युकेशन सिस्टीम सुधारावी लागेल पण याचा विचार कोणीच करताना दिसत नाही...
"शिवाय एवढी मोठी रक्कम भारतात एकत्र इन्व्हेस्ट झाली, तर भारतात जॉब्स तर क्रिएट होतील, पण मोठ्या प्रमाणात इन्फ्लेशन तयार होईल. आलेला पैसा वापरायचा कसा हेच जर माहीत नसेल, तर लोक भरमसाठ वाट्टेल तसा तो खर्च करतील. मोठ्या प्रमाणात महागाई वाढेल, पर्यायी आपले चलन मूल्य घटेल. आणि हे भारताच्या इकनॉमीला मोठं खिंडार असेल!
"पण अमेरिका याचा विचार करत नाहीए! त्यांचे फक्त प्रॉडक्टिव्हीटीवर लक्ष आहे. क्वॉलिटीवर नाही. ना स्किल डेव्हलपमेंटवर.
"तिसरं कारण म्हणजे, अमेरिकेचा इतका पैसा भारत घेत असेल, तर भारत आपसूक त्यांच्या मिंध्यात जाईल. त्याचं वर्चस्व निर्माण होईल. आणि ते सांगतील ते आपल्याला मूक राहून ऐकावं लागेल. इंडियन बिझनेसेसमध्ये त्यांचे मोठे स्टेक्स असल्याने महत्वाचे निर्णय तेच घेतील आणि पर्यायाने मग भारतीय राजकारणातील सगळे महत्वाचे निर्णय डायरेक्ट-इंडायरेक्ट अमेरिका घेऊ लागेल. आणि आपल्याला काहीच करता येणार नाही! प्रसंगी त्यांच्यासाठी युद्धही करावं लागेल! अमेरिकेची इन्व्हेस्टमेंट मला नको आहे असे नाही, पण प्रमाणात! कोणतीही गोष्ट प्रमाणात ठीक आहे. तिची अती झाली, की माती होतेच!
"मला अमेरिकेला सपोर्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही. चीनशी युद्ध नाही, पण हेल्दी कॉम्पिटीशन करायला मलाही आवडेल. पण त्यासाठी मी माझ्या देशाची इकनॉमी व डिग्निटी सॅक्रीफाईज् नाही करू शकत!" पंतप्रधान आपली बाजू सांगून थांबले.
"आणि म्हणून तुम्ही त्याचं प्रोपोसल नाकारलंत?" शक्तीने सगळं नीट ऐकून घेऊन विचारलं.
"येस. यु आर राईट! यांच्या आर्थिक फायदा-नुकसानासाठी मी आपल्या देशाचा गौरव-प्रतिष्ठा, मान-सम्मान त्यांच्यासमोर झुकवणार नाही! यांच्या कोल्डवॉरसाठी माझ्या भारताला रणक्षेत्र म्हणून वापर करण्याची मी यांना परवानगी कदापि देणार नाही!" पंतप्रधान पुनीत आर्मरेस्टवरील मुठी आवळत ठामपणे म्हणाले.
"आय सी!" विचार करत शक्ती म्हणाला.
"आणि तुला माहीत आहे, आपल्यातलं अमेरिकेच्या आत्ता सर्वांत जवळ कोण आहे?" पीएम पुनीत यांनी विचारात हरवलेल्या शक्तीला डोळे बारीक करून प्रश्न केला.
शक्तीने अचानक भानावर येऊन वर त्यांच्याकडे पाहिलं. काही महत्वाचं ऐकायला मिळेल म्हणून त्याने कान विस्तारले होते. लक्ष देऊन तो ऐकण्याचा प्रयत्न करू लागला...
"भारतातली सर्वांत मोठी अपोजिशन पार्टी!" पीएमनी जणू विस्फोट केला.
शक्तीला कानावर विश्वास बसेना!!! तो विचारांच्या अंधकारात अधिकच गुरफटत गेला...
"इंद्रदत्त वाचस्पती यांची..." त्याने वाक्य पूर्ण केलं नाही. पण,
"पार्टी, जनमानस!" म्हणून पीएमनी त्याचं वाक्य पूर्ण केलं.

शक्तीचं डोकं भनभनू लागले. कारण जर असे असेल, तर अमेरिकेने त्यांच्या सर्वांत मोठ्या प्याद्याला स्वतःच का उडवलं असेल? हा मोठा प्रश्न अजगर बनून उपस्थित राहिला होता; ज्याचे वेटोळे शक्ती भोवती अधिकच घट्ट कसले जात होते!