कान्हाची दृष्ट Archana Rahul Mate Patil द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कान्हाची दृष्ट

मला लहानपापासूनच कृष्ण भक्तीचे वेड... त्यांच्या गवळणी.. त्यांच्या लीला. भगवंताचे लहानपण.. खूपच आवडते...😘

श्री भागवत कथा चे पारायण मी अनेक वेळा एकले आहे . त्याचा प्रत्यक्षात वाचनाचा अनुभव अजून त्तरी घेता नाही आला .... पण मी माझे अनेक छंद जोपासले आहे. त्याचप्रमाणे कृष्णाच्या बाललीला चे कथाचे वाचन ही मी अधून मधून करत असते..☺️

माझ्या माहेरी आडगाव ला प. पू. श्री विनायक जी स्वामीजींच्या सांगण्यावरून दररोज सकाळी राधाकृष्ण मंदिरात 4 वाजता काकडा आरती केली जाते.. त्यानंतर मंदिरात महापूजा असते..👣

राधाकृष्ण मूर्तींना सकाळी महास्नान घालण्यासाठी विवाहित महिला व पुरुष यांची जोडी नेमलेली असते.. आठवड्यात प्रत्येकी दोन दिवस असे पूजा करण्यासाठी दिले जाते.. दोन दिवसानंतर पुन्हा नवीन जोड्याना संधी दिली जाते... सगळ्यांनाच पूजेचा मान प्राप्त व्हावा, देवाची पूजा केल्याचे समाधान मिळावे असा त्यामागचा उदात्त हेतू..☺️

महा स्नान आटोपल्यानंतर देवाना साप्ताहिक वाराप्रमाने वस्त्र परिधान केली जाते..जसे की सोमवारी लाल.तर मंगळवारी पिवळा.. बुधवारी निळा तर गुरुवारी हिरवा.. कधी नारंगी तर कधी गुलाबि असे अनेक रंगाची वस्त्रे परिधान केली जातात ... त्यानंतर त्यांना वेगवेगळे आभूषणानी सजवले जाते.. कानात कुंडल, मोरमुकुट, हातात बंसी, वैजयंती माला,कमरपत्ता,पीतांबर नेसून भगवान श्री कृष्ण 💞

तर राधा राणी ल कंगण, नाकात नथ, मंगळसूत्र, हिरव्या बांगड्या, पैंजण, बाजूबंद कमरपत्त, हळदी कुंकू, तुळसी मंजुळा हार, वेगवेगळ्या फुलांच्या माळांनी,तयार केलं जातं...❣️
त त्यांचे ते अनुपम, मनमोहक रूप आपल्याला साक्षात परब्रम्ह परमेश्वर , भगवंताचे दर्शन आपण घेत आहोत, असेच वाटते.. खरंच.. खूपच सुंदर दिसतात त्या मुर्त्या... एकदा तरी अडगावला आल्यानंतर राधाकृष्ण मंदिरा ला नक्कीच आवरजून भेट देण्यासारखे ठिकाण आहे...🤗

प्रत्येक वार्षिक कार्यक्रम मंदिरात मोठ्या भक्तिभावाने, उत्साहाने साजरा केला जातो.. अधिक मासात व कार्तिक महिन्यात संपूर्ण महिनाभर सकाळी 6 वजेला महाआरती केली जाते.. त्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील गावकरी मंडळी ही मोठ्या आनंदाने उपस्थित राहतात..☺️

मी ही सातवी पासून कार्तिक महिन्यात सकाळी लवकर उठून कात्यायनी मातेचे व्रत करत होते..या व्रतात अनेक नियम पाळायचे असतात..जसे की फक्त एक वेळेस फलाहार करून,वे एक वेळेस उपवास सोडायचा असतो..त्यात ही दविदला म्हणजेच ज्या वस्तूचे दोन भाग होतात ती चालत नाही..जसे की शेंगदाणा.. डाळी कडधान्ये असे अनेक प्रकार,,... साधं राहायचं, जजप करायचा.. सकाळी, संध्याकाळ आरती घ्यायची ..पूजा करायची ..खूपच भरी वाटायचं..आपणही मोठे झाल्याचं फिील यायचा...😁
कार्तिक महिन्यात च दिवाळी असल्यामुळे बरेचसे खाद्यपदार्थ खाता येत नवते..डाळीचे लाडू,चिवडा असे काहीच नाही..मग आमच्यासाठी स्पेशल न वेगळे रव्याचे किव्वा मग मैद्याचे लाडू बनवायचे.. भजी चालत नाही म्हणुन गोड भजे, गुलगुळे खायचे...
उपवास असताना दुसऱ्या गावी जायलाही चालायचे नाही...मग काय दिवाळीला मामाच्या गावी पण नाही🙄....

सगळ्या 5जनी मैत्रिणी होतो..😍 माधुरी,गीता,कलींदा,कावेरी,न,मी...या सगळ्या गल्लीतील मैत्रिणी होत्या.. त्याच्याबरोबर मी सकाळी 4 ल उठून गणपती मंदिराजवळ असलेली बागाची विहिरीतून पाणी काढून आम्ही अंघोळी करायचो.. कुणाला जर विहिरीतून पाणी काढता नाही आले,तर त्यालाही करून द्यावं लागायचं... गीता आमच्या सगळ्यांमध्ये लहान असल्यामुळे तिला मलाच अंघोळीसाठी पाणी काढून द्यावं लागायचं..🙄
हिवाळा असल्यामुळे विहिरीतील पाणी अतिशय थंडगार पाणी होते...एक बकेट अंगावर घेईपर्यंत खूप मोठ्याने ओरडून दिंघाना करून , एकमेकींच्या अंगावर पाणी मारायचो..नंतर काही नाही वाटायचं....मग अाेल्या वस्त्राने च देवीची पूजा ,आरती करून घरी जायचो...त्यानंतर साडे पाच च्या दरम्यान राधाकृष्ण मंदिरात पळतच जायचो..तिथे संपूर्ण अष्टक घेवून,गवळणी,पद घ्याचो... मग सहा वाजता काकडा आरती, सुरू केली जाते...

त्यानंतर राधाकृष्ण भगवंतांना पुष अर्पण केले जाते..तेव्हा पुष्पांजली म्हतली जाते...
"पुष्पांजली तुम्हा अर्पितो...
राधाकृष्ण सदया...
तव पदी वंदन करण्या स्मृती
द्यावी या ह्रदया...🌹🌹

भाविक जन हे आनंदाने..
नमिती ताव ठायी..
धन्य मानिती ते आपुल्याला
संशय मुळी नाही...🌹🌹

दीन दयाळा आम्ही लेकरे..
शरण तुम्हां आलो...
भक्तिप्रेमे पुष्पांजली..
वाहण्यास सजलो...🌹🌹

इति पुष्पांजली समर्पयामि...💐🌹🌹🌺🌺
✍️✍️✍️💞Archu💞

महाआरती झाल्यानंतर तेथे एक आजीबाई नियमाने राधाकृष्ण ची दृष्ट फुलाने काढत..मलाही ती खूप , आवडायची.. म्हणून मग मी ती सिकुन घेतली..

कुणाची झाली दृष्ट...💕
माझ्या कृष्णराया...💞

तुम्हा आणि सांगू कान्हा 💕
उत रिते लिंबलोणा..
तुम्हावर न बहू माया...
माझ्या कृष्णराया..💞

देव उभे महाद्वारी....💕
साधू संत सेवा करी.
रुख्मिनिची बहू माया..
माझ्या कृष्णराया..💞

देव उभे यमुनातिरी..💕
सुदाम जी सेवा करी..
राधिके न बहू मया...
माझ्या कृष्णराया..💞

साधू संत येती जाती💕
तुम्हां दृष्ट लववीती..
वर वर न याची माया...
माझ्या कृष्णराया..💞

मीराबाई काढीन दृष्ट..💕
भक्तीच्या मोहऱ्या मीठ...
गलावर लावीन बोट...
माझ्या कृष्णराया...💞

✍️✍️💞Archu💞

आरती संपल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात पाच प्रदक्षिणा घालून... मंदिरासमोर असलेले सप्तृषी चे झाड आहेत, तेथे दिवा लावून, तेथेसुधा सात प्रदक्षिणा पूर्ण करत होतो..
पूजा विधी झाल्यानंतर आम्ही सगळ्या स्वामिजिकडे यायचो, दर्शन घेऊन स्वामिंजी आम्हाला उपवास असल्यामुळे मोसंबी,डाळिंब, केळी व इतर फळे,तर कधी खजूर, देत असत..आम्ही मग बराच वेळ तेथे थांबायचो..
..
(उर्वरित भाग वाचण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल🙂.. लवकरच तो भाग पोस्ट करील... तरीपण काही चुक उणीव असल्यास हक्काने कळवा.. तुमच्या आमच्या मधील..
💞Archu💞✍️✍️)