rakhumai books and stories free download online pdf in Marathi

रखुमाई

सकाळी सकाळी टी. व्ही. चालू झाला .. तेव्हा त्यावर सकालीच अभंग वाणी चालू होती... आषाढी एकादशी जवळ आल्याने त्यात विठ्ठलाची भजन,अभंग चालू होते..थोड्यावेळाने त्यात रखमाई चालू झालं..ते ऐकल..आणि मी स्तब्ध होऊन ऐकत राहिले....

तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना...💕
एकट्या विठुरायाला हो संसार पेलणा...💞

ये ग ये ग रखुमाई...👣
ये भक्ताच्या माहेरी...
सावलीच्या पावलांनी...
विठू च्या गाभारी ये.🌹

तू सकळाची आई...👣
साता जन्माची पुण्याई..
घे पदरात आम्हां...
छाया धर बाई...❣️

तुझी थोरवी महान...👣
तिन्ही लोकी तुला मान...
देई वरदान होऊ..
तुझ्या पालखीचे भोई...💞

तू कृपेचा कळस..👣
आम्ही पायरीचे दास...
तरी युगे युगे उपेक्षाच ..
केली तुझी बाई...💞

तू मायेचा सागर. 👣
आम्ही उपडी घागर..
आता करू दे जागर..
होऊ दे ग उतराई...💞

रखुमाई रखुमाई👣👣
रखुमाई रखुमाई. ...💕

हे संपल्यानंतर मात्र मी माझ्या रोजच्या कामाला लागले.. पण मन मात्र भूतकाळात रमून गेले होते..
माझ्या आजीचा आवाज खूप सुंदर आहे..त्यांना वेगवेगळे सप्तसुरांची आवड... त्यात त्या भजन ,अभंग, गवळण, पद, भारुड, गोंधळ.. लोकगीत.. जात्यावरच्या ओव्या खूपच छान म्हणतात.. माझ्या लहानपणी मी त्याचाजावळ बसून एकत असायचे. त्यांच्यापासून मग मलाही देवाची प्रार्थना ,पूजा करण्याची प्रेरणा मिळाली..
त्यांना आम्ही मा म्हणतो💞...

आम्हा भावंडाची जर कधी भांडण झाली तर आमच्यावर गाणे म्हणायच्या !!!!!!!!!,आम्हाला उद्देशून त्याचे बोल असायचे..त्या गाण्यांमध्ये व्यक्त करताना maa अतिसुंदर काव्य करायच्या....💕
अकरावीत असताना मामासोबत पंढरपूर कार्तिकी एकादशीला गेले होतेमी त्यावेळेस पहिल्यांदाच पंढरपुरास गेले होते त्या अगोदरही कधी केले नाही किंवा त्यानंतरही जाण्याचा कधी योग जुळून आला नाही मला जाण्याची खूप इच्छा आहे आणि मी लवकरच जाण्याचा प्रयत्न करीन..
असो ....
मला हे सांगायचं होतं की मी पहिल्यांदाच पंढरपूर दर्शन करीत असल्यामुळे आम्ही गेलो त्यावेळेस विठ्ठलाचे सुंदर मूर्ती दर्शन घेतल्... मी विचार करत होते या देवाने आपल्या कमरेवर हात का ठेवले आणि यांच्यासोबत यांची देवि का नाहीये????. जसे की रामा सोबत सितेची मूर्ती असते .कृष्णा सोबत राधा राणी असते...तर श्री विठ्ठल यांची पत्नी रुक्मिणी माता कुठे गेली????🤔🤔

आम्ही बारीला लागलेलं होतो आणि विठ्ठलाची मूर्ती दिसत होती मग मी इकडे तिकडे पाहीले पण तरीसुद्धा आम्हाला रुक्मिणी ची मूर्ती काही दिसेना ..मी बाहेर होते तेव्हा मंदिरावर तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर असे लिहिले होते.. तर इथे एकटाच विठ्ठल आहे मग रुक्मिणी माता का नाही... तेव्हा मी maa ला विचारलं ही रुक्मिणी इथं का नाही ??? 🤔🤔
# मा म्हणाल्या अग बाई ती रुसून गेली होती दंडकरण्यात ...तिथे जाऊन बरेच दिवस राहिली ...त्यानंतर देवाने आणि त्यांच्या भक्ताने तिचा रुसवा काढून तिला या मंदिरात आणलं ...अगोदर रुक्मिणी आणि पांडुरंग एकत्र आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी उभे होते पण मंदिरातील भक्तांची मांदियाळी काही संपता संपत नव्हती आणि रुक्मिणी माता व भगवंतांना काही एकांत मिळत नव्हता... म्हणून रुख्मिन माता देवाकडे तक्रार करू लागली..पण देव काही मनावर घेईना...☺️☺️

रुक्मिणीला आता भक्ताचा तिटकारा होऊ लागला... भक्तांनी आणलेली भेट प्रेमाने आपलस करून घेणारी माता आता त्याच्याशी संवाद ही करत नवती.. अबीर, बुक्का, तुळसी मंजुळा याचा सुवास ही तिला सहन होईना...😏😏

वेळोवेळी भक्तासाठी धावत जाणारे पांडुरंग आपला मात्र विचारही करत नाही...असे तिला स्री सुलभ सवयी प्रमाणे वाटू लागले... देवाच्या सामाजिक कार्यात आपल्याला कुठेही स्थान नाही असे तिला वाटू लागले...अवेळी,मध्ये रात्री जरी कुणी देवाला साद घातली तरी भगवंत कुटलाही विचार न करता धावत पळत आपल्या भक्तासाठी जातात 😒😒..

आता रुक्मिणी देवासी वाद घालायला लागली. पण देव मात्र धिम््मच... कुटलही प्रतिसाद देईना .. रुक्मणी देवासी वाद करून कंटाळली... देवासी तिने सवांद तोडला...आणि अशीच एक दिवशी रात्रीच्या वेळेस दंडक अरण्यात निघून गेली.🤨..

सकाळी महापुजेसाठी पुजारी आले असता त्यांना तेथे रुक्मिणी दिसेना... रुक्मिणी कुठे गेली???असा प्रश्न सगळ्यांनाच पडला... तेव्हा सगळी संताची मांदियाळी मंदिरात जमा झाली..आणि देवानं विचारत म्हणाली.की जगजण्णानी रुक्मिणी माता कुठे आहेत?? तेव्व देव म्हणाली त्या रुसून बसल्या आहेत...... भक्त म्हणली का???देव म्हणाला मला माहिती नाही...(देवाला वाटल खरं काय कारण सांगितलं तर भक्त मंडळी रुस्तील...मग यांचा अबोला मला काही सहंन होणार नाही)🤫
भक्त मंडळी म्हणाली चला मग तुम्ही आमच्यासोबत. सावळ्या हरी एकुया तरी काय झालं रसायला..आपण त्यांना विचारू... त्यांना समजावून आणू... त्यांच्याशिवाय पंढरीला शोभा नाही...तुम्ही सुद्धा अपूर्ण दिसतय..
आता सगळे भक्त मंडळी भगवंता सोबत रुक्मिणी मातेला समजावयला चालले होते.. तेव्हा रुक्मिणी च संवाद गाण्यांमध्ये मांडलेला आहे.. 🤗

💕रुक्मिणी रुसली... कोपऱ्यात बसली..
चला जाऊ पुसायला...(ध्रु.)

माझ्या सावळ्या हरी एकु दे तरी..
काय झालं रुसायला...🤨

रखुमाई म्हणते फुग्वूनी गाल..
भक्ताच्या चालीवर तुमचा ताल..
या भक्ताघरी काय ठेवलंय हो.
उठसूट घुसायला...1🙄

कोण ती म्हणे तुमची जनी...
तिची का केली वेणी फणी ..
दळण कांदन करुनी गेले
लुगडी धुवायला....2😏😏

तो एक आहे तुकोबा वाणी..
त्यानं कुठं लिहिली चार दोन गाणी..
तेवढ्यासाठी काय विमान धाडायच..
फुकटच बसायला ..3😔

उगाळ ल चंदन हरकत नाही..
एकनाथ जसा कुणी परका नाही..
श्रीखंद्या बनून तिथेच राहिलात..
पाणी भरायला...4🤐

आणखी तो एक सेना नाव्ही..
त्याची ती धोपटी तुम्ही क घ्यावी...
राजाची केली स्वतः हाजा मत..
आणि बसला तासायला...5😟

भले दमजीन धान्य वाटल..
त्यासाठी तुम्ही कही करावं म्हटल..
पीतांबर सोडून लांगोटी शिवाय..
काही नवत क नेसायला...6😕

नाम्याच गेला होता कीर्तन एकायला..
अंगात आल्यावणी लागलय नाचायला..
तरी बरं तिथं कबीर होता..
सावध करायला..7🤫

चोकोबा एक तर जातीचा माहर..
त्यांना कुठं केलं मायबाप जोहार..
त्याचा संग ढोर अाेधलीत..
रोहिदास संग चामडी रंगव्हायला...8😒

सावता च मळा फुलवला
गोरोबा संग मडकी घडवली ..
आता कोण बाकी सांगा गुरुदास..
काय झालं तुम्हा हसायला....9😁

कटीवर ठेवून दोन्ही हात .
गालात हसतो पंढरीनाथ..
श्रीमुख पाहून हरपून गेले...
नमिते चरणाला ....10😊

पाहुनी या हसत देवाला..
रुक्मिणीच रुसवा गेला..
पहूनिया श्री विठलाला..
रुक्मिणी लागली हसायला..11🤗💕

...✍️✍️✍️archu..💞

आता विचारायला आल्यावर रकुमाईला वाटल यांची चांगलीच हजेरी घ्यावी.. आणि त्या आणखीनच रुसण्याचा आव आणत दोन्ही गाल फुगवून बसल्या. .. देवांनी विचारल्यावर म्हणेकी ह्या भक्तच्या घरी असे काय आहे.जे तूम्ही उठसूट त्यांच्याकड जाता🙄 आतासुद्धा तुम्ही त्यांच्या च तालावर ताल म्हणून माझ्या कडे आला आहात........😒1..

आणि कोण कुठली ती जनी की बनी ... तिच्यासाठी तुम्ही तीची वेणी फणी करून देता..तिच्यासाठी अंबाडा काय घातला.. .माझ्यासाठी मात्र कधीच अस नाही केलं तुम्ही...😏.आणि एवढ केलं ते कमी होत की काय म्हणून तुम्ही नदीवर जाऊन तिची लुगडी सुध्दा धुवायला नेलीत..दळण करू लागलात..आणि मी का म्हणून तुमच्यावर रुसू नको असे तुम्हाला वाटते...🙄2..

आणखी एका...कोण तो तुकोबा वाणी .. त्यांनी तुमच्यावर चार दोन गाणी काय लिहिली... स्वारी तर खूपच खुश झाली. . हुरळून गेले होते.. संत तुकोबाराय यांना सदेह वैकुंठगमन करण्यासाठी तुम्ही आपल विमान दिलं... काय म्हणून दिलं...तो फक्त एकटाच तुमचा भक्त होतं का...बाकीचे नाही.. सगळे नियमाप्रमाणे चार चोघाच्या खांद्यावरून नाही क गेले... मग हा पॅक्सपात का??? पुष्पक विमान हे काही खेळन आहे का??? असे ते कुनाच्याही हवाली करून द्यायला...म्हणून मी रुसले..😣😣😒😒..3..

आणकी सांगते ऐका.. पैठणच्या एकनाथांच्या घरी तुम्ही त्यांना चंदन उगाळून दिलीत..माझी काहीच हरकत नाही..पण तुम्ही कित्येक वर्ष तिथेच श्रीखंद्या बनून राहिलात... एक पणक्या बनून....हे काही मला अजिबात आवडल नाही..😒😒...4..

आणि एकदा काय झालं.. तो सेना न्हावी आजारी पडला म्हणून त्याचा ऐवजी तुम्ही त्या यवन राजाची हजामत करायला गेलात.. जेव्हा दुसऱ्या दिवशी सेना नाव्ही धावतपळत राजवाड्यात गेला तेव्हा यवन राजा म्हणाला की तू तर कालच येऊन गेला स न.... टेववा कुठे सेना ल समजल की तुम्ही येऊन गेलाय... भक्तासाठी तुम्ही काय काय कराल काय माहित,☹️☹️...5

दुष्काळ पडला म्हणून तुमच्या भक्त दमाजीन धान्याचे कोठार सर्वा गिर्गरिन खुल केलीत..राजाने त्याच्यावर दंड बसवला म्हणुं तुम्ही त्याच्या मदतीसाठी अंगावर घोंगडी, डोईवर फेटा,नी कमरेला धोतराचा कासा असा पोशाख करून गेलात... कास्यात कधीच न संपणारे हिरे, माणिक मोती, नाणी ई .पितंबरासहित राजाला देवून आलात.. सगळे आश्चर्य चकित झाले...ते काही मला आवडलं नाही म्हणून मी रुसले. 😣😣🙄6

असच एकदा नम्याच,, संत नामदेव कीर्तन एकायल गेलात...तर नामदेव कीर्तनात दंग होऊन नाचत होते... तेव्वं तुम्ही सुद्धा आपली शुद्ध हरपून, अंगात आल्यवणी कीर्तनात नाचायला लागलात...नाचताना तुमचा पीतांबर गळायला लागला.. बर तरी तिथे संत कबीर होते म्हणून त्यांनी तुमच्या हाताला धरून सुदिवर आणले...नाहीतर अनर्थ झाला असता.. म्हणून मी रुसले😒😒..7

आणि तुम्हाला मी काय काय सांगू ....त्या चोखोबसंग तुम्ही ढोर अाेढलीत...रोहिदास संग चामडी रंगवली... गोरोबा संग मडकी घडवली... कबिराचे शेले विणले.... आता कोण बाकी राहिलं तेव तूम्हीच सांगा बरं.... बारा बलुतदार कामे करताना तुम्हाला काहीच कसं वाटतं नाही...हे ही मला आजपर्यंत समजल नाही.🧐🧐8. व 9.

मी एवढी रागावलेली,🙄 पण तुम्हाला काही फरक पडत नाही.. आणि वरून तुम्ही गालातल्या गालात गोड हसता... काय म्हणावं याला....
देवाच्या समजावण्या ने रखुमाई आपला सगळा राग विसरून हसत देवाच्या श्री चरणा ल स्पर्ष करते... व देवासोबत रवुळात येते.. पण एका अटीवर..की ती तिच्या मर्जीने दुसऱ्या मंदिरात राहील.. जेथे ती भक्त आणि भगवंताच्या भेटीत अडथळा निर्माण करणार नाही... म्हणू न आजही रखुमाई मातेचे मंदिर देवाच्या बाजूला आहेत. भक्तमंडळी तेथे जावून दर्शन घेतात. ...

.... क्रमशः
💞Archu,💞....,. ✍️✍️✍️✍️
(मी माझ्या अल्पमतीनुसर वरील अर्थ लिहिण्याचा प्रयत्न केला आहे... काही चूक झाल्यास नक्की कळवा...💞Archu💞✍️✍️✍️)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED