laahni aashadhi books and stories free download online pdf in Marathi

लाहनी आशाढी

नुकताच माझ्या आजीचा फोन येऊन गेला.... म्हणाली की" या वर्षी मात्र माझी वारी चुकली म्हणायची... या कोरूनामुळे.. आणि लोक डाऊन मुळे ...दौलताबाद स्वामींची वारीला काही जाता आले नाही... "मनात काहीतरी चुकल्यासारखं वाटू लागलं☹️.. यावर्षी ना पंढरीची वारी..ना जनार्दन स्वामींची वारी... आता घरीच राहायची बारी..😌 कित्येक वर्षांनी नेहमीच न चुकता स्वामींची वारी करणारी माझी आजी यावर्षी जाता आले नाही म्हणून त्रागा करुन घेत होती....
मी अगदी लहान होते तेव्हापासून माझ्या माहेरचे सगळे वृद्ध तरुण मंडळी न चुकता जायची ...काही कामामुळे पंढरपूरच्या वारी जाता आले नाही ,तर देवगिरीच्या म्हणजेच दौलताबादच्या वारीला जाऊन संतचरणरज स्पर्श करून आनंद घेता येतो ...सर्व संतांची मांदियाळी व साक्षात परब्रम्ह श्री विठ्ठल जनार्दन स्वामींच्या भेटीस येत असतो .. असे संत म्हणतात..एकादशीच्या दिवशी ही आपल्या दींड्या घेऊन पुण्यतिथी सोहळा असतो ..तीन दिवसांच्या या सोहळ्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात..मीही माझ्या वडिला सोबत गेलेले आहे.. शाळेच्या सहली निमित्ताने गेले आहे...
मी सहावीत असताना आमची सहल दौलताबाद किल्ला,खुलताबाद गेली होती त्यावेळेस मी तईसोबत गेले होते.. अगोदरही ताई तिथे आलेली असल्यामुळे मला आजूबाजूच्या परिसरात विषयी माहिती सांगत होती ..उंच उंच मनोरा पाहताना एक प्रकारची भीती वाटत होती ..जातानाच तिकीट घराजवळ आम्ही सगळ्यांनी फोटो काढले ..दहा रुपये कॉपी प्रमाणे पैसेही दिले.. तेवढाच एक आनंददायी क्षण कॅमेरातून आजही दिसतो ...
वर चढत असताना त्या भुयारी मार्गातून मला खूप भीती वाटत होती.. पण शाळेतील मैत्रिणी हसतील म्हणून मी काहीच बोलत नव्हते.. शिवाय मी ताई ची ओढणी धरून तिच्या मागेमागे चालत असताना माझी एक चप्पल तुटून गेली आणि मी खरोखरच मोठ्याने रडायला लागली..का तर अंधार होता.. दिवट्या होत्या.. त्याच्या उजेडात माझी चप्पलही मला दिसत नव्हती आणि बाकी सगळे पुढे गेले तर आपण हरवून जाऊ या भीतीने आणखीन रडायला येत होतं.. मग माझी दुसरी चप्पल ही ताईने फेकून दिली आणि मग आम्ही प्रवास किल्ल्यापर्यंत केला ..त्यावेळेस अनवाणी पायाने एक वारीच झाली म्हणायची...ती सहल अविस्मरणीय होती..

त्यानंतर तीन वर्षांनी मी पुन्हा माझ्या आत्या सोबत दौलताबादच्या वारीसाठी गेले होते.. माझा लग्न झाल्यापासून वारीला मी फक्त दोन वेळेसच गेले आहे..एक वेळेस गेलो होतो तेव्हा खूप पाऊस चालू होता ,तर वरती जाता आले नाही म्हणून तिथे असलेल्या गणपतीच्या मंदिरात जवळूनच आम्ही माघारी परतलो होतो ...आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा मी माझ्या वडिलान सोबतच आणि माझ्या लहान मुलांसोबत गेले त्यावेळेस त्यांनी आम्हाला पवनचक्की खुलताबाद दर्शन आणि महेश माळ आहे ते दाखवून आणले होते... नंतर जाऊ जाऊ म्हणत असतानाही काही योग जुळून आला नाही... पण खरंच दौलताबाद हे अगदी पाण्यासाठी तर आहेच शिवाय तेथे स्वामी जनार्दन स्वामींचे पुण्यतिथी सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो..त्याचा ही लाभ घ्यावा.. तेथे अनेक दुकानेही थाटली जातात खुपच मनमोहक अशी दृश्य वरून आपल्याला पाहायला मिळते ..तर तुम्ही एकदा नक्कीच दौलताबाद वारीला जाऊन या खूप आनंद वाटेल असा माझा अनुभव आहे...

दौलताबाद चा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे ऐतिहासिक वारसा लाभलेले दौलताबाद प्रेक्षणीय स्थळ देखील आहे तेथे असलेला कुतुबमिनार उंच गगनभेदी गड किल्ला स्वामी समाधी स्थळ यासाठी प्रसिद्ध आहे...
आषाढी एकादशी प्रमाणेच देवगिरी किल्ल्यावर म्हणजेच दौलताबाद देते आषाढी एकादशीला यात्रा असते इलाच् लहान आषाढी असे ही म्हणतात.. आषाढी एकादशीला वारकरी पंढरपूरला जातात ..त्या एकादशीला मोठ्या एकादशी असेही म्हटले जाते...

देवगिरी ची किल्लेदार आणि संत एकनाथ महाराजांचे गुरु असलेले श्री जनार्दन स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दौलताबाद किल्ल्यावर दरवर्षी वारी नित्यनियमाने चालते.. हजारो वारकरी देवगिरी च्या जनार्धन स्वामींच्या दर्शनासाठी दिंड्या घेऊन घेतात.. जनार्धन चरणी लीन होण्यासाठी वारकरी भाविक मोठ्या संख्येने येथे हजेरी लावतात .तीन दिवशीय चालू असलेला हा पुण्यतिथी सोहळा काल्याच्या सोहळ्याने समाप्त होत असतो..महाराष्ट्रभरातील हजारो वारकरी भानुदास एकनाथ असे म्हणत दिंड्या मार्गक्रमण करीत असतात.. देवगिरी गडाच्या दुर्ग तोफे जवळील जनार्दन स्वामींच्या ध्यान समाधीचे दर्शन हजारो वारकरी घेत असतात..यावर्षी जनार्दन स्वामींची 445 वी पुण्यतिथी होती

जनार्दन स्वामींचा इतिहास सुमारे पाचसे वर्षापासून चा आह.. म्हंजे 1450ते 1560 पर्यंतचा.. ऐतिहासिक नोंदणी नुसार स्वामी यांचे गुरु होते जनार्दन स्वामी ही मुळ चे चाळीसगावच्या देशपांडे घराण्यातील ब्राह्मण घरात होते ..त्या काळात निजामशाही काळातील देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार म्हणून त्यांच्याकडे किल्लेदारी होती.. किल्ल्याच्या प्रशासकीय विभागाची जबाबदारी ते सांभाळायचे.. जनार्दन स्वामी यांची श्री गुरुदत्ता वर प्रचंड श्रद्धा होती.. स्वामिनी तेथेच आत्म्नात विवेक सागर हे ग्रंथ लिहिलेले आहेत.. एकनाथ महाराजांचे वास्तव्य ही बरेच वर्ष या ठिकाणी होते..आजही शेकडो वर्षांची परंपरा जपत श्री संत एकनाथ महाराजांची दिंडी जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त दौलताबाद मध्ये येत असते..

अशीच एकदा जनार्दन स्वामींनी संत एकनाथांना चारधाम यात्रा करण्यासाठी आज्ञा दिली . संत एकनाथ महाराज निघून गेली. तेव्हा पैठणऊन एक सद्गृहस्थ देवगिरी किल्ल्यावर आले..स्वामींना म्हणाले की तुमचा जो शिष्य एकनाथ आहे ना मी त्याच्या गावाहून पैठणहून आलो आहे ..एकनाथांच्या आजी-आजोबांना त्याच्या भेटीची ओढ लागली आहे. त्यांची प्रकृती तितकीशी नाही ते नाथांच्या आठवणी ने रडत असतात .स्वामींना हे ऐकून आश्चर्य वाटले एकनाथ इतके वर्ष माझ्याजवळ माझा शिष्य बनवुन करायला त्यांनी कधीच त्याच्या सांगितले नव्हते. ..
स्वामिनी एक पत्र लिहून त्या ब्राम्हण सद्गहसता जवळ दिल्ली आणि त्यांना म्हणाले की तीर्थयात्री वरून जेव्हा एकनाथ पैठण स येईल तेव्हा त्यात माझे पत्र देणे.. हे मी सांगतो आहे म्हणूनच तीर्थयात्रा करून ते पैठणला ही येईल.. ब्राह्मण ते पत्र घेऊन पैठण सी निघून गेला...
फिरत फिरत एकनाथ महाराज पैठण मध्ये आले..पण ते त्यांच्या वाड्याकडे किंवा आजी-आजोबांकडे गेले नाही तर ते गावाच्या बाहेरच थांबले. गावातील ब्राह्मण आहेत तेव्हा त्यांनी पत्र देण्यासाठी आले..
तुमच्यासाठी पत्र दिले आहेत असे ऐकताना नाथ सद्गदित झाले.. स्वामिनी मजा कामगाराची आठवण केली म्हणून त्यांना रडू लागली.. त्यांनी जमिनीवर शुभ्र वस्र टाकून त्यावर जनार्दन स्वामींचे पत्र ठेवले व त्या पत्राला सात प्रदक्षिणा घालून साष्टांग दंडवत प्रणाम केला..त्यानंतर त्यांनी ते पत्र वाचण्यास घेतले ..त्यात लिहिले होते
"की एकनाथ तुम्ही तेथेच थांबा.नामस्मरण चालू ठेवा देव तेथेच तुमच्या भेटीस येतील. .."
तेव्हापासूनच नाथ स्वामींच्या आज्ञानुसारच त्यांच्या भेटीसाठी जात असत ..त्यानंतर ते पैठणशीच राहिली..

जनार्दन स्वामी हे किल्लेदार असल्यामुळे किल्ल्याच्या कामासाठी अनेक मजूर काम करीत असत.. जनार्दन स्वामी हे अखंड दत्तात्रयाची नामस्मरण करीत असत.. किल्ल्याजवळ काही दूर असलेल्या सुळी भंजन या ठिकाणी श्री दत्तात्रेय प्रभू यांनी त्यांना साक्षात्कार दर्शन दिले. तेथे आजही दत्तात्रय प्रभूंची मंदिर आहे .. विलोभनीय असे दृश्य याठिकाणी आपल्याला पहायला मिळते.. या ठिकाणी लोकांच्या जाळी खाली सर्वप्रथम जनार्दन स्वामी यांना दत्तात्रेय भेट दिली असे म्हणतात.. त्यानंतरही ते नेहमीच या ठिकाणी जावून भेट घेत असत.. एक वेळेस दत्तात्रय प्रभूंनी अवधूत रूपामध्ये पाठीमागे गाय व काही श्वान होते .. ज्यावेळेस जनार्दन स्वामी दर्शनास गेले होते .त्यावेळेस एकनाथ सोबत होते... दत्तात्रय प्रभू भोजन करीत असता जनर्धन स्वामी त्यांच्या ताटी बसले होते.. थाळ्यामध्ये श्वान च्या दुधाचे सेवन चालू होते . जनार्दन स्वामी गुरूंची नाम घेत घेत प्रसाद घेतला.. मात्र एकनाथांनी जेवायला सुरुवात केली नाही ..स्वामींनी प्रसाद घेण्यास सांगितले ..पण एकनाथांनी काही प्रसाद हातावर घेतला व समोर च्या बाजूला असलेल्या जाळीमध्ये फेकून दिला ..तेव्हा स्वामी म्हणाले की तू अजून बच्चा आहेस ..तुला गुरुचे बोध नाही तुझे परमार्थ अजून कच्ची आहे ..त्यासाठीतुला बरेच वर्ष वाट पहावी लागेल. गुरु इतक्या सहजासहजी मिळत नाही .. मिळाल्यावरही तो ओळखू येत नाही आणि ओळखल्यावर ही त्याची प्रचिती होत नाही ...आम्ही तर ते म्हणतील तेच आपली पूर्व दिशा.. याप्रमाणे ठेवता आले. .. म्हणूनच श्री दत्तात्रय प्रभ प्रभू यांचे दर्शन होऊन आपण कृतार्थ झालो आहोत.. स्वामिनी एकनाथला आपले शिष्य मानले होते..
जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथीसोहळा साजरा केला जातो तेथे त्यांची जास्त वेळ व्यतीत केल्याने त्याचे समाधिस्थान तेथेच किल्ल्यावर आहे.. त्यांच्या जवळच असलेल्या श्री दत्तात्रय प्रभू च्या चरण पादुका आपल्या दर्शनासाठी आहेत... किल्ल्यावरच्या सर्वात वरच्या बाजूच्या टोकावर एका गुहेमध्ये समाधिस्थान आहे. . दौलताबाद परिसरातील मनमोहक दृश्य आपणास पहायला मिळते..मला जास्ती काही माहिती नाही किंवा त्यांचा ग्रंथ माझ्या वाचनात आलेला नाही नाथांचे चरित्र असल्यामुळे त्यांच्या ग्रंथतील मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे... माझ्याकडून काही चुकले असल्यास मी बाळबोध म्हणून मला क्षमा करावी....

.✍️💞Archu💞✍️✍️

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED