tulshi mahatmay books and stories free download online pdf in Marathi

तुळशी महात्म्य

तुळशी माहात्म्य🌹

तुळस कोणाला माहिती नाही !!नाही का !!प्रत्येक घरासमोर आणि घरातल्या प्रत्येक अंगणासमोर ही तुळस वृंदावन आपल्याला दिसत आहे ..जितकी पूजनीय वंदनीय आहे, फायदेही आहेत.. शास्त्रज्ञांनाही त्याचा अनुभव आलेला आहे ..तुळशीच्या पानांपासून तिच्या मंजुळा पासून आपल्याला खूप काही फायदा होतो, हे तर आहेच.. पण त्यासोबत अध्यात्मिक दृष्ट्या ही तिला खूप महत्त्वाचे स्थान आहे ...
वारकऱ्यांना तर ही तुळस अतिप्रिय आहे..वारकऱ्यांची ओळखच त्याच्या गळ्यातील माळी पासून होत असते ..जर ही गळ्यातील तुळशीमाळा काही कारणास्तव तुटली असली तर ते पुन्हा धारण करूस्तर वारकरी अन्न-पाणी वर्ज्य करत असतो ....एवढा त्यांनी तुळशीला महत्त्व दिले आहे..
वारकऱ्यांच्या एवढ्या प्रिय असणारी ही तुळस का आहे असे जर आपण पाहिले तर त्यांच्या आराध्य दैवतला म्हणजेच श्री विठ्ठलालाच ती अतिप्रिय आहे... आणि आपल्या भगवंताला प्रिय आहेत तर तेच वारकरी त्याच्याजवळ जाण्याकरता त्यांच्या आवडीची गोष्ट करणार.... नाही का!!!!!!!!....

कार्तिकी एकादशी झाल्यानंतर तुळशीचा विवाह असतो आणि तो विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो..कृष्णाला तुळस अतिप्रिय आहे आणि म्हणूनच वरांदा म्हणजेच या तुळशीचा विवाह भगवंता सोबत लावला जातो..
भारतीय संस्कृतीमध्ये तर तुळशीला धार्मिक अध्यात्मिक व आरोग्यदृष्ट्या संजीवनी असल्याचे म्हटले गेले आहे..तुळशीची अनेक नावे आहेत ...वृंदा ,हरी प्रिया, महा दशी हे त्यांच्याच पैकी तुळशी मातेची नाव..तुळशीचे अनेक प्रकार आहेत रान तुळस मंजिरी तुळस ,राम तुळस आणि कृष्ण तुळस..

ज्या घरात ही तुळस असते त्या घरात सुख शांती अध्यात्मिकतिचे वातावरण या देवीच्या कृपेने होत असते..सकाळी उठून तुळशीला पाणी व सूर्याला अर्घ्य देण्याची परंपरा आपल्या संस्कृतीमध्ये पुरातन काळापासूनच आहे ...तिच्या तेजपुंज आणि तेजाने आपणही पवित्र होत असतो.. ..
तुळशीला पाणी घालताना आपण
" गोविंद वल्लभम देवी भक्त चैतन्य कारिनिम.. स्नापयामी जगत धात्री विष्णू भक्ती प्रदयीनिम"..हा मंत्र म्हणून तुळशीला पाणी व्हायचं असतं..
तसेच" वृंदा ये तुलसी देवी प्रियाये केशव स्यच, विष्णू भक्ती प्रदे देवी सत्य व ते नमो नमः.. "असे म्हणून तुळशीची पूजा करून प्रार्थना करावी प्रदक्षिणा ही घालाव्यात...
आपल्या घरी सुख शांती आरोग्य लाभावी हीच तिच्या चरणी प्रार्थना करावी..
या तुळशी मातेची विवाहकथा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते आहे कालामध्ये..
प्राचीन काळामध्ये पद्मपुराण नुसार जालंधर नाम क राक्षस होता.. त्यांनी खूप उच्छाद मांडला होता.. तो खूप शूर ,पराक्रमी आणि नेहमीच विजय प्राप्त करणारा अजिंक्य विजय होता ...त्याचे कारण म्हणजे त्याची पत्नी वृंदा... हे खूप एकनिष्ठ पतिव्रता होती. ती विष्णूची निस्सीम भक्त होते ...तिच्या पतीचे अजिंक्य तत्व हे तिच्या भक्ती होती. हे तपस्विनी आपल्या तेजाने तेजपुंज अशी होती..जालंधराचा नेहमीच जय होत होता आणि त्याच्या या विजयाला घाबरून इंद्र व इतर देवादिकांनी श्री विष्णूकडे धाव घेतली..आपली गाऱ्हाणी सांगून पंधरा पासून मुक्तता करावी यासाठी विष्णूकडे प्रार्थना केली..

श्री विष्णू नेही नागलोक सोडून पाताळ कडे धाव घेतली आणि त्या पतिव्रतेचे पातिव्रत्य भंग करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला.. पण ती एक आदर्श पतिव्रता होती... ती आपल्या निश्चयावर अटळ होती.. व्रंडा आपल्या पतीला युद्धात विजय मिळवण्यासाठी पूजेला बसली होती ..व ही पूजा अर्धवट झाल्यास तिचे भंग होणार होते.. म्हणून ती प्रत्येक वेळी अटल व्रत करीत असे.. जालिंदर हा देवा सोबत युद्ध करत असताना वृंदा ची सत्व कमी झाल्यामुळे त्याचा देवलोकी मृत्यू झाला..जालिंदर हा देवासोबत युद्ध करत असताना त्याचे स्वरूप घेऊन श्रीविष्णू व्रंदाकडे गेले ..तिला वाटले आपले पती आले आहेत,म्हणून तिने पुजेतून उठून आपल्या पतीचे दर्शन घेतले .आणि तिचे व्रत भंग झाला होता. तिचे पातिव्रत्य नष्ट केले होते..वृंदाला भयंकर क्रोध आला होता जेव्हा तिला समजले कि आपले सस्तित्व नष्ट झाल्यामुळे , आपली व्रत मध्येच खंडित झाल्यामुळे,आपल्या पतीची हत्या झाली आहे तेव्हा तिने स्वतःला संपुष्टात आणण्याचा निश्चय केला..
आणि तिने श्रीविष्णूला श्राप दिला की "ज्याप्रमाणे मी पती वियोगाने मरण करीत आहे त्याच प्रमाणे तुलाही पत्नीचा वियोग सहन करावा लागेल.. आणि तू ही काळा दगड बनून मृत्यू लोकावर राहशील"!!!!!! आणि त्याच क्षणी श्रीविष्णू दगडांमध्ये परावर्तित झाली ...त्याचेच नाव शाळीग्राम..!असे म्हणून ती आपल्या पती बरोबरच सती गेली ...

पण ज्या ठिकाणी सती गेली होती त्या ठिकाणी एक इवलेसे हिरवेगार रोपटे त्या अस्थि तून वर आले होते..तिच्या सती त्याचे प्रतीक म्हणून एक तुळशीचे रोपटे उगवले..श्री विष्णू व्रंदा ल सांगितले होते की "कलियुगात तुझा विवाह विवाह माझ्याशी होईल आणि जो कोणी आपला दोघांचा विवाह लावून देईलत्याला परंधाम प्राप्त होईल "असा त्यांनी त्याला वर दिला,..आणि श्रीविष्णूंनी ही मृत्यू लोकांवर शाळीग्राम म्हणून अवतार घेतला होता आणि म्हणूनच तुळशीचे कृष्णाच्या सावळ्या रूपा सोबत विवाह लावल जातो..
कार्तिकीक शुक्ल एकादशी पासून पुढे चार दिवस हा तुळशी विवाह लावला जातो..

तुळशी माता उभी आहे दारात..,👣
करिते मी सेवा जोडूनी दोन्ही हात..
या तुळशीला आणुनी माती..
तुळशी वृंदावन शेती शेती
या तुळशीला घालून अाेटा..
विघ्न जाती बारा वाटा..👣
ह्या तुळशीचे लावूणी रोप..
विघ्न गेले आपोआप..
ह्या तुळशीला लावणी कुंकू..
पूजा करून गेली सखू.. 👣
या तुळशीला लावणी दिवा..
उजेड पडला सर्व देवा..
या तुळशीला घालुनी पाणी ..
सेवा करून गेली जनी...👣
या तुळशीला वाहुनी फुलं ..
पूजा करून गेले मुल..
तुळशीला लावणी गंध ..
पूजा करीतो गोविंद..
या तुळशीला लावणी बुक्का..
वैकुंठाला गेले तुका..👣
✍️✍️💞Archu 💞
अशी ही तुळस हिरवीगार आपणा सर्वांनाच प्रिय आहे.. ज्या घरात किंवा अंगनात तुळस असते, त्या घराचे अंगणातच घरातील माणसाचे व्यक्तिमत्व बोलून जाते. आपल्या ही प्रत्येकाच्या घरी तुळस ही नक्कीच हवी ...नाही का!!.. तुमच्या घरी तुळस आहे ना!!!!!! तर मग मला ही कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला हे तुळशी महात्म्य कसे वाटले.. काही चुकले असल्यास हक्काने कळवा तुमच्या-आमच्या मधील .. ✍️✍️💞Archu💞 ..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED