🌹धन्य ते कुळ 🌹
❣️
आपुलिया हिता जो असे जागता..❣️
धन्य माता पिता तयाचिया...💕
कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक❣️
तयाचा हरिक वाटे देवा.... ध्रु..💕
गीता भागवत करीती श्रवण..❣️
तुका म्हणे त्याची घडो मज सेवा❣️
तरी माझ्या दैवा पार नाही..❣️
संत तुकाराम म्हणतात, जो आपले हित कशात आहे हे जाणून, भगवंताचे अखंड स्मरण करतो,,, त्याचे माता पिता किती धन्य आहेत... अश्या मुलाचे ते जन्मदाते आहेत, याचा त्यांना सार्थ अभिमान वाटतो..ज्या कुळी कन्या आणि पुत्र श्रध्देने आणि सत्विकतेने राहतात.. त्यांचा देवालाही आनंद वाटतो, अभिमान वाटतो..देव ही अश्या कुळी प्रसन्न होतात .
ज्या कुळात गितेसारख्या पवित्र ग्रंथाचा वाचन मनन होते व भागवत आवडीने श श्रवण केले जाते त्या समस्त कुळाचा उद्धार होतो..
संत म्हणतात ,की अश्या व्यक्तीचा संग जरी लाभला किव्वा त्यांची सेवा करण्याचे संधी मिळाली तरी माझ्या इतका भाग्यवंत मीच.. खरंच...
संताची संगती मनोमार्ग गती...याप्रमाणेच भक्ति मार्गाने चालत असलेल्या माणसाच्या संगतीत राहून आपणही त्यांच्यासारखेच धन्य होऊ यात शंकाच नाही..हो न 🤗
"शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी..
गोमट्या बिजाची फळेही गोमटी"💞
तुकाराम महराज म्हंतात की जसे पेरेल तस उगवत...म्हणजेच जसे बीज आहेत तसे फळही निघतात..जर ते बीज शुद्ध न सात्विक असेल तर त्याची फळेही गोमटी असतात.. ज्याप्रमाणे आपण बाभळीचे बीज लावलं तर त्याला काटेच येणार.. आंबे नाही..
हीरण्य काश्यप हा अतं त्य दुष्ट प्रवतीच्या होता त्या पोटी प्राल्हादने कसा काय जन्म घेतला..यासाठी त्यांची माता कायादु हीचे पुण्य..
संत म्हणतात...
🌹सिलवान पुत्र प्राप्त होण्यासाठी आईचे पुण्य असावे लागते..
विद्वान पुत्र होण्यासाठी बापाचे पुण्य पाहिजे...
उदार होण्यासाठी वंशाचे पुण्य पाहिजे..
आणि भाग्यवान होण्यासाठी स्व:तचं पुण्य असावं लागत..💞
इंद्राने युद्धाच्या वेळेस हिरण्यकाश्यप याची पत्नी कयाधू हिचे अपहरण केले होते..त्यावेळेस नारदमुनी म्हणाले की इंद्रा ही एक पतिव्रता श्री आहे ,तिचा आणि तिच्या होणाऱ्या बाळाचा यात काय दोष???.मग इंद्राने कयाधू ला नारदाच्या आश्रमात ठेवले.. सतत नारायण, नारायण असे निरंतर नामजप करना रे नारदमुनी यांच्या सानिध्यात माता कयाधू व गर्भातील प्रलाद होते..आईच्या पोटात असलेले प्रल्हादा वर याचा परिणाम झाला..ज्याअर्थी असा सिलवण, गुणवान,सात्विक,पुण्यवान असा पुत्र प्राप्त झाला...
तेव्हां
त्यांच्या माता धन्य आहेत..
एकदा काय झालं.. पंढरीचे पांडुरंग ,नामदेव, ज्ञानदेव यांच्यासमवेत अरण्यग्रमी आले..देव म्हणाले की नामा मला खूप तहान लागली आहे.. सेजारीच सवतोबचा मळा आहे तेथे जावून पिवून या पाणी...असे नामा म्हणाले..मग काय देव धावतपळत च सवतोबकडे आले..नामा आणि ज्ञानदेव माळ्या बाहेरच थांबले..
पांडुरंग आले तेवहां सावतोबा भाजीच्या वाफा मध्ये बसलेले,अंगावर घोंगडी घेऊन,हातात खुरपे घेवून,देवाचे अखंड नामस्मरण करत होते..
पैल विठ्ठल विहीर विठ्ठल.. मोट ही विठ्ठल, गे... मळा हा विठ्ठल, झाडाच्या फांदीवर बसलेले राघू न मैना ही विठ्ठल...काम ही विठ्ठल,धाम ही विठ्ठल..असे गात काम चालू होते..
इतक्यात देवाने डोक्यावर हात ठेवले.. सावता म्हणे देवा तुम्ही न इथे..एवढे घाबरले ले का??😨
देव म्हणाला.. हो सावता..मीच.. पंढरपूर पासून दोन चोर माझ्या मागे लागलेले आहेत टेव्वं मला लपव..🙃
भाजीच्या वाफ्यात लपा देव ....सावता🙃
उसाच्या फडात लापा..देवा..🙂
केळीच्या बागेत लपा देवा...😒
एक ज्ञान आहे,तर एक नाम आहे..
ज्ञान दाखवत तर नाम पकडत..😌
कटीचे खुरपे काढून काळीज चिरले...😲..
आतमध्ये देवाला सत्वर लपविले...आणि वरून घोंगडी पांघरूण घेतली...पण गडबडीत थोडा पीतांबर उघडा राहिलेला..🤫
इतक्यात नामदेव महाराज आणि ज्ञानदेव महाराज आत आले नी म्हणाले.. काहो इथे नवीन कुणी आल होत का??
तेव्हा
ज्ञानदेव म्हणाले की नामा कश्याला विचारता..तो काय औळखीचा पीतांबर..☺️.
दाखविला ज्ञानाने..तर बाहेर पीतांबर पकडून औडीला नामाने...
ज्ञान दाखवत. तर नाम आकळीत...🤗
बाहेर कडल्यावर नामाचे उद्गार एका...🙏
देवा पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक ..👣
पाण्यापेक्षा अग्नी व्यापक..👣
अग्निपेक्षा वाव्यू व्यापक..👣
वाव्यु पेक्षा आकाश व्यापक..👣
आकाशा पेक्षा माया व्यापक..👣
मयापेक्षा ब्रह्म व्यापक..👣
हे ब्रह्म ही ज्याच्या उदरात साठवते 👣
तो केवढा व्यापक..👣
आणि या सगळ्या त असलेले तुम्ही व्यापक👣
तर तुम्हाला ही ज्याने काळजात व्यापल तो👣
भक्त जेव्हा नउ महिने आईच्या 👣
पोटात होता ते केवढे व्यापक..🥰
"धन्य त्यांची माता, धन्य त्यांचे पिता..
साठविला दाता त्रेलोक्याचा..."हे नामदेवांनी काडलेले संतासावता माळी याच्यासाठी उद्गार..
उदरात साठवण्याची कर्तबगारी सावतानी केली..पण नामदेव महाराज याचे श्रेय त्यांच्या मातेला देतात....
ज्याचे जैसे मुळ.. त्याचे तैसे कुळ असे कुणीतरी म्हणले आहे..ज्या कुळात, किवा घरात मुलांनी आपल्या कर्माने उद्धार केला असे आता दुर्मीळ च आहे ..नाही का!!!
आपली संताने आपल्या यशाचे श्रेय आपल्या मातापित्यांना देतात, करतात तर मुलेच,पण त्यांच्या पाठीमागे असलेले त्यांचे संस्कारच सर्व काही सांगून जातात.. संस्कार हे बालपणापासूनच मनावर बिंबवल जात , किंबहुना ते आपोआप मोठ्याकडून लाहण्याकडे जात असत..🙂
जसे शिवाजी महाराजांच्या आई जिजामाता यांनी त्यांच्यावर संस्कार केले तसे आपल्याला मिळो..
ज्या घरात आदर्श पती पत्नी आहेत तेथे मुले ही आदर्श वान होतात,यात शंकाच नाही.. आपले पूर्वज हे आपले प्रेरणास्थान असतात.. त्याच्यकडून आपणास खूप काही शिकण्यास मिळत..
आपणही माणुसकी जपूनच सगळ्याचा आदर ठेवला पाहिजे..
आपण आई वडीलाचा आदर करा.. पुढची पिढी ही आपल्या पावलावर पाऊल ठेवून किंबहुना थोडे पुढे चालत असते.. म्हणूनच आज संस्काराची खूप आवश्यकता आहे..