sant janabaai books and stories free download online pdf in Marathi

संत जनाबाई

🌹कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने:
प्रणतक:क्लेश नाशाय गोविन्दाय नमो नमः🌹

संत हेच आपले खरे वैभव!!! संत संगती ही चंदनाच्या झाडा प्रमाणे असते🌱🌿.. संत रुपी चंदनाचे झाड जसे आपल्या आजूबाजूला असलेल्या बोरी वेलीला,बाभळीला ही सुगंध देतात❣️ त्याच प्रमाणे संत देखील आपल्या गुणदोषांसकट आपल्याला स्वीकारून आपल्याला योग्य तो मार्ग दाखवतात...☺️

संत जनाबईंच्या अनेक कथा आपण वाचल्या व ऐकल्या असतीलच .😊. माझ्या माहितीनुसार मी त्यांचे जीवन चरित्र येथे मांडणार आहे. ❣️जनाबाई या संत नामदेवाच्या समकालीन वारकरी व संत कवयत्री होत्या... त्यांचा जन्म अंदाजे इसवीसन बाराशे 50 मध्ये झाला..💞

मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात गंगाखेड नावाचं एक गाव आहे त्या गावात "दमा आणि करुंड" या नावाचं एक दांपत्य राहत होतं😊.. दमा विठ्ठल यांचा अत्यंत प्रिय भक्त होता त्यांची विठ्ठलावर गाड श्रद्धा होती🤗. तो नित्यनियमाने पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जात होता ☺️बरीच वर्षे झाली तरी दमा आणि करुंडला मूलबाळ नव्हते😔.. तरीदेखील ते पांडुरंगा वर विश्वास ठेवून त्याची नित्यनियमाने पूजा करत☺️

🌹" माझ्या वडिलांचे दैवत तोच हा पंढरीनाथ".🌹

. एकदा काय झालं वारीच्या निमित्ताने ते पंढरपूरला गेले.. दोघे दाम्पत्य पंढरपूरच्या पांडुरंगाचा जवळ उभे राहून डोळे बंद करून विठ्ठलाशी बोलू लागले.. 😥हे दयाघना कृपाळा तू कनवाळू मायाळू आहेस 🤗अवघ्या जगाची विठाई आहेस😌 आमच्या दोघांच्या मनात तुझ्या भक्तीचा अखंड झरा वाहू दे.❣️. तुझी सेवा आमच्या पिढ्यानपिढ्या करून कडून करून घे 💞त्यासाठी आमच्या पोटी एखाद मूलबाळ दे.. 😇आम्ही तुला शरण आलो आहोत ❣️❣️आम्हाला संतान प्राप्तीचे सुख येऊ दे हे माय बापा कृपा कर..👏

दमा आणि करूंड यांनी आर्त मनाने देवाचा धावा केला🥺 तो आर्त स्वर भगवंतापर्यंत पोहोचलाच☺️ नेहमीप्रमाणेच दयाघन हा आपल्या भक्तांवर सदैव आपली कृपादृष्टी ठेवतो🥰 त्याच रात्री भगवंत दमाच्या स्वप्नात येऊन म्हणाले 😍की हे दमा मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे तुझ्या घरी एक कन्यारत्न तुला प्राप्त होईल 😘ती तुझ्या कुळाचा उद्धार करेल 🙂तिला तू पंढरपूरच्या दामा शेठ शिंपिला ला अर्पण कर💞 तिथे ती नामदेवा बरोबर वाढेल😊 ती संपूर्ण जगाला संसारात राहून भक्ती कशी करायची याचे मार्ग दाखवून देईल.😌😌. असे स्वप्न पडल्यावर दमा अत्यानंदाने विठ्ठलाच्या नावाचा गजर करू लागला ❣️❣️त्याने आपल्या बायकोला पडलेल्या दृष्टांत सांगितला🤩 बायकोही खूष झाली☺️☺️

काही काळानंतर भगवंताच्या वचनाप्रमाणे त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले ❣️तिचे नाव जना ठेवण्यात आले❣️ जनी चे बालपण हसत खेळत जाऊ लागले 🙂जसजशी मोठी होऊ लागली तशी तिच्या आई-वडिलांची चिंताही वाढू लागली 😥जनाबाई आता सहा वर्षांची झाली होती😇

तेव्हा दमा आपल्या बायको ला म्हणाले देवाच्या वचनानुसार हिला आपण पंढरपूरला घेऊन जायला हवं तिला दाना शेठच्या घरी अर्पण करायला हवं 😔😔तेव्हा जणाची आई म्हणाली माझ्या काळजाचा तुकडा मी कसा कुणाला वाटून देऊन तीआपल्याशिवाय कशी राहील..😟😟

दमा म्हणाले आपण पांडुरंगाची आज्ञा तरी कशी मोडणार विठ्ठलाने सांगितल्याप्रमाणे हीच आपल्या कुळाचा उद्धार करणार आहे शेवटी लेक ही परक्याचे धन आहे ना 🙍ती आता पांडुरंगाची लेक😍तोच स्वतः तिचा आता रक्षण कर्ता,😊😊त्यांनी जनाला समजावून सांगितले की तुला दामाशेटी च्या घरी राहायचं आहे😟आता तेच तुझे माय बाप विठ्ठला तुझा सखा सोयरा .😌.

मोठ्या जड अंतःकरणाने जना आणि तिचे आई-वडील पंढरपूरला जाण्यास निघाले .😥..पंढरपुरात येऊन त्यांनी दामाशेटी शिंपिचे घर विचारले... दामाशेटी ने विचारले आपल्याला काय हवं?? मी आपली काय सेवा करू?? तेव्हा दाम्पत्य म्हणाले आम्हाला काही नको जे आपला आहे मी तेच आपल्याला अर्पण करायला आलो आहे!!!! 😭
मलापंढरपुराच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने कन्यारत्न झाले आहे..😌 त्यांनी मला दृष्टांत सांगितले की तुम्हाला अर्पण करावं करावं तुमचा नामा माझ्या जनीचा गुरु होणार ..❣️ ही संपूर्ण जगाला संसारात राहून भक्तीचा मार्ग दाखवणार.. दामाशेटी म्हणाले,, मीही तुमच्यासारखाच विठ्ठलाचा परमभक्त !!
मलाही विठ्ठलाचे संकेत समजतात ...आता माझ्या दोन कन्या झाले आहे एक आऊसा आणि दुसरी हि जनाबाई..,😊 तुम्ही काही काळजी करू नका मी हिला माझीच मुलगी समजतो...

तेव्हा नामदेवाच्या आई गोणाई सा म्हणाल्या घरात 14 तोंडे खाणारी आहेत 🙄🙄आताही पंधराव्या ची भर कशाला😏😏 तेव्हा जना म्हणाली आई मी तुम्हाला जड होणार नाही😔 मी माझ्या परीने सर्व काम करू लागेल 🙁झाडलोट करीन पाणी भरीन दळण दळीले..😟.
दमा आणि कारूंड हे मोठ्या जड अंतकरणाने घरी परतले,😭😭 काही दिवसानंतर आपल्या लेकीच्या विरहाने ध्यास करत...ते विठ्ठलात परम विलीन झाले😔😔 आता खरोखरच जना पोरकी झाली.😔

.. जना म्हणू लागली😥 आई गेली बाप गेला..आता तूच सांभाळ रे विठ्ठला मी तुझी रे लेकरू.😥.. विठ्ठलासी तिने आता माय बापाचे नाते जोडले 🥰आता जनी घरात चालताना बोलताना विठ्ठलाचे नामस्मरण करू लागली👏👏 स्वयंपाक करू लागली भांडी घासू लागली 😊पाणी भरू लागली 😊दळण करू लागली😌 प्रत्येक कामात तिने अखंड विठ्ठलाचे नामस्मरण चालू ठेवले👏👏..प्रत्येक श्वास आता विठ्ठलच बनला होता🥰
तिचे जीवन आता विठ्ठलमय झाले होते..

नामदेवा बरोबर ती विठ्ठलाच्या मंदिरात जायची 😊भजन-कीर्तन करायची 😌अशातच ती स्वर्गसुख मानू लागली.😇😇. पांडुरंगाला तिने आता श्वास मय करून टाकलं होतं🤗 आपल्या रूदयात कोंडून टाकलं होतं .....🤗
🌹 हृदयीं बंदी खाना केला
आता विठ्ठल कोंडीला
धरिला पंढरीचा चोर🌹

संत नामदेव हे तिचे पारमार्थिक गुरू होते.🥰.श्री संत ज्ञानदेव, विसोबा खेचर ,संत नामदेव ,संत जनाबाई अशी त्यांची गुरुपरंपरा आहे.😊.

संत ज्ञानदेव यांच्या विषयी त्यांचा भक्तिभाव अनन्यसाधारण होता❣️.. 🌹परलोकी चे तारू म्हणी माझा ज्ञानेश्वर🌹
असा त्यांनी ज्ञानदेवा विषयी वर्णन केले आहे.❣️.
गौर्या शेन वेचताना सतत विठ्ठलाचे नामस्मरण करत असतात🤗असाच 1 दृष्टांत, ..

त्यांच्यासोबत गेलेल्या एका बाईने एकदा जनाबाईच्या थापलेल्या गौर्या घेऊन टाकल्या 😲जनाबाईंनी दुसऱ्या दिवशी त्या पुन्हा तापल्या ..🙁पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच😏 जनाबाई म्हणी एवढ्या मोठ्या गौर्या कमी कशा होतात म्हणून त्यांनी त्या बाईला विचारले🙄 त्या कामचुकार बाईने कांगावा करून जनाबाई वरच खोटा आरोप घेतला 😲की माझ्याच गोवऱ्या जनिने चोरल्या असा कांगावा तिने गावात केला...
तेव्हा तेथे संत नामदेव आले आणि त्यांनी गावकऱ्यांना सांगितले माझ्या जनी च्या गौर्या आहेत त्यातून विठ्ठल विठ्ठल नावाचा ध्वनी ऐकू येईल...ज्यात आवाज येणार नाही त्या या बाईचा असेल

असे म्हणून गावातल्या पंच जणांनी गोवऱ्या मोजायला घेतल्या.. प्रत्येक गौरी कानाला लावून पाहिली तर काही गौरी यामध्ये आवाज येत नव्हता 🙁तर काही गौरी यामध्ये विठ्ठल विठ्ठल असा स्पष्ट आवाज येत होता 😊😊असे करून पंचांनी निवाडा करून जनी च्या गौर्या सगळ्या जणी च्या अंगणात आणून घातल्या..😊 अशा प्रकारे वरील दृष्टांत यामध्ये जनीच्या नामस्मरणाचा महिमा आपल्याला सगळ्याच ग्रंथामधी दिसून येतो...😌👏👏

जनी आता दामाशेटी च्या घरचे एक सदस्य बनली होती 😍नामदेवाची पत्नी व बहीण त्यांना आपलं मानू लागली होती ☺️पण गोनाईसा मात्र त्यांना सतत कामे सांगत असत.. त्यामुळे जनाबाईला दिवसभर काम करावे लागत होते 😌

सकाळी तीन वाजेपासून दळणाचे काम जनाबाई करत होत्या..😊 दिवसभराच्या कष्टामुळे जनाबाई थकून जात होत्या 😇अशातच एक दिवस रात्री जनाबाई झोपल्या होत्या तेव्हा त्यांना आठवले की उद्यासाठी दळण केलेलं नाहीये ..तेव्हा त्या रात्री दळण करायला बसल्या..🌹 दळिता कांडिता तुज गाईन अनंता🌹

...पण दिवसभराच्या थकव्यामुळे त्यांना झोप लागली......... तिकडे विठ्ठलाला काही केल्या झोप येईना देवाने विचार केला,🤔 जना तर आता झोपली 😟तिला आता सकाळी स्वयंपाक करायचा आहे ..जर हिने दळण केले नाही तर...ती उद्या स्वयंपाक कशाचा बरा करेल😲 असे म्हणून पांडुरंग जणांबाईकडे आला व जनाच्या झोपडीचे दार वाजू लागला ...🙂इतक्या रात्री कोण बरं आलं असेल 😣असे म्हणून जना म्हणाली कोण आहे तेव्हा विठ्ठल म्हणाला🤫 अगं जना बाळा मी आहे... तुझा पांडुरंग,!!!! बाळा दार उघड..😌😌 जनाचा तर आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना😲😲 तेव्हा पांडुरंगच म्हणाला ..अगं जना तुझे दळण दळायची आहे ना,; की विसरलीस.. .बाळा तू उद्या स्वयंपाक कसा करशील?????? तुला मदत करण्यासाठीच मी इथे आलो आहे..🙂
जनाबाईला सगळं स्वप्नवत वाटत होतं 🙅पांडुरंगाने धान्याची टोपली उचलली आणि दळायलाबसले.☺️ जनी आपल्या माय बापाला बघून अतिउत्सहाने दळू लागली.🥰. पांडुरंगाचा हात लागल्यामुळे पीठ ही आता भराभर बाहेर येत होते ..जनी अति आनंदाने विठ्ठलाच्या नावाच्या ओव्या म्हणू लागली.
🌹.."सावळ्या राहीना राहीना;
"येतो जनीच्या घरात
दळण दळीत तो दळीतो
जनाचे जात्यावर ..🌹

अशा प्रकारे ती अगदी गोड व मंजुळ आवाजात ओव्या गात होती☺️ विठ्ठलही तल्लीन होऊन तिच्या ओव्या ऐकत होते🥰... जनाच्या ओव्याचा आवाज ऐकून मात्र गोणाईसा ला जाग आली😲 एवढ्या रात्री ही जणा दळण का बर दळीत आहे 😏😏असे म्हणून ती तिच्या झोपडी बाहेर आली व जणाला ओरडू लागली,😬 काय ग तू तर झोपत नाहीस मेली,🙃 दुसऱ्यालाही झोप येऊ देत नाही ...आणि काय गं हा कोण आहे????? तुझ्या तुझ्या सोबत दुसरा????
जना मात्र काहीच बोलली नाही तेव्हा गोनाईसाला अधिकच राग आला ,🙄🙄व तीने हातातली काठी फेकून जणाला मारली... नेमकी ती काठी लागली पांडुरंगाच्या कपाळाला आणि पांडुरंगाच्या अबीर बुक्का खाली पडला ...😲

संपूर्ण झोपडीत अबीर बुक्का आणि गुलालाचा सुगंध दरवळू लागला😇..
🌹मी वीठाई ,मी विठाई ,पंढरीचे आई 🌹असा आवाज त्या झोपडीत घुमू लागला 🙃असे ऐकता गोनईसा घाबरुन मागच्या पायी पळाली..😧😧

देव आता जनाबाई कडे पाहून हसू लागले😄😄 ..
जनाबाईने ही ओव्या म्हणून दळायला सुरुवात केली ...दळता दळता जनाबाईला खूप दमल्यामुळे तिथे झोप लागली.. जनाबाईला झोपलेले पाहून पांडुरंगानाही झोप आवरेना😴😴😴 पांडुरंग ही जात्यावरच झोपी गेले😴..
🌞आता पहाट झाली 🌞 सकाळची कामे करण्यासाठी जनाबाई उठल्या ....पाहतात तर काय😲 इथे अंगावर गोधडी घेऊन कोण बरंझोपलं??? म्हणून तिने घोगंडी हळूच बाजूला सरकवली... पाहते तर काय 😲साक्षात परब्रह्म परमेश्वर विठ्ठल तीथें झोपलेला... आणि नंतर तिला आठवले की रात्री तर आपण भगवंता सोबत दळण दळीले.. तेव्हा देव येथे झोपी गेलेली असणार ...

माझी मदत करण्यासाठी माझा माय बाप अहोरात्र जागला आहे😣😥 असे म्हणून ती आर्त भावनेने रडू लागली.,,😭. पण माझी काळजी करणारा माझा माय बाप स्वतः माझे रक्षण करीत आहे असा मनोमन विचार करुन ती खूप सुखावली ☺️😊

पण आता काकड आरतीची वेळ झाली आहे ..विठ्ठलाला आता मंदिरात असायला हवं !!!🥰

पण पांडुरंगाला तर आता झोप लागलेली आहे म्हणून तिने विठ्ठलाला उठवलं..😇 पांडुरंग ही गडबडीत उठले आणि उशीर झाला म्हणून अंगावर जनाबाईची घेतलेली गोधडी म्हणजेच घोंगडी घेऊन मंदिरात गेला 😇😇😇

तिकडे आता सगळे पुजारी मंदिरात महापूजेसाठी येऊ लागले😘😘 घंटा वाजू लागल्या😊 महा स्नानाची तयारी चालू केली.☺️
. पाणी हार फुलं व पंच आरतीचे ताट घेऊन पुजारी मंदिराच्या गाभाऱ्यात गेले आणि मंदिराचे द्वार उघडले..😇
आणि इतक्यात पुजारी दचकला,, घाबरला आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाला हे काय पांडुरंगाच्या अंगावर एक साधी वाकल???

देवाच्या अंगावरील भरजरी वस्त्र नाही ....हार नाही... कुठे.???. याचा अर्थ रात्री मंदिरात चोरी झाली.. ......सगळेजण आता विचार करू लागले हि वाकळ कोणाची ????वेगवेगळे तर्क करू लागले..,🤔🤔🤔 तेव्हा कोणीतरी सांगितले की ही अशी वाकळ जणी ची आहे ..पण मंदिराचे द्वार तर बंद होते तर मग जणी मंदिरात आलीच कशी???

पण तरीही शेवटी जनीच वाकळ म्हणून जनीलाच दोषी धरण्यात आले...😧😧. जनीवर चोरीचा आळ धरण्यात आला 🙁
पुजारी आणि इतर सगळेजण आता जनीच्या घरी आले.. तिच्यावर आरोप केले गेले ती वाकळ तुझीच ...तर चोरी सुद्धा तूच केली असणार.. हे ऐकल्यावर जनाबाई रडू लागली 😭😭😭मी हे केले नाही,
, अरे पांडुरंगा;हे तू काय केलेस??? हा चोरीचा आळ मला सहन होत नाही ???मी चोर नाही !!!!मी का बर चोरी करेल.. ???तू तर माझा हातभार लावण्यासाठी आला होता ;आणि हे काय तू हे माझ्यासाठी काय वाढून ठेवल????
तू तर माझी मदत करणार होता ना !!पण देवा खरच रे! मी तुझी रत्नजडित अलंकार नाही रे चोरले.😧😭😭
. ती पुन्हा पुन्हा लोकांना ओरडून सांगू लागली मी चोरी केली नाही😭 मी चोरी केली.. नाही..😭. माझ्यावर विश्वास ठेवा😣 पण तिच्यावर मात्र कोणीच विश्वास ठेवला नाही

जनाबाईला आता पांडुरंगाच्या मंदिरात आणलं गेलं.. तिच्याबरोबर नामदेवाच्या घरचे सर्व सदस्य आले होते 🙃 सगळे पुजार्‍यांना सांगत होते की जनाबाई अगदी शुद्ध आहे तुळशीपत्र प्रमाणे ...💞तिचा यात काहीही दोष नाही 💯जी सगळी कामे करताना सतत विठ्ठलाचे नामस्मरण करत असते 👏👏ती विठ्ठलाची चोरी कशाला बरं करेल..,,???. पण त्यांचं ही कुणी ऐकून घेतलं नाही..

वाकळ जनीची तर.... चोरी पण जनीनच केली असणार !!!!!म्हणून जनीला शिक्षा देण्याचे ठरवले ;;;;😔; जनिने आता पांडुरंगाचे पाय धरले 😣आणि रडून-रडून विठ्ठलाच्या पायी नाहून निघाले 😒आणि त्या म्हणू लागल्या ....अरे सावळ्या, विठ्ठला ,,माय बाप गेल्यानंतर मी तुलाच माझे मायबाप मानले.😇.तू सदैव माझ्या पाठीशी आहेस असा मी तुझ्यावर विश्वास ठेवला💯

.. मी ही चोरी खरच केली नाही रे !!विठ्ठला हे तुलाही माहिती आहे😧 तुझ्या भक्तावर चोरीचा आळ येत आहे आणि तू नुसता बघत उभा राहिला आहेस..🙄 नाही विठ्ठला 😭नाही रे 😭मी चोरी केली नाही 😭तू तर भक्तांच्या हाकेला धावून येणार आहेस ना😭😭😭
तर मग आता काय झालं ?????????भक्तांचा कैवारी असणारा तू आज का बोलत नाहीयेस ???सांग ना.?????? का परीक्षा घेतो आहेस माझी????. जनाबाई रडू लागल्या😭😭😭 लोकांनी ठरवलं की जनाबाईला आता फाशीची शिक्षा देण्यात यावी ....आता जनाबाई रडून-रडून शांत झाल्या आणि मुखाने देवाचे अखंड नामस्मरण विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग असा जप करू लागल्या..👏👏👏👏👏👏
लोकांनी जनाबाईला मंदिरातून ओढत फरफटत चंद्रभागेच्या किनारी आणलं..😔 तेथे फाशी देण्यासाठी सूळ उभा करण्यात आला 😣

जनाबाई पुढे काय होणार आहे,,,, काय होत आहे असे स्तब्ध बघत उभे राहिलेल्या ...🙁. मुखाने अखंड विठ्ठलाच्या नामाचा जप चालला होता 🙃देव झोपलेला तर नक्कीच नव्हता 😴देवाची तर झोप उडाली होती.😲

देव तर तिच्या पाठीशी होता..... माझ्यामुळे माझ्या भक्ताला त्रास सहन करावा लागला ??????हे भगवंत कसे बरं बघू शकणार होता..... जनाबाई विठ्ठलाचे नाम जप अखंड चालू ठेवत होत्या......🌹 तेवढ्यात चंद्रभागे तिरी 🌹गुलाल ,अबीर ,बुक्का, आणि तुळशी मंजुळा ,,वैजयंती माळयांचा सुगंध सगळीकडे दरवळू लागला..🌹🌹🌹🌝🌝

लोक आश्चर्याने इकडेतिकडे बघू लागले🤗🤗 चंद्रभागेतीरी उभ्या असलेल्य सुळाच तेवढ्यात पाणी-पाणी झालं.....😲😲 लोखंडाचे सूळ पाण्यात विरघळू लागला.😇😇. अरे अरे अरे हे काय होतंय????? चक्क लोखंडाचं पाणी होतंय. ?????लोक आश्चर्याने ओरडत होते 🤔🤔तेथे सांडलेल्या 💞अबीर, बुक्का, गुलाल आणि तुळशी मंजुळा देवाची साक्ष देऊन गेले होत्या...💞

लोक आश्चर्याने व भक्तिभाव मिश्रित नजरेने जनाबाई कडे बघत होते..😲😲 जनाबाई मात्र ध्यानमग्न होऊन डोळे बंद करून पांडुरंगाचे नाम स्मरण करत होत्या.😊😊🙂
. सगळ्या जणांनी आता जनाबाईचे पाय धरले आणि सर्वांनी जनाबाई च्या नावासहीत विठ्ठलाच्या नामाचा जयजयकार सुरु केला.. ,🤗🥰🥰जनाबाई म्हणत होत्या
🥰पांडुरंग माझा आणि मी पांडुरंगाची🥰
🥰देव माझा मी देवाचा ची..🥰.

🌹ओव्या गाऊनी स्वरात
दासी जनीच्या घरात
दळण दळीले सख्या श्री हरी
आळ चोरीचा माझ्यावरी🌹

🌹असा कसा विठ्ठला तू गेलास गावा
अलंकार विसरून गेलास देवा
कांबळे घेऊनी खांद्यावरी🌹

🌹सकळ जनाचा तु माय बाप
तुझी चोरी करण्याची नाही केले पाप
जाणूनी तू घ्यावे मजा अंतरी🌹

🌹असा कसा विठ्ठला तू उठला मुळावर
गावकरी येतील मजला रे सुळावर
कुठे गेली तुझी जादूगीरी🌹

🌹सोपान जनाईची ऐकुनी वाणी
विठ्ठलाने सुळाचे केलं पाणी पाणी
दाखवली किमया खरी..🌹🌹

संकट काळी देखील जनाबाईंनी पांडुरंगाचे नाव घेणे सोडले नाही...😊 पांडुरंगावर त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला होता🤗 आणि पांडुरंग ही त्यांच्या विश्वासाला सार्थक करीत भक्ताच्या हाकेला धावून आला होता😊😊..आयुष्यभर जनाबाईंनी खूप कष्ट केले👏 पण हे कष्ट करताना त्यांनी सतत देवाचे नामस्मरण केले 👏

💞 नामजप हे आणि यज्ञाचे फल आहे 💞
सतत नामस्मरण एवढा एकच सोपा आणि सुलभ उपाय त्यांनी संसारात असलेल्या भाविक भक्तांना सांगितलेला आहे...🤗

जनाबाईंनी रेखाटलेलं आजही विठु माझा लेकुरवाळा हे चित्र संपूर्ण महाराष्ट्राचा ग्रंथात आढळतो ...😊

💞**"विठु माझा लेकुरवाळा
संगे संतांचा मेळा *"*💞

या काव्यात जनाबाईंनी विठोबाला 🌹विठाई 🌹साऱ्या जगाची माऊली असे संबोधले आहे.... ही माऊली म्हणजेच आई सगळ्या संतांना अंगा खांद्यावर घेऊन चालत आहे😊
.. वैकुंठाला चालत देवाच्या खांद्यावर निवृत्ती बसलेले आहेत 😊
हाताच्या बोटाला सोपानानी धरले आहे,😊
ज्ञानेश्वर महाराज पुढे चालताहेत 🙂
धीट मुक्ताबाई भगवंताच्या पाठीमागून चालत आहे..
संत बँका कडेवर आहेत 😊
आणि नामदेवाने विठ्ठलाची करंगळी धरली आहे🤗🤗
आणि अशा थाटात भक्त मंडळींना घेऊन परब्रह्म परमेश्वर विठ्ठल वैकुंठाला चालला आहे...👏👏
असे सुंदर वर्णन जनाबाईंनी केले आहे...
...म्हणजेच ,थोडक्यात जनाबाईंनी हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहेत की आपण सगळेच ईश्वराची लेकरे आहोत,😊😊. जनाबाईंनी अखंड नामस्मरण करत जवळजवळ "साडेतीनशे" अभंग लिहून ठेवले आहेत...🤗 असे महान कार्य जनाबाईंनी केले आहे...
,💞 महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून स्त्रिया आजही दळण दळताना जनाबाईच्या ओव्या जात्यावरी गातात..💞 त्यांचे अभंग कृष्णजन्म थाळी, पाक, बाल क्रीडा या विषयात आहेत ....
हरिश्चंद्र नामाक अख्ख्यान सुद्धा आहे..🙂🙂 त्यांच्या अभंगाच्या शेवटी त्या स्वतःचा उल्लेख नामयाची दासी जनी असा करतात.🙂🙂🙂. अशा या महान संत इसवीसन 1350 सली भगवंत पांडुरंगाला विलीन झाल्या..🤗🌹🤗 त्यांना आपले मनापासून वंदन..🌹🌹

क्रमशः (टिपः वरील कथा ही संत जनाबाई च्या चित्रांमधून घेतलेली आहे तरीही काही चूक उणिवा आढळल्यास हक्काने कळवा... यापुढेही मी काही संतांचे दृष्टांत कथा रुपी मांडणार आहे... त्यादेखील तुम्ही नक्कीच वाचा आणि मला तुमचा प्रतिसाद कळवा... तुमच्या-आमच्या मधील💞archu💞)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED