Mahanti shaktipithanchi - 12 books and stories free download online pdf in Marathi

महती शक्तीपिठांची भाग १२

महती शक्तीपिठांची भाग १२

१३) कामरुप शक्तिपीठ गुवाहाटी, आसाम

इथे सती आईची योनि पडली होती .
सती आई “कामरुपा देवी”रुपात इथे विराजमान आहे .

कामाख्या पीठ भारतातले प्रसिद्ध शक्तिपीठ आहे .
कामाख्या देवीचे मंदिर पहाडावर आहे .
अंदाजे एका मैल उंच असलेल्या या पहाडाला “नील पर्वत “म्हणतात .

आई इथे 'कामाख्या' रुपात आहे आणि शिवशंकर 'उमानंद' रुपात विराजमान आहेत .
धार्मिक मान्यतेनुसार कामाख्या मंदिरच्या जवळच उत्तरेकडे देवीची क्रीड़ा पुष्करिणी (तलाव ) आहे .
ज्याला “सौभाग्य कुंड” म्हणतात .
याच्या प्रदक्षिणेमुळे पुण्यप्राप्ती होते .

या मंदिरात शक्तिची पूजा योनिरूपात होते .
इथे कोणतीच देवीमूर्ति नाही .
योनिच्या आकारतील एक शिलाखण्ड येथे आहे .
ज्यावर ओल्या लाल रंगाच्या धारा सोडल्या जातात आणि तो कायम रक्तवर्ण वस्त्राने झाकलेला असतो .
या पीठा समोर पशुबली दिला जातो .
कामाख्या पीठ भारताचे सर्वात प्रसिद्ध शक्तिपीठ आहे जे आसाम प्रदेशात आहे .
गुवाहाटी रेलवे स्टेशन पासुन १० किलोमीटर दूर नीलाचल पर्वतावर आहे .
नीलाचल पर्वताच्या दक्षिणेला सध्याच्या पाण्डु गौहाटी मार्गावर जे पहाड आहेत त्यांना नरकासुर पर्वत म्हणतात .
नरकासुर हा कामरूपच्या प्राग्जोतिषपुर राज्याचा राजा होता , ज्याने त्रेतायुगापासून द्वापारयुगा पर्यंत राज्य केले .
तो कामाख्याचा प्रमुख भक्त होता .

इतिहास

या माँ कामाख्याच्या भव्य मंदिराचे निर्माण कोच वंशाच्या राजा चिलाराय ने १५६५ मध्ये केले होते .
परकीय आक्रमण झाल्याने हे मंदिर विध्वंसित झाले होते.
नंतर १६६५ मध्ये कूच बिहारचे राजा नर नारायण यांनी दुसऱ्यांदा याचे निर्माण केले .
या नील प्रस्तरमय भागात साक्षात माता कामाख्या वास करते असा समज आहे .
जे भक्त या शिळेचे पूजन, दर्शन स्पर्श करतात ते दैवी कृपा तसेच मोक्ष आणि भगवतीचे सान्निध्य प्राप्त करतात .

जेव्हा योनिचे पतन झाले तेव्हा हा पर्वत हलायला लागला त्यावेळेस त्रिदेवांनी याच्या एक एक शिखराला धारण केले .
त्यामुळे हा पर्वत तीन शिखरात विभक्त झाले आहे .
जेथे भुवनेश्वरी पीठ आहे तो “ब्रह्मपर्वत”, मध्य भाग आहे ते “महामाया पीठ “ आहे तो “शिवपर्वत”तसेच पश्चिम भागात “विष्णुपर्वत”किंवा वाराह पर्वत आहे .
वाराहपर्वतावर वाराही कुण्ड दिसते .
आषाढ़ महिन्यात मृगाशिरा नक्षत्राच्या चौथ्या चरणात आर्द्रा नक्षत्राच्या पहील्या चरणाच्या मध्यात देवीचे दर्शन तीन दिवस पर्यंत बंद असते आणि त्या वेळेस माँ कामाख्या ऋतुमती आहे असे मानले जाते .
चौथ्या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर देवीचा श्रृंगार, स्नान झाल्यावर पुन्हा दर्शन सुरु केले जाते .
पूर्वी चार दिशाला चार मार्ग होते .
व्याघ्र द्वार, हनुमंत द्वार, स्वर्गद्वार,आणि सिंहद्वार.
हळू हळू उत्तर तसेच पश्चिम मार्ग लुप्त झाला .
आता चारीकडे दगडी पायऱ्या बनवल्या आहेत ज्या चढायला खुप कठीण आहेत .
काही थोडेच भक्त या पायऱ्या चढुन जाऊन देवी पीठाचे दर्शन करतात .
बहुसंख्य यात्री खालुन टैक्सि घेऊन वर जातात .
खालच्या बाजूने मुख्य मार्गापासून पहाड़ी मार्गापर्यंत कामाख्या पीठ बनवले आहे ,ज्याला नरकासुर पथ म्हणतात .
भक्त सौभाग्य कुंडात स्नान केल्यावर श्री गणेशाचे दर्शन करण्यासाठी मंदिरात प्रवेश करतात .
मंदिराच्या समोर १२ स्तंभाच्या मध्य स्थळावर देवीची उत्सव मूर्ति दिसाते .
देवीचे दुसरे नाव हरिगौरी मूर्ति किंवा भोग मूर्ति आहे .
याच्या उत्तरेस वृषवाहन, पंच-वक्त्र, दशभुज कामेश्वर महादेव आहेत .
दक्षिणेला १२ हातांची सिंहवाहिनी तसेच १८ डोळ्यांची कमलासना देवी कामेश्वरी विराजीत आहे .
भक्त प्रथम कामेश्वरी देवी, कामेश्वर, व शिव यांचे दर्शन करतात.
तेव्हाच महामुद्राचे ही दर्शन करतात .
देवीचे योनिमुद्रा पीठ जमिनीखाली दहा पायऱ्या उतरून गेल्यावर एका अंधकारपूर्ण गुहेत वसलेले आहेत .
जिथे नेहेमीच दिव्याचा प्रकाश दिसत असतो ,त्याला कामदेव म्हणतात .
इथे जाण्यायेण्याचे मार्ग वेगवेगळे बनवलेले आहेत .

१४) प्रयाग शक्तिपीठ प्रयाग, उत्तर प्रदेश

आई सतीची बोटे इथे पडली .
आई “माधवेश्वरी देवी”रुपात विराजमान आहे .

ललिता देवी मंदिर, प्रयागराज
प्रयागराज हा केवळ गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगमच नाही तर शक्तीचे एक प्रमुख केंद्र आहे.
प्रयागराजमध्ये अलोशंकरी, कल्याणी देवी, ललिता देवी इत्यादी शक्तीची अनेक प्रमुख मंदिरे आहेत.
या सर्व मंदिरांमध्ये माँ ललिताचे मंदिर शक्तीच्या साधकांसाठी एक विशेष स्थान आहे.
असे मानले जाते की आई गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती प्रयागराजमध्ये आई ललिताच्या पायावर वाहत आहेत.
या कारणास्तव संगमाला स्नान केल्यानंतर पुण्यप्राप्ती होते .
या पवित्र शक्तीपीठाचा संगम विशेष आहे.

१५ ) ज्वालामुखी शक्तिपीठ कांगड़ा, हिमाचल प्रदेश

इथे सती आईचा डोक्याचा भाग पडला

आई इथे “ वैष्णवी देवी” रुपात विराजमान आहे .

याची माहिती ५२ शक्ती पिठामध्ये आली आहे .

१६) गया शक्तिपीठ गया, बिहार

इथे सती आईचे वक्ष पडले .
आई इथे “ सर्वमंगला देवी मां “ रुपात विराजमान आहे .

मंगलगौरी मंदिर 'पाळपीठ' म्हणून प्रसिद्ध आहे.
येथे प्रत्येक इच्छा पूर्ण केली जाते.
असे मानले जाते की जो कोणी या मंदिरात प्रामाणिक अंतःकरणाने आईची उपासना करतो, आई त्या भक्तावर प्रसन्न होते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करते .
बिहार शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या भस्मकुट डोंगरावर वसलेले हे माँ मंगलगौरी शक्तीपीठ मंदिर आहे .
आई सतीच्या स्तनाचे स्थान (स्तन) येथे पडले आहे, ज्यामुळे हे शक्तीपीठ 'पालनहार पीठ' किंवा 'पालनपीठ' म्हणून प्रसिद्ध आहे.
कालिका पुराणानुसार गया मधील सती चे स्तन मंडप भस्माकुट पर्वताच्या शिखरावर पडले आणि दोन दगड बनले.
मंगलागौरी मां याच आदिमस्तरीय मंडळामध्ये राहतात.
जे भक्त या दगडांना स्पर्श करतात , त्यांना अमरत्व मिळते आणि ते ब्रह्मलोकमध्ये जातात.
या शक्तीपीठाचे वैशिष्ट्य म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या हयातीत स्वतःचे श्राद्ध कर्म इथे संपादन करू शकते.

आई प्रत्येक मनोकामना पूर्ण करते, आईला असा विश्वास आहे
येथे गाभाऱ्यात गडद अंधार आहे, परंतु येथे बऱ्याच वर्षांपासून एक दिवा जळत आहे.
असे म्हणतात की हा दिवा कधीच विझत नाही.
परदेशीही भक्तही मां मंगला गौरीची येथे येऊन प्रार्थना करतात.
मां मंगला गौरी मंदिरात पूजा करण्यासाठी भाविकांना १०० पेक्षा अधिक पायऱ्या चढवाव्या लागतात.

या मंदिराचा उल्लेख पद्म पुराण, वायु पुराण, अग्नि पुराण आणि इतर लेखात आढळतो.
तांत्रिक कार्यात या मंदिरालाही महत्त्व दिले जाते.
हिंदू पंथात, हे मंदिर शक्तीचे निवासस्थान मानले जाते.
मंदिराच्या गाभाऱ्यात जेथे देवीची मूर्ती ठेवली आहे, तेथे भव्य कोरीव काम आहे.
मंदिराच्या समोर मंडप बनविला गेला आहे.
भगवान शिव आणि महिषासुराची मूर्ती, मर्दिनीची मूर्ती, देवी दुर्गाची मूर्ती आणि दक्षिणा काली यांची मूर्ती देखील मंदिर परिसरात आहेत.
येथे इतरही बरीच मंदिरे आहेत.
महाष्टमी व्रताच्या दिवशी आईचे भक्त मोठ्या संख्येने येथे पोहोचतात.


१७ )वाराणसी शक्तिपीठ वाराणसी, उत्तर प्रदेश

इथे सती आईचा पायाचा अंगठा पडला .

आई “ विशालाक्षी देवी”रुपात विराजमान आहे .

याची माहिती ५२ शक्तीपिठात आली आहे .

क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED