sant goroba kumbhar books and stories free download online pdf in Marathi

संत गोरोबा कुंभार

महाराष्ट्र संतांची पवित्र भूमी म्हटले जाते ...याच महाराष्ट्रात भागवत धर्माच्या भगव्या पताका घेऊन व स्वकर्मातून जनकल्याणासाठी झिजनारे विविध संतांनी आपल्या भक्तीने व कार्याने गौरव व कौतुकास्पद कार्य केले आहे ..असेच संत श्रेष्ठ श्रीगोरोबाकाका कुंभार यांच्या विषयी आज आपण काही जाणून घेणार आहोत..

संतांच्या जीवनात अलौकिक अशा घटना घडलेल्या आहेत त्या त्यांच्या अलौकिक अशा विठ्ठल भक्तीने घडल्या गेल्या...
यात संतापैकी प्रसिद्ध संत मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी या गावातील संत गोरा कुंभार... त्यांना एकूण पन्नास वर्ष आयुष्य लाभले त्यांचा जन्म इसवीसन 12 67 मध्ये झालेला... चैत्र कृष्ण एकादशी शके 10 एप्रिल 13 17 मध्ये तेर ढोकी नावाच्या गावात संजीवन समाधी घेतली...🌹🌹

गोरोबा काका जातीने कुंभार असल्यामुळे त्यांना आपला प्रपंच चालवण्यासाठी मडकी घडविणे व त्यांना विकणे अशी सर्व कामे करावी लागत होती. तोच त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता...
ते सकाळी उठून आपल्या कामाला सुरुवात करत पण मुखात अखंड विठ्ठलाचे नामस्मरण चालायचे
...ते पंढरीच्या विठ्ठलाचे परमभक्त ...ते त्याला आपले आराध्य दैवत मानत होते देवाच्या नामाचा गजर करून आनंदाने ते आपली काम करत असे..त्यांना सकाळी उठून गावच्या बाहेर माती आणावी लागत असे ...तिला पाण्यात भिजवून चिखल करून ठेवावा लागायचा ...तसेच त्या मातीला तुडवण्यासाठी खूप कष्ट करावे लागायचे... गोरोबाकाका हे सर्व अगदी आनंदाने आवडीने विठ्ठलाचे नाम घेत घेत करायचे...
असाच एक विठ्ठल भक्तीत तन्मय असलेल्या प्रसंग ..
एक दिवशी सकाळीच गोरोबाकाका आपले हातात चिपळ्या घेऊन देवाचे नामस्मरण करता करता मडके घडवण्यासाठी चिखल तुडवत होते ...तेव्हा काय झालं गोरोबाकाकाच लहानसं बाळ रांगत रांगत आपल्या वडीलांकडे येऊ लागलं ,पण गोरोबा काका मात्र आपल्या विठ्ठल भक्तीत लीन असल्यामुळे त्यांना इतर कशाचंही भान नव्हतं ...
ते आवडीने आपल्या देवाच्या नामस्मरणात तल्लीनतेने मग्न होते.. ते बाळ रांगत रांगत चिखलात उतरलं व बाबाच्या पायाला मिठी मारू लागलं.. पण तरीही गोरोबाकाका मात्र डोळे झाकून तल्लीनतेने भगवंताचे अभंग म्हणून नाचत-नाचत चिखल तुडवत राहिले.. नाचता नाचता त्यांनी चिखला बरोबरच आपल्या बाळालाही तुडवत राहिले ..त्या बाळाचे रक्त आणि मांस त्या चिखलाच्या गोळ्याप्रमाणे एकजीव झाली..ते जागीच गतप्राण झाली ,तरीही ते आपल्या भक्तीत मग्न होते..
तेवढ्यात त्यांची बायको नदीवर पाण्याला गेली असलेली हंडा घेऊन परत आली..आणि बाळाला पाहण्यासाठी ओसरीवर गेली असता तिथे तिला बाळ दिसली नाही म्हणून ती गोरोबाकाका ला विचारती झाली की बाळ कुठे आहे ????इथे झोपलेले होतं आता तर इथे नाहीये ???असे म्हणून ती गोरोबाकाकांना आवाज येऊ लागले ..
काका मात्र भक्तीचा परी सीमित रममाण झालेले होते तसेच त्यांच्या पत्नीचे लक्ष गोरोबांच्या पायाकडे गेले.. त्यांनी चिखलात आपल्या बाळाचे रक्त पाहिले..
आणि ती मोठ्याने आक्रोश करून रडू लागली... ती माता माउली आपल्या बाळाचे प्रेत पाहून मोठ्याने शोक करू लागली...
..."हे देवा हे परमेश्वरा आता मी माझ्या बाळाला कुठून आणू.. हे देवा आता मी काय करू आणि अशातच क्रोधाने गोरोबाकाकांना शिव्या देऊ लागली .....आग लागो तुझ्या भजनाला तुझ्या त्या विठ्ठलाला... असा कसा तो पांडुरंग ज्याने एका बाळाला आईपासून दूर केले असे म्हणून ती मोठ्याने रडू लागली ...
तीचा आवाज ऐकुन गावातील लोकही गोरोबाकाका येथे जमा झाली आणि बाळाच्या मरण्याचा शोक करू लागली...
तेही आता म्हणू लागले की असा कसा हा विठ्ठल आहे ज्याने आपल्या भक्ताचे वंस बुडविला आहे... त्या कुळाचा त्याने उद्धार करायला हवा त्याच कुळाचे मूळ त्यांनी ठेवले नाही आणि सगळेच लोक पांडुरंगाला दोष देऊ लागले...
त्यांच्या आवाजनी आता गोरोबाकाकांनी डोळे उघडले आणि पाहतात तर काय 😲आपल्या पायाखाली पडलेले आपले बाळ बघून ते शोकाकुल झाले ....माझ्याकडून हे काय झाले .........एवढी मोठी चुकी कशी रे पांडुरंगा ....कुठे फेडू मी हे पाप... असे म्हणून ते रडू लागले ...तेव्हा गावातील लोक म्हणू लागले ,असा कसा तुझा पांडुरंग विठ्ठल त्याने सगळे केले .. जाणे त्या बाळाचा जीव घेतला तो कसला आला देव आणि कसा आला पांडुरंग....
तेव्हा त्यांची बायकोही त्यांना अधिकच शिव्याशाप देऊ लागली व त्यांच्या विठ्ठलाला ही नाना प्रकारे नावे ठेवू लागली ..
आता गोरोबांना त्यांचा राग अनावर झाला आणि ते तिथेच असलेलं दांडपट्टा हातात घेऊन आपल्या बायकोकडे मारण्यासाठी धावले तेव्हा त्याची बायको म्हणाली की तुम्हाला तुमच्या विठ्ठलाचे आण आहे जर तुम्ही माझ्या अंगाला स्पर्श केला तर त्या विठ्ठलाची शपथ आहे..
असे म्हणतात गोरोबाकाकांनी हातातली दांडा बाजूला फेकून दिला आणि तिला हात जोडून म्हणाले की तू आज पासून माझी पत्नी नसून आई झाली आहेस तेव्हा मी तुला कधीच स्पर्श करणार नाही आणि आपल्या विठ्ठलाचे गुणगान गाव लागली.... माझी विठाई माझी विठाई मला मिळवून दिली आई...

बरेच दिवस झाल्यानंतरही गोरोबाकाका आपल्या पत्नीला आपले आई म्हणू लागले.. तिला तिच्या पत्नी असण्याचा कोणताही अधिकार त्यांनी दिला नाही व आता आपण तिचे लेकरं आहोत असे ते म्हणू लागले..
अशीच वर्ष निघून गेल्यानंतर त्यांची पत्नी विचार करू लागली की आपल्या कुटुंबाला बाळ कसे येणार ते तर मला आता हातही लावणार नाही... तर मग आपल्या वंशाला दिवा कुठून मिळणार... ती नाना प्रकारे आपल्या नवऱ्याला विनवू लागली तरीही ते काही राजी होईना.. म्हणून त्यांनी तिला एक उपाय सांगितला की तुम्ही आता माझ्या बहिणीशी लग्न करा ...तुम्ही विठ्ठलाची शपथ घेतल्याने मला तर हात लावू शकत नाही पण तुम्ही तिच्यासोबत लग्न करून आपल्या कुणाला मिळेल आणि हा उपाय गोरोबांनी त्यांचे ऐकून त त्यांनी त्यांच्या बायकोच्या दुसरे लग्न केले...

आपल्या दोन्ही लेकीला वाटी लावताना त्यांचे वडील गोरोबा काका ला म्हणाले की .."जसे तुम्ही माझ्या पहिल्या मुलीला सांभाळले तसेच हिलाही सांभाळून घ्या"
" तिला त्याच प्रमाणे वागणूक द्या जर तुम्ही काही भेदभाव केला तर तुम्हाला तुमच्या विठ्ठलाचे शप्पथ आहे.."....
दुसऱ्यांदा विठ्ठलाची शपथ शप्पथ ऐकल्यानंतरत्यांनी मनातच विचार केला की यांनी सुद्धा मला विठ्ठलाच्या शपथच अडकून ठेवले आहे... आता तर ही पण माझी दुसरी आई झाली...

आता त्यांच्या बायकोने विचार केला की आता तरी आपल्या वांशाला दिवा मिळेल बरेच दिवस झाल्यानंतरही ते आपल्या पत्नीसोबत प्रपंच करत नव्हते म्हणून त्यांच्या पत्नीने एके दिवशी विचार करून गोरोबा काका झोपले असताना दोन्ही बायका त्यांच्या दोन्ही बाजूला जाऊन झोपल्या ....गोरोबा काकांना झोप लागलेली होती म्हणून त्यांनी त्यांचे हात आपल्या अंगावर ठेवले.. सकाळी जेव्हा गोरोबाकाकांना जाग आली तेव्हा त्यांनी रागाने पाहिले की आपल्या महापापी हाताने आपले ऐकले नाही म्हणून त्यांना शिक्षाही द्यायलाच हवी... आपण आपल्या आई बहिण मानत असलेल्या लावू शकत नाही हे केवढे मोठे पाप आहे........

गोरोबा म्हणाले माझ्या पांडुरंगाला काही नाव ठेवू नका तो माझे सर्वस्व आहे त्याने तर काही केले नाही ना जर काही केले असेल तर ते मीच केले आहे म्हणून... मला या पापाची शिक्षा हि मिळालीच पाहिजे असे म्हणून त्यांनी जवळच असलेल्या कोयत्याने आपले दोन्ही हात कापून टाकले.....

तिकडे पांडुरंगाला आता आपल्या भक्ताची चिंता वाटू लागली... आणि ती रुक्मिणीला म्हणू लागलेआता त्यांचा उदरनिर्वाह कसा चालणार त्यांच्या कुटुंबाचे पालन पोषण कोण बरे करणार..म्हणून मग आपल्या दोघांनाही त्यांच्या घरी त्यांची सेवा करण्यासाठी जावे लागणार आहे ...असे म्हणतात रुक्मिणी गोरोबाच्या घरी जाण्यासाठी तयार झाल्या..
या दोघांनी पती-पत्नीचे कुंभाराचे रूप घेतले व गरुडाला गाढव बनवले ...आपले काही सामान गाढवावर टाकून ते गोरोबाकाकांच्या घरी आले व त्यांना म्हणू लागले... हे सदभक्त मी खूप लांबच्या देशाहून आलो आहे... मला तुमच्या इथे आश्रय यापुरते जागा मिळेल का ???तिकडच्या राज्यात भयंकर दुष्काळ पडला आहे.... मला काहीच कामधंदा नसल्यामुळे मी इकडे तिकडे भटकत आहे ...कृपया करून तुम्ही मला काही काम द्याल का...🙁
तेव्हा त्यांच्या पत्नी म्हणाल्या की आमच्या मालकाला दोन्ही हात नसल्यामुळे आमच्या सर्व कारभार बंद पडला आहे... तर तुम्हाला मडकी व गाडगे घडवावी लागेल ...जर तुम्हाला येत नसेल तर माझ्या मालकाला कडून शिकून घ्या आणि त्यांचा व्यापारही करावा लागेल ..तेव्हा रुक्मिणी म्हणाल्या ठीक आहे आम्ही सर्व काही करू ...
भगवंत आता गोरोबाकाकांच्या राहू लागले... आणि माती आणू लागले ..त्याचा चिखल बनवून घडवण्यासाठी एका चाकावर ठेवून विविध प्रकारचे मडकी घडू लागली ...
आता भक्तवत्सल पांडुरंग गोरोबाकाकांच्या घरी मडकी बनू लागले त्यांनी चांकाऐवजी आपले सुदर्शनचक्र ठेवून मडकी घडविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचें मडकी ते घडवू लागले..

आता साक्षात परब्रम्ह व विश्व निर्मात्याच्या हातानेच मडकी घडू लागले म्हटल्यावर ती आता कशी असणार... त्या मडक्यांना सुदर्शन चक्रांचेतेज प्राप्त झाले व त्यांचा छ न छं.असा आवाज येऊ लागला ...भगवंता बरोबर गोरोबाकाका ही त्यांना अधूनमधून सांगता सांगता विठ्ठलाचे अभंग सतत नामस्मरण करत होते...

आता ही बनवलेली मडकी व घागरी व्यापारासाठी पंढरपूरच्या बाजारी नेण्यात आली व त्या एका अाण्याच्या घागरी चे दोन आणी असे म्हणून व्यापार करू लागली . त्यांना अनेक माणसांनी विचारले की एका अाण्याची घागर दोन आण्याला कशी काय??? त्याचे असे काय वैशिष्ट्य आहे... तेव्हा गोरोबा काका बरोबर असलेले पांडुरंग म्हणू लागले की तुम्ही तिला घेऊन पहा पाण्याची घागर भरलेली असताना फेकून पहा ..फुटणार नाही ...जर ती तुटली तर आमची आणि जर नाही फुटली तर तुम्हाला दोन आण्याचे 4 आणि द्यावे लागतील मग काय त्या आग्रहाने he4 आणि देऊन ती गाडगी व मडकी घेतली...आता साऱ्या पंढरपूरच्या बाजारपेठेत एकच झुंबड उडाली., गोरोबाकाकांचे मडके जगाच्या पाठीवर असे बनवलेली आहे की ते तुटत नाहीत असे म्हणून त्यांचे सगळे गाडगे व मडके विकू लागले ...त्यांचा खूप प्रमाणात खप पंढरीत पांडुरंग नाहीझाला .
असेच बाजारात गाडगे घेण्यासाठी आलेल्या सावता माळ्याचा बायकोने ी एक गाडगे आपल्या घरी नेले व आपल्या नवर्‍याला म्हणू लागले की हे गाडगे अजबच आहे बघा तुम्ही ते फुटत नाही... असे म्हणून सांवतो बांनी ते गाडगे हातात घेऊन त्याचे बारकाईने निरीक्षण केले असता त्यांना गाडगे च्या खाली सुदर्शन चक्र दिसली... ते त्यांच्या बायकोला म्हणू लागले हे गाडगे कुणाही साधारण कुंभाराने घडवले नसून ते साक्षात परब्रम्ह परमेश्वराच्या सुदर्शन चक्राने बनवले गेले आहेत... म्हणजेच गोरोबाकाकांच्या घरी कुणीही अतिथी नसून ते साक्षात परब्रम्ह आहेत व ते गोरोबाकाकांच्या मदतीसाठी तेथे गेले असावेत..

आता सर्वच संत जणांना चोखोबांना देव या गावाला आहेपंढरीत पांडुरंग नाही तर ते गोरोबाकाकांच्या तीर ढोकी गावी घरी आहेत तेव्हा विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने सगळे संतजन तीर ढोकीगावाला गोळा झाली व गोरोबा काकांना विचारते

सर्व संतांनी विठ्ठलाला आता ग् गोरोबाया अंगणात ओसरीवर पाहायला सुरुवात केली.. तेव्हा त गोरोबा काका म्हणाले की ते दोघेही कुंभारांची जोडी दुपारी निघून गेली आहे ...
असे म्हणतात सगळे भक्त रडू लागले .. पांडुरंग इथेही नाही पंढरी त हि नाही आम्हाला ते कुठेच दिसत नाही सापडत नाही आहे आम्ही काय करावे ...
तेव्हागोरोबांच्या बायका रडू लागल्या आणि म्हणू लागल्या की आता आमच्या कडून खूप मोठी चूक झाली आहे... आम्ही त्यांना एक कुंभार समजून त्यांच्याकडून सगळी कामे करून घेतली आहेत .. आमच्या या पापाला विठ्ठल चूक म्हणून माफ करील का????
तेव्हा गोरोबा काका म्हणाले ...माझा विठ्ठल खूप मोठ्या मनाचा आहे ..त्याला फक्त भावभक्तीने शरण जाण्याची गरज आहे आपण सगळे आता विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ ...उद्याच एकादशी असल्यामुळे भगवंत पंढरीला राहते असे म्हणून सगळे मार्गस्थ झाली..
. एकादशी असल्यामुळे संत नामदेवांचे चंद्रभागेच्या वाळवंटात हरिनामाच्या गजरात सहित कीर्तन चालू होते ..म्हणून गोरोबा काका आणि इतर भक्तजन तेथेच नामदेवांचे कीर्तन ऐकू लागले.. कीर्तनात संत गोरोबाकाका चे विठ्ठलाचे अखंड नामस्मरण करत टाळ्यांचा गजरात तल्लीन होते.. नामदेवांचे कीर्तन संपल्यावर त्यांनी जनसमुदायाला आव्हान करून सगळ्यांना एकदा विठ्ठल नामाचा गजर करण्यास सांगितले ...दोन्ही हात वर करून टाळ्या वाजून विठ्ठलाचे नामस्मरण करा ...विठ्ठल फक्त नावानेच प्राप्त होतो .. तेव्हा विठ्ठलाला आपल्या भक्तीने प्राप्त करा असे म्हणून पुन्हा एकदा नामदेवांनी मोठ्यांनी टाळ्या वाजून विठ्ठल भक्तीचा गजर चालू केला आणि इतरही सर्वजण मोठ्याने विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग गजर करू लागली..
नाम कीर्तन चालू असतानाच गोरोबाकाकांना दोन्ही हात अाले व विठ्ठल कृपेने त्यांचे दोन्ही हाताने आनंदाने टाळ्या वाजवू लागले ..आपल्याला आलेली दोन्ही हात पाहून गोरोबाकाकांनी विठ्ठलाचे आभार मानले व ते आनंदाने नाचू लागली.. हे सर्व इतर संत जण मात्र त्यांना पुन्हा एकदा विठ्ठल आणि विठ्ठल भक्तांची प्रचिती आली अशा प्रकारे गोरोबाकाकांनी आपले सर्वस्व मांडलेल्या भगवंताला महाद्वारापर्यंत दंडवत घातले घातले विठ्ठलाच्या चरणाला आलिंगन देत गोरोबाकाका विठ्ठलाचे दर्शन घेतले... भगवंतांनी तेव्हा गोरोबाकाकांना आपले भक्तवत्सल विराट रूप दर्शन दिले... आणि त्यांना आपल्या हृदयात स्थान दिले...
🌹 धन्य तो भगवंत आणि धन्य त्यांचे भक्त...🌹

,💞तुकोबाची अमृतवाणी पडता देवाजीच्या कानी...
दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग
मौन का धरिले देवा सांगा पांडुरंग....

गोरोबाचे मडके घडले
कबीराचे शेले विणले
भगिरथा साठी आणली स्वर्गाहुनी गंगा

द्रौपदीची साडी फिटली
लाज पतिची राखली
देवकीला केले मुक्त तोडुनी तुरुंग...

निळा म्हणे जगजेठी
काही नाही माझ्यासाठी
भक्त पुंडलिकासाठी उभी चंद्रभागा..💞
हे आणि असेच अनेक संत आहेत ज्यांनी विठ्ठल भक्तीत स्वतःला वाहून घेतले आहेत..
अशा अनेक संतांनी ही महाराष्ट्र भूमी गौरवान्वित केली आहे या भूमीला आपले शतशः नमन...

क्रमशः
(माझ्या अल्प मतीप्रमाने मी दृष्टांत मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे ,तरी त्यात काही चूक उणीव असल्यास हक्काने कळवा... मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझ्या कोणकोणत्या कथा आवडतात प्लीज रेटिंग द्या आणि फॉलो करा...तुमच्या आमच्या मधील 💞 archu 💞)


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED