vaari pandhrichi books and stories free download online pdf in Marathi

वारी पंढरीची


वारी पंढरीची....

आता आषाढी एकादशी जवळ आल्याने सगळ्यांनाच त्या पांडुरंग विठलाच्या भक्तीची ओढ लागली आहे... त्याच्याविषयी थोड जाणून घेवूय..

🌹संपदा सोहळा
नावडे मनाला
लागला टकळा पंढरीचा
जावे पंढरीसी आवडे मनाशी
कधी एकादशी आषाढी
तुका म्हणे ऐसा आर्त जाच्या मनी
त्याची चक्रपाणि वाट पाहे 🌹
....एकदा का आपल्या मनाला पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ लागली असेल आणि अंतकरणातून आपण त्या देवाचे नाव स्मरण केले तर त्या देवालाही आपलीच येण्याची उत्सुकता असते असे म्हणतात हे असे सुख वारकऱ्यांच्या नशिबात असते...

..💞. होई होई वारकरी...
डोळा पाही पंढरी..💞
पंढरीचा वारकरी असे स्वर्गी देखिल सुख नाही ..वारकरी होण्यासाठी सुद्धा आणि एक जन्माची पुण्याई लागते असे म्हणतात... वारीमध्ये हजारो नव्हे लाखो च्या संख्येने वारीमध्ये सहभागी होतात विठ्ठलाच्या दर्शनाची आस असलेल्या भक्तांना पाळी वाऱ्यामध्ये कोणताही त्रास कुठलाही अडथळा आला तरी ते अगदी हसत मुखाने करून पंढरपूरच्या दिशेने हरिनामाचा गजर करीत चालत असतात....
महाराष्ट्र राज्यातल्या कानाकोपर्‍यातून व देशातील इतर अनेक राज्यातूनही संतांच्या पालख्या सोबत विठ्ठलाच्या दर्शनास पंढरपुरात आषाढी महिन्यात एकादशीनिमित्त देतात जिथे साक्षात देव निवास करीत असतो त्या विठ्ठलाच्या मुखदर्शनाने ही आपले अनेक पापे नाश होतात व आपल्या जीवनाचा उद्धार होतो भीमा आणि चंद्रभागा या नद्याही विठ्ठलाला चरण स्पर्श करून या महिन्यापासून अखंडपणे वाहत असतात विठ्ठलाचे अनेक परम भक्त आहेत त्या त्या भक्ताच्या किंवा संतांच्या पालख्या मिरवणूक होऊन सर्व पालकांना पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटात एकत्र पाहताना चा सोहळा अविस्मरणीय असा आहे...

भक्त आणि भगवंत यामध्ये नेहमीच भक्ती व प्रेमाची आदान-प्रदान होत असते... जसा भक्ताचा भाव असतो त्याच प्रमाणे भगवंत त्यांना त्याच रुपात दर्शन देत असतात... भक्ताच्या हाकेला धावून येतो त्याच्या प्रेमासाठी तो नेहमीच तत्पर असतो.... आणि म्हणूनच तो कधी वेगवेगळ्या रूपात प्रगट होऊन दर्शन देतो..
. ज्यावेळेस देवाला स्नान करण्याची इच्छा होते त्यावेळेस ते 💞श्री रंगनाथ💞
म्हणून ते श्रीरगंम् या दक्षिण क्षेत्रात असतात...ज्या ठिकाणी तीन्ही समुद्र व समस्त पवित्र नद्यांचा संगम ह्या भगवंता च्या सेवेसाठी तत्पर असतात...

परंतू भगवतानला ज्यावेळेस भूक लागते म्हणजेच भोग स्वीकारण्यासाठी ते जगन्नाथ पुरी मध्ये असतात... ज्याठिकाणी ते 💞जगन्नाथ जी💞 म्हणून अाेलखले जातात.. आणि त्या ठिकाणी ते 64 उपचार आणि 56 भोगाचा स्वीकार करतात...

ज्यावेळी भगवंताला शयनाची किव्वा झोपण्याची इच्छा होते त्यावेळेस ते💞 गोपाळ कृष्ण💞 किव्वा बालकृष्ण म्हणून वृंदावनाला जातात .. ज्याठिकाणी बाळगोपसखा , नंद राज , यशोदा माई, गोप गोपी आणि राधा राणी यांच्याकडून ते सेवेचा स्वीकार करतात... आणि असेच ज्यावेळेस भगवंताला राज्य करण्यची लहर येते त्यावेळेस ते पंढरपूर धामी💞 श्री विठ्ठल💞 म्हणून भक्ताच्या मनावर अधिराज्य गाजवन्यासाठी येतात...
म्हणूनच आपले संत म्हणतात...
कानडा राजा पंढरीचा....💕
जेथे राजा आला तेथे त्याची प्रजा ही असणारच.. जेथे मायबाप असले तेथे लेकरे ही जाणारच... बाप आणि आई... माझी विट्ठल रखुमाई......
आषाढी वारीला हे सारे वारकरी टाल, मृंदुग घेवून व हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन पंढरपूरत येतात... एकादशी च्य किमान दहा दिवस आधी भगवंत अहोरात्र आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देत असतात...या दहा दिवसांत देव झोपत देखील नाही.. आणि त्यामुळं च म्हणतात न...
💕वाट पाहे उभा भेटीचिया आवडी.. .
कृपाळू तातडी उतावीळ.💕
आपल्या भक्ताच्या प्रेमासाठी भगवंत 28 युगांपासून त्या विटेवरी उभा राहतो.....
सर्वप्रथम भक्तराज पुंडलिक याची माता पिता भक्ती व सेवा पाहून देवाने त्यांना दर्शन दिले,पण त्या ही वेळेस ते आपल्या आईवडलांच्या सेवेत मग्न होते म्हणून त्यांनी देवाला उभे राहण्यासाठी जवळच असलेली विट फेकली,.....पण आपल्या मातापित्यांच्या सेवेत खंड पडू दिला नाही.... आपल्या भक्तासाठी देवानं कमरेवर हात ठेवून वाट पाहत होते....
देवा मजला माता पित्याची
सेवा करू द्या पुरी...
थांब जरा तोवरी विठला...
थांब जरा तोवरी.

इथेची माझी चंद्रभागा...
इथेच पंढरी.....
थांब जरा तोवरी..❣️
त्यानी पुंडलिकाच्या भक्तीचा मान ठेवून त्यांना वर मागण्यास सांगितले... पुंडलिक ही भगवंताला म्हणाले.........". साध्या सरळ भक्तासाठी तुम्ही येथेच राहून त्यांना दर्शन द्या... देवाला प्राप्त करण्यासाठी व्रत, जप तप न करता फक्त नामस्मराने , भवभक्तिने इतरांना प्राप्त हो..".😊

भगवंताचे विग्रह जे आहेत त्या विग्रहाच्या पायावरती डोकं ठेवून दर्शन घेतल्या जात..... साक्षात परब्रम्ह परमेश्वरा च्या पायाला स्पर्श करण्या इतपत देवाने श्री विठ्ठल रूपात प्रगट होऊन संधी दिली आहे... भक्ताची ही इच्छा फक्त श्री शेत्र पंढरपूर धामा मध्येच पूर्ण होते... इतर कुठल्याही मंदिरात असे दर्शन होत नाही .🤩

आषाढी शुद्ध दशमीला सर्व पालख्या, सर्व संतांच्या पालख्या , संत न्यानदेव, संत सोपान महाराज, संत मुक्ताबाई, संत निवृत्तीनाथ, संत गोरोबा काका, इतर ही या सगळ्याच्या पालख्या वाग्रीला एकमेकांना भेटतात... सकाळी 10 वाजेपासून पंढरूरकडे जाण्यासाठी मार्गक्रमण करतात..
आषाढी एकादशी ला वारकरी चंद्रभागेचे स्नान करून, गोपीचंदनाचा टीला ,बुक्का लावून, गळ्यात तुळशीची माळ घालून हातात टाल चिपळ्या घेवून संतांच्या पालख्या समवेत देवाचा दार्शना साठी क्षेत्र प्रदक्षिणा करतात......
❣️तुळसी माळ गळा.. गोपीचंदनाचा टिळा.
हृदयीं कळवळा वैष्णांवाचा...❣️ .

आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठलाच्या रथ प्रदक्षिणा साठी निघतो..अस सांगतात की शिवराम पंतांना दृष्टांत झाला, की त्यांनी वाड्यामध्ये उत्सव मूर्तीची स्थापना करावी.. व मिरवणूक सोहळा साजरा करावा..,आणि भगवंताच्या आज्ञेनुसार च 200 वर्षांपासून भगवंताचा हा मिरवणूक सोहळा साजरा होत आहे.. आजतागायत तो चालू आहे... आषाढ शुद्ध एकादशी दिवशी दुपारी 1वाजेपासून सरदार खाजगीवले याच्या वाड्यातून श्री विठ्ठल रखुमाई, सत्यभामा याचे श्रृंगार लेले विग्रह हे रथातून मिरवले जाते...
भक्त आपण हा रथ गोपाळपूर कडे घेवून जात आहोत, जेथे पौर्णिमेला भगवंता बरोबर आपल्याला गोपाळकाला करायचा आहे..या भावनेने ओढतात . ... म्हणूनचं
रतःस्थम् विठ्ठल दृष्या.... पुनर्जन्म विद्यते.. रथाच्या ठायी बसलेले श्री विठ्ठल रखुमाई याचे दर्शन घेतल्याने पुनर्जन्म होत नाही..या रथाची परिक्रमा पूर्ण झाल्यावर भक्तांना वारी पूर्ण झाल्याचा अनुभव येतो...🤗

आषाढी एकादशी ला देवशयनी एकादशी असेही म्हणतात...
एकादशीचे माहात्म्य भविष्यतर पुराणामध्ये सांगताना अस सांगतात की भगवंत या दिवशपासून श्यन करतात. त्या दिवसपासुंच चातुर्मास प्रारंभ होतो.. आणि भक्त पुन्हा एकदा कार्तिक शुद्ध एकादशी ला भगवंताच्या दर्शनासाठी पंढरपुरात देवाला उठवण्यासाठी येतात..म्हणूनच भगवंत म्हणतात
"आषाढी एकादशी विसरू नका मज.....
सांगतसे गुज पांडुरंग...."
पंढरपूरला भू वैकुंठ असे का म्हतल जात याचा प्रत्यक्ष अनुभव वारकऱ्यांना येत असतो.. जेव्वा वारकरी आपल्या परतीच्या वाटेवर, आपल्या घराच्या दिशेने जाण्यासाठी निघतात तेव्हा त्यांना भगवंताचा विरह जाणवतो... 😔जसे...
कन्या सासुरसी जाये.
मागे परतुनी पाहे....
तेसे झाले माझ्या जीवा...
केव्वा भेट्सी केशवा...
पाण्या वेगळी मासोळी.
तैसा तू मज तळमळी..
तुका म्हणे श्री केशवा...
भेटी लगी द्यावी जीवा...
"वैष्णव पताका घेऊन, हरिनामाच्या गजरात मी पंढरपूर चि वारी केली... पण आज मी घरी निघालो आहे.. मी माझ्या सांसारात अडकल्यानंतर तुमचे नाव देखील माझ्या अाेठामध्ये असू द्या.. आणि पुढं च्या वारीला मला पुन्हा बोलवा..."या आपुलकीने वारकरी भगवंताला प्रार्थना करत करत, देवाचे रूप मानत साठवून देवाचा निरोप घेतात...🤗.

तर असा हा आनंदाचा पारमार्थिक सोहळा प्रतेकाने अनुभवावा.. आयुष्यात एकदा तरी पंढरीची पायी वारी करा...👏
मलाही एकदा पंढरीला पायी जाण्याची खूप इच्छा आहे.. जेव्व देवांनी बोलवलं टेव्वा नक्कीच योग जुळून येईल..,🤗अस वाटत........
यानंतरही पंढरपूर ची जी काही मला थोडीफार माहिती आहे ती मी लिहिणार आहे... तोपर्यंत वाट पहा...👋
...

तुमचीच 💞Archu💞


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED