रेशमी नाते - ५ Vaishali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रेशमी नाते - ५

पिहु लेक्चर अटेंड करते. ब्रेक झाल्यावर तिने वीरा ला कॉल केला.

वीरा:- वहिनी मी कंटीन मध्ये आहे ये तु इकडेच .

पिहु:- वीरा घरी जायच ,माहीत नाही का घरी गेस्ट येणार आहे.

वीरा:-हो माहीत आहे.माझ काय काम‌ तु जा मी नंतर येते..

पिहु:-बरं बाय,पिहु घरी जाते.गाड्या तर बाहेर दिसतच होत्या‌ .तिला धाकधुक लागली होती. घरात कस जायच ....तशीच भीत भीत घरात येते...सगळे गप्पा मारतच बसले होते.ती आल्यावर सगळ्यांच्या नजरा तिच्या कडे वळल्या.ती इकडेतिकडे न बघता सरळ‌ जात होती...

दामोदर:- पिहु,

पिहु ने आवाज ऐकून थांबली.

दामोदर:- पिहु ये‌ इकडे....

पिहु हळु हळु जात सुमन च्या शेजारी जाऊन थांबली.

दामोदर:- मोरे साहेब ही आमची मोठी सुन (.सुमन नजरेने तिला पाया पडायला लावते)

पिहु जाऊन पाया पडली ‌.

साधा:- पिहु जा दियाला आण .

सगळे दियाला प्रश्न करुन मुलगा मूलगी एकमेंकाशी बोलतात.

सगळे एकत्र जेवण करुन पाहुणे निघुन जतात.

रोहिणी:- सुधा पाहुणे आवडले का तुला...

सुधा:- हो पण अजुन एक दोनदा भेटुन कळवाव.म्हणते काय म्हणताय.

रोहिणी:- बघ आत्ताच नंतर परत आमच्या अंगावर खापर फोडशील.तुम्हीच बोलला.

दामोदर:- रागातच )रोहिणी काय बोलते.दियाला मी माझी मुलगी मानतो.अस बोलुन परक करते का.

रोहिणी:- अहो मी खर तेच बोलले सुधाला पटत नाही आपण काही ठरवलेले ..

सुधा:-वाहिनी अस का बोलताय.माझा विश्वास आहे तुमच्यावर .

रोहिणी काही न बोलता निघुन जाते.

आत्या मी दिया ला भेटुन येऊ का ...

सुधा:- हसत)जा ना पिहु ते पण तुझच घर आहे.जा भेटुन ये.

पिहु दियाच्या रुममध्ये जात:- दिया येऊ का?

दिया दारकडे बघत वहिनी ये ना ..

पिहु हसत‌ आत येते.

दिया थोडी लाजत हसत होती.

ओहह ,कोण तरी लाजतय,म्हणजे बोलण नीट झालं पिहु हसत चिडवायला लागते

दिया पिहुला मिठी मारते काय वहिनी तु पण ...ना.असच इनजनरल बोलत होतो.

दिया पिहुला (मुलगा)अमन बरोबर काय काय‌ बोलण झालं ते सांगत होती. पिहु तिच बोलण ऐकत स्वतः विचा‌र करते आपण लग्नाआधी विराट शी बोलल असतो तर त्यांच्या मनातल आपल्याला कळलं असते त्यांना हे लग्न मान्यच नाही. तेव्हाच मी निर्णय घेऊन मोकळी झाली‌ असते.

दिया,पिहुला,आवाज देत वहिनी...वहिनी कुठे हरवलात.

पिहु दियाच्या आवाजाने भानावर येते..अअअ काही नाही गं असच मग तुला मुलगा आवडला वाटतोयं..चेहरा सांगतोय तुझा,

दिपा लाजुन हसत:- काय वाहिनी तु पण ना. वीरा पण आली.

परत त्याच गप्पा रंगल्या.

विराट आज लवकर घरी आला.रुममध्ये येतो.पिहु दिसलीच नाही...बॅग मोबाईल बेडवरच पडला होता.मोबाईल बघुन त्याला सकाळच बोलण आठवलं (तुमच सगळ सामान,मोबाईल पण ठेवुन जाणार आहे.)चेंज करता करता त्याच्या चेहरयावर हलकीशी स्माईल आली. तो फ्रेश होऊन खाली आला.

दामोदर विराट आलेल्या पाहुण्यांविषयी बोलत होते.त्याला पिहु घरात दिसत नव्हती. आणि कोणाला विचारयच कसे😂 म्हणुन शांत बसला. खुप वेळ झाला ती दिसतच नव्हती.

रोहिणी रागातच :-गीता पिहुला बोलव ,चार वाजता गेली.सात वाजत आले अजुन गप्पा मारत बसली.

तेव्हा वि‌राटला कळलं पिहु आत्या कडे गेली.


आदित्य विराटच्या घरी येतो‌ पिहु पण आत्याच्या गेटमधुन घरात येत होती.दोघांची भेट गेटमध्येच झाली.

आदित्य बाईक वरून उतरत :- हाय पिहु...

पिहु थोडी घाबरतच इकडेतिकडे बघत होती.तिने फक्त स्माईल
केली (मागुन वीरा येत) ये हे आदी आज कस काय घरचा रस्ता ...ती त्याला टाळी देत बोलते.

आदि:- घर माझ आहे कधी ही येऊ शकतो ...

तिघे चालत घरात येत होते...वीरा चा कॉल आला म्हणुन ती थांबली पिहुच्या मागे आदि येत होता.

आदि:-हे पिहु आज लव्कर का आली लास्ट लेक्चर अंटेड कारायच होत तु.

पिहु चालत मागे वळुन :-काम होत म्हणुन आले.मला तु नोट्स दे उद्या

आदि:-नोट्स का ते तर आत्ता घे.तो सॅकमधुन काढुन देत‌ होता.

विराट हॉल मध्येच बसला होता.त्याच लक्ष गेलं

पिहुची पण नज‌र वि‌राटवर पडते.तिला तर घेऊ कि नको अस झालं होते.

आदि :- पिहु धर ,तो तिच्या हातासमोर धरतो.

पिहु एकदा‌ विराट कडे एकदा आदि कडे बघत‌ हळुच त्याच्या हातातुन घेत आदिला थँक्यू म्हणते‌.

विराट तर ब्लँक होत दोघांना कडे बघत होता.काय चाललय म्हणून
पिहु पटकन रुमकडे वळते..विराट विचार करत असतो हे दोघे कसे ओळखतात‌.

आदित्य वि‌राटकडे बघत:- हाय ब्रो अस म्हणत त्याला हग करतो.

वि‌राट हलकासा हसत:- त्याच्या पाठीवर थाप मारत बाजुला करतो.

हाय आंटी,आदि सुमन कडे वळतो.

सुमन हसत :-त्याच्या डोक्यावरुन हात फिरवते. पिहु परत येते.

सुमन:- आदि ही पिहु...(वी‌रा पण आत येते.)

वीरा जोरात हसत:- ,काय मॉम त्याला माहित आहे .दोघ एकाच क्लास मध्ये आहेत..तेव्हा विराटला कळते.

आदित्य पण जोरात हसत:- हाय‌ पिहु....

पिहु जराशी हसते.

सगळे गप्पा मारत होते.

आदि:- पिहु नोट्स मधले.काही कळलं नाही तर फोन कर ...

आदि अस बोल्याने विराट चमकुन पिहुकडे बघतो.

पिहु:-( हसत )हम्म ,बघते मी.

विराट थोड चिडतच :- तु इथे फक्त हलवा खायला आला आहे का??

आदि:- मग आंटीने माझ्यासाठी बनवला आहे.मी येणार म्हणुन तु असलं काही खात नाही..मग मलाच आहे ना अस बोलत तो,डोळे मिचकावतो‌.

सुमन विराटकडे डोळे मोठे करून बघत :- विराट काय तरी बोलत असतो.

विराट आट्या पाडत उठत :-आदी आवर लवकर वेळ मिळालं तर कामाच पण बघु आपण...

आदी:- हो रे येतो ना किती घाई ...असते तुला‌

( आदित्य शिकता शिकता वडिलांचा कंनशट्रक्शनचा बिझनेस ही बघत होता.)

विराट‌ निघुन जातो.

आदि:-आंटी दे लवकर नाही तर हा हिटलर मला हजम करुन देणार नाही.

सुमन हसत..धर

थोड्यावेळाने आदी विराट कडे जाऊन कामाच बोलत बसतो.थोड्यावेळाने आदि निघून जातो.


सुमन:- पिहु विराटला जेवायला बोलव.

पिहु मानेनेच हो म्हणत:- विराटला बोलवायला रुममध्ये येते.

विराट लॅपटॉप घेऊन बसला होता.

पिहु त्याच्यासमोर येत इकडेतिकडे बघत तुटकपणेच :- आईंनी जेवायला बोलवले.

विराट एक कटाक्ष टाकत( मनातच दुसरयाशी बोलताना तर हसत् बोलते त्याचा बाण आदीकडे वळत चालला आहे 😅) विराट काही न बोलता उठुन रागातच तिच्या समोरुन ताडकन निघुन जातो.

तो गेल्यावर पिहु ही त्याच्या मागेच येत (मनातच काय गरज आहे पिहु बोलायची ऐवढे घंमडी आहेत हा हु काय तोंडातुन निघतच नाही.) ती धुंदित त्या्च्या मागे खाली बघुन चालत‌ होती.वि‌राटचा मोबाईल वाजल्याने तो थांबत कॉल रासीव करत पायरयावरुन हळु जात होता.मागुन पिहुचा विराटला धडकुन पुढे तोल गेला. .त्याचा तोल चालला होता.त्याने स्वतःला सावरुन पिहुचा हात‌ पकडला तेव्हा तिच्या हातातल्या दोन तीन ‌बांगड्या फुटुन रुतल्या. पिहु खाली बघुन घाबरलेली होती. 😰😰

विराट तिला मागे ओढतो. हुळ जरा ..तो चिडतच बोलतो.

आहहह..माझा हात पिहु इवहळत बोलते.

विराट तिच्या हाताकडे बघत हात सोडला. ओहह सॉरी, मला लक्षात आले नाही. विराट काळजीच्या स्वरात बोलला.

पिहु हात पकडून त्याला रागातच लुक देत ‌खाली निघुन आली.

विराट खाली येऊन जेवायला बसतो.

पिहु किचन मध्येच होती तिने हात धुवुन राहिलेल्या बांगड्या पण सगळ्या काढत होती.

सूधा:- पिहु काय झालं तिने तिचा हात बघत विचारले.

काही नाही आत्या ते बांगडी फुटली.

सुधा हसत :-विराटला हळु हात धरायला सांगत जा.मग नाही लागणार.

पिहु :- बघा ना आत्या, नीट पण धरता येत नाही ती बोलुन गेली.पण सुधाच बोलणं लक्षात‌ येत ती दचकलीच ती आत्याकडे बघत आत्या तस नाही मी ...ती पुढे बोलणार कि रोहिणीने सुधाला हाक मारली.

सुधा हसत:- चल पिहु वहिनींला टाईमिंग चुकवला जेवणाचा तर अजुन बोलणी खावी लागतील.

दोघी बाहे‌र येतात.

सुमन:- पिहु ये बस ...

पिहु वीरा जवळ बसायला जात होती.सुधा तिला थांबवत पिहु विराटशेजारी बस ...ये ..तिने तिचा हात धरतच विराटच्या शेजारच्या चेअर वर बसवलं.आणि सुधा इकडुन विराट शेजारी
बसल्या.

पिहु कावरीबावरी होत इकडेतिकडे बघु लागली.विराट ही नरवस झाला. दोघांच्यात अंतर खुप‌ कमी होते.

सगळे शांत बसुन जेवत होते...

वीरा अचानक बोलत:- दादा,तु हनीमुनला कुठे गेला नाही अजून ...

हे ऐकताच पिहुला ठसका लागला.

विराट ने समोरचा ग्लास समोर धरला.तिने एका घोटात पाणी प्यायच चालु केलं.

विराट ने वीराकडे बघत :- जेवताना बोलु नये वीरा.

वीरा खाली बघुन हळुच सॉरी दादा म्हणाली.

दामोदर:- विराट जेवण झाल्यावर रुम‌ ये.

विराट :- हा बाबा.

पिहु ,आजी, सुमन थोड्यावेळ गप्पा मारत बसल्या .नंतर पिहु रूममध्ये जाऊन स्टडी करत बसली..लवकर कळत नसल्याने तिची चिडचिड होत होती.ती सारखीच लिहून कागद फाडुन टाकत होती...इइइइ किती जमनिंग आहे हे सगळ...अस कधी कळणार मला ...ती एकटीच बडबड करत रीड करत होती.

विराट रुममध्ये येतो...समोर पिहुने केलेला पसारा बघतच :-.हे काय आहे..विराट तिच्या समोर येत बोलतो.

विराटचा आवाज. ऐकुन पिहु एक नजर विराट कडे आणि एक नजर कागदांकडे बघते.

तो स्वतः सगळी कागदं उचलत होता ‌.ते बघुन ती अजुन चिडते.ती रागाने अजुन दोन तीन पान फाडुन टाकते.

विराट वर तिच्याकडे नजर फिरवत प्रश्नअर्थी नजरेने बघतो..ती चेअर वरुन उठत हे बघा मला आत्ता काहीच बोलायच नाही डोक आधीच ‌दु‌खतंय .मला माहीत आहे तूम्हाला शीस्त आवडते‌ मी नंतर‌ सगळ साफ करेन पण आत्ता मला तुमच्याबरोबर बोलून वेळ‌ वाया घालवायचा नाहीये .

एवढी चीडचीड होत असेल ना,थोड्या गप्पा कमी‌ केल्या ना .स्टडीसाठी वेळ‌ मिळतो. (पिहु दुपारी घरी आल्यानंतर. सगळा वेळ‌ असाच घातला होता हे त्याच्या‌ लक्षात आले होते.आता ही जेवण झालं तरी गप्पा मारत होती.)

(पिहुला ही कळलं)ती रागातच बुक उचलून गॅलेरीत जाऊन बसते.

विराट थोडासा चिडतच स्टडीरुममध्ये गेला.थोड्यावेळाने तो पाणी घेण्यासाठी बाहेर आला .पिहु अजुन बाहेरच बसली होती.
तो‌ गॅलेरीत जातो.तर मॅडम मस्त मोबाईल बघत बसल्या होत्या

.

विराट मागुन हलकासा खोकतो.ती दचकुन मागे बघत परत मोबाईल बघु लागली.

विराट तिच्या समोर येऊन :-ऑनलाईन क्लासेस आहेत ते जॉईन कर उद्या पासुन ...

पिहुचा चेहराच ‌खुलला काय ..खरच ती पटकन बोलून गेली.

तिच्या चेहरयावरचा आंनद वि‌राट बघतच राहीला.

खरच ‌खुप टेंशन आले मला डोकच काम करत नाही ..आदित्य ने दिलेत नोट्स पण काहीच कळत नाही...पण कोण घेते ऑनलाईन क्लास मला नाही माहीत.पिहु चेहरा उतरत म्हणाली.

माझा एक फ्रेंड आहे तो घेतो ..उद्यापासुन रात्रीचे नऊच्या नंतर सांगितले ...बघ गप्पा मधुन वेळ मिळत असेल तर ...ऐवढं बोलुन विराट आत आला

पिहु मनातच टोमणे काय सोडणार नाही,जाऊ दे माझ काम झालं ना बस अस म्हणत ती एक उडी मारत येईई...करते.

विराट तिच्याकडे नजर वळवतो.ती लगेच शांत होत आत येते.

गॅलेरीच दार ओपन ठेवणार आहे का ???

ती डोळे मिटून परत उघडत राग गिळत नाही म्हणत गॅलेरीची
स्लाईड ओढते.
.
.
.

.
पिहुला ऑनलाईन क्लासेस मुळे अभ्यासात हेल्प झाली...आता‌ ती रीलॅक्स झाली होती..मागचा पण सिलॅबस कव्हर होत होता...रात्री नऊ पर्यंत काम आवरुन रुममध्ये येत होती.विराट पण त्या वेळी तिला त्याचा लॅपटॉप देत होता.अकारा वाजेपर्यंत तिचा क्लास चालु असायचा. दिवसभर वेळ मिळत नाही म्हणुन विराट खास फक्त‌ तिच्या साठी ती वेळ सांगुन पर्नसल टुश्यन घ्यायला सांगितली. कॉलेज मध्ये तर आदित्य होताच तिला मदत कारायला त्यांची पण आता छान मैत्री झाली होती.

मीता (फ्रेंड):-आदि उद्या संडे आहे मस्त पैकी पिझ्झा खायला जाऊ ..

नील:- खरच ‌चल ना....

आदि:- हम्म जाऊ

सगळ्यांच ठरलं ...

पिहु शांत त्यांच बोलण ऐकत बसली होती.

गुंजन:- पिहु तु पण यायच ..

पिहु :- अअ मी नाही गं नको तुम्ही जाऊन या..

आदि:- काय ,तुला काय झालं अचानक

नको असच रे..

आदि हसत तिच्या कोपरयाला धक्का देत:- काय मग हिटलरचा आणि तुझा प्लॅन आहे का बाहेर जायचा...

पिहु नजर रो‌‌खुन बघते.

बर सॉरी ,तुझी मर्जी ....आदि कान पकडुन म्हणतो.

वीरा कँन्टीनमध्ये येते...वहिनी कधी आलीस ..

पिहु:- खुप वेळ झाला .

वीरा:-हम्म..

गुंजन:- काय पिहु तु पण चल ना मस्त मज्जा येईल गं...

पिहु:-गुंजन नाही जमत मला

वीरा:- कुठे ‌गं जायच वहिनी...

पिहु:-कुठे नाही गं

वीरा:-आदि नेक्स्ट विक मध्ये तीन-चार सुट्टया येतात...कुठे तरी वनडे ट्रीप काढु ना. तुमचा ग्रुप आणि आमचा ग्रुप काय म्हणतोस.दिपाला पण ये बोलते.

आदि:-बघु ‌ठरवतो....

वी‌रा आणि तिचे फ्रेंड्स ओके‌ करतात.
.
.
.
..
.

सुमन पिहुच्या रुममध्ये येते....पिहु,..

पिहु:-हा,आई

सुमन:-संध्याकाळी बाहेर जायच .आपले फॅमिली फ्रेंड्स आहेत‌ त्यांच्या मुलाची पहिली अॅनिवर्सरी आहे. तयार हो.

हम्म...

संध्याकाळी पिहुने पिंक नि‌यॉनी कलरची नेटची साडी घालते.सिंगल पदर सोडला....गळ्यात नाजुक लॉन्ग डायमंडच मंगळसुत्र घालते.डायमंडचे कानात छोटे टॉप्स हतात नियॉनी कलरच्या बांगड्या तर‌ एका हातात वॉच नियॉनी कलरची लिपस्टीक ,डोळ्यात‌ काजळ , छोटी स्टोनची‌ टिकली.हलकासा मेकअप केस वनसाईड घेऊन मोकळी सोडली होती...पिहु छान तयार होऊन खाली आली.

रोहिणी ,सुमन सुधा तयार होऊनच बसल्या‌ होत्या.

सुधा:- पिहु किती गोड दिसतेस‌ गं,सुधा तिला कानामागे तीट लावते.

सुमन हसते.

रोहिणी तोंड वाकड करत :- चला उशीर होईल.

दोमोदर -चौघी पार्टी मध्ये येतात. पिहुच्या चेहरयावर भिती जाणवतच होती.कधी ती अश्या पार्ट्‌यांमध्ये आलीच नव्हती. लोकांच येण जाण चालुच होते..

रोहिणी पिहुची सगळ्यांशी ओळख करुन देते. पिहु कोण काय बोलेल त्यांच्या प्रश्नांशी उत्तरे देत होती...

पार्टीमधली एक लेडीज: सुमन सुन छान शोधु आणली.विराटबरोबर छान जोडी शोभते.

सुमन रोहिणी हसतात.

रोहिणी :- मग विराटला आम्ही त्याला शोभेल अशीच सुन शोधणार.

पिहु चमकुन बघते पाहिल्यांदाच रोहिणी ला तिची तारिफ करताना बघितले. पार्टी मध्ये पिहुला तिने एकट सोडलच नाही ‌.
पण पिहुला कळलं होतं लोकांसमोर एक आणि घरात एक चेहरा आहे.

अॅनिव्हर्सरीचे सेलिब्रेशन होते.

रोहिणी:- सुमन विराटला कॉल कर हे विचारात होते कधी ‌‌‌येणार म्हणून.

सुमन:- हो करते.

तेव्ह‌ा पिहुला कळते विराट पण येणार आहे.

सुमन:-वि‌राट कधी येणार आहे.

विराट:-आलो गं मॉम आत्ता निघालो येतो.

सुमन:- निघाला ,येईल पंधरा वीस मिनीटात ..

रोहिणी :- हम्म .

त्या पार्टी मध्ये त्रिशा मोहिते सुध्दा आली होती....रोहिणी सुमनच्या समोर येत ...हाय रोहिणी आंटी ...

रोहिणी सुमन कडे बघुन परत त्रिशा कडे वरवर स्माईल करत :- कशी आहेस बाळा...

सुमन त्रिशाकडे कटाक्ष टाकत पिहु कुठे म्हणून नजर फिरवतात. सुधा पिहुला कोणाशीच तरी ओळख करून देत होत्या.

त्रिशा:- सुमन आंटी कश्या आहात‌ ती सौम्य भाषेत बोलली.

सुमन काही न बोलता‌ तिथुन निघुन गेल्या.त्रिश्याने तिच्या मूठी आवळल्या.

रोहिणी कुचक्या हसत:- तिच्या समोर जात आता काय फायदा लाडीगोडी लावुन त्रिशा .

त्रिशा पण कुचक हसत:‌हो चुकलं माझ मी चुकिच्या माणसाला जवळ‌ केले ..मला वाटलं विराट तुमच सगळ ऐकतोय.पण शेवटी सख्खी आईच भारी पडली.मोठमोठे लेक्चर देत होत्या ना तुम्ही विराट माझ्या शब्दाबाहेर नाही अस आणि तस..हुम्म् ..ती रागाने निघुन जाते.

रोहिणी त्रिशाकडे रागाने बघत:- तुला सुन केली असते ना माझ्या डोक्यावर मिरया वाटली असती...पण आता तर ही साधी सुधी पिहु चे रंग बाहेर पडत आहे.

विराट पार्टीमध्ये आला. त्याने ब्लॅक कलरचा स्लीम फिटींगचा
ब्लेझर घातला होता. तो आत येत होता मुलींच्या नजरा त्याच्यावर फिरतच होत्या.त्याने जाऊन कपलला अॅनिव्हर्सरी विश केलं थोड्यावेळ बोलून दुसरीकडे येत मॉमला बघत तिकडे चालला होता.तर दोन तीन मित्रांनी त्याला थांबवलं...
तो त्यांच्याशी गप्पा मारत होता.त्याच लक्ष पिहुकडे गेलं त्याला माहीत नव्हत पिहु येणाररआहे ...त्यात ती हसत बोलत होती.तर गालावरची खळी उठुन दिसत होती...त्याच लक्ष सा‌रखतिच्या कडे जात होते. दरवेळस तिच वेगळ रूप बघुन तो तिला निहाळतच राहिला.

मित्राने त्याला हाक मारली तेव्हा तो भानावर आला. व‌िराट त्यांना एक्सक्युज करत मॉमकडे गेला.

सुमन:- किती वेळ विराट

विराट हसत:-मॉम‌ काम होतं मी येणार नव्हतो पण तुझ्या समोर माझ तु चालु देणार आहे का.पिहु ने नजर वळवुन विराटकडे बघितले. तो दिसतच होता भारी ...विराट ची नजर तिच्यावर गेली.ती त्याला बघुन स्माईल देणार कि परत‌ तो‌ देत नाही तर मी कश्याला देऊ अस मनात बोलुन ती आत्यांशी हसत बोलत बसली.

विराट मनातच मी समोर आलो कि हसता येतच नाही.काय समजते काय माहीती.

रोहिणी:- विराट आम्ही जातो ,तु थांब आत्ताच आला आहे तर

विराट:- हम्म.

रोहिणी:- सुमन ,सुधा जाऊ चल,

सुमन:-पिहु तु थांब नंतर ये विराटबरोबर ...

पिहु:-अअअ आई ती वि‌राटकडे नजर वळवत मी पण येते.

विराट ‌‌रागात लुक देत (मनात जस काय खाणा‌र आहे हिला अस म्हणते.)

रोहिणी:- पिहु लोक काय म्हणतील.थांब थोड्यावेळ‌ दोघे या .
सगळे निघुन जातात.आता दोघेच राहिले होते .पिहुची एकाशी ओळख झाली तर गप्पा मारत‌ होती.विराट पण दुसरीकडे जाऊन बोलत बसला.

त्रिशा:- हाय विराट,ती ड्रिंक करत त्याच्या समोर येऊन उभी राहिली.तिला चढली पण होती.

व‌िराट काही न बोलता त्रिशाला इग्नोर क‌रत शांत त्याची ड्रिंक घेत होता.

वि‌राट बोलत‌ नाहीये म्हणून त्रिशाच्या डोळे भरले होते. तिची ड्रिंक
संपली म्हणुन ती वेटरला शोधु लागली.

पिहूने विराट कुठे म्हणुन बघितलं तर तो बोलत होता.त्याच्या हातात ड्रिंकचा ग्लास होता ते तिला खटकलेच .व‌िराटच ही लक्ष तिच्यावर गेलं तिच्या चेहरयावरुन तिला आवडले नसावे हे त्याच्या लक्षात आले..त्याने इकडे तिकडे बघत हळूच ग्लास ठेवुन दिला.

पिहु विराटच्या जवळ‌ आली :-रागात)मला घरी जायच

व‌िराट:‌- हम्म‌ ,हो जाऊ

नुकतीच ओळख झाली होती एक फ्रेंड‌ पिहु विराट च्या शेजारी येऊन पिहु ये स्लेफी घेऊ ...व‌िराट घरी घेऊन ये पिहुला फ्रेंड हसत बोलते.

विराट हसत:- हो ...

फ्रेंड:- एक स्लेफी घेऊ या..ते फोटो,काढतात. तुमचा काढु,का फोटो बघु विराट फोन.

विराट काय बोलाव कळतच नव्हतं त्याने त्याचा मोबाईल दिला
.
फ्रेंड:- हसत )थांबा दोघे मस्त पोज द्या .

त्या दोघांना काही कळतच नाही ..ते लाजत‌ घाबरत शेजारी थांबतात.पिहु अंतर ठेवुन थांबली होती.विराट तिच्याकडे बघतो.ती बघत सुध्दा नव्हती...

फ्रेंड:- पिहु अगं लाजते काय...विराट तु पण अहहह.

विराट तिच्या कमरलेले हळुच स्पर्श करत जवळ ओढले .तिच्‌ा नाजुक कंबरेले हात लावताना तो दोन सेंकद‌ फ्रिज
झाल्यासारख्या उभा होतो..

न कळत झालेल्या स्पर्शाने पिहुच्या अंगाला सरकन काटा आला.ती त्याच्याकडे बघु लागली.

विराट हसत तिकडे बघत म्हणुन इश‌ारा केला.

ती वरवर हसत पूढे बघू लागली.

त्रिशाला दोघांना अस बघुन डोळे रागात‌ आग ओकत‌ होते.ती एकावर एक ड्रिंकचे ग्लास संपवु लागली.

फ्रेंड:- मस्त, हे धर विराट मोबाईल चल बाय,पिहु विराट
ते दोघे पण तिला बाय करतात.

पिहु ने रागानेच त्याचा हात झटकला .ती बोलणा‌र कि जोरात ओरडल्याचा आवाज आला दोघ तिकडे बघु लागले.

त्रिशा वेटरला ओरडत होती...तिला,अजुन ड्रिंक हवी होती. दोघे तिघे जण त्रिशाला संभाळत‌ होते पण ती कोणालाच ऐकत नव्हती.पिहुने पहिल्यांदाच असा तमाशा बघत होती.त्यामुळे ती घाबरली होती.तिने नकळत विराट च्या‌ हाताला विळखा घालत घट्ट पकडुन ठेवला.

विराट ने पिहूकडे बघितलं ती घाबरलेली‌ दिसत होती.

त्रिशाच लक्ष विराट कडे गेले ती अडखळत त्याच्याकडे जाऊ लागली.ती विराट च्या जवळ जात हात लावणार तसा तो लगेच मागे सरकला.त्रिशा खाली पडली.

पिहूने तोंडालाच हात लावला .पिहु त्रिशाला उठवणयासाठी पुढे जात होती.

विराट ने पिहुचा हात पकडत मागे घेतलं ..

पिहु :अहो..

विराट पिहुकडे रागाने बघतच हात पकडुन पार्टीतून निघुन गेला.

गाडी जवळ आल्यावर त्याने तिचा,हात सोडुन गाडीत बसला.
पिहुला कळलं विराट चिडला पण का ते माहित नाही. ती गाडीत बसली‌.

विराट पिहु वर ओरडत:- तुला डोक आहे कोणालाही हेल्प
करायाची असते का..

पिहुला,तो पहिल्यांदाच ओरडला होता तिच्या डोळे पाण्याने भरले.
तिच्या डोळ्यात पाणी बघुन तो शांत होत तिच्याकडे एकटक बघत हळुच आय मीन ...म्हणजे ड्रिंक केलेल्या लोकांजवळ जाऊ नये .
मला अस म्हणायच होतं. हार्मफुल झालं असते.

पिहु डोळे पुसत इकडेतिकडे बघत सॉरी ती मूलगी अशी अचानक पडली म्हणुन मी..ते ती शांत बसली. विराटच म्हण तिला पटलं होतं..पिलेल्या लोकांच काही खर नसतं काहीही करतात.

विराट ने कार स्टार्ट केली.

घरी यायला उशीर झाला होता.दोघेही फ्रेश होऊन झोपतात.


रात्री यायला उशी‌र झाल्याने पिहु अजुन झोपली होती.संडे असल्याने विराटला ही उशीराच जाग आली होती.तो स्लाईड उघडतो...पिहुला बेडवर अजुन झोपलेले बघुन त्याला कालच आठवत होते .

त्याने तिच्या कमरेला हात लावुन ओढलेले ,तिने त्याचा पहिल्यांदाच हात पकडला होता. त्यावेळेस त्याला वेगळच फिल झाले हे जाणवत होते पण का ते कळत नव्हते.. झोपेत पण तिचा शांत चेहरा निहाळत होता .ती चुळबुळ करत कूस बदलते. तेव्हा तो दबकतो(मनातच विराट काय तरी विचार करत बसतो..तिचा आणि आपला काही संबंध नाही ,स्वतःशीच बडबड करत) तो वॉश रुममध्ये जातो.

.
.
पिहुचा मोबाईल वाजल्याने पिहु झोपेतच मोबाईल कानाला लावत हॅलो बोलते.

रेवती:‌पिहु...

पिहु झोपेतच:- हा मम्मी.‌

रेवतीला अंदाज आलाच पिहु अजून झोपेतच आहे.पिहु उठ बाळा‌ दहा वाजत आले ..

पिहु हळुच डोळे उघडून समोरच्या घड्याळ्याकडे बघते.तिचे डोळेच ताट होतात...ती पटकन उठुन बसली...मम्मीईईई..ती जोरताच बोलली.

रेवती तिचा आवाज ऐकुन दचकुन पिहु काय झालं ...

मम्मी दहा वाजले कस मला जागच‌ आली नाही आता खाली कस जाऊ कोण काय बोललं तर‌ तिची कंटुनिसली बडबड चालुच‌ असते.

अरे सोनु एवढ काय दररोज त‌र उठती ना लवकर ..जा आवर नंतर फोन कर.

पिहु हाह हहा मम्मी पटकन फोन करुन तिची धावपळ चालु झाली.ती पळतच बाथरूममध्ये जात होती दार‌ आतुन लॉक होते...ती जोरात दारावर थाप मारु लागली.अहो दार उघडा...ती स्वतःशीच बडबड करत :- अशी काय‌ शाही अंघोळ करतात काय माहीत तिने परत दार वाजलवले पिहु दात ओठ ‌खातच अहो दार उघडा.

विराटला कळलेच नाही अस काय झालं ..तो घाबरुन दार उघडतो..काय झालं ...तो रागातच बोलला.


पिहु त्याच्याकडे बघत डोळे मोठे करत जोरातच किंचाळत वळाली .तो टॉवेल वर होता.

पिहु चिडतच:- अहो तुम्हाला कळतं का... अस कोण येत का.

विराट चिडुन अस म्हणजे ,स्वतःच कितीवेळचा दार वाजवते .जस‌ काय भुकंप‌ येणार आहे.

तुम्ही बाहेर या‌‌ पहिले पिहु डोळ्यावर हात ठेवत म्हणाली.मला उशीर होतोय.

विराट रागाने तिच्याकडे बघत बाहेर येतो.
.

ती आत जाऊन पटकन दार आदळते.

विराट चिडतच बडबड करत माझ्याच रुम मध्ये माझच चालत नाही.बाथ पण सुखाने घेऊ देत नाही. स्वतःच आवरून घेतो.

पिहु पटकन बाथ घेऊन आवरुन चेजिंगरुममधुन बाहेर ओले केस पुसत येत होती.

विराटला पिहुचा राग आला होता, तिला बघुन त्याचा रागच गायब झाला.नुकतीच अंघोळ करुन आली होती तर तिच्या पर्यफ्युमचा सुंधग सर्वत्र रुममध्ये पसरला होता.. तो सुगंधाने बेभान झाला होता...तिला बघण्याचा मोह त्याला आवरता येईना... चोरुन ्का होईना एक दोन तिच्याकडे बघितलंच

पिहु तिच घाईघाईत आवरत होती,तिच मिरर मधुन विराट कडे लक्ष गेलं पिहुला त्याची नजर ‌थोडी वेगळी वाटली .ती स्वतःची साडी नीट करत घाबरतच खाली बघुन तिच आवरत होती.


विराट ला तिला ऑकवर्ड फिल होतय‌ हे लक्षात येताच तो‌ रुमच्या बाहे‌र गेला.तो बाहेर गेल्यावर पिहुने मोकळा श्वास सोडला.


पिहु आवरुन खाली आली ....तिला तर‌ आता भिती वाटत‌ होती दहा वाजुन गेले होते....रोहिणी,दामोदर विराट नाश्ता करत होते..

रोहिणी ने तिच्याकडे नजर वळवली पण काही बोलली नाही .पिहु रोहिणी कडे न बघताच किचन मध्ये निघून गेली.

सुमन किचनमध्ये होत्या.

पिहु घाईतच आई आज जागच आली ..परत नाही असा उशीर ..

सुमन तिला थांबवत अग हो हो श्वास तर घे ..कधी तरी उशीर झाला तर काही फरक पडत‌ नाही तस ही आज संडे सगळ्यांच निंवात चालु ...

आई द्या,मी करते ...सुमन विराटसाठी ज्युस बनवत होत्या पिहुने हातातुन घेऊन करु लागली.

सुमन:-राहु दे करते मी तु कर नाश्ता ...

पिहु:- करते आई नाश्ता ह्यांना ज्युस देऊन बसते...

सुमन पण काही न बोलता फक्त हसल्या

पिहु:- आई मोठ्या आई मला काहीच बोलल्या नाही कस काय..त्यांना आवडत‌ नाही ना अस लेट उठलेले पिहु ब्लँक होत म्हणाली

सुमन हसत :- हो नाही आवडत‌ ताईंना ,सगळी कामे वेळेत हवी..विराट असल्यावर‌ ते बोलत नाही कोणाला ...जास्त ...

पिहु चकित‌ होत बघते....

सुमन:: पिहु दे इकडे मी देऊन येते तु नाश्ता कर ‌


विराट चा फोन येतो तो फोन रीसीव करत अर्धा तासात येतो अस बोलुन फोन ठेवुन देतो.

सुमन:- विराट आज तु सुट्टी आहे ना मग कुठे ??

विराट:- सुट्टी आहे ,म्हणुन तर बाहेर चाललो मानव आणि संकेत बरोबर .

सुमन:- विराट मी काय म्हणते,आज सुट्टी आहे ना मग पिहुला बाहेर घेऊन जा तिला पण चेंज ....

विराट :- मॉम तिला कुठे जायच असेल तर ती जाऊ शकते ...उगाच तु मला कुठलेही बंधन लादु नको अस बोलून तो निघुन जातो.

पिहुने ऐकले असते तिला आतुन वाईट वाटत होते..पण राग ही तेवढाच येत होता.

व‌िराट आवरुन आला ...त्याने ब्लॅक कलरचा टी शर्ट लाईट ब्लु जीन्स गॉगल त्यात दिसायला हँडसम पिहु एक टक बघत राहीली...ऐवढे आवरुन आलेत पण ‌खरच ...तिच्या मनात आता वेगळेच आले खरच हे मित्रांबरोबर चालले का कोण असेल ह्यांच्या जीवनात कुठली मूलगी वैगेरे तिला घामच फुटला ...खरच मी विचार करते तेच असेल तर ....परत स्वतःच्या मनाला समजावत‌ असलं तर काय झालं ...त्यांची लाईफ काही ही करु दे.पण हे काय पटत नव्हते...पिहुचा चेहरा उतरला होता. गीता आणि ‌पिहु दुपा‌रच्या स्वंयपाकाची तयारी करत होत्या....पिहुचा मोबाईल रिंग करत होता...

पिहुने बघितला तर‌ आदित्याचा होता.

तिने रिसीव करत हा बोल‌ आदि..

तु येणार आहे का लंचला ...

नाही रे मी काल सांगितले ना..तुम्ही जाऊन या.

.
पिहु एक दिड तास काढु शकत नाही ‌..सगळे येणार

पिहुला ही जायची इच्छा भ‌रपूर होती..घर कॉलेज करुन ती पण बोर झाली होती..सगळे कूठे ना कुठे जात होते...लग्न झाल्यापासुन कुठे बाहेर नाही मूूूव्ही नाही ,एन्जॉयमेंट तर विसरुनच गेली होती...आदि मी थोड्यावेळाने सांगते.

ओके बाय..

पिहू सुमन कडे गेली..आई ...

हा ये ना ...

आईं थोड बोलायचे होते.

हा बोल ना..

ते आज संडे आहे तर फ्रेंड्स ने प्लाॅन केला बाहेर जायचा..सगळे चल म्हणता‌येत ...जाऊ का मी ...


हो जा ना विचारते का ....(आईंना ही कळत‌ होते पिहुला एकटेपणा खुप जाणवतो...व‌िराट कधी साध दोन शब्द‌ नीट बोलत‌ नाही ..तर बाहेर फिरायला घेऊन जायच तर दुरदु‌र पर्यंत चिन्ह नाही.आज काम नसून तरी कधी मनात येत नाही स्वतः मस्त आज कुठेतरी निवांत फिरायला गेला मित्रांबरोबर ...बोलताना पिहुचा विचार सुध्दा आला नसेल का सुमन स्वसःशीच बोलत होत्या.

पिहु ने ठरवलं जे होयच ते होईलं तिला ही आता कुठेतरी विराट च्या वागण्याचा राग येत होता.तिने मस्त ऑरेंज कलरचा स्लिवलेस
टॉप ब्लॅक लेगिंग मेकअप हलकासा हाय पोनी घालुन ती निघून गेली.बाहेर आल्याव‌र तिला फ्रेश वाटत‌ होता..व‌िराट‌ला जास्त मनावर हवी होऊन द्यायच नाही तिने ठरवलं...कुठेतरी मनाचा कोपरा दुखत होता.विराटला,तिच्याशी बोलायला इंटरेस्ट नव्हता.हे त्याच्या वागण्यातुन तिला जाणवत होते....

सगळे एका ठिकाणी जमले आणि एकत्रच गेले..आज तिला रिलॅक्स फिल वाटत होते..सगळे गप्पा जोक्स करत‌ लंच करत होते...

सगळ्यांनी फोटो काढले...आदी ने लगेच टॅग करत फेसबुक इनस्टावर टाकले....

इकडे विराट मित्राबरोबर बाहेर गेला होता..त्याला नोटिफिकेशन आली म्हणून त्याने मोबाईल बघत‌ चेक केला...
बघुन त्याचे डोळे चमकलेच ..त्याने परत‌ झुम करत बघितले तर‌ पिहुच आहे. तिचे ते बिनधास्त हसण गालावरची खळी हे बघण्यातच गुंग झाला...आता पर्यंत पिहुचा विचार नव्हता त्याच्या डोक्यात पण पिहुचे फोटो बघुन तो‌ थोडा अस्वस्थ झाला....एका फोटो मध्ये आदिने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता....त्याला आदि बरोबर पिहुच बोलण सगळ आठवुन जेलस फिल होऊ लागलं..विराट घरी तीनच्या आसपास आला .रुममध्ये पिहु नव्हती म्हणजे अजुन ती आली नाहीये हे त्याला कळलं .विराट
फ्रेश होऊन बेडवर पडला .खुप दिवसानी तो बेडवर झोपला होता..पडल्या पडल्या त्याला झोप‌ लागली.

.

.
पिहुला घरी यायला चार वाजले.सगळ घर शांत होते..ती इकडे तिकडे बघतच रुममध्ये गेली. विराट झोपला होता.तिने हळुच दार लावले ...फ्रेश होऊन साडी घालुन आली. तिच्या बांगड्याच्या आवाजाने विराटने हळुच डोळे उघडत तिच्या कडे बघितले.तो पर्यंत ती बाहेर निघून गेली.

तीन चार दिवसांनी रात्री,जेवण झाली .

दामोदर:- विराट ,पुढच्या फ्रायडेला माझ्या फ्रेंड पव‌ार त्याचा
,मुलगा विक्रमच लग्न आहे ..आपल्याच रिसोर्ट मध्ये मी सिंगापूरला चाललो तर तू स्वतः जाऊन बघ दोन दिवस आधीच निघ.

विराट:- हो बाबा,मी वेनेस्डे लाच इथुन निघतो.


वीरा:- दादा आम्ही सगळे वनडे ट्रीप ला जाणार आहोत ...जाऊ ना ...

विराट ने कूठे कोण कोण जाणार विचारले.कस जाणर सगळी चौकशी केली.

वीरा :- मॉम‌ वहिनीला घेऊन जाऊ का..,दादा पण नाहीये
मग वहिनीला ही बोर होईल...

विराटने हे ऐकताच पिहुकडे बघितले...पिहु काय म्हणार हे ऐकायच होते ..कारण आदि ही‌ होता..

सूमन:- पिहु तुला जायच का...


पिहु:- माझ काही नाहीये...कस ही

विराट ला आता मॉम काय‌ म्हणते..याची हुरहुर लागाली

सुमन:- विराट तिला कॉलेजला सुट्टया आहेत .लग्नाला तर‌ मला आणि ताईंना जमणार नाही मग तुझ्याबरोबर घेऊन जा दोन दिवस सुमन हळुच बोलल्या.पिहुनु ऐकले तर. हा नाही बोलला परत‌
तिला वाईट वाटेल ...आणि विराट च उत्तर त्यांना माहित होते.पण एकदा विचारव म्हूणन त्या बोलल्या

विराट विचार करत :मी नाही बोललो तर‌ मॉम‌ वीरा बरोबर जा म्हणेल.त्यात तो आदि एवढा चिपकु आहे ...तसा मनाचा साफ आहे पण खूपच फ्रेंडली आहे हे माहित होते...परवाचे फोटो बघुन तर त्याला जेलेस फिल होत‌ होते.सुमन ने व‌िराटला आवाज दिला तसा,तो भानावर आला.

सुमन:- चिडत मी फक्त विचारले राहु दे कळलं तुझ उत्तर .. त्या़नी
पिहुला हाक मारली पिहु...तु‌..पण

विराट मॉमला थांबवत मॉम वेनस्डे ला निघायच सांग अस बोलून तो निघून जातो.

मॉमला विराट बोलला त्याच्यावर विश्वास बसत नव्हता...त्यांचे डोळे आंनदाने पाणवले होते.

पिहु:- हा‌ आई.

त्यानी पिहु कडे हसत:- लग्न आहे गं फॅमिली फ्रेंडच्या मुलाच व‌िराट बरोबर तु जा मला आणि ताईंना तर जमणार नाही ..

पिहुला तर‌ काही च कळलं नाही.अ..अ..मी

हो गं दोन दिवस आधीच निघाव लागेल .लांब आहे आणि आपल्याच रिसोर्ट मध्ये आहे तर विराटला लवकर जायला सांगितले बाबांनी

पिहुला अस अचानक जयाच म्हुणन पुर्ण ब्लँक झाली होती.ती रुममध्ये आली ...व‌िराटच्या समोर येत मी येणं गरजेचे आहे का ..म्हणजे ते मी..ते..तिला तर‌ काय बोलाव कळतच नव्हतं

विराट ती अस बोलल्याने रागच आला... मी तुला कुठे नेऊन सोडणार असल्यासारखे बोलते...

ती त्याच्याकडे बघून चिडत...मी अस‌ बोलले नाही. मला तुमची कंपनी बोरींग वाटते‌ बस...

ओहहह ...मला ‌खुप मज्जा येते ना तुझ्याब‌रोबर फिरायला ...बॅग भर आपल्याला लवकर निघायच आहे.
.

हुम्म पिहु निघुन जाते....

ती गेल्यावर‌ वि‌राट विचार करतो..मी कस काय तयार झालो. बरोबर घेऊन जायला त्याला त्याच कळलं नाही..
.





.क्रमशः