Reshmi Nate - 10 books and stories free download online pdf in Marathi

रेशमी नाते - १०

विराट देवेशचा फोन होता. अर्धा तासात येतोय बोलला.-मानव

विराटने मानव कडे बघितले.हम्म दोन तासाच्या सगळे मिटींग कॅन्सल कर ...

विराट ‌तुला काय वाटत देवेशला का भेटायच असेल.

आय डोन्ट नो,..(त‌ो थोडा विचार करत मानव कडे बघतो,)बहुतेक परत माझ्या बरोबर डील साईन करायची असेल..

तो परत तीच डील घेऊन आला तर मानव थोड्या शंकेतच विचारतो.

मला अजुन ती पाटर्नर शिप कुठल्याही किंमतीत हवीच आहे .

विराट तु विचार कर .मागच्या वेळेस त्याने कंडीशन ठेवली होती.आणि आता परत कुठली दुसरी ठेवली तर तु तयार होणार...

विराट हसतो...मानव बिझनेस करताना घाबरत करायचा नसतो.मला जे हवे ते मी कुठल्याही परीस्थितीत मिळवुनच राहतो.आणि मला माहीत होते.देवेश कधी तरी फोन करणारच ...
.
.
.
.

थोडयावेळाने देवेश येतो.

हे..विराट हाऊ आर यु -देवेश

माझ सोड तु कसा आहे ‌.आणि मुद्द्याच बोल माझ्याकडे वेळ नाहीये- विराट

देवेश हसतो ,का दुसरया गोष्टी काढायचा नाही का किती दिवसानी भेटतोय हसून तरी बोल यार ...

विराट टेबलावर कोपर ठेवुन हात एकमेंकानामध्ये गुंफवतो.
आपली मैत्री तू तोडली मी नाही ...

हो रे बट सॉरी,यार शेवटी बहिण महत्वाची आहे,तिच दु:ख बघवलं नाही..म्हणून मी जे येईल ते तुला बोललो.

विराट त्याला थांबवतो..झालं बोलुन ,इथे जर त्रिशा बद्दल
बोलायला आला असेल तर तु जाऊ शकतो, विराट ने हातानेच दाराकडे इशारा करत बोलला

देवेश बोलायचा थांबतो.मी ऑफर घेऊन आलोय‌,नविन पार्टनरशीपीच तुला माझी जमिन हवी आहे ना ,त्यात मला पार्टनर शिप हवी मंजुर आहे का तुला....

विराट विचार करतो...पार्टनर शिप माझ्याबरोबर‌ हहह..पण मझी एक अट आहे.

देवेश त्याच्याकडे बघतो ,अट विराट तु वेडा आहे त्या जमिनीच्या मागे..आणि तु.

अ...अहह.आधी होतो,आत्ता तु स्वतः आला आहे मी तुला बोलवलं नाही हे तुझ्या डोक्यात‌ घे-विराट
.

यावर देवेश शांत बसतो....काय अट आहे.

एक मत नसेल तर लास्ट डिसीजन माझा असेल..

वॉट,

आय नो तुला स्वतःच ‌खर करायच असते...पण ऑलरेडी तू खूप वेळ घेतला आधीच जर स्वतःच्या डोक्याने चालला असता तर .सोड मागच काढुन काहीच फायदा नाहीये,(विराटला माहीत आहे देवेश चा स्वभाव तो त्रिशाच जास्त ऐकतोय म्हणुन त्याने ही अट घातली)

देवेश विचार करत -ठिक आहे....

विराट हलके हसतो,...

देवेश चेअर व‌रुन उठुन त्याच्या समोर हात करतो .विराट ही उठुन हात पुढे करत मिळवतो..

विराट मानवला बोलावुन कॉन्ट्रंक्ट पेपर करायला सांगतो.

भेटु लवकरच -देवेश

हम्म -विराट

.
.
.
.देवेश घरी आल्याव‌र त्रिशाला सांगतो,त्रिशा तुझ्यामुळे मला त्या विराटच्या समोर झुकाव लागतयं तो हात टेबलावर मारत बोलतो.

हो कमॉन बो,तु तुझ्या बहिनीसाठी ऐवढ करु शकत नाही का,

त्रिशा काही मिळणार नाहीये तुला

ब्रो मिळणार मला विराट त्याच लग्न फक्त सहा महिन्यांच आहे नंतर त्याला कस माझ बनवायच ते मला माहित आहे,

त्रिशा पण..

ब्रो मला विराट मिळाला नाही तर मी जीव देईन सांगुन ठेवते,त्रिशाचे डोळे काटोकाट रागात भरले होते...

देवेश तिला जवळ घेतो.विराट फक्त तुझाच आहे ...तु शांत हो,जेव्हा विराटच्या लग्नाची बातमी मिळाली तेव्हा तिने जीव घेण्याचा प्रयत्न केला होता.त्यामुळे देवेश सगळं शांतीत घेत होता.

विराट रात्री घरी येतो...पिहु त्याच्यासाठी जेवायची थांबली होती.

पिहु त्याला जेवा‌यला वाढते...ती ही बसते.

पिहु तु का थांबली जेवन करुन घ्यायच होते.

भुक नव्हती मला ती काही तरी सांगायच म्हणुन सांगुन मोकळी झाली.दोघेही गप्पा मारत जेवण करतात.
..
.

.
.
विराट आज देवेश आला होता तु बोलला नाही -दामोदर

हा बाबा सांगणार होतो

हम्म ,काय म्हणत होता-दामोदर

मागची डील घेऊन आला होता.पण आत्ता त्याला पार्टनरशीप हवी आहे .मी हो बोललो

का‌य‌,पाटर्नरशीप ..

हो.

(दामोदर‌ विचार करतात )..

बाबा आपल्याला काही लॉस होणार नाहीये त्याच्या पाटर्नरशीप ने तूम्हाला काय वाटते.

विराट तु निर्णय घेतला आहे विचार करुनच घेतला असेल .ठिक आहे .त्याने मागचा काही विषय काढला नाही ना,

नाही...

हम्म‌,जा झोप रात्र झाली आहे.

गुडनाईट बाबा ....

विराट रुममध्ये येतो.पिहु फ्रेश होऊन मिरर मध्ये बघून डोक्याच बँडेज काढत होती.ती घाबरत काढु कि नको काढु कि नको चाललं होत.

विराट तिच्या मागे येऊन थांबतो...पिहु

हहह,पिहु मिरर मधुन बघत बोलते.

मी हेल्प करु का

नको ,मी करते.

तो तिचा कोपरा पकडुन स्वतःकडे वळवतो.

अहो!!!!

.
शुशssssभिती तर किती वाटते आणि माझ मी करते.तो‌हळूच तिच्या कपाळावरची बँनेज काढुन तिची ड्रेसिंग करत होता....दुखत असल्याने डोळ्यातुन पाणी येत होते.तिने घट्ट डोळे झाकले.होते

पिहु दुखतय का त्याने काळजीच्या स्वरात विचा‌रले.

हहहं ,नाही..मला..ते

त्याने तिला हळुच ड्रेसिंग करुन दिली....झालं डोळे उघड.तिने हळुच डोळे उघडुन मिरर मध्ये बघितले..

जखम भ‌रत आली आहे....

हह पण मार्क राहील ना,😥

🙄 हहह,... नाही राहणार बघु ना, कळेल नंतर‌

मला वाटतंय‌ रहणार‌ त्याच मार्क कस दिसेल🤕

विराट 😓😓 (मनातच बोलतो कोणाच काय तर कोणाच काय) पिहु ऐवढ नाही दिसणार .झोपायच नाही का दहा वाजुन गेलेत ..

हा ‌,झोपणारच होते.ती फस्टेड बॉक्स मध्ये सामान ठेवते...

विराट बेडवर बसणारच कि पिहुचा मोबाईल बेडवर असतो तिला मेसेज येत होते.ते ब्लिंक होत होते.आदीच नाव येत होतं..

विराट रागातच स्वतःचा मोबाईल हातात घेतला आणि आदीला कॉल लावून गॅलेरीत गेला.

.
आदीने फोन उचलला .विराट तु ऐवढ्या रात्री ..

का ...करायचा नाही का,..तु जसा रात्रीचे कोणाला ही मेसेज करतो ते तुझ्या ईमेजला शोभत नाही आदी विराट दात ओठ ‌खाऊन रागातच बोलतो.

आदीच्या लक्षात येताच विराट तु वेगळा अर्थ काढतो‌..पिहुने फस्ट मेसेज केला मी आता बघितला त्याचा रिप्लाय दिला..आणि ऐवढ हायपर हो‌यची गरज नाहीये तु चेक कर मी फक्त तिला नोट्स सेंड केलेत.आणि मला माझ्या मर्यादा माहीत आहे ....पिहु फक्त माझी चांगली फ्रेंड आहे ..

विराट कॉल‌कट करतो.आत बघतो तर पिहु मोबाईल घेऊन बुक्स घेऊन बसली होती.विराट सोफ्यावर बसतो..त्याला आदीला अस डायरेक्ट बोलल्याच फिल झालं ...तो आत येतो...पिहु उद्या कर झोप हहह

हा आदी पण ना ,किती लेट पाठवतो.पिहु चिडतच बोलते.

त्याने ब्लँकेट ओढली आणि आडवा होतो..

पिहुने सगळे बुक्स ठेवुन दिले आणि ती ही बँल्केट घेऊन आडवी झाली विराट विचार करत होता.ती त्याच्याकडे वळुन बघते काय‌ विचार करताय. ,झोप येत नाही का..

तो तिच्या कडे बघुन गालात हसतो..काही नाही असच

पिहु पण हसते, सकाळ पासुन धावपळ करता थोडी तरी काळजी घ्या तुमची किती कामाचा लोड घेतात.सगळ आहे तुमच्याकडे तरी पण ..ती बोलायाच थांबते

विराट हसत,माणसाला जेवढ आहे त्याच्या दुप्पटच हवे असते.आकाशात झेप घेतली खाली पडायाची भिती वाटते .

हम्म,

कॉलेज पुर्ण झाल्यावर‌ काय करणार...विचार केला करि‌यरचा ,

पिहु विचार करत -नाही केला‌...पिहुचे डोळे बारीक होत होते..

विराट गालत हसत झोप आता..

हम्म ,ती लगेच डोळे झाकते.विराट कितीवेळ तिच्या चेहरा निहाळत होता...आज त्याच्या मॉमनंतर कोणी काळजी केली ती पिहु होती.
.
.
.
.

सकाळी पिहु विराटला ब्रेकफास्ट रुममध्येच घेऊन आली .तो घाईतच त्याच आवरत होता.

पिहु त्याच्या समोर‌ ज्युसचा ग्लास धरून उभी होती..अहो किती घाई असते.पहिले ज्युस घ्या.तिने त्याच्या हातातली टाय ओढुन हातात ग्लास दिला..

पिहु बघु इकडे, तो वैतागत बोलु लागला.

पिहु मागे हात घेत -हा देते ज्युस प्या किती वेळ झाला
आणला.कुठे फाईल्स बघ ,कुठे पेपर्स चेक कर असलच चाललं आणि आवरुन झालं कि तसच निघुन जायच .तीन चार दिवस झाले बिना ब्रेकफास्ट करताच जाता .

तो हसत थोड ज्युस पितो कि त्याचा मोबाईल वाजतो. तो ग्लास ठेवुन कॉल रिसीव करतो पिहु डोक्यालाच हात लावते.

अहो,पिहु जवळ जाते.विराट बोलत असल्याने तिच्या ओठांवर बोट ठेवतो.आणि इश्यारानेच शांत हो म्हणतो.

पिहु लांब सरकुन ज्युस ग्लास त्याच्या ओठांसमोर धरते ,तो चेहरा फिरवत बोलतो.पिहु जवळ जाऊन ग्लास परत जवळ आणून इश्यारानेच पी बोलते.तो हाताने ग्लास सरकवतो ज्युस त्याच्या अंगावर सांडणार कि विराट मागे सरकतो..तो तिच्या रागात बघतो...तो बोलुन झाल्यावर फोन ठेवून देतो..

पिहु काय केलीस तु..तो गंभीर चेहरा करत तिच्या थोड जवळ येऊन बोलतो.

पिहुचा चेहराच उतरतो,... सॉरी,ती हळूच म्हणाली.हे ध‌‌रा ,तिने पटकन त्याचा टाय ‌ दिला.

त्याने टाय घेऊन गळ्यात घातला.तिच्या कडे रागात बघत होता.ती मान खाली घालुन चालली होतीच कि त्याने तिचा हात पकडला.

पिहु‌ मागे वळून बघितली...खरच सॉरी पण खराब झाला नाही ना,...(तो ही तिची मज्जा बघत असतो.)आणि जोरात हसतो,

.
पिहु ब्लँक होते.

मी तुला खाणार आहे का ऐवढ घाबरायला ..एकदम फनी वाटतं तु अशी घाबरली कि ..

पिहु रागात त्याच्याकडे बघते ,तुम्हाला खुप मज्जा येते का?मी
घाबरलेली..

तो ज्युसचा ग्लास तिच्या हातातुन घेतो.आणि सगळ संपवुन तिला देतो... झालं तुझ्या मनासारख जाऊ का ,

ती नाक मुरडुन ग्लास घेते....

परत एकदा कर तो ब्लेझर घालत तिला विचा‌रतो,

काय ....

अगं रागात नाक मुरडते ते गं ..😁

तुम्ही ना,😣मी बोलणार नाही ती रागातच ट्रे़ उचलून रुमच्या बाहेर निघते.‌

तो ही लॅपटॉप बॅगेत टाकून तिच्या मागे निघतो.पिहु लिसन

ती वळुन बघते काय,

तो तिच्या जवळ येतो.

पिहु डोळ्यानेच काय म्हणून विचारते.

तो अलगद पोटाला स्पर्श करतो, त्याच्या गार हाताचा स्पर्श होताच पिहु पोट आत घेते ,त्याने हसतच कमेरला खोचलेला पदर काढुन हळुवार हात काढुन निघुन जातो,

विराट गाडीत बसल्यावर पिहुचा चेहरा,आठवुन हसत होता...

विराट ने अचानक स्पर्श केल्याने पिहु स्तब्ध ब्लँक उभी होती...ती स्वतःला सावरुन इकडेतिकडे बघते,कोणी बघितलं का तर रोहिणी समोरच असते..पिहु दचकुन रोहिणी कडे न बघताच खाली निघुन जाते.ती लाजुन लाल झाली होती.ती स्वतःशीच हसत होती.

रोहिणी बघुन विचारातच पडते‌,विराटला नेमके काय हवयं काही कळतच नाहीये.

पिहु विराट ने काय केलं का...सुधा हळुच पिहुच्या कानाजवळ येऊन बोलतात.

पिहुच लक्ष नसल्याने ती लाजुन मानेनेच हा म्हणते.नंतर ती भानवर येत सुधाकडे बघते

काय ,..हहह

अ...अअ नाही ती पटकन किचन मधुन पळुन जाते,सुमन सुधा तिलाच हसत होत्या.

सूधा तु का तिच्या मागे लागत असतेस गं -सुमन.

वहिनी ती लाजतेच छान ,विराटला आधी आवडली पण नव्हती लग्नात किती रागात होता कस कस तुम्ही त्याला शांत ठेवलं ते तूम्हालाच माहित..त्याने साध नजर वळुनसूध्दा बघितलं नव्हतं आणि आता लवक‌र काय येतो ,तिला कॉलेजला घेऊन जातो,बाहेर फिरवुन आणतो...आपण किती तरी विधी सोडल्या लग्नानंतरच्या पण केल्या नाही मेण तर हळद काढणी असते ती तर केलीच नाही.-सुधा

सुमन विचारात पडतात..मला करायच्या होत्या गं पण विराट माहीत नाही का कसा आहे .पिहु कधी एका शब्दाने मला काही बोलली नाही.कसली हौसच झाली नाही .-सुमन
.
.
.
.
.
.

विराट पार्टी कधी ठेवायची-देवेश

विराट त्याच्यावर नजर वळवतो,तु डिसाईड कर कधी ठेवायची .

त्रिशाचा बर्थडे आहे तेव्हाच आपण न्यु प्रोजेक्ट साईन करु.

चालेल .विराट काहीच फरक पडला नसल्यासार‌खे तो बोलला.

.
.
.
कॉलेज सुटल्यावर‌ आदी त्यांचा ग्रुप कॅफे मध्ये जातात.गप्पा जोक्स मध्ये सहा तिथेच होतात. सगळे निघतात.

पिहु सग्ळ्यांसोबत आली होती ,जाताना ति्च्याकडे गाडीच नव्हती,
पिहू कशी जाणार आदी विचारतो.

हह,वीरा शॉपिंगला गेली तिच्याबरोब‌र‌ गेलं ना दहा वाजतील घरी जायला. तु सोडतोस का,.

आदी कालच विचार करुन -पिहु मला दुसरीकडे काम आहे ..

हो का...

तु विराटला कॉल कर तो गेला नसेल घरी अजुन आणि त्याच ऑफिस पाच मिनीटाच्या अंतरावर आहे येईल तो,
पिहु विराटला फोन करते,

हॅलो

अहो ....

हम्म ,

(ती एक नजर आदी कडे बघते परत बोलायला लागते)
कॉलेज सूटल्यावर‌ मी बाहेर आले होते,मला पिक करायाला येतात का,ती चाचरतच विचारते.

कुठे आहेस आणि एकटी काय करते.कोणी नाही का...

आहे ना आदी पण त्याला काम आहे ..

विराटला ही कळलं काल आपण बोललो त्याच त्याला हर्ट झाले असेल.

आदीला फोन दे ,

हम्म,आदी धर‌

आदी मोबाईल कानाला लावुन थोड लांब जातो.हा बोल विराट ,

आदी तिला ऑफिसला आणून सोड ,माझ अर्धा तासाच काम आहे ,आणि कालच राग आला असेल तर‌ सॉरी..एवढ बोलून विराट फोन ठेवुन देतो.

आदी पिहुला मोबाईल देतो.

काय म्हणाले पिहु मोबाईल पर्स मध्ये ठेवत‌ विचारते.

काही नाही .ऑफिसला सोड म्हणाला त्याच काम आहे ...

ऑफिसला घरी जायला उशीर‌ होईल..

आदी हसतो ,घरी जाऊन हजार जणांनाचा स्वयंपाक करायचा आहे का,चल बस...

पिहु काही न बोलता त्याच्याबरोबर निघुन जाते.

आदी तिला ऑफिसच्या बाहेर सोडतो जा..आत

नाही ,तु पण चल मला काहीच माहित नाही..कोण ओळखत पण नसेल ..

अरे,तुझच ऑफिस आणि तुला ओळखणार नाही का,जा.
आत आदी बाईक स्टार्ट करतो.

आदी ...ती बारीक चेहरा करते.

ओह..!!!!पिहु तो बाईक बंद करुन उतरतो.

आदी तिच्याबरोबर आत जातो..

सगळे आदीला ओळखत असल्याने कोणी त्याला काही बोलत नाही .पण पिहु पहिल्यांदाच आली होती तर येणारे जाणारे तिच्याकडेच बघत होते. ..

आदी एका पियुनला सांगतो विराट च्या कॅबिन मध्ये बसव.
पिहु विराट यईल थोड्यावेळात तु बस..

हम्म.पिहुला ‌खुप ऑड वाटत होते.पियुन पिहुला विराटच्या कॅबिनमध्ये घेऊन जातो..त्याची कॅबिन बघुन पिहु दंगच होते सगळे नीटनेटके, छान सजवलेली ...शांत ,प्रसन्न होती.पिहु शांत सोफ्यावर बसते...मोबाईल काढुन चाळत बसली.दहा मिनीटांनी विराट बरोबर दोघ तिघ होते.तो‌ त्यांना इंन्सट्रक्शन देत आत येतो.डोरच्या आवाजाने पिहुची नजर पडते.
दोघांची नजरानजर होते.पिहु उभी राहते....विराट त्यांना हातानेच जा म्हणतो.

कधी आली ..विराट त्याच्या चेअर वर बसुन लॅपटॉप‌ चेक करताना विचारतो.

आत्ता च आले...तिने सोफ्यावरची सॅक उचलली ..झालं नाही का,
‌ती थोडी जवळ येत विचारते.

जस्ट अ .सेकंद त्याने लॅपटॉप‌ बंद‌ केला.आणि बॅगेत टाकला.
दोघेही केबिनच्या बाहेर निघाले ..विराट तिच्याशी हसत बोलत होता.सगळे त्यांनाच बघत होते तेव्हा सगळ्यांना अंदाज आला कि पिहु विराटची वाईफ आहे.
दोघेही घरी आले...दारातुन दोघे हसतच आत आले .विराटने समोर बघितले त्याच्या चेहरयावरच हसुच गायब झाले.

त्रिशा आणि देवेश आले‌‌ होते.

त्रिशाला विराटला बघुन भलताच आंनद झाला होता.परत तिने पिहु वर नजर फिरवली .तिने चेहरा फिरवला.

विराटने मॉम कडे नजर टाकली.सुमन चिडली हे त्याला दिसतच होते.विराट ने पिहुकडे बॅग दिली..तो देवेशच्या समोर बसला.

पिहु बॅग घेऊन चालली होती.

त्रिशा सुमन कडे बघत -आंटी ओळख करुन देणार नाही का तुमच्या सुनेशी ती जरा टोमण्यातच बोलली.

सुमन यावर काहीच बोलली नाही.

रोहिणी ने पिहुला हाक मारून बोलवलं ये पिहु..ही त्रिशा विराट ची मैत्रिण आहे. पिहु गालात हसली

तशी विराट ने रोहिणी कडे नजर वळवली.

पिहु पण सुमनच्या जवळ येऊन बसली.

विराट इंव्हाईट करयाला आलो ,त्रिशाची बर्थडे पार्टी पण आणि आपला न्यु प्रोजेक्ट पण साईन होणार आहे ना,

सूमनला माहित नसल्याने त्या आश्चार्याने विराट कडे बघतात.

हो का ,रोहिणी हसत बोलतात.त्यांना माहीत नसल्याचे आव आणत बोलल्या.त्रिशा आम्ही सगळे नक्की येणार काळजी करु नको हहह ...

त्रिशा देवेश उठतात. देवेश व‌िराटला मिठी मारून पुढे येतो.

त्रिशा ही विराटला हग करते.विराट गोंधळुन जातो.

पिहु पण ब्लँक होत बघते.

विराट तिला बाजुला करतो.आणि तिच्या कडे रागाने बघतो.

त्रिशा हसतच आंटी मी येते ...ती सुमनच्या पाया पडत‌ बोलते.
पिहु समोर असल्याने सुमन व‌रवर हसतात.

पिहु रुममध्ये जाते.

दोघे गेल्यावर‌ सूमन रागानेच रुममध्ये जातात.विराट ही मागे जातो.मॉम माझ ऐकुन तरी घे.

विराट तु ऐवढा कसा हट्टी आहेस रे जे नको मला तेच तुला करायच असते अरे मी तुला त्रिशापासून दुर रहायला सांगते.पण नाही तु कधीच ऐकणार नाही.

मॉम तिचा आणि माझा काही संबंध नाहीये मी देवेश बरोबर

बस देवेश आणि त्रिशा काय वेगळे आहेत का ...तु न सांगताच का अस करतो..अरे

मॉम बस झालं तुझ मी ऐकले ना तूझ्या मानासारखे तूला ज्या मूलीबरोबर लग्न करायचे ते मी केलं .स्वतःहुन संधी आली मी कस गमवु.

हो, खूप मोठे उपकार केले माझ्यावर जा तु मला बिलकुल तुझ्याशी बोलायच नाही सुमन रागात बोलून पाठ फिरवुन थांबतात.


मॉम ऑलरेडी सगळ झालं आहे ...आता मी मागे सरकु शकत नाही .अस बोलून विराट रागानेच रुममध्ये येतो.

पिहु त्याला रागातच बघुन विचारातच पडते आत्ता तर चांगले होते.तिने त्याला‌ खवळायचे पण काम केले नाही ती खाली आली.
थोड्यावेळाने सगळे जेवायला आले.

पिहु विराट कुठे आहे त्याला बोलव जेवा‍यला रोहिणी सुमनकडे रागात बघुन बोलते.

मी....ते ..

एकदा सांगितलेले कळत नाही का ...

ताई तुम्ही जावा बोलवायला उगाच‌ माझा राग तिच्यावर‌ काढेल....

रोहिणी रागातच उठते..फक्त तुला विराट व‌र चिडायच माहीत आहे .मनी ताट आण वर ..

पिहु बस जेवण कर.

पिहु तर‌ सगळ्यांच ऐकुन सून्न झाली होती .तर्क तर‌ कश्याचा लागत नव्हता.आपल‌ं शांत जेवण करून घ्याव .

रोहिणी व‌िराटच्या रुममध्ये आल्या ...विराट शांत चेअर व‌र‌ डोळे मिटुन बसला होतो.

विराट .

विराट डोळे उघडुन बघतो,आई ...

खाली जेवायला आला नाही म्हणून आले ..

आई मला भुक नाही‌ेये आत्ता

हो माहीत आहे.पण मला भुक लागली आहे.चल जेवण कर,रोहिणी त्याच्या समोर घास धरत बोलते.

विराट ही खातो...

तु काय सुमनच मनावर घेऊ नको मी आहे तिला समजावते.तु बिनधास्त त्याच्या ब‌रोबर प्रोजेक्ट‌ लवकर चालु कर.

विराट त्यावर‌ काहीच बोलत नाही .तो शांतपणे जेवतो.

रोहिणी थोड्यावेळ बोलून निघून जाते.

पिहु रुममध्ये‌ येते ..विराट गॅलेरीत फोनवर बोलत‌ बसला होता.

पिहूने एक नजर टाकली आणि फ्रेश होऊन आली. पिहुला विराट बरोबर बोलायचे होते पण हिम्मतच होत‌‌ नव्हती.चिडुन काही बोलेेल म्हणुन ती बाहेर‌ गेलीच नाही..ती शांत बेडवर‌ जाऊन झोपली.

विराटला वाटलं पिहु येईल आत्ता बोलेन तो तिची वाट बघत खूप वेळ बसला गॅलेरीत पण तस काही झालंच नाही .तो रागातच येऊन तिला पाठ फिरवुन झोपला.

पिहुने एकदा वळुन बघितले.पण तो पाठ फिरवुन झोपला होता.ती पण त्याला पाठ फिरवुन झोपली.

(दोघांची मन नीट जुळलीच नाही त‌‌र त्यांच्या मनातलं त‌‌र कस कळणार💕)

सकाळी पिहु खाली आवरुन आली त‌‌र‌ रोहिणी , सुमन आणि वीरा बाहेर चालल्या होत्या.

आई तुम्ही कुठे चालला‌ का-पिहु

हो गं, काल सांगायचे होते पण लक्षातुनच गेले. मोठ्या आईच्या भाच्यांच लग्न आहे ना.मग तिकडेच चाललो, सुधा आहे घरी काही लागलं कि फोन कर सूधाला येईल ..विराट ला सांग लवकर यायला .

आई मी एकटी कस ...,(पिहु ला थोड टेशंनच येते एकट ऐवढ्या मोठ्या घरात कस राह‌ायच ) म्हणजे वीरा पण माझ्याबरोबर थांबली असती तर

कॉलेजला पण दोन दिवस सुट्टी म्हणून वीरा पण येतेय-सुमन

पिहु सवय असावी एकट पण रहायची नोकर आहेत कि ऐवढे घरात- रोहिणी

पिहु शांतच बसली ...

थोड्यावेळाने सगळे ब्रेकफास्ट करुन निघुन गेले.पिहु रुममध्ये आली तर‌ विराट ऑलरेडी तयार होऊन निघायच्या घाईतच होता.

पिहु त्याच्या जवळ आली..अहो..

त्याने श‌ुज घालता घालता एक नजर वर बघुन खाली बघितलं

ब्रेकफास्ट त‌यार आहे आणु का ...सगळे ब्रेकफास्ट करुन बाहेर गावी गेलेत ,


विराट ने चकित होत विचारले मॉम पण .

हो ,

तो मॉमचा विचार करत होता न सांगताच गेली .तो उठुन उभा राहिला ..पिहुकडे न बघताच निघुन गेला.

पिहुचे डोळेच पाणवले...

त्याला कालचाच मॉमचा राग आला होता.त्यात‌ पिहुसुध्दा त्याच्याशी बोलली नव्हती आणि आज न सांगताच गेली तो रागानेच ऑफिसला गेला..

तिने ही त्याला फोन केला नाही .तर विराट सारखाच मोबाईल चेक करत होता.पिहुचा फोन येईल....

विराट मि. मेहताने डिनर पार्टीला इनव्हाईट केलं लक्षात आहे ना - मानव

हो आहे - विराट

सात वाजले तरी विराट आला नव्हता.पिहुने सगळ त्याच्या आवडीच केलं होते.काल पण विराट नीट जेवला नव्हता सकाळी पण बिनानाश्ता करताच गेला.

पिहु सगळ आवरुन हॉल मध्ये बसली....दहा वाजले तरी विराट आला नव्हता.पिहुने फोन केला .पण त्याचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता.पिहु घाबरुन सारखीच फोन करु लागली.मोबाईल
सारखाच स्विच ऑफ येत होता. घरात कोणी नाही त्यात विराट चा फोन लागत नव्हता.तिला काहीच कळत नव्हते काय कराव .
ती सुधाला फोन करणार पण ते सगळे बाहेर डिनर गेलेत घरी आल्यावर फोन करु .अकरा वाजत आले.आता पिहुला राहवलं नाही तिने सुमनला फोन लावला.

सुमन पिहुच नाव बघुन घाबरतच फोन उचलला.पिहु,

आई...तिचा आवाज रडण्याच्या स्वरात येत होता...

पिहु काय झालं बाळा..तु ..

आई हे अजुन घरी आले नाही..अकरा वाजत आलेत‌ आणि ह्यांचा फोन ही लागत नाही.

काय,सुमन ओरडुनच बोलतात.विराट अजुन घरी आला नाही काही सांगुन गेला नाही का तुला .

नाही सकाळीच गेलेत तुम्ही सगळे गेल्यावर .

तु घाबरु नको मी बघते कुठे गेला...

हम्म.

सुमन मानवला कॉल करतात..मानवने कॉल उचलला ,हॅलो मॅडम

मानव विराट आहे का ..

हो आहेत एक मिनीट ...विराट आईंचा कॉल‌ आहे .

मॉमचा ,विराट ब्लँक होत मोबाईल घेतो..मॉम तु ठिक आहेस ऐवढ्या रात्री फोन केलास..

सुमन रागातच बोलतात विराट ,मोबाईल कुठे आहे

मोबाईलची बॅटरी डाऊन झाली.का ग तु कॉल‌ केला होतास का,

विराट ,आम्ही सगळे बाहेर गावी आलोत पिहु एकटीच घरी आहे माहीत नाही तुला ती किती वेळेची फोन करते .साध एक कॉल करुन सांगता येत नाही का तुला उशीर होणार म्हणून एवढा केअरलेस असशील वाटल नव्हतं ...अरे थोडा तरी तिचा विचार करायचा.

मॉम ऐक तरी ,तो पर्यंत सुमन फोन कट केला.

सुमन ने पिहुला कॉल करुन सांगितलं येईल थोड्यावेळान‌े तु जेवण करून झोप .

पिहु जेवण न करताच रुममध्ये गेली‌‌.

विराटने पिहुला कॉल केला.अननोन नंबर होता..पिहुने उचलला नाही ,विराट ने घरी लॅनलाईन वर केला

हॅलो ,मनी ने फोन उचलला.

मनी, पिहु कुठे ?

वहिनी आत्ताच रुममध्ये गेल्यात .

हम्म ,मी येतोय थोड्यावेळात एवढ बोलून त्याने फोन कट केला.

विराट थोड्यावेळाने घरी आला.त्याच्या गाडीचा आवाज आल्याने तिच्या जीवात जीव आला. ती शांत गॅलेरीत बसली.सकाळपासुन एकटीच आहे साध एक फोन केला नाही...ती स्वताःशीच बोलत रडू लागते.तिला वाईट वाटलं होते विराटला तिची थोडी ‌सुध्दा काळजी नाही.

विराट रूममध्ये आला ,त्याने गॅलेरीत नजर टाकली तर पिहु सोफ्यावर बसली होती.विराट फ्रेश होऊन बेडवर पडला.तो झोपायचा प्रयत्न करत होता.पण झोप काही येत नव्हती.त्याने गॅलेरीतकडे नजर वळवळी पिहु अजुन बसली होती.

तो उठुन गॅलेरीत आला तिच्या मागे थांबनुच बोलु लागला...रात्रभर बाहेरच बसणार आहे का...झोपयच नाही का,

पिहु काहीच बोलत नाही.

मी तूझ्याशी बोलतोय पिहु तो आवाज चढवूनच बोलतो.

पिहु दोन सेंकद‌ दचकतेच .मी,झोपेन कधी झोपायच ..बोलताना तिचा आवाज जड झाला होता.

तो केसांमधुन हात फिरवत चेहरयावरुन हात फिरवत शांत होण्याचा प्रयत्न करतो.तिच्या समोरच्या चेअर‌वर बसतो.

पिहु त्याच्यावर नजर टाकुन बोलते.तुम्हाला एक,कॉल करुन सांगता येत नाही का मी उशीरा येणार आहे.

मी विसरलो,पण घाबरण्यासारखे काही नाहीये घरात सेफ होतीस तु ,लगेच मॉमला सांगायची काय गरज होती तो चिडुनच बोलतो.

काय ,इथे फोन लागत नव्हता घाबरले होते.कोणाला फोन लावणार मी कोणीही घरात नाही ..आणि तुम्ही मलाच बोलता येत
पिहु चिडुन रडतच बोलली.

पिहु ,डोन्ट क्राय त्याने तिच्या हातावर हात ठेवला..

पिहुने रागातच त्याचा हात झटकला.तुम्ही जाऊन निंवात झोपा ...काही गरज नाही खोटी काळजी दा‌खवायची मनात येईल तेव्हा बोलायच .नाही तर मी आहे कि नाही फरक पण परत नाही.

पिहु तु आता अती बोलतीये विराट थोड चिडुनच बोलतो.

पिहु हुंदके देऊन रडु लागली .विराटला काहीच कळेना तिला कस शांत करायच.

पिहु स्टॉप क्रायिंग तो तिच्या वर ओरडुनच बोलत होता.त्याचा काहीच फायदा नव्हता.

तो उठुन इकडुन तिकडुन फिरु लागला.पिहुच रडण काही थांबत नव्हतं.

तो तिच्या जवळ गेला तिला काही कळायच्या आत त्याने तिला उचलुन घेतलं.पिहुचा आवाजच बंद झाला .ती एकटक त्याच्याकडें बघत होती....तिने घट्ट त्याचा टीशर्ट पकडला होता.

तो पिहुच्या डोळ्यात आरपार बघत होता.तिचे‌ डोेळे पाण्याने भरलेले होते.

पिहु भानावर आली.अहो ... सोडा त‌ी उतरण्याचा प्रयत्न करु लागली‌.

विराटने तिला अजून घट्ट पकडलं .चुप एकदम किती रडतेस चुळबुळ तर करुच नको ,तो ओरडुनच बोलतो.

ती दचकून शांत त्याच्याकडे बघत होती.

विराट पिहुला आत घेऊन आला.तिला बेडवर कुशीत घेऊन झोपला.

पिहु लगेच त्याच्या कुशीतुन बाहेर येऊ लागली. त्याने परत तिला जवळ ओढले.पिहु त्याच्या छातीवर आदळली.

अ..हो...हे.तुम्ही...मी.. बोलताना तिचा आवाज थरथर कापत होता.

तो तिचा चेहरा वर करतो..काय केलं का मी.

हह ..मी झोपते मला झोप आली.ती त्याच्या पासुन लांब होत होती.

त्याने परत ओढलं ,मागाशीच शांत झोपली असती तर...आता तु असच झोपायच तो गालात हसत बोलत होता.

ती मानेनेच नाही म्हणत होती.

तो नजर रोखुनच चेहरा तिच्या चेहरयाजवळ आणू लागला पिहूने पटकन चेहरा खाली घेऊन घट्ट डोळे झाकले.‌

तो हसु लागला.त्याने दुसरयाहाताने ब्लँकेट घेऊन तिच्या अंगावर‌ ओढली.पिहुची चुळबुळ चालुच होती.पहिल्यांदाच ती विराटच्या कुशीत झोपली‌ होती.घाबरली ही होती.पण तिला छान ही वाटत होते...थोड्यावेळाने तिची चुळबुळ बंद झाल्यावर विराट ने
बिघतलं तर ती झोपली होती.त्याने तिला थोड दुर करुन तिच्या चेहरयावरुन हात फिरवला.आज त्याच त्यालाच कळलं नाही का
तिला जवळ घेऊन झोपावस वाटलं.

पिहु झोपतेच त्याच्या अजुन जवळ येऊन त्याच्या छातीवर एक हात ठेवुन झोपली....

विराट ने तिच्या हातावर हात ठेवला.आणि स्वतःशीच हसला‌.

सकाळी पिहुच्या आधी विराटला जाग आली.त्याने डोळे उघडले तर पिहु अजुन त्याच्या कुशीतच होती.त्याने त्याचा अलगद हात काढुन तिला उशी वर झोपवले.तिच्यावर नीट ब्लँकेट टाकून तो गॅलेरीत आला.... आभाळ भरून आलं होते.छान पावसाच वातवरण होतं थ़‌ंड गार वारा अंगाला भिडुन जाताना गोड शहारा ‌येत होता..त्याच त्यालाच कळत नव्हते तो आज एवढा का खुश आहे ,पिहुला जवळ घेऊन त्याला सु‌खाची झोप लागली होती.मन आतुन शांत होते.ती फक्त जवळ हवी होती.विराट तु पिहुच्या प्रेमात तर पडला नाही ना,तो स्वतःशीच प्रश्न करत होता.हा प्रश्न डोक्यात येताच त्याच हृद्य ट्रेनच्या स्पीड‌ने धडधडु‌ लागले‌.काय फिलींग आहे .आधी कधीच कोणाला बघुन वाटलं नाही आणि काल पिहुच्या डोळ्यातलं पाणी काहीच सुधरू देत नव्हते.

विराट डोळे झाकुन दोन्ही हात पसरून एक मोठा श्वास घेतो...

डोळे बंद होताच पिहुचा हसरा निरागस चेहरा त्याच्यासमोर येतो.तो पटकन डोळे उघडतो. त्याला त्याच उत्तर मिळालं 😍😍...तो आत बघतो पिहू अजुन झोपली होती.तो स्वतःशीच हसला.

थोड्यावेळाने पिहु उठली..तिने एक नजर‌ बेडवर बघितलं कालच आठवुन ती विचार करत होती स्वप्न होत का खर होते...

विराट तिला उठलेले बघून हसतच आत येतो..गुड मार्निंग पिहु.

पिहु दचकुन त्याच्याकडे बघते.कालच सगळ खरच होते.ती त्याच्याकडे रागातच बेडवर उठुन बाथरुमचा डोर जोरातच आदळते.

विराट हसतच वर्क ऑऊट करायला जातो.

पिहु तिच आवरुन खाली येते.पुजा करते.

विराट वर्क ऑऊट करुन बाथ घेऊन खाली येतो.आज चक्क तो कोणी न बोलवता‌ खाली आला पिहु ब्रेकफास्ट करतच होती .विराटला बघुन ती किचन मध्ये गेली.विराट ही तिच्या मागेच आला गीता विराटला बघुन बाहेर गेली.

पिहु त्याच्यासाठी ब्रेकफास्ट रेडी‌ करु लागली.

पिहु- त्याने हळुच तिला हाक मारली.

पिहुने मागे वळुन न बघताच आले घेऊन दोन मिनिट .

तो तिच्या जवळ थांबला. तशी ती थोडी सरकली.तिच मन
चलबिचल झालं होते...मनाची धडधड वाढली होती.कालच आठवुन तिच्या चेहारयावर लाजेची लाली चढत‌ होती .शक्य तितके तिने तिचे हावभाव लपवण्याचा प्रयत्न केला.तिला त्याच्यावर चिडा‌यच होते.पण तो अस जवळ आल्याने ती विसरुनच गेली.
विराटने ज्युसचा ग्लास तिच्या हातातुन घेतला आणि बाहेर येऊन बसला.तेव्हा कुुठे तिने श्वास घेतला.ती स्वतःला सावरुन बाहेर येऊन त्याचा नाश्ता दिला आणि ती ही बसली‌....

विराट ‌च लक्ष सगळ तिच्या वरच होते.त्याची नजर तिला छळत होती.

तिने त्याच्याकडे नजर रोखुन बघितले काय हवय तुम्हाला ती वैतागुनच बोलली

तो हसत नाश्ता करु लागला.पिहु तू का चिडली आहे कारण कळेल का,तो ही ती कालचा विषय काढवा म्हणुन तिला उकसवत होता.

पिहु काही न बोलता स्वतःच संपवुन रुममध्ये गेली.कॉलेजला जायच म्हणुन आवरू लागली.विराट रुममध्ये आला तो ब्लँक होत तिच्याकडे बघत ,पिहु कुठे निघाली.

पिहु ने त्याच्याकडे रागात बघितले.कुठे म्हणजे कॉलेजला अजुन कुठे जाते का मी ...

तो कपाळालाच हात मारून घेतो.आणि हसायला लागतो.

हे बघा, मला तुमचा खूप राग आलाय त्यात अजुन तुम्ही ..

तो हसु क़ंट्रोल करत पिहु आज संडे आहे.

काय,पिहु चकित होत जोरात बोलते.

तो हसत मान हलवुन हो म्हणतो.

पिहुला स्वतःच्या वेडेपणावर हसु येत होते.ती लाजुन सॅक ठेवुन टाकते...

विराट चा फोन वाजल्याने तो फोन रीसीव करत गॅलेरीत जातो.पिहु विचार करुन गॅलेरीत येते‌ मला तुमच्याशी बोलायच .

तो कॉल कट करून मागे वळून ( दोन तास स्टडी करुन आली काय काय बोलायच त्यात आर्धे लक्षात असेल तर बोलेन नाही‌ तर‌ सोडून देईल स्वतःशीच पुटपुटत हसला.)

पिहु संशायाने बघत काय म्हणाला ...

अ...काही नाही बोल.तो हाताची घडी घालुन थांबला.
..

काल तुम्ही जे केलं ते तुम्हाला चुकिचे वाटत नाहीये का.

हहह,नाही तो सरळ तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलला.

हे बघा ...तुम्ही लिमीट मध्ये रहा. हह सगळ तुमच्या मनासारखे होणार नाही .

विराट हसत तिच्या जवळ येतो.सॉरी परत नाही करणार तो कान पकडुन बोलतो.हहह पण परत रडु नकोस मला काहीच सुचत नाही.

पिहु लाजुन इकडेतिकडे बघु लागते.

विराट हळुच तिच्या कानाजवळ येऊन बोलला.तु ब्लश करतेय, म्हणजे तुझा राग गेला ना...

पिहु स्वतःला साव‌रत नाही,मी नाही ब्लश करत ..हुम्म..ती पटकन पळुन खाली येते.

पिहु तुझ्या मनातलं ओठावर कधी येईलं गं ,तो मानताच बोलत हसतो.

पिहु त्याचाच विचार करत स्वतःशी हसत होती ..हा तोच विराट आहे का ,जो कधी माझा चेहरा बघत नव्हता.मी असल्याने त्याला कधी फरक पडत नव्हता आणि आता मला रडलेले बघवत नाही.जो कधी समोरून गेलं तरी बघत नव्हता. आणि आज डोळ्यात आरपार बघुन बोलतोय.पिहुला सगळ स्वप्न असल्यासारखे वाटत होते.

पिहु गार्डन मध्ये बुक घेऊन बसली होती.विराटने हाक मारल्यावर ती भानावर आली.

पिहु आवर आपण बाहेर जातोय.

कुठे

डिझाईनरकडे दोन दिवसांनी फंक्शन आहे ,

हम्म, पण मी काय करू येऊन मला तूमच्या कपड्यामधले काहीच कळत नाही.

घरात बसून तरी काय करणार कोणीही नाही‌ेये .आ्वर तसच लंच करून येऊ .

अहो,पण

पिहु मला एकच गोष्ट दहावेळा सांगावीच लागणार का,तो नजर रो‌खूनच बोलतो.

पिहु काही न बोलता आवरुन आली.

दोघेही डिझाईनरकडे गेले.

विराट एक एक वेअर करून बघत होता.पिहु हा छान वाटतोय
का..

पिहु हसत‌े छान आहे पण ब्लॅक खुप छान दिसेल.पण तुमच्या चॉईसवर घ्या मला जास्त‌ कळत नाही ...

विराट गालात हसतो.

पिहुची नजर गाऊन्सवर पडते.ती एक एक बघत होती .विराट मागुन येतो .कुठला आवडला

पिहु त्याच्याकडे बघते नाही ,मी फक्त बघत होते.

(विराट मुद्दाम‌ तिला घेऊन आला होता.ह्य‌‌ा निम्मीताने ती आज तरी काय मागेल पण पिहु कसली काय मागते. )

तो हलक हसतो.पिहु हे बघ तु साडी वेअर करते ना,हे बघ तो काही ना काही तिला घे म्हणून फोर्स करतच होता.

पिहु हसत,साड्याजवळ जाते.ती बघुन हह.छान आहेत पण आईंनी अश्या भरपुर साड्या घेतल्या आहेत नको बोललं तरी आणतात.
मला खरच काही नको,तुमच झालं का जायच

हो झालं ,तु गाडीत बस आलो तो तिला चावी देतो.

पिहु गेल्यावर ती एक गाऊन निहाळत होती त्याने बघितलं होते.तो‌
ते ही पॅक करुन घेतो.

दोघेही लंच करुन घरी येतात....पिहु रुममध्ये जाते...विराट ही तिच्या मागे येतो.पिहु काय करतेस ..

काही नाही ....

चल मुव्ही बघु ..

अहह, काय पिहु शॉक होत बघत बोलते.

तो डोक्याला अंगठा घासत हाताची घडी घालुन बघतो.पिहु तुला ऐकायला कमी येते का,

पिहु गालात हसते,तस नाही पण तुम्ही जे बोलतायेत त्यावर विश्वास बसत नाही...

तो बारीक डोळे करुन तिच्या कडे बघतो.. मी चाललो यायच असेल तर ये नाही तर बस ,तो रुमच्या बाहेर आला.

पिहु पटकन बाहेर आली ,आले मी पाच मिनीटांत ...

विराट गालात हसत मागे न बघताच होम थेटर रुममध्ये जातो.तो मुव्ही बघत होता कुठला लावु ..

पिहु दार उघडुन दोघांसाठी स्नॅक्स आणि कोल्ड्रींक घेऊन आली

त्याने तिच्या कडे न बघताच कुठला मुव्ही बघणार ....

कुठलाही लावा...

तो गालात हसत मुव्हीच नाव सांगणार कि ,पिहु पटकन बोलली..अहो मधे वीरा आणि मी हॉरर मुव्ही बघत होतो.तो लावा पुर्ण बघितलाच नाही...

त्याने तिच्याकडे चमकुन बघितलं ,काय तु आता हॉरर मुव्ही बघणार...

ती सोफा अॅडजस्ट करत हो म्हणु लागली.

.तो मनाताच बोलला. (पिहुला माझ्याबद्दल काय फिल होतय‌ का ते तरी कळेल या साठी रोमँटीक मुव्ही बघाव म्हणटलं तर काय सगळ्या मेहनतीवर पाणी पडलं)

अहो लावतायं ना,

विराट वरवर हसत हो लावतो ना,तो दात ओठ खातच बोलतो.

पिहुने सोफ्यावर बसली .विराट तिच्या शेजारी बसला

मुव्ही चालु झाला.पिहु एक्साईटेड होऊन बघु लागली.विराटचा मुडच गेला होता.

त्याने पिहुवर नजर टाकली तर ती पुर्ण गुंतुन गेली होती.त्याने रागाने मोबाईल काढला आणि बघत बसला. ..

पिहु मुव्ही बघता बघताच विराटच्या खांद्यावर डोक ठेवुन झोपी गेली.तो खुश होत पिहुकडे बघितलं तर तिला झोप लागली होती.

विराट गालात हसत तिच डोक हळुच मांडीवर घेऊन तिचे पाय‌ वर घेतले.मुव्ही बंद‌ करुन टाकला.तो ही पाय समोरच्या टिपायवर ठेवुन सोफा मागे घेऊन झोपला.

पाचच्या दरम्यान सगळे घरी आले ....सूमन फ्रेश होऊन येतात.विराट तर संडेच्या दिवशी पण घरी थांबला नसेल.

गीता पिहु कुठे ,दिसत नाही,

वहिनी खाली आल्याच नाही...मी ही बघितले नाही.

सुमन वर येते...काल पिहु दिवसभर एकटीच होती....विराट काही बोलला तर नसेल ना,त्या टेशंन मध्येच वर येतात..सुमन पिहुला हाक मारतात. पिहु रुममध्ये नाही त‌र‌ कुठे गेली असेल.

बाहेर येऊन मनीला हाक मारतात.

मनी पिहुला बघितलं का,

हा त्या रुममध्ये आहेत.

सुमन रुममध्ये येत- पिहु तु मुव्ही ..त्या दोघांना बघुन बोलायच थांबतात.दोघेही अजुन झोपले होते.सुमनला तर विश्वासच बसत नव्हता.विराट आज घरी थांबला पिहुसाठी त्या खुश होऊन दार लावुन बाहेर येतात...

पिहुला जाग येते ,विराटच्या मांडीव‌र डोक बघुन पटकन उठुन बसते...विराट अजुन झोपलाच होता...ती एकटक त्याच्या चेहरयाकडे बघत हसत होती.तिने घडळ्यात बघितले तर सहा वाजुन गेले होते.ती उठुन फ्रेश होऊन खाली आली.आई तुम्ही कधी आलात पिहु खुश होऊन बोलली.

पाच वाजता आले,बस...पिहुचा हसरा चेहरा बघुन सुमन पण खूश झाल्या.

विराट पण फ्रेश होऊन आला.पिहुने त्याला ग्रीन टी दिली.त्याने मॉमवर नजर टाकली तर सूमन ऊठुन निघुन गेल्या.विराट रोहिणी सोबत बोलत बसला.

.
.
.
.
रात्री सगळ्यांची जेवण होतात. विराट मॉमच्या रुममध्ये येतो.सुमन ने एक नजर टाकली.आणि आवरु लागली.

विराट ने मागुन मिठी मारली.सॉरी मॉम,..दोन दिवस झालं तु बोलली नाही‌.

सुमन ने त्याच्या हात काढला आणि सामान ठेवु लागली.विराट तुला जे करायचे ते तु करतोच‌ .मी महत्वाचीच नाही तुला.

मॉम असे सेंटी डायलॉग मारू नकोस ह्याचा काही फरक पडणार नाही विराट चिडुनच म्हणतो.

हो माहीत आहे ....मला सुमन आवाज वाढवतच बोलतात.

विराट शांत होत.मॉम हे धर ...

सुमन बॅग बघुन काय आहे हे..

तुझ्याव‌र ‌खूप मोठे उपकार केले ना,लग्न करुन तिच्या साठी आहे
.दे तु...

सुमन खुश होऊन हसतात...काय आहे,आणि तु देना..,

मॉम जर तिने घेतले असते तर मी तुला द्यायला आलो नसतो.तुझ्यासारखीच शोधुन आणलीस आहे वाकतच नाही ..

सूमन जोरात हसत विराटलाच्या डोक्यावरुन हात फिरवुन मिठी मारतात.

विराट ही हसत घट्ठ मिठी मारतो.

सुमन बाजुला होत विराट ला बेडवर घेऊन बसतात.

मॉम तु काही विचारू नको विराट मॉमच्या मांडीवर डोक ठेवत म्हणतो...

सूमन मानेनच नाही म्हणत ओठ दाबत हसत असतात...

मॉम डोन्ट लाफ प्लिज ...तो लाजुन उशीने चेहरा झाकतो.

मग माझी चॉईस तुला आवडणार नाही अस कधी झालं आहे का,मला माहित होतं कधी ना कधी तुला पिहु आवडणार...त्या विराटच्या तोंडावरची उशी काढुन बोलतात.आणि कधी पासुन तु लाजायला लागला.हहह.

मॉम आता तु खेचणार का माझी अशी म्हणुन मी काही सांगत नाही..तो गाल फुगवुनच बोलतो.

बर बर सॉरी अस म्हणत सुमन अजुन जोरात हसतात.विराट उठुन बसतो.त्याला ही स्वताःचच हसु येते..तो ही हसत मॉमच्या गळ्यात पडतो.गुडनाईट मॉम,

गुडनाईट,एक मिनीट तु पिहुला बोलला,का.

नाही..

का...

मॉम ती आधीच एवढी लाजते ,घाबरते....मी सांगेन वेळ आल्यावर तिच्या मनातलं तर कळू देत...

बर ....

विराट हसतच रुममध्ये येतो... पिहु तु काय करतेस, पिहु बेडच्या मधोमध पिलो ठेवत होती.

ती त्याच्याकडे बघते..दिसत नाही का,मी काय‌ केलं एवढ बोलून ब्लँकेट घेऊन आडवी होते.

विराट पिलो घेत होता. पिहु लगेच उठुन बसते हे काय करताय ..

पिहु मी काहीच करत नाही एक पिलो घेतोय तो रागातच हसत बोलतो...

पिहु त्याला पाठ फिरवुन ओठ दाबुन हसत लागली.

विराट डोक्यालाच हात मारून घेतो...ओह गॉड ह्या अँटीक पिस साठी मीच सापडलो का तुला.. तो रागाताच ब्लँकेट ओढुन झोपतो.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED