Reshmi Nate - 9 books and stories free download online pdf in Marathi

रेशमी नाते - ९

दोघेही गाडीत बसुन घराकडे वळाले.

विराटचा मोबाईल वाजला. वीराचा कॉल होता.त्याने कॉल रीसीव केला

हा बोल

दादा वहिनीला कुठे घेऊन गेला..मी घरी येऊन तास झाला ,तिने चाचरतच विचारले.

घरी येतोय त्याने पिहुकडे बघितले.

पिहु त्याच्याकडे बघुन गोड हसली.

दादा,वहिनीची सॅक मोबाईल कुठे आहेत वीरा हसतच बोलु
लागली.

तु घेऊन आली ना,मग

हो‌ घेऊन आले पण त्या बदल्यात‌ मला काहीतरी हवयं.

तु जास्तच डिमांडीग झाली नाही.अस वाटत‌‌ नाही तुला.

मग बहिण कोणाची आहे.. एक हात‌ से लो एक हात दो,सुमन तिथेच बसून हसत होत्या.त्यांना वीराने सगळ सांगितले होते.

काही नाही ,फोन ठेव...त्याने फोन कट केला.

हहहहअ.😣,मॉम बघ दादा ऐकत पण नाही .लगेच फोन कट केला.

जा आता ,अभ्यास कर आणि काही कुठे जायच नाही ,

(वी‌राला तिच्या फ्रेंड्च्या ब‌र्थडे जायच होते.रात्रीची पार्टी असणार म्हणुन सुमन नको म्हणत होत्या)

काय म्हणत होती वीरा पिहुने विचारले.

अ काही नाही...त्याने कार स्टार्ट केली.

पिहुची त‌र बडबड‌ चालु होती..ती विराट ब‌र्डसबद्दल सांगत होती..त्याच्या तर‌ काडीमात्र डोक्यात‌ जात नव्हते.. त्याला बर्डसची माहिती घेऊन पीएचडी करायची नव्हती 😂😂😂 तो त्याच्या कामाच काही नाही त्यात कधी टाईम वेस्ट करत नाही त्याला स्वतःच नवल वाटत होते मी का ऐकतोय ...

ती सांगत होती.हा ऐकत होता.


घरी आल्यावर तिचा हसरा चेहरा बघून सुमन ‌खुश झाल्या.

सुमन पिहु रुममध्ये गेल्यावर ,विराट ही जातच होता.त्यांनी मागुन शर्ट पकडला..

विराट ने न बघताच मॉम सोड..,त्याला माहित होते काही तरी विचारत बसणार.

सुमन ने पण शर्ट सोडला ,तो लगेच जायाला लागला..

मागुन मॉम हाक मारतात.विराट आज सोडले पण उत्तर हवयं मला त्या हसतच बोलु लागल्या.

बघु तेव्हा,तो ही न बघताच बोलत निघून गेला.

वेडा,कळत नाही पिहुची सवय होत चाललीये .सुमन स्वतःशीच बोलल्या.

पिहु फ्रेश होऊन साडी घालुन आली..विराटची नजर तिच्या वर पडली.ती छान दिसत होती.

पिहु तिच आवरुन निघाली होती..विराट विचार करतच फ्रेश होयला गेला.

पिहुला मोबाईल देत.धर वहिनी सगळ ति‌थेच ठेवुन चु मंतर दादा बरोबर वीरा हसतच बोलली‌

पिहु लाजुन हसत अग ते अस काही नाही ..पिहु काय सांगायच कळतच नव्हते.

वीरा बस झालं जा आता सुमन दाटवतच बोलतात..

मॉम ...जाऊ दे ना.

वी‌रा रात्रीच एकटी तुला बाहेर सोडणार नाहीये मी.

अग मॉम सगळे फ्रेंड्स आहेत ,आदी पण आहे त्याच्या बरोबर जाते त्यालाच घेऊन येते बस‌ का??

वीरा काय लावलं तु पण मगासपासुन सुमन वैतागुन बोलत असतात.

मॉम तु आदीला बोल धर तिने आदीला कॉल लावला‌

हा वीरा-आदी

आदी मला निकिताच्या बर्थडे पार्टीला जायच तु सांग तु पण येणार आहे..प्लिज -वीरा थोड लांब जाऊन हळूच त्याला सांगत होती.


वीरा एक दिवशी तू मला विराटचा मार खाऊ घालणा‌र तो चिडतच बोलतो.

प्लिज ना, रा‌त्री मला कोण सोडणार नाही बाहेर..

येतो ,तो नाटकी नाराज होत बोलतो.

मॉमला सांग तु अस म्हणत ती सूमन कडे फोन देते.

आंटी मी जाणार आहे जाताना पिक करतो.आणि सोडतो पण ..

ठिक ‌ये.

विराट खाली येतो...पिहुने विराटला जेवायाला वाढले.

मॉम वीरा,कुठे जेवायच नाही का,

ती फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला चालली, आवरत आहे.

आत्ता आठ वाजुन गेलेत...आणि रात्रीच ड्रायव्हर बरोबर नाही .
.

अरे आदी बरोबर चालली ,

तो शांत झाला.त्यावर विराट काही बोलला नाही पिहुला आश्चर्यच‌ं वाटलं

गीता गाजर खिसुन ठेव ,आले मी सुमन बोलल्‌या

आई काय करताय,

अग आदी आला कि पहिले हलवा मागेल सुमन हसत बोलतात.

हो का, मी करते ‌..तो खुप दिवस झाला म्हणत होता तुझ्या हातचा खायचा हलवा..

विराट नजर व‌र करून तिच्या कडे चकित होत बघतो.

कर ना विचारते काय सुमन हसत बोलल्या.

पिहु जेवण करून आदी साठी हलवा बनवण्यासाठी निघून गेली.


थोड्यावेळाने आदी आला. विराट बसलाच होता.विराटला बघुन आदी त्याच्यासमोर येऊन बसला.


विराट ने फाईल मध‌ुन डोक काढुन त्याच्याकडे बघितलं..कुठे आहे पार्टी?.

आदीने मोबाईल बघुनच लोकेशन सांगतिले.

बाईक वर आला आसशील कार घेऊन जा...बाराच्या आत आणुन सोड. तो नजर रो‌खूनच बघत होता.

आदीने मोबाईल बंद‌ करुन त्याच्याकडे पाहीले.जस्ट रीलॅक्स तु जेवढी काळजी घेतो ना मला ही वीराची आहे ...

विराट फाईल बंद करत जरास हसतो,माहीत आहे ..


सूमन मागुन येत हसतात,आदी त्याला माहीत आहे वी‌राच्या बाबतीत तो फक्त तुझ्यावर विश्वास ठेवतो...(आदीला बहिण नसल्याने वीराला त्याने बहिण मानली होती.विराटला ही माहीत आदी वीरा ला त्याच्या सारखाच जीव लावतो. )

पिहु आदीचा आवाज ऐकून त्याच्यासाठी हलवा घेऊन आली.

आदी ची नजर तिच्या वर गेली..पिहु पण मोठी स्माईल करतच त्याच्याजवळ जाऊन बसली.....विराटला ती गोष्ट खटकली त्याच्याजवळ ही जागा होती आणि ती आदीच्या जवळ‌ जाऊन बसली होती..

आदी‌ आज तुझ्यासाठी मी हलवा केला‌य‌ पिहु बाऊल देत हसत एक्साईटेड होत म्हणू लागली.

विराटच्या चेहरयावर आट्या पडल्याच होत्या,तो रागातच फाईल चाळत होता.

आदी ने एक बाईट खाल्ल....व्हा पिहु व्हा काय मस्त झालाय.. आंटी तुम्ही टेस्ट केला का ...काय सुंदर झाला..


पिहु हसत त्याला विचारु लागली‌......खरच आवडला तुला

अग इतका सुंदर झालाय ना काय सांगु ,खरच तुझ्या हातात जादू आहे..पण आंटीच वेगळ आहे .मला आंटीच्या हाताचा खुप‌‌ आवडतो..

सुमन हसू लागल्या.आदी नेक्स्ट टाईम मी करते ...

त्याच ओवर बोलण ऐकून तर विराटने एक नजर‌ बघून परत
फाईल‌ मध्ये बघितले.


पिहु तु टेस्ट‌ केलं का -आदी

नाही माझ जेवण झालं ...

अग एक बाईट...त्याने त्याचा चमचा पुढे केला...

विराट शॉक होतच दोघांकडे बघु लागला पिहु काय त्याचा उष्टा चमचा घेते कि काय ...त्याला तर काय कराव म्हणून विचार करत होता..


पिहु धर एक बाईट त्याने अजून जवळ घेतला तसा विराट जोरात बोलला.

पिहु!!!!!!


तसे तिघेही दचकले..विराट कडे तिघे ब‌घत होते...

विराटला आता काय बोलाव प्रश्न पडला तो वरव‌र हसत पिहु मला पाणी हवयं ...


मग हळु ना, दचकली ना ती सुमन बोलल्या.

मी,दोन वेळा बोललो..तिला ऐकुच आलं नाही.

कधी ...पिहु विचार करत बोलली‌

आता पाणी मिळेल का मला (विराट ती जाव म्हणुन बोलत होता.पण कधी आणि का‌य)

पिहु उठली...तसा तो रिलॅक्स झाला..


आंटी वीराच हे दरवेळेसच आहे ...हहह मला बोलली माझ आवरलं तू ‌ये आणि अजुन रुमच्या बाहेर निघाली नाही.

गीता वीराला हाक मार आदी आलाय.-सुमन

पिहु पाणी घेऊन आली...हे धरा तिने ग्लास विराट च्या समोर धरला..

त्याने ग्लास घेतला.ती आदीशेजारी बसायला जाईल वाटलं पण ती त्याच्याशेजा‌रीच बसली.तो तिच्याकडे बघून गालात‌ हसत पाणी पित होता.

पिहु साडीत तु छान दिसते,आदी खाता खाता बोलला तसा इकडे विराटला ठसका लागला.‌‌

पिहु ने पटकन काळजीने विराटच्या पाठीवर हळू हात फिरवला..

विराट भारावुन तिच्या कडेच बघत होता..तिचा पाठीवरचा स्पर्श त्याला छान वाटल होतं

हळु ना ‌‌ती बोलत होती.पण त्याला ऐकू आलच नाही.😍

विराट (मॉमच्या आवाजाने तो भानावर आला.तु ठिक आहे ना.)
त्याने अजुन एक घोट पिला ‌हातानेच ठिक म्हणाला.

पिहु ने हात काढला....

आदी,बोलणारच कि विराट बोलला.आदी हे घे ,आणि कार काढ विराटने चावी त्याच्यासमोर ठेवली.

वीरा पण आली.

आदी आंटीला हग करुन उठला...बाय आंटी,बाय पिहु...तो बाहेर गेला..

व‌ीरा जास्त वेळ नाही लावायाच लवकर ये ,व‌िराट तिला ऑर्डर‌ ‌देऊन रुममध्ये निघुन गेला.

पिहु पण आवरून लॅपटॉप‌ घेऊन बसली.विराट पण स्टडी मध्येच बसला होता..त्याने पिहुवर नजर टाकली.पिहु ने अजुन चेंज केलं नव्हतं ..पिस्ता कलरची स्पाॅट साडी घातली होती.. साडी पुर्ण चोपून घातल्याने तिची फिगर आधीकच उठुन दिसत होती. केस
क्लचर ने वर फोल्ड केले होते..त्यातले काही केस खाली आले होते.चेहरयावर मेकअप नव्हता.विराट ने स्वतःला सावरत विराट काय करतोय अस बोलत‌ परत कामामध्ये गूंतला...

अकरा वाजल्याव‌र पिहुने लॅपटॉप‌ बंद‌ केला तिला क्लास चालू असताना झोप येत होती.ती काऊच वर डोक ठेवुनच झोपी गेली.
थोड्यावेळाने विराटच लक्ष गेलं. लॅपटॉप पिहुच्या मांडीवर होते आणि ती काऊचवर डोक ठेवुन बसल्या जागीच झोपून गेली होती.
तो उठुन हळुच लॅपटॉप बाजुला काढतो ..हात लावु कि नको हाच विचार करत त्याने तिला थोड .खाली सरकवलं बाहेरून उशी आणुन तिच्या डोक्याखाली ठेवली.त्याने हलकेच तिचे केस सोडुन क्लचर काढला .किती त‌र वेळ तो तिच्या चेहरयाला निहाळत होता..तिचा शांत चेहरा,निरागस पणा बघुन तो गालात हसत होता..ती थोडी वळाली तर साडी असल्याने पोटाचा भाग उघडाच होता .तो दचकुन पटकन बाहेरून ब्लँकेट आणुन ओढली..दोन सेंकद तो हँगच झाला होता .सगळी लाईट्स ऑफ करुन बेडवर झोपायला गेला......


पिहु झोपेतच उठली .तिला स्लाईडींग डोर दिसलाच नाही ती जाऊन डोरवर धडकुन ..तिचा तोल जाऊन समोरच्या टेबलावर‌ तिच डोक आदळलं .


जोरात आवाज आल्याने विराट जागा झाला..

विराट ने पटकन लाईट ऑन केली तर पिहु खाली पडली होती.

अहहह...ती कळवळली तिला काहीच सुचत‌..त्याने पटकन तिला उठवलं,पिहु...


तिच्या डोक्यावरचा हात त्याने काढला तर रक्त येत होते टेबलाच कोपरा जोरात‌ लागल्याने कोच पडली होती..


त्याने तिला बेडवर बसवलं पिहु..हात काढ ...

अहहह.नको..

बघु तर दे जास्त लागलं आहे का ,विराट रक्त बघुन घाबरला होता..त्यात पिहु हात पण लावु देत नव्हती.

त्याने फस्टेड बॉक्स आणला ..पिहु बघु रक्त् तस थांबणार नाही ये..

त्याने तिचा हात जोरात काढुन त्यावर कॉटन ठेवलं..ती जोरातच ओरडली..तिचा रक्ताचा हात बघुन गरगरल्या सारखच झालं..तिने विराटच्या खांद्यावरच मान टाकली..

पिहु त्याने तसच तिच्या गालावर थाप मारत तिला उठवु लागला..

त्याने तिला झोपवलं आणि मोबाईल घेऊन मॉमला कॉल लावला.

मॉम घड्याळ बघुन घाबरतच फोन उचलला.

मॉम रूम मध्ये ये..त्याने ऐवढ बोलुन लगेच फोन कट केला आणि डॉक्टरला फोन केला..

मॉम रुममध्ये आल्या .पिहुला बघून त्या घाबरुन तिच्या जवळ आल्या..विराट हे‌ कस काय झालं...

माहीत नाही मॉम मी झोपलो होते.अचानक आवाज,आला तर बघितले पिहु खाली पडली होती.आय थिंक ती धडकुन पडली.

दारच्या आवाजाने रोहिणी ,दमोदर जागे झाले एवढ्या रात्री कोण आले..ते ही बाहेर आले..विराट डाॅक्टर रुममध्ये चालेले होते.

रोहिणी चल काय झालं ..

हा..हा.

डाॅक्टर पिहुला चेक करत होते..डोक्यावरच रक्त काही थांबतच नव्हते..ड्रेसिंग केल्यावर थोड तिला ज्युस दिल्या वर तिला भोवळ यायच कमी झालं पण तिला काय त्रास होतेय हेच कळत नव्हते.


अंकल काय झालं ...पिहु ठीक आहे ना...


हो रे ठीक आहे ते जोरात डोक्यावर‌ पडल्याने त्रास होतोय.बीपी पण लो झाले......बाकी काही नाही -डॉक्टर


पिहु बेटा ‌‌...सुमन ने तिला नीट बसवलं ....बर वाटतं आहे का...

पिहू ने हळुच डोळे उघडले..हह. ती ऐवढच म्हणाली....

पिहु काय झोपेत चालायची सवय आहे का तुला -डॉक्टर

सगळे ब्लँक होऊन पिहुकडे बघु लागले...

पिहु ने एक नजर सगळ्यांना कडे टाकली.आणि सूमनकडे
बघितले.हा ते दररोज नाही,कधी तरी जास्त थकल्यावर ..ती शांतच बसली.

सगळे एकटक बघत होते.

विराट आधीच घाबरलेला हे एकून थक्कच झाला..किती वेळा झोपेत फिरुन आली काय माहित...

चला मी येतो.डॅाक्टर दामोदर‌कडुन बोलले..

हो ..थॅक्यु दामोदर हात मिळवत डॅाक्टरला बाहेर घेऊन गेले‌.

विराट ही त्यांच्यामागे गेला..

रोहिणी ची नजर स्टडीकडे गेली तर काऊचवर उशी आणि ब्लँकेट होती.त्यावरुन तिला आता चांगलीच ‌खात्री पटली ही नात काय सहा महिन्याच आहे .सुमन रोहिणी जवळ आल्या ताई चला झोपु‌ ...

रोहिणी सुमन कडे बघत-झोप मोडुन झोपु आता.का‌य काय तिच्या आईवडीलांना लपवलं काय‌ माहीत आधीच सांगायच ना अस काही आहे.


पिहुला ऐकुन डोळ्यातुन पाणीच आलं ती रोहिणी कडे बघत आई तस नाही.....कधी तरी होते अस ...

राहू देत. झोप आणि आम्हाला पण झोपु दे आता.त्या रागाने बोलुन निघून गेल्या...

सुमन पिहुजवळ आल्या तिच्या डोक्यावरुनहात फिरवत‌..तु नको मनाला लावुन घेऊ त्यांचा स्वभावच आहे....पिहु काहीच बोलली नाही...हम्म..आता झोप शांत उद्या लवक‌र उठायची काही गरज नाहीये आणि कॉलेजला ही नाही जायच ...

पिहु मानेनेच हो बोलली....सुमन गेल्यावर पिहु उठुन वॉशरुम मध्ये गेली.तीला आधीच घाबरल्यासारख होत होते..आणि रोहिणी तिच्या आईवडीलांनाबद्दल बोलल्यामुळे अजुन मनाला लागलं होते. डोळ्यातुन पाणी येतच होते...

विराट रुममध्ये पिहु त्याला दिसतच नाही तो घाबरुन गॅलेरीत बघतो....तो आत परत येतो तर‌ पिहु चेंज करुन आली..तो रीलॅक्स होत तिच्या जवळ येतो..

पिहु बर वाटत आहे ना तिच्या डोळ्यातलं पाणी बघुन तो तिला विचारतो..

ती नजर न मिळवातच त्याला हो म्हणते..डोळे पूसुन ती बेडवर बसते..

तो तिच्या जवळ परत येतो.पिहु तु र‌डतेस का, काय त्रास होतोय का..हे पेनकिलर घे बर वाटेल तो तिला काढुन तिच्या हातात देतो.
ती पेनकिलर घेते...काहीच बोलत‌ नसल्याने विराटला तिच काहीच समजत नव्हतं.

तो तिच्या शेजारी बसतो..पिहु,

ती त्याच्याकडे बघते..हह.ते सॉरी माझ्यामुळे सगळ्यांना त्रास झाला तिचे डोळे काटोकाटत भरत होते...


तस काही नाहीये तु उगाच काहीतरी बोलु नकोस ते काही कळलंच नाही म्हणून सगळे घाबरले..त्यात तुला चक्कर आल्यामूळे मी घाबरलो....बाकी काही ....जस्ट रीलॅक्स

तिच्या डोळ्यातलं पाणी काय थांबायच नाव घेतच नव्हतं...मूसमुस करत ती अजुन रडतच होती...

विराटला काहीच कळत नव्हते. काय बोलाव.....पिहु तु झोप आता शांत‌ मी इथेच आहे....

ती आडवी होत ब्लँकेट ओढुन घेते.....तुम्ही झोपा जाऊन मी ठिक आहे ती हळु आवाजात म्हणाली..

इट्स ओके ,तु झोप मग झोपेन मी ..

ती काहीच बोलली नाही ती एकटक बघत विचार करत होती....

विराट तिच्यावर नजर टाकत बोलु लागला,पिहु....

पिहु ने त्याच्याकडे बघितले ..हहह...

ते एक विचारायचे होते ....

हा बोला..ना...

तु झोपेत दररोज चालते का??😐

ती उठुन बसते...नाही ओ😥...ते मला खूपच कंटाळा आला तर ‌खूप‌ एक्जरशन झाल्यावर‌ टेशंन अस काहीतरी आणि मी झोपेतुन चालुन परत बेडवर येऊन झोपते..माझी मम्मी बोलली ..😔

काय...🙄

हो ..ते म्हणजे मला कळत नाही झोपेत, मम्मी ने सांगतिले मी दारापर्यंत जाते दाराला धडकले ना परत रिटर्न येऊन बेडवर झोपते.ते ही‌ शिस्तीत अस कधीच झालं नाही...आजच कस काय झालं कळलच नाही...

आणि दार उघडे असले तर‌ 😲😲

ती आडवी होते.. ते...मी....जो पर्यंत कुठली वस्तु धडकत नाही तो पर्यंत चालते मी मग कधी कधी पप्पा मम्मी धरुन झोपवतात ..ती हळुच बोलली

विराटला हसाव का रडाव झालं होते..काहीतरी नवीनच तो ऐकत होता😨😨 तो मनात बोलतो.नशीब दाराकडे माझ लक्ष असते लावलं कि नाही किती तरी वेळा पिहु दार उघडच ठेवते..इकडे गॅलेरी आणि इकडे दाराच्या बाहेर स्टेप..ती स्लाईडींगला धडकली आणि रीटर्न वळली तर टेबलावर जाऊन अदळली.असच झालं असणार तो विचार करतच होता.

त्याने पिहुकडे नजर फिरवली तर‌ तिला झोप‌ लागली होती.

डोक्याला तिला चांगलच लागल होते.तो उठला आणि परत सगळे डोर लॉक आहेत कि नाही आणि स्लाईडींगचा डोर लावला आणि बेडवर‌ च अंतर ठेवुन झोपला..त्याला सगळ हे अचानक झालं त्याची झोपच उडाली होती..तो‌ तिच्या चेहरयाकडे कितीवेळ बघत होता कधी त्याला झोप‌ लागली कळलच नाही.

सकाळी सातच्या आसपास त्याला जाग आली...पिहु अजुन झोपेतच कहणत होती.

विराटाने तिच्या डोक्याला हात लावला तर तिच अंग गरम झालं होते.... त्याने परत डॅाक्टरला फोन लावला.

हा विराट बोल

अंकल ,पिहुला फिवर आहे...

हो का...तिला मेडीसीन दे काल मी दिलेल्या कमी होईल संध्याकाळ पर्यंत .....

हम्म ,विराट फोन ठेवुन पिहु ला हाक मारतो...पण तिला चांगलीच झोप लागली होती...

त्याने तिच्या अंगावरची ब्लँकेट काढुन तिच्या मानेखाली हात घालुन हळुच उठवुन बसवलं पिहु....उठ..

पिहुची झोप चाळवळली,ती झोपेतेच होती...तिने बारीक डोळे उघडुन बघितले...डोक पण जड झालं होतं...ती डोक्याला हात लावतच मागे टेकून बसली.....

त्याने ‌खाली किचन मध्ये कॉल करून दूध मागवलं.....

पिहु हे धर मेडिसीन घे .दुध पिऊन झोप त्याने तिच्या हतात मेडीसीन दिल्या..तिने घेतल्या...दाराचा आवाज आल्याने त्याने दार उघडले...

सुमन आत आल्या विराट रात्री झोपली ना,

हो, आत्ता उठवलं फिव‌र आहे..

हो‌ का, सुमन डोक्याला हात लावतात... पिहु हे धर दुध पी हाय पाव‌रच्या मेडीसीन असते त्रास होईलं....

.
पिहु ने दुध घेतलं.

विराट आवर बाबांना बरोबर जायच आहे ना आवरुन बसलेत तुझीच वाट बघतात...

तो विसरुनच गेला होता.त्याला पिहुची काळजी वाटत होती..आणि जाण ही महत्तवाच होते...तो नाराज होऊन आवरायला गेला...

पिहुने दुध पिऊन ग्लास ठेवला.....

पिहु झोप तु...आता मी ब्रेकफास्ट करायाला थोड्यावेळाने उठवते......

पिहुची डोळ्यावरची झोप जातच नव्हती. ती लगेच झोपी गेली‌.
विराट टाय घालतच बाहेर आला...पिहु झोपली होती.

त्याचा फोन वाजला बांबाचा होता...त्याने पटकन आवरलं .....त्याने एक नजर पिहुवर टाकली त्याला बोलायच होतं पण ती झोपली म्हणून तो तसाच बाहेर आला..

अकारच्या दरम्यान पिहुला जाग आली...ताप सुध्दा कमी झाला होता. पिहु आवरुन खाली आली.....

अग पिहु खाली का आली....व‌रच मी नाश्ता पाठवला असता ना,

मला बरं वाटतयं आता, पिहु हलकं हसून बोलली....

ये बस नाश्ता कर आणि आराम कर दिवसभर खाली येऊ नको शांत झोप डोक दूखत नाही ना.‌‌......

जास्त नाही....पिहु नाश्ता करुन वर आली...तिने मोबाईल घेतला विराटचा एक पण मेसेज नाही कॉल नाही तिला वाईट वाटत होता साध एका शब्दाने विचारलं नाही..बर आहे कि नाही .....मी पण कोणाकडून अपेक्षा करते..ती स्वतःशीच बडबड करत बसली...राग सुध्दा येत होता...मोबाईल,स्विच ऑफ झाला चार्जिंग लवणार कि रुमचा लॅनलाईन वाजला तिच्या मम्मीचा कॉल होता.

विराट ची मिटींग झाल्यावर त्याने पिहुला कॉल केला पण मोबाईल स्विच ऑफ होता....त्याने लॅनलाईनवर लावला तर‌ तो तिने नीट ठेवला नव्हता.लागतच नव्हता.त्याने मॉमला केला....

मॉम पिहुला बर वाटत‌ का

हो आत्ताच ब्रेकफास्ट‌‌ करुन गेली रुममध्ये

मोबाईल लागत नाही तिला दे फोन ....

हा देते.....

गीता पिहुला मोबाईल देऊन ये .....गीता रुममध्ये आली

वहिनी हे धरा....गीता मोबाईल देऊन गेली.

हॅलो..

पिहु मोबाईल चार्जिंगला लावला नाही का स्विच ऑफ येतोय‌‌ किती वेळचा कॉल करतोय...तो रागताच बोलतो.

पिहुचा मुसमूसण्यांने नंतर तो शांत होतो....

अगं ते फोन लागत नव्हता म्हणुन .....

हहह

बर वाटत‌ं का ..

हो...

हम्म आराम कर...मी नंतर कॉल करतो...मोबाईल
चार्जिंगला लाव ....तो फोन ठेवुन देतो...

पिहु ला आंनद पण झाला आणि राग पण आला होता.....
तिला तिचच कळत नव्हतं..ती गालात हसतच होती...गीता मोबाईल मागायला आली...

हा हे धर पिहु स्वतःला सावरत बोलू लागली.

दूपारी विराट घरी आला .....तो रुममध्ये आला तर पिहु झोपली होती..तो तिच्या जवळ जाऊन हळुच कपाळाला हात लावुन टेम्परेचर‌ आहे कि नाही चेक करतो...ताप नव्हता.तो परत खाली आला...जेवण करुन निघून गेला......

संध्याकाळी पिहूला आता बर वाटत होते. ती उठुन फ्रेश झाली.
खाली येऊन आईशी ,सुधाशी गप्पा मारत बसली..

विराट आठच्या दरम्यान आला ....पिहुचा हसरा चेहरा बघुन त्यााला बरे वाटले.....

पिहूने एक नजर टाकली आणि परत सुधाकडे बघितले..विराट तिथेच सोप्यावर बसुन ब्लेझर ,टाय काढत‌ होता...

विराट फ्रेश होऊन ये....

हम्म....

विराट दुपारी कस काय आला तु, सुधा उगाच चिडवत बोलत होती...

पिहुची‌ कळीच खुलली ‌पण तस तिने दाखवलं नाही.....

विराटला अस वाटलं उगाच बसलो...ते आत्या,..माझी फाईल घ्यायला आलो होतो....तो अस बोलून पटकन उठुन निघुन गेला...


पिहुचा चेहराच उतरला...तिला वाटलं तिलाच बघायला आला होता...

सुधा आणि सुमन हसू लागल्या...त्यांना माहीत होते.जाताना काही हातात नव्हते...

पिहु जेवण कर. येईल विराट फ्रेश होऊन सुमन म्हणाल्या..

पिहु उठली आई मी नंतर जेवते .

का गं काय त्रास होतोय का...

नाही मला भुक नाही...

बर औषध घे मग जेव ,हम्म

पिहु मान हलवुन हो म्हणत , उठुन रुममध्ये जाऊन गॅलेरीत
थांबली.

विराट फ्रेश होऊन फोनवर बोलतच रुमच्या बाहेर आला..पिहुने वळुन बघितलं तर विराट गेला होता..!(साध आल्यावर पण विचारलं नाही).....

विराट खाली आला..त्याने नजर वळवली तर‌ पिहु त्याला दिसलीच नाही ..तो जेवायला बसला,मॉम

हा आले ...

सुमन ने त्याला जेवायला वाढले ..

मॉम पिहु जेवली त्याने नजर वळवत विचारले..

नाही ,नंतर जेवते म्हणाली...झोपली का

तो मॉम कडे बघतो..

अरे रुममध्ये गेली ...

नाही ये ती

तू नीट बघितला नसशील रुममध्येच गेली...

हो का.मी फोन वर बोलतच खाली आलो ....

जेव आता.

तो उठला थांब तिला बोलवुन आणतो.

वि‌राट जेवण कर नंत‌‌र जेवेल रोहिणी बोलल्या.

हा आलोच आई,अस म्हणत तो निघून गेला.

पिहुच्या आईचा व्हिडीओ कॉल होता ती गॅलेरीत बसुन तिच्या आई तिला काळजीने ओरडतच होती.

पिहु कस गं तु आधी सांगु दिले नाही तु बघ किती लागलं रेवतीच्या डोळ्यात‌ पाणी तंरगतच होते.

इकडे पिहुची पण तिच अवस्था होती..

मम्मी ...तिच्या डोळ्यातुन पाणी येऊ लागले...विराट ने साध आल्‌यापासुन विचारले नाही..दुपारी आले तर फाईल साठी आले ह्याच तिला वाईट वाटत होते...

विराट मागेच होता.तिच बोलण ऐकतच होता.

पिहु काय झालं का कोण काय बोललं का,

पिहु मानेनेच नाही म्हणाली.

मग काय झालं बाळा खुप दुखतय का .मी ‌येेते तुला
भेटायला ...

विराटने मागुन येऊन पिहुच्या हातातुन मोबाईल घेतला..पिहु दचकलीच..तु...म्ही...ते‌ मी

विराट ने मोबाईल नीट पकडुन आई...

त्याही घाबरल्या आता पिहुला विराट काय म्हणेल का
त्या घाबरतच बोलु लाग्ल्या विराट ती ते ...असच तिच काही मनावर ...

आई शांत रहा ...मी काहीही बोलणार नाहीये तिला ..आणि जास्त लागले नाही ..सगळे जण तिची‌ नीट काळजी घेतो..तरी ही तुम्ही येऊ शकता कधीही एवढ विचार करायाची गरज नाहीये..तो शांत समजुन सांगत होता..

विराट आहे विश्वास मला सुमनला मी चांगल ओळखते..ते पिहु ,लगेच घाबरते ..म्हणुन म्हटले मी...

पिहुला देतो एक मिनीट तो पिहुकडे मोबाईल देतो..आणि आत येतो.

पिहु नंतर बोलु ..आता जेवण कर आणि औषध सगळे नीट घे हळदीच दुध पी ...ठेव आणि जास्त काही त्रास वाटलं तर फोन कर .

हम्म...,पिहुने फोन ठेवला.

गीता जेवण घेऊन आली...भैय्या कुठे ठेवु

गॅलेरीत ठेव..

गीता गॅलेरीत आली.पिहुला काही कळेनाच गीता तुला कोण सांगितले

भैय्यांनी सांगितले...गीता सगळ जेवण लावुन निघुन गेली.

विराट गॅलेरीत एक बॉक्स घेऊन आला...पिहु त्याच्या हाताकडे बघत होती...तिला तो काय करतोय‌ तेच कळत नव्हते.

तो चेअर वर बसत तिच्याकडे बघून बस ना

हहह ते आपण,खाली जेवलो असतो ना इथे कश्याला ..

तु बसुन ही बोलु शकते....तो नजर रो‌खुनच बोलतो.

पिहु बसली ...त्याने तिला बॉक्स दिला ओपन इट ,

अहह..

तुला डोक्याला लागलं , कानाला नाही ओपन इट ....

ती त्याच्याकडे चिडुन बघते,आणि बॉक्स घेऊन रागातच उघडते त्यात चॉकलेट असते...ती हसते हे माझ्यासाठी ..

तो गालात हसतो..हो मी दुपारीच आणलं तुझ लक्ष गेल नाही साईडटेबलवर होते.

नाही, ती बॉक्सच रॅपर काढण्यात बिझी होती.

म्हणजे तु दुपारच्या मेडीसीन घेतल्या नाहीत ना.

ती हात ‌थांबवुन हळुच त्याच्याकडे नजर फिरवते...हा ते बर वाटतं आता आणि मी झोपेले होते.ती हळुच म्हणाली .

तो अजुन तिच्याकडे नजर रोखुनच बघत होता.आणि आता जेवण ही नको

नको आत्ता भुक नाहीये.

बघु तो बॉक्स इकडे त्याने हात पुढे केला.

तिने घाबरुन पटकन देऊन टाकला....

जेवण कर ...मेडीसीन घ्यायच्यात तो आवाज चढवुनच बोलतो.

ती शांत तिची प्लेट घेऊन जेवण केले. विराटने ही जेवण केलं

ती सगळ उचलत होती..तर त्याने तिला थांबवल गीता घेऊन जाईल राहू देत.

तिने हातात धरलेली प्लेट खाली ठेवली रागातच फ्रेश होऊन बेडवर जाऊन बसली...विराटने चॉकलेट्स फ्रीज मध्ये‌ ठेवले....त्याने मेडीसीन काढुन तिच्या समोर धरल्या,धर दुपारच्या का विसरली.मोबाईल चार्ज नाही रुममधला लॅनलाईन नीट ठेवला नाही,मग मी कस कॉन्टक करणार तो शांततेच तिला तिच्या चुका सांगत होता.

ते मी मोबाईल स्विच ऑफ झाला ..ऑन करणारच होते कि लॅनलाईनवर मम्मीचा आला .तो‌ तिला थांबवत‌ म्हणाला

मी तुला कस झालं हे विचारलं नाही..लगेच‌ कारणं देतेस परत अस होऊ नये याची काळजी घे.कालच रात्री ऐवढा मोठा इंसडन्ट‌ घडला मग भिती वाटणारच ना ..कालच तुझ्या साठी नार्मल असु शकते पण मला घरच्यांना नाही तो बोलत‌ होता..

तिचे डोळे लगेच भरले

तो बोलायच थांबला.सॉरी ,रडु नकोस आता...प्लिज
त्याला गिल्टी वाटत‌ होते चुकीच्या वेळेस आपण बोलतोय...पिहु..

मला लागलंय‌ त्याच काही नाहीये . माहीत आहेत तुम्हाला काही घेण देण नाहीये माझ्याशी पण ‌थोड तरी माणुसकी ती बोलायच ‌थांबते...

पिहु माझ तस म्हण नव्हतं ,तो तिच्या समोर बसतो..तो हळुच तिचे हात हातात घेतो..पिहु दचकुन त्याच्याकडे बघते....ती हात सोडण्याचा प्रयत्न करते.तो परत घट्ट पकडतो...

पिहु ,कालच तुला लागलं तु रुममध्ये एकटीच म्हणुन ‌थोडा राग आला होता..


तिची,हाताची चुळबुळ चालुच होती...हहह कळलं पण हात सोडा,तिच त्याच बोलण्याकडे कमी हाताकडे जास्त लक्ष होते.🙄


त्याने तिचे हात सोडले ‌..मी फक्त तुला कळाव म्हणुन .ठिक ये कस वागायच तस वाग. यु अर चॉईस ,पण थोडस मॅच्युअर बिहेविअर ठेव....

ती काहीच बोलली नाही मेडीसीन घेऊ लागली..

तो‌ उठला आणि स्टडीमध्ये‌ फाईल्स बघत होता..त्याच लक्ष तिच्या कडे गेलं ..पंध‌रा मिनीट झाले ती औषध घेत होती..दोन टॅबलेट ला इतका वेळ .तो तिच्या जवळ आला पिहु दोनच आहे..

अहहह ..घेतेय..😓 तिने डोळे घट्ट. झाकुन पटकन खाल्ली ..
तिचा चेहरा बघुन विराटला हसु आले....

तिने तोंडाला हात लावला ..तिला औषधांचा कडु वास सहन होत नव्हता.

त्यावरुन त्याला समजलं तिला उचमळत ..नो पिहु गॅलेरीत‌ वॉक कर वोमेट करु नको .. वेक अप त्याने तिचा हात पकडुन गॅलेरीत आणलं तो‌ंडावरचा हात काढ‌..

तिने हात काढला ...ती इकडुन तिकडुन फि‌‌रत होती.
विराटला तिच वागण बघुन हसाव का रागवाव अशी गत झाली होती.


मला बिलकुल औषध आवडत नाही.ईईईइ..ती चिडचिड करतच बोलु लागली.

कडु कोणालाच आवडत नाही..त्याने आतुन फ्रिजमधुन चॉकलेट्सचा बॉक्स आणून तिच्या समोर धरला...धर खा

नको मला द्यायच आणि परत मागुन घ्यायच ती रागानेच आत गेली.

पिहु ते चॉकलेट्स मेल्ट झाले होते म्हणून मागितले आणि जेवण केल्यावर‌ देणार होतो ...त्याने तिच्या हाताला पकडुन स्वतःकडे वळवलं आणि हातात बॉक्स दिला.ध‌र हे फक्त मी तुझ्यासाठी आणले होते..त्याने एक चॉकलेटच रॅपर काढुन तिच्या समोर धरलं हहह आ कर मी खाऊ घालतो‌.

ती मानेनेच नाही म्हणाली ...

तो बारीक डोळे करुन बघु लागला..त्याने पटकन तिच्या तोंडात टाकले.

ती हसु दाबतच बॉक्स फ्रीज मध्ये ठेवला.

झोप आता....

विराट आता हसून बोलत‌ होता तर तिला ही छान वाटत‌ होते.आणि‌ पहिल्‌यांदा तिच्या साठी तो चॉकलेट घेऊन आला होता.

ती ब्लँकेट घेऊन झोपली...विराटने सगळे डोर नीट लॉक केले‌
स्लाईडींग डोरपण लॉक केला.आणि बेडवर कडेला येऊन झोपला.‌
पिहु पटकन उठुन बसली.तु...म्ही‌...इथे

तो उठुन बसला आज पासुन मी बेडवर झोपणार आहे .

का😲 मी कुठे झो‌पु ...माहीतीये तुमचा बेड आहे पण मला खरच तिकडे झोप येत नाही..

त्याने डोक्यालाच हात मारला झालं आता ऐक तु आणि मी एकाच बेडवर झोपणार आहे...आणि दरवेळेस माझ तुझ करायचच असते का,

का पण

पिहु कालच तुला नॉर्मल वाटत असेल मला नाही परत अस काही तरी होऊ नये म्हणुन सगळे डोर लॉक आहेत काल स्लाईडींगचा डोर अर्धा ओपन राहीला म्हणुन तुला लागलं.

हा पण ते..

पिहु मला वाटतयं मी तुझ्या प्रश्नाच नीट उत्तर दिले आहे.त्याने ऐसीचा टेम्परेचर नीट सेट केला ब्लँकेट‌ अंगावर घेऊन आडवा झाला.

ती त्याच्याकडेच बघत बसली.

तो डोळे बंद‌ करून म्हणाला,पिहु झोप उद्या चर्चा करु

हहह ते

पिहु झोप ...

ती काहीच बोलली नाही त्याच्याकडे बघत आडवी झाली ..तिनें हळुच एक एक मध्ये पिलो ठेवल्या..

.

सकाळी पिहुला,जाग आली विराट पालथा झोपला,होता ब्लँकेट आर्धी खाली आर्धी वर ,केस विसकटलेले ,झोपेत पण कपाळावर बारीक आठ्या पडल्याच होत्या.ती स्वतःशीच हसली.उठुन हळुच ब्लँकेट नीट त्याच्या अंगावर ओढुन आवरायला गेली....

दोन दिवसानी पिहुला बर वाटु लागले.
.
.
.
.

सकाळी पिहु विराटला ब्रेकफास्ट साठी बोलावायला वर आली .विराट पेपर्स बघत फोनवर बोलत‌ फिरत होता..पिहु त्याच्याजवळ गेली..तो टर्न झाला आणि दोघांची टक्कर झाली
विराट ने घाबरून मोबाईल ,पेपर्स सोडुन तिच्या डोक्याला हात लावला पिहु जोरात नाहीना लागलं तो एका दमात बोलुन गेला..

अहं... नाही ऐवढ ती पण तिच डोक चोळत म्हणू लागली.

त्याने दोन्ही हाताने चेहरा धरून तिच्या कपाळाला फूंकर मारु लागला.

त्याने फुंकर मारली..तिच्या अंगाला गोड शहारा आला.

फोन वाजला.त्याने तिला सोडलं आणि मोबाईल घेऊन उचलला
पिहुने पेपर्स उचलुन त्याच्या हातात दिले...तो गालात‌ हसून परत‌ बोलु लागला.

पिहु परत त्याच्या जवळ गेली..त्याने बोलता बोलता हलकीशी स्माईल दिली आणि पाच मिनिटात ‌खाली येतो म्हणुन इशारा करत गॅलेरीत गेला.

पिहु पण त्याच्या,मागे घाईतच गेली....

तो,एक नजर तिच्यावर टाकतो..परत बोलायला लागतो ...पिहु थोडी जवळ जाते..बोलायच थांबुन दोन सेकंद तो विाचरातच पडतो ‌तो फोन कट करुन तिच्या कडे बघतो...काय हवं ..

ती हाताची चुळबुळ करतच बोलते ते...मला अजुन एकदा तुम्हाला टक्कर द्‌यायची..

का‌‌य?‌‌‌‌‌???तिच व्हियर्ड बोलण ऐकुन तो ब्लँक होऊन बोलतो.

अहो ,एकदा टक्क‌र झाली ना,परत‌ एकदा करायच असते भांडण होत नाही.‌...

अहह.🙄पिहु..(तो मनात विचार करतो अस जगावेगळ का बोलत असते काय‌ माहित😓)

अहो .....

हहह...तुला,कोण सांगितले ....

माहीत आहे मला ती डोळ्यानेच त्याला खाली वाक म्हणते

तो थोडी मान ‌खाली करुन डोळे झाकतो.

ती तिच्या‌ टाचा उचवंते .आणि त्याच्या डोक्याला टक्कर‌ देते...

तो लगेच शहारुन जातो तिच ते निरागस बोलण ,टक्कर मारण त्याला आवडलं होतं तो तिच्याकडे बघुन गालात हसतो.

ती त्याला गोड स्माईल देते...तिच्या गालावरची खळी बघुन त्याच्या अंगावर रोमांच उभारुन आला.

तुम्ही या ब्रेकफास्ट करायाला ती हसत बोलुन जाते.तो तिच्या कडेच बघत राहतो.पिहु तु वेड लावणार एक दिवस मला,तो मनातच हसुन बोलुन जातो...फोन वाजल्याने त्याची तंद्री तुटते तो पटकन फोन रिसीव करुन खाली येतो...पिहुने त्याला ब्रेकफास्ट दिला..

वहिनी मी येणार नाही आज कॉलेजला- वीरा

का- पिहु

मला स्टडी साठी वेळ हवा पुढच्या विक मध्ये exam आहे- वीरा

हम्म,पिहु तिच आवरुन रुममध्ये येते.

विराट विनाकाराण टाईम पास करत होता.. पिहुला बघुन तो गाडीत‌ बसला.पिहु बस मी सोडतो तो तिच्या कडे न बघताच बोलतो.

हहह... तुम्ही गेला नाही अजुन तिला माहीत होते खूप वेळ झालं विराटच आवरुन

तो डोक्याला अंगठा फिरवत काय सांगायचा विचार करतो,माझ काम होतं म्हणन थांबलो..झालं का विचारुन बस तो एक लुक देतो.

ती हसुन गाडीत बसते..

तो कार चालु करतो...

पिहुच बुक्स उघडुन काहीतरी चालुच होते.

पिहु ड्रेसिंग कोण केलं. त्याने तिच्या कपाळावर बघितलं तर‌ आर्धी जखम दिसतच होती.

ते मीच केली आत्ता ,ती खाली बघतच बोलत होती..

तुला ‌येते का ...छान केली .

ती हसते ,नाही मी फस्ट टाईमच केली ते पण घाबरत...

त्याने कार थांबवली....

ती पटकन सगळे बुक्स सॅक मध्ये टाकुन दार‌ उघडुन उत‌रली पुढे कॉलेज नाही हॉस्पीटल होते...आ वासुन बघतच राहते..
विराट बाहेर येत तिच्या पुढे जातो..चल ड्रेसिंग करुन जावु..

का?? ती घाब‌रतच विचारू लागली.

तु छान ड्रेसिंग करते ना इथे आपण डेमो दा‌खवु तो‌ रागात हसत बोलतो.

ती अजुन थांबलीच होती..त्याने तिचा हात पकडुन आत घेऊन आला.

डॉक्टर तिची नीट ड्रेसिंग करत होते.विराट इंफेक्शन होतं माहीत नाही का?‌?जखम अजून ओलीच आहे.कोण केली ड्रेसिंग डॅक्टर हसून बोलतात.

पिहु हळुच बोलली मी केली.

वि‌राट काहीच बोलला नाही‌ त्याने पिहु कडे एक कटाक्ष टाकला .पिहु ने लगेच मान खाली घेतली.

विराट ने तिला कॉलेजला सोडलं तिच्या कडे न बघताच निघुन गेला.

राग तर नाकावर आहे .पिहु स्वतःशीच पुटपुटली.

.
.
.
.

विराट ,देवेश मोहिते (त्रिशाचा भाऊ )चा कॉल आहे -मानव

विराट ब्लँक होत कॉल घेतला...

विराट ओळख आहे का विसरला -देवेश

विराट कुचक हसतो .बोल आज माझी आठवण आली ..

देवेश हसत-भेटुन बोलु .

विराट हो बोलून फोन ठेवतो.

काय म्हणत होता देवेश- मानव.

विराट विचार करत -भेटायच त्याला

विराट तु परत ,तसा विराटने त्याच्यावर कडकडीत कटाक्ष टाकला मानव पुढच बोलायच थांबतो.
.
.
.
.
कॉलेज सुटल्यावर पिहु विराटला कॉल करते सायलेंट वर असल्याने त्याला कळत नाही...ती पण परत करत नाही. ती घरी
निघाली ,विराट ने मोबाईल चेक केला तर पिहुचे चार मिसकॉल होते.त्याने पटकन तिला कॉल केला.

विराटचा कॉल बघुन ती खुश होतच उचलून बोलली.

पिहु काय झालं काही त्रास होतो का त्याने एकामागुन एक प्रश्न विचारले.

पिहु कापाळाला हात मारत हसते...नाही काही त्रास नाही मी ते सहज केला होता.तुम्ही बिझी आहात का.

होतो आत्ताच फ्रि झालो‌य..बोल तु घरी गेलीस का


चालले....तुम्ही सकाळी बोलला नाही ना म्हणुन कॉल केला होता.

तो गालात हसतो...नेक्स्ट टाईम नाही करणार अस

ती हसत फोन ठेवुन देते.पिहु घरी आल्याव‌र फ्रेश होऊन गॅलेरीत येते त‌र चेअरबरोबर मिनी सोफा होता.ती विचार करतच खा ली आ ली

आई रुममध्ये सोफा कोण ठेवला

सोफा का विराट ने पाठवला गॅ लेरीत ठेवायला सांगित ला ...
आवडला का

हहहह ...हो छान आहे.

विराटला रात्री याय ला उशीरच होतो.तो बाहेरुनच डिनर करुन आला होता.

पिहु रुममध्ये स्टडी करत बस ली.

विराट आत येताच ब्लेझर‌ काढत विचारु लागला आज क्लास नाही का...

नाहीये आज ,तुम्हाला जेवाया ला वाढु का ...

नको मी बाहेर गेलो होतो डिनर ला..तो फ्रेश होऊन आला.
पिहु सोफा आवड ला ...

अहं हो छान आहे पण अस अचानक!

तो गालात हसतो. तुझ्यासाठीच आणला आहे तु जास्त वेळ
गॅलेरीतच असते कधीही मी आलो तरी गॅलेरीतच बसली असते.सकाळी उठ लो तरी गॅलेरीत असते.मग विचार केला चेअर पेक्षा सोफा असला तर‌ तुला कंफर्ट बसता येई ल.विराट बोलत
बोलत गॅलेरीत जातो.

पिहु हसतच त्याच्या मागे जाते...त्याने तिला हात करत बस म्हणुन इशारा केला.

पिहु लाजुन हसतच बसते..तुम्ही पण या ...

विराट पण बसतो. पाऊसाची रिमझिम ,गारा वारा अंगाला हळुवार स्पर्श करत‌ होता.

पिहु पाय दुमडुन बसली...

विराटाने आतुन ब्लँकेट आणुन तिच्या खांद्यावर टाकली..पिहुने पण नीट अंगाभोवती फोल्ड केली.

पिहु छान आहे ना क्लाईमेंट .

हम्म ,‌खुप छान फि लींग आहे आणि त्यात चहा अस ला तर‌अजुन चारचांद 😍

हो मी म ला कॉफी मागवतो‌ तुला दुध ..तो जोरात हसत बो लतो..

ती गाल फुगवुन बघते.तुम्ही ऐक ले होते

तो मान हलवत हो म्हणुन हसतो.😆

😣मम्मी काय गं तु ती स्वतःशीच पुटपुटली.

त्याने फोन करुन कॉफी मागवली पिहुला दुध मागवलं.

हम्म ,हे धर ..

तो तिच्या कडे बघत बोलतो.पिहु गाण म्हण ना,

पिहु त्याच्याकडे चमकुन बघते काय‌???

अगं तु मला कधीच सॉन्ग म्हणुन दाखवली नाही,

पिहु लाजुन चेहारयावर हात ठेवते...विराट एकटक तिच्या कडे बघत हसत असतो.

हहह म्हणते,पण आवडलं नाही तर..

आवडेल तु्झा आवाज ऐकला मी तो कॉफी मग टिपॉय वर ठेवत बोलला.

कधी 🙄

आता तु साॅन्ग ऐकवणार आहे कि नाही...

ती लाजुन हसतच हो म्हणाली.पिहुने ब्लँकेट काढलं आणि
गॅलेरीच्या ग्रीलला पकडुन पावसाचे थेंब हातावर ‌खेळवत सूर
पकडला

💕💕💕💕💕💕

पल एक पल में ही थम सा गया
तू हाथ में हाथ जो दे गया
चलूँ मैं जहां जाए तू
दाएं मैं तेरे, बाएं तू
हूँ रुत मैं, हवाएं तू साथिया

हंसू मैं जब गाए तू
रोऊँ मैं मुरझाए तू
भीगूँ मैं बरसाए तू साथिया

साया मेरा है तेरी शकल
हाल है ऐसा कुछ आजकल
सुबह मैं हूँ तू धूप है
मैं आईना हूँ तू रूप है
ये तेरा साथ खूब है हमसफ़र

विराट उठुन तिच्या जवळ जाऊन थंबला.....पिहुने एक नजर वळवुन बघत‌िले.

तू इश्क़ के सारे रंग दे गया
फिर खींच के अपने संग ले गया
कहीं पे खो जाए चल
जहां ये रुक जाए पल
कभी ना फिर आए कल साथिया

एक मांगे अगर सौ ख़ाब दूं
तू रहे खुश, मैं आबाद हूँ
तू सबसे जुदा-जुदा सा है
तू अपनी तरह-तरह सा है
मुझे…
विराट हरवुन तिच्या कडेच बघत हळुच हात पुढे करतच तिच्या हातावर ठेवला...त्याचा स्पर्श होताच पिहुने डोळे घट्ट मिटले ...त्याने तिचा हात घट्ट पकडुन तो तिच्या थोडा जवळ आला....पिहुने घाबरून त्याला ढकलले. हात काढुन पटकन आत पळुन गेली.

ती आत गेल्यावर तो भानावर आला.त्याने चेहरयावरुन हात फिरवला.त्याला ही कळलं नाही तो कधी तिच्या वाहत‌ गेला...
तो आत आला तर‌ पिहु ब्लँकेट ओढुन झोपली होती..ती झोपली नव्हती पण विराट असा अचानक जवळ आल्याने ती पुर्ण घाबरली होती.

तो तिच्या जवळ येत सॉरी पिहु...मी ते

तिने काहीच रीसपॉन्स देत नव्हती म्हणुन हा पण शांत झाला.तो ही बेडच्या कडेला झोपला.

थोड्यावेळाने पिहुने हळुच ब्लँकेट काढलं .तो झोपला होता.
ती पण विचार करतच झोपी गेली

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

कसा वाटला भाग नक्की कळवा ,😊
मागच्या भागाला खूप छान प्रतीसाद दिल्याने मनापासुन धन्यावाद 🙏🙏

क्रमश:

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED