Reshmi Nate - 11 books and stories free download online pdf in Marathi

रेशमी नाते - 11

पिहु सकाळी उठली तर विराट,पालथा झोपला होता. झोपेतच तिच्या जवळ आला होता.त्त्याचा एक हात तिच्या पोटावर होता.‌दररोज सारखी ब्लँकेट त्याची थोडी खाली तर ‌थोडी वर पिहुला स्वतःशीच हसली.कोणाला वाटेल का हे असे झोपतात.... त्या पिलोचा काही़ उपयोगच नाही,सगळ्या अस्थाव्यस्थ झाल्या होत्या😂🤦🏻पिहुने हळुच त्याचा हात काढला....आणि आवरुन बाहेर आली.गॅलेरीत बाऊल मध्ये बर्डसला पाणी ठेवत होती..थोड ढगाळ मधेच सुर्याची कोवळी किरणे डोकावत होती....

विराटला जाग आली..तो डोळे चोळतच गॅलेरीच्या दिशेने बघु लागला.त्याची नजर पिहुवर गेली..कोवळ्या ऊनाची सोनेरी किरणे तिच्यावर पडली होती.त्यात‌ तिच रुप अधिकच खुलुन दिसत होते.नुकतीच अंघोळ केली होती...ओल्या केसामंधुन पाण्याचे थेंब टपटप गळत तिच्या पाठीवर,दंडावर पडत‌ होते...अंगावर एकही दागिना नव्हता....बर्डस पाणी पित असताना तिची गोड खळी पडणारी स्माईल 😍😚 उफ, विराटला अजुन काय लागत घायाळ होयला.. पिलो छातीशी कवटाळुन तिच रुप डोळ्यात साठवुन घेत गालात हसत बेडवर झोपुनच बघत होता..

पिहु आत आली तसे विराट ने पटकन डोळे झाकले.पिहुने एक नजर टाकली आणि बेडच्या शेजारच्या टेबलावरचे दागिने एक एक करुन घालु लागली. विराट ने हळुच डोळे उघडले आणि तिच्या कडे बघु लागला....

तिला जाणवल्यासारख झालं तिने विराट वर नजर टाकली तर विराट चे डोळे झाकले होते..पिहूने थोड संश‌याने त्याच्याकडे बघितले,पण त्याचे डोळे झाकले होते.तिने अलगद त्याची ब्लँकेट त्याच्या अंगावर नीट ओढली ...त्याने पटकन तिचा हात ओढला....

अहहह ‌...पिहु दचकुन त्याच्या अंगावर झुकली.

त्याने हळुच डोळे उघडले पिहुच्या ओल्या केसांचा स्पर्श त्याच्या चेहरयाला होताच तो हरवुन तिच्या डोळ्यात बघत होता..तिच्या परफ्युमचा सुगंध त्याला मोहीत करत होता...तो तिच्या चेहयारवरुन हात फिरवणार कि पिहु पटकन तिचा हात सोडवुन घेत नीट उभी राहिली....

हे बघा तुमच डोक चेक करुन या,माझ्या डोक्याला लागलं पण परिणाम तुमच्या डोक्यावर झाला वाटतयं पिहु चिडुनच बोलु लागली.

विराट जोरात हसत उठुन बसतो...हम्म ,मग अशी येत जाऊ नको ना, माझ्या समोर 😍😍

काय😲 अहो ,तुम्ही काय बोलताय भानावर आहे ना, पिहुने स्वतःचे केस गोळा करुन वर बांधुन,साडी नीट करत बोलली...

विराट पटकन बेडव‌र उठुन तिच्याकडे एकटक बघत येत होता ,पिहुला त्याच्या नजरेला नजर मिळवणंं खुपच जड झाले होते..

पिहु इकडे तिकडे बघत पाऊल मागे मागे घेत. हे...ब. ..घा...हा...तिला बोला‌यचच सुचत नव्हते..(ती स्वतःला सावरत मोठा श्वास घेत डोेळे मिटुन उघडुन त्याच्याकडे बघते.).हे बघा तुम्ही माझ्या पासुन लांब रहात जावा मला आवडत‌ नाही...हे...तुम्ही जे काही काल पासुन लावलं ते..ते..ती आवाज चढवतच बोलली..

त्याचा काहीच फायदा नाही .विराट एक पाऊल तिच्या जवळ टाकत येतच होता... ते...ते म्हणजे काय करतो ते तरी कळु दे मला..तो हाताची घडी घालुन तिच्या पुढे थोडा झुकुन क्यूटसा फेस करुन
तिच्या चेहरयाजवळ जात बोलतो.

पिहुला काय बोलाव कळतच नव्हतं ..ते...ते..मला जायच ती पटकन त्याच्या बाजुने जायला लागली .

विराट लगेच तिच्या समोर येऊन उभा रहिला..😁

तिने त्याच्याकडे बघत अ...हो...प्लिज ..जायच...( मला तिच्या तोंडातुन आवाजच निघत नव्हता )ती हळुच बोलली...😟

विराट गालात हसत तिचा रस्ता सोडत बाजुला झाला ..

पिहु हळुच एक नजर बघत निघु लागली.तसा विराट ने तिचा हात पकडुन मागे ओढले.पिहुच हृद्य जोरात धडधडु लागलं ..ती त्याच्या कडे न बघताच स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करु लागली...
विराट तिच्या हळुच कानाजवळ येत....पिहु तुला खरच कळत नाही का ..जाणुन घ्यायच नाहीये‌ तुला...हहह‌

अस म्हटल्यांवर पिहुच्या पोटात गुदगुल्या होत होत्या...गाल
लाल झाले होते...तिला काय बोलाव कळतच नव्हते....ती हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती...विराट ने हात सोडला..ती पटकन पळुन आत निघुन गेली.तिने मिरर मध्ये स्वतःला बघितले..श्वाची गती वाढली होती...तिलाच कळत नव्हते..विराट ने हात लावल्यावर तिच मन चलबिचल का होत .चेहरयावर लज्जायुक्त भिती पसरली होती..गाल लाल झाले होते. अचानक डिवोर्सच आठवुन तिच्या चेहरयाचा रंगच उडून जातो...विराटच्या मनात काय चालु तिला काहीच कळेना..आधी कधी विराट असा वागला नव्हता...आत्ता का अस अचानक ..ती विचार करत तिच आवरु लागली..
.
.

‌💓💓💓

.
.
.

पिहु सकाळपासून विराट च्या समोर गेलीच नाही..

विराटला वाटलं. सकाळीच जास्तच झालं . म्हणुन तो ही तिला न बोलवता आवरुन निघून गेला.पिहु , आज विराटची नविन डील साईन होणार आहे ना,.मग तु हे घाल सुमन पिहुच्या हातात बॅग देत म्हणाल्या..

आई कश्याला ...किती तरी साड्या, ड्रेसेस पडले आहे‌.‌...मी ते साडी..

पिहु तु काय पार्टीला साडी घालुन जाणार आहे का,हा गाऊन घाल सुमन ने बॉक्स मधुन काढुन दाखवला...

पिहु बघतच राहीली...तिने हाच गाऊन विराट बरोबर गेल्यावर तिथे बघितला होता...तिला आवडला ही होता..आई...कोणी आणला..

सुमन गालात हसतात..पिहुच्या गालावर हात ठेवत विराट ने आणला आहे..तुझ्यासाठी..

पिहु लाजुन खाली मान घालते...संध्याकाळी वीरा आणि तु आवरुन घ्या लवकर.

मॉम मला ड्रेस....वीरा पिहुच्या हातातला ड्रेस बघुन ओरडली‌.

सुमन कपाळालाच हात मारते...

मॉम हे तू चांगल केलं‌ नाही...मला काहीच घेऊन आली नाही ..😩😩😩

वीरा तुला हवा असेल तर घे हा‌..पिहुला जे सूचले ते बोलुन मोकळी..

पिहु ते तूझ्यासाठी आहे..विराटने तुला आणला..आणि वीरा तू तर काही बोल‌ुच नको ... सगळी तयारी करुन ठेवली आहे..आणि माझ्यापुढे नाटकं करते का..

वीरा जीभ चावते..हा..ते..झाली आहे पण अजुन एक दादा ने आणला असता तर हुम्म..

हो का...नखरे बंद‌ कर .किती आणलं तरी कमीच आहे...

रोहिणी मागुन येते..वीरा चल आपण आणु तुला काय आणायच ते...आता सुनेपुढे मूलगी दिसत नाही वाटत (रोहिणीला वाटते सुमन ने पिहुला ड्रेस आणला...)

पिहु- सुमन दोघी एकमेंकिकडे बघतात..

नाही आई मी असच बोलत होते..वीरा पिहुचा चेहरयाकडे बघुन म्हणाली..

वीरा आपण दोघी जातोय आता बाहेर सुमन परत असा भेदभाव करु नको,..तुला ही माहीत आहे वीराच्या बाबतीत मी काही खपवून घेणार नाही...

अहो ताई माझ.....

रोहिणी हातानेच थांबवत बस मला नाही ऐकायच ...वी‌रा आवर ..

आई मला खरच नकोय...माझी..

वीरा आता मी काही घेताना तुझी मर्जी विचारायच का तुला हवं नको...

वीरा ‌ शांतच होती..ती सुमन कडे एक नजर टाकते.सूमन डोळ्यानेच जा म्हणते.

आई आले मी आवरुन वीरा हसतच रोहिणीला हग करत गालावर किस करुन पळतच जाते..

रोहिणी खुश होत लवकर ये आहे मी बाहेर....सुमन कडे नजर टाकत रोहिणी निघून जाते.

आई मोठ्या आईंना राग आला का,..पिहुचा चेहराच उतरला होता..(ह्या साठी तिला कोणाकडून काही घ्यायची भितीच वाटायची.)

नाही गं,त्यांचा वीरावर खुप जीव आहे.म्हणून ..यांना वाटलं‌ ,मी आणले म्हणुन मला बोलल्या..तु मनावर घेऊ विराट ने आणलं बोलले असते तर काही वाटलं नसते.

ह्यांना ही खुप सवय आहे ना,मोठ्या आईची..

हो ,त्यांना खुप वर्ष मुलं नव्हते...विराट झाला तेव्हा माझ्याकडे कमी त्यांच्याकडेच जास्त असायचा ...आणि नमनला माझी सवय आहे.तु अजुन भेटली नाही ना,तो न्युर्याकला असतो..अजुन सात आठ महिन्याने येईल...

हम्म..

जा आता थोडा आराम कर मग आवरुन घे....

पिहु रुममध्ये येऊन ड्रेस बघत स्वतःशीच हसत होती..विराट दुपारुन घरी येतो पिहु रुममध्ये नव्हती.तो फ्रेश होऊन खाली येतो..मॉम पिहु कुठे दिसत नाही...

ती सुधाकडे आत्ताच गेली .का काय हवं होते का .

नाही ते असच

सुमन हसतात..माहीत आहे आता घरी आल्यावर तिचा चेहरा बघायची सवय झाली तुला..

मॉम...काही काय.

हो ,असच आहे..

तो मॉम कडे न बघताच रुममध्ये निघुन जातो.

संध्याकाळी वीरा ,दिपा पिहु एकत्रच तयार होत होत्या...मेकअप आरटीस्टने पहिले पिहुला तयार केले...

वहिनी किती छान दिसते...वीरा हग करत बोलते...

वीरा मी फस्ट टाईम अस काही वेअर‌ केलं...छान वाटतयं ना..उगाच

अगं वहिनी,खुप सुंदर दिसतेस-दिपा.

सुमन आत ‌येतात...त्या पिहुला बघतच राहतात..

मॉम वहिनीला सांग कशी दिसते किती छान वाटतं तर वहिनीच वेगळच ...

खुप छान दिसते..पिहु नेकलेस नाही का घातली...

हा ते रुममध्येच राहीला...

मामी मी घेऊन आले दिपा पळतच पिहुच्या रूममध्ये जाते...विराट फोनवर बोलत त्याच आवरत होता...

दादा वहिनीचा नेकलेस बघितला का ..दिपा रुममध्ये नजर फिरवत बोलत होती..

विराटने पण फोनवर बोलता बोलता नजर फिरवली बेडच्या साईडटेबलवर बॉक्स होता...त्याने फोन बंद केला..ते बघ तिकडे

हम्म..दिपा नेकलेस‌ बॉक्स उघडुन बघत होती.

(विराटला ती सकाळपासुनच दिसलीच नव्हती.तो घरी आल्यापासुन ती रुममध्ये पण आली नव्हती.)दिपा पिहूच आवरून झालं का..

हो,झालं आहे.

विराट ने पटकन शर्टच बटण तोडलं .(दीपा चालली होतीच )दिपा...

हहह..

पिहुला पाठवतेस का..

का ...

त्याने बटण दाखवलं..

दादा न्यु शर्टच बटण कस काय तुटलं ,तु तुझा डिझा‌ईनरच बदलं..

दिपा...(विराट रागात हसत )मला लवकर जायच आहे आपण नंतर बोलु...

हुम्म,दिपा खाली आली..वहिनी दादा बोलवतो....

का गं.. सुमन पिहुच्या गळ्यात नेकलेस घालत होती...

अगं मामी...नविन शर्टच बटण तुटलं..दिपा थोड जोर देऊनच बोलु लागली...

सुमन, वीरा, सुधा ओठ दाबत हसु लागल्या.

पिहुला ओशाळ्यालगतंच झालं ...ती लाजुन ‌खालीच बघु लागली

जा,पिहु बघ विराटला काय हवं‌

पिहु कोणाकडे न बघताच पटकन निघून गेली...ती गेल्यावर सगळे जोरात हसू लागले.

पिहु ने डोर उघडला..विराट ने वळून बघितलं .त्याच डोकचं सुन्न झालं... हातात वॉच घालत होता.ते कधीच गळुन खाली पडलं होते.

पिहुने मस्त रेडी चेरी कलरचा ऑफ शोल्डर फिश कट मध्ये गाऊन घातला होता....केस सेट करुन मोकळे सोडले होते...जास्त डार्क नाही ,पण शोभेल असा मेकअप केला.... आधीच तिचे ओठ
गुलाबाच्या पाकळीसारखे नाजुक त्यात डार्क चेरी कलरची लीपस्टीक ओठांना लागुन असलेले तीळ अजुनच चमकत होते. तिचे ओठ बघुन त्याचा श्वासच अडकला होता.‌ बांगडी कंगन असणारया हातात आज एक छोटेसे डायमंडच ब्रेसलेट होते..हातात नाजुक वॉच होतं ,गळ्यात छोटासा पेडंन असलेला नाजुक छोटासा नेकलेस ...दररोज साडी ,ड्रेसमध्ये असाणारी आज पूर्ण वेस्टन लुक मध्ये तयार झाली होती...ती होतीच नाजुक त्यात स्लीम फीटचा ड्रेस मध्ये बार्बी डॉल सारखीच दिसत होती.विराटची नजरच तिच्यावरुन हटत नव्हती...

पिहुला त्याच अस बघणं बघुन खुप लाजल्यासारख होत होते..पिहुने कस बस त्याला इग्नोर करत ड्रॅावर मधुन सुई धागा घेत होती..पण विराट एक नाही ना दोन नाही.नजर त्याची तिच्यावरच स्थिर झाले होते.

तिने त्याच्यावर नजर टाकली... ...केस जेल लावुन सेट केले होते... ब्लॅक कलरचा सुट घातला होता...गोरापान असल्याने ब्लॅक त्याला उठुन दिसत होते...त्याच्या बॉडीने तिच लक्ष विचलित करत होते.शर्टचे पुढची दोन तीन बटण लावली नव्हती...ती समोर उभी राहून नजर इकडेतिकडे करतच बोलु लागली...शर्ट द्या मी लावुन देते.

तिच्या गोड‌ आवाजाने काही तरी संगीत वाजल्यासारख झालं त्याची तंद्री तुटली..तो स्वतःला सावरत केसांमधुन हात घालुन दोन्ही हात पॉकेट मध्ये घालत‌ ...हह.....तु‌ काय म्हणाली (😂 त्याला पिहु काय बोलली ऐकुच आले नाही)

पिहुने नजर रोखून बघितलं ...डोक्याबरोबर तुमचे कान पण चेक करून या..

विराट हसला..ठीक ये करतो..आता तरी सांग. तो थोडा पुढे झुकत बोलला.

शर्ट द्या ,मी बटण लावुन देते.पिहु सुईमध्ये धागा घालत बोलु लागली..

अ..🙄( नाही तिथे डोक लावून बटण तोडलं आणि शर्ट काढुन देऊ..विराट मनातच विचार करु लागला .)

अहो..

अहं.....ते तु असच लाव मी काढ घाल करणार नाही.

नाही नाही...तुम्ही काढुन द्या..(पिहुला त्याच्याजवळ जायलाच भिती वाटत होती)...

पिहु लेट होतोय...

नाही होणार मी फास्ट लावते.तुम्ही बोलून टाईम वेस्ट करताय...

( एका शब्दात ऐकतच नाही..विराट दात ओठ ‌खाऊनच तिच्या कडे बघु लागला.)

पिहु अस लावायच नसेल तर‌ मी असच निघून जाईल त्याने रागातच वेस्ट कोट आणि ब्लेझर उचलला ,दारापर्यंत गेला
(त्याला ही माहीत आहे पिहु काहीच बोलणार नाही जातो तर जा अस आहे तिच😂😂)त्याने तिच्याकडे बघितले.

पिहुचा चेहराच उतरला ती तशीच खाली मान घालुन थांबली होती..त्याने रागावर कंट्रोल करत परत ब्लेझर वैगेर ठेवला आणि तिच्या समोर उभा राहिला....त्याने झुकुन तिच्या चेहरयाकडे बघितलं.तिने नज‌र वर करत त्याच्याकडे बघितले...

त्याने तिच्या हातात बटण दिलं... क्यूटसा चेहरा करुन इश्यारयातच प्लिज बोलला आणि नीट उभा राहीला...तो ऐवढं प्रेमाने बोलत होता.पिहुला ही आता नाईलाज होता.ती थोड अंतर ठेवुन एका हाताने हळुच त्याचा शर्ट पकडुन बटण लावु लागली.

विराट तिचा निरागस चेहरा बघुन अजुन प्रेमात पडत चालला होता.नकळत त्याचे हात तिच्या कमरेवर गेले.पिहु दचकलीच सुई विराटला टोचली.

अहह..

पिहु ने पटकन सुई मागे घेतली... खूप जोरात टोचल का.
ती घाबरुन त्याच्या छातीवर चोळत त्याच्याकडे बघत बोलु लागली.

विराट गालात हसत मानेनेच नाही म्हणतो.त्याने तिच्या कमरेला हाताचा विळखा घातला..म्हणुन थोड जवळ येऊन लाव ...यु आर लुकींग व्हेरी ब्युटीफुल 😍 त्याने चेहरा थोडा खाली घेत तिच्या कडे बघत बोलला.

पिहु काहीच न बोलता बटण लावत होती.पिहु जवळ जात हुळच दाताने धागा तोडाला.त्याचा मोहक परफ्युमचा सुगंध तिला सतवत होता...

विराटही तिचा स्पर्श डोळे झाकुन अनुभवत होता..

पिहु मागे सरकली...पण त्याचा हाताने तिला अजुन सोडल नव्हतं..

त्याने डोळे उघडून तिच्याकडे बघितलं . तिची हनवुटी एका हाताने अलगद पकडुन तिचा चेहार वर केला...पिहु ड्रेस आवडला...

पिहुची नजर अजुन ‌खालीच होती..तिचा हात त्याच्या शर्टच्या बटणाकडे गेला..दोन तीन बटण राहीलेली लावत, मानेनेच हो बोलली.

मग तेव्हाच का मागितली नाही मी विचारलं होतं ना..

मला नाही मागावस वाटत ....ती पुढच बोला‌यच ‌थांबली...

त्यालाही कळाल‌ं त्याचे शब्द तिला कुठलाही त्याच्यावर हक्क दा‌खवायला थांबवत होते. तेव्हा तो सहज बोलून गेला मागचा पुढचा विचार न करता..पण ती नाही विसरली....तिच्या मनाला खुप लागलं होते.(नाही ते स्वप्न बघु नकोस. फक्त सहा महिनेच राहियचं बायको बनण्याचा तर प्रयत्न मुळीच करु नको )त्याला गिल्टी वाटत होते..आपण रागाच्या भरात तिला किती हर्ट केलं .

त्याने तिच्या गालावर हात ठेवला. पिहु ....

पिहुने नजर वर करुन त्याच्या डोळ्यात पाहिले..

आय अम सॉरी...हा शब्द‌ पण खुप लहान आहे...पण एक चान्स तरी देऊ शकते ना....तु का स्वतःला अडवते कळतयं मला ...मी ही तुला कुठल्या गोष्टीसाठी फोर्स करत नाहीये...माझी चुक सुधरण्यासाठी एक चान्स अहह..त्याने तिच्या गाालावर वरुन हळ‌ुच अंगठा फिरवत बोलला.

तिने गालावरचा ‌त्याचा हात काढला...त्याने ही तिच्या कमरेवरचा हात काढला...

मला तुमच्यावर‌ विश्वास नाहीये...कधी तुम्ही काय बोलसाल..कळत नाही..आणि सहा ‌‌महिने झाल्याशिवाय तर‌ मुळीच नाही.

विराट ने तिचे दोन्ही हात हातात घेतले.हो मान्य आहे ..कधी मी तुला विश्वासातच घेतलं नाही...पण ‌थोडा तरी विश्वास ठेवु शकते ना...

ती त्याच्या डोळ्यात पाहून मानेनेच हो म्हणाली.तो गालात हसतो.....

आवरा आता लेट होईल..

हम्म..त्याने तिच्या समोर टाय धरला..तु बांधुन दे‌णार का...

अहं ..मला ‌‌येत नाही...

काय ??😓 ठिक ये आता वेळ नाही ‌ शिकवायला .पण नंतर मी शिकवतो ..

पिहुला काय बोलाव कळलंच नाही. मी आलेच आई बोलवतात अस बोलुन ती पळुन गेली..

अगं ऐक तरी...तो हसत त्याच आव‌रुन घेतो...मॉम मी पुढे चाललो...विराट सांगुन निघुन जातो.
.
.
.

.

देवेश विराट आल्यावर त्याच्याजवळ जात हे विराट किती वेळची वाट बघतोय...चल ये.

विराट सगळीकडे नजर टाकुन पार्टीची अरेंजमेंट बघितली..हम्म नाईस ...

तू जेवढा वीराव‌र जीव ओवाळून टाकतो ना,मी माझ्या त्रिशावर तेवढच प्रेम करतो....तिने काय मागितलं आणि मी तिला दिलं नाही अस झालच नाही....ती बघून खुश होईलं..

विराट ने त्यावर काहीच रिसपॉन्स केला नाही....

आठच्या दरम्यान सगळे व्हेन्यू वर आले...पिहुला गर्दीची भितीच वाटत‌ होती‌ कधी गेलीच नव्हती ती अस कधी पार्टीज वैगेर..
लग्न झाल्यापासुन तिला हे कळालं होते...

विराट ची नजर पिहुवर पडली तिच्या चेहरायावरुनच त्याला जाणवले...विराट जवळ आला..मॉम वीरा कुठे ..दोघांची नजरानजर झाली.

वीरा ताईंबरोबर आहे येत आहे -सुमन

हम्म..

सुमन, सुधा पूढे गेल्या.

विराट पिहुच्या जवळ येत तिच्या समोर हात धरला. ..पिहु

ह..हो ,पिहुने पण हसत तिचा हात हातात दिला.

दोघे जण येत होते. तर आलेल्या लोकांच्या नजरा त्यांच्यावर
पडल्या.. पिहुला लोकांमध्ये आणायची विराटची पहिलीच वेळ होती..लग्न झालं हे माहित होते.पण लग्नानंतर त्याने कुठली पार्टी ,रिसेप्सन अस काहीच ठेवलं नव्हते.घरात पूजा ठेवली त्यात पण क्लोज रीलेटीव्ह ,फ्रेड्ंस आले होते.आज पहिल्यांदा त्याने पिहुला स्वतःसोबत आणलं होते‌....त्यांची जोडी बघुन लोक जवळ येऊन विराटला कोंग्रज्युलेशन करत होते.विराटने ही पिहुला ओळख करुन दिली.

थोड्यावेळाने पिहुला सुमन शेजारी आणून सोडले.विराट निघुन गेला‌.सुमन ने पिहुला काही लोकांशी ओळख करुन
दिली.रोहिणी ,वीरा, दिपा पण आले.

थोड्यावेळाने त्रिशा आली....तिने शॉर्ट ब्लॅक कलरचा वनपिस घातला होता..ती आल्यावर सगळे तिला विश करत होते.पण तिची नजर विराटला शोधत होती..त्रिशाची नजर पडलीच विराट वर ती थोडस बोलुन तिथुन विराट कडे आली.त्याच्यामागे थांबुन तिने मागून त्याचा हात पकडला.तसा विराट गोंधळुन मागे बघु लागला.
त्रिशा हसत त्याचा हात हातात घेऊन तु करणार नाही का,विश मला

विराटने इकडे तिकडे नजर टाकली. राग आला होता.पण त्याला त्याची इज्जत खुप प्यारी ...त्रिशाचा स्वभाव माहीत होता गोंधळ घालण्यात तिचा जवाब नाही .तो‌‌ कुचकपणे हसत हात काढुन हॅपी बर्थडे त्रिशा..

त्रिशा हसून थँक्यु म्हणते..ती थोडी जवळ येत डोळे मिचकावत बोलली. यु लुक हॉट ....बेबी...

पिहुची नजर पडली...त्रिशा विराटच्या खुप जवळ होती....वीराने हाक मारली म्हणुन पिहुने तिच्या कडे बघितलं

विराटने रागात एक कटाक्ष टाकला आणि दुसरीकडे निघुन गेला.त्याचे मित्र आले तो त्यांच्यात शामिल झाला....

विराट भाभी कुठे आहेत ,लग्न केलं साध सांगितले पण नाही'-रितेश(मित्र)

तुला बोलवलं असते तर त्याच्या लग्नालत जेवणच संपलं असते ना-सुजित

मला वाटलं तु आता सिंगलच राहणार आहे .आपल्या बरोबर विराटला फॅमिली ट्रीपला फक्त आपली मुलं संभळायाला घेऊन जाव लागणार - यश 😆

तु नंतर भेट बघतो तुला ,विराट रागात हसतो. यावर सगळे हसतात....

विराट पिहु कुठे नजर वळवुन बघतो...वीरा पिहु बोलत होत्या
...तो पिहुजवळ आला

पिहु एक मिनीट -

पिहु त्याच्या जवळ गेली ....हा बोला.

माझे फ्रेंड्स आलेत ओळख करुन द्यायची होती.त्याने तिचा हात धरला.आणि फ्रेंड्स कडे आणलं ...सगळे पिहुकडेच बघत राहीले...चेहरयावरुन तिच शांत ,निरागस रुप दिसत होते.

पिहु हे माझे फ्रेंड्स सुजित ,रितेश ,यश, पवन आणि मानवला तु ओळखत असेल
.
सगळे एक एक करत पिहुला हाय करतात....पिहु पण छानशी स्माईल करते...

पिहु विराट कडे बघते.मी आईंकडे आहे...

तो गालात हसत हो म्हणतो.

पिहु निघुन जाते विराट जाताना तिच्याकडे बघत असतो...

यश विराटच्या गळ्यात हात घालत -विराट तु कधी कुठल्या मूलीला भाव दिला नाही.आणि आत्ता भाभी वरुन नजर हटत नाही..हह सगळे त्याची खेचत होते...

विराट गालात हसत आधी कोण भेटलीच नाही अशी....

सगळे अजुन हसतात .


थोड्यावेळाने देवेश आणि विराट त्यांच्या न्यू प्रोजेक्टची अनाऊस्मेंट करतात..देवेश शॅम्पीयनची बॉटल उघडतो...थोड तो पिऊन विराटला ही पिऊ घालतो...सगळयांचा,जल्लोष चालु असतो.

विराट दोन वर्षापासुन स्वप्न बघत होता.आता ते पुर्ण होणार होतं त्याच्या चेहरावर समाधानकारक हस्य होते...

पिहु फक्त बघत होती.काय चालु आहे .

देवेश त्रिशाला बोलवतो.केक कटींग होते.त्रिशा केक कट करुन पहिले विराटच्या समोर धरते.विराट त्या केक कडे एकदा आणि मॉम वर नजर टाकतो.सूमनचा चेहरयावर एक भितीदायक हस्य होते...पिहु पुर्ण ब्लँक होऊन दोघांना कडे बघत होती.
विराटने थोडा केक ‌खाल्ला,

विराट मला नाही खाऊ घालणार त्रिशा प्रेमाने बोलते.तो केक घेऊन तिला भरवतो.आणि दूसरीकडे जाऊन उभा राहतो.
सेलिब्रेशन झाल्यावर‌ पार्टीला रंग चढला होता...

विराट तर नंतर गेस्ट मध्येच शामिल झाला. बाकीचे पण सगळे ओळख असलेल्या मध्ये शामिल झाले.पिहु शांत कोण येईल त्यांच्या बरोबर बोलत होती.तिला हे पार्टीज वैगैरे तिच्या साठी नविन होते...

पिहु ...मागुन आदीने हाक मारली....

पिहु मागे वळुन आदिला बघते तु कधी आला .

मी खुप वेळ झालो आलो पण काय तुझ लक्षच नव्हते.तो पण नाटकी चेहरा करत बोलतो...

पिहु हसते, अरे किती जण आहे कोण लक्षातच येत नाही...

हम्म...आदीला वेटर बोलावतो.. ज्युसचा गॉल समोर धरतो... धर .

पिहु घेते ..थँक्यु

आदी वाईनचा ग्लास घेत तोंडाला लावतो.

पिहु त्याच्याकडे एकटकच बघत राहते...

आदीला जाणवते...तो ग्लास खाली घेत मी ते पिहु कधी तरी विराट सारख अस पार्टीमध्येच घेतो.. तो अडखळत बोलतो.

पिहु काही न बोलता ज्युस पिते. रोहिणी पिहुला हाक मारते...

आदी आले हह ,आई बोलवत आहे.

हो हो..

पिहु रोहिणी जवळ जाते.रोहिणी तिच्या मैत्रिणींशी ओळख करुन देते...पिहु पण सगळ्यांशी हसत बोलते.

रोहिणी सुनेच्या माहेरचा बिसनेस काय आहे ..त्यातली एक मैत्रिण बोलते.

बिझनेस नाही गं ,तिचे वडील बँकेत जॉब करतात. रोहिणी कुचक हसत सांगते.त्यावर‌ सगळे जरा वेगळीच स्माईल देतात.

पिहुला आतुन वाईट वाटले होते.पण व‌रवर ती पण गालात हसते.

पिहु , वीरा कुठे आहे बघ..रोहिणी हसत बोलते.

पिहु हो म्हणुन थोडे पुढे ‌येते...

त्यातली एक मैत्रिण बोलते. रोहिणी लव मॅरेज़ असलं तर समजु शकतो. पण दिसायला सुंदर असली म्हणुन काय झाले.विराट साठी तुमच्या स्टेटसला शोभेल अशी मूलगीं शोधून आणायची ना,तु.....

पिहुचे पाय‌ तिथेच थांबतात..मन जड झाले होते.

अग सुमन ऐकते का माझ स्वतःच ‌खर करायच असते...विराटला पण बरोबर तयार केलं तो ही आईच्या पूढे नाही ,..माहीत आहे ना विराटच सुमन पुढे काही चालत नाही.त्याच्या साठी़ किती छान मुलींची स्थळ येत होते...सुमन साध्या घराची करयाची होती.आपण काय बोलणार हुहह.

पिहुने डोळ्यातलं पाण्यावर सावरत अवंढा गिळत पुढे निघुन गेली..
ती शांत एका चेअर वर जाऊन बसली तिची आता इच्छाच नव्हती कोणाशी बोलायची... (बोलण तर काय आहे ..हा ड्रेस कितीचा ही ज्वेलरी ,आणि ते फक्त सगळ्यांच इथे कॉपींटीशन चालु असते.माझ्यापेक्षा भारी कोण नाही.. हे पिहुला सग्ळ्याच्या बोलण्यातुन जाणवत होते.)फक्त अपमान करणारे लोक जास्त आहे.वर एक मनात एक अशी ही लोक...

विराटच लक्ष तिच्यावर गेलं .तो तिच्या जवळ येऊन तिच्या शेजारच्या चेअर वर येऊन बसला. पिहुच लक्षच नव्हतं ती टेबलावरच्या ग्लासशी खेळत विचार करत बसली.

पिहु त्याने हळुच आवाज दिला.

पिहु भानावर‌ आली.अहह..तुम्ही ...

विराट गालात्याल्या गालात हसत- एकटी का बसली...

काही नाही असच ...बसले.पिहू वरवर हसत बोलु लागली.
(विराटला ही जाणवत होते.तिला अश्या वातावरणाची सवय नाही .तरी ती एॅडजेस्ट करते)

पिहु सगळ्यांनी माझ्याबरोबर पिक्स किल्क केले ..वीराने तर तुझ फोटोशेसन केलच असेल ...विराट तिच मन वळवण्यासाठी हसत बोलतो.

पिहु हलके हसून मान हलवुन हो म्हणते.

मी काय म्हणतो मी ही ठीकठाक दिसतो .माझ्याबरोबर पण फोटोज काढु शकते तो जरा खोटा चेहरा पाडत म्हणतो.

पिहु खळखळून हसते.तुम्ही खुप हॅन्डसम दिसता..ती बोलुन गेल्यावर तिच्या लक्षात येताच ती जीभ चावुन दुसरी कडे मान वळवुन बघते.

विराट हसत थोड तिच्या कानाजवळ येतो...खरच का,तारीफ आवडली .थँक्यु ...

पिहु लाजुन हसत त्याच्याकडे बघते...

तो त्याच्या मोबाईल घेऊन कॅमेरा ऑन करतो... पिहू मी हात ठेवु शकतो का... तो खांद्याकडे बघत विचारतो.

पिहु मनात विचार करते ,घरात तर न विचारता कुठेही हात लावतात.आणि ईथे व्हा‌‌..

त्याला तिच्या मनात काय चालु आहे हे कळताच तो हसतो...तुला वाटत असेल घरात काहीही..अअ..आणि इथे विचारतो.

पिहु गोंधळुन बघते.

अग घरात राग आला मारली तरी फरक पडणार नाही चारचौघात कुठे तरी रागात मारली तर..तो जोरात हसत बोलतो‌

पिहु तोंडावर हात ठेवुन हसु लागते...

विराट ही तिच्याकडे बघुन हसत असतो...पिहु लाजुन झालं असेल त‌‌र फोटो काढायचा का.

पिहु पण सगळं विसरुन हसून हो म्हणते.केस नीट करून उभी राहते...विराट ही तिच्या कमरेवर हात ठेवत तिला जवळ घेतो.

पिहु त्याच्या चेहरयाकडेच बघत असते...पिहु तु स्माईल केल्यावर तुझी गोड खळी दिसेल ना तो फुल रोमँटीक अंदाजमध्ये बोलतो..पिहु हसते... विराट पटकन तिची खळी कॅप्चर करत दोघांचा छान फोटो काढुन घेतो...

त्यात त्याचे मित्र दोघांना बघुन लगेच जवळ त्याच्या मोबाईल हातातुन घेतात.पिहु घाबरुन विराटला ढकलत होती..बाजुला सरकण्यासाठी पण तो कसला सोडतो‌य.

अरे मित्र नसल्यासारखे स्लेफी काढतोस..नीट पोज द्‌या मी काढतो.

विराटला ही तेच हवं तो छान पिहुला जवळ घेऊन फोटोज काढुन घेतो..पिहुला तर ऑकवर्ड वाटत‌ होते.पण त्याच्यापुढे तिच‌ं कधी चालाव...

पिहु पटकन बाजुला होते.

त्रिशाची नजर विराट पिहुवर पडली.तिला तर पिहुला बघुन राग येतच होता.ती एका घोटात वाईनचा ग्लास रिकामा करते....रोहिणी तिच्या जवळ येते...त्रिशा बघत फक्त नशा करत बसणार आहे का,.

त्रिशा रोहिणी कडे बघते...तुम्ही काही करता कि नाही ...विराट अस पिहुला बघण वेगळच सांगुन येत आहे.

रोहिणी हसते .त्रिशा आता सुंदर मुलगी दिसल्यावर कोणीही पिघळणारच कि ... तु बघत बस अजुन काय करणार ...

मी पिहुचा जीव घेईन ती विराटच्या जवळ जरी गेली तरी ..

रोहिणी डोक्यालाच हात मारत तिच्या हातातला ग्लास काढुन ठेवुन टाकतात...कधी तरी डोक वापर विराटला जवळ करण्यापेक्षा पिहुला विराटच्या लांब कस ठेवायच तो विचार कर.

म्हणजे..काय करु..

तु फक्त पिहुला जाणीव करून दे.लग्नाआधी तुझ आणि विराट अफेयर होते लग्नही करणार होता.पण विराटच मन नसताना त्याने तूझ्याशी लग्न केलं .सहा महिन्यानंतर तुम्ही दोघं लग्न करणार आहे...पिहुशी मैत्री वाढव तिच्या बरोबर राहुन तिला तु किती विराट वर प्रेम करते ते दा‌खव ..तिला फिल होयला हवं .ती तुमच्या दोघांमध्ये आली...मग काय पिहु स्वतःहुनच सोडुन जाईलं .
मग विराट एकटा असला तर तुला पुढच काही सांगायची गरज नाही.

त्रिशा हसते...हे डोक्यातच आले नाही.

माहीत होते मला ...तुझ डोक गुडघ्यात आहे.

त्रिशा निघुन जाते.

.
.
.

.

सगळे कपल डान्स साठी एक एक स्टेजच्या‌ दिशने जात होते.

वीरा विराट जवळ येते दादा चल ना,डान्स करु ..विराट गालात हसत तिच्या बरोबर जातो...

छान सॉन्गस लावले होते. सुमन ,पिहु दोघांना बघत हसत होत्या.

त्रिशा विराटला बघुन लगेच येऊन थांबते..ती वीराला हाताने खांद्यावर टॅप करते.वी‌रा विराट दोघेही तिच्या कडे बघतात...

वीरा ...मे आय.. त्रिशा प्रेमाने बोलते.

वीरा हसत हो म्हणून बाजुला होते...आणि आदीकडे जाते.

विराट रागाने लूक देत निघुन जातच असतो.कि त्रिशाने हात पकडला...

विराट रागावर कंट्रोल करत तिच्याकडे बघतो.विराट बेबी ,अस करु नको...हह एक डान्स प्लिज ,

तो इकडे तिकडे बघत पिहुकडे नजर फिरवतो...तिच लक्षही नव्हतं त्याच्या डोक्यात वेगळच पिहुला थोड जेलेस होते का कळेलं तरी म्ह़णून त्याची इच्छा नसताना तो तयार होतो.
दोघेही डान्स करत होते...विराट च लक्ष सगळ पिहुवर त्रिशा फक्त डोळे भरुन त्याच्याकडेच बघत होती..विराट माझ्यात‌ काय कमी आहे सांग ना...ती पाणवलेल्या डोळ्यांनी बोलत होती.

पिहुच लक्ष जाते दोघ बोलत होते.

विराट तिच्या कडे बघतो..तुझ्यात काही कमी नाहीये त्रिशा पण तुझा हट्टीपणा सोड ..मी कधीच तुला त्या नजरेने बघितलं नाही.तुला मी एक फ्रेडं‌‌च्या नजरेनेच बघितलं आहे.

विराट मी तुझ्याशिवाय कोणाला आपल्या जीवनात स्थान देऊ शकणार नाही मी वेडी होऊन जाईन तु मिळाला नाही तर ..

त्रिशा ,ह्या विषयावर बोलुन काहीच फायदा नाही...विराट चिडुन तिला बोलतो. विराटच लक्ष पिहुकडे गेलं तिने लगेच नजर फिरवली.तिच्या हातांनी त्याच उत्तर दिलं होते.ती चिडली कि नेल्सची नेलपेंट काढत असते हे त्यानी नोटीस केलं होते.

त्रिशा विराट कुठे बघतो म्हणुन मागे वळुन बघते तो पिहुकडे बघत होता...त्रिशाचे डोेळे रागाने लालबुंद झाले होते...विराट पिहुच्या अस काय आहे ऐवढ ..दिसयाला मी ही सुंदर आहे...

विराट हसत त्रिशाकडे बघतो..त्रिशा वरुन सुंदर असण्यापेक्षा आतुन मन सुंदर असायला हवे ते पिहुकडे आहे...वरची सुंदरता काय कधी कधी ना संपुन जाते.पण मनाची सुंदरता कायम तशीच‌ राहते...ती बोलणार कि विराट तिच्या पासुन लांब होत एक्सक्यूज करत निघुन जातो.

त्रिशाचा राग अनावर होत होता..ती जाऊन ड्रींक घेत बसली.

तो पिहुजवळ येतो..पिहु एक नजर टाकुन मोबाईलमध्ये बघते...
पिहु डान्स करणार माझ्यासोबत तो गालातल्या गालात हसत बोलतो.

मला येत नाही ती किचींत चिडुनच बोलते..

तो हसत-मी आहे शिकवतो..

मला येत नाही बोलल ना.. नाही तर भरपुर जण आहेत तूम्हाला डान्स करायला त्यांना शिकवा.ती रागातच बोलते.

विराट स्वतःच हसु कंट्रोल करतो.मॉम तो सुमन कडे बघत हाक मारत‌ो.

पिहु दचकून विराट कडे बघते..

सुमन जवळ येतात...काय विराट ,

मॉम,पिहुला किती ‌वेळचा म्हणतो डान्स करायला चल तर येत नाहीये....तो नाराजीच्या स्वरात म्हणतो..

पिहु अस का गं...जा ना,

आई..मला

सुमन ती बोलायच्या आतच तिचा हात विराटच्या हातात देते..पिहु मला काही ऐकायच नाहीये,विराट जा घेऊन त्या घाईघाईने दोघांना पाठवुन देतात,.

विराट मागे वळुन ओठं हलवुन त्याच्या आईला आय लव्ह यु म्हणतो...सूमन हसतात.

पिहु इकडे तिकडे बघते.विराट तिचा चेहरा स्वतःकडे वळवतो..मी इथे आहे ..

पिहु नजर रो‌खुन बघते...माहित आहे मला.हुहह...

तो पिहुचे हात घेऊन स्वतःच्या छातीवर ठेवतो.आणि त्याचे हात तिच्या कमरेवर ठेवतो...पिहु नजर खाली करते..तो फक्त तिलाच बघत होता..
छान गाण लागलं होते.

हाअ~आ आआआआ~एयेए
बेपनाह सी मोहब्बत की है-ई
दिल ने भी यही चाहत की है~ईई
तेरे बिना मेरा लाग्गे ना जिया-आ
तेरे लिए ही धड़के जिया
मेरे दिल को तेरे दिल की ज़रूरत है
मेरे दिल को तेरे दिल की-ई ज़रूरत है
मेरे दिल को तेरे दिल की ज़रूरत है
मेरे दिल को तेरे दिल की ज़रूरत है

हाअ~आ आआआआ~एयेए
तेरे बिना मेरा लाग्गे ना जिया-आ
तेरे लिए ही धड़के जिया
तेरे बिना मेरा लाग्गे ना जिया-आ
तेरे लिए ही धड़के जिया
मेरे दिल को तेरे दिल की ज़रूरत है
मेरे दिल को तेरे दिल की-ई ज़रूरत है
मेरे दिल को तेरे दिल की ज़रूरत है
मेरे दिल को तेरे दिल की ज़रूरत है

तो हळूच तिचे केस कानामागे घेतो...त्याच्या स्पर्शाने ती मोहरुन जाते..ती अलगद डोळे झाकुन त्याच्याकडे बघते..दोघेही एकमेंकाच्या डोळ्यात हरवुन गेले होते....पिहु पासुन लांब राहण त्याच्यासाठी खुप मोठी शिक्षा होती...

दोघांना एवढ्या जवळ बघुन त्रिशा रागाने हातातच वाईनचा ग्लास जोर देऊन दाबत होती.

अचानक आवाज आल्याने विराटची तंद्री तुटली.पिहु पण घाबरून आवाजाच्या दिशेने बघू लागली.‌

त्रिशाने हातातच ग्लास फोडला होता..रक्ताने तिचा हात पुर्णपणे भरला होता.देवेश तिचा हात धरून पाण्याने धुवत होता...वातवरण थोड गंभीर झालं होत...त्रिशाच रडणं ,रक्त बघुन घाबरुन पिहुने विराट शर्ट घट्ट पकडला...विराटने तिला जवळ घेऊन तिच्या डोळ्यांवर हात ठेवला...शुश...काही नाहीये..शांत हो..तिकडे नको बघु तु..तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता.पिहुने डोळ्यावरचा हात काढला आणि त्रिशाकडे बघु लागली..

देवेश त्रिशाला घेऊन चालला होता.सगळे नॉर्मल होत पार्टी एन्जॉ‌‌य करू लागले.

विराट तिच्या गालाला हाता लावुन इकडे बघ ..चल जाऊ .,
.घरी गेल्यावर डोर नीट लॉक करुन झोप ..

पिहु त्याच्याकडे बघते ..का,तूम्ही...

विराट हसतो..येणार आहे गं पण मला लेट होईलं माझ्याकडे की आहे..तु लॉक क‌र..नाही तर झोपेत चालत कुठेतरी धडपडशील..

पिहु त्याला रागाने लूक देते‌...तुम्ही माझ्यावर हसताय...

विराट शांत होत नाही ..हसत तो तिला सुमनच्या जवळ आणतो..मॉम तुम्ही जावा लेट खुप झालाय..मी येतो थोड्यावेळाने..

सुमन वीरा,दिपा पिहुला पुढे पाठवतात.विराट त्रिशा‌‌,सुमन काळजीने विचारतात..

मॉम तु तिच टेंशन घेऊ नको ..तुला माहित आहे ती कशी आहे.आपण लक्ष द्यायच नाही.

हम्म ,लवकर ये.

हो.

सगळे घरी निघून येतात.

काही गेस्ट राहीले होते त्यांना ही विराट पाठवुन देवेशकडे येतो..देवेश टेंशनमध्येच असतो.

विराट देवेशच्या खांद्यावर हात ठेवतो..देवेश त्रिशा कशी आहे गेली का घरी..

हा..गेली ग्लासचे पिसेस ‌घुसले होते. देवेश विराटकडे न बघताच बोलतो.

हम्म ,देवेश तुला राग येणार नसेल तर एक सांगतो..त्रिशा ला सायकांट्रीस ची गरज आहे...तु वेळेत तिच्यावर ट्रीटमेंट घे..

वॉट ,विराट तु विचार करुन बोलत जा .. देवेश चिडुन बोलतो.

रीलॅक्स ,देवेश..

विराट तिला तुझी गरज आहे...ती मनापासुन तुझ्यावर प्रेम करते...

हो कमॉन ,देवेश मी फक्त त्रिशाच्या चांगल्यासाठी बोलतोय..ऐनी वेज ..गुडनाईट भेटू उदया ...हा आणि परत त्रिशाचा विषय नकोय‌ .
विराट ताडकन निघुन जातो...

विराट तु त्रिशाचा नाही तर कोणाचा नाही.देवेश रागातच मनात बोलतो.

विराट घरी येतो...सुमन अजून जाग्याच होत्या.मॉम तु अजून झोपली नाही का. विराट गळ्यातली टाय काढत बोलतो...

तु आल्याशिवाय झोप येईल का ..विराट मला त्रिशाबद्दल बोलायच..

विराट सूमनला सोफ्यावर बसवतो...आणि तो गुडघ्यावंर बसून दोन्ही हात हातात घेतो.मॉम तु नको काळजी करु त्रिशा मला काही नुकसान पोहचवणार नाही...

पण विराट ....पिहु

पिहु ..तिच काय मधेच ..पिहूचा आणि त्रिशाचा कही ऐक संबंध नाहीये...

कधी पिहुला त्रिशा बद्दल कळाले तर...

कळाले तरी मला फरक पडत नाही..काही नाहीच तर मी का घाबरु...मी फक्त पिहुला माझ्या हृ्दयात स्थान दिले आणि शेवटपर्यंत तिच राहणार आहे...

सुमन हसत विराटच्या कपाळावर ओठ टेकवतात. जा जाऊन झोप खुप लेट झालाय...

हम्म तु पण झोप आणि जास्त विचार करु नको..विराट बोलुन निघून जातो.

विराट हळुच लॉक उघडुन रूममध्ये येतो..पिहु झोपली होती..
कंट‌ाळल्यामुळे तिचे सॅन्डेल्स ,ड्रेसपण चेअर वर पडला होता. पर्स ,तिची ज्वेलरी...मेकअपच सामान टेबलावर..तो सगळी कडे नजर टाकत फ्रेश होऊन येतो...

मोबाईल चार्जला लावतो..त्याच्या लक्षात फोटोजच येते..तो चेअर वर बसुन दोघांचे फोटोज बघुन गालातल्या गालात हसत असतो..एक नजर पिहु वर जाते पिहुने कूस बदली. तो तिचा खळी पडणारा फोटो बघुन मोबाईल वर आपले ओठ ठेवुन किस करतो...पिहु कधी तु माझ प्रेम अॅकस्पेट करणार ...तो मोबाईलवर हात फिरवत बोलतो.

त्याच्यी नजर पिहुवर‌ पडते.तर पिहु ब्लँकेट काढुन उभी राहीली डोळे बंदच होते .विराट दोन सेकंद दचकालाच कारण आज पहिल्यांदाच तिला अस बघत होता..त्याला ती बोलेले आठवते...जास्त थकल्यामुळे ती झोपेतच चालते...

पिहू ..तो तिला हळुच हाक मारत चेअर वर उठतो..

पिहु हळुहळु पावले टाकत दाराच्या दिशेने जात होती‌..

विराट तिच्या मागे जातो.

ती दाराला धडकणार विराट दाराला टेकुन ‌थांबतो.ती त्त्राला धडकुन परत वळुन चालली .विराटला अस बघुन खुप हसु येत होते.समोर विराटच लक्ष गेलं तिचे सॅन्डल्स पडले होते..ती पाय ठेवणार होती..विराटाने तिला वळवुन तिच्या पाठीवर हात ठेवत जवळ घेतले. पिहुने पण अंग सोडुन देते..विराटने पटकन तिला पकडुन उचलुन घेतो..पिहु झोपेत त्याच्या कुशीत अंग चोरुन बिलगते.
विराट तिला अस बघुन गालात हसत तिला बेडवर झोपवुन ब्लँकेट ओढतो.लाईट्स ऑफ करुन तो झोपायला आडवा होतो तर पिहु त्याच्या हात धरुन झोपेतेच जवळ येते.

आज खूपच मेहरबान झालाय तु विराट हसत वर बघत बोलतो. तिचा हात नीट करत तिला जवळ ओढुन तिचीच ब्लँकेट स्वतःच्या अंगावर घेतो...तिचा चेहरा निहाळत त्याला झोप लागते.

💓💓💓💓💓

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED