सकाळी विराट लवकरच तयार होऊन बसला होता...
विराट वेळ असेल तर पिहुला इकडे घेऊन ये .मग जेवण करून जा...विराटची मामी बोलते.
हम्म ,बघु जीजी कशी आहे...(सूमनची आई)इकडे आली नाही का..
नाही आल्या, गावाकडेच आहे या बोललं तर करमत नाही इथे.
मी फोन लावला तर फोन उचलत नाही विराट बोलतो.
नाही उचलणार रुसल्या त्या तुझ्यावर तुझ्या मॉमवर
विराट हसतो.काय केलं मॉमने ..
लग्न घाईत केलं त्यांना बर नव्हतं तर मॉम येऊ नको बोलली तर रुसुन बसली.आणि तु पण फोन केला नाही .तर राग आलाय.
(विराट तेव्हा रागात असल्याने त्याचं ऐवढ कोणाकडेच लक्ष गेलं नाही.)
आता तु आणि पिहु एकदा जाऊन ये आईंना भेटायला..
विराट हो म्हणून मान हलवतो.
.
.
.
.
.
.
पिहु अजुन झोपलीच होती...
अहो, अकरा वाजलेत अजुन पिहु झोपली कशी ओ...रेवती किचनमधुनच चिडुन बोलतात..
प्रांजल,भिमराव हसतात..
अगं तिला काय काम करायचे आहे का .सकाळी उठुन झोपु दे.उद्या पासुनच आहेच की तिच घर कॉलेज मागे.
तसही मम्मी जीजु उशीरा येणार आहे प्रांजल म्हणते..
तुम्हा दोघांना काय काम नाही, का-रेवती.
पिहु झोपेतुन उठुन खाली येऊन सोप्यावर येऊन आडवी होती.पिहु डोळे झाकूनच बोलते.काय लावलं मम्मी तु सकाळ सकाळी चालु झाली. ..
रेवती किचन मधुन बाहेर येत ..सकाळ होऊन दुपार होईलं पण उठायच नाव काय घेऊ नकोस हहहह.अग विराट येईल कधी पण आणि तुझ निंवात चाललयं.
मम्मी त्यांना उशीर होणार आहे.पिहु हॅालमधुनच ओरडते.
प्रांजु आणि तुझे पप्पा निवांत बसलेत वाटत नाही मला थोडी फार मदत कारवी ..सकाळपासुन मीच एकटी पळते सग्ळ्यांच्या मागे..मम्मीची बडबड चालु असते.
पप्पा मम्मीला मदत करा नाहीतर माझ डोक खात बसेल.जावा पिहु बोलते.
बरं माझ्या चिऊसाठी जातो..नाहीतर सगळ्यांच काही खर नाही ..थोड फार मदत करून मी पण कलटी मारतो.
प्रांजल पिहुच्या जवळ येते..दिदी,जीजु किती मस्त आहेत गं मला तर वाटलं तुझ्या सारखेच ते पण अनरोमँटिक आहेत का..
पिहु खाडकन डोळे उघडुन मान वर तिच्या कडे रागाने बघते...प्रांजु काय बोलली...मी अनरोमँटिक आणि ते रोमँटिक हुहहच रोमँटिकचा र तरी माहिती आहे का तुझ एक काही तरी आपलं उठ तु इथुन पिहु परत डोळे झाकते..
अग खरच दिदी काल जीजु कसे बघत होते. तुझ्याकडे तुझ तर लक्ष पण नव्हतं तु तर तुझ्या धुंदीतच असते कधी पण ,लग्ना आधीं रोमँटीक सिर्यल्स ,मुव्ही बघितल्या असत्या ना थोड रोमांस तर कळलं असता तुला काय तर तुझी आवड कुठे ते बिगबॉस,रोडीज ,खतरो के खिलाडी आर्धे एपिसोड तर भांडणातच जातात...
पिहु तिच्याकडे रागाने बघत उठुन बसते.काय म्हाणाली ते रडके सिर्यल्स बघायचे काय असते त्यात..(पिहुच्या परत लक्षात येते प्रांजल बोलली कि विराट तिच्याकडे बघत होता.)ती हळुच विचारते कधी बघत होते हे मला.
जेवताना,तु किचन मधून हे आण ते आण करत होती.ना ते तूला बघत होते .आणि तु हे घ्या ते घ्या, पप्पा तुम्हाला काय हवं असलं तुझ बोलण ...एकदा पण तु जीजु कडे बघितले नाही..त्यांचा नंतर चेहराच उतराला...
पिहु लाजुन इकडेतिकडे बघु लागली खरच हे बघत होते का ..प्रांजुला वाटलं असेलं तिच डोक वेगळीकडेच चालु झाले.
प्रांजल पिहुच्या कानात हळुच म्हणत ,दिदी जीजुंच्या स्वप्नात रंगली का...
पिहु भानवर येत तिला जवळचा पिलो घेऊन मारते..प्रांजु
.. पिहु तिचा कान पकडते..तुला फारच गोष्टी कळायला लागल्यात कॉलेज मध्ये काय तुझ...पिहु डोळे मोठे करतच विचारते.
प्रांजल जोरात हसते. दिदी कान सोड माझ तस काही बाहेर असलं तर पहिले तुलाच बोलेन गं पण तस काही नाही मम्मी कशी माहित आहे ना...प्रोपज तर तुला किती मुलं करत होते..तु घाबरुन कोणाकडे बघत होती..तसच माझ आहे गं ..😓😓थोडा उशीर झाला कि नको नको करुन सोडते .मम्मी नंतर पप्पा तु एक आता वाचली .
पिहु हसते....
पण कॉलेजच्या मुलांपेक्षा जीजु किती हॅन्डसम आहेत गं😍..तुझ तर लकच उजळलं
पिहु हसत जवळ घेते.प्रांजु आय लव्ह यु..
आय लव्ह यु टु..दिदी😘😘
आता पिहु तु उठुन आवरते कि नाही काल रात्री किती वेळच्या बसल्या गप्पा मारत,अजुन संपत नाही दोघींच मम्मीचा आवाज आतुन जोरात येतो.
(पिहु चक करतच उठते)हो चालेले गं,पिहु उठते दारावरची बेल वाजते पिहु परत वळुन दार उघडते...
समोर विराट असतो. नेवी ब्लू फुल स्लिवचा टीशर्ट कोपरयापर्यंत फोल्ड केलेला जीन्स ...डोळ्यावर गॉगल.. पिहु एकटक त्यालाच बघत असते.तो गॉगल काढुन तिच्या वर नजर फिरवतो.तिने व्हाईट रेड मिक्स कलरचा क्राॅप टॉप खाली शॉट्स घातली होती. अंगावर एकही दागिना नाही . गळ्यात मंगळसुत्र तेवढ होते.त्याने पहिल्यांदा तिला अस बघितले होते.घरी ती एवढी झाकुन पाकुन राहत होती..आणि इकडे तो तर तिला बघुनच हँगच होतो...
पिहु कोण आहे मम्मी बाहेर येत बोलते.तसे दोघे भानावर येतात पिहु एकनजर स्वतःला बघते.नंतर विराट कडे बघतात.ती घाबरून तोंडवरच हात ठेवते..विराट पण दचकुन नजर फिरवतो..पिहुला कुठे जाव तिला कळतच नाही ती पटकन पळतच निघते.
अग पिहु तशी का पळते. रेवती दाराकडे बघतात तर विराट त्या पण दचकतात..(मनातच बोलतात.ही मूलगी कधी सुधारणार आहे घरात पण ये बोलली नाही..)
विराट आत ये ना ..
तो पण दबकतच आत आला.
बस रे विराट चिऊ आत्ताच उठली ना म्हणुन थोडी गोधांळली.-भिमराव
विराट ब्लँक होतो, कोण चिऊ..
पप्पा चिऊ काय म्हणता.. जीजुंना कळणार आहे का..प्रांजल बोलली.
भिमराव हसतात..पिहु म्हणायच होत तोंडात चिऊ आलं.
जीजु ते पप्पा दिदीला चिऊ म्हणतात
हम्म विराट गालात हसतो...
पिहु रुममध्ये येऊन पहिले अंघोळ करुन घेते. तिला तर स्वतःची लाज वाटत होती.आता कस समोर जायच ह्याचाच विचार करत ती आवरते. लाईट ब्लु कलरचा टॉप, व्हाईट कलरची लेगिंग हलकासा मेकअप करुन ती खाली आली..विराट ची तिच्यावर नजर पडली..त्याला आतुन हसू येत होते..तिकडे कशी राहते.आणि इथे बिनधास्त सगळ्यात तिचा क्युटनेसपणा तेवढाच दिसत होता.ती विराट ला नजर न मिळवताच किचन मध्ये गेली.
(किचन हॉल मध्ये जास्त अंतर नसल्याने सगळ दिसत पण होते आणि ऐकु पण येत होते.)
पिहु काय करतेस...दुध पी चहाची सवय कधी पासुन लागली.रेवती दम देतच बोलली ..
मम्मी मला आता दुध पिलं कि भुक नाही लागणार..
तु नाटकं करु नकोस ... माहीत आहे ना तुला चहाने पित्त उसळतं एकदा पित्त उसळलं ना..आठ दहा दिवस तुला त्रास होतो..पावसाळा आला कि तुझ हेच चालु असते ..तिकडे गेली कि कधी तरी पी पण दररोज नाही सांगुन ठेवते..
हळु बोल पितेय ना ,पिहु चिडुनच आर्धा ग्लास दुध पिली आणि ठेवली.
विराटला सगळ ऐकु येत होते.. प्रांजल ओठ दाबुन हसतच होते...
जीजु मम्मीच्या सकाळपासून बोलण्या खातेय.प्रांजल जवळ येऊन बोलली.
भिमराव आत येतात.अगं हळु ,कश्याला बोलते.बाहेर विराट आहे.आत्ता लग्न झालयं तिच तिला कळत काय करायच लहान असल्यासारख सारख ओरडत असते. भिमराव पिहुला जवळ घेऊन हळुच बोलतात.तसे पिहूचे तिच्या आईचे डोळे भरुन येतात.
पिहु तिच्या मम्मीच्या कुशीत जाऊन रडु लागते...मम्मी मी तुला खुप त्रास देते ना ..
नाही गं बाळा तु तर माझ गुणी बाळ आहे कधीं माझ्या शब्दाच्या बाहेर गेली नाही..रडु नकोस विराटला काय वाटेल ..रेवती तिचे डोळे पुसुन तिच्या कपाळावर ओठ टेकवतात.
भिमरावांचे डोळे भरुन येतात.ते स्वतःवर कंट्रोल करून बाहेर निघुन येतात. सगळे गप्पा मारत असतात..
पिहु काय विराट च्या समोर आलीच नाही.नंतर जेवताना पिहु विराट्च्या शेजारी बसली.
त्याने तिच्यावर नजर टाकली तर ती रडल्यासारखी दिसत होती..तिचा चेहरा उतरला होता.त्याला कळालं खुप दिवसानी आईवडीलांना भेटायला आली होती.,
जीजु तुम्ही तीन चार ला येणार होता ना...दिदी बोलली प्रांजु उगाच आता खेचत होती.
पिहु विराट कडे बघते...
हा..ते..मी उशीराच येणार होतो..काम लवकरच झाल होतं तो चाचरत बोलतो.
आई जेवण छान झाले....विराट रेवतीकडे बघुन म्हणतो.
पिहु मनातुनच खुश होते...
आभाळ भरुन आले होते...दुपार झाली होती पण अस वाटत होते कि संध्याकाळच झाली.
चिऊ लवकर निघा ,परत पाऊस वाढला ना...अडकसाल कुठेतरी.
विराट हो म्हणुन मान हलवतो.पिहु देवाला अगरबत्ती लावुन नमस्कार करते...पिहु जाणार म्हणून रेवतीचे डोळे भरलेच होते..
(कस असते ना आईजवळ असताना अस वाटते कि सारख लेक्चर देते पण एकदा काय लग्न झालं तर तेच मिस करत असतो.)
पिहु प्रांजलला समजावत होती...
दिदी,काय तु मम्मी एक कमी आहे का तू पण चालु केली.
पिहु हसयाला लागते. दोघेही पाया पडतात..विराट बाहेर जाऊन थांबतो..पिहु पप्पांच्या कुशीत शिरुन रडायला लागते.
अस सारख रडत बसायच का, तु खूश आहेस ना..
पिहु घाबरुन बाजुला होऊन एक टक तिच्या पप्पाकडे बघते.
पिहु बाळा काय झालं, तरी पहिले मला सांगायच .आणि कोणाला ही घाबरू नको.मम्मीला काय वाटेल मला काय वाटेल..असा विचार तर कधीच करु नको हे घर तुझ आहे कधीही तु येऊ शकते.. भिमराव पिहुचा चेहरा ओंजळीत घेऊन बोलतात.
पिहु भरल्या डोळ्याने हो म्हणुन मान हलवते.
सगळे पिहुला बाहेर सोडवायला येतात...पिहुचे डोेळे रडुन लाल झालेच होते.विराटला तिला अस बघुन वाईट वाटत होते..
दोघेही निरोप घेऊन गाडीत बसून निघून जातात..रेवती रडतच पिहुच्या रुममध्ये येतात.
दोन दिवस पिहु घरात होती तर घर भरल्यासारख वाटत होते.त्या पिहुने घातलेला पसार नीट करत बोलतात.
हो गं आता प्रांजल पण मोठी झाली निघुन जाईलं मग राहिलो आपण दोघं भिमराव रेवतीच्या खांद्यावर हात खिडकीच्या बाहेर बघत बोलतात.
..
पिहु गाडीत शांत होती.ती बाहेरच बघत होती.
विराट ही तिला शांत बसु देतो...
पिहुच्या अचानक लक्षात येते कि,(काल आपण ड्रायव्हर घेऊन आलो होतो.आणि आज विराट गाडी चालवतो.,आणि ड्रायव्हर कुठे गेला.)ती विराट कडे बघते .अहो..ड्रायव्हर काका कुठे ती ब्लँक होतच विचारते.
विराट मनात म्हणतो..लक्ष तर किती बारिक आहे.आता काय उत्तर द्यायच कारण त्याने ड्रायव्हरला कालच रीटर्न पाठवले होते..काल ड्रायव्हर असल्याने दोघेही शांतच होते.
पिहु त्याची तंद्री तोडत अहो मी काहीतरी विचारले....
काल शामला कोणाचा तरी फोन आला .त्याच पर्सनल काम आहे आज म्हणाल अर्जंट जायचे होते तर कालच तो गेला.डोळ्यावर गॉगल असल्यामुळे तो रीलॅक्स होत बोलला.
हो का .??? सगळ ठिक आहे.ना त्यांच्या घरात पिहु ने काळजीने विचारले.
किती प्रश्न विचारते..विराट मानातच बोलला.हो ठिक आहे.
पिहु परत बाहेर बघू लागली.विराटने एक नजर टाकली .
वातावरण गार झाले होते..ढग पण काळेभोर झाले होते पाऊस धो धो पडणार हे वाटतच होते.विराट ने कार स्पीड वाढवला.
पिहु ग्लास खाली घेण्यासाठी बटण दाबते..विराट त्याच्यासाईडने लॉक करतो...
अहो तुम्ही लॉक का केलं उघडा ना किती गार छान वारा आहे ..
पाऊस पडेल आणखी गार होईल..तुला लगेच थंडी भरुन येते..मागच्या वेळेस आठवते ना..
हो पण थोड्यावेळच प्लिज... तशी मम्मी ने तयारी करुनच पाठवलं ते बघा मागे शॉल ,जॅकेट..पिहु हसत सांगते.
तो मिरर मधुन बघत हलेकच हसतो.मम्मी खुपच स्ट्रीक आहे तुझी.
हो , पप्पा पण घाबरतात पिहु हसून सांगते.
विराट हसतो.
पाऊस चालु झाला कि, काच वर घेते.
तो लॉक उघडुन ग्लास खाली घेतो. गाडी सपीड मध्ये अस्ल्याने गार वारा छान येत होता.पिहुने केस मोकळे सोडले होते. वारयाच्या वेगाने ते तिच्या चेहरयाशी खेळत होते.ती पण सावरत बाहेरच निसर्गरम्य वातावरणात फ्रेश झाली .तिच्या चेहरयावर तिच्या खळीने चारचांद लावले होते.विराट अधुनमधुन तिला चोरुन बघत. होता.
तो बघयाला आणि तिने त्याच्याकडे बघितले.तो दचकुन लगेच समोर बघु लागला.
पिहुला प्रांजलच बोलल्याच लक्षात आले.त्याने ग्लास वर केली.
ती गाल फुगवुन त्याच्याकडे बघत राहिली..
काय झालं
काही नाही ..ती परत तोंड फिरवुन बसली.अहो सॉन्स तर लावा किती बोर होतेयं
मग लाव ना विचारते का
ती एफ. एम .लावते. छान अरजित सिंगची गाणी लागली होती..वातावरण पण रोमँटिक झालं होते..हळूहळू काचेवर पाण्याचे थेंब पडु लागले.
विराटचा मोबाईल येतो.तो स्पीकर वर टाकुन कोणाला तरी ओरडत होता.
पिहु दचकुन त्याच्याकडे बघते..किती आवाज तो एवढ काय ओरडायचे..ती मनातच बडबड करत असते.
फोन बंद करून तो पिहुवर नजर टाकत पुढे बघतो..
पिहु त्याच्याकडे बघते,तुम्ही सारख का,कोणाला पण ओरडत असता शांत राहून पण समजावयच असते .
विराट गालात हसतो...काही लोक ओरडल्यावरच नीट काम करतात..ह्यांच्या मागे लागुन काम कराव लागते.गोडीत सांगितले ना मग झालं.
तो तुमचा समज असेल..तस काही नाही वाणी गोड असली ना कोणीही नरमरतो...
विराट जोरात हसतो..काय वाणी गोड...पिहु यु जस्ट...पुढच बोलायचा तो थांबतो.मनातच बोलतो.जगात कस वावरतात हेच माहीत नाही.तर कस कळणार.वेडी.तो अजुन गालात हसतच असतो.
तुम्हाला मी वेडी दिसते का..
विराट चमकून तिच्या कडे बघतो..कारण तो मनातच बोलला होता वेडी..तो परत पुढे बघतो...तस नाही गं जाऊ दे तुला नाही कळणार..तु जग चार भिंतीच्या आत बघितली म्हणुन बाहेरची लोक गोड बोलली कि ते चांगले असे वाटत असतील..पण ते लोक आपला कसा फायदा होतो हे बघत असतात..
जस तुम्ही ती पटकन बोलून जाते.नंतर जीभ चावुन बाहेर बघते..
हो मी आहे तसाच ...तो रागातच बोलतो..
सॉरी ते चुकून निघालं पिहु हळुच त्याला बोलली.
तो त्यावर काहीच बोलला नाही.
त्या नंतर दोघ बोलतच नाही...
पावसाचा वेग चांगलाच वाढला होता.त्याने गाडी स्लो केली...सहा वाजले होते.पण अंधार झाला होता विजा चांगल्याच कडकडत हो्त्या.जोरात कडकडल्याचा आवाज आल्याने पिहु एकदम दचकली..
विराटने तिच्या कडे बघितलं काय झालं एवढी काय घाबरते..
नाही ते ...आपण घरी कधी पोहचु ..अस म्हणत तिने घाबरुन मागे ठेवलेली शॉल घेऊन अंगावर ओढली.
पोहचु आपण नऊ वाजेपर्यंत ...का ??तुला पाऊस आवडतो ना मग,.तो ही तिची मज्जा घेत होता.
हह..हा ते आवडतो पण घरात बसून ती हळुच अडखळत बोलु लागली.परत विजा चमकु लागल्या.तिने पाय वर घेऊन डोक्यावर पण थोडी ओढली आणि डोळे मिटून घेतले.
तो तिच्या वर एक नजर टाकुन हसतच गाडी चालवू लागला.यु आर ओके त्याने काळजीने विचारले.
हम्म मी ..ते मला ...झोप येतेय.तिला पावसाच्या आवाजाने काही बोलायच सुचतच नव्हतं.
झोप थोड्यावेळ अँड रीलॅक्स हो....
ती मानेनेच हो म्हणाली डोळे तर उघडलेच नाही.
थोड्यावेळाने विराटने तिच्या कडे बघितले तर तिला झोप लागली होती.
.
.
.
पावसाचा वेग कमी झाला होता.सिग्नलला गाडी थांबली.त्याने तिच्या वर नजर टाकली तर तिने पूर्ण चेहरा झाकला होता..त्याने हळुच शॉल काढली.चेहरा घामेघूम झाला होता..त्याने ऐसीचा टेम्परेचर कमी केला.तिचे केस चेहरयावर आले होते.तो हात लावु की नको म्हणुन दोनदा हात मागे घेतला.पण मोह काही केल्या आवरेना..त्याने हळुच तिचे चेहरयावरचे केस मागे घेतले.त्याच्या अंगाला गोड शहारा आला..तो गालात हसला..काय तरी वेगळीच फिलींग वाटत होती. मागुन हार्नच्या आवाजाने तो भानावर येत पटकन कार स्टार्ट केली....
आठ साडे आठच्या दरम्यान ते मुंबंईत पोहचले.पण ट्राफिक त्यात पाऊस काय थांबायचा नाव घेत नव्हते.पिहुला जाग आली.ती बाहेर डोळे चोळतच बाहेर बघायला लागली.विराट ने पाण्याची बॉटल तिच्या समोर धरली...
ती गालात हसत बॉटल घेऊन पाणी पित होती..
भुक लागली का...
ती हळुच हो म्हणाली..
जेवण करुन जाऊ ...घरी
तिचा चेहारच खुलला त्याला दिसु नये म्हणून चेहरा फिरवुन बघुन हसू लागली .त्याने नजर टाकली त्याला ही कळलं .ती हसतेय..तो ही गालात हसू लागला...
दोघेही हॉटेलमध्ये पोहचले.विराट ने मॅनेजरला आधीच कल्पना दिलीच होती....
पिहु विराट गाडीतून उतरले वॉचमन कडे चावी देऊन दोघेही आत गेले.पाऊस रिमझिम चालुच होता...पिहु आधी आली होती.पण तेव्हा वीरा ,दिपा होत्या .म्हणून तिला ऑड वाटत नव्हतं आता विराट बरोबर तिला नरवस वाटु लागले.
मॅनेजर ने त्यांच्यासाठी छान अरेंजमेंट करून ठेवली होती.आता त्या मॅनेजरला त्याने वाईफ बरोबर येत आहे अस सांगितल्याने त्याने त्याच डोकं लावल.😂😂मस्त रोमँटिक डिनर अरेंज केले होते...विराट पिहु लॉबीमधुन आत गेले ..विराट ने बाहेर नको आताच अरेंज कर म्हुणन सांगितले होते..कारण पाऊस थांबला जरी पण गारवा खूप होता.पिहुला गारावा सहन होत नाही.
दोघेही आत गेले तर सगळी कडे सेन्टेड कॅन्डल ,फ्लावर्सने टेबल छान सजवला होता..कॅडन्डल लाईट डिनर मस्त रोमँटिक हळु आवाजात सॉन्स लावले होते.
पिहु विराट एकदा पुढे आणि एकदा एकमेकांना कडे बघत होते..दोघांना ही लाजल्यासारखे होत होते.पिह सगळ बघुन थोडी दचकलीच तिच्या हाताच्या चुळबळीवरुन विराटच्या लक्षात आले होते.
विराट मनातच बोलला नाही तिथे डोकं लावायची सवयच लागली.त्याने एक लुक मॅनेजर वर टाकला..
सर ऐनी प्रोब्लेम, तो चाचरतच विचारु लागला.
विराट ने हातानेच इशारा करत जायला सांगितले..
.
पिहु भुक लागली ना चल बस .तो ही काही नसल्यासारख. नार्मल होत बोलला..त्याच्या बोल्याने पिहु कंफर्ट होऊन बसली.
पिहु मेनु कार्ड बघत होती.ती विराट कडे बघुन मेनु कार्ड देते..तुम्ही मागवा ...मला काहीच समजत नाहीये....
तो गालात हसतो..मेनु कार्ड खाली ठेवतो..मी जे ऑर्डर करेन ते खाणार का .
हो .
त्याने सुप सांगितले ..
कुठलं आहे ..
तु टेस्ट तर कर मग सांगतो.
हम्म.
पिहु सुप पिते..ती स्वाद घेत विचार करते..तिचा चेहराच खूलला. त्याच्याकडे बघुन हसते.तुम्हाला कस कळलं मला ब्रोकोली सुप आवडते...
तो सुप पित तिच्या कडे बघतो...असच ,मला एवढ लक्षात आलं तुला हेल्दी रेसीपी करायाला आणि खायला आवडतात.
पिहु गालात हसते.मला हेल्दी पण आणि बाकीच पण आवडतं
तो तिच्या कडे नजर फिरवत हा...हा, पाणीपुरी खुप आवडते ना..किती तरी वेळेस बघितले मी तु आणि वीरा घरात बसून तेच
चालु असते.
(पिहु चमकुन बघते..थोडफार का होईना विराट ला तिला ओळखायला लागला होता.)
तुझ्या हाताची वेगळी टेस्ट लागते...विराट खाता खाता बोलतो.
हे छान आहे पण बदाम लगेच मिक्सर मधुन काढुन टाकल्याने चव. चेंज झाली.तुम्ही बदाम पाच -सहा तास भिजवून बदाम दूध काढा .
तो जोरात हसत तिच्या कडे बघतो..मी शेफ नाहीये .
पिहु पटकन जीभ चावुन सॉरी ,सॉरी ते ती शांत मान खाली गुपचुप खायला लागली.
दोघांच जेवण करुन ते निघायला लागतात..मॅनेजर ने बोलवलं म्हणुन विराट पिहुला लॉबीमध्ये थांबवुन त्याच्याबरोबर जातो.पिहु तिथले पेटींग बघत होती..
रात्रीचे साडे नऊ वाजले होते...चार पाच मुली आल्या होत्या .दोघीजणी रुमच्या फॉर्मिलीटी पुर्ण करत होत्या .दोघी तिघी इकडुन फिरत होत्या.त्यांची मस्ती चालुच होती.
विराट मॅनेजर बरोबर बोलत पेपर्स चेक येत होता.
त्यातली एका मुलगी दुसरया मुलीला :- विराटकडे बघत बोलली ते बघ त्या मुलीने वळून बघितले.
ती गालावर हात ठेवुन हाय काय भारी आहे ना...पिहु शेजारीच असल्याने तिला ऐकु जाते पिहु त्याच्यांकडे बघते..ते कुठे बघतात हे बघयाला वळुन बघते तर त्या विराट कडे बघत होते...
त्या मुलीने तिला कानात काही तरी सांगितले .आणि दोघी हसायला लागल्या.ती पण डोळ्यानेच जा बोलली.
त्या मूलींच्या सगळ्या फॉर्मलीटीज पुर्ण झाल्या.स्टाफ त्यांना रुमकडे घेऊन चालला होता.तर जाता जाता ती मुलगी मूद्दाम जाऊन विराट ला धडकली..ती पडणार कि विराट ने तिला पकडलं.
पिहु एकटकच बघत राहीली...
यु आर ओके मिस..विराट तिला सौम्य भाषेत बोलत तिला नीट उभा करत बोलत होता.
ह हह, मी ठिक आहे तिने विराटचा हात धरला होता.तो दाबला आणि त्याला डोळा मारला.
विराटने पटकन हात काढुन बाजुला झाला.
ती मूलगी त्याच्या डोळ्यात बघून हसायला लागली.दुसरया मूलीने तिला मागुन हलवत चल म्हणू लागली.
विराट इग्नोर करत पिहुकडे वळल निघायच
पिहु रागाने त्या मुलींकडे बघत होती..
विराट ने परत तिला हाक मारली .पिहु ..
पिहु ने विराटवर कटाक्ष टाकला.आणि पूढे निघून गेली...विराटला काही कळलच नाही..तो ही तिच्या मागे निघाला.
गाडीत दोघे शांतच होते..पिहू रागाने नेल्स ची नेलपेंट काढत पुढेच बघत होती..विराटने एक नजर टाकली. परत पुढे बघु लागला.
पिहु ...
...........
परत विराट काहीच बोलत नाही..
घर येते दोघे ही उतरुन घरात जातात. पिहु फ्रेश होण्यासाठी जाते..ती शॉवर घेता घेताच विचार करते .मला का फरक पडतो.जाऊ दे तिकडे ती स्वतःच्या मनाला समजावत होती..पण मानातुन जातच नव्हते..
पिहुला अचानक काय झालं ..चांगली बोलत होती.
तिने केस कोरडे केले...आणि बेडवर ब्लँकेट घेऊन मोबाईल बघत पडली.
विराट फ्रेश होऊन बाहेर येतो..तो पिहुकडे बघतो..त्याला सकाळी दार उघडुन त्याच्यासमोरची उभी राहलेली आणि आता स्वतःला कव्हर केलेले हे बघुन त्याला हसु येते..
पिहु त्याच्याकडे बघते ..उठुन बसते..काय झालं हसयाला ती नजर रोखून बघत विचारते.
विराट मिररमध्ये बघुन तिच्याकडे बघतो.काही नाही..असच काहीतरी आठवलं..
काय ..
तो तिच्या जवळ येतो..
पिहु लाजुन स्वतःला अजुन कव्हर करत होती..त्याने हात पुढे घेत तिच्या जवळुन उशी घेतली.
तो हसत तिला उशी दाखवुन स्टीडमध्ये गेला.
पिहु स्वतःच्या डोक्यात मारुन हसत झोपी जाते.
.
.
.
परत आहे ते रुटीन चालु होते .विराटच ऑफिस पिहुच कॉलेज
दिवसभर दोघांना वेळ भेटत नसला तरी रात्रीच जेवण एकत्र करायचे तिचा ऑनलाईन क्लास झाला कि दोघे बोलत बसायचे...कधी कधी तिला रात्रीचा स्टडी कारयाचा कंटाळा यायचा...विराटला पटत नव्हते.पण काय बोलणार म्हणुन तो शांत बसायचा.दोघांना आता एकमेकांची सवय होत चालली त्यांच्या लक्षातुन डीवोर्स ची गोष्ट विसरले होते.
.
.
.
.
पिहु विराटला कॉल कर अजुन आला नाही सुमन म्हणतात..
हा करते..पिहु विराट ला कॉल करतच होती.कि विराट रागानेच आत आला सोप्यावर ब्लेझर रागातच फेकून दिला.एवढ रागात आज पहिल्यांदा पिहूने त्याला बघितले...
सुमन रोहिणी त्याला अस बघुन जवळ गेल्या..
विराट काय झालं सुमन पाठीवर हात फिरवत बोलु लागल्या..
मॉम ,एवढ बोलून त्याने रागातच बघितलं
तश्या त्या पण शांत झाल्या.
तो इकडुन तिकडुन फेरया मारत होता..त्याच्या मागे रमेश पण आले.विराट माझ ऐकुन घे ते हळुच बोलत होते.
मामा मला काहीच ऐकायच नाही...मला पंधरा मिनिटात. रीषभ (सूधा- रमेश चा मुलगा)इथे हवा आहे .विराट जोरात ओरडुन बोलला..
अरे ,विराट तो लोणावळ्याच्या रिसोर्ट मध्ये आहे ना रमेश घाबरतच बोलु लागले..
विराट ने मोबाईल काढला आणि रिषभला फोन लावला...
तो बोलायच्या आतच विराट बरसला.रीषभ तु मला पंधरा मिनीटात घरी हवा मला..आणि माझ्याशी खोट बोलण्याच धाडस तु करु नकोस विराट ने रमेश कडे नजर रोखून बघितले..
तसे रमेश पण घाबरत इकडेतिकडे बघु लागले..
तेव्हा सगळ्यांना कळालं विराट कोणावर चिडला आहे.पिहुला रीषभ माहित होता.पण विराट का चिडला ते नाही.
दिपा ,वीरा घाबरून रुममध्ये निघुन जातात.सुधा रडत सुमन जवळ आल्या
वहिनी रीषभ ने आत्ता काय करुन ठेवले .विराट खुप चिडला आहे.
रोहिणी जवळ येतात. सुधा रीषभला नीट काम करायला लावले असते ना ही वेळ आली नसती..लोणावळ्यावरुन आलाय तु सांगितले पण नाही...
सुधा घाबरतच बोलु लागल्या ते वहिनी...कालच आला मित्राचा बर्थडे आहे..
पंधरा दिवस इथेच असणार पण तु बोलणार नाही..काम सोडुन निंवात फिरतो.
पिहुला काही कळतच नव्हते.ती फक्त ऐकत थांबली होती.आणि विराट चा चेहरा बघुन तर तिला घामच फुटला होता..
वहिनी विराट ला समजुन सांगा ना तो परत नाही करणार अस,मी समजवाते...त्या रडतच बोलु लागल्या.
सुमन तिला शांत हो म्हणतात..(आता तर विराट कोणाचच ऐकणार नाही हे माहीत होते.)सूमन विराट जवळ जातात..विराट शांत हो..समजून सांग ऐवढ चिडु नको..
मॉम तुला माहित नाही त्याने ..बोलता बोलता त्याची नजर पिहुवर पडते..तो वॉचमध्ये बघुन तिच्या जवळ येतो.तु काय करतेस इथे तो अस बोलल्यावर पिहु घाबरून सुमन कडे बघते.
सुमन पिहुकडे बघतात..विराट ते..
तो सूमनला हातानेच शांत बसयाला लावतो.पिहु मी काय विचारतोय...तो आवाज चढवूनच बोलतो.
पिहुची धडकीच भरते..त्याने एवढ्या जोरात पहिल्यांदाच बोलला होता..तिच्या तोंडातुन आवाजच फुटत नव्हता..
मी..मी...ते..
ते ...वॉट... नाईन थर्टी वाजत आलेत तुझा क्लास मिस करुन इथे काय करतेस..तो जोराताच ओरडुन बोलू लागला..
सगळ्यांसमोर ओरडुन बोलत असल्याने ती पूर्ण घाबरून गेली होती.डोळ्यातुन पाणी वाहतच होते..
सुमन जवळ आल्या.पिहु जा तु...विराट शांत हो ..
पिहु पटकन रुममध्ये गेली..
मागून आत रिषभ घाबरतच आला..
विराट रिषभला बघुन लाल बुंद झाला होता..तो त्याच्या जवळ जाऊन सनकन एक कानाखाली देतो.
दा..दा.ऐकुन तरी घे...रीषभ घाबरतच बोलु लागला..तो पुढच बोलायच्या आतच विराट अजुन एक सनकन देतो..
रोहिणी आडव्या येतात..विराट चा हात पकडुन मागे घेतात.विराट काय केलं सांग ना ..
काय केलं न सांगता कारभार करायची सवय झाली.त्याने न सांगता ऑकऊंटमध्ये घोळ घातला त्याला वाटलं मला काही कळतं नाही..पहिल्यांदा मी जाऊ दे म्हणुन सोडलं पण त्याची ही चौथी वेळ आहे. आत्याच्या नावाने जमीन घेतली ती पण विकली.
विराट आत्या कडे बघतो..आत्या तु पण त्याच्या चुकांवर पांघरुण घालते.विराट आवाज पूर्ण मेन्शंन मध्ये घुमत होता..
विराट ह्या वेळेस माफ कर मी समजावतो त्याला रमेश घाबरतच बोलू लागले...
विराट ने रागात एक लुक दिला.त्याने टॉय काढली..आणि फेकून दिली....तो शांत झाला.मामा तुम्हाला हे करायच असलं असतं ना आधीच केले असते..त्याने हातानेच रिषभला जवळ बोलवले..तो घाबरतच त्याच्याजवळ येऊन थांबला.तु कोणाला जमीन विकली.काय काय घोटाळे केले मला सगळ्या डीटेल्स उद्या सकाळ पर्यंत हव्यात .त्यात काही चुक होऊ नये ह्याची नीट काळजी घे. विराट त्याच्या छातीवर हात थोपटत डोळ्यात आर पार बघत बोलत होता.त्याचा फोन वाजतो..
विराट रागानेच बघत रीसीव करुन बोलु लागतो. हा मानव उद्या निघायच आपल्याला ...अस बोलून तो फोन ठेवुन टाकतो.ताडकन निघुन जातो.
रोहिणी ची बडबड चालु होते.
सूमन डोक्याला हात लावत सोप्यावर बसतात.
पिहुला ऐवढ वाईट वाटलं होते.डोळे रडुन रडुन लाल झाले होते. एवढीश्या गोष्टीसाठी एवढ बोलतात का..
विराट आजीच्या रुममध्ये येतो.आजी हात करून जवळ ये बोलते.
विराट आजीच्या मांडीवर डोक ठेवून शांत डोळे झाकुन पडतो. आजी केसांमधुन हात फिरवतात..विराट स्वतःलाही त्रास होतो.मग का चिडतो...तु किती ही सुधरवण्याचा प्रयत्न केला ना तो आणि त्याचा बाप सुधारणार नाहीये.. तुझा डॅड पण हेच करायचा..सारख रमेश सुधारावा म्हणून काय काय केलं पण नाही तो काही सुधारला नाही आणि आता तु त्याच्या मुलाला सुधरवतो.
विराट डोळे उघडुन आजी कडे बघत गालात हसतो.आजीचा हात घेऊन गालावर ठेवतो..आजी हे सगळे आपले आहेत ..त्यांना मला सोडता तर येत नाही ना.तुला माहित आहे ना डॅडचा किती जीव होता आत्यावर .
आजीच्या डोळ्यात पाणी येते..माझ बाळ असलं असते तर आज किती खूश झालं असता.सगळ माहीत आहे कोण कसं आहे पण तरी कोणाला त्रास होऊ देत नाही.सगळ्यांना घेऊन पुढ आला. अशोक गेल्यावर कोणी तुला साथ दिली नाही..तेव्हा तुला आधाराची गरज होती.तर तुलाच पुढे केलं ..आणि हा रीषभ सगळं आयत असुन नीट काम करता येत नाही.
आजी बस आता ...उगाच रीषभवर चिडु नको...किती ही केलं तरी भाऊ आहे..लहान आहे मी बरोबर त्याला सरळ करतो.विराट उठुन बसतो..तु मेडिसीन घेतली का .
हो घेतली.पिहुने दिली..
पिहुच नाव ऐकताच आत्ता त्याला पिहु आठवते..आजी झोप मला उद्या लवकर जायच लोणावळ्याला तो उठून वळतो.तर सुमन दारात उभ्या राहून त्याच्याकडे बघत असतात.तो हग करून गुडनाईट म्हणुन निघुन जातो.
आई मी विराटला आधीच सांगितले होते..रीषभला बिझनेसमध्ये घेऊ नको पण ऐकतच नाही..सुमन आत येत बोलतात.
रमेश दादांमुळे किती लॉस झाला आपला .ह्यांनी पण कधी ऐकलं नाही विराट ही ऐकत नाही.सुमनच्या डोळ्यात पाणी येते..हे गेल्यावर किती वाईट परीस्थिती आपल्यावर आली होती..विराट ने तेव्हा स्वतः खबीर राहून सगळ्यांना सहारा दिला .हा का ऐकत नाही.
आजी हसतात काय करणार बाप -मुलगा सेम आहेत .विराट रुषभला बरोबर रांकेला लावेन.सुधा कुठे बिचारीच नशीब खराब नवरा चांगला नाही त्यात मुलगा पण असा...
गेली घरी ...सकाळी ये बोलले.
विराट रुममध्ये येतो...अंधार असतो त्याने लाईट ऑन केली तर पिहु झोपली होती.त्याने परत लाईट ऑफ केली आणि फ्रेश होऊन झोपायला गेला.
सकाळी पिहुला जाग आली .कालच आठवुन आठवलं परत भरुन आलं ती ऊठुन आवरुन खाली गेली.विराट आज तिच्या आधीच खाली होता.तो फोनवर बोलत होता ...दोघांची नजरानजर होती..ती रागानेच बघुन किचन मध्ये गेली.विराटच्या लक्षात आले तिला कालचा राग आलाय
.
सुमन पिहु जवळ जाऊन तिचा चेहरा वर करतात.विराट कडुन मी सॉरी बोलते..तो रागात होता काल
पिहु काही न बोलता पुजा करते.
सूमन विराट ला ब्रेकफास्ट देतात..विराट तु पिहुशी बोलला का नाही..
कश्याबद्दल ..तो शांत बोलत होता.
काल तु ओरडुन बोलला किती वाईट वाटले तिला चेहरा पुर्ण उतरून गेला सॉरी तर बोल.
मॉम मी काही चुकीच बोलल नाही...इथे तिच स्टडीच नुकसान होते..कॉलेजला तरी रेग्लूर जाते का .हा सण ते काम, इकडे जा तिकडे जा मग तिनेच स्वतःच वेळ काढुन स्टडी करायला हवे काल काय काम होते थांबली .क्लास सोडुन
विराट ते आत्या रडत होती म्हणुन ती
विराट उठतो...मॉम आपण नंतर बोलु मला उशीर होतो..रात्री उशीरच होईल.
ह्या,मुलाला काही कळतच नाही मनवयाच बोलायच..सूमन स्वतःशीच बडबडत निघुन गेल्या.
.
.
.पिहु तिच आवरुन कॉलेजला गेली. ...तिचा मुड ऑफच होता.
आदि तिच्या जवळ येऊन तिला मागुन घाबरवतो..ती दचकुन बघते..आदी ती रागताच ओरडली.
आदी हसत पूढे येतो..ऐवढी कसल्या विचारत गुंग झाली...
काही नाही...
हम्म, चेहरा असा का झालाय दररोज तर हसतअसते.
ती इकडे तिकडे बघते..नाहीत अस काही नाही थोड हेडयेक होते.
ओके..लेक्चर चालु होते. चार असे वाजतात ...
आदि तिला काही तरी जोक्स सांगुन हसवत होता..ती थोड्यावेळाने फ्रेश झाली.
वीरा येते ,हाय आदी कशी म्हणतेय तुझी रीहर्सल
चालु आहे, तुझी ..तु डान्स मध्ये घेतला आहे ना..
हो चालु आहे. वहिनी कुठेय ..आदि पिहुला हाक मारतो...पिहु गुंजन बोलत होत्या पिहुने पाच मिनिट म्हणुन इशारा केला.
वीरा पण थांबली.
वीरा पिहुला काय झालं शांत शांत आहे आज..
दादा काल रीषभ भाई वर चिडला होता..त्यात वहिनी वर पण बरसला..मग वीरा ने रीषभ ने काय केलं ते सांगितले पिहुला का ओरडला ते पण सांगितले.झालं काल पासून रूसून बसली..
हिटलरला ना काही डोकच नाही..तो चिडतच बोलतो.
ये हॅलो, त्यांचा प्रश्न काही ही करू तुला का राग येतोय..वेडा.
आदी स्वतःच्या इमोशन वर ताबा ठेवतो..तस नाही गं कूठल्याही गोष्टीत काय चिडायच..एक दिवस क्लास बंक केला तर काय होतेय..
वहिनी सारखीच करते..आणि ह्या पंधरा दिवसात तर खूपच झाले..दादा एक दोनदा बघून शांत बसतो...नंतर मग हे अस.जाऊ दे, वीरा परत हाक मारते.
बाय नंतर बोलु गुंजनला पिहु म्हणते.आणि वीराबरोबर निघुन जाते.आदी तिच्या पाठमोरया आकृती कडे बघत राहतो..मागुन गुंजन येत चल आदी...
नाही आज मुड नाही तुम्ही कारा रीहर्सल तो निघून जातो.
गुंजन त्यालाच बघत राहते..आता तर चांगला होता.अचानक काय झाले.
पिहु घरी येऊन आवरुन किचनमध्ये येते..घरात कुणीच नसते..वीरा दिपाच असतात.
गीता सगळे कुठे गेलेत-पिहु.
सगळे पुजा आहे रोहिणी काकीच्या नातेवाईक कडे सगळे तिकडे गेलेत.मग काय करु जेवायला तूम्ही तिघींच आहेत .विराट भैय्या पण उशीरा येणार आहे.
हो का..पिहु हळुच इकडेतिकडे बघत गीता च्या जवळ जाते.गीता आत्या पण गेल्या का.
गीता दोन मिनीट तिच्या कडेच बघते.हो गेल्या.
पिहु हसत निघून जाते...काल काही न झाल्यासारखच सगळे रियॅक्ट करतात..कस काय तिला तर हा सर्वात मोठा प्रश्न पडला होता.वीरा दिपाच रुममध्ये त्यांच चालु होत म्हणुन पिहु पण रुममध्ये गेली. ती तिच स्टडी करत बसली.आठ वाजता गीता जेवयाला बोलवु लागली...
पिहु ,वीरा ,दिपा गप्पा मारत जेवु लागल्या. वीराचा फोन आला वीरा पिहु कडे बघते..
कॉल रीसीव करते.हा दादा बोल
पिहुचा चेहरा च उतरतो..तिला कॉल केला नाही म्हणुन..
हा सांगते अस म्हणत वीराने कॉल ठेवला.
गीता दादा घरी येणार आहे जेवयाला एका तासात येईल.
पिहु मानातच बोलते..मी नाही का मला का सांगितले मला राग
आला ..तर हेच नाटकं करतात..ती रागातच तिच जेवण संपवु लागली.
गीता विराट साठी जेवण बनवत होती.पिहुने गीताला सांगितले मी करते..गीता पण निघुन गेली.पिहु सगळ आवरुन रुममध्ये गेली.
विराट पण नऊ वाजेपर्यंत आला..त्याला भूक लागली तर तो रुममध्ये न जाता पहिले जेवायाला बसला.
गीता ने त्याला जेवायला वाढले...जेवताना त्याला जाणवले.पिहुने स्वयंपाक केला...गीता ..
हा भैय्या
पिहु गेली नाही का पुजेला..
नाही त्यांना उशीर झाला कॉलेजवरुन यायला तर आई नको
बोलल्या
.
त्याला वाटलं पिहु पण गेली असेल म्हणून त्याने वीराला कॉल केला होता.
तो जेवण करुन रुममध्ये आला.पिहुचा क्लास चालु होता..पिहुने एक नजर टाकली..विराट न बघताच फ्रेश होयला गेला.
किती अॅटटे्युड आहे.ती दात ओठ खातच बोलु लागली.
विराट फ्रेश होऊन बेडवर बसला.त्याने पिहुकडे एक नजर बघितलं आणि त्याच काम करत बसला.
अकरा वाजता पिहुने लॅपटॉप बंद केला.विराट त्याच्या कामात होता..रागातच तिने बेडवरच्या फाईली उचलल्या आणि टेबलावर आदळल्या.
विराट ने तिच्या कडे नजर रोखुन बघितले.
मला झोपायच उठा .ती रागातच ब्लँकेट ओढू लागली.त्याचा पाय असल्याने ती अजुन जोरात ओढु लागली.
नीट सांगायची पध्दत आहे कि नाही..पेपर्स पण खाली पडलेत ते उचलुन कोण ठेवणार.
मला नाही माहित पाय काढा पिहु जवळ येऊन त्याच्या पायजवळची ब्लँकेट ओढत म्हणाली.
पिहु जोर लावत होती.ती बेसावध होती.
विराटने रागातच पाय काडुन ब्लँकेट एका हाताने जोरात ओढली ..तशी पिहु ब्लँकेट घेऊनच त्याच्या अंगावर जाऊन अादळली...दोन सेंकद दोघांना काळलेच नाही काय झालं.जेव्हा कळाले तर पिहु विराटच्या मांडीवर बसली.तिने अंतर ठेवायाला दोन्ही हात त्याच्या छातीवर ठेवले होते.दोघांचा चेहरयात थोडस अंतर होते.दोघेही एकमेकांच्या डोळ्यांत हरवुन गेले होते.पिहुचे केस विराटच्या चेहरायावर आले होते.तिने अलगद एका हाताने त्याच्या चेहरयावरचे केस काढु लागली... तिने पहिल्यांदा त्याच्या चेहरयाला स्पर्श केला होता.दोघांच्या अंगावर गोड शहारा येत होता. तेवढीच धडधडही वाढली होती...विराटला तिचा हाताचा स्पर्श होताच त्याने डोळे झाकुन घेतले.आपओप त्याचे ही हात तिच्या कमरेवर गेले..त्याने तिला अजुन जवळ ओढले.दोघांचे गरम श्वास एकमेकांच्या चेहरयावर आदळत होते.ओठांमध्ये थोडसं अंतर होते..त्याच्या स्पर्शाने पिहु मोहरुन गेली होती...वीजेच्या जोरात कडकडत झाला तशी पिहु घाबरून त्याच्या मिठीत शिरली.दोघांची पाहीली मिठी दोघेही हरवुन गेले होते...
परत जोरात वीज कडडाली पिहु भानावर येत पटकन मागे सरकली तो ही भानावर आला..दोघांना काहीच कळत नव्हते .
ते..मी..दोघेही एकमेंकाना नजर न मिळवताच बोलु लागले.
पिहु बाजुला होऊन पटकन ब्लँकेट ओढुन झोपली..ती खुप
घाबरली होती.पहिल्यांदाच दोघे एवढ्या जवळ आले होते..विराट ही हँग झाला होता.तो पटकन उठुन सगळ आवरुन झोपुन टाकला.
दोघांना झोप तर येत नव्हती तरी डोळे झाकुन मिटले होते
दो दिल मिल रहे है मगर चुपके चुपके ...
💕💕
सकाळी दोघे एकमेकांच आवरुन घेतात बोलायची हिम्मत दोघांच्यात नव्हती.
पिहु कॉलेज आली....दुपारनंतर चे लेक्चर होणार नव्हते.
पिहु वीरा बरोबर तिची डान्स प्राॅक्टीस बघायला गेली ...
वहिनी दादाशी बोलती कि नाही अजुन वीरा विचारु लागली
पिहुला कालच आठवलं ..
वहिनी...
अहहह, ते (परत तिला विराट रागल्यावच आठवलं सकाळ पासुन विसरलेली होती ..)नाही बोलणार साध विचारलं पण नाही मी चिडलेली आहे कि नाही फरकच पडत नाही..सॉरी पण म्हणाले नाही.
वीरा हसते....
इकडे विराटला काम करता करता त्याला कालच आठवुन पिहुचा स्पर्श जाणवु लागला..तिने त्याच्या चेहरयावरुन हात फिरवला पटकन त्याच्या कुशीत शिरली.त्याच्या चेहरयावर हसुच आलं
.
विराट...एकटाच का हसतोय -मानव
तो लगेच भानावर येतो आणि लॅपटॉपकडे बघतो..प़ण त्याच मनच लागेना..दोन दिवस पिहु बोलली सुध्दा नव्हती..त्याने पिहुला कॉल लावला.
पिहुने आणि वीरा मोबाईल वाजताच मोबाईल कडे बघतात.विराट च नाव बघताच वीरा चिडवु लागली वहिनी बघ दादाचा कॉल आला उचल ...
पिहुने,रागाने कट केला..
विराट ने परत कॉल केला...
पिहुने परत कट केला..
वहीनी उचल ..तु कॉल घेतला नाही ना दादा,काय करेल कळणार नाही...
काय करणार आहे जेव्हा मनात येईल .तेव्हा बोलणार का ....मी उचलणारच नाही...विराट चा परत कॉल आला तिने सायलेंट केला.
आदीची रीहर्सल चालु असते..आदिने पिहुला बघितले..त्याने तिला हाक मारून बोलवलं.पिहु त्याच्याजवळ गेली.
विराट ने वीराला कॉल केला.
हा दादा
वीरा ,वहिनी कुुठे आहे.त्याने चिडतच विचारले.
ते ..दादा..माझी डान्स प्रॅक्टीस आहे ना ते बघायला थांबली आहे लेक्चर नाहीयेत आता ..कॉलेजमध्येच आहोत..
त्याने फोन कट केला.
आता दादा काय करणार आहे काय माहीत..वीरा विचारतच पडली.
पिहु गिटार बघुन खूश झाली...आदि तुला येते वाजवता...
हो ,
मला बघू ना मी कधी नाही घेतली...त्याने तिला धरायला शिकवली.
तुला शिकायची ..
पिहु मानेनेच हो म्हणते..
तो तिला वाजवुन दाखवत होता.पिहु तो कसा वाजवतो.ते बघण्यात गुंग होती.
थोड्यावेळातच विराट कॉलेज मध्ये आला.तो ट्रस्टी असल्याने त्त्याला कोणी आडवलच नाही..तो डायरेक्ट रीहर्सल हॉल मध्ये आला.तो पिहु कुठे दिसते बघत होता..
कॉलेज मधल्या मुलींना माहीतच होता कि तो वीरा चा भाऊ आहे..एका मुलीने वीराला हाक मारली..
वीरा तुझा ब्रदर आलाय..
वीराने नजर वळवली ती शॉकच झाली. तिने डोकल्याच हात लावला.तो माझ्या साठी नाही वहिनीसाठी आलाय..अस म्हणत ती चेअरवर बसली..आता काय होणार आहे त्यालाच माहित
वीरा पटकन उठली आणि जवळ गेली...दादा...तु...तुती घाबरतच विचारु लागली.
पिहु...कुठे त्याने आठ्या पाडतच विचारले...
वीराने बोट केलं त्याने नजर फिरवली.
तो दोघांना बघुन एकटकच बघत होता..आदि पिहुला गिटार कस वाजवायच ते शिकवत होता.त्याने तिचा हास पकडला होता..विराट वीराला बाजुला करुन पिहुकडे वळला.
वीराने डोक्यालाच हात मारला.
त्याला तर आदिला खाऊ कि गिळु अस झालं होत त्यात पिहु पण मस्त तिच्यात गुंग होती.
तो जवळ आला..स्वतःला कंट्रोल केले..आदि म्युझिक क्लासेस उघडलेत का ..तो कडक आवाजात विचारले..
त्याच्या आवाजाने दोघांच लक्ष गेले.पिहु तर शॉक लागल्यासारखीच बघत होती.तिला विश्वासच बसत नव्हता.विराट खरच समोर आहे.
विराटने आदीकडे रोखुन बघतच पिहूच्या हातावरून त्याचा हात काढला.आणि पिहुला स्वतःकडे ओढले.तेव्हा पिहु भानावर आली.
आदि हे गिटार वाजवण्यापेक्षा कामात लक्ष घालं..विराटला तर ती गिटार घेऊन त्याच्या डोक्यातच घालावी वाटत होती.
आदि हसतो..मी माझ काम नीटच करतो..तु सांगायची गरज नाहीये..तोही रुबाबदारपणे म्हणतो.
पिहु ने इकडेतिकडे बघितले..सगळे त्यांच्याकडे बघतच होते.
विराटने पिहु कडे बघितले.तो बोलणारच कि सगळी कडे नजर फिरवली.तिचा हात धरुनच तो बाहेर निघुन आला.
सगळे ते जाईपर्यंत बघतच राहिले
आदि वीरा जवळ आला विराटला काय झालं असा का रीयॅक्ट करतो..आणि पिहुला अस अचानक का घेऊन गेला..
मग तुला घेऊन जायच होत का वीरा त्याच्या डोकयात मारत हसुन बोलते.
त्यांचा ग्रुप हसायला लागतो.
माझा हात सोडा पिहुला सगळे बघत होते म्हणुन लाज वाटत होती.
विराटने पिहुला गाडीशेजारी आणल्यावर पिहुचा हात सोडला.आणि गाडीचा डोर उघडला..
विराट चिडलेला बघुन पिहु पण शांत गाडीत जाऊन बसली.
तो ही गाडीत बसला आणि गाडी स्टार्ट केली..
थोड्यावेळ विराट काहीच बोलला नाही त्याला आदिचा एवढा राग आला होता..
पिहु ...मोबाईल कुठे तो तिच्याकडे न बघताच बोलला.
पिहु काहीच बोलली नाही...ती रागाने बाहेर बघु लागली.
पिहु...कॉल का रीसीव केला नाही.
माझी मर्जी कोणाचा कॉल रीसीव करायचा आणि कोणाचा नाही..
.......
नाही तर तुम्हाला काय फरक पडतो.मी बोलु या ना बोलु...दोन दिवस झाले मी चिडली आहे साध एक सॉरी बोलला नाही.
का, सॉरी चूक कोंणाची आहे.माझी का तुझी..
पिहु रागाने त्याच्याकडे बघते...पण ओरडायाची काय गरज आहे.
.........
तो काही बोलत नाही म्हणुन पिहु पण शांत बसली..
विराट ने स्वतःच्या रागाला कंट्रोल केले...त्याने एक नजर पिहुवर टाकली...ती चांगलीच चिडुन बाहेर बघत होती...
विराट गालत हसतो....
गाडी थांबल्याने पिहु बाहेर बघते..विराटने गाडी एका टेकडीवर आणली होती..पिहु विराट कडे बघते.हे कुठे आलो आपण घर कुठेय.
विराट बाहेर उतरतो...
सुर्य अस्ताला जाणार होता..नुकताच पाऊस पडुन गेला ..हिरवीगार झाडे थंड गार वारा..त्याने पिहुच्या साईडचा डोर उघडला.
पिहु बाहेर आली तिने सगळीकडे नजर फिरवली.कोणीही नव्हते.
शांत प्रसन्न वातवरण होते.
आपण इथे का आलोय.-पिहू.
असच नाही आवडलं तुला ...
आवडल पण ...ती शांत झाली.
दोघेही शांत निर्सगरम्य वातवरणात हरवले होते.मन दोघांच ही शांत झालं होते..
पिहु वर बघ ...
पिहुने वर बघितले.तिचा चेहराच खुलला पक्षांचा थवा त्यांच्या घराकडे निघाला होता..
ती वर बघुन हसायला लागली...विराट तिच्या कडे बघतच राहीला..तिला बर्डस बघुन खुप आंनद होतो.हे त्याला माहित झालं होते.
विराट गाडीजवळ गेला.तो काय करतो म्हणून पिहु मागे वळुन बघू लागली
त्याने डीक्की उघडली.आणि एक पिंजरा बाहेर काढला.त्यात लव्ह बर्डस होते.