Reshmi Nate - 6 books and stories free download online pdf in Marathi

रेशमी नाते - ६

पिहु विराट आवरतात.पिहुने पिंक कलरची कुर्ती व्हाईट कलरची लेगिंग घातली. केसांचा छोटा पफ करुन मोकळे सोडले होते.
विराट ने पण व्हाईट कलरचा शर्ट जीन्स घातली‌... दोघे एकमेकांसमोर येत नजरानजर होते...दोघेही डोळ्यात‌ आरपार बघत होते.

सुमन रुममध्ये येत: विराट झालं का...दोघे आवाजने दचकुन इकडेतिकडे होतात..

मॉम..हहहह.

अरे झालं का लवकर निघा .ड्रायव्हर ला सावकाश गाडी चालावायला सांग रात्री उगाच उशीर नको होयाला ..पोहचल्यावर फोन करा.पिहु सगळं घेतलं का...

हो‌ आई

दोघेही निघुन जातात.

पिहु विराट मागे बसले असतात..विराट लॅपटॉप‌ घेऊन बसला.पिहु रागानेच बघत होती...तिने रागात हेडफोन काढलं आणि
कानाला लावलं.डोक्यतल्या विचारामुळे 😂😂गाणं तर ऐकु येत नव्हतं ( मनात ) लॅपटॉप घेऊन बसायच होत तर मला कश्याला घेऊन आलेत तुम्ही आणि तुमचं लॅपटॉप‌ सोबत छान आहे ना‌..लग्न तर लॅपटॉप बरोबर करायच होते..दिवस रात्र त्या लॅपटॉपलाच बघत असतात...तिची तिची बडबड मनात चालु असते...राग तोंडावर दिसत होता.

विराट च लक्ष तिच्यावर गेलं रागाने तिचा चेहरयावर आठ्या पडल्या होत्या.रागात नेल्स खात होती.. तिला अस बघुन त्याच्या चेहरयावर हलकिशी स्माईल आली.


पिहु ने अचानक त्याच्या कडे बघितले.ती हेडफोन काढत‌े. तो पटकन नजर लॅपटॉपकडे वळवतो..ती डोळे झाकुन शांत झोपून टाकते.

पिहुला थोड्यावेळाने जाग आली...,ती हळुच डोळे उघडुन इकडेतिकडे बघते...गाडी थांबली होती .सगळीकडे शांत सुनसान होते .शेजारी विराट ही नव्हता..ती दचकुन उठत पटकन बाहेर आली. बाहेर विराट आणि ड्रायव्हर होते....

अहो... पिहु ने घाबरतच हळु आवाजात हाक मारली...

तिच्या‌ आवाजातुन विराटला कळालं कि ती घाबरलेली आहे...तो‌ तिच्या जवळ येत गाडी बंद पडली ...

तेव्हा पिहुच्या मनातले सगळे प्रश्न गायब झाले...अजुन ती त्याच्यावर विश्वासच ठेवत नाही तर मनात दोन मिनिट का होईना वादळ उठले होते...आता मोर्चा चालु 😂😂😂विराटला टॉन्ट मारायच ती सोडणार..

पिहु तोंडाला हात लावत: एवढी महाग गाडी पण बंद‌ पडते माहीत नव्हते ...ते पण मिस्टर देशमुखांची कार बंद‌ पडली लोक हसतील कळलं तर

विराट रजोरात ड्रायव्हर ओरडतो...शाम...

ड्रायव्हर घाबरुन येतो...

काय झालं लवकर बघ .

सर ...

काय..(पिहु त्याचा आवाज ऐकुन पटकन कार मध्ये जाऊन बसते.)

सर‌ मॅक्यनिक लागेल अस वाटतयं

विराट त्याला नाही ते बोलून रागातच गाडीत‌ जाऊन बसतो..रागाने वॉच,जॅकेट फेकुन देतो.

पिहुला हसु येत होते..पण तिने हसू दाबले.

ड्रायव्हर ‌खुप वेळ गेला दोघे गाडीतच बसले होते....शांत रस्ता त्यात‌‌ दोघेही शांत‌ चुडीचुप...आता‌ पिहुला ही कंटाळा आला ती शांतता भंग करत ‌मी ..काय‌ म्हणते...

तस‌ बोलल्यावर‌ विराट ने तिच्याकडे बघितले.

आपण किती वेळ बसायच आता चार वाजत आहेत... रस्ता पण मोकळा आहे अंधार पडेल..

मला ही माहित आहे ..पुढच बोल.

लिफ्ट मागायाची का..तो पर्यंत ड्रायव्हर कार नीट करून आणेल.

लिफ्ट आणिं मी ..नो वे..

का....😒

नाही ,तो कापाळाला आट‌या पाडतच मला आवडत‌ नाही बाहेर थांबुन हात करुन कोणाला पण थांब म्हणायच...

पिहु मनातच बोलते...देवाने काय अॅटिंक पिस बनवलाय‌ ..

विराट तिच्या कडे बघत ..अशी काय बघतेय...

काही नाही...ती रागानेच बाहेर उतरते.

तो ग्लास खाली घेत-हे लिसन ,तु जे करते त्याच्या काहीच‌ फायदा होणार नाहीये...आपण कोणाकडून ही लिफ्ट घेणार नाही...

तुम्ही बसा इथेच मी जाते ...काही तरीच असते...मी लीफ्ट मागते तूम्ही बसायच काम करा ना .आता डिमांड करु नका ब्रन्ड बघुन लिफ्ट माग म्हणून ती हसून म्हणाली...

तो रागातच बाहेर येतो....रागाने कारला काय झालं बघतो..

पिहुला लांबुन एक कार दिसते..


(आर्यन -श्रेया विराटचें फ्रेंड आहेत....)

आर्यनला लांबुन दिसते कोण तरी लेडी हात‌ करते..बबली ती आपल्या कारला बघुनच हात करते.बहुतेक कार बंद‌ पडली.

काही ग‌रज नाही ये थांबवायची किती सुनसान ...लोक कशी पण असतात आणि पिलु बरोबर असल्यावर‌ तर अशी नाटकं करु नको हह...

अरे बबली ,मुलगी तर‌ ठिकठाक दिसते,त्यात कार ही चांगलीच आहे..

चोरी ची असेल तर‌

आर्यन लुक देत श्रेया कधी तर डोक वापर‌...

आर्यन ईई नको ना...श्रेया हट्टाच्या स्वरात‌ बोलली.

मम्मा ,अस नाई कलयच जय‌ बप्पा चिलतो ना,हेल्प केली नाई तल तुच बोली ना मना..

गोलु ,फोल्ड युअर हॅन्ड अँड फिंगर ऑन अ लिप‌....श्रेया मोठे डोळे‌ करत बोलली..

तसा श्रेयान बारीक तोंड करत शांत बसला. त्याला ही कळलं काहीतरी सिरीयस असणार म्हणुन मम्मा ओरडली...

आर्यन ची कार जवळ‌ आली पिहुने हात केला.

आर्यन नको चल.,..श्रेया बोलली.

अग श्रेया मी फक्त विचारतो...तु आतुन लॉक करुन बस ...काही मदत हवी असेल तर आता थोड्यावेळाने अंधार पडेल...एकटीच दिसतेय विचार कर ना थोडा..

श्रेया शांत बसली. आर्यन पण बरोबरच म्हणत होता....पण भिती ही वाटत होती. श्रेयान असल्यामुळे श्रेयाची भिती.

आर्यन ने कार पुढे थोडी लांब घेऊन थांबवली कार लॉक करुन तो उतरला.

पिहु विराटच्या जवळ गेली अहो ते बघा कार थांबली ...तुम्ही बोलता कि मी बोलु

त्याने रागातच लुक देत ...काय तु बोलणार ..‌यु आर मॅड तुला मी सांगत होतो असलं काही करु नको...कसली लोक असतात आणि तू खरच ब्रेनचा वापर करते कि नाही...त्याची नॉनस्टॅाप बडबड‌ चालुच होती.

मागुन आर्यन ने आवाज दिला.,हॅलो मी काही हेल्प करु शकतो..विराट रागानेच वळुन आर्यनकडे वळला...

दोघे ही एकमेकांना कडे बघत राहीले.जशी काही ओळख
असल्यासारखे ..दोघेजण विचार करता करता त्यांच्या चेहरयावर हसु येऊ लागले..

दोघे जोरात ओरडले..आर्यन ...विराट...

तीन चार वर्षांनी दोघे भेटले होते..दोघेजण स्कूल कॉलेज मध्ये एकत्रच होते ...नंतर विराटचे बाबा गेल्यानंतर विराट कधीतरी कॉलेजला येत होता...नंतर नंतर विराट बरोबर आर्यन ची भेट‌ होत नव्हती ..मग असच प्लॅन करुन सगळे एकत्र भेटायचे ..आर्यन च लग्न झाल्यावर आर्यन पण बिझी झाला...मग काय‌ व‌र्षातुन एकादाच भेट होत होती. आता दोन तीन व‌र्षानेच भेटले‌ होते...दोघे जण एकमेकांना कडकडुन मिठी मारतात. दोघेचेही डोळे‌ आंनदाने भरले होते.किती छान वाटत ना क्लोज फ्रेंड ‌खुप‌ वर्षाने अचानक भेटला तर ती फिलींगच वेगळी असते😍😍😍

(मी पण माझ्या‌ फ्रेंड्सला खुप मिस करते कधी लॉकडाऊन संपते आणि कधी भेटु कडकडीत मिठी मारू अस झालंय😔😔😔)

पिहु ला तर‌ काय होतयं कळतच नव्हत‌‌ पण अंदाज आला‌ होता.दोघे एकमेकांना ओळखतात.

श्रेया मिरर मधुन बघत होती पण तिला काही कळत नव्हते.श्रेयान मागे बसलेला श्रेयाला मागुन हग करुन श्रेायच्या खाद्यावर हनुवटी ठेवुन शांत बिलगुन उभा होता...श्रेया श्रेयानच्या गालाला गाल लावुन आर्यन ची वाट बघत‌ होती.

मम्मा ...डॅडा...

हो... रे... बच्चु येतात.श्रेया श्रेयान च्या‌ गालाव‌र पप्पी‌ घेत बोलली.


विराट तु कस काय इथे आणि ह्या कोण तो पिहु कडे बघत प्रश्नअर्थी नजरेने विचारतो..

विराट पिहु कडे बघतो..पिहु पण विराट कडे बघते.

विराट आर्यन कडे बघत. बोलणार कि वन मिनीट ,यु अर वाईफ...

विराट जरासा हसत हामी भरतो.

ड्रायव्ह‌र‌ मॅकनिकला घेऊन आला...

कार स्टार्ट होत नाही का ...चल माझ्याबरोबर ड्रायव्हर नीट‌ करुन आणेल....

विराट ला ही आता तेच पटतंय .
(त्यात आता पिहुला तेवढाच‌ चान्स मिळाला त्याला बोलायला‌ 😆😆😆)
पिहुकडे जात हळुच इकडेतिकडे बघत आपण जाऊया....

पिहु थोडी जवळ कानापर्यंत जात आता का...तुम्हच्या इमेजला शोभत नाही ना हे सगळ ....जाऊया आपण कार नीट झाल्यावर ती नजर रोखुन बघते.

आर्यन दोघांना कडे बघत ...काही प्रोब्लेम आहे का...मी एकटा नाहीये श्रेया ,श्रेयान पण आहे गाडीत या तूम्ही आहे मी अस म्हणत आर्यन गाडीकडे जातो.आर्यन गाडीत बसतो...

आर्यन कोण आहे ,चेहरा दिसला नाही

आर्यन चेहरयावर मोठी‌ स्माईल करत अग विराट आहे.

श्रेया ब्लँक होत कोण विराट ..

अगं विराट देशमुख

श्रेयाच्या लक्षात येताच तो सडु ती मोठ्याने बोलते.

आर्यन तिला नजर रोखुन बघतो.

ईईई तो मला बिलकुल आवडत‌ नाही...

हो माहित आहे..नाही तर तुला माझे कुठेलच फ्रेंड आवडत‌ नाही..

खुप भारी असल्यासारखे तुझे फ्रेंड हुहह....आणि,आवडणार पण कारण ते सगळे सनाचे फ्रेंड्स आहेत...😠..

मी पण आहे 😜

तेच तर...आता काय‌ बोलून फायदा ईईई मला ना सनाच नाव काढलं ना...कुठुन बुध्दी आली आणि तुझ्या प्रेमात पडले.

आता हे काय मधेच🙄 नाही तर आहेच मी भारी किती मुली मागे फिरायच्या त्यातली तु...😎😎

😠 मी कधी तुझ्या मागे फिरले ..स्वतःच यायचा माझ्यामागे😏😏

बबली त्याच्यापुढे काही बोलु नकोस शांत‌ डोक ठेव..

डॅडा..श्रेयान आर्यनला हाताला हलवत कोण ये सांग ना...

अरे बच्चु माझा फ्रेंड आहे..आपल्याबरोबर घेऊन जाऊ अंकलची कार बंद‌ पडली ना...

पिहु विराट डोर ओपन करतात विराट पिहुला बसवुन इकडच्या साईडने बसतो..श्रेया मागे वळुन पिहुला स्माईल देते.पिहु पण हलकीशी हसते..

विराट बसल्यावर श्रेयाकडे बघत हाय श्रेया हाऊ आर ‌यु...

मजेत श्रेया वरवर स्माईल करत बोलते.

पिहु विराट कडे बघते .तिला त्याने श्रेयाच नाव घेऊन विचारले ..ती गोष्ट मनाला लागली...

( मी मधे प्रश्न केला होता विराट पिहु मधली कोणती गोष्ट मिसींग वाटते...तर त्या प्रश्नाच उत्तर ...विराट ने अजुन ही पिहु च नाव घेतल नाही...कोणी नोटीस केलं नाही का हे...भरपुर जणंनी मला पुर्ण स्टोरीत काय काय राहिले आहे हे सांगितले..पण पिहुने माप ओलंडताना विराट च नाव घेतलं पण विराट अजुनही पिहु म्हणुन तिला हाक मारली नाही ..हे त्या‌ प्रश्नाच उत्तर आहे.बघु आता विराट कधी पिहुला नावाने हाक मारतो ..चला स्टोरीकडे वळु)

आर्यन कार‌ स्टार्ट करतो.

विराट श्रेयानच्या गालाला हात‌ ...लावत हाय चॅम्प वॉट इज युअर नेम...

पिहु श्रेयानच्या डोक्यावरुन हात फिरवते.

श्रेयान ओळख नसल्यामुळे शांत श्रेयाकडे बघत होता..

पिलु नाव सांग ना अंकलला श्रेया श्रेयानकडे बघत म्हणते.

श्रेयान उभा राहुन श्रेयाच्या हात धरुन ओढत मम्मा ,मना तुझ्या कडे बसायच ‌‌‌.

पिहु त्याला जवळ घेत अरे बेटा इथे जागा आहे ना पुढे कस बसणार मम्माला जागा नको का..पिहु त्याला समजावत‌ होती.

श्रेयान श्रेयाकडे टक लावत बघत होता...श्रेयाला कळलं घेतलं नाही ‌तर रडणार हा ..

ये इकडे.. श्रेया पिहुकडे बघत नाही रहणार नविन कोण दिसलं लगेच बोलत‌‌ ‌नाही. श्रेया त्याला उचलुन घेऊन मांडीवर बसवते.तो लगेच श्रेयाच्या कुशीत शांत बसतो.

आर्यन एक नजर फिरवत श्रेयानच्या डोक्यावर हात फिरवतो.

श्रेया पिहुकडे बघते आणि दोघी ओळख करुन घेतात‌ इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात...आर्यन विराट च्या बिझनेसच्या गप्पा चालु असतात..

आर्यन मिरर मध्ये बघुन विराट कुठे जायच सांगितेलच नाही..

विराट सांगतो .रिसॉर्ट मध्ये लग्न आहे जवळच आहे

आर्यन ‌रिसॅार्टच नाव ऐकुन अरे मी पण व्रिकमच्या लग्नाला चालोलय.

वि‌राट चकित होत ,तुझी कस काय ओळख

बिझनेस फ्रेंड आहे दोन वर्ष झाले ओळख आहे ..आणि श्रेयाची पण चा गली ओळख आहे..मग काय मागेच लागला सगळे या ‌‌म्हणुन तेवढच फॅमिली ट्रीप होईल म्हणुन आलो.


श्रेया मग काय म्हणतेस खुप दिवस झाले भेटच नाही....

श्रेया मागे वळुन- काय विराट ‌तु स्वतः गायब आहेस..म्हणजे,मी काय तुमच्या ग्रुप‌मध्ये जास्त कोणाला भेट नाही.माहीत आहे ना तुला

आर्यन एक लुक देतो....

विराट काही न बोलता आ‌‌र्यन बरोबर बोलत‌ होता.

श्रेया पिहुकडे बघत अंरेज मॅरेज का लवमॅरेज ...

पिहु विराट एकमेंकाना कडे बघतात.पिहु श्रेयाकडे‌ नजर वळवत अरेंज मॅरेज..

हम्म श्रेया..

पिहु ओळख नसल्यामुळे शांत‌ बसली होती.श्रेया श्रेयान ची कहीतरी बडबड चालु आणि आर्यन विराट काय फक्त बिझनेस बोलण ...मधेच श्रेयान आर्यन च येणारया जाणारया गाड्यांच बोलण ..श्रेयानची चिवचिव ऐकुन सगळेच हसत होते.

श्रेयानच लक्ष विराटच्या लॅपटॉप कडे गेलं श्रेयान श्रेयाच्या कानात मम्मा डॅडाच लॅपटॉप कुठे मना दे ..

नाही ये डॅडाने घेतलं नाही विचार तु..

डॅडा...

आर्यन श्रेयानकडे बघत हहहह बोला.

डॅडा लॅपटॉप कुठे मना दे मम्मा देत नाई.

दोघे एकमेंकाना कडे बघतात..श्रेया आर्यनला डोळ्यानेच नाहीये म्हण

बच्चु आणलं नाही मी...

श्रेयान नजर रोखुन आर्यन कडे-डॅडा मम्मा बोली ना तुना खोत मी बघितलं मना बाईल दे तुदा ...

आर्यन त्याचा मोबाईल श्रेयानला देतो.

पिहु हसत- खुप हुशार आहे कि श्रेयान हहह.

सगळं कळत त्याला हो कि नाही गोलू...आर्यन श्रेयानचे गाल ओढतो..

श्रेयान श्रेयाच्या कानात कुजबुझला ...श्रेया हसत- आर्यन कडे बघते..आर्यन त्याच नाव श्रेयान आहे गोलू म्हणु नको..नाही आवडत‌ माझ्या,पिलुला ... फक्त घरात म्हणायच बाहेर श्रेयान बोलायच सांगुन ठेवते श्रेया आर्यन खोट खोट दाटवत म्हणे.

हो हो नाही म्हणत ..खुप आता कळायला लागलं. (श्रेयान ‌खुप‌वेळ झाला श्रेयाच्या मांडीवर बसला होता .श्रेयाची चुळबुळ‌ बघुन आर्यनला‌ कळालं तिला जास्त वेळ‌ पायावर भार सहन होत नाही एक्सडेंट झाल्यापासुन ...)पिलु आता मागे जाऊन बस,मम्माचे पाय दु‌खतात इतक्यावेळ‌‌ बसला ना...जा

श्रेयान मोबाईल बघत बघत मागे पिहु विराटच्या मध्ये जाऊन बसला.थोड्यावेळाने श्रेयानला झोप लागत होती पिहुने हळुच त्याच डोक मांडीवर घेतलं .आणि मोबाईल काढुन श्रेयाकडे दिला .पिहु पण डोळे झाकते..

आर्यन श्रेयाकडे बघत नजरेने तिला पाय त्याच्या,मांडीवर ठेव म्हणुन म्हणतो...

श्रेया डोळ्यानेच नाही म्हणते.

तो परत‌ तिला ठेव म्हणतो.

श्रेया मागे बघते पिहु ने डोळे झाकले होते विराटने लॅपटॉपमध्ये डोक घातले होते

श्रेया हळुच पाय‌ त्याच्या मांडीवर ठेवते .विंडोला टेकुन डोळे झाकते.

थोड्यावेळाने पिहु डोळे उघडुन पाणी पिते.पाणी पिता पिता पुढे लक्ष जाते.आर्यन च्या मांडीवर श्रेया मस्त पाय‌ ठेवुन झोपली होती.सिग्नला गाडी थांबली की,आर्यन तिचे पाय दाबत होता.
पिहु दोघांकडे बघतच राहिली .विराट ची नजर पिहुवर पडली ती काय बघते म्हणुन हा पण बघयाला लागला ..

दोघांची नजरानजर होती...दोघे पटकन ‌खिडकीच्या बाहेर बघु लागले.

राात्रीचे साडे सात वाजले होते..सगळ्यांना कंटाळा आलाच होता.,

आर्यन मि‌‌ररमध्ये बघत विराट जेवण करून जाऊ .

श्रेया - आर्यन मला भुक नाही आता श्रेयान पण,मागुन डॅडा मना पण .
.

विराट:-आर्यन भुक नाही तर ,एका तासात पोहचु आपण रिसोर्ट वर गेल्यावर पहिले जेवणच करु.पिहु ने रागात बघितलं (मानातच मला साध विचारलं पण नाही ,मला भुक लागली कि नाही.स्वतःच बोलुन मोकळे .ती विराट ला बोलणा‌र‌ होती...पण आर्यन बोलायला लागला.

व‌िराट‌,नऊ वाजता आपण जाऊ दोघ गेल्या गेल्या झोपणार मला माहित आहे ..आता ते का नको म्हणतात.त्यांना उतरून जेवायचा
कंटळा आला. पिहु ला भुक लागली का नाही आर्यन मिरर मधुन पिहुकडे बघून म्हणतो..

पिहु विराट कडे नजर‌ रोखुन हो भुक लागली आहे मला काही लोक विसरुनच‌ गेले मी पण आहे बरोबर

विराटला पिहुच लक्षातच नव्हते.तो‌ तिच्या कडे बघतो. तो हळुच सॉरी ते लवकर जायच्या नादात विचा‌रयचे राहिले.

आर्यन श्रेया ब्लँक होऊन एकमेकांना कडे बघतात.

आर्यन एका हॉटेल मध्ये गाडी थांबवतो.

श्रेया श्रेयान आर्यन त्यांची मस्ती करत‌ आत जात होते.

हे दोघे मागेच चालत‌ होते.पिहुला विराटची गोष्ट लागलीच होती मनाला व‌िराटलाही फिल झालं होतं पुढे आर्यन श्रेयाला बघुन पिहुच काळीज थोडफार‌ दुखत होते.

श्रेया आर्यन समोर पिहु विराट बसले होते.आणि त्यांच कार्टुन 😂😂फिश टँक मध्ले फिश बघत उभा होता. आर्यनने त्या तिघांच ऑर्डर दिलं .व‌िराटला तर काय द्याव कळेनाच‌ पिहुला काय आवडते‌ हेच‌ माहित नाही.विराट तिच्या कानाजवळ जातो तशी पिहु दचकतेच हा असा कस काय जवळ‌ आला.पण़ पुढे दोघ असल्याने ती शांत होत त्याच्याकडे स्माईल करत बघते.

तुला जे सांगायच ते सांग तो मेनु कार्ड तिच्या हातात देतो.त्याचा आवाज कानात गुणगुण लागला. थोडा का होईना त्याने विचार‌ केला.तिला माहित होते व‌िराटची आवड निवड तिने दोाघांसाठी एकच मागवले.

श्रेया आर्यनच्या हाताला विळखा घालुन खांद्यावर डोक ठेवुन
बसली होती.आर्यन तिचे केस मागे घेऊन कानात कुजबुझत‌ होता.

पिहु मोबाईल हातात घेऊन विचार करत एवढ पण कोण काळजी घेत का ...आणि हा माझा नवरा साध भुक लागली का नाही हे पण विचारत नाही.गाडीत बसल्यापासुन ती आर्यन ला बघत होती तो श्रेयान श्रेया ची किती काळजी घेतो.जाऊन दोघे झोपतील म्हणून जेवायची घाई ..ती विचारतच गुंतली होती.

विराट लक्ष पिहु कडे गेलं मोबाईल समोर पण लक्ष नव्हतं हे कळालं ..त्याने तिच्या हाताला हळुच टच‌ करत‌ भानवर आणत जेवणाकडे इशारा केला.

श्रेयान कम ,आर्यन ने हाक मारली.

श्रेयान उड्या मारतच आला ...

सगळे जेवण करुन निघाले.

डॅडा,मना उचलुन घे..झोप आली.श्रेयान डोळे चोळतच बोलु लागला.

आर्यन ने त्याला उचलुन घेत..बघ विराट अस असत जाई पर्यंत झोपून जाणार ...

विराट हलका हसतो..

श्रेया गाडीत बसल्यावर आर्यनने श्रेयानला दिलं.

रिसोर्टला पोहचायला दहा वाजले...श्रेयान गाडीतच झोपून गेला होता.

आर्यनने उतरुन श्रेयान ला घेतला.

विराटने स्टाफला बोलवुन सामान घेऊन जायला सांगितले.

स्टाफपैकी एकाने दोघांना रुम्स दाखवले.

आर्यनने दुसरया हॉटेलमध्ये त्याच बुकिंग केलं होतं पण वि‌राट त्याच न ऐकता रिसोर्टमध्ये आर्यन साठी रूम बुक केली.

पिहु‌ विराट रुममध्ये येतात. पिहु सगळीकडे नजर फिरवुन बघते...विराट मागुन येऊन दार लावतो.पिहु वळुन बघते.विराट फ्रेश होण्यासाठी गेला..पिहु शांत‌ गॅलेरीत बसुन बाहेरचा नजरा बघण्यात गुंग होती ..सगळीकडे निसर्गरम्य वातावरण बघुन तिला फ्रेश वाटत होते.तो बाहेर येऊन एक नजर पिहुकडे टाकतो..तो गॅलेरीत जात फ्रेश होऊन घे.काही हवं असेल तर सांग

पिहु नजर वळवून छान आहे तुमच रिसोर्ट ...हॉटेल पण छान होते.पण हे खुपच सुंदर आहे.मी पिहल्यांदाच बघितले ‌ अस ...रुमसुध्दा मस्त

(तिची ती निरागस स्माईल कडे बघत विचार करत होता.
ती तुमच म्हणाली हे ऐकुन विराटला तिच्या बद्दल थोड फिल होते.ती कश्यावरच कधी हक्क दा‌खवत नाही हे त्याला नवल वाटत होते.खरतर हे सगळ्या वर तिचा पण हक्क आहे पण कधी तिने दा‌खवलाच नाही.)

तो गालात हसत हे खुप ओल्ड आहे रिसोर्ट .माझ्या डॅडाला खूप आवडत होते..आम्ही आधी सारख यायचो.पण आता मी इयर मधुन एकदा कधी तरी येऊन जातो.आता ही येणार नव्हतो पण लग्न जवळच असल्याने ते पण आपल्याच रिसोर्ट मध्ये म्हणून .फोन वाजल्याने बोलता बोलता तो थांबला.पिहु त्याच्याकडेच बघत राहीली विराट कधी तिच्याशी बोलु लागला ..ती ब्लँक होत त्याच्याकडे बघत होती.

तो फोन बोलत‌ होता.ती फ्रेश होण्यासाठी निघून गेली.व‌िराट फोन ठेवत पिहुशी तो कस काय ऐवढ खुलुन बोलला हेच त्याला आश्चर्य वाटत होते.पिहु फ्रेश‌ होऊन आली.

पिहु सोफ्याव‌र जाऊन बसली.

व‌िराट तिच्या जवळ येत तु बेड वर झोपू शकते.मी झोपेन

नाही.... नाही तुम्ही झोपा .मी झोपेन इथे

इट्स ओके तु झोप तुला कंफर्ट नाही होणार.तो तिला खुपच फोर्स करत होता पिहु पण जाऊन बेड वर झोपली......
इकडे तर‌ श्रेयान, श्रेया फ्रेश होऊन झोपले .आ‌र्यन फ्रेश होऊन येईपर्यंत दोघे मस्त एकमेकांना बिलगुन झोपले होते.

आर्यनने श्रेयानला नीट सरळ झोपवुन दोघांना ब्लँकेंट
ओढले.श्रेयानला,हलवल्याने तो चीडुन ओरडत डॅडा...डोळे झाकलेच होते.त्याने आर्यन च्या अंगाव‌र पाय‌ टाकत पाय दाब रडतच बोलु लागला.आर्यन कपाळालाच हात मारतच त्याचा पाय दाबतो.
.तेव्हा कुठे‌ श्रेयानची चीडचीड कमी होऊन कपाळ्यावरच्या आट्या कमी होत शांत झोपुन जातो.
.
.
.
.
.
.


विराट ला सोफ्यावर झोपच येत नव्हती.त्याची चुळबुळ चालुच होती.

पिहु बेडवरुन उठुन त्याच्यासमोर अहो..

त्याने डोळे उघडले.काय हव आहे का.

ती मानेनेच नाही‌ म्हणाली .

तो पुढे बोलणार ती‌ बोलली.तुम्ही उठा पहिले.त्याला काहीच‌ कळेना ही काय करते तो‌ उठला...

हे बघा सोफा कंफर्ट नाहीये तुम्हाला मला कळतंय एवढ मोठ्या रिसोर्टचा मालक अस झोपण मला बिलकुल आवडत नाहीये..प्लिज ..तूम्ही बेडवर झोपा.

आणि तु कुठे झोपणार....

मी पण बेडवर झोपणार एवढा तर विश्वास आहे माझा तुमच्यावर उगाच तुमची झोप नीट नाही झाली तर तबियत बिघडेल.

विराटला ही तेच पटत होत सोफ्यावर त्याला झोप येतच नव्हती.
तो ठिक म्हणत दोघ बेडच्या कोपरल्या झोपले. दोघांना ऑकवर्ड वाटत होते..पहिल्यांदा दोघे असे झोपत होते...

.
.
.
.
सकाळी पिहुला जाग आली तिच्या पायावर काही तरी जड जाणवलं म्हणुन तिनें हळु हळु डोळे उघडुन पायाकडे बघितले ..तिचे डोळेच ताट झाले. कारण वि‌राट चा पाय तिच्या पायावर होता..विराट झोपेतेच तिच्या थोड जवळ आला होता आणि एक पाय तिच्या पायावर होता.ती पटकन उठुन सरकली .तिच्या चुळबुळने तो ही उठुन तिच्या कडे बघुन दचकूनच उठला....

ती रागाने बघत‌ तिचा पा‌‌य ओढु लागली त्याच ही लक्ष पायाकडे गेलं

ओहह सॉरी,त्याने पाय काढायला घेतला तर‌ त्याच्या पायात काळा दोरा होता त्यात तिच्या पायातली चैनच्या हुक ला‌ त्याचा दोरा अडकलेला होता तो पाय परत तिच्या पायावर जोरात पडतो.

अहहह ती कळवळते अहो पाय आहे का दगड 😖

आय अम रीअली सॉरी..तो तिच्या पायाला हात हळुवार पणे हात फिरवतो....

तिच्या पायाला त्याचा हात लागतात पिहुच्या अंगाला शहारे ‌येत होते.. ती कावरीबावरी होत अ..हो..तिच्या तोंडुन शब्द फुटत नव्हता..

त्याच्या लक्षात येताच तो पटकन हात काढत दोराच तोडतो.आणि पाय बाजुला घेतो.

पिहु पटकन उभी राहते..

विराट ला काय बोलाव कळतच नव्हत .तो ही उभा राहत आय यम सॉरी माझा पाय‌ झोपेत कस . ते..तो इकडेतिकडे बघत असतो..

पिहु काही न बोलता पटकन आवरायला जाते.

विराट पण मोबाईल घेऊन गॅलेरीत जातो.त्यालाच कळलं नाही काय होतं .
.सकाळी श्रेयानला जाग आली तो डोळे उघडुन इकडेतिकडे बघत होता...आर्यन समोर गॅलेरीत व‌र्क ऑऊट करत होता.श्रेया झोपली होती..श्रेयान उठुन श्रेयाच्या कपाळाला किस करत गुल मॉनिंग मम्मा ...

श्रेया अजुन झोपतेच होती .ती झोपेतच गुड मॉर्निंग म्हणाली.

श्रेयान उठुन उभा राहत आर्यनला हाक मारू लागला..डॅडा....
डॅडा....

आर्यन त्याचा आवाज ऐकून आत आला...माझ पिलु उठलं तो श्रेयानला उचलून घेतो.श्रेयान आर्यनला नाक गोळा करत ओठांचा पाऊच करतो.आर्यन हसत त्याला पप्पी देतो. श्रेयान आर्यन च्या खांद्यावर मान टाकतो.डॅडा बोनविटा ‌..

हो रे बच्चु .उतरा चला फ्रेश हो.मी फोन करुन माझ्या‌ पिलुला बोर्नविटा सांगतो...

श्रेयान वॉश रुममध्ये जाऊन फ्रेश होऊन येतो.

आर्यन ने श्रेयानसाठी दुध मागवलं ..कार्टुन लावलं..श्रेयानच उड्या मारत टीव्ही बघत दुध पिऊ लागला.

श्रेया अजुन झोपाच काढत होती...आर्यन तिच्या जवळ येत तिच्या कानावरुन‌ हळुच बोट फि‌रवत..बबली

नको ना त्रास देऊ ती त्याचा हात काढत ब्लँकेट घेत बोलते.


अग ऊठ ,त्याने ब्लँकेट तिच्या अंगावरुन काढली...

ती डोळे हळुच उघड झाप करत उठुन बसते.काय रे झोपू पण देत नाही...

अग किती झोपायच असत झोपाळु...आर्यन तिच्या जवळ बसतो..

उम्म,ती लगेच त्याच्या मांडीवरुन येऊन बसते.

आर्यन तिचे केस कानामागे करतो...आपण इथे लग्नाला आलोय,उठा..

आपलं काय काम निवांत जाऊ इथे मी रीलॅक्स होण्यासाठी आले घर ऑफिस बोर‌ झालं मला...

हो का, अस म्हणत तो तिला गुदगुल्या करु लागला.

आर्यन शा‌ंत बस ना..

उठ आवर ,भेटुन तर ‌येऊ इव्हिंगला फक्शन आहे.आता भेटुन ‌येऊ मग ‌रिसोर्ट मध्येच फिरु ...

ती डोळे उघडुन त्याच्याकडे बघते.तो ही तिच्या डोळ्यात बघत समोर येतो..

ती मागे सरकते..काय काही नाही.ती श्रे‌यान वर नजर टाकत बोलते.

त्याच लक्ष नाहीये,एक किस...

ती लाजुन मानेनेच नाही बोलते...

तो नजर रोखुन बघत नाही..इतकी अन रोमंटीक झाली ना,काल आली लगेच झोपून गेली...गुडनाईट कीस नाही गुडमॉर्निंग किस नाही...हुम्म.

श्रेया हसत-‌अरे व्हा आज एक वेळ आहे म्हणुन नखरे सूचतायं
हहहह नाहीतर दिवस भर माझ चेहरा बघायला वेळ नसतो.हुहहह.

अरे ,बच्चा किती बोलायच असतं ...तो तिचे गाल ओढतो.तो पटकन तिच्या ओठांवर ओठ ठेवतो...

उम्म ,बस ना..उठु दे ...पिलु समोरच काय.. तुझ वेगळ असतं


अगं त्याला तुझी पर्स मिळाली कि त्याच लक्ष जात नाही कुठे😬😬

.
😲 काय तु ना ती पटकन उठत श्रेयान जवळ जाते.तो मस्त चेअरवर उलटा बसला होता.श्रेयाच लक्ष जाऊ नये म्हणुन ...सगळ सामान काढुन काय शोधा शोधी चालली होती काय माहीत.

पिलु ...श्रेया त्याच्या जवळ येऊन उभे राहते..

तो‌ घाबरुन श्रेया कडे बघतो. दात दाखवत हीहहीही करत हसत..बबीईई तु उतली...तो चेअर वरुन पटकन उतरुन पळतच आर्यन कडे जातो..

आर्यन हसत त्याला उचलुन घेतो.

श्रेया सगळ सामान परत पर्स मध्ये रागाने भरत ...पिलु तु‌ इतका कसा बदमाश आहे काही नाहीये तुझ त्यात कश्याला उचकत असतो सामान ...

मादी का‌र होती..तु घेतईई...

मी....तु इकडे तिकडे टाकतो..आणि मला मागायच..परत हात लावला ना फटके देईलअअअ..कळलं श्रेया त्याच्यासमोर येऊन बोट करुन बोलते...

तो लगेच श्रेयाचा बोट धरत चावु लागतो..

ती पटकन हात काढते..ती मारणार कि आर्यन हसत तिचा हात पकडतो. किती मस्ती करायची ते..शांत बस श्रेया माझ्या सोूनला मारयच नाही अस म्हणत तो त्याच्या गालाला गाल घासतो.ब्रेडमुळे श्रेयानला गुदगुदल्या होत होत्या तर‌ खुदुखुदु हसत‌ होता...

डॅडा मम्माला कल ना....तो हसत बोलतो..

आर्यन श्रेयाच्या गालाला गाल घासतो श्रेया लाजुन त्याच्या मिठीत शिरते..काय तु पण आर्यन..

अगं त्याला किती मज्जा येते तुला येत नाही अहह तो हळुच तिच्या कानात बोलतो.

ती छातीव‌र बुक्की मारत वॉश रुममध्ये जाते.

आर्यन श्रेया श्रेयान आवरुन खाली ब्रेकफास्ट कारयाला ‌येतात.

पिहु आणि विराट पण खाली ब्रेकफास्ट कारयला येतात.

हाय पिहु श्रेया पिहुला हात करुन बोलवते.

चौघे एकत्रच बसुन ब्रेकफास्ट करत होते

श्रेया पिहुच्या शेजारी बसली होती..श्रेया तिलाच निहाळत होती .पिहुने छान रेड कलरची शिफाॅनची साडी घातली होती.हातात त्याच कलरच्या बांगड्या गळ्यात लॉंग मंगळसुत्र दिसायला सूंदर होती च..पिहु तु डेली अशीच आवरते.श्रेया ने विचारले.

पिहु स्माईल करत हो ..

खुप क्युट‌ दिसते.तु श्रेया डोळे मिचकावत बोलते.

पिहु लाजुन हसते...तू पण छान दिसते ..श्रेया ने मस्टर
कलरचा लो हाय नी लेंथ शार्ट ड्रेस घातला .हलकासा मेकअप ,गळ्यात छोट डायमंडच मंगळसुत्र ...

मम्मा मना नको बास..मना खेलायच तल ना,तो श्रेयाचा हात ओढु लागला..

हो जाऊ...मी ब्रेकफास्ट‌ करते...मग जाऊ

नाईईई..आता तल ना...

पिलु मम्माच झालं कि आपण जाऊ..

डॅडा...तु‌ तल..

हो जाऊ ना..

विराट ने स्टाफमधल्या माणसाला बोलवलं.आणि श्रेयानला गेम स्केशन मध्ये घेऊन जायला लावल.श्रे‌यान पण पळतच गेला.

श्रेया:-मग कॉलेज नंतर काय करणार.

पिहु:-नाही माहीत अजुन ठरवलं नाही...

विराट ,हनीमुला कुठे गेला होता ..श्रेयाने व‌िराट कडे बघत बोलली‌.
तसे दोघे एकमेकांना कडे बघयाला लागले.पिहुने लगेच नजर खाली घेतले.

अजुन नाही कुठे गेलो..विराट बोलायच म्हणुन बोलला.

आर्यन बघ तुझाच मित्र तुझ्याच वळणावर...काय पिहु हट्ट करायचा ना घेऊन जा त्या शिवाय निघत नाही ...

श्रेया त्याला वेळ मिळाला कि घेऊन जाईल ..त्या पिहुला काही प्रोब्लेम नाही .

पिहु शांत खाली मान घालुन ऐकत होती.

ओहहह पिहु किती लाजतेस गं विराट चांगलाच तुझ्‌या‌ प्रेमाचा अस‌र पडलाय..त्यात हसल्यावर तिची खळी अहहह.श्रेया बोलत‌ होती.तर विराट पिहुला बघण्यात हरवुन गेला ...

श्रेयाने आर्यनच्या कोपरयाला धक्का मारत विराट कडे बघ म्हणत‌ होती.

आर्यन बघुन गालात हसत....विराट .

विराट भानव‌र येत ..अहहमम्म...

विक्रमला भेटुन येऊ ...त्यांचे फंक्शन असतील. इव्हिंगच फंक्शन अंटेड करु ..मग आपण बाहेर फिरुन येऊ.काय म्हणतोस..तुला जर वेळ असेल तर ..

थोडा वेळ‌ लागेल..मला मग आपण निघु..तो‌ पिहुकडे नजर वळवत बोलतो.

पिहु मानेनेच हो बोलते.

चौघे विक्रम त्याच्या फॅमिलीला भेटतात...थोड्यावेळ बसतात
शांत त्यांची विधी बघत होते.विराट आल्यावर चौघे निघतात. श्रेया श्रेयानला घेऊन आली.श्रेयान तर रुसुन बसला होता...

काय झालं बाबु ला ...आर्यन त्याचा चेहरा बघुन श्रेयाला‌ विचारतो...

अजुन काय तिथेच बसयाच होते..आणलं म्हणून गाल फुगवुन बसलाय.चल तो असाच त्रास देणार‌ श्रेया श्रे‌यान पिहु मागे बसतात.
आर्यन विराट पुढे बसतात.

आर्यन मिरर मधुन श्रेया कडे बघत श्रेया उद्या नाही तर आज निघालो असतो तर बर झालं असते उगाच एक दिवस वाय‌ा

काय अरे आपण दोन दिवस फिरयला आलोय..तेवढाच तुझा खिसा रिकामा नको का श्रेया पिहुकडे बघत बोलते..

तुला तेवढ भारी जमते..कामात काम साधुन घ्यायच

विराट हसतो.अ्जुन बदली नाही श्रेया जशी आहे तशीच आहे..

त्या दूप्पट‌ म्हण..फक्त मला त्रास द्यायचा माहीत् आहे..
श्रेया मागुन त्याला फटका मारते...

डॅडा मना पण तास देती ईईई मम्मा ..

सगळे हसतात..श्रेया श्रेयान धपाटा मारते.

पिहु आणि विराट काहीच बोलत‌ नव्हते..श्रेया ला लक्षात आले.
ती विचार करत होती हे असे का आहेत ...काहीच बोलत‌ नाही. विराट काही बोलला तर मान डोलवते हा नाही म्हणुन ..

चौघेही एका टेकडीवर येतात. छान गार वारा सुटला होता...अंगाला भिडुन शहारे आणत होता..निसर्गरम्य वातावरण
विराट पिहु अंतर ठेवुन चालत होते.. श्रेयानच इकडेतिकडे बॉल घेऊन पळायच चालल होते.

आर्यनने श्रेयाच्या गळ्यात‌ हात घालुन जवळ घेतलं होते.त्या दोघांना अस बघुन ह्यांना ऑकवर्ड वाटत‌ होते..

श्रेया मागे वळुन बघत आर्यन ला हळुच बोलत: आर्यन हे खरच नवरा बायको आहेत का...
.
आर्यन श्रेयाला लुक देत वेडी ..काही‌ काय बोलते.

नाही रे वाटत‌ नाही..दोघे बोलतच नाही एकमेकांशी म्हणून..

अग नविन लग्न झालं थोडा वेळ लागेलच ना ..एकमेकांना समजुन घ्या‌ला...त्यात तो विराट आहे कधी तो मुलींच्या भानगडीत पडलाच नाही..प्रेम वैगैरे गोष्टीत त्याला इंटरेस्ट नव्हता..फक्त डोक्यात बिझनेस च पडलं होतं .आता पण लग्नाला तयार नव्हता..मग खुप आढेवेडे घेत त्याच्या आईने तयार केले.पिहु पण शांत आहे कस बोलव कळत नसेल.

हम्म..पण ना पिहु गोड आहे विराटने थोड एक पाऊल उचलायला हवे

बबली ते त्यांच बघुन घेतील ना...तु का माझ डोक खाते...

आआआ मी डोक खाते.आर्यन पळून जातो..श्रेया त्याच्यामागे पळत होती..

विराट पिहु दोघांची मस्ती बघुन हसु लागतात...

क्रेझी आहेत दोघं विराट दोघांना बघुन पिहुला म्हणतो.

पिहु पण हसत:- हो खूप मस्ती करतात‌ दोघं श्रेया किती बोलते..नानस्टॉप चालुच असते.वाटतच नाही एक मुलगा आहे ,

हो ती आधीपासुन अशीच आहे श्रेया मुळे आर्यन पुर्ण बोलका झालां सारखी नोकझोक परत भांडण नंतर तिचा रुसवा काढायचा खूप एन्जॉय करतात.मेड फॉर इच अदर..

श्रेयान पिहुकडे बॉल टाकतो..आंटी बॉल ...पिहु‌ हसत बॉल घेऊन त्याच्याकडे टाकते. तो परत पिहु कडे बॅाल टाकतो...पिहु बॉल घ्यायला पळयाला जाते पण साडी असल्याने तिचा पाय अडकतो ती पडणार कि विराट तिच्या कमरेला हात लावुन पकडतो...
त्याचा तो गार हातचा स्पर्श अंगाला कंरट लागल्यासारख झाले...तो तिच्या काळ्याभोर‌ डोळ्यात‌ हरवुन गेला‌‌ होता‌.दोघेही सुन्न झाल्यासारखे बघत होते.श्रेयान ने हाक मारल्यावर विराट ने पटकन पिहुला सोडले.

आर्यन श्रेया फोटो काढुन फिरून परत आले.

आर्यन चला,निघु....

विराट इथे जवळपास मॉल आहे का मला शॉपिंग करायची आहे

हो आहे ना ...

आर्यन कपाळाला हात मारुन घेतो.


सगळे मॉलला जातात....श्रेयाला तर काय घेऊ नी काय असे तिचे आणि पिहु शांत बघत फिरत होती.

विराट आर्यन श्रेयान इकडेतिकडे बघत फिरत होते.

विराट असा कसा रे,तु पिहुला काहीच घे म्ह़णत नाही...श्रेया बोलते..

तो‌ पिहुकडे बघतो...श्रेया तिला जे हवे असेल तर घेईल ना..

अस कस घेईल ती प्रेमाने तु घे बोलना...मी काल पासुन बघते..तू खुप रुड बोलतो.तिला तिला ही काय भाषा झाली
बोलायची...किती छान नाव आहे तिच पिहु अहहाहा...आणिमी एकदा पण तुझ्या तोंडातुन ऐकले नाही.

पिहु चमकुन श्रेया कडे बघते..विराटला‌ही‌ काय‌ बोलाव कळतच नाही.

आर्यन च्या डोक्याच्या वर आहे श्रेयाच बोलणं कधी काय बोलेन कळणार.

विराट बोल‌ लवकर ..तिच‌ नाव घे...

विराट पिहुजवळ जातो..इकडेतिकडे बघतो..पिहुच्या हृद्याची धडधड वाढली होती ...

विराट पिहुकडे बघत:- पिहु...त्याच्या तोंडातुन पहिल्यांदा पिहुच नाव निघालं होता..तिच्या चेहारयावर लाली पसरली होती.ती गालात हसते..ती हसल्यावर‌ विराटला तिची खळी दिसते..त्या्च्या ही चेहरयावर हसु उमटते..ती त्याच्याकडे बघते...तो‌ तिच्या डोळ्यात बघत पिहु तुला काही घ्यायच ...

श्रेया तर दोघांना बघत च राहते...ओहहह 😍 किती मस्त आर्यन विराट कडुन शिक जरा तू कधी मला अस बोलला का हुहहह

मम्मा तुना नाही बोल तली तु घेते.मना डॅडा ला मॉल फि‌लवत बसते‌ मना डॅडाला नाई आवडत.हो ना डॅडा...

यावर सगळे हसतात..पिहुला तर आज वेगळाच आंनद होत होता...तिच नजर, विराट वरुन हटतच नव्हती..

विराटच्या,मनात ही पिहु बोलल्या पासुन वेगळच फिल होत होते..पण छान फिलींग आहे ..मन फ्रेश वाटत होते....

(कसा वाटला भाग नक्की कळवा.)

क्रमश:


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED