Reshmi - 7 books and stories free download online pdf in Marathi

रेशमी नाते - ७

दुपारी सगळे रिसोर्टला येऊन जेवण करुन रुममध्ये गे ल ‌..पिहु एकटीच रुममध्ये गेली विराट मला काम होते .

संध्यकाळी सगळे आवरून फंक्शन अटेंड करायला गेले .विराटने पिहुची ओळख करुन दिली.

ओळखीचे मिळाले ..श्रेया आर्यन गप्पा मारत बसले श्रेयांनची तिथल्या काही किड्ससोबत ओळख झाली होती त्यांच्याबरोबर खेळत होता .विराट हि बॊलण्यात बिझी झाला.

पिहू एकटीच इकडेतिकडे बघत बसली होती.समोर हळदीचा कार्यकम चालू होता .विराट ने एक नजर पिहू वर टाकली दोघांची नजरानजर झाली .पिहू लगेच मोबाईल बघू लागली .

पिहूच लक्ष श्रेया आर्यन कडे गेले .आर्यन ने एकमिनटांसाठी पण श्रेयाचा हात सोडला नव्हता ..नंतर विराट कडे बघितले विराट मस्त हसत गप्पा मारण्यात बिझी होता ...मी आहे कि नाही याच काही घेणं देणं च नाही पिहू स्वतःशीच बडबड करत होती तिला थोडं भरून पण आलं होत .कोणीच ओळखीचं नाही एकटीच बसली होती .तिच्याशेजारच्या चेअर एक माणूस येऊन बसला तिच्या हाताला स्पर्श होताच पिहू घाबरून उभी राहिली .

तो माणूस तिला वेगळाच नजरेने बघत होता .पिहूला काय करावं काळातच नव्हते ती घाबरुन विराटच्या शेजारी जाऊन थांबली..

विराटच लक्ष तिच्यावर गेलं तो बोलायचं थांबला तिच्या कडे बघत काही हवं आहे का.??

असं विचारल्यावर ..ती मानेनेच नाही बोली...विराट परत दुसरीकडे बघत बोलु लागला.त्याचा फोन वाजला तो थोडा लांब येऊन रिसिव्ह करत बोलू लागला .तो गेला आणि पिहु दुसरीकडे येऊन एकटीच थांबली.तेव्हा मात्र पिहूचे डोळे भरून आले ...तिने कस बसे डोळ्यातले पाणी आवरले .

श्रेयाच लक्ष पिहू वर गेलं ...श्रेया आर्यनच्या हातातुन हात काढुन आलेच अस बोलुन पिहुकडे गेली.

पिहु..श्रेया ने हाक मारली

तिने स्वतःला आवरत मागे वळुन स्माईल देत..हहह.बोल ना..

श्रेया तिच्या डोळ्याकडे बघत ब्लँक होत ...काही नाही ते एकटी काय करतेस व‌िराट‌ कुठे..

ते आहेत ना फोन आला तिकडे गेलेत...पिहु चेहरयावर खोट हसु आणत बोलते.

चल आपण, बसु..

तितक्यात विराट येतो...‌श्रेया निघायच का आपण .(विराट बोलातना पिहु वर नजर फिरवतो).मी डिनर अरेंज केले आपल्यासाठी ...

हो का.. आर्यन ते बघ तिकडे आहे ..तुम्ही दोघे या मी आणि पिहु पुढे जातो..श्रेयानला पण घेऊन ये. पिहु विराट कडे बघत सुध्दा नाही..(विराट विचारात पडतो आता तर. चांगली होती.अचानक काय झालं)

विराट ओके म्हणत आर्यन कडे वळतो.

पिहु श्रेया रुममध्ये येतात...श्रेया पिहुचा हात पकडुन बेडवर बसवते.

पिहु इकडे बघ काय झालं तु अशी का शांत शांत असते.विराट आणि तुझ मनाव‌िरुध्द‌ लग्न झालं आहे का म्हणजे मी जेव्हा तूम्हाला बघते ना तुमच्या दोघांमध्ये एक पोकळ दरी दिसते...तुला विराट बरोबर हे लग्न जड जाते का..

पिहुला काय बोलाव कळतच नाही ..कोणीतरी पहिल्यांदा तिच मन. ओळ‌खलं आहे .आत्ता पर्यंत थांबवुन ठेवलेले अश्रुंना वाट मोकळी मिळाली तसे,ते वाहु लागले.

श्रेया तर ब्लँकच होती.श्रेयाने पिहुला,जवळ घेतले.तिला रडू दिले..पिहु किती रडायच तेवढ रड पण ह्या पुढे अस रडुन शांत बसुन आयुष्याचे प्रश्न सुटणार नाही एवढ लक्षात ठेव...

पिहु डोळे पुसुन तिच्याकडे बघते...

हो‌ पिहु तुमच्या दोघांचा काय प्रोब्लेम आहे मला माहीत नाही..पण माझ्या वर थोडा विश्वास ठेवुन बघ ..,मी थोडी का होईना मदत‌ करु शकले तर...

पिहु तिच्या कडे बघते ...मला माहीत नाही माझ्या जीवनाचा उद्देश लग्न झाल्यापासुन काही कळतच नाहीये काय चालु आहे ह्यांनी कधी लग्न अॅक्सेपटच केलं नाही..त्यांना कधी सहा महिने होतात.डिवोर्स होऊन मी..ती पुढे बोलायच थांबते.

श्रेया तर‌ शॉक होतच तिच्या कडे बघते..का ...व‌िराटला तु आवडत नाही का..तुमच्या मनाविरुध्द लग्न झालं का

हो त्यांना लग्न नव्हतं कारयच ... कुंडली दोष म्हणुन लग्न करावं लागलं ...

आणि तुला विराट आवडतो..

माहीत नाही आईवडीलांना आवडलं ..हे स्थळ मग मी पण काही नाही बोलले मला वाटले त्यांना आवडत असेल मी म्हणुन मी...तिचे डोळे परत भरुन येतात.पण मला माहित नव्हते..अस काही होईलं बहुतेक दुसरी कोण मूलगी वैगेर ..

श्रेया तिला थांबवत बोलते..नाही गं मी व‌िराटला चांगले ओळखते अस कोणी असेलं ना मला कळलच असते ..तस काही नाही कॉलेज पासुन मी बघते त्याला नंतर. पण भेट नाही पण मला माहित आहे त्याच्या जीवनात प्रेमाच्या विषयी वेगळेच भावना आहे मीन्स तो प्रेम वैगेरे असल्या गोष्टीपासुन लांबच आहे.तो फक्त जिथे त्याचा,फायदा‌ तिथेच श्रेया बोलायच थांबते. (तिच्या डोक्यात येते पिहुकडुन तर काहीच फायदा नाही म्हणुन तो‌‌ तिला इग्नोर करतोय.सहा महिन्याने त्याचा दुसराच काही तरी प्लॅन आहे कसा हा विराट श्रेयाला विराटचा राग च येतो...ती पिहुकडे बघत..मनातच काय विराट आहे ऐवढी छान मूलगी त्याच्या आयुष्यात आली ..पण मी व‌िराटच्या डोळ्यात पिहुबद्दल काळजी बघितली आहे पण तो दाखवत नाही .तो पिहुला लांब ठेवयाचा प्रयत्न करत‌ आहे ...)

श्रेया...

हहहह.पिहु ऐक मी काय म्हणते. तुमच नातं आत्ता कस ही असु दे ..पण ह्यापुढे तु एक पाऊल तर पुढे जाऊ शकतेस ना..म्हणजे आत्ता ही गाठ देवानेच बांधली आहे तर तु पहिली सुरवात करुच शकते ना.

मी ...कस पिहुला श्रेया काय बोलते कळतच नव्हते.

अग तु कधी विराटशी बोलायचा प्रयत्न केला का...तुमच्या नात्याचा त्याने सांगितले तु करतेय ऐवढच तो म्हणाला सहा महिन्यानंतर तुला मी डीवोर्स देणार आणि तु तयार ही झाली..का तयार झाली हेच कळत नाही...

अस कस त्यांना राहायच नाही तर मी कशी जबरदस्ती करु रहा म्हणुन...

अग तु एकदा ही ट्राय न करता लगेच कशी तयार झाली.तु पहिले स्वतःला बदल थोडा कडकपणा ठेव बोलण्यात जगा बरोबर चालायला शिक ...चेहरयावर कॉन्फिडंट ठेव ...अस कोणी ही येऊन लग्न करणार आणि त्याच्या मनानुसार तो तूला सोडुन देणार आणि तु तयार होतीस हे चुकीचे आहे ...विराट चांगला आहे मनानेपण त्याला प्रेम काय असते माहीतच नाही ते तु दे ...मग बघ तुझ्या प्रेमात पडला ना ..तेव्हा प्रेम म्हणजे काय कळेल त्याला ...त्याच्या जगण्याला नवी दिशा मिळेल..तु ऑलरेडी तीन महिने वाया घातले आता राहीले तीन महिने तु कशी त्याला स्वतःच्या प्रेमात पाडते हे तुझ्यावर आहे .

पिहुला श्रेया काय म्हणते ते कळत होते.पण कस करियच ते कळत नव्हते.

पिहु तु वि‌राटशी मनमोकळेपणाने बोल तुला त्याचा किती राग येत असेल सगळा काढ .तेव्हा तुला मन मोकळ होईलं नविन नात्याची सुरवात होईल....मग ऩतर हे नात कस टिकवायच ते तूझ्यावर आहे.अॅटलीस्ट मैत्रीचा हात तर‌ पुढे करु शकते ना..बघ मी सांगायच काम केलं तु आता ठरवं ..

आता पिहुच विचारच्रक चालु झाले ..

आर्यन श्रेयाला कॉल करतो...तो ओरडुनच किती वेळ झाला कुठे गेलीस बोलतो.
हो आले किती चिडतोस ..ती अस म्हणत फोन ठेवते..(मनातच आर्यनला कळालं मग झालं लेक्चर चालु होईल.. )
पिहु चल डिनर वेट करतय नंतर विचार कर...

हहह आले ... पिहु फ्रेश होऊन चेहरा नीट‌ करून आली...श्रेया तिला हातानेच इशारा करत स्माईल कर म्हणते
पिहु चेहरयावर एक गोड स्माईल करते . दोघी जणी बाहेर आल्या ..विराटने छान अरेंजमेंट केली होती लॉन मध्ये

विराट श्रेयान आर्यन वाट बघतच बसले होते...श्रेया ने आर्यन कडे बघितले तो चिडला हे दिसतच होते...खुप वेळ झाला होता दोघी गेल्या होत्या..श्रेयानने तर नको नको करुन ठेवले होते आर्यनला

आर्यन श्रेयाच्या जवळ जात हे धर गोलुला माहीत आहे कसा आहे तो तरी त्याला सोडून फिर तु ...

काय झालं श्रेयान रडलेला दिसतच होता.श्रेयाने श्रेयानला उचलून घेतलं ..काय झालं बबु तु रडला...

काय केलं विचार आर्यन बोलुन परत चेअर जाऊन बसला.

विराट आर्यन कडे बघत लहान आहे जाऊ दे.

श्रेया पिहु सोफ्यावर बसल्या श्रेयाने श्रेयानला मांडीवर बसवले होते...काय केलं विराट श्रेया ने विचारले..

काही नाही गं मुलांमुलांची भांडण बाकी काही नाही श्रेयान ने कोणाला तरी ढकलुन दिलं लागलं नाही पण मुल माहीत आहेत. रडुन गोंधळ

श्रेयान बारीक आवाजात मम्मा डॅडा ओडरला मला तो मुसमुस करतच बोलु लागला..

आर्यन त्याच्याकडे रागाने बघतो.श्रेयान आर्यन कडे बघून परत श्रेयाच्या कुशीत तोंड झाकतो...

पिहु श्रेयानच्या डोक्यावरुन हात फिरवते...आर्यन लहान आहे तुम्ही पण ना कसा चेहरा झाला त्याच्या ..

पिहु तो कसा आहे ना आम्हा दोघांना माहित आहे त्यात श्रेयाने एवढ लाडवून ठेवलं त्याला बसस..

मी लाडावुन ठेवलं का तु जस‌ काय लाडच करत नाही हुहहह.

हो मी करतो लाड पण मला कळतं कुठे लाड करायच कुुठे ओरडायच.

विराट दोघांना शांत करत आपण जेवण करुया का.

दोघेही शांत बसतात.

पिलु धर जेव...

नतो मना...

का रे सोनू..

श्रेया त्याने स्नॅक्स खाल्ले ..जेवणार नाही तो नंतर दुध पिऊ घाल आर्यन जेवता जेवता बोलतो.

हम्म श्रेया पिहु बोलत बोलत जेवण करतात. श्रेयान मोबाईल बघत बसला .

सगळ्यांची जेवण झाले. ..आर्यनने श्रेयान साठी दुध मागवले.दोघेही बिझनेसच बोला‌यच म्हणुन उठुन वॉक करत होते.

धर पिलु दुध पी..श्रेयाने त्याच्यासमोर ग्लास धरला..

मना नको दुध त्यात बोनविटा नाई टाकलं ...

अरे सोनु तु सकाळी पिलास ना धर लवकर नाहीतर डॅडा चिडेल...श्रेया हळु आवाजात त्याला सांगत होती..

श्रेया चॉकलेट पावडर‌ टाकून दे पटकन संपवेल.."पिहु

अग नको, तशीच सवय लागते एकच टाईम देते सकाळी झोपेतून उठला असतो म्हणून देते ते पण आर्यनला आवडत‌ नाही पण तो सकाळ सकाळी रडला की दिवस सगळा रडण्यातच घालवतो‌.म्हणुन तो पण काही बोलत‌ नाही...रात्रीच मग आई समोर असली कि पितो प्लेन दुध तो घरात आईला आणि आर्यनलाच घाबरतो..बाकी कोणाला नाही.

मी नाई घाबत आईला..डॅडा घाबलतो आईला श्रेयान रागाने बघत ओरडुन बोलतो.

दोघी हसतात. ..लाड पण तेवढच करते आई हो कि नाही बाबु.

श्रेयान हळुच हसत मान हलवतो.‌आई मादी आहे मी डॅडाच नाव सांगणार डॅडाला आई ओडरती. मी फोन कलु..

आत्ता नको नंतर‌ कर पहिले दुध संपव इकडे दे मोबाईल किती वेळ झाला मोबाईल बघतो.. श्रेया मोबाईल घेते...

मना बाईल दे,तो ओरडतच श्रेयाच्या हातातुन मोबाईल घेतो..त्याची चीडचीड‌ चालु असते...श्रेया त्याला समजावत होती.पण तो काही श्रेयाला ऐकतच नव्हता.

आर्यनच लक्ष जाते..आर्यन श्रेयानला हाक मारतो..गोलु इकडे ये...
श्रेयानचा आवाज कमी होतो..तो श्रेयाकडे टक लावुन बघतो...

धर दुध पी मगास पासुन सांगते ऐकत नाही ..श्रेया श्रेयानला बोलत होती...

आर्यन त्याच्या समोरच्या चेअर वर येऊन बसत,श्रेया त्याच्याकडे ग्लास‌ दे आणि पटकन माझ्यासमोर‌ येऊन दुध फिनीश कारायच लाहान आहे पिऊ घाला‌यला.

श्रेयाने श्रेयान कडे ग्लास दिला त्याने पण बरीक तोंड करत ग्लास घेतला..आणि हळु हळु आर्यन समोर जाऊन ‌थांबून ओठ काढतच दुध पिऊ लागला....दुध पिऊन ग्लास त्याने ठेवला..
डोळे पुसत फिनीश केलं तो रडतच बोलु लागला...

आता काय करायच आर्यन कडक आवाजात त्याच्याशी बोलु लागला..

फेश होऊन दोपायच ..श्रेयान डोळे चोळत बोलु लागला.

मोबाईल हवा आहे का...

श्रेयान मानेनेच नाही बोलला.

आर्यन श्रेयानला उचलुन घेतो...श्रेया आर्यन दोघांना गुडनाईट बोलुन रुमकडे जातात.

.
.
.
.
पिहु विराट पण एकमेकांना बघत रुमच्या दिशेने जात होते...पिहु थांबली.....विराट ने मागे वळुन बघितले...तिच्या जवऴ जात काय झाले त्याने पश्नअर्थी नजरेने विचारले.

आत्ता तिच्या मनात श्रेयाचे शब्द‌ घुमत होते. ती घाबरत धाडस करुन :- मला बोलायच तुमच्याशी ...जास्त वेळ घेणार नाही प्लिज

तिच ते केविलवाणे बोलण त्याच्या मनाला स्पर्श करुन गेलं ...तो काही न बोलता हातानेच तिकडे बसू असा इशारा करत तो सोफ्यावर‌ जाऊन बसला.

पिहुला आता थोड टेंशन आलं होतं कुठुन सुरवात करावी अस मनात बोलत‌ ती त्याच्यासमोर येऊन बसली...

दोघे शांत बसले होते.

विराट शांतता भंग करत बोलायच तुला सो...तु

तिने त्याच्याकडे बघितले..मी ...मी..(परत श्रेयाचे शब्द‌आठवत कॉन्फिडंट असू दे चेहरयावर )ती ऐक मोठा श्वास घेत त्या्च्या डोळ्यात बघत मला आपल्या दोघांच्या नात्याबद्दल बोलायच आहे ...

विराट ने तिच्या कडे ब्लँक होत बघितले आपल्या बद्दल ...

हो आपल्याबद्दल..इतके दिवस झाले मला बोला‌यच होते..पण कस बोलु कसे कळत नव्हते...तुम्ही तुमचा निर्णय‌ घेऊन मोकळा झाला पण मला विचारलं माझ मत... लग्न दोघांच झालं मग निर्णय तुमच्या ऐकटाचाच का..

पिहुच्या आवाजातली धार आज पहिल्यांदा विराटने बघितली होती...तिचा तो चेहरयावरचा राग अट्युटुड आज बाहेर निघत होता.

विराट फक्त तिच्या कडे बघण्यात गुंग झाला तिच बोलण ही बरोबरच होते.,

लग्नाच्या आधी तुम्ही मला बोलला असता ना मी तयार नाही तर मी स्वतःहुन मागे झाले असते माझी लाईफ स्पाॅईल करुन काय. मिळालं तुम्हाला ....तुमच काय लग्न झालं लगेच डिवोर्स पेपर घेऊन बसलात सगळ आधीच डोक्यात होते .

व‌िराटच्या काळजाला तीर लागल्यासारखी गोष्ट आरपार‌ गेली.

मला तुम्हाला हर्ट करायच नाही ...पण माणूसकीच्या नात्याने बोलताना,विचार करायचा होता तुला किती अॅलमनी हवी सांग हे काय बोलण झालं .तुमच्या कडे खुप पैसे असतील द्यायला पण सगळे पैश्यासाठी मागे मागे फिरत नसतात...तुमच्या आजुबाजुची लोक तसे असतील स्वार्थी म्हणुन सगळे तसेच नसतात...अहो मी तुमच्या शेजारी येऊन थांबले तर‌ काय हवं हे विचारता पण का थांबले हेच तुमच्या लक्षात आले नाही त्या माणसाबरोबर आयुष्य घालवणे खुपच कठिण आहे कळालं आज .अनओळखी जागा कोणी ओळखीच नाही म्हणुन येऊन थांबाले तर. तुम्हाला वाटले असेल काय ही मागे मागे फिरते...परत नाही होणार अस ...पण काही तरी कारण होते म्हणुन आले होते..तुम्ही एकटेच ओळखीचे आहे तुमच्या बरोबर सेफ वाटेल असा विचार करुन आले होते...पण तुम्हाला आवडलं नाही हे कळालं मला

विराट कामाच्या नादात ती का आली होती हे विसरूनच गेला होता..त्याला फिलच होते..का कोण काही बोललं का तुला.तो काळजीच्या स्वरात तिला विचारतो...

तिचे डोळे भ‌रुन आले होते..ती विषय बदलत... राहीलेत तीन महिने असे निघुन जातील .काळजी करु नका माझा कधीच तुम्हाला त्रास होणार नाही ....चला निघु आणि थँक्यु तुमचा किंमती वेळ दिल्याबद्दल ती ताडकन त्याच्यासमोर उठुन पळतच रुममध्ये जाते‌ आत्ता पर्यंत धरू ठेवलेले अश्रु बाहेर पडत होते...तिला विराट अस बोल्यायचा खुप वाईट वाटत होते.पण का हे कळत नव्हते....

विराट अजुन तिथेच थिजल्यासा‌रखा बसला होता...त्याला पिहु जे काही बोललं ते मनाला लागलं होते..आज पहिल्यांदा त्याच्या कडे शब्द‌ नव्हते. मनात आपल्यामुळे कोणाची तरी लाईफ स्पाॅईल झाली याच त्याला खुप दु‌ख झाले होते....तो खुप विचारवेळ विचार करत बसला.

.
.
.
.

आर्यन श्रेया रुममध्ये आले.श्रेयान फ्रेश होयाला गेला.

हा मॅडम, कोणाला धडे शिकवयाला गेला होता..

श्रेया जीभ चावते..मी नाही ते असच गप्पा

तुला मी चांगल ओळखतो ,असच कुठे गायब होत नाही तु ...अग दहा वेळा सांगितले लोकांच्या लाईफ मध्ये इंटरफेअर करु नको पण,ऐकायचच नाही सतत लोकांना उपदेश देत बसयाच‌.ह्यासाठी आली का तु...इथे..आर्यन ची बडबड चालुच असते...श्रेया रागानेच तिच आवरत असते...

श्रेयान फ्रेश होऊन आर्यन कडे एकदा श्रेयाकडे एकदा बघत हळु हळु बेडवर जाऊन बसतो..श्रेयान तोंड फुगवुनच बसला होता.आर्यन श्रेयान बघुन शांत बसतो..

पिलु मी पण डॅडाशी कट्टी ..तु पण कर..श्रेया श्रेयानला नाईट सुट घालत बोलते...

श्रेयान हळुच आर्यन कडे बघत कंरगळी दाखवत कट्टी करतो.

आर्यन हसत त्याच्याजवळ येत ..बर कट्टी का...ठिक ये,मी पण कट्टी श्रेया परीने मला तिच्यासाठी डॉलहाऊस आणायला लावले आपण जाताना घेऊन जाऊ हहहह...

हुहहह.श्रेया रागानेच फ्रेश होयला जाते.

डॅडा नाई घ्यायच त्या पलीला काय तु श्रेयान रागानेच आर्यन च्या मांडीवर जाऊन बोट दाखवत बोलतो.

का?? तु तर कट्टी आहे ना मग गोलुला काही नको ...परीलाच टॉईज घेऊन जाणार मी .

मी,तोलतो तिच डॉल मग कस देणार तु..

आर्यन हसत...अस करायच असते..का..

मग तु मना घेत नाई फक्त पलीला मना पली आवडत नाईई‌ तु मादा आहे मना रेड कलरची बाईक घे मी तुना तास देत नाई हहह श्रेयान हसत नाक गोळा करत आर्यन ला पप्पी देतो..

तु तर कट्टी होता ना ..

नाई ती तुझी बबईई म्हणती कट्टी कल मग केलं मी तर बट्टी तु घेतो ना बाईक मना..श्रेयान नाटकी हसत आर्यनला म्हणतो. .

आर्यन त्याला कुशीत‌ घेऊन कवटाळतो...हो घेऊ ..नाटकं करायला तर‌ मम्माच्या वर गेला‌य आगाऊ...

श्रेयान लगेच दात दा‌खवत येईईई आय लव्ह यु डॅडा...

आय लव्ह यु टु बच्चु उम्हाहहा ...

श्रेयानला आर्यन आडव करुन कुशीत घेऊन झोपवतो‌ दिवसभ‌‌र दमल्यामुळे श्रेयान पटकन झोपतो.

आर्यन बाथरुमचा दरवजा वाजवतो....

हा आले..सुखाने बाथ पण घेऊन देत नाही अजून काय लेक्च‌र द्यायच ती रागानेच दार उघडून बाहेर येत होती.आर्यने ने तिच्या कमरेला पकडत परत आत ओढत दार लावले..

आर्यन काय हे ...श्रेया चिडतच‌ बोलते..जाऊ दे मला

हो हो जा..मला पण फ्रेश होयच‌..

मग हो ना...सरक जाऊ दे..

तो तिच्या जवळ येतो...

आर्यन तु...ती पळणारच कि आर्यन ने तिला आडवलं

आर्यन मी आत्ताच बाथ घेतला ..‌

हो गं सोना माझ्या बरोबर एकदा घे...तस तर मी जाऊ देणार नाही तुला...

पिलु उठेल ना..

नाही उठत आता सकाळी पाच सहा वाजताच उठतो...

आर्यन ती पुढे बोलणार कि आर्यनने शॉवर ऑन केला...तिचे शब्द‌ ओठांवर आलेले तिथेच विरघळले..

आर्यनने अलगद‌ बोटाने तिच्या चेहरयावर आलेले केस बाजुला केले...आर्यनच्या स्पर्शाने ती मोहरुन गेली...

ती पटकन त्याच्या मिठीत शिरली...

दोघेही ऐकमेकांच्या प्रेमात बुडुन गेले.

.
.
.
.

.सकाळी पिहु विराट दोघांचीही हिम्मतच होत नव्हती एकमेकांकडे बघायची .

लग्नासाठी दोघेही आवरत होते.पिहु ने येलो कलरची इमरॅाडरी असलेली त्यात ब्लश पिंक कलरचा पदर साडी घातली होती.विराट ची आवरता आवरता तिच्या वर नजर जातच होती..
ती नॉट बांधण्याचा प्रयत्न करत होती पण,तिच्या हातातुन दोरी सारखी सुटतच होती.विराट तिची धडपड बघत (,मनातच म्हणतो
इगो तर कुटुन भरलाय ..).तो तिच्या जवळ जात तिच्या दंडाला पकडुन स्वतःकडे वळवतो.इतक अचानक झालं पिहुला कळलच नाही विराट ने अस का केलं ती थरथरतच त्याच्या कडे ब्लँक होत बघत होती.तो तिच्या डोळ्यात बघत हळुच हात मागे घेऊन मागच्या दोन लेस धरतो. त्याचा पाठीला हात लागताच पिहुने डोळे घट्ट मिटुन पदर मुठीत आवळत होती. तो लेस लावताना तिचा चेहरा निहाळत होता...एवढ्या ऐेसीत पण तिला घाम फुटला होता. तिच्या चेहर‌यावरील लज्जायुक्त भिती थरथरत्या ओठांवर ब्लश पिंक कलरची लीपस्टीक ओठांना चिटकुन असलेले तीळ ह्यानेच विराट घायाळ होत होता. त्याच्या चेहरयावर आपओप स्माईल आली...त्याने लेस बांधुन अलगद हात काढुन हाताची घडी घालुन थांबला.. गालात हसत विराट ने हाक मारली .पिहु

विराटच्या तोंडातुन तिच नाव ऐकताच तिच्या कानात पक्षांची चीवचीव ऐकु येते होती..तिच हृद्य जोरात धडधडु लागले‌‌...अस का होतेय तिला काहीच कळेना..तिने अलगद तिचे डोळे उघडले..समोर विराट होता..ती इकडेतिकडे बघत भानवर येते..

पिहु ....विराट ने परत तिच नाव घेतलं...

पिहु:- अहहह काय...हा ते निघायच आहे ना ती नजर‌ चोरून काय तोंडात येईल बरळु लागली.

पिहु मला तुझ्याशी बोला‌यच .

पिहु शांत‌ होत त्याच्याकडे बघते.

काल तु जे बोलली अगदी बरोबर बोलली .माझ खूप चुकलं तुझी लाईफ स्पॅाईल करून... पण आता मागच आपण बदलु शकत नाही...आणि पुढे होणार आहे ते...मला कधी अश्या बंधनात अडकायच नव्हते.मी कधी माझा संसार उभा करेन असा कधीच विचार केला नाही ...प्रेम वैगैरे ह्या गोष्टीपासुन मी आधीपासुनच लांब राहीलो..त्यात तु अचानक माझ्या लाईफ मध्ये आली तेव्हा मला जे योग्य वाटलं ते केलं,.मी कधी तुला चुकुन हर्ट केलं असेल तर आय अम व्हेरी सॉरी...


पिहु,एकटक त्याच्याकडेच बघत असते..

पिहु ,से समथिंग


मी काल जास्तच बोलली सॉरी ...पण राग ही तेवढाच होता मनात
तुम्ही राग मानून घेऊ नका‌...

विराट बोलणार कि त्याचा फोन वाजला..तो‌ फोन रीसीव करत बोलत असतो...

पिहुला श्रेया बोलेली आठवते...तु पहिले पाऊल उचल....एकदा मैत्री करायला काय हरकत आहे.पिहु मनातच बोलू लागाली.

विराट कॉल संपवुन तिच्या कडे वळला.दोघांही काय बोलाव कळतच नव्हते पुढे .‌.पिहु अजुन मनातच घोळु लागली बोलु कि नको...

विराटने तिच्या समोर हात केला.पिहु प्रश्सअर्थी नजरेने त्याच्याकडे एकदा आणि त्याच्या हाताकडे बघत होती...

आपण फ्रेंड्स बनु शकतो का .. मला माहित आहे हे सगळ वेगळ आहे ..जितके दिवस आपण एकत्र आहोत एकाच रूममध्ये अनळोखी राहण्यापेक्षा फ्रेंड्स बनुन राहू.. मला माहित नाही आपल्या नात्याच काही भविष्य आहे कि नाही पण एक सुरवात तर‌ करुच शकतो ना..

पिहु विराट कडे आश्चार्याने बघत होती...तिला जे बोलायच होते.ते विराट इझिली बोलुन मोकळा झाला होता.ती एकटक त्याच्याकडे बघत होती.

तो परत तिला हाक मारत.... पिहु...

पिहु भानावर येत अहहह हो ‌.‌हो...ती हसत हात पुढे करत त्याच्या हातात हात मिळवते..दोघांच्या चेहरयावर एक वेगळ्याच प्रकारच समाधान असते.. थोड्यावेळाने पिहु हाताकडे बघते विराट ने हात अजुन धरलाच होता...ती डोळ्यानेच हात काढा म्हणून इशारा करते.तो पटकन हात काढुन इकडे तिकडे बघत लग्न अटेंड करून निघायच आहे...

पिहु हसत मान हालवते.


.

श्रेयाने सी ब्लु कलरची नेटची साडी त्याव‌र पिच कलरचा ऑफ शोल्डरचा ब्लाऊज घातला होता.आर्यन मागुन येऊन तिच्या ब्लाऊजची चैन लावुन तिला मागून मिठीत घेत केसांचा सूंधग घेत..यु लुकिंग ब्युटीफुल हळुच तिच्या कानात म्हणतो.

श्रेया आरश्यातुनच नजर टाकत लाजते.आज पहिल्यांदा बघतोस का ..

तुला किती वेळा पण बघु दे मन भरत नाही तो अजुन घट्ट पकडत बोलतो..

आर्यन आवरु दे‌ ना सोड ..

त‌ु आवर‌ ना मी माझ काम करतो.तो तिला मिरर मध्ये बघुन डोळा मारतो.

श्रेयान दोघांसमोर येऊन एकटक बघत डॅडा..मम्मा तो जोरताच ओरडत‌ बोलतो...

आर्यन दचकुन श्रेयाला सोडत‌ तिच्या पदराला घेऊन काय तरी करायच म्हणुन चालु असते.श्रेया आर्यनला मोठे डोळे करुन बघते.

डॅडा तु काय कलतो‌.‌श्रेयान आर्यनच्या समोर य‌ेऊन विचारतो.

आर्यन त्या्च्याकडे बघत मी ..मी ना मम्माला हेल्प करतो.‌

तु नाई कलायची मम्माला हेल्प .

श्रेया श्रेयानकडे बघते .

का रे सोनु ..आर्यन त्याला विचारतो..

नाई मम्मा कट्टी तुद्याशी तु मम्माला ओडरतो मना ओडरतो. तॉरी पण बोलत नाई मम्मा तु डॅडाला कडल नाई कलायच अस म्हणत श्रेयान श्रेयाच्य‌ा पायला विळखा घालत हग करतो.

आर्यन कपाळालाच हात मारतो..माय लेक दोघं सेम आहे बरोबर सगळ लक्षात असते.

श्रेया हसत श्रेयानला उचलून पप्पी घेते माझ बाळ गं किती हुशार आहे.

आर्यन जवळ‌ येत‌ माझी बबली आहे मी हग करणार तो श्रेयान कडे बघत बोलतो.

श्रेया लगेच आर्यनच्या छातीवर हात ठेवत :- अहहह नाही ..मिस्टर राणे माझ्या मुलाला तुम्ही कडल केलेले आवडत नाही सॉरी बोला पहिले आम्हा दोघांना ....श्रेया हसत बोलते..

श्रेयान पण येईईई मादी बबीईई तो श्रेयाला पप्पी घेत आर्यन जीभ दाखवतो..

आर्यन बारीक डोळे करत श्रे‌यानकडे बघत ...गोलु नवीन बाईक कोणाला हवी ..

श्रेयानच्या लक्षात येताच मना तो हसतच पटकन आर्यन कडे झेप घेतो.आर्यन हसत श्रेयानला घेतो.

श्रेया श्रे‌यानला एक फटाका़ मारते. ...किती आगाऊ आहेस आत्ता पर्यंत तर माझी साईड घेऊन डॅडाशी भांडत होता ...हुहह.आणि एका बाईक साठी लगेच पार्टी चेंज

काय करणार तुझ्यावरच गेलाय आर्यन हळुच श्रेयाकडे बघत बोलतो...

श्रेया आर्यनच्या दंडाला फटके मारते...काय रे तू.‌.

मम्मा ,तु डॅडाच ऐकत नाई मग डॅडा चिलतो.श्रेयानचे आर्यनला मस्का मारायच काम चालु असते..

आर्यन श्रेया दोघे ही एकमेकांनाकडे बघत हसतात.

श्रेयान पण लाजुन हसयाला लागतो.....

.
.....

सगळे लग्नासाठी तयार होऊन येतात..लग्न लॉन मध्ये होते...

लग्न होते.विराट ने आज पिहुला एकट सोडलं नाही कारण काल तिच्या बोलण्यातुन त्याला जाणवलं होतं इथे काही तरी झालं असणार त्यात तिच्या ओळखीच कोणीच नाहीये आपण आपलया जबाबदारी वर तिला आणलं .म्हुणन आज त्याने एकट सोडलच नाही.

पिहु श्रेया गप्पा मारत होत्या श्रेयाने मुद्दाम कालचा विषय‌ काढला नाही कारण पिहुची लाईफ आहे आपण उगाच इंटरफेअर करु नये.तिने स्वतःहुन सांगु दे. दोघी इकड्याच्या तिकडच्या गप्पा मारतात.

पिहु ने श्रेयाकडे बघत श्रेया ‌....

श्रेया पिहुकडे बघत ...का‌य गं

थँक्स

श्रेया गालात हसते.

मला तूझी साथ मिळाली....खुप जवळच वाटलं तुझ्यासोबत बोलुन मन हलक वाटतेय..

श्रेया तिच्या हातावर हात ठेवते...तुझी लाईफ बिनधास्त जग..कोण काय‌ बोलते ह्या कडे लक्ष देऊ नको लग्न झालं म्हणुन तुझ स्वतंत्र. कोणी हिरावुन घेतलं नाही...हहह काही मर्यादा असतात ...पण़‌ मन ‌खुलुन जगयाला मर्यादा नसतात.मी पण लग्न झाल्या व‌र घाबरायची कारण मला हे नाती वैगेरे काही कळत नव्हते.सारख्या चुका होयच्या पण आर्यन ने मला समजुन घेतलं आणि आज बघ अजुन ही आमच्या नात्यात थोडा इंच ही फरक नाही.आधी कसे होतो तसेच आता आहोत..‌त्यात अजून भर श्रेयानची दोघी खळखळून हसतात.

श्रेया,आर्यन खुप प्रेम करतात ना तुमच्यावर ..दोन दिवस मी बघतेय किती काळजी घेतात...

श्रेया हसत,आर्यन वर नजर टाकत...हो खुप म्हणजे खूप मी फक्त त्याच्यासमोर हसत खेळत राहावी ...काळजी़ 😥 काय सांगु नको एक प्रकारच टॉ‌र्चर आहे मला आणि श्रेयानला 😅😅

पिहु खुदकन हसते.

जेव्हा विराट आणि तूला प्रेम होईल ना तेव्हा तुला कळेल प्रेमाचा अर्थ...😍
,
पिहु गोड लाजुन खाली बघते.

श्रेया जोरात हसते....

आर्यन श्रेयाला हाक मारतो...,पिहु मी आले हा...अस म्हणत श्रेया निघुन जाते..

पिहु एकटीच थांबली होती.ती इकडेतिकडे बघत होती...विराट तिच्या समोर येऊन ज्युसचा ग्लास धरतो.

पिहु एकटक त्याच्याकडे बघत राहते.ती विराटला बघुन मानतुन
सुखवाली होती.

विराट डोळ्यानेच तिला ग्लास घे म्हणतो.पिहु भानवर‌ येत पटकन ग्लास घेत ओठांना लावते.

लग्नातुन सगळे रुमवर येतात...चौघजण आवरुन गाडीजवळ‌ येतात.

आर्यन विराटला हग करतो..चल बाय आपली जर्नी ऐवढीच होती..

श्रेया पिहुला हग करत बघु नेकस्ट टाईम कधी चुकुन परत भेटलो तर😅

सगळे हसयाला लागतात.श्रेयान पण दोघांना बाय करतो.

विराट श्रेयानला उचलुन घेतो.तु मला अजुन नाव नाही सांगितले .

श्रेयान इनोसंट फेस करत हळुच हसत तेयान अस म्हणत आर्यन कडे झेप घेत त्याच्या कुशीत शिरतो.

सगळे हसतात.

डॅडा तल लवकर आई वाट बघती मादी ...

हो जाऊ आर्यन त्याला मागे बसवतो..आर्यन श्रेयासाठी दार उघडुन मॅडम चलयाच का अजुन तुमच ज्ञान वाटायच लोकांना ..

श्रेया हसत आर्यनच्या मिठीत शिरते..आर्यन मिठी घट्ट करत वेडाबाई चल आता ...

श्रेयान ग्लास खाली घेऊन बाहेर बघत डॅडा तल ना मना बाईक देतो बोलो तु...

दोघेही हसत गाडीत बसतात.
.
.
.
.
विराट पिहुसाठी दार उघडतो..पिहु मान खाली घालुन गालात हसून आत बसते.

विराटला ही तिच्या चेहरयावरचे हसू बघुन तो ही मनोमन सुखवाला होता...

दोघेही गाडीत शांतच बसले होते..काय बोलायच काय कळतच नव्हते.त्यात‌ विराट चा तर फोन सारखाच चालु असतो .संध्याकाळ झाली.

विराटने ड्रायव्हरला एका कॅफे मध्ये गाडी थांबवण्यासाठी सांगितले.दोघेही कॅफे मध्ये जातात. मस्त जोरात पाऊस पडुन रीमझिम चालु होता....वातावरण गार झाले होते...पिहु बाहेर पावसाला बघत खुश होत गालात हसत होती....


विराट ने दोन कॉफी ऑर्डर केल्या ...पिहु तु काय ‌खाणार आहे का ..


पिहु विराट कडे नजर वळवत नाही म्हणते.कारण तिला मस्त पावसात कडक चहा पिऊ वाटत‌ होता.


काॅफी येते .दोघे ही कॉफी पित होते.विराटच तर मोबाईल मध्येच जास्त डोकं



पिहु विराटकडे बघत :- कॉफीची टेस्ट ऐवढी काही खास नाही ना.
.

विराट तिच्या कडे बघत :- माझी ब्लॅक कॉफी आहे .

पिहु कॉफी टेबलावर ठेवते.मला नकोय आपण दुसरीकडे जाऊन चहा घ्यायचा का.

आपण बोल्यावर विराट तिच्याकडे एकटक बघु लागतो.

पिहु लगेच हळु आवाजात म्हणजे मला कॉफी आवडत‌ नाही जास्त.


तो तिच्या कडे बघत:-आता पुढे काहीच मिळणार नाही...आधी बोलली असतीस तर ...आणि इथे चहा नाहीये..


पिहुचा चेहराच उतरतो...हो का ...अस म्हणत ती मग उचलून कॉफी पिते.

दोघेही कॉफी संपवून बाहेर येतात. विराट पावसाच्या रिमझिममुळे फास्ट पाऊले टाकत गाडीपर्यंत पोहचतो.पिहु मस्त पावसामध्ये भिजत एन्जॉय‌ करत हळुहळु चालत येत होती...विराट ने रुमाल काढुन तोंडावरच पाणी पुसलं त्याच लक्ष पिहुवर गेलं


ती मस्त वर पावसाकडे बघत गोड स्माईल करत खुश होतं पावसाच्या थेंबानी तिच्या अंगावर गोड शहारे येत होते.तिला अस एन्जॉय‌ करताना विराट तिलाच एकटकच बघत राहिला.

ती जवळ येत पटकन गाडीत बसते..ती गाडीत एवढी फास्ट अचानक बसल्यावर विराट भानावर‌ येत गाडीत बसतो... काय झालं

पिहु हातावर हात घासत मला थंडी वाजल्याने हात पाय गार पडलेत माझे... ती थरथर कापतच बोलत असते....(कॅफे मध्ये पण बराच वेळ बसल्याने तिला थंडी वाजु लागली.)



मग भिजायच कश्याला ..तो आटया पाडुनच रागातच बोलतो.

ती बारीक चेहरा करुन बाहेर बघते...

विराटने ड्रायव्हरला ऐ सी ऑफ करायला लावला.समोरुन त्याच जॅकेट तिला देतो...

ती घेऊन पटकन घालते.

तो रागातच लॅपटॉप उघडुन त्याच काम करत बसतो.


त्याला ऐसी शिवाय जमत नाही हे पिहुला माहित होते.पिहु थोड्यावेळाने मी आता ठिक आहे ...काका ऐसी ऑन करा...


विराट काहीच रीअॅक्ट करत नाही .

थोड्यावेळ पिहु मोबाईल बघते झोप येत असल्याने ती डोळे झाकुन झोपते. गाडी टर्न होताना तिच डोक विराटच्या खांद्यावर येते.तो ब्लँक होऊन तिच्यावर नजर टाकतो. पिहु झोपेत आहे हे लक्षात आल्यावर तो ही तसाच न हलता लॅपटॉप बंद करुन डोळे मिटतो.

घरी यायला नऊ वाजतात.पिहु अजुन झोपली होती.तो हळुच तिला हाक मारत पिहु...

तिच्या कानात काही संगीत वाजत असल्याच जाणवुन ती मोठी स्माईल देते.


विराट तिच्या कडे बघत गालात हसत परत तिला हाक मारतो .पिहु घर आले.उठ.

अस बोल्यावर ती खाडकन डोेळे उघडते ...बघते तर तीच डोक विराटच्या खांद्यावर आहे.ती पटकन स्वतःला सावरून दुर सरकत सॉरी..सॉरी कधी झोप लागली कळलच नाही.ते..

तो तिला थांबवत इट्स ओके ..उतर.

ती त्याला नजर न मिळवताच पटकन उतरून आत जाते.

तो ही तिचा असा गोधंळुन जाण्यावर हसत‌ बाहेर येत घरात जातो.

सुमन पिहु विराटला बघुन खुश होऊन तिच्या जवळ जात:- कसा झाला प्रवास


दोघेही हसत एकदाच हो म्हणतात.नंतर शॉक होत एकमेकांना कडे बघतात.


सुमन हसतात. बर जावा फ्रेश होऊन ये मग जेवण करा.


पिहु हसून मान हलवुन निघुन जाते.विराट पण तिच्यामागे निघून जातो.


पिहु गरम पाण्याचा शॉवर घेऊन बाहेर येते.तिच्या बॉडी वॉश चा सुगंध रुमभर पसरतो.. विराटला सुगंध अनभवुनच तिच्यावर एक नजर टाकत.. तो ही फ्रेश होण्यासाठी निघून गेला.तो बाहेर येतो..तो चेंज करुन बेडवर नजर टाकतो तर पिहु ब्लँकेट घेऊन छान झोपली होती.विराट तिच्या निरागस चेहरयाला बघत गालात हसत असतो..

सुमन पिहुला हाक मारतच जेवयला किती वेळ अस म्हणत त्या रुममध्ये येतात.त्यांची नजर विराट वर पडते.तो पिहुला बघण्यात हरवुन गेला होता.सुमन त्यांच हसू दाबत विराट पिहु कधी झो‌पली.


मॉमच्या आवाज ने विराट दबकतो.तो पटकन दुसरी कडे नजर वळवत हा मॉम...

अरे पिहु़ कधी झोपली जेवण करुन आलात का...

नाही ...जेवायच अजुन,त्याला आता वाटते बाहेरच जेवुन आलो असतो तर बर झालं असते ..का विचार केला नाही मी त्याला स्वतःचा राग येतो.


हम्म ,चल तु जेवण कर ती नंतर उठेल थकली असेल .


विराट मान हलवुन मॉमला नजर न मिळवताच बाहेर निघुन गेला.
सुमन दार ओढुन बाहेर गेल्या.


विराट जेवण करुन बांबाशी बोलुन परत रुममध्ये येतो.दार लावुन लाईट ऑफ करून ऐसी बंद करतो.त्याला रिसो‌र्टमध्ये दोघं एका बेडवरच झोपत होते ते आठवते.तो बेडवरची उशी घेऊन तिच्याकडे बघत स्टडीमध्ये निघुन जातो.


पिहुला एक च्या आसपास जाग येते. ती एक नजर पुर्ण रुमभर टाकत उठते.ती दार उघडून बाहेर जाते.



दा‌राच्या आवाजाने विराटला जाग येते.तशी त्याची झोप सावधच असते‌.तो उठुन स्लाईडी़ग ओढुन बाहेर बघतो तर पिहु बेडवर नव्हती तो भिंतीवरच्या घडयाळ कडे बघत आता कुठे गेली.तो ही बाहेर येतो.


पिहु किचनमध्ये फ्रिजमधुन दुध घेऊन फ्रिज बंद करत ग्लास ओठांना लावत‌ दुध पित होती.रात्रीची किचनमध्ये डीमलाईट होेती.विराट पण पिहुला शोधत खाली आला होता.त्याच्या पायाच्या आवाजाने पिहु घाबरते.आता कोण आहे रात्रीच विचार करत तिने किचनमधुनच बाहेर डोकवलं कोणच दिसलं नाही.ती परत वळते.

मागुन विराट तिला हाक मारतो. पिहु दचकुन मागे बघते तिच्या हातातला ग्लास पडणारच कि विराट ने ग्लास पकडत तिच्या हाताला घट्ट पकडलं.त्याच्या हाताचा गार स्पर्श होताच पिहु्च्या तोंडातुन आवाज निघेनासा झालां .श्वास अडकल्यासारखा झाला होता.


तो परत विचारतो.तु रात्रीच काय करते.काय हवं होते का.
तीच्या तोंडातुन आवाजच निघत नव्हता.ती त्याच्या हाताकडेच बघत‌ होती.त्याने तिच्या हाताकडे बघितले .त्याने पटकन हात सोडला.

तेव्हा कुठे तिने श्वास घेतला...

तो वॉचकडे बघत रात्र खुप झाली म्हणुन विचारलं.



ते..ते..मला भुक लागली म्हणून ..ती हातातला ग्लास दाखवु लागली.

तो दोन मिनीट काहीच बोलत नाही.पिहु ग्लास धरून इकडेतिकडे बघत होती.

फिनिश इट ...

ह हहहा‌..ती पटकन ओठांना लावून गटगट दुध पित असते.विराट तिला अस पिताना बघतच राहतो.


ती पिऊन ग्लास खाली ठेवते.तिच लक्ष विराट कडे जाते.तो तिच्याकडेच बघत असतो..

ती हळुच म्हणते‌ झालं माझ ..


तो स्वतःला सावरत हह अ..तो लगेच‌ वळुन किचन बाहेर वळतो.ती ही त्याच्यामागे जाते.पाऊसाची रिमझिम चालुच असते.रुमकडे वळताना पोर्चमधून पाऊस दिसत होता.पिहु पोर्चमध्ये गेली.विराट स्पेट चढताना मागे वळुन बघतो.तर‌ पिहु गायब .तो चिडतोच आता तर होती.कुठे गायब होती.तो परत मागे वळुन खाली येत असतो.ती पोर्चमध्ये दिसते.


तो तिकडे जाता जाता रात्रीची सवय आहे का तुला फिरयाची सारखी गायब होते तो किंचत रागातच बोलत येतो.


तुम्ही का मागे फिरता झोपा ना माझी मर्जी कुठेही फिरू पिहु तो रागात बोल्याने तीही तिरसट उत्तर देते.

विराट काहीच बोलत नाही बाहेर पाऊसात हात करत तो चिडतच बोलतो‌.हा पाऊस कधी थांबतो काय‌ माहीत‌ आय हेट.

पिहु खुदकन हसते...

विराट ती हसल्याने तिच्याकडे कटाक्ष टाकत हसयाला काय झालं.


पिहु हसत काही नाही म्हणुन परत हसु लागते.


मी जोक सांगितला का ऐवढ हसयाला ..


नाही ओ .तुम्ही कुठल्यापण गोष्टीत चिडता ..आता पावसावर काय चिडायच त्याला कळणार आहे का तुम्ही चिडला.ती अजुन हसत असते.

विराट तिच्याकडे बघत पावसामुळे माझ काम किती लाबंते.आता पाऊस बंद होईपर्यंत पुढच काम पण करु शकत नाही नवीन हॉटेलच ...त्या आदीला बोललं होत‌‌ लवक‌र चालु कर पण नाही स्वतःचाच खर‌ करायच.


(तिला आतापर्यंत विराटचा स्वभाव कळाला होता तो फक्त त्याचा नफा तोटा बघत‌असतो.)

पावसाचा वेग आता चांगलाच वाढला होता...गार वारा अंगाला भिडुन शहारा आणत होता....

तुला पाऊस आवडतो‌ वाटतो‌..विराट विचारतो.

पिहु पावसाच्या थेंबाना हातात घेऊन मोठी स्माईल करत हो म्हणते.
विराट तिच्या गलावर पडणारया खळीला बघत गालात हसतो.ती त्याच्याकडे बघते तो लगेच नजर वळवतो.

मला भिजायला पण ‌खूप आवडते . पाऊसात भान हरपून गप्पा मारत असते.तिचे केस वारयाने तिच्या चेहरयावर वर येत होते.ती कानामागे सावरत असते.तिची एक एक अदा बघण्यात विराट हरवुन गेला होता. ती एक्साईटेड होत त्याच्याकडे बघत मला गायला पण आवडत पावसात.

तो लगेच स्वतःला सावरत हो ..का तुला गाता पण येते.

तस काही मी ट्रेनिंग नाही घेतली ..पण ‌थोड गुणगणुता येते.पप्पांना ‌खुप आवडते मी गाण म्हटल्यावर..




विराट गालात हसतो....रात्रीचे दोन वाजुन गेले.आणि मला उदया ऑफिसला जायच आहे.



पिहु त्याच्याकडे बघत‌ सॉरी .मी माझ्या लक्षातच नाही. मी जास्त बोलत नाही ओळख नसल्यावर पण जशी ओळख झाली ना भानच राहत नाही.


विराट हसत पुढे निघत असतो.पिहु त्याच्यामागे जाता जाता :- तुम्ही आधीपासुन जास्त बोलत नाही का ...का फक्त माझ्याशी बोलताना कमी बोलता.

विराट चालायचा थांबत मागे वळुन बघतो.माझ ही तुझ्या सारखच आहे .ओळख नसल्यावर मी जास्त बोलत‌ नाही.पण ओळख झालं कि बोलतो.पण तुझ्या ऐवढे शब्द‌ सुचत नाही लवकर तो अस म्हणुन हसतच पुढे जातो.

पिहु पण गालात हसत निघते .


रुममध्ये आल्याव‌र दोघे एकमेंकाना कडे बघत गुडनाईट म्हणुन झोपतात.

सकाळी पिहु आवरुन खाली येते.

सुधा पण किचन मध्ये येतात.अरे व्हा पिहु कधी आली ..

पिहु हसत मी काल रात्रीच आले.


हो का.... मग कस वाटलं रीसोर्ट ...

हो खुप छान किती निसर्गरम्य वातावरण आहे ना पिहु बोलत‌ होती

सूमन पण येत..म्हणजे पिहुला आवडलं हहहह

पिहु हसत हो म्हणते.

सुमन सुधा दोघी एकमेंकिना बघत हसतात.

पिहु विराट उठला नाही का अजुन आठ वाजुन गेलेत.ऑफिसला जायच आहे जा बघ ..

पिहु मान हलवुन हो म्हणत निघून जाते.

वहिनी पिहु खूश दिसते ना आज ..

सुमन गालात हसत हो म्हणतात.

.
पिहु रुममध्ये येत थोड भीत भीतच हळुच स्लाईड उघडते .
ती एक नजर आत फिरवते व‌िराट तिला काऊचवर दिसत नाही.ती आत येत इकडेतिकडे बघत थोडी पुढे जाते.समोरचा कर्टन उडत असतो.ती कर्टन थोडा सरकवाते.समोर विराटला बघतच राहते तो कॅटलबेल वर हात ठेवून पुशअप मारत होता शर्टलेस असल्याने त्याचे बायसेप,बॅक अब्स उठुन दिसत होते.घामाने पुर्ण भरलेला तोंडावरुन घामच्या धारा वाहत होत्या. पिहु त्याला बघताच हरवुन गेली.त्याला अस बघून तिच हृद्य जोरात धडधडु लागलं. त्याने मान वर केल्यावर तिच्या वर नजर टाकली.


ती स्वतःला सावरत तोंडावरच हात ठेवत पटकन वळली.घाबरुन ती थरथर कापु लागली तिच डोकच काम करेना ...विराट पटकन उठुन कॅटल बेल बाजुला करुन नॅपकीन ने घाम पुसुन बॉटलमधुन एनर्जीड्रींक पित तिच्या जवळ येत बोलला..पिहु...

त्याने नाव घेतल्याबरोब‌र तिच्या पोटात‌ गुदगुल्या होत होत्या .ती हहह.

तो टीशर्ट घालुन तिच्या समोर येत पिहु तु इथे .

मी..मी..ते..तिने अजुन डोळे घट्टच‌ मिटले होते.

डोळे उघडु शकते तु..

तो अस बोल्यावर ती एका डोळ्यानेच हळुच उघडत बघत‌ मग नीट‌ डोळे उघडते.

तो‌ तिच्या कडे बघत होता.ती स्वतःला नार्मल करत ,ते आईंनी सांगितले ..तुम्हाला लवकर जयाच आहे ना आज अजुन तुम्ही ती शांत‌ होते.



हम्म,ते लेट झाला जाग उशिराच आली..


पिहु त्याच्याकडे बघत‌ सॉरी माझ्यामुळे लेट झाला तुम्हाला.


तो‌ गालात हसत स्लाईडिंग पुर्ण उघडुन बाहेर येतो.पिहु पण लाजुन हसतच बाहेर येते.‌

पिहू मणीला बोलावुन माझ कपडे सामान काढायला लावते का मला आज खुप लेट झालाय ..


तुम्हाला एक सांगायच होते..


वि‌राट तिच्याकडे बघतो.


मला आवडत नाही.अस कोण रुममध्ये आलेले....ती भीतच हळुच बोलते.

तो‌ तिच्या कडे बघत सॉरी... मी तरी आता जास्त बोलवत नाही ..तू असते म्हणुन.. आज लेट झाला ..परत नाही बोलवणार तो अस बोलुन बा‌थ घ्यायला निघुन जातो.

ती स्वतः सगळ सामान आज पहिल्यांदा काढुन ठेवते.. सुट ,वॉच, रुमाल ,बॅग , शुज सगळ सामान नीट काढुन ती खाली निघुन येते.

विराट घाईतच येतो...त्याला आज उशीर झाला होता.तो त्याच सामान काढणार कि बेडव‌र नजर‌ जाते.तो पटकन सुट घालायला घेत स्वतःशीच हसत आवरून खाली येतो.पिहु त्याला नजर न मिळवताच त्याला ब्रेकफास्ट देते.


तो ही घाईतच बाबांनाबरोबर मिटींगच डिसकस करत होता.नंतर दोघेही एकत्रच उठतात.पिहु त्याच्याशेजारीच थांबली होती.तो जाता जाता हळुच तिला थँक्यु म्हणुन निघुन गेला..ती त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे बसत गालात‌ हसत असते.


सुमनच तिच्याकडे लक्ष जाते. त्या पिहुजवळ‌ येत काय म्हणाला विराट ..


थँक्यु.‌पिहु‌ पटकन बोलून जाते .ती लगेच भानाव‌र‌ येत अहह ते‌ आई..


सुमन जोरात हसत राहू दे नको सांगु ... असच हसत ‌खेळत रहा तुम्ही दोघ..विराट बदलत चालला हेच म्हत्तावच‌ आहे ..त्या पिहच्या डोक्यावरून हात फिरवतात.सध्याकाळी मी मेंहदी आरटीस्ट बोलवल आहे लवकर आवरुन घे..

पिहु ब्लँक होते....आज का‌‌य आहे...


सुधा तिच्या जवळ येतात...अग उदया वटपौर्णिमा आहे. आणि तुझी पहिली पुजा आहे नव्या नवरीसारख तयार हो उद्या सुधा तिची हनुवटी पकडुन म्हणतात‌.


पिहु लाजुन मान खाली घालुन निघून जाते...


आजी सुमनला हाक मारत सुमन पिहुला लग्नातला शालु घालायला लाव ..


हो आई सांगते‌.सुमन म्हणल्या.


पिहु संध्याकाळी पटापट सगळ आवरुन घेते...मेंहदी काढणारी आलीच होती.पिहुला ती छान मेंहदी काढत होती...दिपा वीरा पण काढुन घेतात.



विराट सगळी लवकर गेल्याने आज घरी सातलाच येतो.
तो आत आल्यावर त्याची नजर पिहुवर पडली .ती मेंहदी काढत होती...तो रुममध्ये जाऊन फ्रेश होऊन खाली येतो. गीता विराट ला ग्रीन टी देऊन निघुन जाते...

वीरा विराटला बघुन लगेच त्याच्याजवळ येते..दादा कशी आहे मेंहदी.तो टी पितच छान आहे म्हणतो...दादा वहिनीने पण काढली...पिहु एक नजर विराटवर टाकून खाली बघते.


विराट मॉमच्या जवळ बसुन मॉम कोणाच लग्न आहे ...

हे ऐकून सुमन जोरात हसतात...त्या विराट ला हलकेच डोक्यात‌ मारत‌ वेडा फक्त लग्न असल्यावर काढतात का उद्या सण आहे म्हणुन काढली.


सण??? तो प्रश्नाअर्थी नजरेने विचारतो.


अरे उद्या वटपौर्णिमा आहे..

त्याला कळालं‌ तर नाही तो हम्म म्हणत स्टडी रुम मध्ये जातो.


सूमन रोहिणी कुठे गेली...दिसत नाहीये सकाळपासून आजी विचारते.


ताई त्या त्यांच्या मैत्रीणीच्या मुलाच्या एनंगेजमेन्टला गेल्या आहे रात्री उशीर होईल म्हणल्या.

रात्री सुमन,पिहुला वीरा स्वतःच्या हाताने भरवतात.पिहुचे डोळेच भरुन येतात तिला तिच्या आईची आठवण येत होती..
सुमन पिहुचे डोळे पुसते...


सकाळी लवकर उठुन नैवेद्याचा बघते. किचन मधलं आवरुन स्वतः तयार होते सुमन रुममध्ये येतात.पिहु लग्नाचा शालु घाल आज ..


पिहु हो म्हणुन शालु काढते..पण आई.मला येत नाही नववारी साडी घालता..

सुधा आत येत मी आहे ना तुला सजवायला अस म्हणत पिहूच्या हातातुन शालु घेत तिला आवरतात.

मँगो कलरचा शालु काठ ग्रीन कलरची घालुन पिहुच रुपच खुलेले..केसांचा जुडा घालुन त्यावर मोगरयाचे गजरे छान गोलकार घातले होते..हातात तोडे मॅचिंग काचेच्या बांगड्या ,नाकत नथ चेहारयावर मेकअप डार्क रेडकलरची लीपस्टीक कपाळावर‌ चंद्रकोर टिकली. पिहु स्वतःला मिरर मध्ये बघते..

सुमन पिहुच्या कानामागे तीट लावतात.

आई समोर तर जायच आहे पुजा कारयला मग ऐवढे कश्याला पिहुला सगळ ऑडच वाटत होते...

हो गं, झाड तर समोरच आहे पण सगळा शृगांर करुनच पुजा करतात.तुझ्याबरोबर सुधा ,मोठी आई बरोबर येतात ते कस सांगतील तशीच पुजा कर..काही चुकवु नकोस‌हह पुजा होईपर्यंत उपवास असतो .मी वि‌राटला बोलवते एक पर्यंत विराटची आरती करुन मग उपवास सोड ..हहह.सुमन तिला सौम्य भाषेत सांगतात..सुधा जा तिच ताट केलयं ताईंनी मंदिरात आहे ‌नीट सांग

सुधा तिला घेऊन बाहेर येते.


वीरा पिहुला बघत अरे वहिनी काय दिसतेस व्हा..


पिहु गालात लाजुन हसते..

वीरा पिहुचे वेगवेगळ्या पध्दीतीने फोटोज काढते...लगेच तिच्या स्टेट्सला लावते

रोहिणी वीराकडे बघुन तुझ्या वहिनी च झालं असेल तर निघायच का.

सुधा पिहु रोहिणी बाहेर येतात..गेट्च्या बाहरेच मोठे वडाचे झाड होते.सुवासिनी पुजा करतच होत्या.रोहिणी पिहुला पुजा,कशी करतात ते सांगतात.पिहु पण ते कशी करतात ते बघुन नीट न चुकता पुजा करते...झाडाला सात फेरया मारून पाच सुवासिनी च्या ओटी भरुन घरी येतात.

सुमन ने विराट ला फोन केला होता .तो तर‌ चिडूनच घरी आला होता त्याच काम सोडून मधेच‌ ऐवढ काय महत्तवाचे काम आहे बडबड करतच घरात येतो..

मॉम काय हे कधी पण घरी बोलवायच का.तो चिडुन बोलतो..

विराट किती चिडतोस ..रे सुमन वैतागतच‌ बोलतात.आले मी थांब.

मनी विराटला पाणी आणून देतो.तो पाणी पिता मोबाईल काढुन कोणाला तरी कामाच सांगत असताना त्याच लक्ष दाराकडे गेले.पिहु सुधा बरोबर हसत आत येत होती..तो फोन वर बोलयाचा थांबतो..ग्लास तर ओठांना पर्यंत घेतलेला आपओप खाली येत पिहुला भान हरपुन वरून खाली नजर फि‌रवत‌ निहाळत असतो.पिहुच नवरीसारख रूप बघतच राहतो. वीरा हळुच विराटची गंमत‌ घेत त्याच्या खांद्यावर हात ठेवते..आणि हळूच कानात म्हणते.दादा वहिनी ब्युटीफुल दिसते ना..लग्नाच्या शालु मध्ये ..हहह

विराट गालात हसत भान हरवून हो..शी इज व्हेरी ब्युटीफुल ...नंतर त्याच्या लक्षात येताच तो स्वतःला सावरत वीरा कडे एक कटाक्ष टाकतो ‌

वीरा पटकन हसुन पळत पिहुकडे जाते.

वीरा पिहुचा हात पकडुन वहिनी इकडे ये...दादा बरोबर फोटो काढू.‌‌अस म्हणुन ती विराटच्या जवळ आणते.पिहु़विराट दोघीही एकमेकांना कडे बघत डोळ्यात हरवतात.

वीरा हळुच पिहुला ढकलते..तिच लक्ष नसल्याने ती विराट च्या अंगावर ढकलते विराट पटकन तिला सावरतो...दोघांची हृद्याची धडधड वाढली होती..

सुधा जवळ येत म्हणते...वीरा लवकर आवर पिहुने अजुन काहीच खाल्ल नाही‌..

अगं आत्या मी तयार आहे तिकडे बघ ..वी‌रा इशारा करते.

सुधा हसुन विराटच्या जवळ येते..विराट तुझीच बायको आहे निंवात नंतर‌ बघ तिला..सोड तिला अस बोल्यावर‌ दोघेही पटकन बाजुला होतात

पिहु तर लाजुन लाल झाली होती.‌

सुधा विराटला म्हणतात.आत्ता छान दिसते का लग्नात छान दिसत होती.ह्या शालु मध्ये हहह

विराटने लग्नात तिला नीट बघितलंच नव्हतं साधे लग्नाचे अलब्म व्हिडीयो पण त्याने अजुन बघितले नव्हते..पण आज पिहुला बघुन त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला.

अरे सांग ना सुधा अजुन चिडवु लागल्या.

विराट काहीच न म्हणता,जायला निघतो..दादा,फोटो रे..वीरा
वीरा विराट चा हात पकडुन पिहुच्या हातात हात देते..दोघेही ऑकवर्ड होतच फोटो काढतात...

रोहिणी पिहुला हाक मारतात ‌...पिहु तिचा हात पटकन सोडवुन निघुन जाते.

पिहु धर विराटची आरती कर.विराटला सुमन चेअर वर बसवतात.

आई हे काय आहे तो आट्या पाडतच‌ विचारतो.

रोहिणी त्याला इशारयानेच शांत बस म्हणतात....

पिहु त्याच औक्षण कर..पिहु पण त्याला ओवाळून घेते.आणि त्याच्या पाया पडायला खाली वाकतते.तो पटकन उठून मागे सरकतो.

अरे विराट काय हे रोहिणी ओरडतात.

आई मला हे सगळ आवडत नाही ...तो ओरडुनच बोलतो.

पिहु पण दचकुन मागे सरकली.

सुमन तो चिडलेला बघुन बर ठिक ये जाऊ दे.हे धर पिहुला स्वतःच्या हातातुन खीर ‌खाऊ घालं तिने आज सकाळपासुन काहीच खाल्ल नाही..तुझ्साठी धरला होता उपवास ..

विराट शांत होऊन एक नजर पिहुवर टाकुन सुमन कडे बघतो..का

ते नंतर सांगते तुला धर‌‌ खाऊ घालं .तो पण काही न विचारता चमचा हातात घेऊन पिहुच्या तोंडासमोर धरतो.

पिहु चमच्या कडे बघते विराट च्या डोळ्यात बघत त्याच्या हातातुन पहिल्यांदा खात होती..तिने आ करत बाईट खाल्ल.

विराटला वाईट वाटत होते.आपल्यासाठी ही सगळ करते आणि आपण कस वागतोय त्याचा चेहरा उतरला होता...तो चमचा वाटीत ठेवुन नजर न मिळवताच मॉम मी निघतो..

अरे आलास आहे तर जेवण करुन जा.

नकोय मला... आत्ता माझी मिटींग आहे..अस म्हणत तो घराच्या बाहेर पडतो.गाडीत बसुन राहतो.त्याच मन असवस्थ झाले होते...त्याने टाय लुझ केली वेस्ट कोट काढुन टाकला...गाडी स्टार्ट करून तो निघून गेला.

पिहु पण सगळ आवरुन रुममध्ये येते. आल्यापासुन दोन सुट्ट्या झाल्या होत्या तिने आदित्य फोन लावला.

आदीत्यने फोन उचलला..हॅलो पिहु कुठे हरवली...

त्या वाक्यानेच पिहु जोरात हसली.

तिच हसण आदीच्या कानावर पडताच तो ही हसु लागला पाच सहा दिवस दोघांचा कॉनटॅक्टच नव्हता..

अरे काय तु... कसा आहेस‌‌


माहीत आहे तु मला असच फोन करणार नाही एक नंबरची
सेल्फिश मुलगी आहेस.. तो उगाच नाटकी चेहरा करत म्हणाला

अरे ते सॉरी...कामात होते.

तो हसतो...अगं असच गंमत केली...पाठवतो नोट्स वॉटसप वर ओके.मी बिझी आहे नंतर कॉल करु का...

पिहु हसुन हो म्हणते..

आदी थोड्यावेळाने तिला नोट्स पाठवतो... स्टेटस चेक करताना त्यात वी‌राचा स्टेट्स चेक करतो पिहुचे फोटो होते..वेगवेगळ्या पोझेस मध्‌ये तो बेधुंद‌ होतच तिचे फोटो बघत होता...तिच्या चेहरयावरची निरसगता बघुन किती क्यूट आहे अस बोलत‌च होता‌‌‌ कि‌ पुढचा फोटो विराट आणि पिहुचा आला त्याचा चेहरा क्षणात बदलतो. तो मोबाईल बंद करतो.एकटक ‌खिडकीच्या बाहेर बघत राहतो.

विराट ऑफिसमध्ये येतो.तो वॉश रुमला जाऊन नीट तयार होत होता....मिरर मध्ये बघुन तो चेहरयावर‌ पाणी मारताना त्याच लक्ष सुटवर‌ जाते.‌त्यावर लाल काहीतरी लागलं असते.तो विचारत पडतो..तेव्हा लक्षात येते..वी‌राने ढकलल्याने पिहुच्या डोक्यावरच‌ कुंकु त्याच्या शर्ट वर लागले. तो अल्हाद त्यावरून‌ हात फिरवत तिचा स्पर्श जाणवु लागतो...त्याच्या फोन वाजल्याने त्याची‌ तंद्री तुटते..तो‌ टीश्यु पेपर‌ने साफ करतो...सगळे विचार झटकुन तो लगेच मिटींगसाठी जातो.
.
.
.
.
.

विराटला रात्री यायला दहा वाजतात..तो बाहेरच खाऊन आल्याने डायरेक्ट रुममध्ये येतो..पिहु स्टडीमध्ये बसली होती.तिचा ऑनलाईन क्लास चालु असतो.वि‌राट एक नजर टाकून फ्रेश होऊन बेडवर मोबाईल बघत पडतो..सकाळापासुन धावपळीने त्याला कधी झोप लागली कळलंच नाही..


पिहु अकरा वाजता लॅपटॉप बंद करते...तिला ही कंटाळा आला होता..ती बाहेर येते तर विराट झोपला होता...ती उशी घेऊन स्टडीमध्ये जाऊन झोपते.ती खुप वेळ‌ झोपायचा प्रयत्न करते पण झोपच येत नव्हती.तिला आता बेडवरची सवय झाली होती.ती उठुन बसते...खुप वेळ विचार करते.आता तर हे झोपले सकाळी नाहीतर मी लवकरच उठते त्त्रांना कळणार पण नाही अस स्वतःशीच बोलत हळुच बेडच्या कोपरयाव‌र ब्लँकेट घेऊन झोपते.पिहुला लगेच झोप लागते.

विराट झोपेत टर्न होतो...त्याचा हात तिच्या अंगावर टाकतो.पिहु दचकुन डोळेच उघडते ..तिचे डोळेच ताट होतात.पिहु बेटा खुप मोठी चुक केली झोपुन ती मानातच बोलु लागली..ती हळुच त्याचा हात काढयाला जाते..तो परत हात टाकतो.
दोन मिनीट पिहु दचकतेच विराट जागा झाला का ...ऐवढा मोठा बेड आहे पण किती लोळायच असतं पिहु चिडतच बोलु लागली.
आता परत हात लावला कि उठेल त्या भितीने तिने त्याचा हात हलवलाच नाही.ती त्याच्या हाताला बघत बघत झोपून जाते.
.

.सकाळी पिहुला जाग येते...ती डोळे उघडते विराटचा हात अजुन तसाच होता...ती थोडीशी उठली.आणि त्याचा अलगद हात उचलला ती त्याचा हात खाली ठेवणार विराट बारिक डोळे उघडत एकदा तिला आणि एकदा त्याच्या हाताला बघतो.
पिहु घाबरून जाते कारण तिने त्याचा हात पकडला होता.ती घाबरुन डोळे मिटून त्त्राचा हात अजुन घट्ट पकडत ठेवते..विराट पटकन उठुन बघतो तर तो बेडवर असतो काल तो इथेच
झोपलेला आठवतो.पिहु सॉरी काल झोप लागली . उगाच तुला त्रास

ती डोळे उघडून खरच मी सॉरी मी झोपले पण मला त्या काऊच वर झोप येत नव्हती ..ती घाबरतच बोलु लागली.

तो हसतो ..

हसायला काय झालं मी मुद्दाम नाही झोपले..

तस नाही गं तु ऐवढी का घाबरते...मी काय तुला काही खाणार नाहीये.....

मी ....नाही ती स्वतःला सावरत बोलते..


माझा हात तु खुप प्रमाणात दाबला आहे अजुन काही वेळ दाबला ना दुखेल आता मला..

अस बोल्यावर‌ ती हाताकडे बघते ती जीभ चावुन पटकन सोडते...आणि उभी राहते.ती लाजुन लाल झाली होती..तिला काय बोलव कळतच‌ नव्हते .ती स्टडीकडे जात होती..

पिहु इकडे बाथरुम‌ आहे तिची मज्जा बघुन विराट खुप हसु येत होते..

पिहु डोक्यालाच हात लावत पळतच बाथरुममध्ये जाते.

विराट हसत परत ब्लँकेट घेऊन झोपतो.

.
.
.
.

आता कुठे विराट ला पिहूचा सहवास हवाहवासा वाटु लागला ....तिच्या बबरोबर राहणे ,कुठे काहीतरी जोक्स करणे ..तिच्या स्टडीमध्ये पण तो तिला हेल्प करू लागला. पिहुपण त्याच्या बरोबर कम्फर्ट फील करत होती .... कॉलेज मध्ये गेल्यावर पण पिहूची आदींची चांगलीच मैत्री वाढत चालली होती ...

आदीला थोडी थोडी पिहूची सवय होत चाली होती त्याला एक दिवस पिहूला बघितलं नाही कि बैचैन होत होते पण का हे त्याच्या लक्षात येतच नव्हते ...

कॉलेजमध्ये अॅनुअल फंक्शनची तयारी चालु असते

आदित्य आणि पिहु कँटीन मध्ये बसले होते.

गुंजन आदीच्या जवळ येते.आदी चल प्राॅक्टीस चालु झाली.

हो येतो..आत्ता तर‌आलोय लगेच चालु कर तु तर..

आदी जा...मी पण निघते घरी...

ये थांब ना आज रियर्सल बघ ना माझी मी कसा गातो तु बघितलच नाही..तु तर कश्यातच पार्ट घेतला नाही...का विराट नको म्हणतो का..

तस काही नाहीये पण मला इंटरेस्ट नाहीये....

काय ...???गुंजन आणि आदी गालावर हात ठेवुन म्हणतात‌..

पिहू डोक्यावरच हात मारते...मी नंतर बघेन आता दोन दिवस नाहीये ..


का...आदि विचारतो...

अरे मी पुण्याला चालले माझ्या घरी सटॅरडे आणि संडे सुट्टी मग जाऊन येते खुप दिवस झाले भेटुन ..पिहुच्या डोळ्यात पाणी आले होते..

आदि हसत तिचे गाल ओढतो..जा,आणि मंडेला तु कॉलेज ला हवी ..

हो येणार आहे.माझे पप्पा स्वतःच हकलतील कॉलेज मिस केलेले आवडत नाही....पिहु हसून बोलते..

यावर दोघेही जोरात हसतात....

पिहुने घरी सांगितले होते..ती सकाळी जाणार होती..इकडे विराटला कळल्यापासुन चलबिचल झाले होते...दोन दिवस त्याला दोन वर्षासारखे वाटत होते.

विराट संध्याकाळी घरी आला रुममध्ये पिहुची जायची तयारी चालु होती..तो तिला काहीच न बोलता..फ्रेश होऊन मॉमकडे गेला..

मॉम मी उद्या पुण्याला चाललो आहे ..

मॉम चकित होत..तु पिहुब‌रोबर चालला .

नाही.... माझ काम आहे ..

तुझ कुठलं काम मॉम आता मुद्दाम त्याला विचारु लागल्या..मामा बोलला असता काय काम असले असते तर मला.‌आत्ताच फोन आला होता..(वि‌राटचे मामा पुण्यातल हॉटेल बघत होते.)

मॉम मामा कशयाला तुला बिसनेस बद्दल सांगेल ..तो नजर इकडेतिकडे फिरवत म्हणू लागला.माझ आणि मामाचं बोलण झालयं..

मॉम हसू दाबत ठिक ये..जा..त्यांच काम करत बसतात.

मॉम पुढे काही बोलत‌‌ नाही म्हणून त्याचा चेहराच उतरतो..त्याला वाटलं होते कि मॉम म्हणेल कि पिहुला पण जाता जाता सोड.तो हम्म म्हणत वळला..

मॉम मागुन हाक मारतात विराट तु चालला आहे तर पिहुला पण सोड ती वेगळी गाडी तु वेगळी गाडी कश्याला मॉम हसतच बोलतात..

विराट आतुन खुश होतो.पण चेहरयावर हावभाव न आणता.ठिक ये पण मला लवकर निघायच सांग तिला अस म्हणत तो न वळता बाहेर निघुन जातो.


सुमन ने पिहुला सांगितले ...तो लग्न झाल्यापासून एकदा हि तिच्या घरी गेला नव्हता ....हे ऐकून पिहूला तिच्या कानांवर विश्वास च बसत नव्हता ....

पिहू त्याचं जवळ जाते .थँक्स तुम्ही उद्या माझ्याबरोबर येणार ती हसत बोलु लागली..

विराट तिच्याकडे बघतो...मला काम आहे..म्हणुन मॉम मला
बोलली.. पुण्याला जाता जाता सोड ..ऐवढच बोलुन तो स्टडीमध्ये निघून जातो.

.पिहू तू पण नाही ते विचार करते काम आहे म्हणून येतात ...तिला वाटल होते तिला सोडवायला येणार आहे का..



इकडे विराटला काहीच काम नसते ...तो नरवस होत डोक्यलाच हात लावतो ...
.
.
.

.
.
रमेश काळ लं नविन प्रोजेक्ट को़णाच्या नावाने सुरु करणार आहे विराट...रोहिणी विचारते...

हो ताई...नमनच्या नावाने पण तो आता इथे नाहीये सध्या दुसर काम हातात घेत लं .रमेश हसत बोलतात.

रोहिणी खुश होतात...

आणखी एक बातमी आहे तुम्हच्या कामाची आहे..पण.रमेश शांत बसून हात पुढे करतात.

रोहिणी ला कळते त्या लगेच चेक साईन करून हातात देतात..बोला रागानेच बो लतात.

हम्म,विराटने लग्नाआधी डीवोर्स पेपर बनवुन घेतले ...

रोहिणी हे ऐकताच शॉक होतात..काय ..

हो दोन दिवसापुर्वीच वकिलाकडुन कळलं मला

रोहिणी चकित होत्या..दिसतो तसा विराट नाही..डोक कुठे चालेल कळणार नाही ह्याच..कुणालाही कळता कामा नये...

मी तुमच्या बाजुने अस कस कळेल कोणाला निघतो.मी

रोहिणी चेअर‌ बसत खुश होतात..त्या त्रिशा कॉल करतात..

त्रिशा कॉल उचलते...काय काम काढलं..

तुझ्यासाठी गुड‌न्युज आहे...रोहिणी हसत बोलतात..

काय..त्रिशाला काही कळतच नाही.

विराट अजुन तुझ्या हातातुन गेला नाहीये...

त्रिशाच्या चेहरयावर मोठी स्माईल येते...

.
.

.
.

दोघेही पुण्याला येतात ...विराट पाहिल्यांदाच येत असल्याने पिहूच्या आई बाबांना काय करू नि काय झालं होत ....दोघेही घरी येतात ...विराट घर बघण्यात बिझी होतो छोटास रोहोऊस होते. खूप छान प्रकारे सजवलं होती ..

विराट आणि पिहुचे बाबा गप्पा मारत होते...

पिहू विराटला तुझ्या रूम मध्ये घेऊन जा फ्रेश होण्यासाठी रेवती म्हणतात ...

पिहू मान हलवून विराटला रूम मध्ये घेऊन येते ,...पिहूची रूम त्याच्या गॅलरीएवढं हि नव्हती ...छोटीशी रूम एक छोटासा बेड ,एका साईडला कबोर्ड तर एका साईड ला बुक शेल होते ...,स्टडी टेबल ...बस ...

विराट आत येत सगळीकडे नजर फिरवून बघत असतो...खुप छान आहे रुम..


पिहूला बर वाटते ती गोड स्माईल देते ...विराटच लक्ष विंडो कडे जाते ,... तिथे चार कुंड्या होत्या .कलरफूल छोटी फुले लागली होती ...वरती हँगिंग चैन होती त्याला छोट छोटे घुंगरू लावले होते ..वाऱयाची झुळूक आली कि ते घुंगरू वाजायचे ..छोट्या मडक्याचा खापरला पेंट करून त्यात पाणी ठेवले होते.विराट ला खूप आवडले होते..तो जवळ जातो ...हे छान आहे पिहू ...आपल्या रूम मध्ये पण लावू हे..

पिहू एकटक त्याच्याकडेच बघत राहिली तो आपल्या बोलला ...तो तिच्या कडे बघत अशी काय बघते ...मी काय म्हणतो हेच घेऊन जाऊ आपण तो त्या हँगिंग चैनला हात लावत बोलतो मस्त वाटते ...तू ते काचेचं बाऊल ठेवण्यापेक्षा असच मातीच काही तरी ठेव बर्डस ला पाणी पिण्यासाठी...ह्यात पाणी गार राहते ...आपल्या ग्यालरी मध्ये फ्लॉवरच एक दोनच प्लांट आहेत ..अशीच कलरफुल फ्लॉवर्स लावू काय म्हणतेस तु तो एक्सएटेड होत बोलत होतो.

पिहू गोड स्माईल करत हो बोलते ...तिच्या हसण्याने गालावर खळी पडली होती ...तो तिच्या कडे भान हरवुन बघत होता ...दोघे हि डोळ्यात हरवून गेले होते.

प्रांजल आत येत खोकते तसे ते लगेच भानावर येत तिच्या कडे बघतात ...

दीदी जिजुंना खाली बोलवलं ...जेवण रेडी आहे.

दोघेही खाली येतात...हसत गप्पा मारत‌‌ जेवण करतात.
पिहु विराटला विचारते..अहो तुम्हाला उशीर तर‌ झाला नाही ना..

विराटला तिच बोलण कळतच नाही कुठे ..तो ब्लँक होत विचारतो..

अहो तुमच काम आहे ना..इकडे ...

तेव्हा विराटच्या लक्षात येते तो अडखळत हो..हो..आहे...निघणारच होतो..तो थोड्यावेळ बोलुन मामाकडे येतो..

तो आत येताच मामा जवळ येतात...अरे विराट ताई म्हणाली काम आहे म्हणुन ...तु काहीच बोलला नाही...

मामा बसू का मी नंतर बोलु अस म्हणत तो सोफ्यावर बसतो.

अहो काय ओ तुम्ही धर बाळा पाणी विराट ची मामी बोलते.जा फ्रेश हो ...

तो पाणी पिऊन फ्रेश होयला जातो.संध्याकाळी तो मामाबरोबर हॉटेलच मेन्टनंस वैगेर बघुन परत घरी येतो.जेवण करुन रुममध्ये बेडवर पडला होता...

तो विचार करत होता.पिहुला फोन करु कि नको..ती पण करु शकते‌ ना..‌

पिहु पण खिडकीत बसून विराट चाच विचार करत होती..बाहेर‌ पावसाची रिमझिम चालु होती.गार वारा सुट ला होता...
पिहु फोन कडे बघते फोन करु का...ती फोन उच लते...फोन करायला तर विराटचा फोन होता.पिहुच्या चेहरयावर मोठी स्माई ल येत ती फोन रीसीव करते.

पिहु...

अहह बोला ..विराट ने नाव घेतलं कि पिहुच्या अंगाला गोड शहारा आला.पोटात‌ गुदगुदल्या होत होत्या..

काय तरी बोलायच म्हणुन विराट बोलतो.. ...मला उद्या उशीर होईल ..यायला तिकडे..तो पटकन जीभ चावतो.काय बो लून गे लो..

पिहु हसते..चालेल या तुमच काम करुन पण लवक‌र जाऊ घरी पाऊस कधी ही वाढु शकतो..रात्रीचा..

विराट हसतो...हो..पिहु तु विंडो शेजारी बसली का...

पिहु चकितच होते..अहहह तुम्हाला कस कळलं..

ते हँगिंग चैनच्या घुंगूंरुचा आवाज येत आहे ना म्हणून विचारले.

पिहु हसते...

तो ती हसताना इम्याजिन करतो..

मी ठेवते पिहु लाजुन कॉल कट करून मोबाईल विंडोमध्ये ठेवते..ति ला वाटते फोन कट झाला पण चालुच‌ राहतो..

हॅलो‌ पिहु..पिहु ती काहीच बोलत नसल्याने तो त्या घुंगूराचा आवाज ऐकत बेडवर‌ पडतो. अचानक त्याला गाण्याचा आवाज येतो.तो उठून मोबाईल नीट कानाला लावत बाहेर गॅलरीत येतो...पिहू गाणं म्हणत होती त्याने तिला कधीच गाताना ऐकले नव्हते ..


पिहू हात बाहेर घेऊन पावसच्या पाण्याशी खेळ‌त गात होती..

तू ही तू हर जगह आजकल क्यूँ है
रास्ते हर दफ़ा, सिर्फ़ तेरा पता
मुझसे पूछे भला क्यूँ है
एक पल प्यार का ज़िन्दगी से बड़ा
ऐसा मेरे खुदा क्यूँ है
तू ही तू हर जगह...

सूना-सूना मन का है कोना
सूना-सूना तेरे बिन होना
हर कहीं पर तू है, तू नहीं पर तू है
ओ बेखबर, तू है हर मोड़ पर
इतना तो बता, मौसमों की तरह
तू बदलता गया क्यूँ है
तू ही तू हर जगह...

तेरी-मेरी बाकी है कहानी
तेरी-मेरी आधी है कहानी
आ गई वो मोड़ पर, तू गया जो छोड़ कर
मेरे दिल को तोड़ कर, क्या मिल गया
पास हो तो बुरा, दूर हो तो बुरा
ऐसा मेरे खुदा क्यूँ है
तू ही तू हर जगह...

तू ही तू हर जगह आजकल क्यूँ है
रास्ते हर दफ़ा, सिर्फ़ तेरा पता
मुझसे पूछे भला क्यूँ है
ना मैं अपना रहा, ना किसी और का
ऐसा मेरे खुदा क्यूँ है
तू ही तू हर जगह...

धीमी-धीमी आँच पे जैसे
धीरे-धीरे जलता है दिल
ये बेक़रारी क्यूँ है, ये खुमारी क्यूँ है
आवारगी क्यूँ है, हर मोड़ पर
ना मैं अपना रहा...

हुआ नहीं पहले कभी ये
छुआ नहीं दिल को किसी ने
हर आरज़ू तू ही, चैन-ओ-सुकूँ तू ही
मैं तो कहूँ तू ही है ज़िन्दगी
ना मैं अपना रहा...

💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕


🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵

कसा वाटला भाग नक्की कळवा...

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED