सहनशक्ती Archana Rahul Mate Patil द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

सहनशक्ती

सहनशक्ती....

आज दुपारी मी शेतात द्राक्षाची खुरपणी करत असताना माझ्या मैत्रिणीचा फोन आला ..🤔🤔.मग मी हेडफोन कानात टाकून फोन शर्टच्या खिशात टाकून दिला, मला माहिती होतं कमीत कमी तासभर तरी ती मला सोडणार नाही.....🤣 इतका वेळ जर मी तिला बोलत बसले तर माझं काम आहे तसंच राहील म्हणून मी हेडफोन नेहमीच माझ्या खिशात ठेवते...,🤫 स्मार्ट आहे न मी 😂

नेहमीप्रमाणेच आजही तिने मला दुपारच्या वेळेत फोन केला कारण दुपारी तिची खाष्ट सासूबाई तीन तासाची कुंभकर्णाची झोप घेते...त्याच वेळेस फक्त ती माझ्याशी बोलू शकते....,😂 तिला नेहमीच मला फोन करायला काहीतरी कारण हवे असते ☺️त्यांच्या घरात काही वाद विवाद झाले किंवा तिच्या आणि तिच्या सासूची कडाक्याचे भांडण झाले तेव्हाच तिला माझी आठवण येते.... खरच.....💁🙄
याव्यतिरिक्त ती मला माझी खुशाली विचारायला कधीच एक फोन नाही करत नाही किंवा साधा मेसेज नाही करत ...🙄 जेव्हा त्यांच्या घरात काही वाद झाला तू फक्त सांगण्यासाठीच ती मला फोन करत असते ..💁..सर्व ऐकून घ्यावं लागतं 🤦
आणि त्यानंतर ती थोडी शांत झाली की मी बोललेलं ती ऐकत आणि झालेल्या गोष्टी सोडून देऊन पुन्हा एकदा निश्चिंतपणे पुन्हा एकदा त्यांना सामोरे जाण्यासाठी उभी असते... ,😌
आज ती म्हणाली

इज्जत तो सबको दि मैने..पर
सब वापिस करना भूल गये..

असच मी म्हटलं हे काय होतं ??????
ती म्हणे मी शायरी केली आणि तुला तेवढे ही समजून नाही घेता येत???? काय ग अर्चू...!!!!!!😩😩

बर बाई सांग आता काय झालं.....🤫🤫..मी

अगं आता जीव नकोसा झालाय आता ना असं वाटायला लागलंय मी खरंच लग्न करून खूप मोठी चूक केली हे सगळं करून... किती बोलताय हे घरचे अन त्यांच्या बोलण्याला काही लिमिट नाही ग.....
प्रत्येक वेळी फक्त मीच का??????😭
मी सगळ्यांना ज्याच्य त्याच्य हातात मझ काम सोडून ते अगोदर करते...😔मी स्वतः कडे पण लक्ष देत नाही...माझी आवड निवड तर केववाच खड्डय्यात गेली.. 😏😏फक्त काम, काम आणि कामच करत असते तरीही
मी कुठल ही काम केलं ना त्या प्रत्येक कामात माझी चूक काढतात... खरं माझच चुकत का????,🤔

मला वाटतं आता मी हे सगळ सहनच करू शकत नाही...खूप
त्रास होतोय ग याचा..😔..मी सगळ काम करूनही या म्हणत की काहीच काम करत नाही,मलाच पहावं लागत.. सांगितल्या शिवाय😔 सुचत नाही..माहेरी हेच सिक्वल का???
हे च का संस्कार....???
आईवडिलांची मया काही सुटत नाही...🤦
सारखं सारखं माहेरी आहे तेरी काय???.. प्रत्येक वेळेस म्माझ्या अस्तित्वावर प्रश्न का???🧐🧐🧐

किती सहन करायचं आम्ही...आता सहनच होत नाही.."का म्हणून सांगायचं सहन करायचं आणि किती ते त्याला काही लिमिट नको का.😣😣. कुणाकुणाचं टेन्शन घेऊ आणि कुणाच म्हणून सोडून देऊ... आईवडिलांना त्रास नको म्हणून त्यांना ही काहीच सांगू शकत नाही!!!! कुणासमोर बोलून दाकवू शकत नाही ना!!!!,😔😔म्हणून माझ्या राणी मी तुला सांगते ग 😌

संस्कार म्हणूनच तर आजपर्यंत मी मी गप्प राहिले आणि माझे संस्कारच आहे ते म्हणून मी काहीही न बोलता आज हे सगळे सहन करीत आहे.....🤐🤐🤐

हुश्श.......

.....तुम्हालाही अशा कित्येक सिच्युएशन आल्या असतीलना, की त्या कशा हँडल कराव्यात हे तुम्हाला समजत नसेल ...नाही का !!!!
प्रत्येक मुलीला कुणाच्या न कोणाचं काही तरी सहन करावं लागतं...🤐🤐 घरातील वाद बाहेरचे पण...काहीच येत नाही काही करत नाही किंवा काम करूनही सगळे म्हणतात कि काहीच काम करत नाही तेव्हा ,असं वाटतं त्यांना सांगावं मी टाईम मशीन नाही मी करते हा माझा गर्व नाही आणि खरोखरच करते तेही सहन करून कधीकधी तर अगदी सहनशक्तीच्या पल्याड जाऊन होतं..😔😔 डिप्रेशन मुळे कशातच लक्ष लागत नाही एवढा टेन्शन असतं...🤦🤦

पण आपणच आपल्या मनाला दिलासा देवून , मनाची समजूत काढावी लागते...🤗
कधीकधी आपणही अगदी क्षुल्लक अशा गोष्टीचा विचार करून स्वतःच्या जीवाला त्रास करून घेत असतो ...नाही का !!!!!!!!!!!☺️

जेव्हा शांत मनाने आपण त्याच गोष्टीचा विचार करतो तेव्हा वाटते,,, की अरे ही एवढी शी गोष्ट होती ....😒त्यामुळे आपण आपल्या मनाला किती त्रास करून घेतला 😔😔
पण ज्या वेळेस सगळे बोलतात ना ,,त्या वेळेस असे वाटते की माझं चुकलं का???? प्रत्येक वेळेस मीच का ?????!!!!!!!
म्हणून मी असे काय केले आहे म्हणून मला हे सहन करावे लागत आहे ....मी एक स्त्री आहे म्हणून !!!??????
या घराची लक्ष्मी म्हणून आली आहे ,पण मला तर यांनी दासी बनवून ठेवले ...घरात काही विषयावर बोलणे चालू असले तर त्या विषयात मी माझे मत मांडू शकत नाही किंवा माझा निर्णय नाही सांगू शकत नाही ...का ??????🤫🤫🤫
तर समोरच्या म्हणतात तुला यात पडण्याची काहीच गरज नाही किंवा तुझा यात काहीच काम नाही...🤫🤫🤫🤫.

लग्न झालेल्या मुलींना तर कोणीच व्हॅल्यू देत नाही, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी माहेरच्या माणसामुळे हिणवले जात.... तुझ्या माहेरी काय आहे???? मोठी लागून गेली आहे??? किंवा माहिती नाही तेवढी ???असा माझा मुलगा आहे सकाळपासून राब राब राबून दिवसभर थकून जाते....😏😏
आणि मी!!!!
सकाळी उठल्यापासून ते रात्री पर्यंत अगदी निष्क्रिय देणे जसे कि ती कोणती एखादे यंत्र आहे ...असे तिचे काम चालूच राहते ....तरीही एखादे वेळेस चूक झाल्यास तिला लगेच ऐकवले जाते... काय करते... लक्ष कुठं असतं किंवा तू काहीच करत नाही... मलाच करावं लागतं... तू फक्त या घरातील शोपीस आहे....
खरंच का मुली या दुसऱ्या घरातील शोपीस असतात का!!!????? त्यांनाही मन आहेत त्यांच्या मनाला जाणीव करणार आहे कोणी पाहिजे ......
अापल्या नवर्‍याला काही सांगितलं तर तो आपल्या आई वडिलांची, बहिणीची ,भावाची बाजू घेतो ...आपल्यालाही तसे काही सांगण्याचा हक्क नाहीये ...माहेरही माहेरी आपण काही सांगू शकत नाही कारण आपल्यामुळे त्यांच्या जीवाला त्रास होईल किंवा मी काही बोलले तर त्यांना काय वाटेल ते काय .... ीहे संस्कार दिले आम्ही तुला असे म्हणून प्रत्येक वेळेस... गप्पच राहावे लागते...
पण याच चुकीचा प्रत्येक वेळेस आपण चुकतो असा तर अर्थ होत नाही ना....😣 आपणही कधीतरी बरोबर असतो पण आपल्याला मात्र कोणी समजून घेत नाही 😭😭त्यांना समजून घेण्याची गरजही वाटत नाही 😭😭आता ना कधीतरी असं वाटतं बास झालं ...आता मी हे सगळं नाही सहन करणार!!!;;;;
वयाच्या कित व्या वर्षापर्यंत आणि किती सहन करायचे..firstration म्हणजे काय ते जेववा अनुभवलं ना तेव्हाच समजतो..😣😣

आपण आपल्या आईवदीलाना काही कळू न देता आपले दुःख व्यक्त न करता एकटेच सोसत असतो.. त्यासाठी आपल्याला फक्त आपली हक्काची अशी एक मैत्रीण पाहिजे..ती आपल्याला समजून घेईल .. आपल्याला चार समजुतीच्या गोष्टी सांगेल...
कारण फक्त तिने च हे सगळे सहन केलं अस्यावेले स तिने ते कसं हाताळला,त्या विषयाला ती कशी सामोरी गेली आपण त्यातून सिक्त असतो... ❣️
प्रत्येकीला सहन करावा लागत..मी अस नाही म्हणत की फक्त मुली सहन करतात.. सगळ्यांचं म्हणतोय. लहान..मुलं असो व वृध्द मंडळी... अगदी सगळ्यांनाच असतात...🙏
पण सहन करण्याची आपली किती capacity आहे किती आपण ती आपणच आपलं ठरवायला हवं नाही का..
सहनशीलता अंगी वाहताना बाळगताना आपल्याला अनेक कठिण प्रसंगाला सामोरे जावे लागते आपल्या मनाविरुद्ध वागावे लागते नाही का...
प्रत्येक वेळेस आपण आपल्या सहनशक्तीचा अंत पहात असतो पण याच सहनशील ते मुळे आपल्याला किंवा समोरच्याला त्याची चूक समजते.. सकारात्मक विचार व प्रसंगी दोन पावले पुढे जाण्याचा वृत्ती आपल्याला यश शिखराकडे जाण्यासाठी कशी प्रवृत्त करते ते ही समजते..
आपल्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणजेच आपली आई ही साक्षात सहनशीलतेची शक्ती स्वरूप... ती प्रत्येक प्रसंगाला कणखरपणे सामोरी जाते तिच्यात एवढे सहन कसे हा एक अचंबित करणारा प्रश्न आहे सहनशक्तीची परिसीमा केव्हाच ओलांडलेली असते. ..
. ज्या प्रमाणे आपण आपला नवीन ड्रेस आपण चार-पाच दिवस घालून त्याला पुन्हा धुण्यासाठी टाकतो त्यावर एखादा दा ग पडेल असेल तर काडण्यासाठी आईला सांगतो... मग आई त्याला गरम पाण्यात बुडून ठेवते... धुवून काढते... आता तर वाशिंग मशीन निघाल्या ...कपड्याला पुन्हा एकदा त्या मशीन मधूनही फिरून यावे लागतो ..तो कपडा विचार करतो की🤔🤔 मी यांच्यासाठी किती काम केलं पण येणे मात्र माझा विचारही केला नाही... किती सहन krych मी.. सांगायचं मी त्यानंतर पुन्हा त्या कपड्याला उन्हात वाळवले जातात तेव्हाही तो कपडा विचार करतो की एवढंच बाकी राहिलं होतं त्यानंतरही इस्त्री केल्या जाते तरीसुद्धा कपडा विचार करीत असतो आता हे मला सहन होत नाही... म्हीच का??? मलाच हे सगळं का सहन करावा लागतोय पण dryclean झाल्यानंतर तू ड्रेस पुन्हा एकदा नव्याने चमकू लागतो... अगदी नव्या सारखा तेव्हा मात्र त्यांनी एवढे सगळे सहन केल्या त्याला काहीच वाटत नाही .....

तसेच आपण आहोत प्रत्येक स्त्रीला जर आपण हे मला सहन होत नाही हे मी कसे सहन करू आता ही माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे माझ्या सहनशीलतेचा अंत आहे असे म्हणून आपण कधी स्वतः स्वतःवर रागवत असतो....

खरंतर आपण कधीतरी चुकत असतो कधी बरोबरही असतो म्हणून आपण सगळेच काही सहन करायचे नाही.... आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे सहनशीलता ठेवले पाहिजे....🤗पण आपल्या सहान शक्तीच्यावर असेल तर मात्र आपल्या स्वतःसाठी उभा राहिले पाहिजे ....
आपणच आपल्याला आपला मान म्हणून देऊ शकतो तर दुसऱ्याची कशाला अाशा करायची...!!!! जेव्हा आपण आपली मदत करू शकतो दुसऱ्या कडे पहात बसण्यापेक्षा आपण आपल्या मध्ये आपली चूक सुधारणा स्वतःचा आत्मविश्वास जागृत ठेवण्याची गरज आहे...!! नाही का !!!!!
तसेही आपल्याला जो तो येऊन आपल्या विषयी काही पण बोलू शक..तो त्यावेळेस आपण त्यांचा प्रत्येक मुद्दा खोडला पाहिजे आणि आपण काय करतो आहोत हे सांगून त्यांची स्पष्टपणे कानउघाडणी केली पाहिजे. .... . सिंयांना स्वतःच्या आत्मसन्मानाला विषयी काही सहन नाही केले पाहिजे या मताची मी आहे..🤗❣️❣️❣️ पुरुषही प्रत्येक अवस्थी मी काम करत असतो पण त्यांच्याकडेसहन शक्तीच असते कारण सहनशक्ती तर ते आदिशक्ती महिलांमध्ये आहे ...मुलांना थोडं काही लागलं ,दंगा मस्ती करायला लागले की लगेच म्हणतात हे मला सहन होत नाही तुझं लक्ष कुठे असतं??तुझ तूच पाहून घे.....☺️ आता त्यांना काय म्हणावं....

🌹स्वप्ने रंगवली होती ज्याआशेने💕
त्याच लोकांनी मला दुरावल.न..

दोष खरच माझाच होता ...💕
एक चंगले कारण न आले देता.......💞

आरोप होते क सत्य ते...💕
पावित्र्याचा कलंकित करून रंगवले ते.....💞

सांगणारे जास्तच शहाणे होते....💕
कान व डोळे मिटून संबोधित होते....💕

दोष देणारे आज किती केविलवाणे...💕
म्हणतात सहनशक्तीच्या गाणे...💞

वेळ साक्ष देत असते बजावून...💞
सत्य माझे झळकावून......💕

मी नेहमीप्रमाणे आजही सर्व सहन करते आहे...
तुमच्यासाठी माझा सन्मान पणाला लावते आहे...🌹

........✍️✍️✍️💞Archu 💞✍️✍️✍️

..(.. वरील लेखनाचा सर्व हक्क लेखिके कडे राखीव... शेअर करायची असल्यास नावासकट शेअर करावी.... अन्यथा कायद्याने दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. )