classmate books and stories free download online pdf in Marathi

क्लासमेट...

classmates...........❣️

सर्वांना आपल्या शाळेतील आठवणी, शाळेतील मित्र मैत्रिणी... संपूर्ण मित्र-मैत्रिणींचे संपूर्ण नावही तोंडपाठ असते नाही का!!!!!!!!!........ एखाद्याचं नाव घ्यायचं म्हणजे संपूर्ण नावासहित त्याची माहिती असायची.... शाळा म्हटलं की आपल्याला बालवाडीपासून ते दहावीपर्यंत आपली बाल शाळा असते 🥰🥰
या शाळेतील आणि सर्वांसोबत घालवलेले सुवर्णक्षण अविस्मरणीय असतात... नाही का!!!!! सर्वांचे मन लहानांचे बालपण किती सुंदर क्षण असतात हे जे आपल्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात गाजवलेली असतात..... माझ्या प्रत्येक वर्गातील माझ्या वर्गमैत्रिनी म्हणजेच आता सोप्या भाषेत सांगायचे झाले तर क्लासमेट्स... या माझ्या सागळ्य पेक्सा कितीतरी वेगळ्या होत्या... आम्हा मैत्रिणीचे विश्र्वचं वेगळे होते. . त्यांच्याशी मैत्री करायला मलाही खूप पापड करावे लागले... बर का!!!!! माझा स्वभाव कसा जरी असलं न तेरी प्रत्येक वेळेस त्यांनीं मला आपलंसं करून घेतलं..माझ्या चुका त्यांनी त्यांच्या ओढणीमध्ये घेतल्या...(पदरात नाही बर का🤣🤣) तरीही त्या माझ्या बेस्ट मैत्रिणी होत्या, आहे, आणि नेहमीच राहणार...,💞💞

पहिली मध्ये कोणत्या शिक्षिका होत्या दुसरी दुसरी मध्ये कोणा सोबत भांडण केले चौथीमध्ये पाचवीमध्ये फर्स्ट टाइम इंग्लिश शिकायला सुरुवात केली हे आणि असे बरेच काही क्षण आठवणीत राहतात.... शाळेचा परिसर... शिक्षक वर्ग...याची आपल्याला खूप लवकर सवय होऊन जाते.... त्यांच्यासोबत घालवलेले सोनेरी क्षण आठवणीत राहणारी असतात.... हे आणि असे अनेक मित्र मैत्रिणी मित्र मैत्रिणी. .🌹🌹

. आता तर काय सगळेच आपल्या वर्ग मित्रांना क्लासमेट म्हणतात ना..🥰.. पण माझ्या मैत्रिणी ह्या फक्त क्लासमेटच नव्हते तर त्यांनी वास्तव जीवनातही त्यांची छाप वर्गमित्र पेक्षाही इतर वेळी ते आपले कधी भाऊ तर कधी बहीण म्हणून आपल्या सोबत नेहमी असायची...💞 प्रत्येक वेळेस मदत करणारे हेच का ते वर्गात छोट्या गोष्टीवरून भांडणे करणारे 💁मित्र मैत्रिणी सगळ्यांनाच असतात 🤗मित्र शिवाय आयुष्य नाही किंवा आयुष्यात मित्रा शिवाय काहीच अर्थ नाही ...शिवाय आनंदही नाही... आपल्या दुःखात... फक्त आपली मित्र आपली साथ मनापासून देत असतात..💖

शाळेमध्ये आपण किती मज्जा करतोना ...सहलीला जाताना, खेळ खेळताना ,खाताना शाळेतील भात खाताना, कधी पाणी पिण्यासाठी नळावर भांडण होतात ,तर कधी मला तू पेन का देत नाहीये..????. अबोला असतानाही आपल्या मित्र मैत्रिणी विषयी कोणी काही बोललं तर ऐकून न घेणारी आपले मित्र त्यावेळेस मात्र भांडयला येतात. !!!!!🙃

आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा मुली मुलांशी बोलायच्या नाही..कुणी मुलगी जर एकाद्या मुलाला स्वतव्हून बोलली तर लगेच त्या मुलीला चिडवायचे 😌......या सगळ्यांमध्ये त्या बालमनाला काय वाटत असेल असा विचार तेव्हा तरी कुणीही करत नव्हतं..😔.....
आता तर सगळे कसे छान ग्रुपने बेस्ट मैत्रिणी मैत्रिणी म्हणून घेतात, राहतात ही ...आम्ही पण एवढ नाही राहिलो........ हा.. जसजसे नवीन वर्गात गेलो तसे नवनवीन मैत्रीणी होत गेल्या.... कोणाशीही मैत्री सहज होऊन जायची...हो न,❣️❣️❣️

पहिली दुसरीचा एवढा आठवतही नाही पहिलीच्या वर्गात असलेले भिंतीवर असलेले छोट्या बाळांचे चित्र ,,तर दुसरी च्या वर्गात असलेली पाण्यातील मासा या कवितेचे बोलकी पण आकर्षक चित्र ..💞त्या चित्राकडे पाहिलं की वाटायचं खरंच आपण त्यांच्या विश्वात आहोत....
ती कविता नाही का तुम्हालाही माहिती असेल ..
💕.."कोणाचे ग कोणाचे..
सुंदर डोळे कोणाचे..
त्या पाण्यातील माशाचे ..
की माझ्या बाळाचे....

कोणाचे ग कोणाचे....
सुंदर बोल कोणाचे...
त्या गाणाऱ्या मैनेचे....
की माझ्या बाळाचे...." 💕
किती सुंदर कविता होती ना ... !!;;;;;मला खूप आवडायचं ...म्हणून ती मी पाठ केली होती...💖

तिसरीच्या वर्गात जेव्हा गेलो तेव्हा शाळेत नवीन गणवेश वाटप व नवीन पुस्तके त्याच वर्षी मिळाली होती .....शाळेतील त्या पुस्तकाचा किती छान सुवास यायचा.... त्या नवीन कोऱ्या पुस्तकाची सर कोणत्याही फुलाच्या सुगंधाला नाही... जसा पाऊस पडल्या ओला मातीचा वास येतो ना, तशाच कोर्‍या करकरीत वह्या ... पुस्तक शाळेत येण्याचा उत्साह निर्माण करीत असतो ...नाही का!!!....🌹
❣️गेलो विसरून ते दिवस अभ्यासाचे....जुन्या आठवणीचे...
जाऊ सगळ्या एकदा आठवणीच्या रम्य शाळेत...❣️

चौथीच्या वर्गातील मॅडम आमच्या वर्गशिक्षिका तेलप मॅडम... त्यांना नाटकाची वा गाण्याची खूप आवड होती.. म्हणून त्यांनी आमच्या वर्गात नवीन छोट्या छोट्या मुलांचे नाटक बसवले होते... त्याच वर्षी स्कॉलरशिपचे पेपरही असल्यामुळे आमच्याकडून ते अगदी हसत खेळत तयारी करून घेत असतात...🥰.
जेव्हा आम्ही पाचवीत गेलो होतो त्याच वर्षी पहिल्यांदाच इंग्रजी हा विषय आला होता.... इंग्रजी म्हणले की सगळ्यांच्याच काळजात धडधड व्हायची ...त्या भाषेला ना काना ना मात्रा पण तरीही खूप अवघड 🙄आता पहिलीपासून किंवा त्याही अगोदरपासूनच सीबीएससी पॅटर्न आहे..ना..त्या मुलांना तर त्यांना मराठी अवघड जाते आणि आम्हाला पाचवीत असताना ही एबीसीडी ची भीती वाटायची ..,😁वर्गशिक्षक तावरे सर यांनी आम्हाला खूप छान इंग्रजी शिकवली ...आम्ही मनापासून शिकण्याचा प्रयत्न करत होतो ...एबीसीडी लिहिता लिहिता कधी आमच्याकडून ते वाक्य तयार करून घ्यायचे ,तर कधी वाचन करायला लावायची.... हळूहळू इंग्रजी मध्ये पण आवड निर्माण व्हायला लागली आणि तसे मी लहानपणापासून हुशार आहे🤷 मला पण आता मी इंग्रजी वरही आपले वर्चस्व निर्माण केले होते आणि सगळ्या शाळेमध्ये फक्त मलाच छान पैकी इंग्रजी जमत होती असे आमचे सर म्हणायचे😂 मलाही मग गर्व वाटायचा 🤣स्वतःविषयी😂😂

त्याच वर्षी ही आमच्या शाळेत स्टेजवर म्हणण्यासाठी प्रार्थना, प्रतिज्ञा ,सुविचार किंवा कथा सांगण्यासाठी सर नेहमी मला बोलवायचे ...हळूहळू मलाही सरांची भीती मनातून गेली आणि मी अगदी निर्धास्तपणे स्टेजवर वावरू लागले, मग सरांनी मलाच समोर कधी स्वागत घेत तर कधी प्रार्थना तर ,कधी भाषण असे म्हणण्यास त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिले.😌...
माझ्या मैत्रिणीही याबाबतीत काही कमी नव्हत्या.. त्यांनाही खेळाची खूप आवड ...हा स्टेजवर यायला थोड्या घाबरत होत्या😭... त्यांना स्टेजवर आले की थरथर कापायला व्हायचं... भाषन तर नकोस म्हणायच्या,.. .. पण 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट ला आम्ही समूहगीत नक्की घ्यायचो ...आमचा आवाजही पहाडी असल्यामुळे आम्हाला कोणत्याही मइकची गरज नव्हती ...एकदा का आम्ही ओरडायला सुरुवात केली की दुसऱ्या वर्गातील मुलांना वाटायचं पाचवीच्या वर्गात भांडणं चालू आहे 🤣🤣
पाचवीच्या नंतर आम्हाला सहावी व सातवी साठी दोन वेगळे वर्ग गावातील गावकऱ्यांनी नवीनच बांधून दिले होते, म्हणून आम्ही सहावीमध्ये नवीन वर्गात गेलो ...नवीन वर्ग म्हटलं की पळत जायचं आपली जागा धरून ठेवायची... तेववा
माझी मैत्रीण💞 अर्चना राठोड 💞ही पळत जायची न आम्हाला 2 न ल जागा पकडून ठेवायची..😂😂...त्या नंतर ही प्रेतेक वर्षी आम्ही दोघी 1च बेंचवर बसून अभ्यास केला...अगदी 12वी पर्यंत...आम्ही प्रेटेक गोष्ट एकमेकींशी शेअर करायचो...कधी कधी 12वी ल माझी सायकल खराब जर झाली तर आम्ही 1कच सायकल शेअर करायचो.... ती माझी मैत्रीण लहानपापासूनच आहे.. प्रेतेक् गोष्ट शेअर आम्ही आजही करतो ब् र.,😌 ..असो..,

सातवीत आम्हाला बसायला तेव्हा लांब अशा पट्ट्या होत्या ...त्याही खूप खराब झाल्या होत्या ,पण आम्ही मात्र त्यावरच ॲडजस्ट करत असू ...माझा हजेरी क्रमांक पहिलीपासून ते सातवी पर्यंत चौदावा होता ...आमच्या वर्गात एकूण 26 मुली आणि पस्तीस मुले होती😊...यासाठी गणित पक्का असावं लागत बर का... माझ्यासारखं 😇😇😇

सहावीत आम्हाला नवीनच बदली झालेले ननवरे सर आले होते... त्यांच्याकडे स्पोर्ट्स व इतिहास हा विषय होता; आता इतिहास म्हटलं की खूपच बोर व्हायचं !!!! पण स्पोर्ट्सला मात्र खूप मज्जा यायची ....सरांची हातात नेहमी सुट्टी आणि एका हातात लंबी स्केल होती... सिटी तर खेळण्यासाठी होती ... खेळण्याचा तास झाला हे आम्हाला सरांच्या सुट्टीवरून समजायचं... आज ख खो खेलयाचा आहे की कबड्डी ची प्रॅक्टिस करायची,... पण सरांच्या हातातल्या पट्टीला मात्र सगळेच घाबरायची ...कारण सर तेव्हा त्याला अभ्यास केला उलट्या हातावर मारायची ना ...किंवा आमचा अभ्यास झाला नाही त्यावेळेस आमची धडकत नसायची......😂. याच वर्गात अनेक नवीन मैत्रिणी आल्या...
💞 अनुराधा भाटे 💞तिच्या मावशीकडे शिकायला होते ..लहानपणापासून पाचवीपासून आडगाव ला आली होती...सुरुवातीला मी ख तिला भाव दिलाच नाही..पण 8विपासून मात्र आम्ही खूप पक्क्या मैत्रिणी झालो....आजही आहेत....तिच्यासारखी bestii , अजूनपर्यंत मला 2री कुणी मिळालीच नाही...,💞ही माझी 2 दिलं 1 धडकन..❣️.अशी मैत्रीण आहे.. तीच्याऐवड मला कुणी समजू घेवूच शकत नाही ..एवढी ती माझ्यासाठी स्पेशल आहे...तिच्याविषयी लिहायचं म्हतल म्हणजे मला पूर्ण दिवस पुरणार नाही..म्हणून थोड आवरते घेते...😌
. ... शाळेत तेव्हा नवीनच आणखीन एक दोन मुले आली होती.. यशोदा थोरे ही तेव्हापासूनच आम्हाला जॉईन झाली होती... काही दरकवाढीच्या मुली इतक्या लांबून चालत आडगाव ला शाळेत येत होते.... त्यातलीच एक
💞विजय माला वाघ...💞. दिसायलाही सुंदर होती ,पण शाळेत अगदी चुणचुणीत.. सरांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तिच्याकडे असायचं.. म्हणून मी तिच्याशी मैत्री केली पण माझ्या लहानपणापासून असलेल्या चंचल केदारी आणि बाली अवघड या माझ्या मैत्रिणी मला बोललास नाही.. त्यांनी बरेच दिवस माझ्याशी कट्टी घेतली होती .. 💁का तर म्हणे मी तिला जास्तच भाव देते... आम्हाला बोलत नाही पण मी खरंच सांगते मी असं काही केलं नव्हतं ...फक्त ती नवीन होती म्हणून तिच्या सोबत जास्त राहते...,,🤦 नेहमीच माझा पहिला बाली दुसरी आणि तिसरी असा नंबर असायचा शाळेत कधी आम्हाला एबीसीडी म्हणायची...
किंवा अ म्हंजे अर्चना...b म्हणजे बाली...c. म्हणजे चंचल....

चंचल चे आजोबा त्यावेळेस शाळेचे मुख्याध्यापक होते म्हणूनच तिची शाळेत शान काही औरच होती.... पण माझ्याशी मात्र ती खूप जुळवून घेत होती तिचे अक्षरही सुंदर होते... माझे अक्षर खूप खराब होते कुत्र्याचे पाय मांजराला मांजराचा पाय उंदराला उंदराची शेपटी माझ्या लेखणीला....😂😂

सातवीतील आमचे वर्गशिक्षक घारेगावचे शेख सर हे होते... ते आम्हाला गणित खूप छान शिकवायचे ..अगदी अवघड वाटणारे गणित सर शिकवत असताना खूपच सोपे वाटायचे..🌝 सरांचा स्वभाव खूप गमतीशीर होता आणि ते छानशी कवितांच्या रचना सुद्धा करायची... त्यांनी बरेच गाणे प्राथमिक शाळेवर बसवली होती.. त्यांचा आवाजही खूप सुंदर होता... सर आम्हाला लेझीम व पेटी सुद्धा शिकवायचे ..
अर्थातच मी बाकीच्या मुलांना लेझीमचे हात करून दाखवण्यासाठी स्टेजवर होते..💁 सातवी मध्ये मी एकदा स्टेजवर गेले असताना घाबरले होते ती वेळ माझी सर्वप्रथम आणि सर्वात शेवटी घाबरण्याची होती.. त्यावेळेस गावातील सरपंच ,उपसरपंच इतर कमिटी सदस्य अध्यक्ष, माझे वडीलही आलेले होते आणि भाषण मला करायचं होतं ...मी त्यावेळेस स्त्रियांविषयी भाषण करणार होती ..उबाळे मॅडम ने मला भाषण लिहूनही दिलं होतं पण ऐन वेळेला माझ्या ती लक्षातच येईना... एवढी मी घाबरले होते... मी हळूहळू म्हणायला सुरुवात केली पण पुढचे काही आठवेना म्हणून मग मी त्यादिवशी आडगावातील बायांच्या समस्या मला जशा मांडता येतील तशा माझ्या भाषणातून बोलण्याचा प्रयत्न केला... गावात महिलांना पाणी खूप लांबून आणावं लागायचं हे सांगितलं होतं किंवा बायांना किती काम करावं लागतं पण पुरुष मंडळी ही जाणीव करून घेत नाही... काही काही माणसे तर सकाळी उठून रोडवर एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन बसतात, ते रात्रीपर्यंत तिथेच पडलेली असतात ...पण त्यावेळेस घरच्या बायांची किती बरे त्रास होत असेल, तरीसुद्धा त्या सगळं काम मोठ्या निष्ठेने करत होत्या.. आणि हेच मी त्यावेळेस सगळ्यांसमोर सांगितलं.. सगळ्यांना मी बोललेलं एवढ भावलं त्यांनी मला प्रत्येकी व्यक्तिगत बक्षिसे दिली आणि त्यापासून मी भाषण करायला दुसऱ्या गावी जायला लागले होते ..आता प्राथमिक शाळेचे दिवस फक्त सातवीपर्यंत आठवीपासून तिथे दुसऱ्या शाळेत ऍडमिशन घ्यावी लागत होते.🤩

आता नवीन वर्गात जायचे म्हटल्यावर पुन्हा नवीन मैत्रिणी नवीन शिक्षक वर्ग आणि सदस्य काही नवीन नवीन युनिफॉर्म, सगळच कास नवीन !!!!प्राथमिक शाळेत skirt आणि midi होती.. आता आठवीपासून पद्मश्री सखाराम पाटील न्यू हायस्कूल मधला गणवेश पंजाबी ड्रेस ,दोन वेण्या ,बूट सॉक्स... मला पहिल्यापासूनच वेण्या घालायचं जीवावर यायचं 🙄...मी कधी स्वतःसाठी टापटीप राहिलेले नाही... मुली शाळेतील प्रत्येक तासाच्या सुट्टीमध्ये हात पाय धूऊन छोटासा मेकअप करून शाळेत यायचा ...पण मी मात्र सकाळच्या वेण्या आणि तसेच घामाघूम असलेली मी... मला फक् स्वतःला राहण्याचं कंटाळा यायचा.. तेव्हा ही यायचा आणि आजही येतो 😌😌.
मला सांगितलेली मी हजार कामे करील पण त्या कामापैकी स्वतःसाठी एकही काम करीत नाही....🤣🤣या विषयावर माझी ताई...माझे वडील, माझे पती देव आणि माझ्या प्रिय मैत्रिणी अजूनही माझ्यावर खूप रागावतात ...😔😔...

💞गुंजाईश तो रहती है...
रिष्टो को टूटणे से बचाने की....
थोडी कोशिश तुम करो थोडी मै....
मन की दुरी मिटने की...💞
माझ्या 1 मैत्रिणीचा या अाेली....
.....मला प्रतेक वेळेस समजून घेणारी माझ्या मैत्रिणी....मला प्रत्येक वेळेस मोलाचा सल्ला देणाऱ्या...काही काही तर माझ्या पेक्स वाटेने खूप मोठ्या आहेत त्या ही मला छोट्या बहिनिप्रमाने.. मैत्रणीप्रमाने हक्‍क गाजवतात...कधी रुस्तात..तर कधी मंवतात.... अस्या मैत्रिणी..सगळ्यांना मिळो... अश्या आहेत माझ्या क्लासमेट... बेस्ट मैत्रिणी...❣️❣️


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED