कृष्णाचा गोपाळकाला Archana Rahul Mate Patil द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कृष्णाचा गोपाळकाला

गोपाळ काला...
कृष्णाचा गोपाळ काला!!! अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.. ष्टमीच्या दिवशी दिवसभर उपवास असतो तर त्याच्या दुसर्‍या दिवशी गोपाळकाल्याचा सोहळा.. या दिवशी कृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत दहीहंडी फोडत असतो ...मागील काही वर्षापासून गोकुळाष्टमी पेक्षाही गोपाळ काल यालाच जास्त महत्त्व देण्यात येत आहे ...गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा चे अनेक पथक तयार केले जातात व जी सर्वात उंचीची दहीहंडी असते ती फोडणाऱ्या ला बक्षीसही मिळत असत...आता त्यात सरकारनेही काही नियम घालून दिली आहेत... कारण या दहीहंडी पासून अनेक गोविँदा पथक जखमी होत असते... तरीही आपल्या भारताची शान असलेली ही दहीहंडी संपूर्ण जगभरात मात्र खूपच सुप्रसिद्ध आहे... दहीहंडी फोडण्यासाठी जमाव जमलेला असतो तर याचा सरावही बरेच दिवस आपल्या मित्रांसोबत गोविंदा पथकाला करावा लागतो...अशी ही दहीहंडी सर्वपरिचित आहे... आता प्रत्येक गावोगावी म्हणण्यापेक्षा घरोघरी हा उत्सव साजरा केला जातो....

तर बालकृष्ण हे पाच सहा वर्षाचे असतील तेव्हा त्यांनी हा खेळ चालू केला... बाबर अाेट ,तोबरं गाल ,कुरळे केस, सावळा रंग पिवळा पितांबर ,लाल शेला आणि कमरेला खोसलेली बासरी, वैजंती च्या माळा गळ्यात आणि कपाळी गोपीचंदनाचा टिळा.. कुरळ्या केसात खोचलेला मोरपंख आणि बोलायला बोबडे.. दिसायला ठेंगणा म्हणजे आणखी कमी उंची, दिसायला गुटगुटीत असा हा कान्हा त्याच्या अनंत लीला.. त्यानच्या काय लिला करायचं सांगाव थोडी लागत..
चतुरा तू शिरोमणी, गुण लावण्याची खाणी...
असा का कान्हा आपल्या सवंगड्यांसोबत संपूर्ण गोकुळात धुमाकूळ घालत होता... सामान्य वानर होती पण त्यांच्या शिवाय जसे रामायण पूर्ण होत नाही , मावळी सामान्य होते पण शिवबांचा इतिहास त्यांच्या शिवाय पूर्ण होत नाही..अगदी तसेच जगाच्या मालकांनी गोपाळांची संगत केली त्यांच्याशिवाय त्यांच्या बाललीला किंबहुना कृष्णच पूर्ण होत नाही...
वेडावाकडा, पेंद्या, सुदामा हे त्यांचे मित्र मंडळ ..पण सगळेच अंग काठीने जरा बारीकच ..भगवंतांनी विचार केला की आपल्या गावात एवढे दही-दूध-लोणी असूनही ही मुले बारीक कशी?? तर गवळणी त्यांना ह्या दही दूध लोणी घेऊन मथुरे त विकण्यासाठी जातात ,असे समजले... म्हणून त्यांनी आपल्या मित्रमंडळींना जमा करून दहीहंडी फोडून कशी खायची हे शिकवले..

भगवंतानी साम, दाम, दंड, भेद वापरून गौळणींना मथुरे ला दही दूध नेण्यास परावृत्त केले.. ज्याचे अंतकरण पवित्र आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या सोबत वाटून घेत होते...घरातील पाळीव प्राण्यांपासून बचाव होण्यासाठी गवळणी आपले दही-दूध-लोणी याचे मडके किंवा घागरी या शिकयावर ,उंच टांगुन ठेवत असे..
आता गवळी च्या घरी चोरी करायला जायचे म्हटल्यावर ह्या चोरांसाठी साहित्यही लागणारच ना!!!! म्हणून भगवंताच्या सांगण्यानुसार बारीक बारीक खडे ,माती,दगडं आणि काठी इत्यादी साहित्य गोपाळांनी जमा केली..
खडा यासाठी के उंचावर लटकवलेली घडे रिकामी आहे की नाही?? हे पाहण्यासाठी... माती यासाठी कुणी धावत-पळत आपल्या मागे लागलीच तर त्यांच्या डोळ्यात फेकण्यासाठी!!..काठी अगदीच उंच असलेला घडा फोडण्यासाठी.!!.
सगळे गोपाळा ते काम गवळणीच्या घरात गेले ..दरवाजा बंद करून सिंकयावर असलेले गाडगे फोडण्याचा प्रयत्न करू लागले.. एक खडा फेकला तर तो रिकामा घडा... दुसरा खडा फेकला तर भेटला गाच्च करीत असलेला लोण्याचा.. लोण्याची धार लागली... सगळे गोपाळ ओंजळीने लोणी खाऊ लागली....

खाऊन झाले तर बाहेर गवळणीची चाहूल लागली ...आता काय करायचं ???असे म्हणून सगळेच कान्हाकडे पाहू लागले.... कृष्ण म्हणतो पे'ढ्या पळ ...वाकडा म्हणतो आत कसा पळावं ...अरे खिडक्यातून पळा... दरवाजातून पळा... जेथून जागा मिळेल तेथून पळा...
खिडकीतून उड्या मारता येत नाही आणि दरवाजात तर जवळच गवळण उभी !!!!!आता आपण पकडले गेलो आहोत असे म्हणून ते सगळे मोठ्याने ओरडू लागली.. भगवंत म्हणतात की सगळ्यांनी डोळे झाकून आपल्या देवाचे स्मरण करा.. तसे सगळ्यांनीच डोळे झाकले... पण पेंड्याला मात्र प्रश्न पडला की हा नटखट कान्हा काय करणार आहेत???? म्हणून त्यांनी एक डोळा बंद तर दुसरा डोळा बारीक करून डोळे झाकले.. सगळे गोपाळ काना सोबत बाहेर गेले... पण पेंढ्या मात्र आत मधेच अडकला ...गवळणी ने त्याच्यावर काठीचा वर्षाव केला.. पायावर, पाठीवर जिथे मिळेल तिथे कान्हाचा संपूर्ण राग पेढ्यावर निघाला आणि पेनत्यालाही कान्हाचे न ऐकण्याची शिक्षा मिळाली.. आता पेंद्या कानाचा धावा करू लागला.. तेव्हा भगवंत म्हणतात की तू डोळे उघडे का ठेवले???
मला तुझ्यावर विश्वास नव्हता, म्हणून पण देवा आता मी चुकलो.... मला येथून सोडव!!!!मी खूप मार खाल्ला आहे!!!! मला हलता येत नाही!!! तेव्हा परत पेंद्या ने डोळे बंद केले आणि कान्हासोबत सुखरूप आले...
भगवंताच्या तक्रारी आता माता यशोदा कडे येऊ लागल्या होत्या... सर्वच गवळणी काही ना काही कारणांनी तक्रारी घेऊन रोज येत होत्या..
(त्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी आपण कृष्णलीला या भागात पाहणार आहोत आज फक्त गोपाळकाला विषयी...)
यशोदा माता दररोज जाम तक्रारी ऐकून थकल्या होत्या म्हणून त्यांनी आता कान्हाला गुरे चारण्यासाठी वनात पाठवण्याचे ठरवले म्हणून कान्हाचे मित्रमंडळ ही आपापल्या गायी घेऊन वना कडे प्रस्थान करत आहेत सकाळी च्या शोधा मातेने कान्हाचा शृंगार करून दिला पितांबर घालुनी गळ्यात माळा मोरपीस खोचून बासरी हातात दिली तर एका हातात रानात खाण्यासाठी शिदोरीही सोबत दिली पंचपक्वान आणि कृष्णाला आवडतं म्हणून लोणी ही दिलं तर त्यांच्या मित्रमंडळींनी मिळेल ती चटणी भाकर घेऊन कान्हा सोबत रानाकडे निघाली..
राना मधील वासरे चारत असताना सवंगड्यांसह भगवंत कानांनी अबक दुबक तिबक खेळ मांडू ..खेळू आता विटी दांडू ..खेळ खेळु लागले.. खेळ खेळताना पुन्हा ऊन डोक्यावर आली होती ..एक जन म्हणाला, की कृष्णा आता बास झालं!!! मला भूक लागली आहे... तेव्हा कान्हानी वासरांना ही यमुना नदीचे पाणी पाजून त्यांना चारण्यास सोडले व आपण आपल्या सवंगड्यांसह एका मोठ्या वृक्षाखाली गोल रिंगण करून बसले... सगळ्यांनी आपापल्या शिदोर्‍या सोडल्या... पण भगवंतांनी मात्र सगळ्यांच्या शिदोर्‍या आणि त्यांची स्वतःची शिदोरी एकत्र करून करून त्यांचा काला केला... गोड ,तिखट ,आंबट, कडू सर्व एकत्र झालं..आणि वैकुंठीच्या देवतानाही दुर्लभ असलेला प्रसाद भगवंत आपल्या सवंगड्यांना मोठ्या आनंदाने खाऊ लागले... एकमेकांना घास भरू लागले आणि तो सोहळा पाहण्यासाठी देवादिक ही स्वर्गाहूनी पाहत होते...

असा हा काला कृष्ण भगवंतांनी आपल्या सवंगड्यांसोबत केला आणि ती दररोज एकमेकांचं काला करूनच खाऊ लागले...भगवंतांच्या अनंत लीला आहेत.. त्यांच्या स्मरणाने देखील आपली पुण्या कोटीने वाढते असे संत म्हणतात...
असा हा गोपाल काला तेव्हापासून आपणही दहीहंडी म्हणून साजरा करत असतो...तुम्हाला कृष्णाचा गोपालकाला कसा वाटला?? हे मला नक्की कमेंट करून कळवा ..काही चुकले असल्यास माफ करा...
माझ्या लेखणीतून ...✍️✍️💞Archu💞