इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले.. Archana Rahul Mate Patil द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले..

भक्त आपल्या भगवंताकडे आपल्या मोक्षाची प्रार्थना करत असताना, त्यांची कोणती इच्छा असते ते काही शब्दात वर्णन करून सांगतात की..

हे भगवंता माझ्यासाठी फक्त एवढेच करा की, ज्यावेळेस माझा आत्मा या शरिरातून जाईल, त्यावेळेस मी तुमचं नाव घेऊन मगच माझा देहत्याग करू इच्छितो...

पवित्र गंगेच्याकाठावर किंवा यमुना नदीच्या वाटेवर फक्त तुम्ही माझ्या जवळ असा...

पवित्र असे वृन्दावन स्थळ असो आणि माझ्या तोंडात तुळशीपत्र असो आणि तुमच् चरनोदक पाणी असो...

तुमच्या डोक्यावर मुकुट असो आणि चेहऱ्यावर कुरळ्या केसांची काली बट असो..

आणि असंच मला तुमच्या मुखाकडे पाहता पाहता मरण यावी..
तुम्ही समोर उभे असावी ..तुमच्या हातात मुरली असावी.. पाय तुमचा वाकडा असावा आणि तुमच्या मुरली तून मधुर स्वर निघावा.. याशिवाय मरताना मला आणखी काय हवे..

असे असताना मी माझा आनंदाने देहत्याग करील. पण त्यावेळेस तुम्ही नक्की याल न....की मला विसरून जाल!!

जर तुम्ही आलात तर माझा भवपार होईल आणि या संसारातून माझी मुक्तता होईल.. म्हणूनच हे देवा मी तुमच्या चरणा शी मागते की, तुमचे नाव घेता घेता, तुमच्या नामामध्ये रममाण असताना मला मरण यावे आणि तेव्हाच माझा प्राण निघून जावा ..याशिवाय मला आणखी काहीच नको..!!!✍️✍️💞Archu💞

इतना तो करना स्वामी ..
जब प्रान तन से निकले ..
गोविंद नाम लेकर ..
तब प्राण तन से निकले..1..!!

श्री गंगा जी का तट हो..
या यमुना बन्सी वट हो..
मेरा सावरा निकट हो..
तब प्राण तन से निकले..2..!!

श्री वृंदावन का स्थल हो..
मेरी मुखमे तुलसी दल हो..
श्री कृष्ण चरण का जल हो..
तब प्राण तन से निकले ..3..!!

सिर सोहना मुकुट हो..
मुखडेपे काली लट हो..
यह ध्यान मेरे घट हो..
तब प्राण तन से निकले..4..!!

मेरा सावरा खडा हो..
मुरली मे स्वर जडा हो..
तिरछा चरण धरा हो..
बंसी की मधुर धुन हो..
तब प्राण तन से निकले..5..!!

तन छोड जाऊ सुख से ..
तेरा नाम निकले मुखसे..
बच् जाऊ घोर दुःख से..
तब प्राण तन से निकले..6..!!

उस वक्त जल्दी आना..
कही श्याम मुझे भूल न जाना..
हमें भवपार लगा देना..
तब प्राण तन से निकले..7..!!

रहे वासना न मनमे..
मंमता रहे ना जीवन में..
रहू मस्त कृष्ण नाम धूनमे..
तब प्राण तन से नीकले..😊

✍️✍️💞Archu💞. ....❣️ किती सुंदर हेे नाही ... या काव्य रचना अगदीी आपल्या मनातलं सांगून जातात नाहीी का... असे सुंदर आणि दिव्यय विचार असणारे. संत आणि त्यांची आपल्याला लाभलेली संगत म्हणजेच सुवर्ण योगच म्हणावा लागेल... खरंतर देवाकडे सगळेच जण जगण्यासाठी काहीी ना काही मागत असतात पण आपले म रन हे कसेे असाव हे आपले आपण ठरवू शकत नाही. पण त्यासाठी आपण आपलीपण पूर्वतयारी नक्कीच करू शकतो नाही का... म्हणूनच आपण वेळात वेळ काढून देवाच्या ध्यानात मग्न असायला हवं... चालता बोलता आणि अगदी वेळ मिळेल तेव्हा देवाचे नाव घेत जावी आणि असेच देवाचे नाव घेता घेता आपल्याला मरण यावे... आज-काल मरणाला कोणी घाबरत नाही असे जरी मनात असले तरी प्रत्यक्षात मात्र सगळ्यांनाच जगावेसे वाटते पण या जन्म-मृत्यूच्या चक्रव्यूहातून आपली सुटका फक्त आणि फक्त भगवंतच करू शकतो आणि त्यासाठी आपण नाही त्याची आराधना करायला हवी नाही का... तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कळवा.. आणि जर काही चुकीचे वाटत असल्यास हक्काने सांगा... तुमचया आमच्या मधिल ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️Archu,💞💞


Disclaimer:
The opinions expressed in this post are the personal views of the author