Lost love ........ # 28. books and stories free download online pdf in Marathi

हरवलेले प्रेम........#२८.






काही दिवस सगळे व्यस्त असतात.....कॉलेज - ऑफिस - घर, हा रेवाचा रोजचा संघर्ष......तर ऋषी आणि अमायरा यांचा कॉलेज संघर्ष.....😎🤣🤣......श्रेयस सुद्धा ऑफिस जातो आणि शशांक UP केस मध्ये गुंतलेला....😒बिचारी अमायरा.....😒😒

असेच काही दिवस जातात.....आणि अचानक रेवाला शशांक कॉल करतो.....

शशांक : "हॅलो.......रेवा.....फ्री असलीस की लगेच स्टेशन ला ये तुझ्याशी पूर्वा केस बद्दल खूप महत्त्वाचं बोलायचय....🤨"

रेवा : "आता अजून काय...?🤷..झाली ना तिला शिक्षा... मग..🤔.....आणि माझा काय संबंध आता....🙄? याच्याशी..??"

शशांक : "अग ये तर सांगतो सर्व.....आणि हो, सर्वांना सोबत घेऊन ये....जे तुमच्यासोबत होते.....त्या वेळी......या सगळे....🙁"

रेवा : "ओके...... निघतोय....😦"

रेवा च्या मनात प्रश्नांची गर्दी होते... ती ऋषी, अमायरा, अर्णव, श्रीकांत यांना कॉल करून बोलाऊन घेते.....आणि सगळे पोलिस स्टेशनला जायला निघतात.....

सगळे पोलीस स्टेशन मध्ये हजर.......फक्त अर्ध्या तासात....😎😎....

शशांक : "बसा.....घाबरु नका सगळं सांगतो मी..."

सगळे : "..🤔🤔🙄🤨🤨🤨"

शशांक : "जेव्हा आपण माँटी आणि पूर्वाला ताब्यात घेतले.... माझ्याकडे दुसऱ्या केसची जबाबदारी असल्याने मी तो केस आमचे पोलीस उपनिरीक्षक अनिल घोलप यांच्याकडे सोपवली होती......त्यामुळे, पुढची माहिती तेच तुम्हाला देतील....🤨.... कॉन्स्टेबल गोळवलकर या सगळ्यांना..... Confidential Room मध्ये घेऊन जा.....तिकडे PSI अनिल घोलप सर असतील... त्यांना सांगा, मी त्यांना ज्या लोकांना, पूर्वा मते केस बद्दल माहिती द्यायला सांगितली होती....ती हीच मंडळी.....जा घेऊन जा...तुम्ही सगळे परत भेटा मला येऊन.....या आता....😎"

सगळ्यांना गोळवलकर रूममध्ये घेऊन जातो...तिथे अनिल घोलप सर बसलेले असतात.....अतिशय रुबाबदार अस व्यक्तिमत्व असतं त्यांचं......बघून कुणीही घाबरेल......

गोळवलकर : "सर ते शशांक सरांनी..... या सर्वांना, पूर्वा मते केस विषयी...... आपल्याकडे माहिती सांगण्यासाठी पाठवलंय...🙁"

घोलप : "बर...🤨...तुम्ही या गोळवलकर.....त्यांना मी बघतो.....या तुम्ही....."

सगळे : "...😧😦😧😧😧"

गोळवलकर : "हो सर.....🙁"

घोलप : "आपल्यापैकी मिस. रेवा कुलकर्णी कोण..🤨.?"

रेवा : "हो सर....मीच रेवा कुलकर्णी....🙂"

घोलप : "तर...आपण जे काही पुरावे, आम्हाला पूर्वा केस संबंधी दिले होते....त्यासाठी खूप धन्यवाद मॅडम... खरंतर त्याच पुराव्यांच्या मदतीने आम्ही खऱ्या गुन्हेगाराला पकडू शकलो....आधी पूर्वा मते ही निर्दोष आहे आणि तिचे मानसिक आणि शारीरिक छळ झाले आहे या कारणामुळे तिला समुपदेशन केंद्रात हलवण्यात आले होते.....तिथून ती बरी होऊन सुटलीच असती....पण, त्यावेळी तो निर्णय हा प्राथमिक तपासात निष्पन्न झाला होता....पुढील तपासणी जस - जशी पुढे जात होती.... तसं - तसे आम्हाला नवीन पुरावे हाती लागत गेले...... एक पुरावा जो की, तुम्हीच आम्हाला दिलेली कॉल रिकॉर्डिंग त्यात एक अशी रेकॉर्डिंग सापडली की, ज्याने पूर्ण केसची दिशाच बदलून गेली......ती रेकॉर्डिंग होती......🤨🤨 पूर्वा मतेच्या छुप्या चेहऱ्याची जो की, अजून पर्यंत समोर येणे बाकी होते.....तिला ताब्यात घेण्यात आले....आधी तर फक्त माँटीला, तिला फसवण्याचा गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती....पण, ती तर त्याच्याही पुढची निघाली....."

रेवा : "अस काय केलं सर तिने..??😧"

सगळे : "..😧😧😧"

घोलप : "रेवा मॅडम तुम्ही - आम्ही विचारही नाही करू शकणार...... अस काम करायची ही पूर्वा मते.... ट्रिपल मर्डर केसचे चार्जेस लावलेत तिच्यावर आम्ही.....😠"

सगळे : "काय.....😲😲😲😳😳ट्रिपल मर्डर केस.....😳😲😲😲😲"

घोलप : "हो....ट्रिपल मर्डर केस....माँटी आधी तिला फसवून तिच्याकडून पैसे लुबाडून घेत होता...त्यामुळे तिला काहीच हाती लागत नव्हते....म्हणून तिने स्वतःचा देहव्यापार सुरू केला.... त्यांचे व्हिडिओ बनवून ठेवायची आणि त्यांच्याकडून पैसे लुबाडायची.....तीन ते चार जणांकडून अस करून झाल्यावर काही जणांनी तिला विरोध केला आणि धमकी दिली, तिची पोलीस कंप्लेंट करायची...तेव्हा या मॅडमनी सगळे पुरावे तुम्हाला परत करतो अस सांगून त्यांना घरी बोलावलं आणि अशा एका पाठोपाठ एक तिघांचा मर्डर करून स्वतःच्याच फ्लॅट शेजारी तीन खड्ड्यात त्यांना गाडले......बॉडीच्या पोस्टमार्टेम रिपोर्ट्स वरून तिन्ही खून काहीच कालावधीच्या अंतराने झाल्याचे समजले......ही सर्व प्लॅनिंग पूर्वा मते हिने एकटीने एक्झिक्युट केली...... यात कुठेही माँटीचा सहभाग नव्हता...."

रेवा : "पण, सर हे आपल्याला कळले कशावरून...??🤔🤔 नाही म्हणजे.....मी खरंच गोंधळली आहे......सर्व ऐकून...😫"

घोलप : "मॅडम जेव्हा ती हे सर्व करत होती....तेव्हा माँटी हे सर्व बघत होता.....आता त्याला कसं कळलं......हा प्रश्न असेल तर, त्याने हे माहीत करायला.....आपला क्लाएंट तिच्याकडे पाठवला होता.....कारण, ती त्याला धीसारखी को - ऑपरेट नव्हती करत....त्याला तिच्यावर संशय होता की, ती नक्कीच काही तरी करतेय....आणि त्याने नजर ठेवायला सुरुवात केली....तिच्या आणि माँटीच्या कॉमन क्लाएंट नी माँटीला तिच्याबद्दल सांगितले....जेव्हा तो पुरावे घेण्यासाठी तिच्या घरी गेला तेव्हा माँटी सुद्धा त्याचा पाठलाग करत तिच्या घरी जाऊन पोहचला....त्याने हे सर्व प्रकरण स्वतःच्या डोळ्याने बघितले अशी कबुलीही नंतर आम्हाला दिलीय.....हा तिला कॉल करून धमकावून पैशांची मागणी करू लागला.... फोन वरून याचसाठी त्यांच्यात, खूप भांडणं व्हायची....ती बातचीत, रिकॉर्डिंग मोड ऑन असल्याने रेकॉर्ड झाली..... पण, तिच्या लक्षात राहिले नाही....आणि हे सर्व तिला ताब्यात दिल्याच्या काहीच दिवसांपूर्वी घडल्याने ती गुन्ह्याचे पुरावे मिटविण्यात व्यस्त होती....म्हणून ती रिकॉर्डिंग डिलिट करू शकली नाही........आणि तुम्ही सगळं आमच्या ताब्यात दिल्याने ते आणखीच सोपं झालं.... धन्यवाद रेवा मॅडम.....खरंच तुमच्यासारख्या स्त्रियांची प्रशासनाला खूप गरज आहे....इतकं सर्व झालं....तुम्हाला काही प्रश्न नसतील तर तुम्ही येऊ शकता....🙏☺️"

सगळे : ".....😳😲😳😧😲😲😟😯😮😦😧😧😨😰😓😓😓😓"

रेवा : "येतो सर आम्ही....🙂🙂"

सगळे शशांक कडे जातात.....

रेवा : "अरे यार ही पूर्वा मते काय चीज आहे यार......किती कांड केलेत तिने.....यार......Seriously...😠😠"

सगळे : "हो ना....😒😒"

शशांक : "मी स्वतः पूर्ण तपासानंतर शॉक होतो.....🙁 वाटलं तुला याची कल्पना द्यावी.....😒😒म्हणून बोलवून घेतलं..."

रेवा : "चांगली शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करा......"

शशांक : "सगळे पुरावे तिच्या विरुद्ध आहेतच.....आणि हा फौजदारी खटला असल्याने सुटण्याचे चांसेस कमीच आहेत.....आता पुढे बघू..... न्यायालयाचा निर्णय योग्यच असेल.....🙂🙂 विश्वास ठेवा.....🙏😎"

रेवा : "येतो आम्ही....बाहेर आहोत अमायरा सोबत बोलून घे.....बिचारी घाबरली आहे ती....सगळं ऐकून....🙂🙂"

शशांक : "हो....🙂🙂"

सगळे बाहेर थांबतात..... अमायरा जाऊन एकदम शशांकला कमरेत पकडून hug करते...😍😍🥰...ती खूप जास्त घाबरली असते....ह्या सगळ्या प्रकरणाने तिच्या मनात शशांक विषयीची काळजी आणखीनच वाढवली असते.....

शशांक : "अमो...... Don't Worry....... मला काहीही होणार नाही.....अग वेडी या प्रोफेशनमध्ये हे सगळं नॉर्मल असतं.....😘"

ती त्याला कमरेत पकडून असल्याने तो तिला डोक्यावर किस करतो......आणि शांत करतो....

अमायरा : "Amish.....Take care.....🥺🥺🥺"

शशांक : "रडायचं नाही सांगितलेलं ना.....😘"

तो तिचे डोळे पुसतो.....आणि काळजी घे असे डोळ्यांनीच इशाऱ्यातून सांगतो.....ती रडायची थांबते....आणि दोघे बाहेर येतात.....

रेवा : "चल मग येतो आम्ही....तू काळजी घे...."

शशांक : "रेवा....यार अमायराची काळजी घे....😒"

रेवा : "Don't be worries.....रे.😎😎.....I am always with her..🙂.."

शशांक : "Then ok....🙂🙂"

सगळे घरी जायला निघतात.....

ऋषी : "सगळे आज घरी या.....काही बोलायचं आहे बाबाला, तुम्हा सगळ्यांशी.....🙂"

रेवा : "काय बोलायचं आहे बाबांना.....🤔🤔"

ऋषी : "चला मग सांगेल बाबा....🙂"

अर्णव : "ऋषी अरे आमचं नाही जमणार....तुम्ही जा सगळे...मला आणि श्रीकांतला ऑफिस मध्ये थोडं काम आहे.....आम्ही अर्जंट म्हणून इकडे काम टाकून आलोय.... ओके...चला येतो आम्ही....🙂🙂🙏"

सगळे ऋषीच्या घरी जातात.....श्रीकांत आणि अर्णव ऑफिस साठी निघून जातात.....

सगळे ऋषीच्या घरी पोहचतात.........बाबा हॉल मध्ये बसलेले असतात...

बाबा : "अरे...... वा..... बच्चा पार्टी आली वाटतं.....🥰🎉🎊"

सगळे : "हो.....🎉🎊🥰🥰😎😎"

बाबा : "अरे.....या या....बसा...."

आई सुद्धा येऊन बसतात....

रेवा : "बाबा ऋषी सांगत होता तुम्हाला काही बोलायचय...🤔"

बाबा : "अरे हो बाळांनो सांगतोय......आधी खाऊन तर घ्या...काही...."

सगळे.....खात - खात गप्पा मारतात.....

बाबा : "अरे रेवा बेटा.... ऋषीच्या चुलत बहिणीच लग्न येत्या २५ जानेवारीला ठरलंय..... तुला आणि अमायराला आमच्या सोबत औरंगाबाद यायचय काहीही बहाना चालणार नाही.....ओके... It's my order....😎😎"

थोडा वेळ विचार करून रेवा होकार सांगते.... अमायराला सुद्धा काहीच प्रॉब्लेम नसतो.....

रेवा : "ओके बाबा येऊ आम्ही...... आता निघतोय कारण, शॉपिंग करावी लागणार ना.....🎊🎉🥰"

बाबा : "ऋषी आणि आईला सोबत घेऊन जा त्यांची ही होऊन जाईल...."

रेवा : "आणि बाबा तुम्ही....🙄"

बाबा : "माझे वेगळे सूट मी डिझायनर कडून बनवून घेणार.... Don't Worry...... मला आवडत नाही बाहेर जायला.....जा तुम्ही सगळे.... एन्जॉय करा....🎉🎊🎉😎😍🥰"

रेवा : "तुम्ही असला असता तर....🥺"

ऋषी : "चल ना रे बाबा....का इतका भाव खातोस....ऐक ना तिचं...प्लीज ना...."

आई : "चल ना विराट....अस तर कुठे जात नाहीस..... चल....येतोय तू...🥰"

बाबा : "चला आता गृह मंत्रालयातून ऑर्डर म्हटल्यावर...... यावच लागणार...😜....पर्याय आहे का दुसरा.....चला.....😜."

आई : "....🤨🤨"

बाबा : "...😘😘😘😘😘"

आई : ".....😌😌😌😌 इश्श....पुरे चला.....😌"

सगळे : "हुर्रे...🎉🎊😎"

सगळे शॉपिंग मॉल जातात...... शॉपिंग करतात, बाहेरच डिनर करतात.......सगळं झाल्यावर घरी येतात....खूप थकलेले असतात....त्यामुळे त्यादिवशी झोपण्यावाचुन पर्याय नसतो.....रेवा आणि बाकी सगळे झोपून जातात..... अमायरा शशांकला कॉल करते....

शशांक : "बोल ना अमो.....कशी आहेस....काय म्हणतेस...😍"

ती आज झालेली सर्व प्लॅनिंग त्याला सांगते....

शशांक : "Wow...... Great yar..... Amo..... Go... Enjoy.....🎊🎉😎😍😍😍🥰"

अमायरा : "But, .....😒"

शशांक : "माहिती आहे रे मला....पण, तू जा एन्जॉय कर आणि खूप सारी फोटो मला सेंड कर....तू खुश की मी खुश... ओके....😘😘😍🥰आता चला झोपा मॅडम....खूप उशीर झालाय....☺️😘😍🥰 गूड नाईट अमो....💞"

अमायरा : "Good Night...... Amish..💞🥰"

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED