संतश्रेष्ठ महिला भाग १४ Vrishali Gotkhindikar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

संतश्रेष्ठ महिला भाग १४

संतश्रेष्ठ महिला भाग १४

ऐसी लगन लगाई कहां तूं जासी तुम देखे बिन कल न परति है

तलफि तलफी जीव जासी तेरे खातर जोगण हुंगी करवत लूंगी फासी

मीरा के प्रभु गिरिधर नागर चरणकंवल की दासी

"तुझ्या प्राप्तीसाठी जोगीण बनेन, वेळ पडल्यास मरण पत्करेन.

गिरिधरा, ही मीरा तुझ्या चरणांची दासी आहे रे!"

तिचा ठाम विश्वास होता की प्रभुचे नामस्मरण, त्याचे भजन कीर्तन हीच त्याच्या प्राप्तीची गुरुकिल्ली आहे. त्यासाठी मथुरा-काशीला जाण्याची गरज नाही.

तीर्थयात्रांची आवश्यकता नाही.

बस्स प्रभुंचे नामस्मरण यातच मोक्ष आहे.

आणि हे सुत्र तीने आयुष्यभर अंगी भिनवले होते.

भजन भरोसे अविनाशी मै तो भजन भरोसे अविनाशी

जप तप तीर्थ कछुए ना जाणूं करत मै उदासी रे

मंत्र ने जंत्र कछुए ना जाणूं वेद पढ्यों न गइ काशी

मीरा के प्रभु गिरधर नागर चरणकमल की हूं दासी

भजन भरोसे अविनाशी मै तो भजन भरोसे अविनाशी!

हे झालं मीरेच्या स्वतःबद्दल, तिच्या कृष्णभक्तीबद्दल.

पण स्वतः कृष्णाबद्दल सांगताना मात्र तिची काव्यप्रतिभा विलक्षण बहरते.

श्रीकृष्णाबद्दल बोलताना तिला काय सांगु आणि काय नको असे होते.

यदुवर लागत है मोहिं प्यारो मथुरा में हरि जन्म लियो है गोकुल में पग धारो

जन्मत ही पुतना गती दीनी अधम उधारन हारी

यमुना के नीरे तीरे धेनु चरावै ओढे कामरी कारो

सुंदर बदन कमलदललोचन पीतांबर पट वारो

मोर मुकुट मकराकृत कुंडल करमें मुरली धारो

शंख चक्र गदा पद्म बिराजै संतन को रखवारों

जल डुबत ब्रज राखि लियो है करपर गिरिवर धारो

मीरा के प्रभु गिरिधर नागर जीवनप्राण हमारो

'मीरा' मुळात 'मीरा' राहिलीच नव्हती.

ती पुर्णतः कृष्णमयी होवून गेलेली होती.

त्यामुळे तिच्या कवनांमधुन जिथे तिथे कृष्ण ओथंबून भरलेला दिसतो.

तिचा प्रत्येक क्षण हा हरिच्या मिलनासाठी आसुसलेला आहे.

कुठलीही सुखे तिला तिच्या या साधनेपासुन परावृत्त करू शकत नाहीत

अथवा तिच्या मनातील प्रभुबद्दलची प्रिती कमी करु शकत नाहीत.

हरि मेरे जीवन प्रान-धार

और आसरो नाही तुमबिन तीनूं लोक मंझार

आप बिना मोहिं कछु न सुहावै

निरख्यौं सब संसार

मीरा कहै में दासि रावरी दीज्यौ मती बिसार

हरि मेरे जीवन प्रान-अधार

मोहि लागी लगन हरिचरनन की

चरन बिना कछुवै नहिं भावे जग माया सब सपननकी

भवसागर सब सुखि गयो है फिकर नही मोहिं तरनन की

मीरा के प्रभु गिरिधर नागर आस वही गुरु सरनन की

मोहि लागी लगन हरिचरननकी

अशा भजनातून मीरेची सायुज्यता दिसून येते .

ती कृष्णाशी एवढी एकरुप होवू गेली होती की स्थळ्-काळाचे देखील भान विसरून बसे.

कधी ती स्वतःला वृंदावनातील गोपी समजे तर कधी राधा.

कृष्णाच्या लीलांना कंटाळलेल्या एखाद्या गोपिकेप्रमाणे ती लडिवाळ तक्रारही करते.

हलकेच आपल्या प्रियाला लटका रागही दाखवते.

मीरेची सगळी कवने ही एक प्रकारची आर्त विनवणीच असल्याने ती खुप लवकर तोंडात रुळतात.

मनाला भावतात.
तिच्या कवनात त्या गोपालाचे वर्णन असते, त्याच्याविषयी लडिवाळ तक्रार असते.
तिच्यासाठी तिचा कृष्ण सार्‍या आसमंतात सामावलेला आहे.
पशु-पक्ष्यांच्या किलबिलीत तिला कृष्णाची मुरली ऐकु येते.
ऋषीमुनींच्या मंत्रपाठात तिला कृष्ण जाणवतो.

तर कधी हिच मीरा विरहाने व्याकुळ होते.
काय वाट्टेल ते करा पण आपल्या चरणी स्थान द्या अशी प्रभुचरणी विनंती करते.

तुम सुनो दयाल म्हांरी अरजी

भौसागर में बही जात हूं काढो तो थांरी मरजी

'मीरा' हे त्याग, समर्पण, निष्ठा, प्रेम या गुणांचे आदर्श उदाहरण आहे .

मीरेचे जीवन अनेक अद्भुत घटनांनी भरलेले आहे.

मीरेचे जीवन इतके स्वच्छ आणि शुद्ध आहे की त्यात चमत्कारांना जागाच नाही.

स्वच्छ पाण्याप्रमाणे तिचे जीवन पारदर्शक आहे.

इथे लपवण्यासारखे काही नाही.

प्रेम आणि निष्ठा हे तिच्या साधनेचे, तिच्या आयुष्याचे मुलभुत घटक आहेत.

मीरेची साधना प्रकट आहे.

तिच्या पदांमध्ये भक्तीरस ओथंबून वाहतो आहे.

पदांमध्ये श्रुंगाराचा भावही आहे पण नटवेपणा नाही.

मीरेचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे तिच्या पदांमध्ये काव्यत्मकता असली

तरी प्रेमभक्तीच्या बारकाव्यांत ती शिरत नाही.

तिची पदे भक्तिरसपुर्ण असली तरी त्यात कसलीही कृत्रिमता नाही.

सच्ची भावना, त्यांचे पावित्र्य या दोन्ही गोष्टी मीरेमध्ये काठोकाठ भरलेल्या आहेत

आणि त्या तिच्या काव्यातुन कायम भेटत राहतात.

त्यामुळे आपोआपच एका सनातन राजघराण्यात जन्मलेली, वाढलेली

ही राजकन्या तथाकथित रुढी परंपरांच्या चौकटीत न अडकता त्यापेक्षाही मोठी बनुन जाते.

कृष्णमयि म्हणवता म्हणवता ती स्वत:च कृष्ण बनून जाते.

मै तो राजी भई मेरे मन में
मोहिं पिया मिले इक छन में

पिया मिल्या मोहिं किरपा कीन्हिं
दीदार दिखाया हरिने

सतगुरू शब्द लखाया अंसरी
ध्यान लगाया धुन में
मीरा के प्रभु गिरिधर नागर
मगन भई मेरें मनमें.....
मगन भई मेरें मनमें.....!!!

तेव्हा राजपूत बायकांनी नवर्‍याला साथ देणे म्हणजे जोहार करणे इतपतच महत्त्व दिले जात होते.

त्या काळातल्या लढाऊ मराठा किंवा कानडी स्त्रियांची चरित्रे आहेत तसे एकही राजस्तानी स्त्रीचे चरित्र नाही. पद्मिनीचे सौंदर्य आणि जोहार वगैरे अशाच कथा प्रसिद्ध आहेत.
मीराबाई मात्र या सर्वांपेक्षा वेगळ्या होत्या .

.आपल्या आयुष्यातील शेवटची वर्षे त्या व्दारका येथे वास्तव्यास होत्या.

येथेच श्रीकृष्णाच्या चरणी त्या कायमच्या लीन झाल्या.

गोवर्धन गिरीधारी गोपाळकृष्णाच्या मुर्तीत त्या लुप्त झाल्या असे सुध्दा अनेक जण सांगतात.

राजस्थानची कन्या म्हणून ओळखली जाणारी ही प्रख्यात संत श्रीकृष्णाच्या द्वारकेत गेली

आणि १५४६ मध्ये ती श्रीकृष्णरूपात विलीन झाली.

भारतात अनेक संत होऊन गेले. प्रत्येक राज्यातील भाषा, ऐतिहासिक, भौगोलिक पार्श्वभूमीनुसार प्रत्येकाच्या संतपणाची जातकुळी भिन्न असली तरी सर्वांमधे एक समान धागा आहे आणि तो म्हणजे ईश्वर-भक्ती..!

कुणी ईश्वराचं निर्गूण निराकारत्व जाणून घेऊन ज्ञानोत्तर भक्तीला प्राधान्य दिलं

तर कुणी कर्मयोगाचे पालन करत कुटुंबात राहून, सामाजिक प्रबोधन करत भक्तीमार्गाचा प्रसार केला. राजघराण्यात जन्माला आलेल्या संत मीराबाईंनी पूर्ण समर्पण भावानं एकनिष्ठ भक्ती केली.
त्यांचं संतपण मधुरा भक्तीत विलीन झालेलं होतं.

भक्ती या समान धाग्यामुळं इतर भाषेतले संतही सर्वत्र वंदनीय झाले.
त्यांच्या संतत्वाचा सहज स्वीकार झाला.

त्यांची काव्यमय शिकवण समजून घ्यायचा प्रयत्न होत राहिला.

आपल्या भजन-कीर्तनात ती सामावली गेली.

संत मीराबाईंची पदं तर विशेषच लोकप्रिय आहेत.

कथा, कादंबरी, कविता.. अशा साहित्यामधून, चित्रपटांमधूनही मीराबाईंचा परिचय जनमानसात रुजला.
या सगळ्या माध्यमांमधून सतत भेटत राहिल्यामुळे संत मीराबाई मराठी मनाला कधी परक्या वाटल्या नाहीत.

मीराबाईंना काव्य, संगीत, नृत्य.. या कला चांगल्या अवगत होत्या.

त्यांनी आपला आर्त उत्कट भक्तीभाव काव्यरूपात शब्दबद्ध केला.

इतकंच नाही तर ही पदं स्वतः गाऊन, नाचून,

उघडपणे संतांना बरोबर घेऊन त्या आपला भक्तीभाव व्यक्त करत असत.

त्यांच्या समूहसाधनेचाच हा भाग होता

त्यांची पदं अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी असल्यामुळे मौखिक परंपरेतून सर्वदूर पसरली आणि टिकली. त्यातली सुमारे ५०० पदं आजही उपलब्ध आहेत.

पण त्यात प्रक्षिप्त भाग बराच आहे. त्यामुळे उपलब्ध पदांमधे अनेक भाषांचे मिश्रण आढळते.

मूळ काव्य-रचना १५-१६व्या शतकातली राजस्थानी, ब्रज आणि गुजराती या भाषांमधे आहे. पण त्यात पंजाबी, खडी बोली.. इ. भाषांमधले शब्दही आढळतात.

मीराबाईंच्या काव्याचा विषय प्रामुख्यानं कृष्ण-भक्ती.. विरह, मीलन.. हा आहे. पण काही पदांमधे वैयक्तिक आणि सामाजिक संदर्भही आढळतात.

उत्कटता, भाव-सौंदर्य, शब्दमाधुर्य, नादमयता, गेयता, चित्रात्मकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मप्रचीतीचं सच्चेपण...
ही त्यांच्या काव्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
अशी ही मीराबाईंची संपूर्ण जीवनकथा अतिशय अचंभित करणारी आहे .
मीरेबद्दल तर काय सांगायचं, तिच्याएवढा विद्रोह तर कोणीच केला नाही.
भारतातल्या स्त्री-मुक्तिवाल्या महिलांनी मीरेला पहिल्यांदा नीट समजून घ्यायला हवं.
राणी! तिचं नखही कोणाला दिसलं नसतं.
बघायची हिंमत कोणी केली नसती.
केली असती तर त्याचे डोळे काढले असते, अशी ती मीरा.
एक दिवस हातात एकतारी धरून बाहेर पडली.
अगडापगड जातीच्या संतांच्याबरोबर नाचली.
बेभान होऊन नाचली, पर्वा नाही केली कोणाची
आणि त्या काळात रविदासासारखा चांभार गुरू केला. केवढा विद्रोह आहे हा.




क्रमशः