Reshmi Nate - 15 books and stories free download online pdf in Marathi

रेशमी नाते - 15

विराटला कामामुळे दोन दिवस पिहुशी बोलताच आलं नाही...इतके दिवस पिहुच्या टेंशनमध्ये कामामरलक्षं लागत नव्हतं जस तिच्याशी बोलुन आलां तेव्हा त्याच मन शांत होऊन कामाकडे वळलं...आणि पिहु कधी फोन करणार त्याला😂 ते ही माहित होतं .रात्री यायला उशीर होत होता..पिहु पण झोपली असेल म्हणुन तो करत नव्हता.

इकडे पिहुला राग येत होता..एक दिवस नाटकं केली ...परत त्या नंतर फोन सुध्दा केला नाही.काय ‌‌खर काय खोट काही कळतच नाही... पण़ हे ही तिला कळत होते...त्याच्या वर खुप जबाबदारया आहेत..तिने स्वत: बघितलं होते....

आई,...नमनचा कॉल आला होता दोन दिवसाने येणार आहे..विराट बोलतो.

रोहिणी ,सूमन विराट कडे बघतात.

कस काय,तो दोन महिन्याने येणार होता रोहिणी हसत बोलतात.

हो , त्याला सरप्राईज द्यायचे होते...

रोहिणीच्या डोळ्यातुन आंनद अश्रुच येत होते...दोन वर्ष झाले तो न्युयॉर्कला होता... सुमन चे डोळे पाणवले ताई,सुमनने खांद्यावर हात ठेवत सहारा दिला..

रोहिणी हसत,सुमन किती त्रास दिला जायच म्हणून कस मी स्वतःच्या मनाला समजावलं माझ मलाच माहीत...

हो..हो..ताई...

विराट जवळ येत‌ो...आई तो स्टडीसाठी गेला होता..

हो पण,आता परत नाही कुठे पाठवणार...

दामोदर आणि विराट हसतात..

विराट आज लवकर आला होता...रुममध्ये येऊन पिहुला कॉल केला..दोन तीन वेळा कॉल केल्यानंतर तिने उचलला,तसा त्याने मेसेज केला😂 मग गुपचुप फोन उचलला😣

काय धमकी दिल्याशिवाय फोन उचलू वाटत‌ नाही का,तो हसतच
बोलु लागला..

थोडयावेळ ती काहीच बोलली नाही..तूम्ही का करताय‌ मला खरच यायची इच्छा नाहीये...ती शांत गंभीर होतच बोलली...

पिहु मी ये बोललं का..कधी ही ये माझ काहीच म्हणणं नाहीये...मला जसा वेळ मिळेल मी येत जाईल तुला भेटायला...😉

तूम्ही सुध्दा यायच नाहीये..इकडे...ती चिडुनच बोलली..

वा‌य,..आता तुझी आठवण आली ..तर मी तूझ्याकडेच येणार ना,😂

तूम्ही फोन कश्याला‌ केला..दोन दिवस फोन नव्हता तर बर वाटत होते...ती हलक हसून बोलते.

कामात बिझी होतो...दिपाच्या लग्नाची तारीख पण जवळ आलीये.

पिहु विसरलेली आत्ता तिच्या लक्षात येते..हो...तिच लग्न आहे ना,झाली तयारी....

कशी होणार तयारी, घरची मोठी सूनच गायब आहे ..विराट रुबाबदारपणेच बोलतो.

पिहु हलक लाजुन ...स्वतःला सावरते...आता नाहीये ..दूसरी सुन तयारच आहे तिला बोलवा...हुम्म...

विराट राग गिळत शांत होतो...पिहु लास्ट टाईम रागाचे परीणाम विसरली का,‌.

पिहु तोंडालाच हात लावते...तिला आठवुन पोटात गोळाच येतो...

तो हसत..आठवलं वाटतं....हम्म ..हात काढ ओठांवरुन मी तिथे नाहीये...

पिहु पटकन हात काढते...ते...ते...मला झोप आली.मी,... फोन ठेवुन पटकन लाजुन ब्लँकेट ओढुन घेते..

विराट मोबाईल बघत हसतो,कस गं पिहु ..किती लाजतेस...(तो लॅपटॉप बंद‌ करुन आडवा होत तिचा फोटो बघत झोपी गेला)
.
.
.
रेवतीला सुमनचा फोन येतो .दिपाच लग्न आहे...

हो का...पिहु काहीच बोलली नाही..

लक्षात नसेल...गं राहु दे...

मी तिला पाठवते...

नाही नाही गं मी काय ह्यासाठी फोन नाही केला...तिला राहू देत किती दिवस राहायचे...ते मी इनव्हीटेशन कार्ड भावाकडे पाठवुन देते...मला‌ जमणार नाही यायला राग मानुन घेऊ नको हह
.
नाही गं त्यात तुच यायला हवं अस थोडी असते..

हम्म पिहु काय करते...ठिक आहे ना,

हो ,हो ठिक आहे..विराट चा फोन आला होता..मला..

हो का ,काय म्हणत होता...सूमन दचकत विचारतात.

दोघांच काहीतरी बिनसलं त्यामुळे पिहु रुसली आहे..तेवढच बोलला..

हो का...विराटकडुन मी सॉरी म्हणते...आता दोघांमध्ये मी पण बोलु शकत नाही ना ,सुमन वरवर हसतात.

नाही गं सॉरी काय त्यात आता नवराबायको मध्ये आपण काय बोलायच..तरी मी पिहूला समजुन सांगते...

हम्म...तुमच्या बरोबर घेऊन ये लग्नाला पिहुला.....

हो हो चालेल

सुमन फोन ठेवुन विचार करत बसतात...

.
.
.
.

पिहु सुमनचा फोन आला होता..दिपाच लग्न आहे,तु काही बोलली नाही मला रेवती तिला दुध देत म्हणाली..

माझ्या लक्षातुन गेलं काल हे बोलल्यावर लक्षात आले.पिहु नाश्ता करतच बोलली.

रेवती खाताना काही काय विचारत बसते...विसरली असेल तु पण

अहो घरच लग्न आणि ही इथे काय म्हणत असतील सगळे...सुमन ने असाच फोन केला नाही...ती काही ये बोलली नाही पण इनडायरेक्टली तिला हेच बोलायच होते...

पिहु रागाने प्लेट ढकलुन निघून जाते...तुम्हाला पण माझा त्रास होतोय आता अस बोलत ती वर निघून गेली..

पिहु....पिहु...भिमराव हाक मारत होते...तीने काहीच उत्तर दिले नाही..रेवती काय हे...पाच सहा दिवस आली तर‌ तुझ एक लगेच तिला पाठवायची घाई असते...

अहो ..ते..मी रेवतीला पण वाईट वाटते...

हे बघ रेवती...मला वाटत नाही कि छोटोसी गोष्ट असेल ...तु पण चांगलीच ओळखते पिहुला...ती अस कुठल्याही गोष्टी साठी रुसत नाही...तिला काही हंव असेल तर पटकन ती मागत नाही....आणि विराटला ही सांगायच नाही आपल्याला हे कळून येते...दोघांना त्यांच्या पध्दतीने हॅन्डल करु देत...उगाच तिला फोर्स करु नको...जेव्हा स्वतःहुन पिहुला सांगायचे असेल त‌रच आपण मधे पडा‌‌यचे...विराट आला होता...इथे

रेवती शॉक होत विचा‌रतात.. कधी

मी दुपारी लंच टाईम मध्ये आलो होतो..तु ही नव्हती पिहु एकटी असेल म्हणुन आलो हो‌तो घरी जेवण करून जावे म्हणटलं बाहेर विराटची कार होती...

पिहु काहीच काय बोलली नाही...तुम्ही विराट शी बोलला...

नाही,मी आत आलो नाही..दोघांना वेळ द्यावा म्हणून मी परत निघून गेलो.. तिला काही विचारु नको ...दोघांची लाईफ आहे...मधे पडु नको पिहुला जेव्हा सांगायच तेव्हाच सांगु दे...मी सुमनताईंना लग्न झालं कि बोलणा‌र आहे...उगाच आपल्यामुळे त्यांच फंक्शन नको स्पॉईल होयला... कारण आपल्याला ही माहित नाही...पण विराट ऐवढे ऐफेर्ट्स घेतोय ...पिहुसाठी मग आपण ही त्याला एक संधी द्यायला हवी ...

हम्म ,..

जा आता तिला बोलवुन आण ..

रेवती रुममध्ये येतात.पिहु बेडवर पडुन रडत‌ होती...

पिहु ,रेवती तिच्या डोक्यावरुन हात फिरवत बो लतात...

पिहु हात झटकते मम्मी जा मला कोणाशी बो ला‌यच नाही..कोणीच समजुन घेत नाही . फक्त आपले निर्णय थोपवतात...आणि मी फक्त हा म्हणायचे...माझ्या मनाचा कोणीच विचार करत नाही..चार दिवसात मी तुला जड झाली... लगेच पाठवायची घाई झा ली...

पिहु नाही अ‌‌रे बाळा काही काय बोलते..उठुन बस..पिहू उठून बसते...

तुला मी नाही पाठवणार कुठे बस्स..तुझी इच्छा नाही ना आता जायची नको जाऊ...लग्नाला पण आमच्या सोबत ये आणि आमच्या सोबत परत घरी ये पण तिथे तू असायला हवी तुझ्या बरोबर त्यांचं नाव जोडलं आहे....तूच जर नसली तर लोक किती प्रश्न करतील ..ह्ह्ह.

पिहू काही न बोलता आईच्या कुशीत शिरते ...रेवतीने तिला कस बस लग्नाला यायला तयार केलं ..

.

.

.

.आज नमन येणार म्हणून रोहिणीची तयारी चालली होती..तिच्या चेहऱ्यवरचा आनंद ओसांडून वाहत होता...

विराट त्याला एअरपोर्टला घायला गेला होता...गाडीचा आवाज आल्यावर रोहिणी ताट घेऊनच दारात आली ...

नमन विराट दारात येऊन थांबले...रोहिणी तर डोळे भरून त्यालाच बघत तिने त्याच औक्षण केलं

नमन रोहिणीला बघून हलकं हसून हग करतो....रोहिणी हि घट्ट मिठी करते .विराट नमन च्या पाठीवरून हात फिरवून आत येतो.नमन रोहिणीला सोडून सुमनच्या गळ्यात पडतो...मॉम..आय मिस यो...

रोहिणीला वाईट वाटते.ती तस न दाखवता बाजूला येते ...

नमन मी पण आहे इथे दामोदर हात करून बोलतात ...

नमन हसून दामोदरला ह्ग करतो ...

ब्रो .....वीरा पळतच येते...नमन तिला पकडत गोल गोल फिरवतो ...दोघांचा गोंधळ बघून सगळे हसत असतात .....

सुमन रोहिणी शेजारी येते....ताई घर किती भरल्या सारखं वाटतं ना....

रोहिणी हसत हो बोलते....

थोड्य वेळाने सुधा ,रमेश,दिपा पण येतात ..सगळ्यांचा गोंधळ कल्ला चालूच होतो....

मॉम वाहिनी कुठे आहे नमन सगळीकडे नजर फिरवत सुमन ला विचारतो .

माहेरी गेली आहे ...सुमन विराट कडे बघत बोलतात ..

काय दादा ,मला वाहिनी ला भेटायचं होत...तो चेहरा पाडत बोलतो...

नमन चल फ्रेश फ्रेश ..रोहिणी डोक्यावरून हात फिरवत बोलतात...

नमन काही न बोलता निघून जातो...रोहिणीला इन्स्लटिंग वाटत होते. सगळे तिच्या कडे बघुन आपापल्या कामाला लागले .

विराट जवळ येऊन रोहिणीच्या खांद्यावर हात ठेवुन सहारा देतो...आई थोडा वेळ दे लहान आहे अजुन कळत नाही...

रोहिणी डोळ्यांच्या कडा पुसत हसते.ती नमनच्या रुममध्ये येते...नमन हा ड्रेस घाल तो बाथ घेऊन नुकताच आला होता.

त्याने हातातुन ड्रेस घेतला आणि घालुन आला...

रोहिणी टॉवेल घेऊन त्याच डोक पुसायला जाते...

आई मी करतो लहान नाहीये मी....तो चिडुनच बोलतो...

हो तु लहान नाहीये पण माझ्यासाठी तू माझ बाळच आहे...अस म्हणत ती जबरदस्तीच चेअर वर बसवत डोक पुसते...किती मिस करत होते...तुला...तु तर माझा जीव आहे...अस लांब ठेवुन जीव किती जळत होता माझ मला माहित...रोहिणी कंठ दाटुन बोलते.

मी पण खुप मिस करत होतो..नमन रोहिणीला हाताचा विळखा घालत बोलतो....

रोहिणी त्याच्या कपाळाला अलगद ओठ ठेवतात..

आई ,

रोहिणी त्याच्या चेहरा वर करत हा बोल बाळा..

तु माझ्यावर जशी निस्वार्थ प्रेम करते तसच दादावर का करत नाही...

त्याच्या प्रश्नानाने ती थक्क होऊनच बघत राहते...

नमन तिचा हात काढुन उभा राहतो..

नमन मी सगळ तूझ्यासाठीच करते ना,...

आई ,मॉम कधी तिघांमध्ये फरक करत नाही तु एकटी करते...तो आवाज,चढवुनच बोलतो..

नमन,रोहिणी जोरातच ओरडतात...

तो शांत होत आवरायला लागतो...रोहिणी जवळ‌ येते...नमन माझ्यासाठी तु महत्तावाचा आहे ...मुलाच काय दु‌ख असते ना,मला माहित आहे पंधरा वर्ष मी वाट बघितली आहे..ह्या सुखासाठी मग‌ तुझ्या भविष्याचा विचार मी करणार नाही तर कोण करणार...

राब राब राबायच दादाने...आणि तु सगळ माझ्या नावाने कर म्हणून दादाला हट्ट करायचा...आणि दादा एक हि प्रश्न न करता सगळ माझ्या आणि वीराच्या नावावर करतो...कधी स्वतःसाठी काय केलं का...

विराट जरी मोठा असला तरी पहिला हक्क तुझाच आहे ह्यावर ,

आई मला हेच कळत नाही...माझ तुझ का करते तुझा असाच स्वभाव मला पटत नाही...तो मोबाईल घेऊन दार पर्यंत येत...आई तुला काय वाटत दादाला तुझ मन कळत नाही का,सगळ कळतं त्याला पण तो घर तु‍टु नये,लहान पणी जीव लावला तु त्यामुळे तो तुला कधी दुखवत नाही...तो बोलून ताडकन रुममधुन निघून जातो...

नमन तुला आता कळणार नाही मी हे का करते...हे सगळ तुझ्या उज्वल भिवष्यासाठी करतेय मी..कस कळत‌ नाही तुला..‌रोहिणी स्वतःशीच बोलतात.

.
.
.
.
बाबा दिपाच लग्न आपण लोणावळ्याच्या रिसोर्ट मध्ये‌ करू

अरे छान आयडीया विराट ,दामोदर हसत बोलतात.

नमन विराटच्या मागून येऊन गळ्यात हात घालत बिझनेस विषयी बोलत असाल तर सांगा मी निघुन जातो...तो नाटकी चेहरा करत म्हणतो..

विराट दामोदर हसतात...नाही ,रे ‌ये विराट हात मागे करुन त्याला पुढे घेतो..नमन त्याच्या चेअरच्या कोपरयावर बसतो..‌

दिपाच्या लग्नाविषयी बोलत होतो..

व्वा...काय काय ठरलं नमन ऐक्साईटेड होऊन बोलला..

विराट दामोदर नमनला लग्नाविषयी कस करायच सगळं सांगतो..

थोड्यावेळ गप्पा मारून दोघे रुमकडे जायला निघतात..
दादा रीषभ आला नाही मला भेटायला...का,आणि मोबाईल पण स्वीच ऑफ आहे,

माझ्याकडे आहे त्याचा मोबाईल गेले तीन महिने मोबाईल बंद ठेवला मी ...

नमन शॉक होत का‌य...

विराट नजर रोखुन बघतो.

ते..ते...दादा देऊन टाक मोबाईल अस करतात का,तो चाचरत बोलतो...

विराट दोन पाऊल जवळ येत ...तुमच्या दोघांची सगळी नाटकं माहीत आहेत मला,...

दादा ,प्लिज किती पनिशमेंट असते ती ...थोडी दया मया कर ना,तो विनवणीच्या स्व‌रात म्हणतो...

मोबाईल काढुन घेतला आहे म्हणून सुधरला आहे..नाही तर वाईट मित्रांच्या नादी लागुन काय काय केलं असते कळलं नसते..तुला सगळ कळालच असेल...

हो रे दादा आता नाही तो परत वागणार मध्ये थोडा भरकटला होता...तुझ्या सारखा दादा असल्यावर कोण नाही सुधरणार नमन हसत त्याच्या गळ्यात हात घालतो...

विराट रागने बघत हात काढ,...नमन लगेच हात काढतो

झालं का,रीषभ ची साईड घेऊन...

दादा..‌प्लिज ना,

नमन,आजच आला‌य म्हणुन तुला मी काही बोलत नाही याचा गैरफायदा घ्यायचा नाही...

नमन शांत होतो...

जा जाऊन झोप दमला अाहेस...विराट बोलुन रुममध्ये वळतो...नमन मागे येत दादा...दादा....ऐक ना

वि‌राट रागाने लूक देत लॅपटॉप घेऊन गॅलेरीत जातो.

अरे दादा वहिनीला व्हिडीयो कॉल लाव मला बोलायच आहे...नमन त्याच्या शेजारी बसत बोलतो..

आता....तो हातातल्या वॉच कडे बघत बोलतो...

दादा फक्त अकरा वाजले आहेत...काय तू पण

हम्म ,त्याने व्हीडीयो कॉल लावला ...

तुम्ही फोन करताना टाईम का बघत नाही...त्रास द्यायच तर असा द्यायचा का,.पिहु ओरडूनच विराटला बोलली .तिला फक्त विराट चा चेहरा दिसत होता...तिला कळलंच नाही

नमन शॉक होत विराट कडे बघतो...सगळ्यांना ओरडणारा वहिनीच्या बोलण्या खातो तो हसतच तोंडातच पुटपुटत बोलला.

विराट ने त्याला एक लुक दिला.तसा तो शांत झाला...पिहु झोपली नव्हती ना ,मग हळु बोल तो रागाने बघतच तिला बोलतो...ती बोलणार कि नमनने डोकवलं हाय वाहिनी....तो हात करत बोलला..

पिहु त्याला बघतच भीतीने आवंढा गिळते....तिला कोण आहे लक्षातच येत नाही...ती एक नजर विराट कडे एक नजर नमन कडे बघते...

तिच्या चेहरयावरुन कळत होते ती पर्ण ब्लँक झाली आहे...
पिहु नमन आहे ,आजच आलाय...

पिहुने फक्त फोटो बघितले होते‌.म्हणून एवढ तिच्या लक्षात आलं नाही....ती हलकी स्माईल देत कधी आलात ...

मी सकाळीच आलो...तु कशी आहे वहिनी,आणि हे का‌‌य अहो जावो...नको मला एकेरी शब्दात बोल..नमन हसत बोलतो..

पिहु हसते...ठिक आहे ....नमन गप्पा मारत होता. पिहु हुसन त्याच्याशी बोलत होती...विराट शांत ऐकत एक नजर लॅपटॉप तर एक नजर पिहुकडे होती...विराटच तिच्या खळी कडे लक्ष जाते...त्याच्या ही चेहरयावर स्माईल येते...खूप दिवसांनी तिच निरागस हसणं बघितलंच नव्हतं...

वाहिनी ,कधी येणार तु मला भेटायच आहे ....तो नाटकी चेहरा करत बोलतो...पिहु विराट कडे बघते...

ते...मी...तिला,काय बोलायच कळत नव्हतं...

नमन जा आता खुप बोलला जाऊन झोप...

तुला पण बोलायच ते सांग ना मी कबाब मे हड्डी नाही बनत तो पिहुला बाय करून निघून जातो..

पिहु त्याच्याकडे बघते...मी फोन ठेवते...

अ...अंहह‌..तो गालात हसत बोलतो..

अ...काय ....

आणि आता घाबरत नाही वाटतं मला आवाज चढला चांगलाच..तो भुवई ताणुन विचारतो..

ती नाक मुरडते..

हम्म चांगल आहे...आता हक्क दाखवुन चिडते असच आयुष्यभर हक्क दाखव...तो हसत बोलतो.

मला झोप आपली तुम्ही काय बारा एक वाजेप‌र्यंत लॅपटॉपसमोर बसता...

आता तु नाही तर,त्याचीच साथ आहे...तो मोबाईल थोडा जवळ घेत बोलतो...

पिहु चेहरा फिरवते...

एकदा मला हसून दा‌खव, ना तो‌लाडात‌ येत बोलतो....

ती मानेनेच नाही म्हणुन मोबाईल समोर ठेवुन आडवी होते..

पिहु,मी येऊ का उदया ....गालावर जी खळी पडली ना आता मला किस करायची इच्छा होतेय तुला...

अ...ती दचकून उठुन बसते...नाही,तुम्ही परत....ती बोलायच ‌थांबते...

हहहं‌...मी परत पुढे बोल ....

पिहु लाजुन इकडेतिकडे बघते...

ठिक ये नको हसू...पण मोबाईल बंद‌ करु नको...

तो आपोआप बंद होणार आहे बॅटरी लो आहे ती हसतच बोलते...

विराट हसतो..शेवटी तिच्या मनात नव्हते तरी हसली आणि खळी पडली...वेडी,मग चार्जर नावाचा प्रकार असतो..‌ते लाव...

नाही लावणार मी,हुम्म....

पिहु,पटकन चार्जर लाव नाही तर आत्ता निघेल इथुन पुण्याला ...तो गंभीर होतच बोलतो..

हहह😥 लावते....ती पटकन चार्जऱलावते...

गुड.

तुम्ही मला ब्लॅकमेल करता येत ती चिडून म्हणााली.

प्रेमामध्ये सगळं माफ असते पिहु...

ती काही न बोलता ब्लँकेट ओढुन झोपुन टाकते...

इकडे लग्नाची तयारी चालुच असते....तीन दिवस आधी सगळे रीसोर्ट ला जाणार होते...सगळे फंक्शन ति‌थेच होणार होते... विराट ने मुद्दाम लग्न लोणवळ्याला ठरवलं होते...कारण पिहुची इच्छा नसताना तिला यावे लागले असते...ह्या घरात ती तिच्या इच्छेने यावी म्हणुन हा सगळे केले होते.

सुमन ने सगळ्यांना सांगितले होते...रेवती ची तबियत बरी नाही म्हणुन पिहु डायरेक्ट लोणावळ्यालाच येणार आहे...रोहिणी तर शॉकच राहते...

पिहु येणार आहे म्हणून ती त्रिशा कॉल करते...

हॅलो त्रिशा,काय कुठे गायब झाली...असच जर राहीलं मग विराट पिहुला मनवुन घरी आणेल आणि बस मग...

तस काही होणार नाहीये....त्रिशा फुल जोश अक्रोशमध्ये म्हणते..
.
अस काय करणार आहे तु..आणि आता ह्यापुढे मी तुझी काहीच मदत करु शकणार नाही..‌

का ,अचानक काय झालं

नमन मला कळलं ना,जेवढ बोलतो तेवढ पण सोडून देईल...तो असल्या वर तर मला काही बोलता येत नाही ना,काही नाही..

नको मला कोणाची हेल्प अस म्हणत त्रिशा रागाने फोन कट करते..

राग तर किती आहे..एवढ करुन सुध्दा मलाच अॅटेट्युड दाखवते...काय करणार आहे काय माहीत...
.
.
.
सगळे लोणवळ्याला पोहचतात...इकडुन पिहु,प्रांजल तिचे आईवडील सुध्दा निघतात‌...ते लग्नाच्या दिवशीच येणार होते...पण सूमनच्या हट्ठामुळे ते तयार झाले...सुमनला ही माहीत होते..आईवडील आले तर पिहू सुध्दा लवकर येईल.

नमन रीषभ पळतच येत गळ्यात पडतात....

कसा आहेस...नमन,रीषभ त्याला घट्ट पकडतच बोलतो..

मी ठिक आहे तु कसा आहे...मी पण बराच म्हण तो चेहरा उतरत बोलतो.

विराट दोघांसमोर येऊन थांबतो..झाल का,भेटुन कामाला लागा...बहिणीच लग्न विसरु नका,काही आगाऊपणा केला दोघांनी तर माझ्या इतक कोण वाईट नाही.....

दादा...एक बोलायच होतं रीषभ घाबरतच बोलतो...

कळालं मला विराट त्याच्याकडे नजर रो‌खूनच बघत बोलतो...
तसा,तो लगेच मान ‌खाली घालतो..

वि‌राट त्याचा मोबाईल ,कार्डस परत देतो..हे धर आणि नंबर चेंज केला मी कुठल्याही वाईट लोकांच्या नादाला परत लागला तर बघ....

रीषभ डोळ्यात पाणी आणुनच विराटच्या गळ्यात पडतो..सॉरी दादा मी परत नाही करणार...

विराट हसत त्याच्या पाठी्वरुन हात फिरवतो...माहीत आहे मला तु परत काही करणार नाही...वाईट संगत असली की माणुस भरकडतो...

नमन विराट कडेच आभिमानानेच बघत रहतो...

विराट त्याच्याकडे बघत नजरेनेच काय म्हणून विचारतो....

तो हसत काही नाही ....म्हणतो..

विराट त्याला हात करत जवळ बोलवतो...तो पटकन येऊन त्याला मिठी मारतो....

सगळे तिघांनाच बघत असतात..सुमनचे डोळे पाणवतात...तिचे आणि विराटच्या डॅडचे संस्कार दिसून येत होते..

पिहुची सगळ्या रसत्यात धाकधुक चालु होती...सगळ्यांना आता फेस करायच ...त्यात आईंना काय म्हणायच हेच तिच्या डोक्यात येत होते..‌आणि विराटला झेलायच😂 चिपकु😏

बाराच्या दरम्यान रीसोर्टला पोहचतात..पिहु सगळीकडे नजर फिरवत होती पुर्ण रिसोर्ट पिंक रेड व्हाईट फुलांनी सजवलेले होते.
कलरचे नेटचे कर्टन त्यात रीसोर्ट निसर्गाच्या सानिध्यात असल्याने शांती प्रसन्न वाटत होते..एक स्टाफ मेंबर येऊन त्यांच सामान घेतो...

विराटला कळताच त्याच्या चेहरयावर मोठी स्माईल आली... अठरा-वीस दिवसानंतर तो पिहुला बघणार होता..तो हातातलं काम सोडुन घाईतच आला..पिहु सगळ्यांशी हसत बोलत‌ होती...त्याची नजर तिच्या वर पडली...तिने रेड कलरचा चुडीदार घातला...हलका मेकअप ,गळ्यात त्याच्या नावच मंगळसुत्र😍 बघुन त्याला भलातच आंनद झाला..विराट तिच्या आईवडीलांशी बोलतो..आणि पिहुकडे वळतो...
पिहू सुधा बोलत होत्या तर त्याने पटकन जाऊन पिहुला हग केलं😳पिहु तर ब्लँकच झाली...

सुमन तर‌ शॉक होत डोक्यालाच हात लावते.🤦🏻

ति‌थे असणारे पण दोघांवर एक नजर टाकत बघत राहीले...रेवती भिमराव दोघे एकमेकांना बघत दूसरीकडे बघु लागले...विराट कधी सगळ्यांसमोर पिहुच्या ऐवढ्या जवळ गेला नव्हता .म्हणुन सगळ्यांना ते नविन होते.

तिच्या डोळ्यात बघत तो ‌थोड बाजुला होतो...पिहुचा हात त्याने पकडलाच होता...पिहु,त्याला रागाने लुक देत हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती...तो डोळ्यानेच तिला दटवतो....

जीजू मी सूध्दा आहे माझ्याशी पण बोला प्रांजल तोंड वाकड करतच बोलते.

विराट हसत पिहुचा हात सोडुन तिला हग करतो...पहिले तुझ्या दी ला भेटायच होते...नाही बोललो तर रुसुन बसते...

प्रांजल खुदकन हसते...ते तर‌ आहे....

पिहु दोघांनाकडे रागाने बघत सुमनच्या शेजारी जाऊन बसते.

सुमन पिहुच्या डोक्यावरुन हात फिरवते...कशी आहेस..

पिहु मानेनेच हो म्हणत कुशीत शिरते.

रेवती दोघींना डोळे भरुन बघते.

वीरा येताच प्रांजलच्या गळ्यात पडते...दोघींच चांगलीच फ्रेंडशीप झाली होती..

रोहिणी पिहुच्या शेजारी येऊन बसते...पिहू एक नजर बघते...आणि तिला सगळं आठवुन ती रोहिणी श‌ी काही न बोलता दूसरीकडे नजर फिरवते..रोहिणी च्या लक्षात येताच ती रागाने,बघत दुसरी कडे बघते..

मॉम मी आणि प्रांजल रूम शेअर करतो...वीरा हसत बोलु लागली...

हो हो जा तिला फ्रेश होयला घेऊन जा...सुमन बोलते.

पिहु जा फ्रेश होऊन जेवण करून आराम कर ,विराट काम नसेल तर जा घेऊन सुधा विराटला डोळा मारत बोलते.

विराट लाजत इकडेतिकडे बघत केसांमधुन हात पिहुच्या समोर येतो चल पिहु .....पिहुची धडधडच वाढली..

ना‌‌ ...नाही...मी ठिक आहे पिहु हसतच बोलते...

रेवती भिमराव तिच्या कडे एकटकच पाहत राहतात.

पिहुला कय बोलाव कळतच नाही..ते...ते..मला भुक लागली...ती सुमन कडे बघत बोलते..सूमनला ही कळते तिला जायच नाहीये...

पिहु फ्रेश होऊन मग जेव बाळा रेवती तिच्या जवळ येत बोलते...

ठिक आहे ना,आई नंतर होईल फ्रेश विराट तिच मन ओळखुन तिला बघत बोलतो...सुमनही रेवतीला बोलते...सगळे जेवायला बसले..

आई नमन कुठे आहे दिसत नाहीये...विराट नजर फिरवत बोलतो..

असेल इथेच फोन कर जेवायला ये म्हण...

हम्म,विराट कॉल करुन बोलवुन घेतो...नमन दहा मिनिट येतो.

नमन पिहुकडे बघत हसतो...विराट पिहुच्या आईवडीलांना नमनची ओळख करुन देतो...

वाहिनी ssअस म्हणत तो लगेच जाऊन गळ्यात पडतो...पिहुला सवय नसल्याने ती घाबरतेच...ती पटकन मागे सरकुन विराटकडे झुकते..

नमनच्या लक्षात येताच सॉरी सॉरी,...वहिनी..

पिहु घाबरत गालात हसते..

नमन हे काय न्युयार्क नाही अस भेटायाला..रोहिणी चिडुन बोलते..

सॉरी तो हळूच खाली मान घालत म्हणाला.

सगळे जेवायला बसतात....विराट पिहुशेजारी बसणार कि नमन येऊन बसला...इकडुन बसयाला गेला कि रीषभ,येऊन पटकन बसला...दोघे ही त्याला बघून हसत,दादा दररोज तर बसतोस ना,आज आम्ही बसणार तु दुसरीकडे जाऊन बस नमन रिषभला टाळी वाजवुन म्हणतो...विराट दोघांना कडे रागाने बघतो...

पिहुला त्याच्यावर ओठ दाबुन हसू लागली.
विराट पिहुवर नजर टाकत-नमन ,रीषभ जेवण झालं ना,ऑफिसमध्ये या...तो हाताची घडी घालत दोघांना नजर रोखुनच बोलतो..

दोघे एकमेकांना कडे बघत अ..हहह.‌दादा तु बस आम्ही दूसरी कडे बसतो...बारीक चेहरा करुन दोघही उठून दुसरीकडे बसतात.

दोघे उठ ले म्हणून पिहुच हसुच गायब झाले. ती एक लुक देत दुसरीकडे बघते... विराट गालात हसत पिहु शेजारी बसतो.

वीरा आणि प्रांजल पण फ्रेश होऊन येतात...ये प्रांजल इथे बस,सुमन तिला आपल्याजवळ बसायला सांगतात...

नमन ची नजर तिच्या पडते...तो तिलाच बघत राहतो...😍😍😍

प्रांजल पण पिहुसारखीच दिसायला सूंदर होती...पण दोघी ऑपोजिट होत्या...प्रांजल बोलायला लागली बंदच होत नव्हती..ती बोलत होती तर नमन तिच्यात गुंतुन गेला होता.

रीषभ त्याला हलवतो...जेव ना,कुठे लक्ष आहे..

तो दचकुन ..अ..ह..ते काही नाही ,..रीषभ

हहह.

ती कोण आहे मॉमच्या शेजारी बसली आहे ...

रीषभ वर बघत,ती प्रांजल वहिनीची लहान बहिण ,रीषभ एक नजर नमन कडे बघत तु का विचारतो...🤨

नमन हसत...ते.ते...असच माहित नव्हतं नविन चेहरा म्हणून विचारतोय,😛

विराट थोडा पिहूकडे सरकतो...पिहु बँगल्स नाही घातले आज.
पिहु खायच थांबुन,त्याच्याकडे बघते...

तो गालात हसत डोळ्यानेच हाताकडे बघत इशारा करत का नाही घातले विचारतो.

ते...घाईत विसरले, ती हळुच म्हणाली,

रेड कलरच्या बँगल्स तु आपल्यारुममध्येच विसरली...

पिहु चकित होत बघते,..हा...ते तिकडे विसरले, नविन घ्यायच लक्षात आले नाही.

विराटने बघितलं होतं तिला बँगल्स खूप आवडतात..तिच्या कडे सगळ्या कलरचे कलरफुल बँगल्स आहे.

जेवण झाल्यावर सगळे उठुन इकडेतिकडे गेले.

पिहु धर ,फ्रेश होऊन आराम कर,थोड काम आहे ते झाल्यावर येतो मी,विराट ने तिला किकार्ड दिलं आणि स्टाफ मेंबरला रूमपर्यंत सोडुन यायला सांगितले...

विराट रिसोर्टच्या ऑफिसकडे वळला.

पिहु रुममध्ये आली फ्रेश होऊन बेड वर विचार करत पडली..कधी तिला झोप लागली कळलच नाही.चार साडे चारला तिचा मोबाईल वाजल्याने तिला जाग आली...तिने कॉल उचलला,हा बोल मम्मी,

पिहु उठ बाळा फ्रेश होऊन ‌ये ...दिपाच्या सासरकडचे आलेत...

हह.आले..पिहुने पटकन उठुन फ्रेश होऊन रेडपिंक मिक्स कलरची साडी घातली.तिच आवरतच होती..कि विराट रुमचा डोर उघडुन आत आला,...

पिहु दचकुन दाराकडे बघते,...तू...म्ही मी लॉक केलं होत...

विराट हसत तिच्या जवळ आला.माझ्याकडे मास्टर कि आहे तो तिच्या केसावरुन हात फिरवत हळुच गाल ओढतो...

पिहु रागाने बघत.. त्याला मारयाला हात उचलते,पण लगेच हात मागे घेते...

अ....पिहु,तु काय करणार होती,तो हाताची घडी घालुन तिच्याकडे नजर रो‌खून बघतो...

पिहु परत वळून मिरर मध्ये बघते, ...काही नाही...तो मागुन हाताचा विळखा घालत मिठीत घेतो...मारायची इच्छा होतेय मला.

ती मिरर मधुन नजर वर करत ,हो.....खुप खुप ती चिडुनच त्याचा हात काढायचा प्रयत्न करत होती...

विराट एका हाताने समोरचा ड्रावर उघडुन बँगल्स काढतो...आणि तिच्या हात पकडुन डोळ्यात बघत‌ एक एक घालत होता...पिहू पण त्याच्या डोळ्यात हळू हळू हरवत होती.

तो तिच्या कानाजवळ येतो,आय लव्ह यु प्रिंसेस.

पिहु भानवर येत त्याच्याकडे बघते.ती पटकन हात सोडवुन घेते...आणि मागे सरकते.हे बघा मी फक्त तीन दिवस आले ते पण आई बोलल्या म्हणुन आले...उगाच माझ्यामुळे तुमच नाव नको खराब होयला बस,आणि लग्न झालं कि परत जाणार आहे...माझ्याकडुन कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवु नका..पिहु चिडुनच बोलते .

विराट गालात हसतो....ठिक आहे चिडु नको...आवर एवढ बोलुन तो फ्रेश होण्यासाठी निघून जातो...

पिहु चिडतच आवरत होती.तिलाच वाईट ही वाटत होत विराट बरोबर अस बोलाल्याचं मन कुठे तरी दुखतही होते...ती स्वतः ला सावरुन खाली आली..दिपा छान साडी घालुन मस्त तयार झाली होती..एक एक गेस्ट यायला चालु झाले होते...आज सगळे हातावर मेंहदी काढण्यात बिझी होते...पिहूने पण छान मेंहदी काढुन घेतली...
प्रांजल तु पण काढ मेंहदी सुधा बोलली

प्रांजल पिहुकडे नजर वळवत आंटी मला आवडत नाही...एकदे छोटस फ्लावर वैगेरे काढेल नंतर..

सुधा यावर फक्त हसली.आणि उठुन गेली.

पिहु डोळे मोठे करत बघते...प्रांजु,माहित आहे आवडत नाही,पण समोरच्याला चांगल वाटाव म्हणुन हा बोलाव..

दि,समोरच्याला चांगल वाटाव म्हणून मी हा बोलाव हा कुठला प्रकार..आय नो, तुला सवय आहे ..पण मला नाही..आपलं ही मत मांडाव..जे आवडत नाही ते नाही आवडत सिंपल.ते हात किती वेळ धरून बसायचे याचा मला कंटाळा येतो इइइ‌..

बस झालं जास्त शिकवु नकोस...पिहू तोंड वाकड करुनच बोलते.

थांब तुला मी ताट आणते.

नको राहू देत मी नंतर जेवेन...

का गं ,जीजु अजुन दिसले नाही म्हणुन का,प्रांजल कोपर्याने तिला धक्का देत बोलते.

त्यांचा काय संबंध पिहु नजर फिरवत इकडे तिकडे बघत बोलते..

हहह‌.प्रांजल विराट येताना दिसतो..ती पटकन हाक मारते...जीजु...पिहु दचकुन प्रांजलकडे बघते..विराट दोघांनी कडे बघत जवळ येतो...

हा प्रांजु..

जीजु तुम्ही जेवला नाही ना अजुन ..

मी जेवलो आत्ताच ...तो पिहुवर नजर फिरवुन हसत बोलतो.त्याचा फोन रींग केल्याने तो रीसीव करत लांब जातो.

पिहुचा चेहराच उतरतो..प्रांजल पिहुकडे बघते...दि ..जेवायला आणते...

पिहु काही न बोलता चेअर वर जाऊन बसते.प्रांजल पिहुला भरवत होती...दि,तुला राग आला जीजुचा..

पिहु हसत..नाही गं राग काय त्यात मला माहित आहे मोठे असल्यामुळे गेस्ट बरोबर त्यांना पण बसाव लागतं ..आणि हे काय नविन नाही माझ्यासाठी..सगळ ते एकटेच हँन्डल करतात फंक्शन मध्ये त्यांची धावपळ चालु असते त्यांना सगळ परफेक्ट लागतं कधी कधी वाईट वाटत कोणीच अस साथ देणार नाही त्यांना..ती बोलायच थांबुन विचारात पडते..(विराट किती आतुन एकटा असेल ..कधी कोणाबद्दल वाईट तिने त्याच्या तोंडुन ऐकलेच नव्हते...सगळ्यांनासाठी काहीतरी करतच राहतो..)

रात्री सगळे रुममध्ये जातात...पिहु विराट ची वाट बघत गॅलेरीत थांबली होती...तो स्टाफशी बोलताना तिला दिसत होता...बारा वाजले तरी तो रुममध्ये आला नव्हता...पिहु पण वाट बघुन झोपुन गेली.‌थोडयावेळाने विराट रुममध्ये आला...पिहुला झोपलेले बघुन त्याचा मुडच ऑफ झाला...दुपारपासून त्याला नीट बोलताच आलं नाही....कसे गैरसमज दुर होणार तो स्वतःशीच बोलत फ्रेश होऊन तिच्याशेजारी झोपला...तिचा शांत चेहरा...खुप दिवसांनी दोघे एकत्र झोपत होते. ती जवळ आहे हेच खुप होत,त्याची दिवसभराची ओढाताण कमी करण्यासाठी तो तिच्या हळुच चेहरयावरुन हात फिरवुन कपाळाला अलगद ओठ टेकवुन शांत डोळे झाकुन झोपला..

सकाळी पिहुला जाग आली ,तर विराट पालथा झोपला होता एक हात तिच्या अंगावर होता.पिहुला आधीचे दिवस आठवुन हसू आले..नकळत ती तिचा हात त्याच्या केसांमधुन फिरवु लागली...त्याने अलगद डोळे उघडून तिच्याकडे बघितलं

पिहु घाबरुन पटकन हात काढते...विराट गालात हसत तिला हाताने अजुन जवळ ओढतो..गुड मॉर्निंग तो आळसवलेल्या आवाजात म्हणतो...

पिहु काही न बोलता उठण्याचा प्रयत्न करु लागली त्याने परत तिला,ओढलं ..झोप ना तो डोळे झाकुन बोलला‌...

अ..हहह..सकाळ झाली आहे...

हो गं माझी चिमणी,सकाळ झाली ,माहीत आहे..पण झोप ना तो सरळ होत तिला कुशीत घेतो...

अ....हे काय माझ नाव पिहु आहे...

विराट डोळे झाकुनच हसत हो गं ...पिहूच आहे तू ...पण तुझा आवाज चिमणी सारखाच आहे ना😘 चिऊ चिऊ गोड बोलते.कानाला कुठलही तरी संगीत वाजल्यासारख वाटतं..

पिहु लाजुन लाल झाली होती..तिला काय बोलाव कळतच नव्हतं..ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न क‌रत.....‌ तुम्ही झोपा...

ती पुढच बोलणार कि तो तिच्या ओठांवर बोट ठेवतो...शुssss किती चुळबुळ करतेस ..झोप ना थोड्यावेळ फक्त थ्री डेज आहेस ना माझ्यासोबत त्यात दिवस भर मला वेळ मिळत नाही..तो तिच्या डोळ्यात आरपार बघत बोलत होता...प्लिज ना, तो विनवण्याच्या स्वरात बोलतो.

पिहु ही शांत होत डोळे झाकुन त्याच्या कुशीत शांत पडली...विराट ने डोळे झाकले...नऊच्या आसपास पिहुला जाग येते.विराट ची पकड लुझ,झाल्याने ती हळुच त्याच्या कुशीतुन बाहेर येऊन पटकन आवरते...विराटच बोलण तिच्या वर जादु करत होते...तोच ग्लो तिच्या चेहरयावर दिसत होता...ती एक नजर विराट वर टाकून खाली जाते...सगळे ब्रेकफास्ट करण्यासाठी आलेच होते...

पिहु दहा वाजले ही वेळ आहे का येण्याची रोहिणी चिडुनचं बोलते‌

पिहु बोलणार कि ,सुमन जवळ आल्या ..ताई रात्री उशीर झाला असेल झोपायला...आणि गेस्ट अजुन कुठे आलेत ...

हो पण..

ताई प्लिज ...पिहु जा ब्रेकफास्ट करुन घे.पिहु निघून जाते...

पिहु काय म्हणत होत्या रोहिणी ताई,रेवती जवळ येऊन बोलतात.

काही नाही गं. असच...तु ब्रेकफास्ट केला का...

हो केला ,विराट कुठे अजुन आला नाही का..

ते झोपलेत रात्री उशीर झाला यायला..

हम्म,

थोडयावेळाने विराट आवरुन खाली येतो..

आजचा दिवस पण दोघांना बोलायला वेळ भेटत नाही . हे अस होणार विराटला माहित होते..पण तो ही मजबुर होता..मेन लग्न होते...आता सध्या त्याच्यासाठी ,

रात्री पिहु आणि तिची आई गप्पा मारत बसल्या होत्या. पिहु विराट च आणि तुझ काही मोठ भांडण झालं आहे का...

पिहु दचकुन बघते...नाही..ग...ते...ती नजर इकडे तिकडे बघत बोलते‌...

ठिक आहे मी विचारणार नाही...पण अस आतून स्वतःला त्रास देऊ नको तुला जर रस्ता सापडत नसेल तर‌ तु बोलु शकते बाळा... आणि आम्हाला त्रास होईल हा डोक्यातुन विचार काढुन टाक ...आमच्यासाठी तु म्हत्तावाची आहे तु आतुन ‌खुश असेल तर आम्ही...रेवती डोक्यावरुन हात फिरवत बोलतात.

पिहुचे डोळे पाणवले..रेवती तिचे डोळे पुसुन कपाळावर ओठ टेकवतात...दार उघडल्याने दोघी दाराकडे बघतात.

विराट आत येत-सॉरी मला माहित नव्हतं..

मी चालले होते...रेवती हसत निघून जातात.

पिहु त्याच्याकडे बघून गॅलेरीत जाऊन उभी राहते...विराट फ्रेश होऊन गॅलेरीत ‌येऊन तिच्या शेजारी ‌येऊन थांबतो...

गार वारा ‌सुटला होता..पाऊस पडुन गेला होता...छान वातवरण होते...विराट ने पिहूच्या हातावर हात ठेवला...तशी पिहू तिच्या विचारातून बाहेर आली.

काय विचार करत होती...

पिहु मानेनेच काही नाही म्हणते...

विराट गालात हसतो.तिचा हात पकडुन सोफ्यावर बसतो.

काय झालं,तो तिचा चेहरा स्वतःकडे वळवत म्हणतो...

पिहु नजर वर करुन त्याच्याकडे बघते...काही नाही,तुम्ही खरच प्रेम करतायेत का आईंना ,लोकांना दाखवण्यासाठी करतायेत कळत नाही.

विराट हसतो..तुला माझ्याबद्दल काहीच फिलींग नाहीयेत का ...

ते माझ्या प्रश्नाच उत्तर नाहीये..

तुझ सांग माझ्या बद्दल तुला काय वाटते...

काहीच वाटत‌ नाही मला प्रेम वैगेर मला काही कळत नाही...तुम्ही हे अचानक म्हणतायेत ... आधी माझा चेहरा पण बघत नव्हते...मी बोलले कि दोन शब्द बोलत होते..अचानक ऐवढ कोण बोलु शकतो...प्रेम काय एका दिवसात होत नसते.पिहु बोलुन उठते

विराट ती बोलत असतानाच तिला ओढुन अंगावर घेतो..पिहु त्याच्या अंगावर जाऊन आदळते..पिहु गोंधळुन त्याच्याकडे बघते...अस अचानकपणे केल्याने तिला काहीच सूचत नाही.

विराट तिच्या डोळ्यात आरपार बघत ,तिचे केस पूढे आलेले अलगद बाजुला करून कानामागे सारतो..पिहु,त्याच्या स्पर्शाने मोहरुन अलगद डोळे उघडझाप‌ करते..ती स्वतःला सावरत स‌ूटण्याचा प्रयत्न करत होती...

त्याने तिला मांडीवर बसवून तिच्या कमरेला हाताचा विळखा घालुन घट्ट पकडलं ..

घाबरुन पिहुच्या तोंडुन आवाज निघत नव्हता..त्याने केस बाजुला घेऊन तिला मागे घेतले. .पिहु माझ्या स्पर्शात कधी वात्सना जाणवली तुला...

पिहु डोळे उघडून मान फिरवुन त्याच्याकडे बघते...

हहह..बोल तु इतक्या दिवस माझ्याबरोबर राहीली तुला कधी मी अनकंर्फट होईल असा वागलोय का, तु एक मूलगी आह‌े स्पर्शावरुन कळते तुला मग माझ्या स्पर्शात तुला कधी जाणवले का,

पिहु मानेनेच नाही म्हणते..

मग,तुला अस का वाटते मी लोकांसाठी तुझ्याबरोबर राहतो.तु माझ खर प्रेम आहे...तु आत्ता कनफ्युज आहेस पण तू सुध्दा माझ्याशिवाय राहू शकत नाही तु ही माझ्यावर‌ प्रेम करते पण तु मानायला तयार नाही...

मी नाही करत,ती हळुच म्हणत दुसरीकडे बघते...

तो गालात हसत तिच डोक त्याच्या छातीवर ठेवतो...हे हृद्याचे ठोक आहेत ना फक्त तुझ्यासाठी धडधड करतात...पिहु पण डोळे झाकुन त्याची हृद्याची धडधड ऐकत होती...ती आता रीलॅक्स होत पाय जवळ घेऊन त्याच्या टीशर्ट बरोबर ‌खेळत त्याच्या कुशीत शांत विचार करत बसली.

.दोघे काही न बोलुन शांत‌ एकमेकांचा सहवास अनु्भवत होते.

दिल का दरिया बह ही गया
इश्क़ इबादत बन ही गया
खुद को मुझे तू सौंप दे
मेरी ज़रूरत तू बन गया

बात दिल की नज़रों ने की
सच कह रहा, तेरी क़सम

तेरे बिन अब ना लेंगे एक भी दम
तुझे कितना चाहने लगे हम
तेरे बिन अब ना लेंगे एक भी दम
तुझे कितना चाहने लगे हम
तेरे साथ हो जाएँगे ख़तम
तुझे कितना चाहने लगे हम

बात दिल की नज़रों ने की
सच कह रहा, तेरी क़सम

तेरे बिन अब ना लेंगे एक भी दम
तुझे कितना चाहने लगे हम
तेरे साथ हो जाएँगे ख़तम
तुझे कितना चाहने लगे हम
तुझे कितना चाहने लगे हम

इस जगह आ गई चाहतें अब मेरी
छीन लूँगा तुम्हें सारी दुनिया से ही
तेरे इश्क़ पे, हाँ, हक़ मेरा ही तो है
कह दिया है ये मैंने मेरे रब से भी

जिस रास्ते तू ना मिले
उसपे ना हो मेरे कदम

तेरे बिन अब ना लेंगे एक भी दम
तुझे कितना चाहने लगे हम
तेरे साथ हो जाएँगे ख़तम
तुझे कितना चाहने लगे हम
तुझे कितना चाहने लगे हम

तुझे कितना चाहने लगे हम

थोड्यावेळाने पावसाचा वेग वाढल्याने विराट डोळे उघडून तिच्याकडे बघतो..पिहुला झोप लागली होती...विराट हसत तिचे केस मागे घेतो...अशी बिनधास्त माझ्या कुशीत झोपली आहेस ,तुला विश्वास आहे मी माझी लिमीट क्रास करणार नाही..माझी काळजी करते सारखी .... ह्यालाच प्रेम म्हणतात वेडाबाई...तो तिच्या नाकाला टच करत बोलतो...पिहु थंडीने अजुन त्याला बिलगुन झोपते.

विराट हळुच उठुन तिला बेडवर झोपवतो...पिहुने त्याचा अंगाला हाताचा विळखा घट्ट केला होता..तो,ही़ हात न काढता तीच्या शेजारी झोपतो‌‌‌‌..पिहु‌ लगेच डोक छातीवर ठेवुन झो‌पते...विराट ही ब्लँकेट ओढुन घेतो..

सकळी सगळ्यांची धावपळच चालु होती...दुपारच लग्न असल्याने खुप गोंधळ उडाला होता..परत मुंबई़ला दिपाच्या सासरी रात्री रीसेप्शन होतं.

पिहुला मेकअप आर्टीस्ट तयार करुन नुकतीच ती बाहेर गेली...विराट बाहेर आल्यावर त्याच आवर‌‌याला आत आला..
दोन मिनीट तो पिहुला बघुन हँगच झाला...पायनॅपल यलो जरी वर्कचा लेहंगा त्यावर मेलन ऑरेंज कलरचा ब्लाऊज मीन्ट ग्रीन कलरचा नेटचा दुपट्टा घातला होता..गळ्यात नेकलेस ,मंगळसुत्र केस मोकळे सोडुन सेट केले होते...कानात मोठे इंरीयंग मेकअप तिला जसा सुट होईल तसा...हातात त्याच कलरच्या बंगड्या ती तिच्यात गुंग होऊन खाली बघुन तिच आवरत होती..

विराट हळु हळु तिच्या जवळ आला..पिहुला चाहुल लागताच तिने नजर वर करुन मिर‌र मधुन त्याच्याकडे बघितलं..त्याची नजर तिच्यावरच खिळली होती...तिने लगेच नजर दूसरीकडे वळवली.तो मागुन झुकुन तिच्याकडे बघुन गालात हसला.

पिहु लाजुन लाला झाली होती‌.त्याच अस हसण ‌खुप काही बोलुन गेलं होतो..तो ड्रेसिंग टेबलाच्या कोपरयावर बसत तिच्याकडे बघु लागला..

रेडी नाही झालात अ‌जून ...ती नजर देत बोलली.‌

तो हसत मानेनेच नाही म्हणतो..

मग जावा ना ,तिला त्याच बघण छळत होेते.ती वैतागुनच बोलली..

त्याने तिच्या कमेरला धरून स्वतःकडे खेचलं,ती दुपट्टा घालत होती,तर तो खाली पडला तिने आधारासाठी तिच्या शोल्डरवर हात ठेवले. शहारुन गेली होती.तिच हृद्य धडधडु लागलं त्याने एक नजर तिच्या वर टाकत एक हात ‌अलगद तिच्या पोटावरुन फिरवत मागे घेत होता...पिहुने तिचे डोळे घट्ठ मिटुन त्याच्या शोल्डर हात घट्ठ रोवले..त्याचा स्पर्श तिला काहीच सुधारु देत नव्हता. अंगावर गोड शहरा येत होता.त्याने तिच्या मेखल्याचे हळुच हुक काढुन तिचा कमरेचा मेखला काढला...

अ...हो...तिच्या तोंडुन एवढच निघालं...तिला पुढे बोलता सुध्दा येत नव्हतं.पुर्ण अंगाला सरकन काटा आला होता.

त्याने पॉकेट मधुन एक पाऊच काढलं त्च्यसाठी कमरबंध आणला होता.. नाजूक चैन आणि त्याला गॅप गॅप ने छोटे छोटे घुंगुरु लावले होते...तिचे डोळे बंदच होते..त्याने ते तिच्या कमेरला घातले..पिहुला जाणवताच तिने डोळे उघडुन खाली बघितलं.

तो गालात हसत उभा राहून तिला मिठीत घेतलं.पिहूने तिचे हात त्याच्या छातीवर ठेवले.

दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते...आवडलं...तो गालात हसत तिला विचारु लागला..

पिहु लाजून गालात हसत मानेनेच हो बोलली..

दार नॉक झाल्याने पिहु गोंधळुन त्याच्याकडे एकदा दाराकडे बघु लागली...

दी झालं का,मी खाली चालले ...प्रांजल दार वाजवतच बोलु लागली‌.

पिहु बोलणार कि विराट ने तिच्या तोंडावर हात ठेवला...पिहु डोळे उचंवुन त्याच्याकडे बघु लागली..

प्रांजू तुझी दी नाहीये,खाली गेली...तो पिहुला डोळा मारतच बोलु लागला‌‌..

पिहु रागाने बघु लागली..

हो का मला बोलली जाताना आवाज दे ठिक ये प्रांजल एकटीच बडबडत निघुन गेली.

विराट ने तिच्या तोंडावरुन हात काढला..

तुम्ही खोट का बोलला ती चिडुन त्याचा कमरेभोवती चा हात काढत बोलली...

त्याने अजुन घट्ट पकडुन तिला जवळ ओढले...मी गिफ्ट दिलं मग रीटर्न गिफ्ट हवं मला तो तिच्या ओठांजवळ जात बोलला‌..

पिहु ने त्याच्या छातीवरच्या हाताने त्याला मागे केलं‌..अ...नाही नाही..मला नको तुमच गिफ्ट ती गोंधळुन बोलु लागली..

अस कस आता दिलं आहे .त्याने तिला अजुन जवळ ओढलं

तिने लगेच चेहरा फिरवला‌ .म....ला नकोय‌ काही सगळे वाट बघत असतील,तूम्ही पण आवरलं नाही अजुन ती घाबरून सुटण्याचा प्रयत्न करु लागली‌..

तेच ना,टाईम वेस्ट करतेय मला अजून रेडी होयच तुला सगळे शोधत आहे...बघ आता मी तर किस मिळाल्याशिवाय तुला सोडणार नाही..तो तिच्या हळुच कानात येऊन बोलला‌‌

किस .... नाव ऐकून पिहूचे डोळेच ताट झाले अ...मी,ती आवंढा गिळत बोलते...

तो हसत तिच्या कडे बघतो...मानेनेच हो बोलतो..त्याने त्याचा गाल तिच्या समोर केला..हहह.लवकर,

पिहु जायच ना, ती अजुन शॉक होऊन त्याच्याकडेच बघत होती..म्हूणन तो बोलली...

हहह..हो...हो..ती घाबरुन पटकन त्याच्या गालावर हलके ओठ ठेकवुन बाजुला होते..विराटला तिचा तेवढाच स्पर्श पुर्ण अंगाव‌र रोमांच भरून भरुन वाहत होता...तो गालात हसत तिच्याकडे बघतो..

हहह‌ झालं सोडा...आता...ती घाबरली ही होती...ते‌ तिच्या चेहरयावरुन दिसत होते...त्याने दोन्ही हातांनी तिच‌ा चेहरा ओंजळीत घेतला...पिहुने डोळे बंद ‌करुन ओठ आत घेतले..

विराटला तिच वागण बघुन हसु येत होते...त्याने ऐका हाताने तिची कपाळावरची बिंदी बाजुला करत तिथे ओठ टेकवले.त्याच्या मायेच्या स्पर्शाने पिहु पुर्ण पणे शांत झाली... त्याने परत तिची बिंदी नीट केली..कपाळाला कपाळ टेकवून पिहु ‌येणार आहेस माझ्याबरोबर आपल घर,तुझी रूम वाट बघत आहे..पिहु नजर वर करून एकटक त्याच्याकडेच बघत होती...

ती काहीच बोलली नाही त्यातच त्याला उत्तर कळालं..तो हलका हसला.आणि तिला सोडुन आवरायला गेला...

पिहु ला काहीच कळेना काय म्हणु एक मन त्याच्याकडे ओढलं जाते..तर‌ एक मन तो परत आपल्याला अस बोलला तर ते सहन होईल का,तिचा मनाचा गोंधळ उडाला होता.

पिहुचा फोन वाजल्याने ती विचारातून बाहेर पडली.फोन उचलतच ती बाहेर गेली...

अक्षदाची वेळ झाली होती...लग्न सोहळा पार पडला

विराट गेस्ट शी बोलत होता ..त्याचा फोन वाजला,देवेशचा फोन आता तो विचा‌र‌ करतच उचलुन बोलु लागला‌...विराट बोलणार कि देवेश बोलला..

विराट..विराट..तो घाबरतच बोलु लागला...

देवेश काय झालं आणि तु घाबरला का आहेस..

विराट..त्रिशा...

त्रिशा काय ,

त्रिशा माझ्या लॉकरमधून गन घेऊन गेली आहे..तो घाबरुनच बोलू लागला...

वॉट?‌‌‌‌??? कस काय कुठे गेली..विराट पॅनिक होतच बोलु लागला...

मला ही माहित नाही,कधी काढली तिने , ती खूप दिवस डीस्टर्ब होती...तुला कळतयं ना,मी कोणाबद्दल बोलतोय...मी ही निघलो तिचा नंबर ट्रेस केला आहे ती लोणावळ्यात आहे..

देवेश....आय विल किल यु...विराट जोरातच ओरडला...

ति‌थे असणारे विराट कडेच बघु लागले..

सुमन घाबरुन त्याच्याजवळ येते...विराट...विराट काय झालं ,

विराट एक नजर मॉमकडे बघतो....आणि सगळी कडे नजर फिरवून बघतो पिहु दिसत नव्हती...त्याच फक्त हृद्य बंद‌ पडा‌‌यच बाकी होतं एवढा तो आतुन घाबरला होता..

विराट, काय झालं सुमन ने त्याला हलवलं ..

मॉ...म,पि....हु...कुठे त्याच्या घश्याला कोरड पडली होती...बोलातच येत नव्हते...

पिहु,असेल ना, इथेच होती आत्ता ...काय झालं..

मी आलो च अस म्हणून तो पिहुला शोधु लागला‌.

त्याने पटकन तिला फोनं लावला..रिंग जात होती..पिहूने फोन उचलला ...

विराट रीलॅक्स होत...चेहरयावरुन हात फिरवत .पिहु कुठे आहेस तु..

त्रिशाचा आवतार ,हातात गन बघून तिच्या तोंडुन आवाजच फुटत नव्हता...

तिचा आवाज येत नसल्याने तो रीलॅक्स झालेला परत घाबरुन बोलतो...पिहु तु कुठे आहे..कोण आहे बरोबर..‌

त्रि.....शा...ती एकच शब्द कंठ तोडुन बोलली.

त्याच्या पायाखालची जमीनच सरकली..

क्रमश:


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED