दोघे खोलीत जातात...रणजीत शांतच होता.. पन राधा घाबरतच आत आली...रणजीत जाउन पटकन फ्रेश होऊन आला...राधा बेडवर बसली होती..रणजीतही आला आणि तिच्या शेजारी बसला.....
रणजीत__ राधा मला आता सगळ खर सांगायचं...का त्या निशांतने तुला मीठी मारली...का लव्ह यू बोला...??? तू त्यांला ओळखतेस अशी का उभी होतीस??? नक्की काय आहे हे??
राधा थोड़ शांत होऊन मग रणजीतला सगळ खर सांगायचं ठरवते...
राधा__ रणजीत ते तर सांगेन पन तुला माझां पास्ट आधी सांगते...ऐक....
राधा रणजीतला सगळ सांगते....नकळत तिचे डोळे पाणावतात...कितीतरी वर्ष जे दुःख मनात साठल होत ते आज अश्रुच्या रूपातुन बाहेर निघत होते...पण रणजीतला आतून वाटत होत की,हे लग्न तिला करायचा नव्हतं पन करण भाग असत म्हणून तिने केलाय का???... आपण तिच्याशी लग्नाआधी बोलायला हव होत का?? ही गोष्ट त्याला आतून टोचत होती...पण तो तस दाखवत नाही...
रणजीत__ म्हणजे निशांत तोच मुलगा आहे.. आणि मग मीठी का मारली तुला..?
****************************
Flashback....(छोटुसाच आहे हं😅...)
राधा नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये आली...तिला आलेले पाहून सगळे आनंदी झाले...महिन्याभरानी आली होती ना..मग राधा जाउन तिच्या केबिनमध्ये बसली...तेवढ्यात एक केस आली...राधा बघायला गेली तर नियती होती...आणि ती कळवळत होती...
राधा__ निशांत काय झाल नियती ला...
निशांत__ तिच्या पोटात दुखायला लागल अग..तरी मी तिला काहीच काम नही करू दिल...आई पन आले माझी घरी आहे ती....प्लीज तू बग न😢
रमेश लवकर ये..वनिता सिस्टर...नेहा...लवकर या...
राधा नियतीला इंजेक्शन देते तीच चेकअप करते...ती शांत होते...मग केबिनमध्ये निशांतला बोलवते आणि तिची काळजी घ्यायला सांगते..
निशांत__ थैंक्यू राधा...तू खरच ग्रेट आहेस...अग मी जे तुझ्याशी वागलो...तरी ही तू माझ चांगल करतेस...खरच मी खुप मोठी चूक केली तुला सोडून...तुला मी खुप नालायक वाटत असेल पण कारण तशी होती ग....😢😭
निशांत__ आज सांगतो ऐक...जेव्हा मी एक्साम झाली आणि गावी गेलो तेव्हा तिकडे सगळे ठीक होते माई पन ठीक होती...तिकडे गेलो तेव्हा समजल की मला गावी बोलवण्यासाठी हे सगळ खोट बोलल गेल होत..घरच्यानी माझ्या साखरपुडयाचा विषय काढला तेव्हा मी आंपल्या विषयी सांगितले पण त्याना लव्ह मैरिज मान्य नव्हते....मी त्याच टेंशन मध्ये होतो म्हणून तुझ्याशी नीट बोलात नवहतो...तेव्हा नियतीच स्थळ आल तस आमच्यात लवकर लग्न करतात पण इतका ही लवकर नाही..तरीही आपल समजल त्यानंतर घरच्याना वाटल मी पळून गेलो तर..म्हणून रिजल्ट लागला आणि माझ अन नियतीच लग्न लावल....मग मी सुद्धा चांगल्या कंपनीमध्ये अप्लाय केले..जॉब भेटला तेव्हा काही महीने कोल्हापुरला होतो मग ट्रांसफर इथे झाल...राधा मी दबावाखाली केल ग सगळ पण तुझी आठवण,प्रेम अजुन मनात आहे ग....पण विसरलो मी सगळ नीयतीमुळे...सॉरी राधा😭😭😭
राधाला हे सगळ एकूण कसतरी वाटल...आपण का निशांतला दोष देत होतो अस वाटल...नशीब किती वाइट असते ना,आपल्याला हव तस कधीच होत नाही...
राधा__ प्लीज...आता ते सोड...तू शांत हो...निशांत आपल एक होण भाग्यात नव्हतं म्हणून अस झाल...प्लीज तू आता नियतीला जप..तिची कंडीशन आता खुप नाजुक आहे...आणि ती खरच स्वभावाने खुप चांगली आहे.....(रडत).मला विसर यात चांगल आहे तुझ णी माझ ही😭
राधा त्यांला धीर देण्यासाठी उठली आणि त्याच्या जवळ जाऊ लागली....तेवढ्यात निशांतने तिला मीठी मारली...तिच्यासाठी त्याची मीठी अनपेक्षित होती...म्हणून ती तशीच उभी राहिली...मग रणजीत तिकडे आला....
******************************
राधा__ खरच रे मी फक्त त्यांला धीर देत होते...त्यांनी मला मीठी मारली हे पन समजल नाही...तो काय बोला हे पन नाही समजल....तू आलास तेव्हा मी भानावर आले...😢
रणजीत__ हो..सॉरी राधा मी सगळ माहित नव्हतं तरी तुझ्यावर चिडलो...तुझ एकूण घ्यायला हव होत मी...
राधा__ ईट्स ओके तुझी काही चूक नाही...
रणजीत__ हम्म..आता तू रड़न थांबव...शांत हो..र र राधा...
राधाने नकळत त्यांला मीठी मारली...अन रडू लागली...ही त्यांची पहिली मीठी होती...रणजीतने ही नकळत तिला मिठित घेतला...पहिला स्पर्शच वेगळा असतो नाही का...ती जवळ येताच रणजीतच हृदय पुन्हा धड़धड़ करू लागल...तीच्या डोळ्यांतील अश्रु पाहून त्याचेही डोळे पानावले...असच होत ना..आपला जोड़ीदार रडत असेल तर आंपल्या डोळ्यातही पाणी येत...याच कारण आपल त्याच्यावरील प्रेम असते...
काहीवेळाने राधा रणजीतपासून दूर होते...सुरुवातीला दोघ थोड़े लाजतात...मग एकमेकांना गुड़ नाइट बोलून झोपी जातात....
******************************
सकाळी राधा आणि रणजीत नेहमी प्रमाणे त्यांच आवरत असतात...राधा मात्र आधिपेक्षा खुप शांत झाली होती...जास्त बोलात ही नव्हती...रणजीत ही तिच्याबद्दल विचार करत त्याच आवरत होता...
रणजीत__ राधाच्या मनात किती दुःख होत...बिचारी..नशीब पण कस असत ना...प्रेम ज्याच्यावर आपण करतो तो आपल्याला भेटत नाही आणि ज्याच्यावर प्रेम नसत तोच नेमका आंपल्या आयुष्यात कसा येतो..नियतीचे खेळ खरच अजीब असतात...आणि आमच्या लग्नाला फक्त २-३ महीने झालेत तरी मला राधाची सवय झाली...खरच झाली का??? कुणास ठाऊक हृदय कधी कुठे आणि कोणामध्ये गुंतेल सांगता नाही येत....माझ ही गुंतल होत...(डोळे बंद करून)...सोना....
राधा__(मागून येऊन)....काही बोलास का..?
रणजीत__ (पटकन डोळे उघडून)....आआ नन नाही...आ काय झाल चालीस का हॉस्पिटलले..
राधा__ हो निघालेच आहे आता...आ तू सोडशील का मला....
****************************
दोघेही कारमध्ये बसून निघुन जातात...मग रणजीत राधाला हॉस्पिटल जवळ सोडतो....
रणजीत__ हम्म...आ राधा...एक मिनिट......(आवाज देऊन).....शिवा..बाहेर ये जरा...
शिवा__ हा रणजीत साहेब बोला ना...
रणजीत__ शिवा आजपासून तू राधसोबत राहायच..तिला सेफली हॉस्पिटलमधुन घरी आनायच आणि घरून हॉस्पिटलमध्ये सोडायच...आणि इथेच थांबयच ठीके...
रणजीत__ राधा अग असुदे..आणि शिवा मी आता गाड़ी घेऊन जातो...उदयापासुन तू राधासोबत ये आणि आ...माझ्यासोबत उद्यापासन संतोषला पाठव ह्म्म्म...
शिवा__ ओके रणजीत साहेब चालेल...मी तस सांगतो संतोषला....आणि आज राधा मॅडम जवळ थांबतो..
रणजीत__ हो चालेल....चल राधा..मी निघतो हम्म्म्म
राधा__ ओके..Thanks again....bye
पुढचा काही एकूण न घेता राधा हॉस्पिटलमध्ये निघुन जाते...रणजीतला ही समजत की राधा खुप उदास झालेय कालच्या सगल्यामुळे...मग काहीवेळाने रणजीतही त्याच्या ऑफिसला निघुन जातो....
*********************************
सुमन__ माधवी ताई...आहो तारीख किती आजची....
माधवी__ आआ...४ ऑगस्ट....का ग..?
सुमन__ आहो...उद्या आंपल्या राधाचा वाढदिवस नाही का...लग्नानंतर पहिला वाढदिवस तिचा...
रम्या__ काय सांगताय काकू...बर झाल तुम्हला लक्षात आहे ते....मग उद्या मस्त प्लान करूया...जीत आणि राहुल आले की ठरवू...
माधवी__ हो...किती वर्षाची होइल ग उद्या राधा...?
सुमन__ आ...राधाला..२५ वर्ष पूर्ण होतील...
रुता__ मम्मा राधा काकुचा उद्या बड़े आहे...
रुता__ मग मी काकूसाठी ग्रीटिंग बनवते...
माधवी__ सुमन आपला रणजीत २८ वर्षाचा ना...आणि राधा २५..
सुमन__ हो ताई का काय झाल?
माधवी__ काही नाही ग....आताची मूल बग ना त्यांच्यात फक्त २,३ वर्षाच अंतर असत आंपल्या काळात तस नव्हतं बाई....
रम्या__ आई,काकू किती वर्षाचा फरक आहे हो तुम्हच्यात...
सुमन__ अग माझ्यात आणि यांच्यात ८ वर्षाच अंतर आहे...
माधवी__ आणि आमच्यात १० वर्षाचा...हो पन या वयाच्या अंतरामुळे आम्हाला कधी काही अड़चन नाही जानवली...आम्ही खुप खुश आहोत नाही का....
सुमन__ हो खरच...
माधवी__ बर रात्री सगळे आले की मस्त प्लान करू...आणि गिफ्ट्स पण ठरवू....
सुमन__ हो...
रम्या__ हो हो...
*************************************
रणजीत रात्री घरी येतो...सगळे खाली बसले होते...राधा तिच्या खोलीत होती..राधा या सगळ्यांमध्ये तिचा वाढदिवस उद्या आहे हेच विसरली होती....
सुमन__ अरे जीत तुझ्या लक्षात नाही का उद्या राधाचा वाढदिवस आहे....
राहुल__ मग मी काय म्हणतो राधासाठी पार्टी प्लान करूया...सरप्राइज पार्टी...ह
रेवा__ अरे भारी गोष्ट तर ही आहे की राधा वहिनी उद्या तिचा वाढदिवस आहे हेच विसरले😃
रेवा__ अरे मगाशी मी तिच्या खोलीत गेले होते तेव्हा समजल...मी कितीवेळा बोले तिच्यासमोर पन कामामुळे कदाचित तीं विसरलेच...
रम्या__ हे बर झाल....नाही का..
रणजीत__ बर ऐका...मी विनय आणि राधाच्या ग्रूपला सांगतो ते आपल्याला हेल्प करतील ओके..आणि आई बाबा तुम्ही राधाच्या घरी सांगा की कोणीही विश करायला कॉल नाही करायचा तिला....आणि तिच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा कोणाला माहित नसनारच तिच्या वाढदिवसाच आणि तिचा सोबतचा डॉक्टर तर जरा बाहेर आहेत सो काही प्रॉब्लम नाही....
महेश__ चालेल...आणि हे बर आहे...बर जा तू आधी चेंज कर आमच जेवून झाल आहे...तू ये मग आपण प्लान करू..
रणजीत रूममध्ये जातो तर राधा गाड़ झोपली होती....मग तो हळूच आत जातो अन सगळ आवरतो....आणि मग खाली जाउन प्लान करतो...रणजीत राधाच्या ग्रूपला आणि विनयला पन मदतीला घेतो....सगळे मिळून मस्त सरप्राइज प्लान करतात...आणि ठरल्याप्रमाणे सगळे तसच वागणार असतात.....
*************************************
रात्री जास्त जागल्यामुळे रणजीत सकाळी उशीराच उठतो..आणि आज घरातील सगळ्यानी ऑफिसला न जाण्याच ठरवल होतच...राधा सकाळी उठली तीच आवरुन खाली गेली...रणजीत ही उठून सगळ आवरुन खाली गेला...
रणजीत__ गुड़ मॉर्निग....अरे राधा चालीस हॉस्पिटलला...
राधा__ नाही रे...आज घरीच...
रेवा__ अरे नाय😕...म्हणजे का नाही जाणार आज तू वहिनी हॉस्पिटलला..?
राधा__ अग असच माझ्या सुट्टया बाकी होत्या ना सो आज म्हंटल राहुया घरी...आणि अपॉइंटमेंट पण नाही सो...
रणजीत__ तुला पन आजचा दिवस भेटला....☹️
रणजीत__ म्हणजे आआ आजचा दिवस तुला पन भेटला अस...कारण आज मी पन घरी आराम करायच महंत होत..😅....(किंचित हसत)
सुमन__ (इशारे करत)....आता काय करायच जीतू....😕
रणजीत__ (इशारे करत).....तू थांब आम्ही बघतो....दादा...आता काय करायच?
राहुल__(इशारे करून).....आ रूममध्ये जाउन ठरवू....रेवू,रम्या,आई,काका,बाबा रूममध्ये या...
राधाच तेवढ्यात लक्ष जात सगळेजन इशारे करता बोलात होते तिला काही समजेना...
राधा__ काय झाल दादा...काही हवय का...
राहुल__ ननननन नाही..आलो मी आ आई,बाबा,रम्या,रेवा,जीत,काका,जरा माझ्या खोलीत या ना काम आहे...(डोळे मारून)
माधवी__ आलो ह आम्ही...(सुमनच्या कानात बोलात)...तिला बोलनयात गुंतव....
सुमन__हम्म....आ राधा...तू आज दुपारच जेवन करतेस का....
राधा__ हो..चालेल ना काय काय करू...
सुमन__ सांगते मी ये...
सगळे खोलीत जातात आणि राधाला घरा बाहेर कस काढयच ते ठरवायला बसतात...
रणजीत__ दादा काय करायचा...राधा तर आज घरीच थांबली..
राहुल__ हो रे मला पण अपेक्षा नव्हती की राधा आज घरी थांबेल...
रेवा__ भाई,दादू मी काय म्हणते आपण राधा वहिनीला रूममध्ये बंद करून ठेवूया हा हा..😃
रणजीत__ हाड़...काय पण सांगते...😏
सदाशिव__ काहीतरी करून तिला थोडावेळ तरी घरापासून लांब करायला हव...
रेवा__ मग आपण वहिनीला बेशुद्ध करूया का...😃
रणजीत__ (तिच्या डोक्यात मारून)......रेवू काय पण आयडिया देऊ नकोस ह....
सगळे विचार करत बसतात..मग आंपल्या रेवा मॅडमाना अजुन एक आयडिया डोक्यात येते..आणि मग सगळे तसाच करायचा अस ठरवतात....
{मग फ्रेंड्स...बघुया आता पुढे रणजीत आणि सगळे मिळून काय प्लान करतात राधाला कस सरप्राइज देतात....रणजीत अस काय करणार आहे की ज्यामुळे राधाची गेलेली स्माईल परत येईल...सरप्राइज पार्टी करताना काही गड़बड़ तर नाही होणार ना🙄😂..सगळ नेक्स्ट पार्ट मध्ये समजेल...आणि स्मिता,हे कैरेक्टर काही कारणाने मी वगळले आहे सॉरी त्यासाठी...आणि सोना हें नवीन पात्र आता लवकरच येणार आहे....पन तुम्ही असच वाचत रहा आणि मला स्पोर्ट करा...कमेंट्स करा आणि कळवा की तुम्हला कथा कशी वाटली काही चूक आढळली किवा माझ्या कथेबद्दल काही वाटल तर मला मेसेज करून सांगा....Thank uu...!!😊}