ती__आणि__तो... - 17 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

ती__आणि__तो... - 17

भाग__१७


सगळे खोलीतुन बाहेर येतात...एकमेकाकड़े बघतात आणि रेवा प्लानला सुरवात करते....



रेवा__ (तिला मस्का लावत)....राधा वहिनी....मेरी प्यारी वहिनी...मेरी स्वीटहर्ट वहिनी....



रणजीत__ (इशारे करून)....अग मुद्दयावर ये ना....



राधा__ काय झाल रेवू...काही काम आहे का...



रेवा__ आ वहिनी अग उद्या ना माझ्या कॉलेजमध्ये फंक्शन आहे सो मला न्यू ड्रेस घ्यायचा आहे तुझा चॉइस खुप चांगला आहे ना म्हणून तू येतेस का माझ्यासोबत आता...



राधा__ आता...



रणजीत__ हो जा ना ग..(हळूच)....तेवढच काम होइल...



राधा__ आ कसला काम???



रणजीत__ ह रेवूच काम ग...



राधा__ आईना सांगून येते तोवर तू माझी बॅग आन...



रेवू__ हो...



राधा__ (सुमन जवळ येत).....आई...मी



सुमन__ हो बाळा जाउन ये...



रणजीत__ आई....अग पाहिले ऐक तरी तीं काय बोलते.....(खोट हसत)😅😅



राधा__ ह्म्म्म..रेवासोबत जाउन येते आई...



रेवा__ चल वहिनी ..हे घे तुझी बॅग...काकू आलो आम्ही जाउन बाहेर...



सुमन__ ह...नीट जा...



राधा__ आलेच ह ...



रणजीत__ शिवा गाडी काढ़....रेवा आणि राधा येतायत...सेफली घेऊन जा हम्म



शिवा__ ओके साहेब.



त्या दोघी शिवाला घेऊन मॉलकड़े निघुन जातात....जशी वाड्याबाहेर गाडी जाते तस राधाची गैंग,तिच्या घरचे आणि विनय वाड्यात येतात....आणि मग सगळे मिळून सरप्राइज पार्टीची तयारी करतात...



***************************



रेवा राधाला फिरव फिरव फिरवते...उगाच तिचा वेळ घेते..खुप शॉपिंग करते मग संध्याकाळपर्यंत रेवा राधाला घेऊन वाड्यावर येते...तर लाइट बंद होत्या समोरच काही दिसत नव्हतं...शिवा पण मागुनच गायब झाला...राधा बरीच घाबरली...



रेवा__ आ..वहिनी मी तुला रूमजवळ सोडते...सगळे जन कुठेतरी बसले असतील अन लाइटच काय तरी झाल असेल...तू चल वरती.....(तिला पकडून नेत)



राधा__ ह्म्म्म



रेवा राधाला रूममध्ये सोडते...अन निघुन जाते...तेवढ्यात दार बंद होत राधा खुप घाबरते...मग लाइट्स येतात तेव्हा राधा सुटकेचा श्वास घेते...



**************************



बराचवेळनंतर बाहेरुन सुमनचा आवाज येतो...राधाला वाटत सगळे आले...म्हणून ती खोलीबाहेर येते...पण अजूनही बाहेरच्या लाइट्स ऑफ होत्या...राधा घाबरतच खाली उतरते...



राधा__ (घाबरत).....ररर रणजीत....रम्या ताई...दादा..रेवू...आई,बाबा, काका,काकू...कककक कुठे आहात तततत तुम्ही....😢☹️



तेवढ्यात राधाचा पाय कशात तरी अडकतो आणि ती पडणारच की तितक्यात रणजीत तिला सावरतो...आणि लाइट्स ऑन होतात...आणि सगळे एका सुरात बोलतात....



सगळे__ surprise...... Happy Birthday Radha....!!!! 😄



राधाला आनंदाचा धक्काच बसला...तिला काय बोलू कळत नव्हते....समोर आजी,रणजीत,राहुल,रम्या,रेवा,सुमन,सदाशिव,महेश,माधवी,रुता,विनय,तिचे आई,बाबा आणि तिची गैंग ही उभी होती....आणि सगला वाडा खुप छान सजवला होता...ती खुप खुप खुश झाली...राधा पळत मनोहर आणि मालतीकड़े गेली....त्यांना मीठी मारली..



राधा__ आई,बाबा कसे आहात तुम्ही आणि कधी आलात



मनोहर__ फुलपाखरा ग आम्ही मस्त..तुला सरप्राइज द्यायला आलो



मालती__ कशी आहेस राधू...



राधा__ मस्त आई...



सुमन__ मग कस वाटल सरप्राइज..



राधा__ खुप छान आई...आहो मी माझा वाढदिवस विसरले होते....पन तुम्हा सगळ्यांना लक्षात होता खुप छान वाटतंय मला...Thank u...



माधवी__ थैंक्यू काय ग..आम्ही सगळ्यांनी मिळून प्लान केल...



राधा__ हो...आणि तुम्ही गैंग...तुम्ही पन शामिल झालात ना...



जागृती__ काय करणार मॅडम कराव लागत...जर शामिल नसतो झालो तर तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद कसा पाहिला असता...😊



सनम__ हो ना...



पल्लवी__ हो..खुप बर वाटल तुला आनंदी पाहून...



विक्रम__ हो...काय म राधुडे कशी आहेस...



राधा__ (त्यांला मीठी मारून).....मी एकदम मस्त विकुड़ी...खुप मिस केल मी तुला...सर्वानाच..



विक्रम__ हो ना राधू...मी पण यार...



राधाने विक्रमला मीठी मारली हे बघून रणजीतला आतूनच खुप जेलिस फील झाल...ह होणारच ना...🤣अपना खड़ूस बटाटया प्यार में जो पड़ रहा है...😃



रेवा__ चल राधा वहिनी तयार होऊन ये लवकर...तुझ्या खोलीत मस्त ड्रेस ठेवलय...



राधा__ बर जाते....



राधा खोलीत जाते...तिकडे ब्लैक कलरचा लॉन्ग वन पीस होता...राधाने तो वन पीस घातला...त्यावर छोटे कानातले घातले...केस मोकळी सोडली...हातात ब्रेस्लेट घातला...ओठांवर लाल लिपस्टिक लावली...तयारी करून ती खाली आली....रणजीत विनयशी बोलात होता..तर त्याच हृदय धड़धड़ करू लागल...तस त्याने मागे वळून पाहिले...आणि राधाला पाहतच बसला...



विनय__ (त्यांला चिडवत)....भारी दिसतेय ना राधा.....



रणजीत__ हो ना...😍तिला बघून माझ हृदय तर धड़धड़तय यार...



विनय__ ओह....😂😂😂😂🤣



रणजीत__ (भानावर येत).....आआआ बब गग गप्प बस विन्या..😅 ककक काहीही काय...ए मला माधवी काकू बोलावतेय..आलोच ह मी...



विनय__ मला तर आवाज नाही आला...😂



रणजीत__ मला आला...ती बग...ह आलो काकू...



आणि रणजीत तिकडूंन काढता पाय घेतो...मग रेवा राधाला टियारा घालते..मग ती केक कट करते अन सगळ्यांना भरवते...मग राधाला सगळे एक एक करून गिफ्ट्स देतात...खुप फोटोज,सेल्फी काढतात...राधाची गैंग,रेवा,विनय तर रणजीत राधाला चिडवायची एक संधी सोडत नव्हते...त्यासगळ्यांनी मिळून राधा आणि रणजीतचे वेगळ्या वेगळ्या पोजमध्ये अन स्टाइलमध्ये फोटोज काढले...


आज रणजीतसोबत राधाचेही हृदय धड़धड़ करत होते..दोघेही थोड़े लाजतच होते...राधा ही सगळ विसरून गेली अन खुप आनंदी झाली होती..नंतर सगळे आंपल्या पार्टनर सोबत कपल डान्स करतात...रणजीत आणि राधा सुद्धा सगळ्यांच्या हट्टापोटी डान्स करतात....


Oh....शायरों से लफ्ज लेके थोडेसे उधार...

बोलना ये चाहता हु दिल से तुमको यार...

हो रहा था, हो गया है, हलकासा खुमार...

कोई ना रहा है दिल पे अपने जोर...

LOVE ME थोड़ा और...

Let me tell you tonight...

When the stars are shining bright...



रणजीत राधाला जवळ घेतो...आणि तिच्या कमरेभोवती पकडतो...दोघेही एकामेकांच्या डोळ्यांत हरवून जातात...



Love me थोड़ा और...

Just take my hand in your hand...

And then don't you let it go...

Love me थोड़ा और...

All i need is the time...

When I promise that you'll be mine...

Mmmm थोड़ा और...



गाणी बंद होतो...तरीही हे दोघा एकमेकांत हरवून नाचत होते...जनु त्यांना जगाच भानच नाही आहे..दोघेही हळूहळू एकमेकांच्या जवळ येत होते...सगळे त्यांना अस बघून खुश होतात...मग रेवा त्यांच्याजवळ जाते...



रेवा__ (त्यांना हलवून)....भाई...वहिनी...गाण बंद झालाय....



रणजीत आणि राधा रेवाच्या आवजाने भानावर येतात...तसेच दूर होतात...मग सगळे त्यांना अस बघून हसू लागतात....😂😂



रम्या__ काय ग रेवू मस्त रमले होते ते त्यांच्या दुनियेत...कशाला डिस्टर्ब केलास ग त्यांना🤣😂😅



राहुल__ हो ना ग रेवू काय केलास हे😂🤣 मुड़ची वाट लावली नाही का जीत😂



रणजीत__ (खोट हसत)....अस नाही काही😅



राहुल__ मग कस आहे😂



जागृती__ राधुडे काय ग उतरली का नशा😂🤣



राधा__ (फ़टका मारत)....जीरु...गप्प बस हं😳



जागृती__ बर बाई🤣



रणजीत__ (नाटक करत)....आ हैलो..ह बोला न...(बाहेर जात...)



राहुल__ कुठे चालला जीत...



रणजीत__ दादा फोन फोन...अलो..



राहुल__ पण आवाज नाही आला...😅



रणजीत__ आ सायलेंट होता ना अलो....(बाहेर जात)



आणि रणजीत तसाच बाहेर पळ काढतो....😂तसे सगळे हसतात....😂🤣थोड्यावेलाने रणजीत येतो तर सगळे जेवायला बसले होते...पन राहुल मात्र त्याची तिकडेच वाट पाहत होता...



रणजीत__ आ अरे दादा गेला नाहीस जेवायला...



राहुल__ अरे नाही म्हंटल एवढा अर्जनट कॉल तुला आला बघुया तरी कोणाचा होता म्हणून विचारायला थांबलो...😁



रणजीत__ आ बब कॉल ना अरे ते मित्राचा एक जूना मित्र...बाकी काही अर्जनट नाही...



राहुल__ अच्छा कोन मित्र..तुझ्या सगळ्या मित्रांना मी ओळखतो....मग कोन😃



रणजीत__ अरे तो हा...तो नाही का तो...आ ब....(हात करून)......अरे रम्या वहिनी ह आलो....



रणजीत तसाच पळून जातो😂🤣आणि जेवायला बसतो...मग राहुल ही हसतच जेवायला जाउन बसतो...सगळे मस्त हसत गप्पा मारत जेवन करतात..भरलेले घर बघून राधाला खुप छान वाटत होत..ती सगळ विसरून मनमोकळ हसत होती हे पाहून रणजीतही मनोमन खुश झाला...खरच आपल माणूस आणि आपली फॅमिली सोबत असली की कोणतेही विचार मनात येत नाहीत...सर्वात जास्त आनंद तेव्हाच होतो...



पार्टी मस्त झाली राधाच्या घरचे आणि तिची गैंग ही त्यांचा निरोप घेऊन घरी निघाली...विनयसुद्धा त्यांच्या घरी परतला...सगळे दमले होते म्हणून आपापल्या रूममध्ये गेले...राधा आणि रणजीतही त्यांच्या खोलीत गेले....




क्रमशः




©प्रतिक्षा__🌸