रेशमी नाते - 22 Vaishali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रेशमी नाते - 22

पहाटे उठुन पिहुने पुजा केली...देवापुढे दिवा अगरबत्ती करत सुखी संसाराची प्रार्थना केली...

पिहु जा आवरुन ये निघायच आहे.सुधा बोलते...

आत्या आई दिसत नाहीये...

वहीनी थोड्यावेळापुर्वीच निघाल्या पुजेची तयारी करायची ना,तु ही आवर निघायच आहे आपल्याला...

पिहु हो म्हणत रुममध्ये आली ,विराट रुममध्ये नव्हता..ती विचार करत दाराबाहेर बघु लागली....विराट स्टेप्स उतरुन ‌खाली येत होता..

अहो ,ही वेळ आहे का,त्याच्या टीशर्ट ओला होता आत्तापर्यंत तो जिममध्येच होता...म्हणुन ती चिडली.

विराट हसतो..किती घाई हहहं ,मुबंईला जायची...जाणारच आहोत...तु उठली़ मग म‌ला पण जाग आली...आता पुजा तर मला करता येत नाही मग म्हटलं जे काम मला येते तेच कराव अस म्हणत तो जवळ जाणारच किती पिहुने छातीवर हात ठेवला...

आवरा अकरा वाजेपर्यंत पोहचायचे आहे...ती लटक्या रागातच बोलली...

का,इतकी घाई हहह तो लाडात हसत बोलतो...

पुजा आहे घरी...तुमच डोक कुठेही चालते..पिहु नजर चोरत तिच आवरतच बोलते...

विराट ही हसतच आवरायला जातो...तो आत गेल्यावर पिहु स्वतःशीच लाजुन हसत आवरु लागते.

सकाळी सहा- सव्वा सहा वाजता,सगळे आवरुन मुंबईला निघाले.पिहु विराट मानव आणि सोनिया एका कारमध्ये जाणार होते....सोनिया हसत गाडीत बसली तर पिहुच्या चेहरयावर आठ्याच पडल्या..

गुड मॉर्निंग मॅम सोनिया हसत तिला विश करु लागली...पिहु वर वर हसत गुड मॉर्निंग म्हणाली.

विराट मामांशी बोलुन निघुन गाडीत बसला..विराट ला पिहुने एक नजर बघितलं आणि फुगुन बाहेर बघु लागली...

विराटला ही कळालं सोनिया आली म्हणुन फुगली...तो गालात हसत तिच्या कमरेला पकडुन स्वतःजवळ ओढत कानाजवळ येतो...सकाळ सकाळ अशी रुसली तर पुर्ण दिवस बोर‌ जाईल माझा...डिपंल दिसल्याशिवाय माझी मॉर्निंग होणार नाहीये आज पासुन कळलं..तो प्रेमळ भाषेत ऑर्डरच देत असल्यासारखा बोलत होता..‌

पिहु लाजुन एक,नजर टाकुन गालात हसते.

मानव कार चालवणार होता सोनिया ही त्याच्याशेजारी बसली.‌ आणि विराटपिहु मागे बसले होते.

जशी कार चालु झाली विराट तर लॅपटॉप उघडूनच बसला..त्यात सोनियाला का घेतलं हे पिहुला कळालं..तिघजण ऑफिस च डिसकस करत होती..पिहुच्या तर सगळ डोक्याच्यावर चाललं होते.😂पण पर्यात नव्हता..ती मोबाईल बघत बसली..मध्येच ती स्टेटसबघताना मोबाईल चा आवाज वाढला..पिहुने पटकन बंद केला..विराट ने एकनजर‌ टाकत सोनियाकडे बघितलं ...रात्री उशिरा झोपली वरुन पहाटे लवकरच उठली होती..तिला कधी झोपलागली कळलंच नाही..ती विंडोला टेकुन झोपली होती...विराटच लक्ष तिच्याकडे गेलं...तो बोलायच ‌थांबुन लॅपटॉप सोनियाकडे दिला.पिहुच डोक अलगद त्याने त्याच्या मांडीवर घेऊन तिचे पाय वर घेऊन तिला नीट झोपवलं...झोपेत तिचा प्रसन्न चेहरा मनाला मोहक वाटत होता तिच्या चेहरयावरुन हात फिरवु लागला.त्याच लक्ष तिच्या हातांकडे गेले..आत्ता पर्यंत शांत बसून सगळी नेलपेंट काढुन टाकली होती...😆😆ते बघुन विराट गालात हसला.

नऊच्या आसपास पिहुला जाग आली.पिहु डोळे हळुच उघडत उठुन बसली आणि बाहेर बघत विराट कडे बघितलं तो तिचे केस मागे घेतो..झाली झोप...

ती डोळे उघडझाप करत हो बोलते..मला भुक. लागली. सकाळपासुन तिने काहीच घेतल नव्हते.

मानव मिरर मध्ये बघत पिहुकडे नजर टाकतो...पिहु पुढे रेस्टॉरंट आहे तिथे ब्रेकफास्ट करु...पिहु गालात हसत हो म्हणते.

सकाळी तु दुध घेतलं नाही ,ना...विराट नजर रोखुनच विचारतो...

ते...घेणार होते घाईगडबडित विसरले...ती बारीक आवाजात बोलु लागली

हो‌ ना देवाची पुजा,महत्वाची होती ...

पिहु बारीक चेहरा करत त्याच्याकडे बघते ..तो तिचे गाल ओढत जवळ घेतो.

चौघेही रेस्टॉरंटमध्ये थांबुन ब्रेकफास्ट करतात..सकाळचा गारवा अजुन होता...सगळी कडे हिरवळ पसरली होती..आभाळ भरलेले होते..पाऊसाची सर येऊन गेल्यामुळे रस्ते ओले झाले..पुर्ण रोमँटीक वातावरण झाले होते.😍😍विराट तर पिहुचा हातच सोडत नव्हता..

अहो मला चहा हवाय...

काही नाही ,ज्युस पी तीनचार दिवस दगदगझाली आणि काल नीट झोप पण झाली नाही...पहाटे लवकर उठुन बसली आणि आता चहा अॅसीडीटी होईल...नाही.

अहो उलट फ्रेश वाटते...आणि ह्या वातावरणात तर खूप छान फिल होते चहा पिताना😍😍

विराट तिला आवडत असेल तर .मानव बोलतच होता..कि विराट त्याला थांबवतो..‌मानव तिला चहा ने त्रास होतो ...

ओहह...सॉरी,

‌पिहु गाल फुगवुनच ज्युस पिते.

सोनिया मानव बोलत पुढे जातात...चल इथेच बसायच का,विराट चेअर वर उठुन बोलत होता..

पिहु दुसरीकडे चेहरा फिरवते...विराट परत चेअर वर बसतो..पिहु काय झालं तो तिचे हात हातात घेऊन प्रेमाने विचारतो...

पिहु त्याच्याकडे नजर फिरवते...आपण उद्या जाणार‌आहोत हे मला सोडुन सगळ्यांना माहीत आहे ...ती बा‌रीक चेहरा करतच बोलते.एका शब्दाने तुम्ही मला बोलला नाही.

पिहु मी सांगितले होते...आपण डिनरला गेलो होतो..

त्यावर तुम्ही एकदा ही बोलला नाही...

अग मी कामाच्या गडबडीत विसरलो बोलायच...आणि असा किती वेळ मिळत होता आपल्याला बोलायला... तु ही विचारु शकत होती ना...

हहं...पण आता उद्‌या जायच आहे बॅगसुध्दा पॅक नाहीये...ती चिडुन बोलते..

ओहहं अच्छा त्याच टेंशन आलं विराट हसत बोलतो..

अहो,तुम्ही इतक कस रीलॅक्स बोलु शकता..आता घरी गेल्यावर वेळ मिळणार आहे का...रात्री परत फक्शं‌न कस ती पॅनिक होतच बडबड करत होती...

पिहु,ऑलरेडी तुझी आणि माझी पॅकिंग झाली आहे. सो डोन्ट वरी..

पिहु तर शॉक होतच बघते कस काय आय मिन कोण ..केलं...

मी स्वतः केली आहे मला माहित होत‌ लग्नाच्या घाईत जमणार नाहीये् म्हणुन आधीच मी बॅग पॅक करुनच पूण्याला आलो..

माझे कपडे नव्हते घरी मी सगळे घेऊन आले फक्त साड्या होत्या...तुम्ही काय साड्या बॅगेत भरल्या का...पिहु आठ्या पाडतच बोलते..

विराट टेबलावर डोक ठेवुन जोरात हसतो...हो साड्याच भरल्यात..तो तिच्या डोक्यात टपली मारतो..स्टुपिड ..

अहो..तुम्ही काय बोलता ना मला काहीच कळत नाहीये...

अगं किती टेंशन घेते.मी तूझी आणि माझी शॉपिंग केली होती.

माझी साईज कस काय कळली..

ते काय लगेच लक्षात येते...घरी जाऊन बॅग एकदा चेक कर तुझं पर्सनल काही ठेवायच तेवढच ठेव..तुझा हाच मोठा प्राॅब्लेम होता...झाल सॉट ऑऊट

तेव्हा कुुठे पिहु रीलीफ होते...आता निघायच विराट हसत तिचा हात पकडत तिला चेअर वरुन उठवतो..

विराट चा मोबाईल वाजल्याने तो फोनवर बोलत थांबला होता.‌‌पिहु तिथे असणारया मोगरच्या झांडाचा सुंगध घेते दोन -तीन फुल तोडुन हातात घेत सुगंध घेते...

विराट मोबाईल ठेवून तिच्याकडे बघुन हसत जवळ येतो...काय करतेस...

पिहु हसत त्याच्यासमोर फुल धरते...सुगंध किती छान आहे बघा ना...विराट तिचे हातात धरत सुगंध घेतो...वॉव..तो डोळे झाकुन सुगंध अनुभवत म्हणतो...

हो ना,मला खुप आवडतात.

विराट तिच्या खांदयावरुन हात घेत जवळ घेत चालु लागतो‌....पिहु लाजुन नजर ‌खाली घेते.आज हवेत जणु त्याच्या प्रेमाचा सुंगध येत असल्याने जाणवत होते...
.
हं... हं...
हं... थांब ना...
हं... हं...
तू कळू दे, थांब ना...

गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा, सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे, थांब ना
थांब ना, थांब ना

(सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा)
(गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)

हो, गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे, थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा

सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला

हो, सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला
खेळ हा तर कालचा...
खेळ हा तर कालचा, पण आज का वाटे नवा...
कालचा हा खेळ बघ वाटे नवा

(सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा)
(गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)

बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे

हो, बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे
वाटतो आता...
वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा...
उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा...

गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना
हूल कि चाहूल तू, इतके कळू दे थांब ना
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना
तोल माझा सावरू दे थांब ना

(सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा)
(गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)
(सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा)
(गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा)

देशमुख मेन्शनमध्ये कार ऐन्टर होताच पिहू सगळीकडे नजर फिरवत बघते....ती दोन महिन्यांनी घरी आली होती...सोडुन जाताना परत येण्याची आशा तिने ठेवलीच नव्हती...तिच मन भरुन आले होते..विराट खाली उतरुन तिच्या साईडचा डोर ओपन करुन तिला हात देत बाहेर आणतो..पिहु तर तिच्या विश्वावात मग्न होत सगळी कडे नजर फिरवत होती...

विराट तिचे दोन्ही हात हातात घेतो...पिहु एकटक त्याच्या डोळ्याकडे बघते...पिहु .... परत कधीच ह्या घराला सोडुन जायाचा विचार सुध्दा आणायाचा नाही...तो भावुक होत तिच्या डोळ्यात बोलत म्हणतो...

पिहुचे डोळे काटोकाट भरले होते.ती मानेनेच गालात हसत नाही म्हणते...विराट तिचे डोळे फुसतो..

दोघांच्या स्वगतांसाठी सगळे वाटच बघत होते.विराट पिहुच्या अंगावर गुलाबांच्या पाकळ्यांचा व‌र्षाव होत होता....पिहूला आज पहिल्यांदा जाणवत होते...ह्‌या,घरात आपली ही जागा आहे ‌...

रोहिणी परत पिहुविराटच औक्षण करुन गृहप्रवेश करते..पिहु विराट देवघरात जाऊन देवाच्या पाया पडतात.

दोघजण जावा आवरा ...पुजेला बसायच गुरुजी येऊन बसलेत सूमन बोलते...(लगेच त्यांच्या लक्षात‌‌ येत .दोघे एकत्र गेले की लवकर यायच नाव घेणार नाही त्यात विराटवर आता काडीमात्र भरवसा नाही...😅😅)पिहु तु माझ्या रुममध्ये आवर ..विराटच्या एवढ लक्षात येत नाही तो फोन वर बोलतच वर जातो.पिहुला कळल्यामुळे ती सुमनला नजर चुकवुन रुममध्ये जाते..😂
विराटला रुममध्ये आल्यावर पिहु आली नाही तेव्हा क्लिक होते...तो चिडतच आवरु लागतो लग्न दोन वेळा झालं तरी सगळे विलन बनुन फिरतात...😂😂तो बडबड करतच आवरुन ‌खाली आला..पिहुने चेरी मरुन मिक्स फिरता कलरची़ कांझीवरमची स्लिकची साडी घातली होती..विराटने त्याच कलरचा कुर्ता घातला होता.. दोघेही येऊन पाठावर बसतात...
विराट पिहुवर नजर टाकतो...ती शांत हात जोडुन कथा ऐकत होती...त्याला काही इंटरेस्ट नव्हता...तो हळूच पिहूच्या पायाच्या अंगठ्याला अंगठ्याने स्पर्श करतो...तशी पिहु दचकून तिचा अंगठा मागे घेते..आणि त्याच्याकडे बघते..तो गालात हसत डोळे मिचकावतो..पिहुला तर घाबरल्यासारखच झाल़ं कोणी बघितलं तर नाही म्हणुन ती इकडे तिकडे बघते कोणाच लक्ष नाही म्हणून ती रीलॅक्स होते..

पुजा झाल्यावर दोघे सग्ळ्या मोठ्याच्या पाया पडतात.

आत्या आता गेम्स आहेत ना,नमन एक्साईटेड होत विचारतो...

सुधा,हसते...हो रे पण विराटला माहित नाही तुला बर माहीत आहे सगळं.हहह.सुधा चिडवत विचारते...

अ..ते..आत्या काही पण तुझ मी..एका मुव्ही बघितलं ते रींग अजुन काय ते काय...नमन चाचरतच बोलतो..तसे सगळे त्याला हसु लागतात...

अजुन खूप सारे आहेत...पहिले हा तर खेळ खेळु दोघांची नजर मिळते..तसे दोघे गालात हसत असतात..

मोठ्या पात्रात दुध आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकुन .सुधा गोल फिरवुन रींग टाकते...हह शोधा रींग ज्याला मिळेल आयुष्यभर त्याच्या हृद्यावर राज करणार सुधा दोघांकडे बघत मिशकलीत बोलते...

पिहु लाजुन नजर खाली घेते.दोघेही दुधात हात घालतात...विराट ची नजर पिहुवरच स्थिर होती..त्याची नजर बघून पिहुला काहीच सुचत नव्हते..ती डोळ्यानेच खाली बघा म्हणते तो गालात हसत डोळ्यानेच नाही म्हणत तिचा हात धरतो..पिहु पटकन सोडवुन बाजुला करत शोधु लागते...

दोघांची गम्मत बघुन सगळे चिडवत होते...पिहुला तर‌ उठुन जाऊ वाटत होते..इतक लाजुन जीव पाणी पाणी झाला होता... ☺☺

विराटला तर त्याचा काही फरक पडत नव्हता😆😆

एकदाची रींग पिहुच्या हातात आली तेव्हा कुठे पिहुच्या श्वासात जीव आला..ती हसतच रींग दाखवु लागली‌..

येईईई वहिनी विन‌र झाली वीरा ,दिपा खुश होतच हसत बोलू लागल्या...

नमन रीषभचा चेहारच पडतो...काय रे दादा,लास्ट टाईमला पण वहिनी विनर झाली आणि आत्ता रिषभ चक करतच बोलला..‌

विराट गालात हसतो...पिहुला रींग भेटली नाही तरी आयुष्यभर तीच माझ्या हृद्यावर राज करणार आहे...

तसे सगळे हसु लागतात...पिहु,तर चेहरयावर हात ठेवुन लाजुन हसु लागते...

रोहिणीला तर रागच येत होता ..नाही ते नाटकं बघुन

अजुन काय आहे...मम्मी रींग झालं आता दोरा सोडायच ना, मग झाल का... रीषभ एक्साईटेड होत विचारतो...

सुधा सुमन कडे बघते..सुमन गालात हसत सांग म्हणते...

हह अजुन आहेत...पण मागच्या वेळेस विराट उठुन गेला म्हणुन केल्या नाही आता सगळे खेळ खेळु...हह

तसा विराट सुधा कडे कटाक्ष टाकतो ...

ते..तस नाही अरे..सुधा दबकतच बोलु लागले.दोन मिनीट पिहुही दचकते,आता विराट उठुन निघुन जातो कि काय😥

आत्या ,त्यावेळस माझ चुकलं होते...पण आज मी सगळं मनापासुन करणार आहे..विराट शांत भाषेत बोलतो...

तसे सगळ्यांचे चेहरे गंभीर झाले़होते.विराट बोल्यावर सगळ्यांच्या चेहरयावर आंनदच पसरला.

विराट पिहुच्या डोळ्यात बघत त्याचा उजवा हात पुढे करतो...पिहु डोळ्यातलं पाणी आवरतच काकणाची डोरी अलगद सोडते..विराट ही तिच्या हाताची डोरी एका हाताने सोडतो...

पिहु‌ सुपारी हातात घट्ट धरणार होती....विराट तिची मुठ उघडणार असतो.

पिहुने हसत दोन्ही हातांनी जोरात सुपारी पकडली होती...

विराट तिचा प्रयत्न बघुन हसतच होता...त्याने एका मिनीटात तिची मुठ जोर देऊन उघडली.तसा पिहुचा चेहराच उतरला..ती गाल फुगुनच बघु लागली..😒😒

रीषभ आणि नमन जोरजोरात हसत वीरा दिपाला चिडवत होते..

आता विराटने एका मुठीत सुपारी धरली होती..पिहु दोन्ही हातांनी त्याची मुठ‌ उघडायचा प्रयत्न करत होती...पण त्याची पकड खुप मजबुत‌ होती..😉

वहिनी हार मानुन घे आता तुला जमणार नाही नमन चिडवत म्हणतो...

पिहु रागाने विराट कडे बघत अजुन जोर लावत होती..😠😠विराट तिच्या डोळ्यात बघत गालात हसत होता...

रागाने पिहु हात वर करत जोरात चावली‌.‌तरी त्याने मुठ सोडली नाही... विराट एक भुवई वर करून बघु लागला...

सुमनने तोंडावरच हात ठेवते... आजी जीजी जोरातच हसु लागल्या...तशी सुधा हसतच ओरडु लागली..पिहुss..

पिहुच्या लक्षात येताच तिने परत हात खाली घेतला.‌.आत्या मुद्दाम करतायेत पिहु चिडतच बोलु लागली...

तिचे गोड प्रयत्न बघुन विराट ने मुठ हलकी केली.😍😍मुठ सुटताच पिहु हसतच सुपारी घेत दाखवु लागली...त्याला ही तिच्या चेहरयावर हसुच हवे होते...🙈

झालं हुश्श....विराट उठायला लागतो..तशी सुधा,हात धरत परत बसवते अरे...अजुन आहेत....

आत्या,किती असते ते...आता दिवस भर बसवायच का,तो आठ्या पाडतच बोलतो...

विराट थोडा वेळच माहीत आहे तुला उद्याची तयारी करायची घाई आहे....सुधा पिहुकडे बघत चिडवत बोलते...ओहहह ..सगळे चिडवु लागतात‌..

रोहिणी ओरडुनच बोलते...सुधा आवर लवकर परत संध्याकाळी रीसेप्शन आहे...(तिला पिहुच्या हसण्याचा आवाज दोघांची मस्ती बघुन आतुन राग येत होता...विराट आपल्या हातातुन गेला कि काय हे जाणवु लागले...)

ह..हो वहिनी विराटच त्रास देतोय मी लवक‌रच आवरते..तोच इतका वेळ टाईम पास करतोय......सुधा रोहिणी कडे बघत बोलते.

रोहिणी तु जाऊन बघ सगळी तयारी झाली का...नाही तर तुझ्यासारख कोण नीट काम करतं नाहीं जा ...आजी टोमण्यातच बोलते.

रोहिणीला कळताच रोहिणी चिडुनच उठुन‌ जाते.

आई,...सुमन आठ्या पाडतच बोलते...

तुला जायच का जावेची मदत करायाला तर तु जा मला बघु शांत आजी जीजीला बघत बोलते..तशी जीजी पण हसते...

वय झालं पण खरच अजुन लाहानमुलांसारखं वागतात.....आई सुमन बोलते.

सुधी पण ओठ दाबतच हसु लागली...

सुधा,तु सांग काय करायच..आणि सुमन मध्ये मध्ये बोलु नकोस....जीजी ठसक्यातच बोलते.

(एका ट्रे मध्ये पान,खोबरे, लंवग असते...)हह आता हे पान ,खोबर ,आणि लंवग दाताने तोडायच.

एवढ सोपं ,विराट पान घेतो आणि दाताने तोडुन हसत परत ट्रे मध्ये ठेवतो.....विराटने कधी बघितलं नव्हत..म्हणून त्याला कळलचं नाही.सगळे त्याला बघुन जोरजोरात हसतात...

पिहु शॉक होतच सुधा कडे बघते..पिहुने तर भीतीने आवंढाच गिळला...सग्ळ्यांसमोर कधी हात धरायाला ती घाबरत होती आणि आता तर दाताने तोडायच म्हणटलं तर😂😂😂

विराट सग्ळ्यांकडे ब्लँक होत बघतो..विराट तस नाही...सुधा कानाजवळ येत कुजबुज करुन परत नीट बसते...तसा विराट चा चेहराच खुलला...री‌यली आत्या..😁😁तो एक्साईटेड होतच बोलला.

सुधा लटक्यातच त्याला फटका मारते...आगाऊपणा करायचा नाही हहह ...🤣🤣🤣 आम्ही सगळे आहोत ह्याच भान ठेव...

नाही 😁😁 उगाच टाईमपास करत बसलो होतो आत्तापर्यंत विराट पिहु वर नजर टाकत हसत बोलतो..पिहु़ घाबरून खालीच बघत पदर घट्ट पकडते..

तशी आजी त्याच्या कान पकडते...विराट हसू नकोस..निर्लज्ज झालास... ..😜😜.

सुमन तर कपाळालाच हात मारते....

पिहु धर सुधा हसत तिच्या हातात पान देते...पिहु पानाकडे एकदा आणि सुधा कडे एकदा‌ बघते...अगं धर...सुधा दाटवतच बोलते...

पिहु पान घेत नजर विराट कडे वळवते..त्याची स्माईल बघुन तिची धडकीच भरते...पिहु घाबरतच पान दातात धरते....

विराट फक्त पान तोडायच 😛😛सुधा हसतच बाजावुन सांगते..

😉😉हो आत्या...विराट पिहुच्या डोळ्यात बघतो पिहु डोळ्‌यानेच त्याला विनवणी करत होती...विराट हसत तिचा चेहरा ओजळींत धरत तो पान तोडणार कि पिहुने पानच दातातुन सोडले आणि चेहरा दोन्ही हातांनी लपवला..

😟😟विराटचा पोपट झाला😂😂म्हणुन सगळे जोरातच हसु लागले...🤣🤣

आत्या चिटींग आहे...तो हट्टच्या स्वरात बोलु लागला...😩

हो..हो पिहु अस नाही...हहह सुूधा हसतच परत तिला पान दातात धरायला लावते...पिहु नाईलाजाने परत 😣पान धरते...

विराट ने ती सोडायच्या आता पानाचा तुकडा दाताने तोडला..पिहु लाजुन खाली बघु लागली...

आता पिहुची बारी होती..

विराट पान दातात धरतो..तो मस्तीभरीनजरेने 😼पिहुकडे बघत हसत असतो...पिहुच्या चेहरयावर लज्जास्पद भिती होती...चेहरयावर तर लाजेची लाली पसरली होता..🙈🙈🙈

पिहु घाबरतच त्याचा चेहरा दोन्ही हातांनी धरते..ती पान तोडायला जाते विराट पान तोंडात घेत मागे सरकतो..तशी पिहु त्याच्या अंगावरच अदळते..विराट पटकन तिला सावरत डोळा मारतो..पिहु पटकन नीट बसते....सगळे हसायला लागतात..

पिहु नजर रोखूनच बघते...

विराट मस्ती नकोय...सुमन ओरडुनच बोलते...सुमनला पिहुवर दया येऊ लागली..😂

सुमन तु उठ बर....इथुन जीजी ओरडुनच बोलते...

सुमन शांतच बसते.

पिहुचा चेहरा बघुन विराट ही शांत होतो..पिहु पटकन पान तोडुन लाजून बाजुला होते..

खोबरे,तोडले मग लवंग तोडताना का होईना दोघांचे ओठ ओठाला लागलेच लंवग तोडताना विराट हळुच तिच्या ओठांना चावला‌‌..😽😽😻🙈पिहु तर गाल फुगवुनच बघत होती.

दोघेही उभे राहतात..पिहुच्या मागे विराट थांबतो...सुधा दोघांच्या डोक्यावरुन कुंकवाच पाणी टाकते..नंतर दोघांच्या डोक्याव‌रुन पाणी घालतात...गार लागल्याने पिहु दचकुन पुढे झुकते ...विराट पटकन तिच्या कमरेला पकडत सावरतो...त्याच्या स्पर्श होताच पिहुच्या अंगाला गोड शहरा आला...तो ही मुद्दाम तिच्यावर झुकला...विराटच्या अंगावरच पाणी ओझरत पिहुच्या अंगावर पडत होते...दोघ ही त्या पाण्यामध्ये शहारुन गेले होते..मनाची चलबिचल चालु होती..दोघांचे ही श्वास फुलले होते.

वि‌राट तिला उचलुन घेऊन जा आत...आजी हसतच बोलते...
सगळे एकसाथच कल्ला करतात..

विराट पिहुला दोन्ही हातांवर उचलुन घेतो...पिहुने तर लाजुन चेहराच झाकला होता..ती बघत नाहीये म्हणुन विराट ने तिला खाली झुकवलं तशी ती घाबरुन लगेच दोन्ही हातानी त्यांचा शर्ट पकडुन बिलगली..

विराट sss कुठे पण मस्ती सुचते तुला जा,आत ती गारठली आणि तुला मस्ती सुचतेय..सुमन वैतागतच बोलते...

चाललो मॉम, विराट ही गाल फुगवुन पिहुकडे बघतो...ती लाजुन हसत होती..दोनवेळा त्याला बोलणी बसली होती..😂😂

सगळ्यांचा गोंधळ चालुच होता...सुमन सगळ्यांना ओरडल्या आणि आत जाऊन जेवण करुन आराम करायला लावला...संध्याकाळी परत फंक्शन होते...

विराट पायरयावरुन पिहुला घेऊन चालला होता..पिहुची हिम्मतच होत नव्हती त्याच्याकडे बघायची...पिहु,...

बोलु नका, पिहु गाल फुगवुन बोलते...विराट हसत तिला रुममध्ये आणतो...तो बाथरुमपर्यंत सोडतो पिहू आत जात दार लावणार कि विराट दार पकडतो‌..पिहु एक नजर त्याच्याकडे बघते...तो तिला वरुन खाली निहाळत होता...पाण्याने चिंब झाल्यामुळे साडी पुर्ण अंगाला चिटकली होती..

अ....हो प्लिज ना... पिहु दार लावायचा प्रयत्न करत नजर चूकवत बोलु लागली.

तो गालात हसत दार सोडतो...पिहु हसुन दार लावते...

विराट दुसरया रुममध्ये जाऊन बाथ घेऊन फ्रेश होऊन खाली येतो...पिहु आधीच आवरुन जेवण करत होती ...तो ही तिच्या शेजारी बसला.सगळे जेवण करुन आराम करायला गेले ...

पिहु विराट रुममध्ये आले.पिहु रुमभर नजर टाकते...सगळ्या वस्तुवर नजर टाकुन गालात हसत होती...

विराट तिला जवळ घेतो..का हसतेस..हहं

पिहु त्याला मिठी मारत खुदखूद हसत होती....

अरेच्चा काय जोक आठवला का,तो तिचा चेहरा वर करत हसतच विचारतो...

ती हसत मानेनेच हो म्हणते...

काय,

रुम किती सुंदर दिसतेय..ना‌...कुठलीही वस्तु हालली नाही...किती भांडत होता पिहु ते नीट ठेव हे अस नको ठेवु साधा रिमोट पण जसाच तसाच ठेवता तुम्ही ती हसतच बोलु लागली..

विराट हसतो...तुझ्यासारख नाहीये माझ रिमोट हातात घेत फिरायच आणि तिथेच सोडुन ‌यायच आणि परत शोधत बसायच अहो रिमोट मी इथेच ठेवला...कुठे गेला तो तिची नकल करत बोलतो‌‌.
पिहु खळखळुन हसते.

दोघेही गॅलेरीत येतात...पिहुचा चेहराच खुलला...तिने जस सांगितले तशी गॅलेरी विराट ने केली होती..हिरवी झाडे कमी करुन फुलांची झाडे लावली होती‌‌...झोका ही आणला होता..ती पटकन जाऊन झोक्यात,बसली....


विराट झोक्याला हात लावुन हलवतो...आवडला का झोका....

हो...थँक्यु...😘😘 ती एक्साईटेड होतच बोलु लागली...

तिच्या चेहरायवरचा आंनद बघुन विराटचा चेहरा खुलला.

पिहु बस्स आता आराम कर परत रात्री उशीरच होणार झोपायला विराट तिला उचलुन बेडवर झोपवुन कुशीत घेतो....दोघेही थकल्यामुळे लगेच झोपून जातात...


पिहुने स्लिवर ग्रे कलरचा,लेहंगा घातला होता...त्यावर जरी वर्क केलेले कटवर्क होते...हातात हिरवा चुडा गळ्यात डायमंडचा नेकलेस, मोठे मंगळसुत्र ,केस सेट करुन मोकळे सोडले होते.न्यूड कलरची लिपस्टीक ,डोळ्यात काजेची लकीर....आयलाईनर साजेसा मेकअप,भांगेमध्ये सिंदुर ...विराट ने नेव्ही ब्लु कलरचा सुट घातला होत


दोघे एकदम परफेक्ट‌ दिसत होते मेड फॉर इच अदर..दोघेही लॉनमध्ये आले...पिहुने सगळीकडे नजर फिरवली...लॉन खुप छान पध्दतीने सजवलेले होते...वेगवगळ्या कलरफुल फुलांनी आणि लाईटींग सजवलेले होते.. समोर छान स्टेज सजवला होता...एकासाईडला ड्रींक कांऊटर तर एका साईडला स्नॅक्स काऊंटर....डान्स फ्लोअर होता..

गेस्ट सुध्दा भरपुर आले होते..आणि तेवढी सिक्युरीटी ही होती....लग्नाला मोजकेच गेस्ट होते.. त्यामुळे पिहुला एवढ काही वाटलं नाही...पण आज इतके गेस्ट बघुन तिला घाबरल्यासारखच झालं...तिच्या चेहरयाचे हाव भाव विराट ने बरोबर हेरले...पिहु रीलॅक्स....मी आहे ना तो तिचा हात हातात घेत‌ घट्ट पकडुन म्हणतो...

पिहु गालात हसते...

दादा चल पहीले फोटोज काढु...वीरा दोघांचे हात धरत घेऊन गेली..दोघांचे वेगवेगळ्या पोझ मध्ये फोटोसेशन झाले...

सगळे दोघांना शुभेच्छा देत होते...विराटने ही पिहुची मोजक्या गेस्टशी ओळख करुन दिली..

रोहिणी तर‌ दोघांना सोडतच नव्हती...विराटच्या आवतीभोवतीच फिरत होती.पिहु विराट सग्ळया गेस्टमध्ये मिक्स झाले...

गुंजन आदित्य शेजारी येते...आदी ड्रींक करत दोघांकडे बघत होता..

आदी एक विचारू...

हहह तो पुढे बघत बोलतो...

तु पिहुला लाईक करतो ना‌‌...तसा तो ड्रींक करायचा थांबतो.आणि गुंजन कडे एकटक बघत गालात हसतो...

गुंजन गालात हसत त्याच्या खांद्यावर थोपटते..

आदी मोठा श्वास घेतो...गुंजन ती आहेच इतकी निरागस दगडासारखा विराट पिघळला तिच्या समोर.... मग मी ही माणुसच आहे..मन हातात राहीलं नाही वळालं...

आदी...ती मॅरीड आहे...डोक्यातुन काढुन टाक.तिचा विचार

आदी हसतो...प्रेम एकदाच होत असते...पण ती मला हवी आहे हा मी कधी हट्ट धरलाच नाही...लग्न झालं ह्यापेक्षा ती विराट बरोबर खुश आहे हे महत्वाच आहे....प्रेम फक्त निस्वार्थ करायच असते....तो उरलेला वाईनचा ग्लास एका घोटात पित स्वतःचे अश्रु आवरुन गुंजनकडे बघत हसतो...

गुंजन त्याला टाईट हग करते...म्हणुन तर तु वेगळा आहेस...निखळ मैत्री झळकते ..आदी ही तिला घट्ट पकडत डोळ्यांच्या कडा हसत पुसतो.😌😌😌



रोहिणी दामोदर शेजारी येऊन थांबतो....अहो,

हम्म...

तुम्ही जस नमनला ओळख करुन देताय तस विराट नमनची ओळख करुन देतच नाही‌ेये...शेवटी तो ही आता बिझनेस बघणार आहे ना. लहान भाऊ आहे त्याच्या......रोहिणी चिडुुनच बोलते...

दामोदर रागाने बघतात...रोहिणी ओळख बनवयाची असते...करुन दिलेली ओळख जास्त वेळ टिकत नसते...विराट ने स्वतः‌‌ला सिध्द‌ केले..म्हणुन आज त्याच्या मागे पुढे लोक फिरतात..नमनलाही त्याची ओळख करायाला वेळ‌ दे. ह्या अश्या स्वभावामुळेच नमन जे वागतोय ना तुझ्यासोबत बरोबर आहे...दामोदर चिडुन निघून जातात...

रोहिणीचा पाराच चढतो...ती स्वतःला नार्मल करत निघुन जाते.

जशी जशी रात्र सरत चालली गेस्टही कमी कमी होत चालले

विराटचे मित्र तर त्याला आज सोडतच नव्हते.. सगळे ड्रींक कॉऊंटर ‌थांबुन विराटला चिडवत होते...

विराट ड्रींक करता करता पिहुवर नजर वळवतो..ती रागाने एक लूक देत दुसरीकडे चेहरा फिरवते..तेव्हा त्या्च्या लक्षात येते....तिला ड्रींक केलेले आवडत नाही ..विराट ग्लास खाली घेतो...

यश अजुन एक ग्लास समोर धरतो...

नो थँक्स ,....तो डोक्यावर अंगठ्याने घासत बोलतो.

वाय? यु जस्ट टुक टु पेग ...

अरे ,यश ट्राय टु अन्डरस्टँड टुडे इज स्पेशल नाईट फॉर हिम...रितेश चिडवत बोलतो..

ओहह...सगळे मित्र चिडवु लागले.विराट गालात हसतो..

जवळ जवळ सगळे गेस्ट जाईपर्यंत बारा वाजत आले होते.

विराट पिहु स्टेप्स वरुन चालत होते...पिहु शांत चालत होती...विराट ती शांत का आहे ह्याचा अंदाज येत नव्हता...तो एकटाच बडबडत होता..

पिहु ..पिहु चिडली आहेस...

अहो ,डोक दुखतयं माझ....ती चिडतच बोलते.

कधीपासुन डोक दुखत‌य....तो काळजीने जवळ घेत बोलतो...

माझी झोप नीट झाली नाहीये आता उदया परत ट्रॅव्हल करायचे ... ती नाराज होतच त्याला बिलगुन चालते..

आता जाऊन शांत झोप उद्या लेट निघायच ..हम्म

हम्म,पिहु रुमचा डोर उघडत आत येत..समोरच दृश्य बघुन ती ब्लँक होतच बघते...विराट दार लावुन समोर बघतो..तो ही चकित होतच बघतो...

पुर्ण रुम सजवली होती.. बेड गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेला होता..

विराट खुश होत पिहुला मागुन मिठीत घेतो..तशी पिहुची धडधड वाढली...

हहं....मिसेस. देशमुख आज काय आहे इतकी सुंदर रूम डेकोरेट केली...

पिहु घाबरतच नजर लाजुन ‌खाली घेते...

बघु कशी ब्लश करतेस हहं तो हसतच तिचा चेहरा स्वतःकडे फिरवतो.

पिहु नजर वर करत त्याच्याकडे बघते..मानेनेच नाही म्हणत‌ त्याच्या कुशीत शिरते.

विराट हसतो...जा,चेंज कर. हेवी झालं असेल ...

अहं ती मान हलवतच बिलगुन बोलते.

मला घाई नाहीये..तुझी तबियत महत्वाची आहे जा जाऊन चेंज करत तो तिला थोड दुर करतच बोलतो...

पिहु बाजुला होतच पळतच आत जाते..विराट बेडव‌रच्या सगळ्या पाकळ्या काढुन डजबिन मध्ये टाकतो...

पिहु चेंज करुन येते..ती बेडवर नजर टाकत विराटला मागुन मिठी मारते..विराट तिला मागुन पुढे घेतो...‌‌उद्यापासुन आपण दोघेच आहोत... तो तिचे गाल ओढत कपाळाला कपाळ टेकवतो...तशी पिहु ‌खुदकन हसते.

हह पण तिकडे गेल्यावर असे नखरे नकोय नाही तर नको जायला तो खट्याळ हसतच बोलतो‌..

पिहु लाजुन बेडवर ब्लँकेट ओढुन झोपते...विराट चेंज करुन फ्रेश होऊन येतो...

पिहुडोकं धरूनच बसली होती..विराटने तिच्या डोक्याला बाम लावुन चेपून दिलं..तेव्हा कुठे तिला हलक हलक वाटत झोप लागली...विराट ही झोपून जातो.

सकाळीचे नऊ वाजले तरी अजून दोघांना जाग आली नव्हती.
लॅनलाईन वाजल्याने दोघांची झोप चाळवळते.पिहु परत ब्लँकेट ओढत विराटला बिलगते..विराट पिहुभोवतीचा हात काढुन फोन रीसीव करतो ...

विराट जाणार आहेस आज ..सुमन विचारते.

ह..हो विराट डोळे उघडझाप करत बोलतो..

मानवचा फोन आला होता..

हा करतो.तो फोन कट‌ करतो.

विराट मोबाईल स्विच ऑन करुन मानवला फोन ‌लावतो...पिहु पण त्याच्या आवाजाने नीट जागी होती..घडळ्यात बघुन पटकन आवरुन खाली येते.. रात्री सगळे उशीरा झोपल्याने कोणच दिसत नव्हते.. किचन मध्ये येते..सुमन पिहुच्या डोक्यावरुन हात फिरवते..बॅग वैगेर आव‌रुन झालं ना...

पिहू हसून हो म्हणते...आई मी करते पिहु सुमनच्या हातातून फ्रुट्स घेत बोलते.

मी करते तु नाश्ता कर. आणि बॅग नीट चेक कर थोडा आराम कर..

हम्म..पिहु तिथेच नाश्ता करत गप्पा मारत होती.

सुमन ही तिच्या शेजारी येऊन बसते..लोकांसाठी तुमच लग्न होऊन सहा महिने झाले असले तरी... आजापासुन तुमच्या दोघांच्या नात्याला नवीन सुरवात होईल...दोघेही एकमेंकाना समजुन घेऊन संसार करा..सुमन तिला समजवात होती.

पिहु लाजुन हसते.

विराट ऑफिसमध्ये जाऊन मानवला थोडफार‌ इनस्ट्रक्शन देऊन घरी येतो....

दोघेही दुपारुन निघाले ..

अहो कुठे चाललो आता तरी सांगा ना...पिहु लाडात येत विचारु लागली...विराट ने हसत तिला तिकिट्स दाखवले ..

पिहु एक नजर विराटकडे बघत तिकिट्स ओपन करुन बघते...तिकीट्स बालीचे होते.

पिहु लाजुन विराटच्या कुशीत शिरली...पण परत तिने तिकीट्सवर नजर फिरवली तर‌ त्यात डेट दोन दिवसानंतरची होती....

अहो,हे तर दोन दिवसानंतरचे आहे पिहु गोंधळुन बोलते.

हो ,आपण दोन दिवसानंतर जाणार आहोत तो,तिकीट्स परत ठेवत बोलतो...

मग आता कुठे चाललो ती पुर्ण गोंधाळलेली होती...

अजुन एक सरप्राईज आहे विराट तिला जवळ घेत बोलतो..

मला आता काहीच सुधरत नाहीये..तुम्ही आणि तुमचे सरप्राईज डोक उठवुन ठेवलं हुम्म..

मग जास्त डोक लावु नकोस ना...

मी झोपते.मला तर काहीच कळत नाहीये...कुठे चाललो आपण ती डोळे मिटून विराटच्या मांडीवर डोके ठेवुन आडवी झाली..
विराट हसत तिच्या केंसामधुन हात फिरवतो.थोड्यावेळाने तिला झोप लागली.विराट ने ही डोळे बंद‌ केले‌.

सहा- सातच्या दरम्यान कार थांबली...विराटने पिहुला उठवलं,

पिहु उठ ,तो तिला नीट बसवतो...पिहु बाहेर बघते...तर‌ पाऊस जोरात चालु होता...अंधार पडल्याने बाहेरच काहीच दिसत नव्हते

अहं....आपण कुठे आहे..ती घाबरतच विचारते...

विराट तिला जवळ घेतो...आपण महाबळेश्वर मध्ये आहोत..

पिहु चमकुन बघते .इथे का आ...लो...त

विराट काही न बोलता का‌रचा डोर उघडुन तिला हात दिला..पिहु गालात हसत त्याला हात देत बाहेर येते...

दोघेही एका बंगल्याच्या बाहेर येतात...विराट ड्रायव्हरशी बोलत होता..पिहु सगळीकडे नजरफिरवत होती.. संदुर झांडानी सजलेली पुढे एक बाग होती...दारासमोर एक झोपाळा होता.एका साईडला छोटा,पुल होता.
विराट तिच्या जवळ येतो....

अहो हे घर कोणाच आहे..ती सगळी कडे नजर फिरवतच बोलते...

विराट गालात तिचा चेहरा समोर करतो...पिहु बघत पुढे जाते... मिसेस.पिहु विराट देशमूख ती हात फिरवते आणि विराट कडे एकटक बघते....

माझ नाव ..ती ब्लँक होत एकामागुन एक प्रश्नच विचारत होती...

आपण आत जायच का तो तिला थांबवत बोलतो.

विराट दार ओपन करतो...तो गालात हसत तिचा हात पकडतो...

पिहु शांत होत तो काय करतोय.हेच बघत होती..पिहुच दारात खाली लक्ष गेलं .दारात एक फ्रेम होती..त्यात फुट प्रिंट साठी,क्ले होती.

पिहु मला ह्या फ्रेममध्ये दोघांच्या फुटप्रिंट हवेत...पिहु त्याला भारावूनच बघत होती..विराट इतका विचार करतोय ..प्रत्येक वेळेस तिच्या विचारांचा पुढचा पाऊल टाकत असतो..

पिहु मान हलवत हो म्हणते..दोघेही उजवा पाय ठेवुन घरात प्रवेश करतात..

विराट ती फ्रेम उचलून घेऊन टेबलावर ठेवतो.

पिहु सगळीकडे नजर फिरवत बघत होती.

विराट ने तिला जवळ घेतलं पिहु धिस इज अव‌र होम ...अ गिफ्ट फॉर यु फ्रॅाम युअर हसबंड ...तो गालात हसत तिच्या हातात पेपर ठेवत बोलतो...

पिहु त्या पेपर कडे बघत परत विराटच्या हातात देते...म...ला नकोय...ती शॉक होत गोंधळुन बोलते...

विराट तिला मिठीत घेतो...वाय डोन्ट यु वॉन्ट इट?

ती त्याच्या डोळ्यात बघते.मला फक्त तूम्ही हवेत ...मला खरच नकोय...तिचे डोळे काठोकाठ भरले होते.

मी तर तुझाच आहे ना..तो हसत तिच्या कपाळावर ओठ टेकवतो...

ह..हो पण नकोय मला, ती कंठ दाटुनच बोलते.

ओके लेट इट बी .तो पेपर बाजुला ठेवतो...चल तुला घर बघायच ना...

पिहु डोळ्यांच्या कडा पुसत, हलक हसून हो म्हणते.

विराट तिला सगळा बंगला दाखवतो....छान मॉर्डन पध्दतीने बंगला होता...एक हॉल,हॉलअॅट्च डायनिंग हॉल आणि किचन होते...एक बेडरुम आणि मेन डोरपासुनच वर जाण्यासाठी स्टेप्स होते.. वरत तीन बेडरुम त्याला अॅट्च मोठा पोर्च होता...
एका रुमला लॉक होते...

अहो...सगळे ओपनच आहे आणि हा रुम लॉक आहे पिहू विचार करत बोलते...

‌काम झालं नाही त्या रुमच म्हणून लॉक आहे तो काही तरी बोलायच म्हणून बोलुन मोकळा झाला‌..

हम्म. खुप छान आहे,पिहू हसुन त्याला बिलगते .

दोघेही खाली येतात....

अहो पाऊस किती आहे ना,पिहु हॉलच्या स्लाईडींमधुन बाहेर बघत बोलते...

हो,खुप आहे...किती रोमँटिक वाटत ना,विराट तिच्या हातावरुन हळुच बोट फिरवत बोलतो...पिहु लाजून हात काढत वळते..

ते...ते..मी किचन मध्ये जाते तूम्हाला भुक लागली असेल ना ती जातच असते तर विराट तिचा हात धर त मागे घेतो...ऑलरेडी डिनर तयार आहे.

कोण केलं ??पिहु ब्लँक होत विचारते.

सर्वंट ने करुन ठेवले आपण ययाच्या,आधीच

अ..आणि कुठे गेलेत कोणच नाही कि इ‌थे

कपल आहे त्यांना राहण्यासाठी बॅक साईडला रूम्स आहेत.

हम्म ,चला जेवण करु ..पिहु किचनमध्ये जाऊन जेवण गरम करते..विराट डायनिंग टेबलावर बसुन तिला निहाळत हसत होता..ती लगेच कुठल्या गोष्टीसाठी तयार होत नाही..आणि तो चिडला रागात बोलला तर,ती रडेल म्हणुन त्याने तो विषय आत्तासाठी थांबवला..

पिहु नजर चोरुन बघत होती..दोघांसाठी हा एक वेगळाच अनुभव होता..आज पिहल्यांदा त्यांना एवढी प्रायव्हसी मिळाली होती...दोघांच्या मनात असख्य फुलपाखरु उडत होते..

पिहु दोन प्लेट्स घेते...विराट तिचा हात पकडतो..पिहु एकच प्लेट लाव तो गालात हसत बोलतो..

का तुम्ही जेवणार नाही..पिहु जास्त विचार करताच पटकन बोलुन जाते.😂😂

😐 तो कापाळालाच हात मारतो .पिहु आपण दोघ एकाच प्लेटमध्ये जेवु तो दातावर‌ दात घासत हसत बोलला..

ओहहं☺ पिहु लाजुन हसते.

😓काय होणार माझ ,सगळ एक्सप्लेन करुन करुन आर्ध्या रोमान्स ची वाट लावणार आहे अस वाटतयं..तो मनताच बोलत तिच्या कडे बघत हसतो.

पिहु चेअर त्याच्याकडे सरकवुन बसते.तिचा मोबाईल वाजतो..मम्मीचा होता पिहु खुश होतच उचलते..जेवण करून फोन लावते अस बोलुन ती ठेवून देते..

तो पिहुचा मोबाईल घेऊन स्विचऑफ करतो...

अहो,ती आठ्या पाडुनच बघते.

आज,फोन नाही फक्त तु आणि मी तो त्याच्या ही मोबाईल स्विच ऑफ करतो..पिहु खाली बघून लाजते..

दोघेही जेवण करतात...पिहु सगळ नीट ठेवुन किचनच्या लाईट्स ऑफ करते...

पिहु तुझी बॅग मी त्या रुममध्ये ठेवली चेंज कर...

पिहू गालात हसत रुममध्ये जाते...ती बॅग ओपन करते त्यात गिफ्ट होते .ती त्यावरून अलगद हात फिरवते..पिहुच्या हृ्दयाची धडधड वाढली होती..असख्य पोटात फुलपाखरांनी धुमाकूळ घातला होता..लज्जा ,भिती सगळे भाव समिंश्र झाले होते...ती आवरुन एक नजर मिरर मध्ये बघून स्वतःशीच लाजते.पिहु दारापर्यंत गेली डोळे बंद‌ करुन एक मोठा श्वास घेतला..

ती दार ओपन करते. विराट वळुन बघतो..विराट एकटक देहभान हरपुनच तिला बघत राहतो...पर्ल व्हाईट कलरची नेटची साडीला मोतीव‌र्क होते.. ,त्यावर नाजुक ब्लेटचा स्लिवलेस ब्लाऊझ...हातात हिरवा चुडा ,गळ्यात छोट्स मंगळसुत्र,कानात डायमंडचे नाजूक स्टोन असलेले टॉप्स ,केस ओलसर मोकळे सोडले होते. पाणीदार डोळ्यात काजळाची लकीर ,ओठांना रेड कलरची लिपस्टिक
,हलकासा मेकअप त्याची नजर चेहरयावरुन ‌खाली येत कमरेवर गेली..त्याने तिला गिफ्ट दिलेली चैन घातली होती..पिहुने घाबरतच नजर वर करत त्याच्याकडे नजर फिरवली ...विराट ने ब्लॅक कलरची जीन्स आणि ऑफ व्हाईट कलरचा फॉर्मल शर्ट घातला होता..स्लिव्ज कोपरयापर्यंत फोल्ड केले होते..

विराट एक एक पाऊल जसा तिच्या जवळ येत होता. पिहुच हृदय ट्रेन सारख पळु लागले ...

ऐसा देखा नहीं खूबसूरत कोई
जिस्म जैसे अजंता की मूरत कोई
जिस्म जैसे निगाहों पे जादू कोई
जिस्म नगमा कोई
जिस्म खुशबू कोई
जिस्म जैसे मेहक्ती हुई चांदनी
जिस्म जैसे मचलती हुई रागिनी
जिस्म जैसे कि खिलता हुआ एक चमन
जिस्म जैसे कि सूरज की पहली किरण
जिस्म तर्शा हुआ दिलकश ओ दिलनिशिं
संदलिं संदलिं
मरमरिं मरमरिं

हुस्न-ए जाना कि तारीफ मुमकिन नहीं
हुस्न-ए जाना कि तारीफ मुमकिन नहीं
अफरीन अफरीन
अफरीन अफरीन
तु भी देखे अगर तो कहे हम-निशिं
अफरीन अफरीन
अफरीन अफरीन
हुस्न-ए जाना कि तारीफ मुमकिन नहीं
हुस्न-ए जाना कि तारीफ मुमकिन नहीं

जाने कैसे बांधी तूने अखियों की डोर
मन मेरा खींचा चला आया तेरी ओर
मेरे चेहरे की सुबह जुल्फों की शाम
मेरा सब कुछ है पिया
अब से तेरे नाम
नज़रों ने तेरी छुआ
तो है ये जादू हुआ
होने लगी हूं में हसीन

अफरीन अफरीन अफरीन
अफरीन अफरीन अफरीन
अफरीन अफरीन अफरीन
अफरीन अफरीन अफरी

विराट ने तिला उचलून घेतले..पिहुची तर त्याच्याकडे बघायची हिम्मतच होत नव्हती...स्टेप्स वरुन चालु लागला.

पिहु,

हहं तिची अजुन नजर खालीच होती.

तु कंफर्ट आहेस ना..तो काळजीने तिला विचारतो.

पिहु ने नजर वर करत त्याच्या डोळ्यात बघुन डोळ्यानेच हो म्हणाली...

विराटने तिला खाली उतरवले आणि डोर ओपन केले.पिहुने एकदा त्याच्याकडे आणि दाराकडे बघितलं तेव्हा ती समजून गेली ..

विराट हसत तिला हाताला धरून आत आणतो...पुर्ण रूम सजवलेली होती...रेडकरच्या पाकळ्यांच्या पायघड्या ,त्यावर सेंटेड कॅन्डल बेड वर पाकळ्यांनी हार्ट काढले होते..पावसाच्या आवाजाने आज संगीत धरले होते..गॅलेरीची स्लाईडीने उघडी असल्याने गार वारा अंगाला भिडुन गोड शहारा आणत होता.

विराटने दार लावताच पिहुचा श्वास अडकला. ..त्याने हळुच त्याचे बोट तिच्या उघड्या कमरेवरुन वेलाटी करत फिरवत पुढे आला .

पिहु अंग चोरुन एकटक त्याच्या डोळ्यात बघत होती.त्याची नजर बघुन पिहु मागे मागे सरकु लागली..तो ही तिच्या डोळ्यात बघतच तिच्या कडे एक एक पाऊल जात होता...मागे भिंत आल्याने पिहु जागीच थांबली..विराट हलक हसत तिच्या जवळ येतो..तिच्या दोन्ही बाजुने हात भिंतीवर टेकवतो....पिहु लाजुन डोळे घट्ट बंद करुन खाली बघते.तो एका हाताने तिची हनुवटी पकडुन वर करतो...तिचे ओठ थरथरत होते..तिच्या ओठांच तीळ आज चमकत होते.,
पिहु ,आय लव्ह यु...तो एकदम रोमँटीक स्व‌रात बोलतो...

त्याच्या आवाज कानात गुदगुदल्या करत होता...तिच्या चेहरयावर लाजेची लाली पसरली होती...दोघांचे ही श्वास जड झाले होते...गार वारयाने तिचे केस तिच्या चेहरयाशी खेळत होते...तो तिच्या केसांवरुन हात फिरवत चेहरयावरुं‌न बोट फिरवत गळ्यापर्यंत येतो..पिहु त्याच बोट धरते.तिच अंग अंग शहारुन गेले होते.विराट ने त्याचे बोट सोडवुन तिचाच हात पकडुन तिला अलगद वळवले...पिहुचा श्वास फुलला होता...डोक्याने काम करायचं सोडुन दिलं होते..त्याने तिचे केस एका बाजुला घेतले.. तिची गोरीपान पाठीवरुन हात फिरवत मानेवर पाठीवर किस करत ब्लाऊझ ची डोरी ओढली .पिहुने पदर हातात घट्ट पकडला ..त्याच्या स्पर्शाने ती ही मोहरुन जात होती..विराट ने तिला स्वतःकडे वळवून तिचा चेहरा दोन्ही हातात धरून तिच्या नाजुक ओठांवर ओठ ठेवले...पिहूही त्याला साथ देऊ लागली... नकळत तिचे हात त्याच्या पाठीवर फिरु लागले ..किती क्षण गेल्यानंतर दोघांचे ओठ वेगळे झाले ..दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत जोरजोरात श्वास घेत होते...
विराट त्याच्या शर्टची बटण काढत शर्ट काढुन फेकला....पिहूने नजर खाली घेतली..

पिहु माझ्याकडे बघ,तो तिचा चेहरा वर करत बोलतो...पिहुने नजर टाकली आणि डोळे त्याच्या देहावरच स्थिरावली..त्याला इतक जवळुन तिने आजच बघितलं होते.त्याने तिचा हात पकडुन तिला जवळ ओढले तशी ती त्याच्या छातीवर आदळली...नकळतच तिचे हात त्याच्या दंडाव‌रुन मानेवरुन फिरु लागले..विराट ही तिच्या मोहक स्पार्शाने ‌उत्तेजित झाला.दोघांची नजर एकमेका़ंच्या स्पर्शासाठी अतुर झाली‌ होती..विराट ने पिहुला दोन्ही हातांवर उचलुन घेतले‌आणि बेडवर बसवले..विराट खाली झुकुन तिच्या पायावरुन हात फिरवत किस करु लागला‌..पिहु ने ही अंग बेडवर झोकुन देत ती एका अंगावर येऊन अंग चोरुन लाजु लागली..आज दोेघे फक्त स्पर्शाची भाषा बोलत होते...वि‌राट हसत तिच्या जवळ झोपला.. बाहेर वीजांचा कडकडाट होताच पिहु पटकन विराटकडे वळुन,कुशीत शिरली...तिच्या चेहरयावर आलेले केस त्याने मागे घेतले...
पिहुचे ही हात त्याच्या केसांमधे कधी पाठीवर फिरु लागले... त्याने तिच्या हातात हात गुंफवुन बेडवर घट्ट करत तिच्यात समावुन गेला...पिहुला ही आज त्याच्या प्रेमात बुडुन जायच‌ होते..बाहेर पावसाने वेग धरला होता...पुर्ण रुमभर फक्त पिहूच्या बांगड्याच्या आवाज खणकत होता...विराट तिला फुलाप्रमाणे फुलवत होता....ती ही त्याला साथ देत होती..जशी रात्र सरत जात होती तस त्यांचे प्रेम फुलत‌ होते...

आज खरया अर्थाने दोघे पती पत्नी झाले होते.❤❤❤
.
.

विराट ने ब्लँकेट ओढुन घेत पिहुला कुशीत घेतले....तिचे डोळे पाण्याने भरलेले होते...त्याने तिचे डोळे‌ पुसत तिच्या कपाळावर डोळ्यांवर किस केले . पिहु पण त्याला बिलगुन झोपली .

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

कसा वाटला भाग नक्की कळवा ....काही चुकले असेल तर क्षमस्व 🙏