ती__आणि__तो... - 21 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती__आणि__तो... - 21

भाग__२१


रणजीत सगळ्यांना सोनाक्षीबद्दल सांगतो...फक्त त्यांच्या प्रेमाविषयी कोणाला काही बोलात नाही...राधा ही त्यांला तेवढीच साथ देत होती...घरच्यानाही तिच्याबद्दल ऐकून वाइट वाटत होत...



महेश__ ह्म्म्म....खरच खुप वाइट गोष्टी घडल्यात तुझ्यासोबत सोनाक्षी...



सदाशिव__ हो...आणि तू इकडेच राहा अगदी बिंदास्त...काय दादा..



महेश__ हो आम्हाला काही हरकत नाही...कायमची राहा आमच्या जवळ तू..



माधवी__ हो खरच चालेल आम्हाला



सुमन__ हो ना



रम्या__ हो..तू पण आता मस्त राहा हसत खेळत...अजिबात घाबरु नकोस...



राहुल__ हो...काही लागल तर बिंदास्त माग...



रेवा__ हो आपण खुप मज़्ज़ा करू ह



सोनाक्षी__ हम्म..तुम्हा सर्वांचे खरच खुप खुप आभार..तुमच्या सारखी माणस मिळन खुप अवघड असते..



आजी__ बाळा आता आभार नको मानूस...आमच्या घरातली एक सदस्य बनून राहा...



रुता__ बर आम्ही तुला कोणत्या नावाने हाक मारायची...आणि मी काय बोलू तुला......(सोना जवळ जात)



सोनाक्षी__ (थोड़ हसुन).....ह तू मला सोना दीदी बोल ह्म्म्म😀



रुता__ ह चानेन...काकू चानेन ना....



राधा__ हो हो चानेन....😂वेडु...



शीतल__ बर आता सगळी जेवून घ्या...जेवन बी तयार हाय...



माधवी__ हो...शीतल तू आणि रामु काका ताट वाडायला घ्या...अन रेवू जा सोनाला रणजीतच्या रूम शेजारी खोली आहे ती दाखव...ह आणि तिचा सामान तिकडे ठेव...



रेवा__ हो आई....चल सोना...



सगळे मस्त जेवण करतात...गप्पा मारतात...राधा आणि रणजीत सोनासाठी आनंदी होते...कारण त्यांना भीती मनात होतीच की घरचे तिला स्विकारतील की नाही...पण सगळ नीट झाल....आणि रणजीतच्या मनातील जी अनामिक भीती होती ती ही गेली...मग काहीवेळाने सगळे आंपल्या खोलीत झोपायला जातात....



********************************



राधा आणि रणजीत त्यांच्या खोलीत जाउन गप्पाच मारत बसले होते....



राधा__ चला...सोना घरी आली आणि सगळ्यांमध्ये मिसळून गेली हे बर झाल...



रणजीत__ हो...



राधा__ तीच सगळ आता निट झाल की मग झाल...बर जीत....



रणजीत__ (चमकुन)....काय....😀



राधा__ कुठे काय आ काय नाही....



रणजीत__ तू जीत बोलीस मला



राधा__ नाही..ते काय झाल रण स्वरपेटीतच राहील आणि जीत बाहेर पड़ल😅



रणजीत__ ह्म्म्म...बोल काय बोलात होतीस...☹️😏



राधा__ अरे मी म्हंटल की..उद्या तू आंपल्या इकडे स्कूल्स मध्ये टीचर्स च्या जॉब आहेत का बग आणि सोनाशी बोल मग तस तिला विचारुन चौकशी कर....



रणजीत__ हो उद्या करतो...



तेवढ्यात लाइट्स जातात...सगळीकडे अंधार होतो राधा घाबरते...आणि जाउन रणजीतच्या कुशीत शिरते...राधा जस त्यांला मीठी मारते तस तिचा हृदय जोरात धड़धड़ करू लागत...रणजीतचे ही तेच हाल होते...काही क्षण दोघा एकमेकांच्या डोळ्यात हरवले..अंधारात त्या शांततेत..त्यांच्या ह्रदयायची धड़धड़ दोघाना ही ऐकु येत होती....तेवढ्यात बाहेरुन कसला तरी आवाज आला...आणि राधा घाबरून रडू लागली😂😅



राधा__ (डोळ्यात पाणी आनत)...आआ र रणजीत....😢बाहेर बग कोनतरी आहे....(शर्टला घट्ट पकडत)...☹️



रणजीत__ राधा...राधा घाबरु नकोस..बाहेर काही नाही आहे....थांब.....(आवाज देत).....ए कोन आहे रे बाहेर...



शिवा__ रणजीत साहेब...मी आहे शिवा...ते लाइट्स का गेल्यात ते चेक करतोय......(बाहेरुन बोलात)



रणजीत__ आ काय झाल म..?



शिवा__ आ साहेब ते बाहेर जरा पावसामुळे वायर टूटले...मी वायरमैन बोलावले आहे...येतील ते..२ तासात लाइट येईल



रणजीत__ ह बर....
झाल आता तरी राधा...शिवा होता तो...रडू नकोस गप...



राधा__ हु..



रणजीत__ आणि असच जर मला मीठी मारून राहशील तर दोन गोष्टी होतील....एक तर माझ्या शर्टचे बटन निघतील🤣 आणि....(तिच्याकडर बघत)....दूसरा मी तुझ्याकडे खेचला जाइन...तुझ्याकडे attract होइन.......



रणजीतच्या अशा बोलण्याने...राधा त्याच्यापासुन लागेच दूर होते...रणजीत तिला तसाच एकटक बघत उभा असतो...राधाला त्याच्या अशा बघण्यामुळे आता okward फील होत होते...



राधा__ (चाचरत).....रर रणजीत.......(खाली बघून)



रणजीत__ (तिच्याकडे बघत).....हम्म्म्म.....😍



राधा__ (थोड़ लाजुन)....रणजीत..अस का बघतोयस..मला कसतरी वाटतंय...प्लीज...😳



तस रणजीत हसतच तिच्यावरून नजर हटवतो...आणि बेडवर बसतो...मग राधाही बेडवर त्यांच्यासमोर पाय वर करून बसते....



रणजीत__ बर आता लाइट गेले तर ३ तास काय करायच...



राधा__ काहीही..तू बोल..गप्पा मारत बसूया



रणजीत__ ओके...बोल म...मला सांग तुला एवढी भीती का वाटते अंधाराची...डॉक्टर आहेस ना मग...🤣😂



राधा__ का डॉक्टर आहे म्हणून काय झाल...मी माणूस पण नाही का...वाटू शकते मला भीति...😏



रणजीत__ बर बाबा...😂...(तोंड सीरियस करत).....बर राधा....तुला एक गोष्ट माहित आहे का...



राधा__ काय रे😕



रणजीत__ मला सांग तुझ गण कोणत आहे?...



राधा__ आ मनुष्य गण....का...?



रणजीत__ बापरे.........(घाबरायच नाटक करत😂)




राधा__ काय झाल☹️



रणजीत__ (आवाज बदलून).....अग अस म्हणतात...ज्यांच मनुष्य गण असते त्यांना भूत दिसतात...



राधा__ (घाबरून)....कायय.....😕😥😫गप तू काहीही बोलतोयस....



रणजीत__ खरच...रम्या वहिंनीच पण मनुष्य गण आहे..तिलाही असच वाटत होत आधी...पण एकदा...असच लाइट्स गेल्या होत्या..आणि रम्या वहिनी दादाला शोधत होती...आणि तिला घुंगरूचे आवाज काय एकु येत होते...सावल्या काय दिसत होत्या...ती खुप घाबरलेली तेव्हा...म्हणून बग आता लाइट्स गेले तर ती बाहेर आले का...येणारच नाही तर ती..तिच्या हातात तू तो धागा बघितला आहेस ना तो त्यासाठीच बांधलाय तिच्या हातात..मग...😕......(मनात)...बापरे,ही घाबरली फूल😂😂🤣



राधा__ हो...अरे...माझ्या हातात तर नाही धागा...😕☹️😥




रणजीत__हो न आम्हाला कुठे माहित होत तुझ मनुष्य गण आहे ते.....



राधा तशीच घाबरत विचार करत बसते...रणजीतला हसू येत होत पन तो कंट्रोल करत होता...




रणजीत__ तुला...माहित आहे रात्री भूत फिरायला निघतात राधा....चेटकीण,मानकाप्या...असे खुप भूत असतात....



राधा__ काय...☹️😕पण हे मानकाप्या काय आहे



रणजीत__ मानकाप्या म्हणजे जो सरळ माणसाला पकड़तो आणि त्याची मान कापतो....आणि..(एक्टिंग करून दाखवत).....रक्त पितो अस....👿👹



राधा__ (थरथरत).....कायय..ईईई...😦☹️😕😥



रणजीत__ राधा खरच ते.......(बोट करून दाखवत).....आआ राधा तुझ्या मागे बग कोन आहे हा.......



राधा__ आआआआआआ रणजीत😮😵😵..........



राधा जाउन रणजीतच्या मांडीवर बसते आणि त्याच्या गळ्यात हात टांकते...आणि जोरात ओरडते....रणजीतला राधाचा अस अचानक बसन्यामुळे जरा वेगळच वाटल..पण तीच जवळ येन आता त्यांला आवडत होते....



राधा__ रणजीत...कोन होता...



रणजीत__ hahahahaha😂😂😂😂😂🤣



राधा__ हसतोयस का....



रणजीत__ अग जे काय मी तुला सांगितले ते खोट होता...मी फक्त तुझी मस्करी करत होतो ग...



राधा__ (मांडीवरुन खाली उतरत).....काय...😠.



राधा चिड़ते आणि बाजुच्या उश्या घेऊन त्यांला मारते...तो मात्र जोरात हसत होता...😂मग राधा तोंड फुगवुन बसते...



राधा__ गप तू...मला या अशा गोष्टी लागेच पटतात...मी खुप घाबरले होते....



रणजीत__ सॉरी ग...तू पण कशी घाबरत होतीस😂



राधा__ (आठवुन).....हो ना😂😂😂😂😂😂



दोघेही हसत असतात...मग लाइट्स येतात आणि दोघेही झोपतात....




राधा आणि रणजीतला आता एकमेकांसोबत राहण आवडत होत...बोलन आवडत होत...दोघेही नव्याने भेटत होते...दोघांच्या मनात काहीतरी स्पेशल फीलिंग्स आहेत नक्की..पण दोघाना यची जाणीव अजुन नाही... त्यांच्या नात्यात आता ओढ़ निर्माण झाली होती म्हणून ते एकमेकांच्या नकळत जवळ येत होते...नात्यामध्ये ओढ़ निर्माण झाली की प्रेमाची वेल अधिकच फुलत जाते..


******************************


सोनाक्षीला इकडे येऊन...आता खुप वेळ उलटला होता...सगळ्या घरात आता तीं रुळली होती अस वाटत होत की तीं सुद्धा याच घरची आहे...रणजीतने त्याच्या ओळखीवर अंदेरी मधील मोठ्या इंग्लिश स्कुलमध्ये सोनाक्षीला टीचरचा जॉब मिळवुन दिला...ती या सगळ्यात खुप खुश होती...



सकाळी सगळ्यांच नेहमी प्रमाणे रूटीन चालू होत...रणजीत ऑफिसला जायला निघाला होता पन त्यांला त्याचा रुमाल आणि इतर गोष्टी भेटत नवहत्या...



रणजीत__ आ....ए गधा......अरे काय बोलो हें😂😜....आ ब राधा...राधा...



राधा__ हम्म बोल काय झाल...ओरडतो कशाला...



रणजीत__ माझा रुमाल,वॉच,पॉकेट कुठे आहे...मला काही भेटतच नाही आहे




राधा__ हम्म देते मी...



रणजीत__ भेटणार तरी कस म्हणा तू रूम साफ करतेस ना....😏



राधा__ बर...मग तू करत जा मग समजेल तुला...😤😏...(सगळ हातात देत)…...घे..रुमाल,वॉच,पॉकेट....😏



रणजीत__ हम्म...आभारी आहे...



राधा__ ह्म्म्म जा आता नाटकी...😏...बर ऐक ते मी काय म्हणत होते...आपण आज......


(तेवढ्यात रूममध्ये सोनाक्षी येते..आणि रणजीत राधाच बोलन इग्नोर करतो...)



रणजीत__ अरे सोना...ये...



सोनाक्षी__ आ...जीत तू ऑफिसला निघतोयस ना..मग एकत्र जाऊया...



रणजीत__ हो...चल....



सोनाक्षी__ राधा चल तू पन सोबत...तू पण हॉस्पिटलला जात अशील ना...



राधा__ (रणजीतकड़े रागात बघत).....नको..मी शिवा दादासोबत जाइन...😠😏😤...(आवाज देत).....शिवा दादा गाड़ी काढा....😠😏



रणजीत__ (मनात)....बापरे..😂😀एवढी का भड़कली ही...🤣आणि मी बोलतो तसाच बोली...आहाहा काय Attitude आहे😍😂😀



राधा,रणजीत आणि सोनाक्षी आंपल्या कामाला जातात...राधाला रणजीतला काहीतरी सांगायचं होत आणि त्यांनी आज फस्ट टाइम अस इग्नोर केल्यामुळे राधाच लक्ष कामात लागत नव्हतं...



राधा__ अस कस करू शकतो रणजीत...आम्ही इतका भांडतो पण आजवर त्याने माझ बोलना कधी इग्नोर नाही केल...मला आज कुणास ठाऊक पण त्यांच्यासोबत कॉफी प्यावी बाहेर अस वाटत होत..सकाळी तेच बोलात होते पण माझ ऐकला नाही...सोना आली तस त्याने इग्नोर केल मला..मान्य आहे सोनावर त्याच प्रेम आहे...पण आता मी आहे ना त्याची बायको...मग अस का वागतोय हा...सोना आल्यापासून तो मला इग्नोरच करतोय...पन मी का त्याचा इतका विचार करतेय...😏त्यांला माझी परवाह नाही...एक फोन सुद्धा केला नाही...



(तेवढ्यात तिचा फोन वाजतो...📱)



राधा__📱 Hello...हम्म जीरु बोल ग...



जागृती__📱 राधुडे काय झाल ग...आवाज असा का तुझा...



राधा__📱 काही नाही तू बोल काय झाल...



जागृती__📱 हा अग आंपल्या ग्रुपने ठरवले आहे की बाहेर हॉटेल मध्ये भेटायच...तुम्ही ये मग...



राधा__📱 नको ग तुम्ही जाउन या....



जागृती__📱 अस का करतेस ग...राधू तुला यावच लागेल ह...नाहीतर मी नाही बोलणार...



राधा__📱 बर बाई येते...वेळ आणि अड्रेस मेसेज कर हम्म....☺️



जागृती__📱 हो चल बाय..😘



राधा__📱 हम्म बाय..!!!😘

(राधा फोन ठेवते....)



तेवढ्यात जागृतीचा मेसेज येतो...मग राधा तीच काम आटपते आणि त्यांच्या ग्रूपला भेटायला निघते...ऐका कैफ़े बाहेर तिचा ग्रुप उभा होता तिची वाट बघत...



राधा__ हाय जीरु....(मीठी मारून)



जागृती__ राधुडे....खुप छान वाटला तुला आज बघुन...



राधा__ हेय सनम.....कसा आहेस बड़ी...



सनम__ मस्त राधा तू



राधा__ fine....
हाय पल्लू कशी आहे...



पल्लवी__ मी मस्त...बर झाल तू आलीस ते...



राधा__ हो.....(मीठी मारून)....विकुड़ी...



विक्रम__ राधूड़ी🤗🤗कशी आहेस डार्लिंग...ख़र खुप मिस केल तुला...



राधा__ मी पण...



पल्लवी__ बर चला आत जाऊ या...



सगळे आत जातात...आणि खायला मागवतात मस्त गप्पा मारतात...अर्ध्या एक तासानी राधाच लक्ष बाहेरच्या टेबलवर जात...तिकडे रणजीत आणि सोनाक्षी बसले होते...त्यांच्या टेबल जवळ खुप शॉपिंग बॅगस पण होत्या...दोघेही हसत खेळत कॉफी पित होते...राधाचा इकडे जळफलाट होत होता....



राधा__(मनात).....रणजीत ने माझ बोलन इग्नोर केल त्यात साधा एक कॉल नाही केला...आणि मला तर सारखा मला काम आहेत अस सांगतात आज सोना सोबत फिरतोय हा...😠😠 म्हणजे मी पागल ना....😤😤😤



विक्रम__ बर फ्रेंड्स निघूया....मला ही काम आहे...आणि लेट पन झालय..



पल्लवी__ हो...चला...विक्रम मला घरी सोड..



विक्रम__ हो मॅडम...राधू तुला पन सोडू का.



राधा__ (तिकडेच बघत)....नको शिवा दादा आहेत...मी जाइन...



विक्रम__ बर...



सनम__ चला पुन्हा...भेटू...



सगळे एकमेकांचा निरोप घेतात...आणि जातात...राधा चिडतच कैफ़े बाहेर जाते....राधाला अस जाताना रणजीत बघतो..पण तीं रागात चालले हे ही त्यांला कळत म्हणून तो काही बोलात नाही....ती कारमध्ये बसून...घरी जाते...🚗


*****************************



रात्री रणजीत सोनाक्षी घरी येतात...रणजीत खोलीत जातो तर राधा तिचा काय तरी काम करत बसली होती...तो आला तरी राधाने त्याच्याकडे पाहिले पण नाही..मग तो फ्रेश होऊन आला....



रणजीत__ आआ र.....



रणजीत काहीतरी बोलायचा आतच राधा रागात त्याच्याकडे एक कटाक्ष टाकते...



रणजीत__ (मनात)...बापरे तवा खुप तापलाय...😂
आ...राधा जरा बोलायच आहे...



राधा__ ह्म्म्म



रणजीत__ आज तू...स्टेशन जवळच्या कैफ़े मध्ये का आली होतीस...मी पाहिला तुला बाहेर जाताना..आणि तू रागात होतीस..अस का??



राधा__ हो...माझा ग्रुप पन होता सोबत...त्यांना भेटायला गेलो होते....आणि पाहिले मी तुला तिकडे सोनासोबत...



रणजीत__ अग तू आवाज का नाही दिलास मग...मी आणि सोना आज दिवसभर फिरत होतो माहित आहे....तू पण......



राधा__ (त्याच बोलन मधे तोड़त).......का देऊ आवाज आणि कसा...तू बिझी असतोस ना...आज ही होतास...रोज मी बोलते तेव्हा मी कामात बिझी आहे अस सांगतोस मग आज तिच्यासोबत बरा गेलास फिरायला ते ही दिवसभर...आज सकाळी मी काहीतरी बोलात होते तर इग्नोर केलास बोलन माझ...



रणजीत__ अस नाही आहे राधा..सकाळी तू काहीतरी बोलात आहेस हेच मला माहित नाही...मी घाईत होतो..आणि सोनाने फोर्स केला सो गेलो ग...मान्य आहे तुझ्यासोबत नाही गेलो पण...



राधा__ (हात दाखवून).... राहुदे...🤚 तुझे explanations तुझ्याकडे ठेव...सगळ कळत आहे मला...आणि मला काही फरक नाही पड़त...माझा काय हक्क तुला जाब विचारायचा...😔😏



रणजीत__ राधा...काय बोलतेस हे...अग तू छोट्या गोष्टीचा ईशु का करते...



राधा__ मग काय करू...तू सोना आल्यापासून तिची जास्त काळजी घेतोय आणि मला इग्नोर करतोयस...कुठे बाहेर पन जात नाही आपण तरी माझ्या प्रत्येक गोष्टी तुला छोट्या वाटतात...आणि एक साधा कॉल तरी केलास का मला...



रणजीत__ हो पन मी ते सोना...



राधा__(मधे बोलात).....ह्म्म्म आता सोना बरोबर गेला होतास ना मग कस लक्षात राहील तुझ्या...तुझ्या डोक्यात तर सोनाच असणार ना...



रणजीत__ (ओरडत).....shut up राधा😠



राधा__ माझ्यावर ओरडू नकोस मला ही ओरडता येत...😠



रणजीत__ ओरड मग सांगतो तुला...😠तुझ ऐकतो आहे म्हणुन काहीही बोलतेस तू....



राधा__ जऊदे मी आता काय बोलताच नाही...



रणजीत__ हो बर होइल....जा निघ...निघ😠



राधाच्या डोळ्यात पानी साचत...ती तशीच रूम बाहेर जाते...रणजीत रागातच त्याचा हात जोरात टेबलवर आपटतो...त्यामुळे त्याच्या हाताला लागत...राधा खाली जाते सगळे जेवणासाठी तयारी करत होते...




सुमन__ राधा जा रणजीतला पण बोलव...



राधा__ आ मी....



सुमन__ हम्म जा बोलाव त्यांला...



राधा__ मी आताच खाली आले ना...आ बबडू.....



रुता__ हा काकू...काय झाल......



राधा__ बबडू जीत काकाला बोलाव जा...



रुता__ ओके काकू....



सोनाक्षी__ जीत काम करतोय का ऑफिसच....



राधा__ ह्म्म्म....



रुता काहीवेळाने खाली येते...आणि राधाजवळ जाते...



रुता__ काकू..जीत काका ना बेडवर बसलाय आणि त्याच्या हातमधून रक्त येतोय...त्यांला लागल...



राधा__ काय...😥☹️



ही गोष्ट बाजूला असलेल्या सोनाक्षीला ही ऐकु गेली....राधाच्या आधी तीच त्यांच्या खोलीत पळत गेली...राधाला हे जरा खटकल...राधा खोलीत आली तर सोनाक्षी रणजीतच्या जवळ बसून त्याच्या हाताला पट्टी लावत होती...राधाला हे बघून राग आला ती काहीच न बोलता खाली निघुन गेली....सगळ्यांचा जेवून झाल पण रणजीत सोनाक्षी अजुन खाली नव्हते आले...म्हणून बाकीचे जेवून त्यांच्या खोलीत गेले...राधा त्यांच्यासाठी तिकडे थांबली होती...



राधा सोबत रुता पण बाहेर बसली होती...काहीवेळाने सोनाक्षी आणि रणजीत खाली आले....रणजीत खुर्चीवर बसला...राधा जेवन वाढनार होतीच कि सोनाक्षी त्यांला जेवण वाढ़ायला लागली....



सोनाक्षी__ अरे जीत तुझ्या तर जेवणाच्या हातावर लागलाय...जेवशील कस आता तू...



रुता__ राधा काकू भरव तू काकाला....



राधा आणि रणजीत एकमेकांकड़े बघतात...राधा त्यांला भरवायला उठनारच तेवढ्यात सोनाक्षी त्यांला भरवू लागते...हे बघून राधाचा पारा चढतो...ती रुताला घेऊन तशीच खोलीत जाते....रणजीतला समजत राधा चिडली पण का ते निट कळत नव्हतं...



जेवून रणजीत रूममध्ये आला तर राधा आणि रुता झोपल्या होत्या...रुता राधाला घट्ट मीठी मारून झोपली होती...राधाने ही रुताला तिच्या कुशीत घेतला होता...हे बघून रणजीतच्या चेहऱ्यावर हळूच स्माईल आली...मग तो ही रुताच्या शेजारी झोपला....


*****************************



सकाळी रणजीत उठला...राधा कुठेच नव्हती..रुता त्यांला पकडून झोपली होती...तिचा हात हलुच बाजूला काढून तो उठला आणि फ्रेश होऊन खाली गेला...



रणजीत__ गुड़ मॉर्निग....



रम्या__ गुड़ मॉर्निग...



रणजीत__ वहिनी बाकीचे कुठे आहेत...



रम्या__ अरे बाबा आणि काका ऑफिसला गेले...राहुल पण आताच गेला...आई आणि काकू मार्केटला गेलेत...सोना आहे बग खोलीत..



रणजीत__ हम्म...राधा?



रम्या__ हॉस्पिटलला..



रणजीत__ लवकर गेली...



रम्या__ हो रे...तिला काय झाल काय माहित...काल रात्री पण जेवली नाही तीं...आज सकाळी नाश्ता पन नाही केला आणि टिफिन पन नाही घेऊन गेली...



रणजीत__ काय......



रम्या__ हो ना...बर हे घे तू कर नाश्ता मी बबडूला बघून येते....



रणजीत__ हं....
(मनात).....म्हणजे काल राधा माझ्यासाठी जेवायला थांबली होती....बहुतेक आज पण तीं माझ्यामुळे उपाशी राहिली...अरे शीट..मला तिला भेटायला हव...पण कशी भेटेल ती....हॉस्पिटलमध्ये तिला काम असणार...हम्म आज रात्री घरी तिच्याआधी येतो...मग तिच्याशी बोलतो...



रम्या__ अरे जीतू अजुन देऊ का...



रणजीत__ नको वहिनी खुप झाल...ऑफ़िसला निघतो आता...



रुता__ बाय..काका...



रणजीत__ बाय बबडू...


********************************


{हॉस्पिटलमध्ये....}



राधा__ गुड़ मॉर्निग आजोबा कशी आहे तब्बेत...



आजोबा__ हा डॉक्टर बाई आता तब्बेत हाय तशी बरी...तुमच्यामुळ झाल समद....



राधा__ आजोबा मी काही नाही केल..तुम्ही निट काळजी घेतली....वेळेवर गोळ्या घेता...म्हणून तुम्ही बरे झालात...आता उद्या तुम्हला डिस्चार्ज मिळतोय ना...



आजोबा__ व्हय...



राधा__ मी सांगितले ना तशीच काळजी घ्या बर...चला येते...



आजोबा__ ह पोरी ये...



क्रिश__ गुड़ मॉर्निग डॉक्टर रेडिओ....😀



राधा__ कोन.....(त्याच्याकडे बघून).....अरे क्रिश...कसा आहेस...काय यार लग्न काय झाल विसरला तू मला...हनीमूनला गेलास तो आलच नाहीस....



क्रिश__ सॉरी ग बाई...कालच आलो...



राधा__ बर...नंदिनी कशी आहे...



क्रिश__ मस्त..बर चल कामाला लागतो..आपण काय गप्पा मारुच...



राधा__ हम्म...ओके..


********************************



रात्री रणजीत लवकर घरी आला...त्याची खोली आवरली...मग राधा आली...खोली अगदी निट ठेवली होती..राधाला हे अजब वाटल..मग ती फ्रेश होऊन खाली गेली आणि सगळ्यांना जॉइन झाली...



राधा__ रम्या ताई आमची रूम तुम्ही साफ केली का...



रम्या__ नाही...जीतने केले...आज लवकर आला ना तो...



राधा__ काय...ह्म्म्म..बर सोना कुठे दीसत नाही...



रुता__ सोना दिदी आणि रणजीत काका तर...तिच्या लूममध्ये गेने....



राधा__ ह्म्म्म...आ ताई मी आलीच...



राधा तशीच सोनाक्षीच्या खोलीकड़े गेली...आत जाणार की तोवर दार ओपन झाल..समोर सोना होती...



सोनाक्षी__अरे राधा ये ना...



राधा__ जेवायला खाली बोलवतायत...



सोनाक्षी__ ओके आलो आम्ही



राधा तशीच तिच्या खोलीत जाते...रणजीत खाली येतो तर राधा जेवायला नव्हती...मग तो ताट घेऊन त्यांच्या खोलीत जातो...राधा बेडवर बसलेली...



रणजीत__ राधा,जेवून घे...तू काहीच खाल्ला नाही आहेस...



राधा__ भूक नाही मला...तू जेवून घे...



रणजीत__ तू नाही जेवनार तर मी पन नाही जेवत मग...



राधा__ ठीके नको जेवुस....गुड़ नाइट....(चादर अंगावर घेत)



रणजीत__ र राधा अग.....☹️😥😔.....ह्म्म्म आयडिया....



रणजीत जाउन राधाच्या समोर बेडवर बसतो..कान पकडून सॉरी बोलात असतो आणि गाण बोलायला लागतो....राधा त्याच्याकडे रागातच बघत असते...ती दुसरीकडे वळते तर रणजीत तिकडे जाउन कान पकडून बसतो....😀


🎵🎶

वो है जरा खफा खफा तो नैन यू चुराये है के हो हो..हो हो...
वो हे जरा खफा खफा तो नैन यू चुराये है के हो हो..हो हो..
ना बोल दु तो क्या कहूँ वो हसके यू बोलाए है के हो हो..हो..



त्याचे हे केविलवाने प्रयत्न बघून राधाच्या मनात त्यांला माफ कराव अस वाटत होता...तो एवढा हसुन माफी मागत होता..तिला बोलवात होता...पण तरी तिच्या डोक्यात बराच राग होता...



🎶🎵

ऐसे मत सताईये जरा तरस तो खाई ये..
दिल की धड़कन मत चढ़ाई ये..
कुछ नही कहूंगा में ना अखियाँ झुकाई ये..
सर को कांधे से उठाई ये..



मग राधा उठून बसते आणि तीं ही गाण बोलते....



ऐसे नींद आये है कि हम्म ह्म्म्म ह्म्म्म.....
वो है जरा खफा खफा तो नैंन यू चुराये है के हो हो..हो हो...



राधा__ वा रणजीत छान गाण गातोस की....😂



रणजीत__ हम्म राधा सॉरी खरच सॉरी...मी तुझ्यावर ओरडलो..मला ना खुप बैड फील होत होते ग...म्हणून तुला मनवायला आलो..मी पण नाही जेवलो ग☹️



राधा__ I am sorry too..मी पण उगाच चिडले...आणि आता सोबत जेवुया😂



मग रणजीत आणि राधा एकाच ताटात जेवतात....तेवढ्यात राधाला कोणीतरी त्यांना बघताय अस वाटल...म्हणून ती दरवाजा बाहेर वाकुन बघू लागली...पण कोन दिसत नव्हतं....



रणजीत__ काय झाल राधा...? काय आहे बाहेर



राधा__ कोणीतरी बाहेरुन बघतेय आपल्याला अस वाटल...



रणजीत__ हम्म वेट......(बाहेर बघून)....कोणी नाही आहे ग.....(दरवाजा लावत)....तुला भास झाला असेल...




राधा__ ह्म्म्म....(आवाज देत)...शीतल ए शीतल....वरती ये जरा....



शीतल__ हा बोलवल का



रणजीत__ प्लीज हा ताट घेऊन जाशील....



शीतल__ हो दादा दया ना..मला माहित होत तुमचा आता जेवून होइल म्हणून तुमच्या खोली बाहेर उभी होते..



रणजीत__ थांक्यु शीतल....



राधा__ तू होतीस होय बाहेर...घबरलस ग..



रणजीत__ जा आता हात धुवून ये...घाबरट..



राधा__ ह्म्म्म....



राधा चेंज करते आणि झोपी जाते...रणजीत ही आनंदाने झोपला होता...भांडण फाइनली मिटली यांची🤗



क्रमशः
(वाव...किती गोड़ आहे ना रणजीतची आयडिया..तुम्ही पन असच काहीतरी करून मनवत जा तुमच्या जोडीदाराला...बघा लगेच मानेल मग तो..राधा आणि रणजीत आता एकामेकांवर हक्क दाखवत होते...जे आधी किती भांडायचे,रागवायचे ते आता प्रेमाने एकामेकांशी वागतात...काळजी घेतात..इथुनच तर प्रेम वाढत ना....☺️)