ती__आणि__तो... - 22 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ती__आणि__तो... - 22

भाग__२२



रात्री १२ वाजता राधाचा फोन वाजला...ती डोळे चोळतच उठली....मोबाइल पाहिला तर स्क्रिनवर विकुड़ी अस नाव दिसल....



राधा📱: hello...बोल विकुड़ी....



विक्रम📱: सॉरी राधू तुला आता एवढ्या रात्री फोन करतोय....माझ जरा तुझ्याजवळ काम आहे...अग पल्लुच्या घरी आमच समजल आहे...आणि त्यांनी पल्लूला खुप मारल आहे ग....😢



राधा📱: क़ायsssss......विकुड़ी रडू नकोस अरे....



राधा पटकन उठून बाल्कनीमध्ये येते....आणि विक्रमला धीर देऊ लागते....



राधा📱: विकी...आता पुढे क़ाय झाल आहे..तरी म्हंटल मॅडम इतके दिवस कॉन्टैक्ट मध्ये का नाहीत....



विक्रम📱: अग मलाही कळत नाही आहे..मी Daddy ना सांगितलेल आहे ते सुद्धा क़ाय करायचा विचार करतायत...



राधा📱: एक काम करूया...उद्या आपण जाउन पल्लवीच्या घरच्याना समजवू...हम्म...मला तर वाटल नव्हतं अस होइल...पण मिळून कन्वेंस करू हम्म...



विक्रम📱: हो ग...😢आज मम्मीची आठवण खुप येतेय....



तिच्या आवाजाने रणजीत उठतो...तो पाहतो तर राधा बाल्कनीमध्ये उभी होती...तो हळूच उठतो आणि बाल्कनीजवळ जाउन त्यांच बोलन ऐकतो...



राधा📱: बाळा तू शांत हो आता...तू शाहाना मुलगा आहेस की नाही...आणि आता मला ही बोलायला नाही जमनार...रणजीत केव्हाही उठेल ना रे....



विक्रम📱: हम्म..तू जेवढे बोलीस ते खुप आहे ग...आणि प्लीज या मैटर बद्दल कोणाला म्हणजे कोणालाच सांगू नको...रणजीतला ही..आपल्यातच राहुदे ग तुला माझी शपथ आहे....



राधा📱: ओके..डार्लिग...😂हस आता...मी भेटायला येते न उद्या मग उदास नको होऊ...आणि झोप आता मला ही झोपु दे....



विक्रम: हु...बाय.....



रणजीत पटकन बेडवर जाउन झोपतो....राधा फोन ठेवते आणि रणजीत झोपलाय की नाही हे चेक करते आणि पुन्हा झोपी जाते....पन रणजीत मात्र रात्रभर विचारात हरवतो...कोनाशी राधा इतके बोलात होती ते ही रात्री??? आणि रणजीतच्या मनात तिकडेच संशयाची पाल पुटपुटली.....



*************************************


सकाळी सगळे आपापल्या जागेवर बसून नाश्ता करत होते....राधा रणजीतला सकाळपासन कुठे दिसली नव्हती म्हणून त्याची नजर खाली आल्यावर राधाला शोधू लागली...तो किचनकड़े बघत बघत गेला त्यांच लक्ष फक्त किचनकडे होत...तेवढ्यात समोरून राहुल आला आणि रणजीत राहुलला जाउन धडकला....



राहुल: अरेरे...जीतू..क़ाय करतोयस हे समोर बघून चाल ना....



रणजीत: दादा सॉरी ते....



रेवा: क़ाय भाई आजकाल लक्ष नसत तुझ कुठेच..😂



रणजीत: रेवा...तूला ना मारीन आता....



रम्या: जीत,रेवा क़ाय भांडण करताय तुम्ही...लहान नाहीत आता तुम्ही...



रणजीत: वहिनी ती बघ ग...



रेवा: क़ाय मी...



रम्या: रेवा...तू आधी बोलतेस ह जीतला..आता गप बस..नाहीतर फटका खाशील....



रणजीत: (चिडवत)......😂😛😛



रेवा: वहिनी ग तू सारखा भाईची साइट घेतेस...मला नुसत ओरडते...😕🙁



रणजीत: हा मग क़ाय...वहिनीचा लाड़का आहे मी...(तिच्या खांद्यावर हात ठेवून)



रम्या: हो हे ख़रय....(त्याच्या डोक्यावर हात फिरवत)



रेवा: जा बाबा😕मी जाते कॉलेजला...बाय....(उठत)




रणजीत: हा जा..



राहुल: रेवा....ए सोनुले...जीत क़ाय तू पन...मी आलो तिला समजवून...रेवा.....(मागे पळत)



रम्या: चला लाडोबा..नाश्ता करा...



रणजीत: हु...बर वहिनी राधा....



रम्या: हम्म..वाटलच मला..आता तू तिच्याबद्दल चौकशी करणार...थंब....राधा...ए राधा...चाय आन ग जीतला....



राधा तशी हातात चहा नाशत्याचा ट्रे घेऊन येते...मग रणजीत तिच्याकडे बघतो....आज राधाने सफेद,गोल्डन कलरची कॉटन साडी चांगली चोपुन आणि परफेक्ट घातली होती त्यात तिची फिगर वेलमेंटेन जी होती...केसांचा वरती पफ पाडुन लांम्ब सड़क केस ओपन ठेवली होती...राधाकडे आज रणजीत पाहतच बसला....रम्याला ते बघून जरा हसू आल...म्हणून ती किचनमध्ये गेली...



राधा: रणजीत...ए माकडा.....



रणजीत: आ...हा....सस सॉरी...(चाहा घेत)



राधा: ह्म्म्म....(आवाज देत)....आ आई...काकू..रम्या ताई येते मी.......(पर्स घेत)



माधवी: बाळा आज लवकर चालीस...आणि साड़ी घातलेस आज...



सुमन: हो ग...



राधा: हु...असच....आई ते जरा काम आहे आधी एक...



सुमन: कसल ग????



राधा: (अड़खळत)......आ ते आहे एक काम.....



सुमन: बर...रात्री लवकर ये...



राधा: हु....



रणजीत: राधा....मी सोडतो तुला....



राधा: नन नको...येते मी.....(बाहेर जात)



सुमन: जीत चल नाश्ता कर लवकर...



रणजीत: हम्म....(मनात)....म्हणजे नक्की राधा कोणाला तरी भेटायला जातेय....आज अड़खळत पण बोलात होती ती....मला बघायला हव...



मग रणजीत ही राधाचा पाठलाग करतो....राधा आज ऑटोने जाते....याच रणजीतला ही नवल वाटल..त्याने ऑटोचा पाठलाग केला....तर राधाची ऑटो पुढे जाउन एका चोकात थांबली....तिकड़ूं राधा समोर एक कार अली त्यातून एक मुलग उतरला रणजीतला तो पाठमोरा दिसला..मग राधा डायरेक्ट कारमध्ये बसली....रणजीतला काही कळेना...त्याने त्या कारचा ही पाठलाग केला...पण अचानक त्यांची कार मधून गायब झाली....रणजीत ही खुप चिडला....



***********************************


इथे राधा,विक्रम आणि त्याचे वडील पल्लवीच्या घरी पोहोचली....घरात खुप शांतता होती....सगळे खाली बसले होते...तिचे आई बाबा काहीतरी चर्चा करत बसले होते...



राधा: (दार नॉक करत).....नमस्कार..परेश काका...



परेश: राधा अग ये ना...पण हे लोक कोन आहेत?



राधा: काक...हा विक्रम आहूजा..आणि हे त्याचे वडील गुरुचरण आहूजा....



परेश: (रागात)...हाच ना तो ज्याच्यावर पल्लू.......



राधा: हो काका...



परेश: (रागात).....राधाssss...तुला माहित होत तरी तू यांना इथे आनल...



राधा: काका प्लीज बसून आणि शांतपणे बोलुया का...



अंजली: आहो...प्लीज शांत राहा..आणि पालव घबरतोय..ओरडू नका..



राधा: पालव...बेटा तू तुझ्या खोलीत जा ह्म्म्म....



पालव: ओके राधा दी...



राधा: अंजली काकू...पल्लवीला बोलवता का...



अंजली: पल्लू....बाळा खाली ये....



तेवढ्यात पल्लवी रडत खाली येते आणि राधाला मीठी मारते...तिच्या हातावर लाल अश्या चट्टया उठल्या होत्या...डोळे सुजले होते...राधाच्या ही डोळ्यात पानी आल...विक्रमला ही रडू आल...मग सगळे एकत्र बसले...



राधा: पल्लू....ठीक आहेस का ग



पल्लवी: ह्म्म्म☹️



विक्रम: पल्लू...Are u ok..?



पल्लवी: हो...😢



परेश: पल्ले...लांब हो😡



अंजली: बाळा इकडे ये बस...



राधा: काका मला तुमच्याकड़ून ही अपेक्षा नव्हती...इतक मारत का कोणी....



परेश: मग चूक केली तर मारायला नको....



राधा: काका मारून काहीही होत नाही...पल्लवी आता २५ वर्षाची आहे...५ नाही....आणि विक्रमला बघा ना क़ाय कमी आहे यात...



परेश: कमी त्यांच्यात नाही...जात एक नाही हमारी...आम्ही गुजराती...आणि ते पंजाबी...कस जमेल..



राधा: का नाही जमनार...काका आताच्या जमान्यात ही तुम्ही जातपात मानता...काका मला सांगा..तुम्हाला मैत्री करायला कोणत्याही जातीचे लोक चलतात...तुमच्या ऑफ़िसमध्ये पण खुप लोक ऐसे असतील जे वेगळ्या जातीचे आहेत तरी तुम्ही त्यांच्यासोबत बसून काम करता...त्यांच्याशी तुमचा एक चांगल बॉन्डिंग आहे...आहे का???



परेश: आहे तर....



राधा: मग तिकडे तुम्ही जात नाही बघत मग इकडे का?
क़ाय कमी आहे विकी मध्ये...डॉक्टर की शिकलाय...बिझीनेस आहे स्वतःचा...दिवसाला लाखो उडवले तरी संपनार नाही इतका पैसा आहे...आणि पैसापेक्षा महत्वाचा मुद्दा असा की...विक्रम आणि त्याचे बाबा खुप प्रेम करतात तिच्यावर...काळजी करतात...तिला आनंदी ठेवतात...फुलाप्रमाने जपतात...अजुन क़ाय हवाय...



परेश: 🙁



राधा: काका...आहो जात पात काही नसत...मानव हिच जात..आणि मानुसकी हाच आपला धर्म...रक्त सारख आहे ना आपल...काका मला सांगा..ट्रेनमध्ये वेगळ्या जातीचा मानुस अला तर तुम्ही त्याच्या शेजारी नाही बसत का...



परेश: अस काही नाही...



राधा: मग...आहो काका आंपल्या देशाचे राजे छत्रपती शिवजी महाराज यानी पन जात कधीच बघितली नाही...आणि नाही तशी शिकवण कधी सर्वाना दिली...जातपात माणसाने काढली ओ..आपण शगले समान आहत...काका आहो माझ्यावर विश्वास ठेवा..खुप खुश राहील तिकडे पल्लू...आणि काका आहो तुमच्या सुखासाठी ती तुमच्या जातितील मुलाशी लग्न ही करेल पन आनंदी कधीच राहणार नाही....



गुरुचरण: बघा...मी मधे बोलतोय पण...एक सांगतो..तुमच्या मुलीला आम्ही खुप सुखात ठेवू...तिला कसलीच कमी भासु नाही देणार...आणि परेश जी एक गोष्ट लक्षात घ्या...जात सगळे बघतात पन अशा वेळी, आंपल्या मुलाची निवड आपण पारखुन घेतली पाहिजे...मग निर्णय आपला त्यांना सांगायला हव...आणि जर त्यांची निवड योग्य असेल तर क़ाय हरकत आहे...आपल्याला जातीपेक्षा आंपल्या मुलांच सुख,आनंद म्हंत्वाचा आहे...



राधा: हो...



पल्लवी: प्लीज पप्पा☹️विक्रम मेरा जीव है पप्पा..☹️हु विक्रम साथे लग्न करवा मांगू छु...😢



परेश: (तिच्या डोक्यावर हात फिरवून)......हु तमने लग्न करवानी छूट आपु छु....☺️



पल्लवी: खर...Thank u पप्पा😚🙏




विक्रम: ओय...आता तुमची भाषा आम्हाला नाय समजत...आंपल्या भाषेत सांग आता...😥



पल्लवी: बाबानी परवानगी दिलय आहे😃



विक्रम: क़ाय...Thank u अंकल...



गुरुचरण: अरे वा वा...चांगला निर्णय घेतला तुम्ही...



राधा: हो काका😊



परेश: पल्लू..सॉरी मी तुला खुप मारल न...



पल्लवी: नो पप्पा ईट्स ओके....😊



अंजली: मी आले मिठाई घेऊन...



तसे सगळे हसतात..राधा पल्लवी आणि विक्रम साठी खुप खुश होती...रात्र जास्त झाली म्हणून विक्रम राधाला सोडायला आला...



राधा: चला...क़ाय तरी चांगल काम झाल...



विक्रम: थांक्यु स्वीटहार्ट...तुझ्यामुळे आज हे शक्य झाले...



राधा: आभार क़ाय मानतोस रे...लहानपनापासन ओळखते मी तुला...तू माझा फ्रेंड आणि भाऊ दोन्ही आहेस...तुझ्यासाठी एवढ तर करू शकते...




विक्रम: ह्म्म्म...(मीठी मारून)



राधा: वेडा...आता इमोशनल नको होऊ...ह्म्म्म...



त्याने राधाला मीठी मारली...हे सगळ बाल्कनीमधुन रणजीत ने पाहिला...त्यांला विश्वास बसत नव्हता...विक्रम आणि राधा?????



रणजीत: (मनात).....विक्रम...आणि राधा...? कस शक्य आहे...राधा विकीला पसंत करते...मग हे तिने मला का नाही सांगितले...अस कस करू शकते तीं...तरी यांच्या ग्रूममध्ये राधा विक्रम खुप जवळ असतात....आसू ही शकत..आणि मला का फर्क पडावा याने..तस ही लग्न करताना तिने सांगितले होत..तीच माझ्यावर कधीच प्रेम नाही बसणार..आणि तस ही आमच लग्न मन मारून केलेला होता आज ना उद्या आम्ही डिवोर्स घेऊन वेगळे होणार तर होतोच..पन तीं वेळ इतक्या लवकर येईल अस वाटल नव्हतं..आणि राधाला खर विकी आवडतो का?..पन मला का याच वाइट वाटतंय..मला राग पन येतोय पन का??..राधा थोड़ी माझ्यावर प्रेम करते☹️😕आणि मी तरी कुठे तिच्यावर प्रेम करतो...नाही करत...(विचार करून).....खरच नाही का????


क्रमशः


( संशय...हा शब्दच असा आहे की याने चांगल आणि वाइट दोन्ही गोष्टी घड़तात...चांगल अस की थोडफार संशय जेव्हा नात्यात येतो तेव्हा आंपल्या पार्टनर वर आपण जेलिस फील करतो...राग येतो...त्यामुळे मनात साठवलेल्या सगळ्या फीलिंग्स बाहेर निघतात आणि happy ending होते...वाइट अस की, जास्त संशय जर नात्यात आल तर गैरसमज होतात,वाद होतात,विश्वास कमकुवत होतो..आणि दुरावा येतो म्हणून विचार करून संशय घ्या...आणि त्या संशयाला काही मर्यादा ठेवा..आणि मी कास्टचा जो मुद्दा मांडला आहे मला अस वाटत सगळ्यांनी यावर विचार करायला हवाय...🙏 आता राधा आणि रणजीत यांच्या नात्यात पन संशय यायला लागल आहे..याचा परिणाम चांगलाच होइल ओ😉डोन्ट वरी पन कसा होतो ते हळूहळू बघुच...आणि प्लीज स्टार्स सगळ्यानी दया यार आणि त्यात काहीतरी लिहा मेसेज..खुप कमी लोक लिहितात...अस नका करू न...मला ही समजेल ना कि मी कस लिहिते..तुम्हला भागा विषयी क़ाय वटलय नक्की सांगा...Keep supporting ☺️)