Understand but do not turn! books and stories free download online pdf in Marathi

कळतं पण वळत नाही!






एखादी वस्तू, व्यक्ती आकर्षक असली की, सगळेच तिकडे खेचले जातात.... पण, जर ती आकर्षकच नसली की, तिच्या बाबतीत जे घडतं.... असच काहीसं या कथेतील नायिका असलेल्या, माझ्या बाबतीत घडलं किंबहुना, अजूनही घडतच आहे..... दुर्दैव हे की, मी अजुनही त्याच गोंधळात फसले आहे.... त्यातून बाहेर निघायचं हे कळतंय मला पण, वळत नाहीये.... तर तुम्हाला घेऊन चलते मागे जिथून माझं जग सुरू झालं......

मी एका प्रतिगामी विचारांच्या समाजात जन्मले म्हणण्यापेक्षा, समाज अजूनही त्याच विचारांनी गुरफटलेला आहे..... जिथे मुलगी म्हणजे फक्त परकं धन आहेत..... लहानाच्या मोठ्या झाल्या की, त्यांच्यासाठी स्थळ शोधून त्यांना "लग्न" या शीर्षकाखाली विकून टाकायचं..... हे मी इथे जाणीवपूर्वक म्हणेल कारण, हुंडा घेऊन केलेलं लग्न हे एखादी वस्तू विकण्यासारख नाही का!

तर जन्मापासून मी रंगाने सावळी, कमी उंचीची त्यामुळे जन्मतःच लग्नाचा विचार प्रतिगामी डोक्यात येणे साहजिक होते..... "हिच्याशी कोण लग्न करून घेणार" हे वाक्य मी लहानाची - मोठी होत पर्यंत ऐकल्याचा रेकॉर्ड बनू शकतो इतक्या वेळेस मी ते वाक्य ऐकले असेल..... मुलगी जितकी जास्त शिकली तितकी स्थळ चांगली येण्याची शक्यता वाढते. हा हेवा मनात ठेवत इच्छा नसताना, घरी मुलींना शिकवलं जातं ही स्वागतार्ह बाब....

मी शिकले.... घरचे त्यांची जबाबदारी बजावत होतेच..... स्थळं बघायला सुरुवात झाली.... माझं दुर्दैव, कोणीच माझ्या सारखीला गळ्यात बांधून घ्यायला तयार नव्हतं..... आता ही भाषा याचसाठी की, मी लग्नाच्या पात्रतेत बसत नव्हते.... कोण करून घेणार ना मला बायको! त्यांना विशिष्ट साच्यात बसेल अशी मुलगी हवी होती.... मी त्या चौकटीत बसत नव्हते.....

"कशात काय आणि फाटक्यात पाय" अशी अवस्था त्यावेळी माझी होती..... मग विचार केला आता जॉब शोधुया.... लग्नाला उशीरच लागणार होता.... मी निर्णय घेतला आणि जॉब शोधला..... चला आता इथे एक तरी गोष्ट मनासारखी मिळाली होती.... जॉब मस्त सुरू होता.... मी खुश ही होते..... असेच दिवस जात होते.... काही दिवसांनी एका मुलाने ऑफिस जॉईन केले..... त्याला माझ्या अंडर ठेवण्यात आले.... मी माझा फोकस त्याला ट्रेनिंग देण्यावर लावत होते.... त्याला मात्र मी आवडायला लागले अस मला नेहमी वाटायचं पण, नंतर मिळालेले रीजेक्शन्स आठवायचे आणि आपली लायकी कळायची..... स्वतःचं पूर्ण लक्ष जॉब वर केंद्रित केलं...... एक दिवस मी बसचा वेट करत थांबले असता, तोच मुलगा बाईक माझ्या समोर उभी करून, मला लिफ्ट देण्यासाठी थांबला.... मी त्याला इग्नोर करते आहे हे बघून गालातच हसला आणि बाईक वरून उतरून माझ्या समोर येऊन उभा राहिला.....

मी : "काय आहे.....??"

तो : "तुला घरी ड्रॉप केलं तर चालेल का??..."

मी : "पण माझी बस आहे आता.... जाईल माझं मी....."

तो : "चल ना प्लीज मला तुला काही सांगायचं आहे...."

मनात एक उत्साह होता पण, मला तो चेहऱ्यावर न दाखवता बोलायचे होते.... हो..... माहितीये हे खूप अवघड असतं... पण, मी ते केलं.....

मी : "अस काय आहे सांग इथेच..... माझी बस येईलच इतक्यात....."

तो हट्टाला पेटला....

तो : "तू माझ्यासोबत जोपर्यंत येणार नाही...... मी इथून हटणार नाही....."

मनात वाटायचं की, याने आताच प्रपोज करावं पण, चेहऱ्यावर मात्र रागच होता.... त्या गोंधळाच्या स्थितीत मी कधी त्याच्या गाडीवर जाऊन बसले.... माझं मलाच समजलं नाही......🙃

तो : "मी तुला खाणार आहे का इतकी घाबरते कशाला...??"

मी : "खाल्लं म्हणजे....😜 मी एकटीच आहे आई - बाबांना...🤭"

तो : "आम्हीही काही खंडीभर नाही.... जरी आम्ही भावंडं असलो...... पण, मी त्यात लाडका आहे बरं का!..🙃"

मी : "अच्छा....."

बोलता - बोलता एका कॅफे समोर बाईक थांबली आणि ब्रेक लागल्यामुळे, मी भानावर आणि स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर आले...... कारण, माझं लक्ष त्याच्यात पूर्णपणे हरवलं होतं.....😌

तो : "उतर आलोय आपण... मला नंतर बघशील.....😜"

मी गोंधळले याला कस कळलं की, मी त्याच्याच विचारात गुंतले होते??🙄🙄😲...... विचार करत गाडीवरून खाली उतरले..... त्याच्याकडे बघितले तर तो गालात हसत होता.....🤭 मी त्याला रागीट लूक देऊन, समोर थोड्या अंतरावर जाऊन थांबले तो गाडी पार्क करून आला..... आम्ही दोघे कॅफेत शिरलो....

तो : "वेटर......🙂"

वेटर येऊन, ऑर्डर घेऊन गेला.... मी मेन्यू कार्ड चाळत बसले असता..... मेन्यू कार्ड स्वतः कडे खेचत तो.....

तो : "लक्ष कुठेय तुझं.... मी तुला इथे मेन्यू कार्ड बघायला घेऊन आलोय का.....🙄"

मी : "मग कशाला आलोय आपण.... तू केलं ना ऑर्डर...... मग आता मी काय करणार म्हणून बघत बसले होते.....😒"

त्याने अलगद माझे टेबलावर ठेवलेले हात स्वतःच्या हातात घेतले आणि विचारलं......

तो : "लग्न करशील माझ्याशी??"

मी : "....😲😲😲😲🥺🥺🥺🥺"

तो : "हे काय झालं..... तुझे डोळे का पाणावले??"

मी : "नाही, काही नाही....😓"

तो : "सांग ना...."

मी : "आज पर्यंत कोणीच प्रपोज तर काय साधं बघितलही नव्हतं आणि आज तू चक्क प्रपोज ते सुद्धा लग्नासाठी मागणी घालतोय..... म्हणून, थोडा गोंधळ झाला.....😣"

तो : "हे बघ बाकीच्यांसारखा मी नाही.... मला तुझ्यातल्या त्या खऱ्या व्यक्तीशी प्रेम आहे.... बाकीचे बाहेरच्या दिसण्याला महत्त्व देत असतील पण, मी त्यातला नाही.....☺️ यू कॅन ट्रस्ट मी....."

मी हाताची पकड घट्ट करत......

मी : "खरच तुला माझ्याशी लग्न करायचं आहे....🥺"

तो : "हो ग राणी.....🥰😘"

मी : "आज पर्यंत कोणीच मला इतकी स्पेशल वागणूक दिली नाही.... थॅन्क्स टू यू....😌😌"

तो : "यू डिसर्व यार..... तू मनातून खूप चांगली आहेस.....☺️ सच ए प्यूअर सोल.....😘 लव्ह यू....."

हे ऐकुन माझे डोळे पाणावले....... खरच इतकी स्पेशल वागणूक मला कधीच मिळाली नसल्याने, तो क्षण मला टिकवून ठेवायचा होता...... वेटर कॉफी घेऊन आला.... तोवर आम्ही आमचं प्रेमळ बोलणं संपवलं होतं म्हणून वाचलो नाहीतर वेटरलाही बघून नवलच वाटलं असतं..... इतका चांगला मुलगा माझ्यासारख्या मुलीसोबत बसून करतो तरी काय??

आम्ही आवरून जायला निघालो बाहेर मी त्याची वाट बघत थांबले..... तो बाईक घेऊन आला आणि मी बसणार की, त्याने हात पकडला.....

तो : "थांबू या का अजुन थोडा वेळ....??"

मी : "भेटूया ना नंतर..... आता तर रोजच होणार भेटणं नाही का"

तो : "बरं....😓"

तो निराश झालेला बघून, गालात हसत मी त्याच्या बाईक वर बसले....🤭

आम्ही निघालो.... त्याने मला माझ्या पॉईंट वर ड्रॉप केलं..... मी त्याला बाय करून आपल्या रस्त्याने वळले.... लांब जाऊन, मागे वळून बघितले तर तो तिथेच माझ्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा असलेला मला दिसला.... मी हाताने जा अस सांगितल्यावर, तो निघून गेला..... घरी आले तरीही मी अजुन त्याच्याच विचारात होते..... पहिल्यांदा अनुभवलेली ती फिलिंग मला जपून ठेवायची होती.....🥰

पहिल्यांदाच कोणी मला इतकं आपलंसं वाटून गेलं होतं....🥰 त्याचा तो स्पर्श मला हवासा वाटत होता..... अशाच रोजच्या भेटीत मी सुद्धा त्याच्यात गुंतत गेले आणि नवीन प्रेमाची दिशा आमच्या नात्याला लाभली...... काही महिने, महिन्याचे - वर्ष आमच्या भेटीगाठी होत गेल्या..... नंतर आम्ही लग्न बंधनात अडकावं अस वाटू लागलं कारण, दोघेही हवं तितकं कमावत होतोच..... त्याच्या घरी काहीच प्रॉब्लेम नव्हता.....

मी मात्र खूप मोठ्या गोंधळात होते..... ते म्हणजे, जर मी दुसरीकडे कुठे लग्न होऊन गेले तर माझं मन त्या गोष्टीला स्वीकारेल की नाही..... कारण, मुली एखाद्याला मन लावून बसल्या की, शेवट पर्यंत निभवण्याची हिम्मत ही ठेवतात.... तसच माझ्या बाबतीत होतं.... इतर कोणाला, शारीरिकरित्या स्वतःला सोपवणं माझ्याकडून कितपत शक्य होईल हे मला माहीत नव्हते..... त्यामुळे मग मी सुद्धा स्वतःच्या मनाची तयारी केली आणि लग्न त्याच्याशीच करेल हे मनाशी ठरवले.....

आपण म्हणतो की, अरेंज मॅरेज म्हणजे सॅक्रिफाईज पण, तसं बघायला गेलं तर लव्ह मॅरेजमध्ये जास्त सॅक्रिफाईज आपल्याला करावं लागतं..... लव्ह मॅरेजमध्ये एकदा का प्रेमात पडलो की, सगळ सहन करण्याची हिंमत आपोआप येते..... अरेंज मॅरेजमध्ये तर काही सहनच करावं लागू नये अस बघूनच सगळे लग्न करतात....

लग्नासाठी दोन्ही मंडळींची तयारी होतीच लग्नही छान पार पडले.... आम्ही एक झालो..... लग्ना नंतर वेगळ्याच दुनियेत मी होते.... रोज आवरून जॉबसाठी बाहेर पडायचं आल्यावर स्वयंपाकाचं बघायचं..... महिने - दोन - महिने गेले.... सगळं काही व्यवस्थित सुरू होतं...... असेच गेले मग काही दिवस..... नंतर आले ते लग्नानंतरचे खरे दिवसं...... न पिणारे ते पिऊन येऊ लागले...... मग काय संसाराचा वाटोळा व्हायला वेळ लागत नाही..... त्यातच भर म्हणून, मग त्यांना एक वेगळच व्यसन लागलं..... ज्याचा विचार मी आयुष्यातही केला नव्हता अस ते व्यसन.....!! व्यसन होतं एका बाईचं..... नको ते विचार डोक्यात येत होते.... खरच यांनी माझ्यावर कधी प्रेम केलं तरी असेल की फक्त ते आकर्षण होतं..... असच होतं मग लग्न तरी का केलं?? प्रेमावरून विश्वास उठण्याचे कारण, असे सुद्धा असू शकते यावर विश्वास बसला...... वाटलं जावं सोडून सर्व - काही पण, मन त्यांच्यात होतं..... ते म्हणतात ना कळतं पण वळत नाही.... असच काहीसं माझ्या बाबतीत घडताना बघून, एक दिवस जीव नकोसं वाटू लागलं..... आत्महत्येचा विचारही येऊन गेला..... पण, का मी एका अशा माणसासाठी ते पाऊल उचलावं ज्याणे कधी माझा साधा विचारही केला नव्हता.....! नको त्या व्यासनाच्या तो आधीन झाला होता....

असेच दिवस जात होते...... ऑफिसमध्ये ही चांगले सहकारी लाभले...... एक तर इतके चांगले की, त्यांची वाइफ कधी माझी इतकी जवळची मैत्रीण बनली समजलंच नाही..... (ज्यांनी जी कथा सजेस्ट केली त्या) अधून - मधून त्या मला भेटायला यायच्या... मनातलं त्यांना सांगून अगदीच मन प्रसन्न वाटायचं.... मदतीला धावून येणाऱ्या स्वभावाच्या त्या होत्या.....

वाईट दिवस सुरू असूनही मी कुठलीही तक्रार न करता शांतपणे सगळ सांभाळून जॉब करून, घरात काय लागतं - काय नको बघायचे..... पण, मला दिवस गेले आणि मॅटर्निटी लिव्ह म्हणून, घरीच थांबावं लागलं..... तसे आमचे सासरे माझ्या बाजूने ठाम असल्याने मला काळजी नव्हतीच..... डिलिव्हरी वगैरे बऱ्यापैकी झाली..... परत जॉब जॉईन केला...... दिवस जरी जगायचं म्हणून जात असले तरी, आता फक्त माझ्या जीवनात आम्ही दोघे नव्हतो...... मला पूर्णत्व देणारं पिल्लू माझ्या जीवनात आलं होतं.... निदान त्याला बघून तरी मला जगायचं होतं..... म्हणून, सर्व सहन करून, समोर जात होते.... त्यातच एक दिवस वेगळीच गोष्ट कानावर पडली.....ती म्हणजे, आमच्या यांनी माझ्या नावावर मोठं कर्ज घेतल्याची...... त्यातच मला अजुन दिवस गेल्याने मला लिव्ह घ्यावी लागणार होती..... तितकं कर्ज कसं फेडणार?? हा मोठा प्रश्न!! त्यात आमचे हे भलत्याच व्यसनात गेलेले.....

विचार करून ही मार्ग सापडत नव्हता..... त्यांनी मला विश्वासात घेत, "कर्ज फेड मी पिणं सोडून योग्य मार्गी लागेल" असे सांगितले..... मी आंधळी त्यांच्यावर विश्वास ठेऊन ते करायलाही तयार झाले..... माझी एकच चूक होती की, मला कळत सर्व होतं पण ते वळवून घेताना, मन कुठे तरी भटकायचं.....

आजही कर्ज फेडायचे बाकी आहे..... परिस्थिती तीच आहे.... लॉक डाऊनमुळे अजुनच हलाखीच्या परिस्थितीत आम्ही जगतोय...... लॉक डाऊन आधी माझ्या त्या मैत्रिणीने खूप मदत केली पण, हा काळ असा होता की, जे स्वतः मदतगार होते त्यांनाही काही व्ययक्तिक परिस्थितीमुळे इतरांना मदत करणं जमलं नाही.....

नवऱ्याचे इतके व्यसन असूनही मी होईल त्या परिस्थिती जगतेय...... मला सगळं कळतं पण, अजूनही वळत नाही......😣😣🥺

परत एक लघुकथा खऱ्या आयुष्यात असणाऱ्या एका व्यक्तीची..... जी, मला कोणीतरी सजेस्ट केली आणि लिहायला प्रोत्साहित केले......

आपल्याही जीवनात अशा काही गोष्टी असतात की, ज्या कळतात पण, वळत नाहीत...... लवकर मनाला त्या गोष्टींपासून वळवलं तर, जीवनात आपल्याला कमी दुःख सहन करावे लागू शकतात.....

काळजी घ्या सुरक्षित रहा......

निरोप........🙏


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED