She__and__he ... - 34 books and stories free download online pdf in Marathi

ती__आणि__तो... - 34

भाग__३४


घरातील सगळे रम्याची खुप काळजी घेत होते.........शिवाय राधा ही तिची खुप काळजी घेत होती.......दिवसेंदिवस राधा आणि रणजीतच प्रेम ही वाढत चालल होता........ते एकामेकाना वेळ द्यायचे,खुप गप्पा मारायचे,भांडायचे तर खुप पण त्यातूनही नव्याने त्यांच नातं खुलत होता.........राधा आणि रणजीतच्या आयुष्यात आता कुठे खुप आनंद आला होता........असेच महीने गेले..........रम्याला सातवां महीना लागला म्हणून आज घरातच ओटीभरनाचा कार्यक्रम होता..........सगळे मस्त तयारी करत होते.......



नेहमी सारखाच आपला रणजीत लवकर तयार होऊन राधाची वाट पाहत होता...........पण मॅडमच क़ाय आजुन आवरेना........😂



रणजीत: राधा होतय की नाही आवरुन...


राधा: (आतून आवाज देत)....दोन मिनिट....


रणजीत: एक तासाआधी पण हेच बोली होतीस.....(गाण बोलून)......ओ इंतहा हो गयी इंतजार की...आइ ना कुछ खबर मेरे यार की...है मुझे ये पता बेवफा वो नही....फिर वजहा क्या हुई इंतजार की.......



तेवढ्यात मागून राधा तीच आवरुन बाहेर येते....



राधा: (गाण बोलून)......मी आले....निघाले...सजले फूलले फुलपाखरु झाले...वेग पंखाना आला असा....आल्या या लकेरी घेतली भरारी...तुफानापरी बेभान मी झाले...मी आले ,निघाले...मी आले , निघाले....



रणजीत तस मागे वळून पाहतो......राधाने मस्त साड़ी घातली होती.......रणजीत तर तिला पाहतच बसला...



रणजीत: नेहमी सारखीच सुंदर दिसतेयस😍आणि तुला साडीत पाहून मला कंट्रोल नाही होत माहिते ना तुला...(जवळ जाउन)


राधा: गप्प बस हु रणजीत....चल आता खाली वाट पाहत आहेत सगळी...आणि चावटपना जरा कमी कर आता,दिवसेंदिवस वाढत चालला आहे तुझा चावटपना....


रणजीत: बर बाई....पण मला एक कळत नाही,तुला एवढा नटायची क़ाय गरज...तू कशीपण छानच दिसतेस😍


राधा: हो क़ा,बर पूरे आता चल खाली....


रणजीत: अरे यार सगळा रोमांटिक मुड़ घालवला...


राधा: चल....😂


रणजीत: बर मी क़ाय म्हणतो,थोड्यावेळाने गेलो तर नाही चालणार का? म्हणजे आपण....


राधा: अम्म्म चल जीत😂पूरे आता.....



मग दोघेही खाली जातात...........समोर रम्या मस्त तयार होऊन बसली होती...........सगळ्या बायकानी तिची ओटी भरली............आणि मग रेवा,राधा,आणि सोनाक्षी मिळून डान्स करू लागल्या......



रेवा: (तिच्याजवळ जाउन)......चांदण्यात न्ह्या ग हिला नटवा सजवा हिला झोपले झुलवा...भोवतालची बस तिला काव हव ते पुसा तिचे डोहाळे पूरवा, हो हो डोहाळे पूरवा...


राधा: (डान्स करत)......ग कुणीतरी, ग रम्याताई,ग कुणीतरी येणार येणार ग….पाहुणा घरी येणार येणार ग....कुणीतरी येणार येणार ग…..


सोनाक्षी: इवलस नाजूक पाउल बाई,हळूच आतून चाहूल देई….गोविंदा गोपाल लागे जीवाला तुझा चाला….हो चाला, हो चाला साजीव होणार ग, ग चाला साजीव होणार ग,ग कुणीतरी येणार येणार ग…..पाहुणा घरी येणार येणार ग..



नंतर सगळे त्यांच्यात शामिल झाले...........आणि मस्त नाचूं लागले..........इकडे सगळे नाचत होते...........पण राधाच्या फ़ोनवर नेहाचे जवळ जवळ ३०..४० मिस कॉल आले...........सगळे नाचन्यात गूंग होते.........तेवढ्यात रुताने राधाचा फोन हातात घेतला.........आणि कॉल येतोय हे बघताच ती लागेच राधाकडे गेली..........आणि तिच्याकडे फोन दिला.........



रुता: काकू,काकू हे घे तुझा फोन...किती फोन येतात बग तुला...


राधा: हु...बापरे ४० मिस कॉल....नेहाचे....



राधा नेहाला कॉल करणारच की समोरून नेहाचा फोन आला....



राधा:📱 नेहा बोल क़ाय झाल...


नेहा:📱 राधा mam...ती आपली पेशंट आहे ना नियती मोरे..


राधा:📱 हा क़ाय झाल नियतीच..


नेहा:📱 त्यांचा नवरा त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेत...त्यांना लेबर पेन सुरु झाल आहे...


राधा:📱 क़ायssss....अग पन तिची डेट तर २५ दिवसानंतरची होती ना...इतक्या लवकर कस..


नेहा:📱 Mam..त्यांच नवरा बोलात होता कि त्या पाय सटकुन पोटावर पडल्या..


राधा:📱 क़ायsss....अरे यार शीटssss.....बर त्यांना घे एडमिट करून..मी १० मिनिट मध्ये आले...


नेहा:📱 ओके...लवकर या mam...



राधा तड़क हॉस्पिटलला जायला निघते.........तिची चालेली घाई पाहून कोणाला काही कळतच नाही.......



महेश: राधा बाई कुठ चालात..?


राधा: काका ते एक अर्जनट डिलीवरी केस आले..मला जाव लागेल..


सुमन: अग पण..अस अचानक...


माधवी: हो ना...आता घरी फंक्शन पण आहे आणि....


राधा: हो काकू पण तिकडे जान जास्त गरजेचे आहे...कारण ती मूलगी प्रेग्नेंट आहे आणि ती पोटावर पडले...मला जावच लागणार आहै...


सुमन: बापरे....


राधा: आई प्लीज मला माफ करा आता निघते..माझी पेशंट तिकडे कळवळतेय...


माधवी: बर राधा निट जा....


राधा: आई,बाबा,काका,काकू,दादा,ताई,अजी,शीतल प्लीज तुम्ही सगळ्यानी घरूनच तिच्यासाठी प्रार्थना करा हु....


सुमन: राधा निश्चिंत जा..ह्म्म्म...तुझा कान्हा सगळ निट करेल...


रुता: डोन्ट वली राधा काकू...आणि ऑल द बेस्ट..


राधा: हु पिल्लू...बाय!!


रणजीत: राधा डोन्ट वरि..काही होणार नाही तिला...मी येऊ का सोडायला...


राधा: नको...मी जाइन तू इथे थांब...हम्म आणि रम्या ताई सॉरी....


रम्या: नाही राधा सॉरी म्हणू नकोस...आता पळ पटकन आणि निट जा...


राधा: हा...बाय...



राधा जाते.........तस सगळे देवाकडे प्रार्थना करत बसतात.........खरच अशी माणस खुप कमी असतात जगात जी ओळख नसताना ही दुसऱ्यांच चांगल व्हावे अस चिंततात........नाहितर आजच्या जगात आपलेच माणस घात करतात....



*********************************


【हॉस्पिटलमध्ये】



राधा: (आवाज देत).....नेहा...वनिता सिस्टर....लवकर तयारी करा....निशांत....


निशांत: (रडत)....राधू...नियु.....😢


राधा: मला समजलय...पण हा हळगरजीपणा तुम्ही करू कस शकता...क़ाय बोलू मी तुला आता...सोड..वेळ नाही तेवढा......(आवाज देत)....नेहा....


नेहा: यस डॉक्टर तयारी झालय...प्लीज चला...



राधा आत जाते तर नियती जोरात ओरडत होती...........राधाने पटकन तिच्या पोटाला हात लावला.........आणि तिला जानवल की बाळ फिरलय.........तिने स्कैन ही केल.......तर बाळ नाळमध्ये अडकल होत............मग राधा एक फॉर्म घेऊन बाहेर निशांत जवळ गेली....



राधा: निशांत.....


निशांत: राधा...क़ाय झाल...नियु कशी...


राधा: निशांत..पडल्यामुळे बाळ फिरलय...आणि नाळमध्ये अडकल आहे...नॉर्मल डिलीवरी नाही होऊ शकत हे तुला अधिच सांगितले आहे मी..सीजर कराव लागनर आहे आणि त्यात नियतीची कैपेसिटी नाही उरली काहीच...तू प्लीज फॉर्म वर सही कर...बाळ हव की आई...?????



निशांत हे ऐकुन खालीच बसला........त्याचे हात पाय गार पडले..........तो जोरात रडू लागला...



राधा: न निशांत प्लीज...ही योग्य वेळ नाही...प्लीज लवकर डिसीजन घे......(फॉर्म देत)


निशांत: आईला वाचव......(फॉर्म वर सही करत)


राधा: मी माझा बेस्ट देणार आणि बाळ वाचवायच ट्राय करणार...डोन्ट वरि.....आलेच.......(आत जात)



राधा आत जाते........निशांत बाहेर टेशनमध्ये बसतो.........तोवर निशांतची फॅमिली तिकडे येते...



राधा: नेहा...तिचे हात चोळ...पटकन...वनिता सिस्टर इंजेक्शन दया...


वनिता: यस डॉक्टर...


नियती: (रडत)....ड डॉक्टर राधा....मम माझ ब बाळ व वाचव...पपप प्लीज...आआ...प्लीज.....कक


राधा: नियती टेंशन घेऊ नकोस...बीपी लो होइल...डोन्ट वरी...सिस्टर लवकर इंजेक्शन तयार करा....


वनिता: हा डॉक्टर...


राधा: (हात जोडून)......हे कान्हा माझ्या आयुष्यात पहिली ही अशी क्रिटिकल केस माझ्या समोर आले...प्लीज माझ्याकडून सगळ चांगल करून घे...आणि कृपा कर आज तू कान्हा आणि तिच्या बाळाला आणि तिला सुखरूप बाहेर काढ़ यातून...राधे कृष्ण...🙏


वनिता: डॉक्टर इंजेक्शन....


राधा- हम्म्म्म...



मग राधा नियतीला इंजेक्शन देते.........आणि नियती बेशुद्ध होते.........राधा ऑपरेशनला सुरवात करते.......ती मनोमन कान्हाच जप करत होती..........राधाच्या घरचेही नियतीसाठी प्रार्थना करत होते........मग ३ तासानंतर ऑपरेशन निट झाल..........नियती आणि तीच बाळ दोघ सुखरूप होते........राधा तर खुप खुश झाली.......



राधा: (हांत जोड़त).....राधेकृष्ण.....सिस्टर जा बाळाला निट आंघोळ घाल..


सिस्टर: हो डॉक्टर...



मग थोड्यावेलाने राधा बाहेर आली.........तर तिकडे निशांत,आणा,माई आणि नुपुर होती...........सगळे खुप काळजीत होते...



निशांत: र र र राधा...नियु....बाळ...


राधा: दोघ सुखरूप आहेत निशांत...😃


निशांत: क़ाय...खर😃


राधा: नियती पडल्यामुळे खुप क्रिटिकल झाल होत.....पण म्हणतात ना विज्ञानापुढे ही एक शक्ती आहे.....आता बाळ आणि नियती दोघी सुखरूप आहेत...


निशांत: राधा.......(मीठी मारून)Thank u thank u तुझ्यामुळे झाल सगळ....


राधा: माझ्यामुळे अस काही नाही...सगळ कान्हाचा चमत्कार...☺️आणि हो मूलगी झालेय तुला... Congratulations!!!


निशांत: वाव!! आम्हा सगळ्यांना मुलगीच हावी होती😃


राधा: हो ना...मी तर खुप अधिच बोले होते...बर बाळ अड़ीज किलोच आहे..छान हेल्दी आहे...


निशांत: बाप्पा...तुझे खुप उपकार🙏


राधा: जा जाउन बाळ आणि नियतीला भेटा....हा फक्त नियतीला बघा...कारण तीच ऑपरेशन झाल सो ती बेशुद्ध आहे...बाळाला बघा तुम्ही...


निशांत: ओके...


राधा: मी आलेच...


आण्णा: डॉक्टर बाई...तुमच खुप उपकार झाल..आमच्या सुनला वाचवल तुम्ही....(हात जोडून)....


राधा: आहो बाबा..अस नका करू...यात माझ काही नाही....सगळ फक्त देवाने केलाय....


माई: खर लई चांगली आणि हुशार डाक्टर आहेस तू...बाय तुझ देव नेहमी भलच करल...


राधा: आई तुमचा आशीर्वाद भेटलय तेच खुप आहे...बर आता जाउन नातीला भेटा ह्म्म्म मी येते नंतर...


माई: व्हाय..



राधा तिच्या केबिनमध्ये जाते.........आणि बसते तेवढ्यात राधाचा फोन वाजतो.........ती बघते तर फोन सुमनचा असतो...



राधा:📱 हा आई बोला ना...


सुमन:📱 बाळा ती मूलगी कशी आहे...आणि तीच बेबी??



मग राधा सगळ सुमनला सांगते........तेव्हा त्यांना राधाचा गर्व वाटत..........आणि त्या खुशही होतात...



सुमन:📱 चांगल काम केलास राधा..तू कान्हाची मनापासून भक्ती करतेस म्हणून तर तो तुला हेल्प करतो ना बाळा.....बर घरी कधी येतेस???


राधा:📱 ह्म्म्म....आज तरी थांबाव लागनर आहे...उद्या येईल..


सुमन: 📱बर...


राधा:📱 बर रम्या ताई जास्त टेशनमध्ये नाही आल्या ना म्हणजे घाबरल्या होत्या ना त्या...


सुमन:📱 नाही आता आहे निट...आता मी सगळ्यांना न्यूज सांगते...हम्म तू ही काळजी घे..


राधा:📱 हो आई बाय!!!!.......(फोन ठेवून)



***************************



रणजीतला राधाची काळजी आणि तिचा राग दोन्ही येत होते.........तो खोलीतच फेरया मारत बसला....



रणजीत: निशांतची वाइफ सुखरूप आहे ही गोष्ट खुप चांगली झाली.....पण राधाने मला फोन का नाही केला.......म्हणजे ठीके आईला जरी केला तरी माझ्याबड्डल काही चौकशी पण नाही केली.....क़ाय हे राधाचा वागण.....आसो मीच फोन लावून बघतो...



रणजीत राधाला फोन लावतो तर ती फोन उचलतच नाही.........रणजीत जवळ जवळ ३० कॉल करतो नंतर तिची वाट ही बघतो पण कॉल काही आला नाही..........रणजीतला न राहून शेवटी तो हॉस्पिटलमध्ये जायला निघाला....तोवर जाताना रम्याने त्यांला पाहिल......



रम्या: जीत.....(पायरी उतरत)


रणजीत: हा वहिनी...


रम्या: कुठे जातोयस आता???


रणजीत: वहिनी राधाच्या हॉस्पिटलमध्ये...


रम्या: आता???क़ा पण? क़ाय झाल????


रणजीत: अग हाइपर नको होऊ काही नाही झाल....असच तिच्याशी बोलन नाही झाल म्हणून जातोय मी...आणि मला काळजी वाटते तिची...तिने काही खाल्ला पण नाही काहीतरी घेऊन जातो...


रम्या: ohhhh अस आहे तर...काकूना सांगू का मग...आई...काकू....😃


रणजीत: वहिनी वहिनी प्लीज जाउ दे ना ग...प्लीज....


रम्या: बर बाळराजे जा..पण लवकर या ह्म्म्म...😃


रणजीत: हो..तू ही पायऱ्या निट चढ़...


रम्या: हम्म बाय!!!


रणजीत: बाय!!!!



********************************



राधा: हाय नियती.......(वार्डमध्ये येत)


नियती: हाय राधा...


राधा: मला वाटला तुला लवकर शुद्ध नाही येणार....बट आली हे बर झाल....आता कस फील होतय...म्हणजे पोट दुखत असेल ना..


नियती: हो..☹️पण...बाळाला पाहिला आणि सगळा त्रास गेला ग....


राधा: असच असत..आई होत असतो ना आपण स्त्रियां तेव्हा खुप वेगळ्या गोष्टी नकळत आपल्यात घडत असतात....त्यातली ही एक आई खुप त्रास सहन करते पण जस तिच्या बाळाला तीं बघते सगळ विसरून जाते...


नियती: हो...राधा मला ह्यांनी सांगितला आहे की खुप क्रिटिकल कंडीशन मधुन तू आम्हाला वाचवल आहेस...ThankYou...खरच☹️


राधा: अग सगळ कान्हाने घडवून आनल..मी निम्मित मात्र आणि हे माझ कर्तव्य ही होतच.....हो आता प्लीज खुप काळजी घे...हम्म दोन दिवसात तुला डिस्चार्ज मिळेल...


नियती: ओके...


राधा: वा बाळ पण छान झोपलाय..अगदी तुझ्यासारख आहे हु...गोड़,निरागस.....चला मग मी आहे आज इकडेच काही लागल तर आवाज दे...


माई: डॉक्टर बसा की तुम्ही पण..


राधा: नको आई...तुम्ही पण इकडे आराम करा..मी ही येते..काही लागल तर सांगा


अण्णा: हो नक्की सांगू...


निशांत: thanks...And sorry.....


राधा: हेय,don't be....येते मी....


माई: लई चांगली आहे हु पोरगी..आंपल्या सुनला वाचवल तिने...


आणा: होय..अशा मूली कुठ मिळत नाहीत...


नुपुर: खरय...खुप चांगली आहे तीं....


निशांत: आ अण्णा माई जरा बाहेर येता...बोलायच आहे...नुपु तू नियु जवळ बस ह्म्म्म...


नुपुर: हो दादू...


माई: नुपे बाई बस ग इथेच ह...


नूपुर: होय माई...


अण्णा: बोल निशांत क़ाय झाल???


माई: क़ाय झाल रे..


निशांत: (रागात)....का कौतुक करताय राधाच तुम्ही???


अण्णा: का म्हणजी...करायला नको..एवढ्या अवघड परिस्थिती मधुन तीन सेफली बाहेर काढलय सुनबाईला आणि बाळाला...


माई: होय...आणि तू कशाला चिड़तोयस...


निशांत: का चिड़तोय हे तुम्ही मला विचराताय...ही डॉक्टर राधा कोन आहे माहित आहे का तुम्हला...


माई: कोंन तीं...


निशांत: ही तीच माझी प्रेयसी...कॉलेज मधली..जिच्याशी मला लग्न करायचा होत....तुम्हला जेव्हा आमच्या प्रेमाबददल सांगितला तेव्हा इतका चिडला होतात की नाव सुद्धा नाही ऐकला तुम्ही तिच...क़ाय क़ाय बोला होतात तिला,मुंबईची फालतू मूलगी क़ाय.....आणि आज तुमचा काम क़ाय केल तर लागेच कौतुक करू लागलाय...वा वा👍अण्णा माई...


माई: क़ाय...


निशांत: हो...बिचारी राधा मी एवढ तीच वाइट करून पण माझ्या बायकोला जीवन दिल तीन...मी असतो ना तिच्या जागी उभ पण नसत केल तिला माझ्या समोर...मग तीं गरोदर असती तरी...पण तीन खुप काळजी घेतली नियुची..आता पण उपाशी आले तीं..आणि तिला सगळ माहित असून पण तुमच्याशी आदरण वागली...तिच्या जागी दूसरी असती तुमच्याशी बोली पण नसती....


आणा: पोरा आम्ही चुकलो..आता माफ कर की,आम्हाला तरी कुठ माहित होता.....


निशांत: आणा..माफी नका मागु मी तुम्हला जाणीव करून देतोय की...जेव्हा आपला मुलगा किवा मूलगी त्यांच्या प्रेमाबद्दल तुम्हला सांगतात तेव्हा आधी त्यांची निवड तपासा...पारखा मग क़ाय तो निर्णय घ्य..तुम्हाला आम्ही सांगतो कारण आम्हाला तुम्ही महत्वाचे वाटता...पण तुम्ही कास्ट,गरीबी ,दिसना,लोक क़ाय म्हणतील यावरुन बोलता..खुपदा ना आम्ही मूल योग्य पार्टनर निवडतो पण तुम्ही....शेई...😢


आणा: ह्म्म्म...


निशांत: नियु चांगली आहे...खुप चांगली आहे....अगदी गरीब गाय....माझ प्रेम ही आहे तिच्यावर आता कारण तिचा सहवास पण माझ प्रेम जेवढ़ राधावर आहे तेवढ तिच्यावर मला या १-२ वर्षात नाही करता अला पुढ बी नाही येणार...माझ्या पहिल्या प्रेमाची जागा फक्त राधासाठी आहे...तिची पण हिच अवस्था असणार...तिच्या नवरा तिला आवडत ही असेल पण,माझ्यावर प्रेम आहे तेवढा त्याच्यावर नसनारच करत तीं..सगळ तुमच्यामुळे आणि अजिबात राधाचा कौतुक करू नका...आणि हो नुपु वर ही वेळ अली तर प्लीज अस करू नका तिच्यासोबत...कधी तरी मुलांच पण ऐकत जा....प्लीज...😢


माई: होय पोरा...माफ़ कर आम्हाला.....


निशांत: हा विषय बंद आता...आणि आत जाउ चला...


अण्णा: ह्म्म्म...



निशांत बोलला तें खरच होता........सगळ्या आई वडिलांनी असा विचार करायला हवाय........थोड्यावेलाने रणजीत हॉस्पिटलमध्ये येतो.........तिच्या केबिनमध्ये जातो तर राधा डोळे मिटून पडूंन होती........रणजीत हळूच आत गेला........आणि राधाच्या गालावर किस केली...



रणजीत: (किस करून)......Hello स्वीटहार्ट...


राधा: (डोळे उघडून)......हु कोंन...जीत तू...इथे????


रणजीत: यस बेबी...बायकोसाठी जेवन घेऊन आलोय...


राधा: (मीठी मारून).....thankYouuu मेरा बच्चा😚


रणजीत: हाय आता जास्त जवळ नको येऊ आपण हॉस्पिटलमध्ये आहोत...😍😚😂


राधा: गप रे...वेडा...बर दे ना जेवायला...भूक लागले खुप.....


रणजीत: ह्म्म्म..मी भरवतो थांब....


राधा: ओके....


रणजीत: (भरवून).....हे घे....



राधा मस्त पोटभर जेवते..........रणजीतशी थोड़ बोलते.........आणि त्याला घरी जाण्यासाठी समज्वते..



राधा: जीत प्लीज घरी जा...बग नियतीची कंडीशन जरा नाजुक आहे..मला आज,उद्या आणि परवा पर्यंत इथेच थांबव लागणार आहे...तिला परवा डिस्चार्ज मिळेल मग येइल मी...


रणजीत: क़ायssssss तू इथे...कस??? ते ही २,३ दिवस...?


राधा: कुल जीत...अरे हॉस्पिटलच्या बाजूला नेहाच घर आहे..तिच्या घरी फक्त ती तिचे आई वडील असतात...मी बोलेय त्यांच्याशी ते बोलेत चालेल म्हणून...बग मला अंदेरी वरुन इकडे अपडाउन नाही होणार...सो..


रणजीत: राधा पन....


राधा: सॉरी...फक्त दोन दिवस...मी आईना सांगितलेल आहे...त्यांनी पण परवानगी दिले...


रणजीत: ह्म्म्म ठीके...


राधा: ह्म्म्म...आणि आता उदयापासुन जेवन घेऊन येऊ नको तिकडे जेवेल ना मी...


रणजीत: राधा..अग.......ओके बाय...टेक केअर...(उठून)


राधा: रणजीत...थांब ना...अरे....


नेहा: डॉक्टर...नियतीच चेकअप ची वेळ झालेय....


राधा: आले....



रणजीत रागात निघुन गेला.........पन राधाचा ही नाइलाज होता.........मग राधा नियतीच चेकअप करायला गेली.........ती आली तेव्हा रणजीतला कॉल केला पन त्याने उचला नाही.....



क्रमशः

(तुम्हला क़ाय वाटत फ्रेंडस...राधा सारखी मूलगी या स्वार्थी जगात मिळन शक्य आहे का??....आणि तुम्हला नक्की माझी कथा आवडते की नाही हे स्टारस देताना लिहून पन सांगा प्लीज....रिक्वेस्ट आहे ही....कारण मी सुद्धा वेळ काढून खुप आठवून भाग लिहिते.....माझ्या जॉबच टाइम सकाळी ८- संध्याकाळी ७ अस आहे...घरी येऊन काम आवरुन मी भाग लिहित असते फ्रेंड्स.....दमलेली असून सुद्धा फक्त तुमच्या प्रेमामुळे लिहिते.....नेक्स्ट भाग लवकर टाकायच ट्राय करेन....हा भाग कसा होता सगळ्यानी कमेन्ट लिहून सांगा जरा.☺️)

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED