रेशमी नाते - 31 Vaishali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रेशमी नाते - 31

मम्मी तू येणार आहे, का पिहू विचारते....

हो मानव सारखाच फोन करून करून नको नको करून ठेवलेय.....रेवती हसत सांगतात....

ह्म्म, पिहू हसते....

पप्पा पण जाऊ बोले.....पप्पा दोन दिवस राहतील...मी रहते तुझी exam होईपर्यंत....मावशी डब्बा देते बोली......

ठीक ये....कधी येणार आहे.....

मानव कामासाठी येणार आहे त्याच्या बरोबर च येणार आहे....

हहह.....पिहू मोबाइल ठेऊन स्टडी करत बसते....मोबाइल मध्ये टाइम बघते अकरा वाजले होते..पिहू आवरून बेडवर येते...अन् विराट ला कॉल करते.....

डीड यू फिनिश्ड यूऊर स्टडी ...
,

हो..हो....हो....हो....पिहू जोरात चिडूनच बोलतो....

विराट डोळे झाकून फोन कानाचा काढत परत लावतो
कशाचा राग आला...हहहह तो हसत बोलतो.

.अहो,....

हहह,..विराट लॅपटॉप बंद करत गॅलरी येतो....

बोर होतय.....

विराट हसत कॉल कट करतो. पिहू एकटक मोबाइल 📱 कडे बघते.....लगेच विराटचा व्हिडिओ कॉल येतो....पिहू हसत फोन रिसीव करते....

त्याचा चेहरा बघून तिच्या चेहर्‍यावर गोड स्माइल येते....काय करत होता,

अम्म... मी....काय करत असतो माहीत नाही तुला विराट खट्याळ हसत बोलतो....पिहू लाजून नजर खाली घेते....

हाय आय...अस लाजतेस ना.......तुझे चिक्स ओढून चावू वाटतात.....

पिहू लाजून लाल झाली होती...ती डोळ्यांवर उलटा हात ठेवून हसू लागते....

पिहू , स्टडी वर कॉन्संट्रेट कर...लास्ट ईयर आहे....अणि मार्क मला चांगलेच हवेत..... mrs.विराट देशमुख ला शोभत नाही इतके कमी मार्क विराट रूबाबदार पणे बोलतो....

अस कुठे लिहिले आहे का....तुम्ही ऑल राउंडर तर मला ही तसच जमल पाहिजे.....

हो, मला तू माझ्या सारखीच हवी ....प्रयत्न केले की होऊ शकते.....लगेच होणार नाही म्हणून सोडून द्यायच का....

अहो दिवसभर करते ना.....

ते मला सांगू नको ,पहिले ते व्हॉटअॅप डिलीट कर....

क...काय...पिहू गोंधळून बघत परत विचारते.....

व्हॉटअॅप विराट नजर रोखून बघत बोलतो....

का,... पिहू बारीक चेहरा करत बोलते....

अ‍ॅक्च्युअली, तू फिफ्टीन डेज मोबाइल च बंद ठेव......

तुम्ही राहू शकता मला न बघता पिहू दात काढत विचारते.....

हो, राहू शकतो.....मला तुझी एक्झाम इंपाॅर्टंट आहे .

खर, तुम्ही राहू शकता पिहू थोड सिरियस होत बोलते....

तो मानेनेच हो बोलतो....ती रागाने च फोन कट करते....मलाच आठवण येत असल्या सारखे फोन करते ...आता तर फोन च उचलणार नाही हूहूहूह....ती मोबाईल स्विच ऑफ करते आणि झोपून टाकते.....

विराट गॅलरीत उभ राहून व्हील चैन ला हात लावत ओठ टेकवतो....madness ची शॉप आहे.....कधी म्यॅचूअर होणार सगळ्या समोर तर शांत, सोज्वळ आणि माझ्या समोर हट्टी, नखरे सुचतात ....विराट हसत स्वतःशीच बडबडत व्हील चैन ⛓ हलवत आत येतो.....

विराट ने कॉल केला तर हा नाही मधेच बोलत होती.....
Exam जवळ आली होती....दोघांचे ही फोन कमी झाले.....विराट ही तिकडे सेटल झाला होता.....त्याच रिसॉर्ट च काम चालू झाल्याने त्याला ही वेळ च भेटत नव्हता.....फोनवर बोलण कमी आणि भांडण जास्त होत होती....पिहू सहज रागाने काहीतरी बोलून मोकळी....विराटचा राग तर ज्वालामुखीच.......एकदा काय तो सटकला की पिहू च्या तोंडून आवाजच येत नव्हता...अश्यातच महिना निघून गेला....

पिहू ,सुमनला विचारून मानव कडे च राहिला गेली होती ...
मानवला खूप आनंद झाला होता....पहिल्यांदा रेवती आणि भिमराव राहायला आले होते.....प्रांजल पण चार पाच दिवसाच्या सुट्टय़ा टाकून आली होती....एक फ्लॅट आता घरासारख वाटत होते.....कधी त्याच्या घरात त्याने दिवा लावला नव्हता...आता देवघर चमकत होते....दिवा अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता... मन प्रसन्न वाटत होते........
दोन टाइम आईच्या हातच जेवण मिळत होते ....आतून तो खूप सुखावला होता....मायेचा स्पर्श काय असतो आज त्याला जाणवत होता.....एवढ्या वर्षात इतक कमवले होते....त्याचा कधीच एवढा आनंद झाला नव्हता आज घरातल वातावरण बघून झाले होते....रात्री एकत्र डिनर ला गेले.....दोन तीन दिवस पिहूचे पप्पा राहून पुण्याला आले....प्रांजल ही हॉस्टेल ला गेली....मानव दिवसभर ऑफिस मधे घरात पिहू आणि रेवती असायच्या....त्यांना ही दोघींना रिलॅक्स वाटत होते....मुंबईला आले कि पिहूच्या सासरी राहत होते तर रेवती भीमराव यांना अवघडल्यासारखे होत होते .....

पिहू ला ही स्टडी ला वेळ मिळत होता....घरी असले की दिवसभर रूम मध्ये बसता येत नव्हते....काम नसले तरी उभ राहून करून घ्यावे लागत होते....किचन मध्ये लक्ष द्यायचे कोण गेस्ट आले की सगळ बघायच....पण मानव च्या घरी मोकळ मोकळ वाटत होते....

पिहूचे पेपर चालू झाले....

पेपर चालू असतानाच त्यांची anniversary ची डेट आली होती.....विराट ला यायला वेळ नव्हता....पिहू ही समजून घेते....

Anniversary च्या वेळेस विराट तिला वीडियो कॉल
करतो.....happy anniversary dear 😘 ♥ ❤ 💖

पिहू लाजून बोलते.....happy anniversary ...

Sorry हनी ,

It's OK ती गालात हसत बोलते....वाईट तर वाटत होते....पण शेवटी त्याला जमतच नव्हते यायला तर काय करणार....

मला गिफ्ट काय घेतल...विराट मोबाइल 📱 जवळ घेत बोलतो......

मी, ना.....ती लाडात येत बोलते....

हहहहह,...ती बोलत होती तर डोर नॉक झाले....

आता कोण आले ती विराट कडे बघत बोलते.....बघ कोण आहे तो म्हणतो...ती मोबाइल घेत दार उघडते....दादा ...पिहू मानव ला बघून ब्लँक होते....

हे धरा ....मानव गिफ्टचा बॉक्स देत बोलतो. Happy anniversary both of you...विराट पार्सल डिलिव्हर झाले तो मोबाईल मध्ये बघत हसत बोलतो...

Thank you दादा पिहू त्याला एका हाताने हग करत बोलते....
झोप लवकर उद्या पेपर आहे....मानव दार ओढत बाहेर येत बोलतो .

पिहू मोबाइल समोर ठेवत बॉक्स कडे बघून मोठी स्माइल करते....अहो काय आहे....

ओपन कर ....

ती एक्साइटेड होत ओपन करते.....एक बॉक्स होता तिने ओपन केला....त्यात डायमंड च ब्रेसलेट होते.....त्याला गॅप गॅप ने 🦋 बटरफ्लाय च लटकण होते.....पिहू भान हरपुन बघत होती....दिसायलाच ते खूप expensive आणि attractive वाटत होते....पिहू ...विराट ने हाक मारली...

वॉव 🤩 पिहू विराट कडे बघत बोलली....



घाल ना, बटर फ्लाय वेट करत आहे कधी नाजूक हाताला स्पर्श होतोय तो रोमांटिक आवाजात बोलला...

पिहू लाजून हातात घालू लागली.....

काढू नकोस....(ती खूप महागाचे असले तर कधी तरीच घालते..)..म्हणून तो बोलतो....

अहो खूपच नाजूक आहे मी कधी तरी घालते.....ती हात हलवत बोलते...ते लटकन हलवून हसते...

पिहू हातातून काढली ना बघ...ते कबोर्ड मधे ठेवायला नाहिये....ती गाल फुगवून च बघते....अहो,
.

अहो नाही काही नाही, ...

त्या रॅपर मध्ये चॉकलेट चा बॉक्स होता....तिने पटकन एक घेतलं आणि मोबाईलला लावते...
happy anniversary once again ती स्वतः खात बोलते....
विराट मागून केसमध्ये हात फिरवत मानेवरून खाली घेतो तिचे क्यूट नखरे बघून हसत होता.......

हसता काय केक नाहीये म्हणून आणि बर झाल चॉकलेट भेटले...चॉकलेट संपले होते...

मग सांगायच ना कोणाला तरी आणायला ...

मला फक्त तुम्ही आणले की आवडतात..... न सांगता संपायच्या आत आणता ते आवडते...तिचे डोळे पाणवले ..ती उलट्या अंगठ्याने कडा पुसत दुसरीकडे बघते.....

रडूबाई, इकडे बघ ....मला गिफ्ट काय आणलीस....हहहह. तो विषय बदलतो....

मी, तुम्ही हसणार नाही ना....मगच दाखवते.....

अस काय आणलीस विराट भुवई उंचावत गालात हसत विचारतो...

तुम्ही आतच हसताय बघून अजून. अहं ती मान हलवत नाही म्हणते....

ओके...ओके नाही हसणार ....बस...दाखव.. ...

अहो,

तू अहो अहो मधेच रात्र घालव .....

दाखवते ना किती चिडता...ती रैपर काढून दाखवते......त्यात दोन कॉफी मग होते....


दोन मग समोर धरत त्याला दाखवते...आणि डोळ्याने विचारते कस आहे....तो गालात हसत एक नजर खाली बघत तिच्या कडे बघतो.....
(आता पर्यंत तो तिला चांगलाच ओळखत होता तीच गिफ्ट कमी किमतीत असले तरी त्यात काही तरी लॉजिक असते....तिच्या भावना जुळल्या असतात...)

I miss you 😘 😞

(त्याला हेल्पलेस वाटत होते.....त्याच उद्या महत्वाच काम नसले असते तर तो एका दिवसात जाऊन आला असता पण तो ही मजबूर होता.....)पिहू ,लवकरच आपली मॉर्निग ह्या मग ने होईल.....पण मॉर्निंग माझी मग ने नाही तुझ्या ओठांनी करायची तो खट्याळ हसत बोलला ....पिहू लाजून दोन्ही हातांनी चेहरा झाकते....
आय हाय अशी लाजली तर कस होणार आहे माझ......तो गालावर हात ठेवत बोलतो....

पिहु लाजून लाल झाली होती....ती चेहर्‍यावरचे हात काढून त्याच्याकडे बघू लागली .....पिहु झोप आता लेट झाला पेपर आहे....
अह....चालू राहू द्या ना कॉल मी तुम्हाला बघत झोपते ..पिहू बेडवर आडव होत बोलते..

ठीक ये....झोप .....पिहू मोबाईल समोर ठेऊन डोळे झाकते.....विराट तिला बघत बेडवर झोपतो....पाच ते दहा मिनिटात पिहू झोपून जाते.... तिचा शांत निरागस चेहरा बघून त्याला जायची ईच्छा होत होती.........विराट कॉल कट करतो...


सकाळी सगळे पिहू ला विश करतात.....सुमन दुपारनंतर मानवच्या घरी येतात.....पिहू अजुन आली नव्हती....सुमन आणि रेवती गप्पा मारत बसतात....

आई तुम्ही कधी आलात पिहू आत येत बोलते....

खूप वेळ झाला आले पेपर कसा गेला....

हो मस्त ,अजून दोन दिवस मग झाल एकदाच हूशश ....पिहू हसून बोलते.....

पिहू लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....सुमन डोक्यावरून हात फिरवत बोलतात...पिहू पाया पडून आशिर्वाद घेते....

पुढ्च्या वर्षी छोटा विराट नाही पिहू हातात असू देत तुझ्या...सुमन रेवती कडे बघून हसून बोलतात....पिहू लाजून इकडेतिकडे बघते.....आई आले मी...ती काहीतरी बोलायचं म्हणून आत रूम मधे जाते.....

अग सुमन मी तिला किती वेळा सांगते....तर अजून नाहीच म्हणते......आता शिक्षण झाल ना....विचार करायला नको का....

पिहू बॅग ठेऊन परत येते....

करेल आता.....मला बोलली ती हो ना पिहू .....सुमन डोळे मिचकावत बोलते....पिहू लाजून खाली बघते....

मी विराट ला सुद्धा बोलले सकाळी....

तर मला ओरडू लागला.....

पिहू सुमन कडे नजर फिरवते....आता तूच सांग विराटला सुमन हसत बोलतात.....पिहू विचारात पडते.....त्यांच कधी ह्या विषयावर बोलणच झाल नाही....त्याच काय मत आहे बेबी बद्दल हेच माहीत नाही...रात्री घरी सगळे येऊन सेलिब्रेट करतात....विराटला विडिओ कॉल करतात....

पिहूचे पेपर संपतात.....आदि, तू बंगलोरला का चालला....

मी माझा बिजनेस तिकडे सेट केला..मॉम अँड डॅड सुद्धा तिकडेच येणार आहे....

ह्म्म....पिहू नाराज होत बोलते.....आदि बरोबर तीच बॉन्डिंग छान झाल होत....आणि अस अचानक तो चालला तर तिला वाईट वाटत होते....

पिहू मी अधून मधून येत जाणार आहे.....आदि हसत बोलतो....पिहू काळजी घे.....हिटलर ने त्रास दिला तर मला सांग मी बघेल त्याला....

आदि ,..मोठे डोळे करतच बोलते.....
सगळे हॉटेल. मधेच लंच करून घरी जातात ....

सुमन पिहू येणार आहे की नाही.....वीस पंचवीस दिवस झाले तिकडेच आहे... विराट नाही म्हणून राहू वाटत नाही का....

ताई एक्झाम होती म्हणून गेली होती....

हो इथे खूप काम करते....वेळ न मिळायला .....वीरा ची पन एक्झाम चालूच आहे ना ....

सुमन काहीच बोलत नाही....त्यांना ही पटले नव्हते....पण ती गोष्ट त्यांनी सोडून दिली ...

उद्या गेस्ट येणार आहेत बघ येते का.....

सुमन विराट ला कॉल करतात...

हा बोल मॉम,.

विराट पिहू ला सांग. ...उद्या घरी ये ...गेस्ट येणार आहे....

ह्म्म सांगतो, त्याला बोलण्याचा टोन वेगळा वाटला....

विराट, तुला पटले का हे एकाच शहरात राहून पिहू जाऊन मानव च्या घरी रहते....हो मान्य आहे आता नात आहे पण एक दोन दिवस ठीक ये ना.... इतके दिवस बिलकुल मला पटले नाही....

मॉम रिलॅक्स मी पिहूला सांगतो.... तो फोन ठेऊन विचारात पडतो.....

पिहू घरी येते....आल्या आल्या विराट ला कॉल करते....पण काय विराट फोन कट करुन तिला मेसेज करतो..

खरच हिटलरच आहे. हूहूह....पिहू झोपून टाकते....खूप दिवसानंतर शांत झोप लागली होती.....

विराट संध्याकाळी पिहूला कॉल लावतो.....मोबाईल साइलेंट असल्याने ती ला काळातच नाही.....संध्याकाळी सात लाच तिला जाग येते......

पिहू ,किती वेळ झाली झोपली उठ आता....रेवती बाहेरून च तिला ओरडून बोलतात......विराट चा दोन वेळा फोन आला होता....

पिहू ने मोबाइल बघितला तर विराटचे तीन चार मिस कॉल होते....पिहूचे डोळेच ताठ होतात....आज कुठून दिवस उगवला चक्क काम सोडून मला फोन करता येत पिहू हसत त्याला फोन करते.....

हॅलो ,....आज काय उठायच नव्हते का विराट हसत बोलतो...

हो, पिहू डोळे चोळत बोलते.....इतके मिस कॉल, काय काम होते...

का काम आल्यावरच मी कॉल करतो का....

तस नाही पण एक मिस कॉल च्या वर कधी पडत नाही ना...

ह्म्म ,काम होते....म्हणून कॉल केला होता....

हूहूहूह वाटलच मला.....

उद्या गेस्ट येणार आहेत घरी सकाळीच जा ....बाबांचे फ्रेंड्स येणार आहेत त्यांची फॅमिली सुद्धा येणार आहेत.... आता एक्झाम झालेत...

हो मी जाणार च होते.....पिहू चेहरा उतरत च बोलते. .....तो त्यावर काहीच बोलत नाही.

अहो ,

ह्म्म

मी पुण्याला जाऊ का....म्हणजे आता एक्झाम पण संपलेत.....

पिहू ,....आई ला नाही पटणार..... नंतर कधी तरी जा... .उद्या ड्राइवर येईल घ्यायला.....तो रागात बोलून फोन कट करतो...

पिहू एक नजर फोन कडे बघते.. .ती बाहेर येऊन हॉल मध्ये सोफ्यावर बसते....रेवती ने सगळे ऐकले होते.....तिच्या साठी खायला घेऊन येतात.....

धर पिहू ,खाऊन घे..आल्यापासून झोपली....

नकोय मला ती प्लेट बाजूला करत रेवतीच्या मांडीवर डोक ठेवून झोपते.....रेवती गालात हसत तिच्या केसांमधून हात फिरवतात..

बाळा ,आता लग्न झाल....तुझ स्वतः च हक्काच घर आहे..तुझी पजबाबदारी आहे घर आणि घरातल्या माणसांकडे लक्ष द्यायच.....आता जर मानवच घर नसले असते तर,....विराट इथे असला असता तर...तुला तिथे राहूनच exam द्यावी लागली असती ना ...मग एवढ नाराज होतात का.. हह...

पिहू उठून बसते....काळजी करू नको.... मी ठीक आहे......ते असच....

होत ग.....त्रास होतो ... आपण स्ट्राँग राहायच.....विराट ची आठवण येते ना....रेवती तिचा चेहरा स्वतः कडे करत बोलतात...पिहूचे डोळे काठोकाठ भरले...ती लगेच कुशीत शिरली....रेवतीचे डोळे भरले त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत केले......

.
.
.मानवने पिहू ला घरी सोडले आणि रेवतीला पुण्याला घेऊन गेला......

गेस्ट आल्याने पिहूचा पूर्ण दिवस त्यातच गेला.... विराटचा राग आलाच होता.....तिनेही त्याला कॉल केला नाही.....बेड वर पडल्या पडल्या तिला झोप लागली......फोन वाज ल्याने तिने झोपेतच फोन बघत कॉल रिसीव केला....हॅलो..

हहह पिहू डोळे झाकून बोलली....

झोपली आहेस तू....त्याने हातातल्या वॉच कडे बघत प्रश्न केला....

तसे पिहू ने डोळे उघडले....काय बोलला ,

अग अजून आठ ही नाही वाजले म्हणून विचारले....

पिहूच डोकच गरम झाले......हे बघा मी सगळ काम करून गेस्टची नीट खातिरदारी करून रूम मध्ये आले......
मग आता रूम मध्ये येऊन काय करू कोण आहे रूम मध्ये बोलायला....

पिहू काय झाल इतक का हाइपर होती येस....मी

तुम्ही बोलूच नका मला काही एक बोलायच नाही....वेळ असला की फोन करता....आणि केला तर हे अस राग येण्या सारख बोलता....

पिहू ऐकून घे शांत हो.मला तो पर्यंत तिने फोन कट केला

त्याला विचारायच होते...तुला बर वाटत नाही का एवढ्या लवकर झोपली...पण ते बोलायच्या आधीच पिहू बरसली....
दिवस भराचा राग सगळा विराट वर निघाला होता.....

त्याने परत फोन केला...तिने बघून कट केला....आणि परत डोळे झाकून घेतले....पन आता पूर्ण झोप उडाली होती....दहा अकरा च्या दरम्यान तिनेच वीडियो कॉल फोन केला.....

त्याने रिसीव केला...

ती काहीच बोलत नव्हती.....तो ही शांत होता...पिहू कालचा राग आला आहे का....तिने नजर फिरवली.....त्यावरून च त्याला कळले....

पिहू तू मोठी आहे आई माॅमला ही होत नाही सगळ हॅन्डल करता....त्यात तू इतके दिवस मानव च्या घरी होती.. जवळ असून तू .एकदा तरी भेटायला आली का ती गोष्ट मला बिलकुल पटली नाही....

ती त्याच्या कडे नजर फिरवते....अहो, सॉरी..मला इतक लक्षात आल नाही....

ठीक ये.... ही फॅमिली तुझी आहे....मी तुझ्या वर सोपवून इथे बिनधास्त काम करू शकतो.....मग तू ही काळजी घ्यायला हवी ना.....exam झाली म्हणून तू पुण्याला जायच बोलते.....राग येणारच ....इतके दिवस राहून तुझ मन भरत नाही....म्हणजे मी नाही म्हणून त्या घरात राहायच नाही का असा अर्थ धरू का.....

पिहू ला तिची चूक लक्षात आली....तिला गिल्टी वाटू लागले.....तिचे डोळे भरून आले....

पिहू मी तुला ओरडत नाहिये....फक्त जबाबदारी ची जाणीव करून देतोय .....माहित आहे मला तू मुद्दाम केल नाहीये ..

सॉरी ती डोळे पुसत बोलते....

रडू नको I love you....तो प्रेमाने बोलतो....

अहो,

हहह बोल तो गालात हसत बोलला....

तुम्ही कधी येणार लवकर या ना...मला तुमच्या कुशीत झोपायच .......

हो ग ....सोना थोडे च दिवस....त्याने मोबाइल ला ओठ टेकवले....

पिहू लाजून हसू लागली....

अजून हवेत किस ,तो रोमांटिक आवाजात बोलला.....

कडू आहेत....

अच्छा, कडू का....जेव्हा भेटू ना तेव्हा सांगतो....किती कडू आहे....पिहूच्या पोटात गुदगुल्या होऊ लागल्या चेहरा गुलाबी झाला होता....

पिहू ,जा डिनर कर मग झोप....

नको मला...ती परत बेडवर आडव होत बोलली....दार नॉक झाले...ती ब्लँक होत दाराकडे बघू लागली...

ओपन द डोर.....गीता आहे...

ऑहहह,तुम्ही अहो मी नंतर जेवले असते ना ती बडबड करतच दार उघडते....

तू bed वरुन उठलीच नसते ....खाली कधी जाऊन जेवणार....

ति डिनर घेत बाहेर गॅलरीत आली. समोर मोबाइल ठेवून त्याच्याशी गप्पा मारत जेवू लागली. अता कुठे ती ही relax झाली.....

दिवसा मागून दिवस जात होते.....विराटला जाऊन आता दोन महिने झाले होते.....पिहूचा दिवस सगळा असाच जायचा.....रात्री नमन वीरा रिषभ त्यांचा गोंधळ असल्याने तिला करमून जायचे.....प्रांजल ही जसं वेळ मिळेल तस भेटायला येत होती......

सकाळची सुरवात पिहुला वीडियो कॉल करून च होत होती.....

पिहू चा बर्थडे आला होता.

अहो, तुम्ही येणार ना....पिहू हट्ट करतच बोलली...

तो थोड्या वेळ शांतच होता....पिहू ,तुला काय हवे....गिफ्ट तो विषय वळवत आहे हे पिहु च्या लक्षात आले....

ती हसून मानेनेच काही नको म्हणते....

का,

अशी कुठली गोष्ट तुम्ही दिली नाही ...सगळ तर आहे.....

ह्म्म ,विराट हलक हसतो....पिहू ने परत विचारलच नाही.....तो त्या विषयी बोलत नाही म्हणजे येणार नाही असाच अर्थ असतो.....

अहो ,मला तिकडे यायच....

हहह हे काय मधेच...इकडे येऊन काय करणार...

हा पन तुमच्या बरोबर थोडे दिवस राहते ना.....आता कॉलेज नाही.....घरात बसून बोर होत......

साईट वर कोण जाणार,...मला यायलाच आठ नऊ होतात...कधी कधी बारा ही होतात....लवकरात लवकर संपवायच.....नमन च्या बर्थडे ला ओपनिंग करायच.....
(पिहू चा चेहराच पडतो....कुठे तरी मनात वाईट वाटत होते...माझ्या बर्थडे ला येऊ वाटत नाही मला ये म्हणत नाही....)

मी दोन तीन डेज साठीच येते....मानव दादा दोनदा आला होता तस...

पिहू काम होत म्हणुन आला होता...आणि परत रिटर्न सुद्धा येतो विराट हसत बोलतो...

नेक्स्ट टाइम दादा येत असेल तर मी पन येणार...

पिहू .... मी एकाच ठिकाणी नसतो.....काम असले की ...कधी कधी रात्र होते.....आता सिंगापुरला ही जायच......,इकडे एकटी राहावे लागेल ...बघ ठरव...कोण आहे इथे हट्ट करते........तो थोडसं रागवत च बोलतो....

ती शांत होते....अहो, मी पण येते सिंगापुरला मला ही बघायच पिहू एक्साईट होतच बोलते....विराट डोक्यालाच हात मारतो....पिहू ,एकदा काम संपले ना सेकंड हनी मून ला जाऊ तो डोळा मारत बोलतो.....

पिहू लाजून तोंडावर हात धरून हसते ....काही बोलता पिहू लाजून बोलते....

का तुला नाही यायच.....हहहह अं

पिहू दोन्ही हातांनी चेहरा लपवत मानेनेच हो बोलते....

विराट तीच लाजणं बघून जोरात हसतो....पिहू खरच मॅड आहेस.....

का? पिहू हात काढून गाल फुगवून च बोलते....

काही नाही ,तू सांग तुला कुठे जायच आपण जाऊ.....

अहो,

हहह, तो पाणी पीत हुंकार भरतो ...

आपण बेबी प्लॅनिंग कधी करायच तसा त्याला ठसकाच लागतो...तो खोकत ब्लँक होत तिच्या कडे बघतो....

अहो हळू प्या ना पिहू काळजीने बोलली....

तू...तू...का...य बोलली....हहहह तो टिशू ने ओठांवर च पाणी टिपत बोलला....

मी, बेबीच बोलत होते....ती ही त्याची रिएक्शन बघून थोडी दबकतच बोलली...

हे कुठून मध्येच ... मॉम काही बोलली का तो थोड सिरियस बोलला...

ती मानेनेच हा बोलली...पण मानत तिच्या ही होत...

मॉमच तू मनावर घेऊ नको...सगळे तसेच बोलत असतात...लग्न झाल की सगळ्यांना बाळाचे वेद लागतात....पहिले लग्न लग्न म्हणून डोक उठवतात नंतर बाळ हव ....म्हणून तो थोडा वैतागूनच बोलतो....

अहो,

पिहू मला वाटते तु ऑफिस जॉईन कराव.....

काय पिहू ब्लँक होत विचारते.....

हो ...घरात बसुन बोर होण्या पेक्षा ऑफिस ला जा.....मानव नमन आहे तुला हेल्प करतील.....

आपण नंतर बोलू ह्या विषयवार पिहू चेहरा उतरत बोलते....

ओके ,किती वेळ घ्यायचा तेवढा घे....पण विचार कर...

.
.

विराट पिहू ला कॉल करतो....गुड मॉर्निग, स्वीटी 😘😘तो किस करत बोलतो...

गुड मॉर्निग ..पिहू अजून बेडवर च लोळत होती....

आज उठायच नाही का.....तो मोबाईल समोर ठेवून त्याच आवरत बोलला......

कोण नाहिये घरी ती नाराज होत बोलते....

ह्म्म, त्याला माहीत होते....आईबाबा , पिहू आणि आजी च घरी आहे...नमनच पेंटिंग एक्झबिशन होते....
फंक्शनला वीरा आणि मॉम कोल्हापुरला गेले होते....
.
.पिहू ,कुठे तरी फिरून ये.....

जाणार होते...पण आईबाबा चालले बाहेर आजी घरीच आहे ना...म्हणून कॅन्सल केले....

ह्म्म,

अहो,

ह्म्म....तो ही घाईत होता....

रात्री मी पाहिले मम्मीचा कॉल उचलणार आहे मग तुमचा ती हसत मुद्दाम बोलत होती....

हो हो ,ठीक आहे मी करतो तुला कॉल रात्री थोडा उशीर होईल...बाय तो मोबाईल वर किस करत कट करतो...

पिहू विचारात च पडते....विराट ला कळले मी काय बोलत होते...

पिहू च्या बर्थडे ला रात्री तिच्या आईवडिलांनाचा प्रांजल चा विडिओ कॉल करतात....तिला बर्थडे विश करतात. .. चौघे जण बोलून पिहू फोन ठेवते....साडे बारा वाज ले तरी विराट चा कॉल आला नव्हता....तिने दोन वेळा चेक केला...व्हॉट अप चेक केले तो ऑनलाईन आहे का बघायला नव्हता...म्हणजे तो अजून घरी आला नसेल....लास्ट सीन दुपार च होत....तो बाहेर डिनर ला जाणार होता....मोबाईल बघत बघत झोपून गेली.....विराट ला यायलाच घरी एक होतो...तो फ्रेश होऊन मोबाईल घेतला त्याने विडिओ कॉल केला...
तिने पटकन उचलला....happy birthday princess 😘 😘 अँड सॉरी लेट झाला ना तो नाराज होत बोलतो....

ती मानेनेच नाही म्हणत ... थँक यू हसत बोलते....झोपा उद्या करा कॉल ..

बोल ना.....राग आला का...

नाही ओ ...झोप बघा किती आहे.....तो सकाळी सात ला बाहेर पडला होता...आणि आता आलाय त्याचे डोळे सांगत होते....तो किती थकला आहे....

पिहू मी करणार होतो,

शु शुss.. अहो मला नाही राग आला.....वाटतय का माझ्या चेहर्‍यावर....काही बोलू नका झोपा फोन चालू राहू द्या.....मी कट करते तुम्ही झोपला की....त्याला गिल्टी वाटत होते हे त्याच्या चेहर्‍यावर दिसत होते. ....तो तिला बघत पाच मिनिटात झोपून ही गेला....

पिहू ने हलकेच डोळे पुसून फोन कट केला ....बर्थडे च्या दिवशी ती अशी पहिल्यांदाच एकटी होती.....घरात ही कोणीच नव्हते....रोहिणी होती पण ती असून नसल्यासारखी होती.....

सकाळी विराट ला जाग आली त्याने मोबाईल घेत परत पिहू ला फोन लावला.....तिने उचलला नाही....
त्याने घरच्या फोन वर केला रोहिणी ने फोन उचलला.....
थोड फार रोहिणी शी बोलून त्याने पिहु ला द्यायला सांगितला....

ती पूजा करते नंतर सांगते फोन करायला रोहिणी ने सांगून फोन ठेवून दिला....

विराटच मन आतून जळत होते.....पिहू घरी एकटीच आहे.....ते पण बर्थडे आहे....दररोज सारखाच दिवस चालू झाला होता....पन एका शब्दाने तिने कम्प्लेंट केली नाही...कसला राग व्यक्त केला नाही.....

पिहू त्याला कॉल लावला...पण त्याचा बिझी लागत होता....नंतर तिचे ही कॉल चालू झाले...
............


प्रांजल ला कळले तेव्हा ती कॉलेज बंक करून घरी आली होती .....

प्रांजू तू कॉलेज सोडून का आली ते सांग

अरे माझ्या दी चा बर्थडे आणि मी कॉलेज मध्ये अस कस होईल प्रांजल दात काढत बोलते....

पिहू तिला लूक देत बेडवर चा पीलो फेकून मारते.....

अरे सॉरी दी.....परत नाही करणार.....चल आपण मस्त हॉरर मूवी बघू प्रांजल सगळे कर्टन खाली घेत अंधार करते.....

पिहू हसत टीव्ही ऑन करते...प्रांजू तू काय खाणार मी घेऊन येते....

अरे दी आज मी तुला काम लावले ना, पाप लागेल ग ...प्रांजल नाटकी चेहरा करत बोलते....

नौटंकी सांग काय हव....

तू थांब मी ऑर्डर करते.....प्रांजल पिज्जा ऑर्डर करते .....

दोघीं गप्पा मारत हसत मूवी बघतात....दी ऑर्डर आले मी घेऊन आले.....

राहु दे कोणीतरी आणेल....पिहू तिला थांबवत बोलते.....

खालून तर आणायच....ती पळतच निघते ......

रोहिणी फोनवर बोलत येत होती...प्रांजल पळतच खाली येत होती ....दोघींची टक्कर होती.......

सॉरी सॉरी आंटी, प्रांजल रोहिणीचा मोबाइल उचलत बोलली....

अग डोळे आहेत की नाही ....देवाने फ़क्त मेकअप करायला डोळे दिले नाही.....रोहिणी मोबाईल ओढून घेत रागाने बोलली....

मला का आहेत ना...हे बघा .....माझा मेकअप छान झाला वाटत इतक लक्ष गेल.......प्रांजल कुचक हसत एक लुक देत पार्सल घ्यायला जाते...

रोहिणीचा पाराच चढतो...ती रागाने तिच्याकडेच बघत होती....

प्रांजल चाललीच होती....मागून रोहिणी बोलते..... तुला काय कॉलेजला सारखीच सुट्टी असते का ग......हहह...काही शिकते की नाही ,का टाइम पास म्हणुन जाते. कॉलेजला सारख्या सुट्टय़ाच घेते.... आई वडिलांनी एवढ्या लांब पाठवले ....शिकायला आणि तू .... उगाच पैसे वाया घालवायचे...... रोहिणी कुचक हसत बोलते....

प्रांजल डोळे झाकून केस मागे घेऊन रागावर कंट्रोल करत वळून रोहिणी समोर येते....आंटी, किती काळजी करता हहहह ....thank you हहह .... माझ्या आईवडिलांची काळजी तुम्ही नका करू.....मी आह़े ना....त्यांची काळजी घ्यायला.....एक तर तुम्हाला किती जणांच टेंशन असते....
वाया नुसार एवढे टेंशन चांगले नसते...आधीच बीपी शुगर असेल.....गोळ्या नीट घ्या डोक शांत राहील.....वायानुसार होत ...समजू शकते......प्रांजल बॉक्स टाइप स्माइल करत नाक मुरडून निघून जाते....

रोहिणी शॉक मधेच तिला जाताना बघत होती....ही मला म्हातारी बोलून गेली की काय......नाही ह्या मुलीला मी काय चीज ये दाखवली ना नावाची रोहिणी नाही सांगणार... आगाऊ मुलगी.. जीभ तर कात्री सारखी चरचर चालते....कुठे ती पिहू आणि आणि कुठे ही........रोहिणी पाय आपट च निघून जाते....

काय प्रॉब्लेम आहे काय माहित प्रांजल चिडून रूम मध्ये येते.....

काय झाल किती वेळ....

प्रांजल पिज्जा ओपन करत...आय स्वेर दी ही तुझी सासू ना....कधी कधी माझ्या तावडीत सापडली ना.
..

हे...हे...ही कुठली पद्धत बोलायची....नीट बोल मोठ्या आहेत त्या पिहू ओरडून बोलते....

हो ग माते....पण आगाऊ किती आहेत त्या....सारख काही ना काही बोलत असतात...तुझी सासू म्हणून मी गोडीत घेते....तुला माझ्या मुळे त्रास नको...नाही तर अश्या लोकांना मला चांगलच सरळ करता येते...

प्रांजु अस बोलतात का....काय बोलल्या का तुला....पिहू तिचा पारा बघून तिला काळजीने बोलते....

पिहूचा चेहरा बघून प्रांजल नॉर्मल होते.....नाही, ग असच...सोड .....मूवी बघ धर प्रांजल तिला खाऊ घालत
विषय चेंज करते......

दोघी मूवी बघून झोपून जातात.....चार साडे चारला प्रांजलला मानवचा कॉल येतो....

दी दादा डिनरला जाऊ म्हणतोय.....

अग आई अणि वीरा येणार आहेत....चांगल नाही वाटत आपण नंतर कधी तरी जाऊ. ..

अरे दी....बर्थडे आहे तुझा अस घरात सेलीब्रेट करणार का.....आवर तू खूपच विचार करते अख्ख घर दार बाहेर फिरते.... बर्थडे दिवशी पन विचार कर.....खरच ह्या च जागी दूसर कोणाचा बर्थडे असला असता ना.....दिवाळी सारखा करतात.....आणि तुझ्या बर्थडे ला घरात कोण आहे....आणि तुझी मोठी आईने साध विश पण केले नसेल......

बेबी काय झाल इतक चिडते....पिहू तिला जवळ घेत पाठीवरून हात फिरवत शांत करते...

प्रांजल पण दोन्ही हातांनी तिला घट्ट बिलगते....प्रांजल ला वाईट वाटत होते.... बर्थडे च्या दिवशी घरात कोणीच नाही
I love you di...तू खूप भोळी आहेस....स्वतः चा विचार का करत नाही .तुझी ही लाइफ आहे.. तू आता फक्त घर... जिजू च्या इर्दगिर्द असते....त्यातून बाहेर पड स्वतः साठी जग...

पिहू हसते ....मला ह्यातच आनंद मिळतो.....बाळा पिहू तिच्या हनुवटीला धरून कपाळावर ओठ टेकवते.

दी तू येणार नाही का, प्रांजल चिडून बोलते....

एक मिनिट मी आईना विचारते कधी येणार आहे पिहू कॉल लावत बोलते.....पिहु फोनवर बोलून ठेवते....आवरते आईना यायला लेट होणार आहे...

Yeeeye, चल. मी चूस करते... प्रांजल वॉर्डरोब ओपन करत बोलते....

ठिक ये.....

दी हे तुझ वॉर्डरोब आहे प्रांजल ब्लँक होत विचारते....

हो, का पिहू ड्रेस बघत बोलते.....

नाही इतक क्लीन व्हह क्या बात है....

पिहू रागाने बारीक डोळे करून बघते....

प्रांजल जोरात हसते ...जिजू ने शिकवल आहे का अस ठेवायचे....

मी काही करत नाही....,तेच करून देतात....पिहू बोलून पटकन जीभ चावते...

काय बोलली, प्रांजल शॉक होत पिहू च्या खांद्याला धरत वळवून विचारते....

अम्म....ते...ते....ते हेल्प करतात..... .पिहू नजर चोरून बोलते....

म्हणजे जिजू हे सगळ ठेवतात....अरे वाह....भारी आहेस की तू......

अग मला हे ठेवायला बोर होते माहित आहे. .....अर्धी तर भांडण हे नीट का नाही ते नीट का नाही ह्यातच होतात....मग रागाने स्वतः च नीट ठेवत बसतात.... आणि हात पन फास्ट आहे.....पंधरा मिनिटच लागतात....प्रॉपर घड्या घालायला....आणि मला एक ड्रेस घड़ी घालायलाच दहा मिनिट लागतो.....पिहू आवरत सांगत होती....प्रांजल ला मज्जा वाटत होती. दोघांचे किस्से ऐकायला.....

दोघी आवरतात....पिहूने रेड पिंक मिक्स कलरची डिजाइनर शिफाॅन ची साडी घातली ...विराटनेच आणली होती पन कधी घालणे झाले नव्हते.......हलका मेकअप एका हातात नाजूक वॉच तर दुसर्‍या हातात विराट ने दिलेले ब्रेसलेट गळ्यात मोठ नाजूक मंगळसूत्र .....सिंगल पदर सोडून तिने हातावर घेतला....मानव घरी आला होता दोघींना घ्यायला.....

रोहिणी मानव कडून बिझनेस ची इन्फर्मेशन काही मिळते का म्हणून गोड बोलत विचार पुस करत होती....मानवला स्वभाव माहीत असल्याने तो बरोबर विषय बदलत होता.....पिहू प्रांजलला बघून मानव उठतो...आई येतो परत तो आतून कधी त्याची सुटका होती हेच बघत होता .....

रोहिणी वरवर हसते ....

बाहेर येऊन तो डोळे ताठ करत दोघी कडे बघतो....किती वेळ यायला तो वैतागत गाडीत बसत बोलतो...दोघी हसत गाडीत बसतात...हॉटेल मध्ये येतात....मानव मॅनेजर शी बोलून दोघीं कडे येतो....हॉटेलच्या दहाव्या मजल्यावर येऊन लिफ्ट थांबते....

दादा ,आपण खाली च डिनर केले असते....

अस कस हॉटेलच्या ओनरच्या बायकोचा बर्थडे अणि साधा सुधा कसा होईल.....मानव हसत बोलत बाहेर येतो....

वॉव ......प्रांजल पुढचा नजरा बघून जोरात एक्साईट होत बोलते.....पिहू ही ब्लँक होऊन पुढे बघते....

पूर्ण हॉल रेड -पिंक बलून ने भरली होता..लाइटिंग कलरफूल त्यावर पडत होती.......सगळी कडे व्हाइट फ्लावर,कर्टन ने डेकोरेट केले होते......लाईट ऑफ होते तशी पिहू दचकते....
प्रांजू ती बोलतच होती की मागून शूजचा आवाज आल्यावर तिचा श्वास अडकला होता....तो आवाज जवळ येत होता.......हृदय शंभर च्या स्पीड ने वाढल होते......अंगावर गोड शहारा येत होता....ओठ थरथर कापत होते.....अंग सोडून द्यायची इच्छा होत होती....खूप दिवस त्या हाताचा स्पर्श झाला नव्हता....डोळ्यातून पाणी गालावर आले होते....कंठ दाटून आला होता......मागे वळून बघायची इच्छा ही होत होती भीती ही वाटत होती...स्वप्न तर नसेल ना....आणि स्वप्न तुटले तर किती त्रास होईल....तिने डोळे घट्ट मिटून मंगळसूत्र हातात घट्ट पकडले होते.....काही क्षणात आपण एका सेफ मिठीत असल्या सारखे वाटले .....विराट ने मागून तिला घट्ट मिठीत घेतले होते....त्याचा गरम श्वास तिच्या मानेवर जाणवत होता....तसे तिने अलगद डोळे उघडले ..त्याचे हात तिच्या पोटावर होते...
तिने त्याच्या हातावर नजर टाकत मायेने थरथरत हात फिरवू लागली....तिला रडाव का हसू अशी अवस्था झाली होती.....तिने मान फिरवून बघितले विराट तिच्या खांद्यावर हनुवटी ठेऊन डोळे झाकून तिचा सुगंध भरून घेत होता.....
पिहू ने तिचा हात त्याच्या गालावर ठेवला ..त्याने डोळे उघडून तिच्या कडे बघितले....दोन अडीच महिन्यांनी दोघे बघत होते.....
पिहू फिरून पटकन त्याच्या कुशीत शिरली.....विराट तिच्या कमरेला विळखा घालत उचलून गोल गोल फिरवू लागला.....
दोघे बोलत नव्हते फक्त एकमेकांचा स्पर्श अनुभवत होते....
खूप वेळा ने विराट ने तिला खाली सोडून दोन्ही हातांनी तिचा चेहरा हातात घेत पूर्ण चेहर्‍यावर किस करत होता.....दोघेही एकमेकांच्या डोळ्यात आरपार बघत होते.....कधी त्यांचे ओठ एक झाले कळलेच नाही.....खूप दिवसाची तहान तिच्या ओठांनी तो भागवत होता....तिचा श्वास जड झाल्यावर त्याने तिला मिठीत घेत दीर्घ श्वास घेतला. ....पिहू ही त्याच्या छातीवर डोक ठेऊन श्वास घेत होती..... त्याचे हृदयाचे ठोके खूप दिवसाने ती ऐकत होती... मधुर संगीत कानात गुन गुन करत होते.... तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत
करू लागला.....

खूप वेळा ने तो भानावर आल्यावर तिचा चेहरा एका हातात पकड़त तिच्या डोळ्यात बघत बोलला...happy birthday princess 😘😘😘😍😍 त्याचा तो मॅजिक वाला आवाज खूप दिवसाने जवळून ऐकत होती....

पिहू च्या चेहर्‍यावर हळू हळू स्माइल येत तिची खळी पडली.....त्याने गालात हसत तिच्या खळीवर ओठ टेकवले..... लाइट चालू झाले पुर्ण हॉल भर तीचे फोटो दिसत होते.....तिने सगळी कडे नजर वळवली..... फोटोज खूप छान दिसत होते.....तिच मन सकाळ पासून उदास होते....विराट ला बघून तिच्या आनंद गगनात मावत नव्हता....चेहरा गुलाबी गुलाबी झाला होता....खळी काही केल्या कमी होत नव्हती.....
विराट ने तिला बाजूला केले आणि समोर हात केला....पिहू ने त्या हाता कडे बघितले......तस गाण लागले.....

एक दिल है
एक जान है

डोळ्याने तिला हात दे बोलला..पिहू तिचा हात त्याच्या हातात देते.....तो तिला गोल फिरवत मिठीत घेतो....

दोनों तुझपे कुर्बान है
एक मैं हूँ
एक ईमान है
दोनों तुझपे हाँ तुझपे
दोनों तुझपे कुर्बान है
एक दिल है..

आ.. इश्क भी तू मेरा प्यार भी तू
मेरी बात ज़ात जज़्बात भी तू
परवाज़ भी तू रूह-ए-साज़ भी तू
मेरी सांस नब्ज़ और हयात भी तू

पिहू ने त्याच्या शोल्डर वर हात ठेऊन त्याच्या डोळ्यात बघू लागली.....त्याच्या तालावर ती ही साथ देऊ लागली...

मेरा राज़ भी तू
कुफर आज भी तू
मेरी आस प्यास और लिबास भी तू
मेरी जीत भी तू
मेरी हार भी तू
मेरा राज़ राज़ और मिसाज भी तू

मेरे इश्क के
हर मकाम में
हर सुबह में
हर शाम में
इक रुतबा है
एक शान है

दोनों तुझपे हाँ तुझपे
दोनों तुझपे कुर्बान है

एक दिल है.....डांस करता करता पिहू ने डोळे झाकले...तसे त्याने तिच्या गुलाबी ओठांचा ताबा घेतला. त्याने तिला डीप किस केले......ती ही हळुवार त्याला साथ देऊ लागली. ....दोघांना ही जगाचा विसर पडला होता....
गाण बंद झाल्यावर पिहू भानावर आली ....

अहो, ssss ती तोंडावर हात ठेऊन एक्साइटेड होत बोलू लागली......

हो, आलोय मी त्याने हसत तिला परत मिठीत घेतल....

अहो, मला विश्वास बसत नाहिये ती तिच्या चेहर्‍यावर अंगावर हात फिरवत बोलते....

त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले... I love you beby..😘😘😘.

I love you too....ती कंठ दाटून बोलून त्याच्या कुशीत शिरून रडत बिलगली . ..

रडू बाई आज ही त्या डोळ्यांना आराम देऊ नको......त्याने समोरचे टिशू घेतले आणि तिचे डोळे नीट पुसले....

तुम्ही आधी का नाही सांगितल ती तिच्या छातीवर पंच करत बोलते.....

तो हसत मागे झुकतो....सांगितले असते तर नॅचरल खळी बघायला मिळाली असते का.. सरप्राईज होते....आवडल गिफ्ट मी आलेलो..... पिहू मानेनेच हो म्हणत त्याला बिलगते.....तो तिच्या भोवती हात घेत तिला जवळ घेत केक समोर घेऊन येतो.....

पिहूला केक कडे बघून लक्षात येते...अहो ,प्रांजू दादा ती डोर कडे बघत बोलते...

ते डिनर करत असतील खाली...

अहो पन प्र...त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवले...शुशु sss प्रांजू

आणि मानव बरोबरच प्लॅन केला आहे.....माहित आहे
तेव्हा कुठे ती शांत होते....त्याने नाईफ हातात घेतली. ...आणि केक कट केला ....तिने त्याला केक खाऊ घातला त्याने ही तिला खाऊ घातला....थोडा सा केक तिने त्याच्या गालावर लावून जीभ दाखवत पळू लागली ...

पिहू sss तो तिच्या मागे पळू लागला....त्याने पटकन तिला पकडले आणि तिचा हात पकडून जवळ ओढले....खुप बदमाश झाली...ये.... तिला गुदगुल्या करत बोलू लागला....

पिहू खळखळून हसत होती....अहो ...सोडा...ना....परत ना....नाही....तिच्या डोळ्यात हसून पाणी आल होते....खूप दिवसांनी अशी मनमोकळी हसली नव्हती....

सोडतो....क्लीन कर त्याने गाल पुढे केला....

ती टिशू ने पुसत होती तर त्याने टिशू फेकून दिला....आणि गाल पुढे केला....पिहू समजून गेली...तिने तिचा गाल त्याच्या गालाला लावला...तिचा स्पर्श होताच विराट ने तिला अजून जवळ ओढले......दोघांनाही एकमेकांना पासून दूर होयच
नव्हत.....त्याने तिला उचलून घेतले....आणि काउच वर बसवले.....

अहो ,तुम्ही येणार नव्हता ना.....अचानक

सरप्राईज होते तो हसत बोलला.....त्याने डिनर मागवल

खर तिने नजर रोखून बघितले.....

पिहू ,मी आलोय आवडल नाही का....( तो येणार च नव्हता त्याला सिंगापुर ला जायच होते...पण पिहू एकटी त्याच मन विचलित झाल होते....त्याने सिंगापुर तिकिट्स कॅन्सल केले होते)
पिहू उठून त्याच्या मांडीवर बसून बिलगली..मी खूप मिस केलं ती कंठ दाटून बोलू लागली.......त्याने ही तिला कुशीत घेतले....आणि केसांवर ओठ टेकवले....आता रडली ना बघ हहह.....

ती हसत मान हलवत नाही म्हणते......

गुड चल खाऊन घे....

दोघांनी डिनर केल.....खूप दिवसच्या गप्प रंगल्या होत्या ..
पिहू ची मस्ती वाढतच चालली होती.....तो ही तिचे नखरे झेलत तिला भरवत होता....

मानव प्रांजल डिनर करून वर येतात.....प्रांजल खोकण्याच नाटक करते...दोघे नजर वळवतात...

झाला बर्थडे सेलीब्रेट प्रांजल केक घेऊन पिहू ला भरवत बोलते...

पिहू लाजून खाली बघते.....

दादा, चेहरा खूप पिंकी पिंकी झाला कोणाचा तरी.....प्रांजल हसत चिडवत बोलते....

पिहू प्रांजल ला डोळ्याने शांत बस म्हणते....विराट मानव हसतात....

चला घरी जाऊ....मानव बोलतो....चौघे ही घरी येतात...

दादा आत चल ना....

पिहू लेट झाला उद्या प्रांजल ला लवकर सोडायच....

ह्म्म, दोघे ही पिहूला परत विश करून निघून गेले....

विराट तिला जवळ घेत आत आला....दार उघडले तसे सगळे एकसाथ लाइट ऑन करून जोरात ओरडले....happy birthday....पिहू दचकून सगळी कडे बघू लागली....सगळे ही विराट ला बघून शॉक मध्ये बघत होते....कोणालाच माहीत नव्हते तो येणार आहे.....सगळ्यांच्या चेहर्‍यावर मोठी स्माइल आली.... दादा, ss वीरा पळतच जात विराट ला बिलगते....विराट हसून तिच्या पाठीवरून हात फिरवतो....

वीरा पिहूला विश कर सुमन पिहू जवळ येत बोलतात

सगळे पिहू ला विश करतात....सुमन विराट ला जवळ घेतात....

वहिनी केक कट कर ये... बारा वाजत आले.....नमन हात पकडून केक समोर आणतो.....

पिहू ला तर स्वप्न असल्या सारख वाटत होते....सकाळ पासुन एकटीच होती....

सॉरी वहिनी लेट झाला यायला वीरा समोर येत बोलते....

पिहू हसून तिला जवळ घेते....पिहू एक नजर विराट कडे बघते तो डोळ्याने तिला कट कर बोलतो...पिहू हसून केक कट करुन सगळ्यांना भरवते ...

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣