Reshmi Nate - 38 books and stories free download online pdf in Marathi

रेशमी नाते - 38

पिहू तीच आवरून किचन मधे येऊन पूजा वैगेरे आटोपून सगळ्यांच्या आवडीचं ब्रेकफास्ट बनवायला लावते ..
प्रांजल नमन दोघे ही घरी येतात....

गुड मॉर्निंग वहिनी,नमन बोलून रूम मध्ये जातो...पिहू हसत एक नजर बघत प्रांजल कडे बघते...कुठे गेले होते तुम्ही..

जॉगिंग ला इथेच जवळ गार्डन आहे.

प्रांजु अस जात जाऊ नका कुठे?मी तर आल्यापासून गेट च्या बाहेर एकटी जात नाही आणि तूला कसली भीतीच नाही.

दी, मी लहान आहे का?हरवायला..

जा आंघोळ कर, तुझ्यासाठी मी तुझ्या आवडीचे पराठे केलेत....

दि,...माझ्या डायट मध्ये नाहिये....तू विचारात पण प्रांजल चिडून बोलून गेली. पिहू हसते ...डायट आणि माझ्या समोर मी करून देईन तर ना.

सगळे ब्रेकफास्ट साठी येतात.....

गुड मॉर्निंग वहिनी आलीशा पिहूला हग करत चेयर वर बसते.

पिहू वरवर हसत विश करत प्रांजल च्या शेजारी बसते.
सगळ्यांचा नॉर्मल गप्पा मारत होते.

आलीशा कुठे चालली का?? ती आवरलेले बघून वीरा विचारते.

हो ,ग थोड काम आहे....

इथे,

ह्म्म, .दोन तीन ओळखीचे वेडिंग planner आहेत...त्

तू इकडे करणार तुझ लग्न

नाही, ग....मी कस्टमर साठी बघायला चालले. रिषभ तू येणार आहेस ना....

हो, ग येतो....

ओह्ह, मस्त दोघांच प्लॅनिंग ठरले आहे...हम्म, वीरा चिडवत बोलते...

रि...रिषभ दादा, पिहू मधेच तोडत बोलते....दादा, तुम्ही नमन बरोबर जाणार नाहिये का....

जाणार होतो, मी दादा ला सांगितले.....

पिहू वर वर हसत बॉक्स टाइप स्मायल देते....ह्यांना आल्यावर बघते पिहू मानतच चिडून बोलते.

नमन साईट वर निघून गेला. रिषभ आणि आलीशा बाहेर गेले .वीरा आणि प्रांजल त्या त्यांच्या गप्पा मारत बसल्या होत्या.

पिहू पण सगळ आवरून स्टाफ त्यांच्या कॉटेज मध्ये गेल्यावर मेन डोर लाऊन घेते. आणि रूममध्ये येऊन ऑफिसच काम घेऊन बसली. संध्याकाळी नमन आला...पिहू किचन मधे दिसली. त्याने वीरा च्या रूम मध्ये डोकावले तर दोघी मस्त झोपल्या होत्या..

त्याने प्रांजल वर नजर टाकली आणि फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये गेला.

तो हॉल मध्ये आल्यावर पिहू ने त्याच्या साठी गरम गरम ☕ कॉफी आणली.

थँक्स 😊 वहिनी ,त्याने हातातून मग घेतला. दादा आला का,

उशीर होणार आहे........आलीशा रिषभ दादा कधी येणार आहे.

येतील, ... ते बघ आले.....रिषभ आलीशा कडे बघून नमन बोलला.

पिहू relax झाली.

प्रांजल डोळे चोळतच बाहेर आली....दी किती थंडी आहे...प्रांजल पिहू शेजारी बसत बोलते....

प्रांजल...तु ट्रेकिंग ला कधी गेली का नमन तिच्या कडे बघत बोलतो....

हो, एकदा गेले होते.घरात रामायण झाले नंतर मला कोणी जाऊ दिले नाही प्रांजल पिहू कडे रागाने बघत बोलते....

नमन हलके हसतो...वहिनी तू गेलीस का कधी....त्यावर प्रांजल जोरात खो खो हसते....

नमन,दी ला ट्रेकिंग च नाव काढले की चिडते आणि तू कधी गेली का विचारतोय.....तिच्या फ्रेंड्स ने एकदा विचारले तर तयार झाली....तिला वाटले फिरून वैगेरे यायच असेल....तिथे रहायचे बोलले मग काय कॅन्सल....

प्रांजल, जंगलात जाऊन ते तसले टेंट करून कोण रहते का विचित्र पणा पिहू चिडून बोलते.

त्यात काय विचित्र,...

हो, वहिनी खूप relax फील होते...अस nature च्या सानिध्यात रहायला...मस्त फिलिंग येते....नमन excited होत बोलते.

whats going on guys? ...वीरा झोपेतून उठून नमनच्या खांद्यावर डोके ठेवून बसते. ...

ट्रेकिंग चा विषय चालला आहे....प्रांजल बोलते...

वॉव, आपण जातोय का??वीरा नमन कडे बघत बोलते....

रिषभ आलीशा फ्रेश होऊन येतात.

No baby, अजून तस काही ठरले नाहिये...दादा तयार झाला की जाऊ.....मी आज साईट वर गेलो होतो ना....त्यांच ग्रुप डिस्कशन चालू होते...ते मुन्नारला ट्रेकिंगला जाणार आहे..दादा ला पण विचारले अजून काही रीप्लाय दिला नाही...

प्लीज़ ना ब्रो खूप डेज झाले.....सगळे जाऊ मस्त एक ट्रीप होईल.....

हो, मस्त मज्जा येईल सगळे एकसाथ बोलतात..

हो चालेल....मी तर एका पायावर तयार आहे 😆😆प्रांजल
हसत बोलते....

ते...ते...हे तयार होणार नाही.. ..आणि कोणीही कुठे जायचे नाही..त्यांना अस काही आवडणार नाही पिहू विराटचा धाक आहे म्हणून बोलते....

वहिनी, दादा ह्या टू-थ्री ईयर मध्ये गेला नसेल....नाही तर तो ईयर मधुन दोनदा तरी जात होता. वीरा बोलते...पिहू डोळे ताठ करतच बघते...तिला आज पहिल्यांदाच कळले होते.

वहिनी, तुला माहित नाही ? नमन पिहू चा ब्लँक चेहरा बघत बोलतो. पिहू मान हलवून नाही म्हणते.

दी, अग खुप मज्जा येते....जीजू असल्यावर कसली भीती ....

नाही, 🙄 मला नाही आवडत मी येणार नाहिये....




वहिनी,तू अशी का आहेस. काही तरी नवीन ट्राय करायला इतकी का घाबरते. आजच्या जगात थोड बोल्ड बनावे लागते. बाहेर फिरल्याने तुला कळेल ना. अस सारख घरात बसुन तुला बाहेरची दुनिया कळणार आहे का?
दादाच्या पूर्ण opposite आहे.

वीरा ....नमन तिला डोळ्याने शांत बस म्हणतो....आणि पिहू कडे बघत बोलतो...वहिनी नवीन काही तरी ट्राय कर तुला आवडल तर चांगली गोष्ट आणि नाही आवडल तर सोडून द्यायचे....मला तर वाटते तु एकदा तरी ट्राय करावे ...मस्त फिलिंग येते.... नमन पिहू ला तिथल्या गमतीजमती सांगत होता... सगळ ऐकून तिची ही इच्छा हळू हळू होऊ लागली
सगळ्यांनी मिळून तिला तयार केले. 😂😂

.
.
.

विराट आल्यावर सगळे डिनरला बसले. विराट ने सगळ्यावर नजर फिरवली. काय प्लॅन आहे तुमचा...

आमचा तर ट्रेकिंग चा प्लॅन आहे वीरा excited होत बोलली.

हो, दादा मुन्नारला जाण्याचा प्लॅन आहे . तुला मिस. देविका ( आर्किटेक्ट)बोलली होती ना.

ह्म्म, कधी निघणार आहे ...

दादा, ss तू येणार नाहिये वीरा चिडत बोलते.

माझ काम आहे आणि मी येऊन काय करू....तुम्ही सगळे एन्जॉय करा.

अ...अहो, मला ह्यांच्या बरोबर जायचे आहे. पिहू पटकन बोलली.....

आपण जाऊ नंतर त्यांना जाऊ देत .पिहू बारीक डोळे करून रागात बघत होती.

दादा, तूला यायच नसेल तर नको येऊ वहिनी ला आम्ही घेऊन जाणार आहे वीरा बोलते.

वहिनी तू पण चल दादाच काही ऐकु नकोस.

पिहू विराट कडे बघत हसू दाबते. ह्म्म, मी येतेय तुमच्यासोबत.
घरी एकटी बोर होण्यापेक्षा तुमच्या बरोबर येते .

विराट तिला एक लुक देत उठून जातो .

सगळ्यांची प्लॅनिंग चालू होती ....पिहू उठून रूम मध्ये आली विराट फोन वर बोलत होता पिहू त्याला मागून मिठी मारते . विराट तिचा हात काढत बोलता बोलता गॅलरीत निघून जातो.

राग किती आहे पिहू वर बघत बोलत त्याच्या मागे जाते .

विराट फोन ठेवून वळतो पिहू त्याच्या मिठीत शिरत घट्ट पकडते.

अहो, मला जायच....तुम्ही पण चला ना....

पिहू ,मला काम आहे. तुला जाऊ नको बोलल तरी चालली आहे तो रोखून बघत बोलतो .

प्लीज़ ना.....चला ना....ती त्याच्या डोळ्यावर हात ठेवत लाडीगोडी लावत बोलते..विराट तिचा हात काढत जवळ ओढतो....

पिहू ,....आपण जाऊ हिल स्टेशनला तू त्या कार्टून बरोबर जातेस. विराट हसत बोलतो. पिहू गाल फुगवून बघते. आपण जाऊ नेक्स्ट वीक मध्ये त्यांना जाऊ देत विराट तिच्या चेहर्‍यावर चेहरा घासत बोलतो. पिहू च्या अंगावर शहारा येतो ती अंग चोरून त्याच्या कुशीत शिरते....

अहो,

ह्म्म,

चला ना....मी कधी अस जंगलात चालत गेले नाही ट्रेकिंग वगैरे काहीच केले नाही..

मग जाऊ नको ...

मला जायच वेगळ काही तरी ट्राय करायचे.

Okey....जा

तुम्ही....ती त्याच्या कडे बघत बोलते .

पिहू ,माझ काम...

काय काम काम ,चालू....ती चिडून बोलते.

अरे सोना.....तुला जायच आहे ना जा बोललो ना.....मग का हट्ट करते.

मला तुमच्या बरोबर जायचे. माझे पाय चालून चालून दुखले तर मला कोण उचलून घेणार....

तू बेबी आहेस तुला उचलून घ्यायला तो तिचे गाल ओढत बोलतो.

तुम्ही ट्रीट तसच करता...मला

आहेस लहान माझ्यापेक्षा 7 ईयरचा गॅप आहे....तो हसत तिच्या डोक्याला डोक लावत बोलतो.

आहे तर आहे.....मग आधीच बघायच तुमच्या एज ला मॅच होणारी. पिहू चिडून त्याला ढकलून आत येते....

विराट हसत तिच्या मागे येतो. पिहू..

बोलू नका ती ब्लँकेट ओढून बेडवर पडते. मी कधी बोलते का तुम्हाला तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात तरी मी एडजस्ट करते...

Whatss 😳 इतका हँडसम आहे. हजबंडच्या सगळ्या क्वालिटी आहेत .तू मला एडजस्ट करते तो ब्लँकेट ओढून बोलतो.

पिहू तोंड वाकडं करते. पहिले तुम्ही म्हातारे होणार ...तेव्हा मला तुम्ही सूट होणार का.?पिहू खुदुखुदू हसत बोलते.

हो, का.??? तो तिला गुदगुल्या करतो ...पिहू खळखळून हसत लांब होते...अ...अहो, शांत बसा. ना......

विराट हात पुढे करत डोळ्याने ये बोलतो.....पिहू त्याचा हात धरून त्याच्या कुशीत बसते.

अहो,

पिहू sss....तो थोड चिडून बोलतो. ती शांत होते.....थोड्या वेळ दोघ काहीच बोलत नाही. पिहूला काही तरी आठवते....)

अहो ,रात्री थकल्यामुळे मी चालत कुठे गेली तर (तसा विराट चा चेहराच गंभीर होतो)हा, आता चालत नाही खूप दिवस झाले मी बहुतेक चालत नाही पिहू विचार करत बोलत होती. हो ना तुम्ही बघितल असते तर सांगितले असते हा ना....विराट वरवर हसत मान हलवतो. (त्याला माहित होते महिन्यातून एकदा तरी तिच्या बाबतीत होते. पण केरळ ला एक दोनदा तर दिवाळीत तो गेला तेव्हा तर पंधरा दिवसात दोन तीन वेळा घडले होते. म्हणून तो तिला तिच्या बरोबर घेऊन आला .)

अहो, चला ना बारीक चेहरा करत बोलते.

अहो sss,

ह्म्म, विराट विचारातून बाहेर येतो....पिहू ,मला आता खूप झोप येतय...तो आडवा होत तिला ही कुशीत घेऊन डोळे झाकतो.

पिहू त्याच्या कुशीतून बाजूला होत त्याला पाठ फिरवून झोपते. तो एक नजर बघत डोळे झाकतो.
.
.
.

पिहू तीच सामान पॅक करत होती. दी जीजू काय बोलले येणार आहे का? ...

हो, येतील....पिहू विचार करत हसत बोलते.

काल तर येणार नाही म्हणत होते.

हा बघू आता काय बोलतील.....

ह्म्म, प्रांजल निघून जाते.

विराट दुपारनंतर घरी येतो...... मी पण येतोय तो तिला इग्नोर करत बोलतो...

माहित होत ...मी तुमची बॅग पॅक केली आहे पिहू खीखीखी हसत बोलते.

विराट रोखून बघत फ्रेश होण्यासाठी निघून जातो. ...

पिहू सगळ्यांना सांगते. सगळे खुश होतात .रात्री जेवण करून लवकरच झोपतात. सकाळी 5 पाच वाजता रेडी होऊन निघाले .विराट स्पॉट पर्यंत पोहोचेपर्यंत सगळ्यांना सुचना देत होता. सगळे हा नाही ह्या टोन मध्ये बोलत होते.

ब्रो, दादाला उगाच आणले वीरा नमन च्या कानात बोलली.
नमन हुश्श करत हामी भरतो. आणि हसून दोघे एकमेकांना टाळी देतात.

सगळे आधीच पोहोचले होते. हे पण त्या ग्रुप ला जॉईन झाले.

विराट सगळी चौकशी करतो. कस जायचे ,कुठल्या टूर च पॅकेज आहे...वैगेरे वैगेरे ..

पिहू एक्साईट पण आणि थोडी नर्व्हस होती .

अहो, (पिहू त्याच्या कोपरला हाताचा विळखा घालत हळू बोलली. )

विराट तर फुगूनच होता. त्याच काम सोडून तो फक्त पिहू साठी आला होता. विराट ने तिच्याकडे बघितल च नाही.

😏 पिहू त्याचा हात सोडून चिडून दुसरीकडे बघू लागली.विराट ने तिचा हात पटकन पकडून तिच्या खांद्यावरची सॅक घेतली आणि चालू लागला. पिहू हसू कंट्रोल करत त्याच्या बरोबर चालू लागली.
घनदाट जंगलातून सगळे मस्ती मज्जा करत चालू होते. हवेत गारवा असल्यामुळे मन फ्रेश वाटत होते.....पिहू सगळी कडे नजर फिरवत 😁 चालत होती. पक्षांची किलबिल ऐकून तर मन प्रसन्न झाले होते . वेगवेगळया कलरचे पक्षी दिसत होते . हळूच हिरव्या गार झाडीतून सूर्याची किरणे डोलत होती. सगळ्याचे मध्ये मध्ये फोटो सेशन चालूच होते. खळखळून हसत पिहू पोज देत होती...वीरा प्रांजल तिला अस थांब तस थांब म्हणून तिच डोक उठवले होते...विराट भान हरपून तिला बघत होता....

पिहू सेल्फी काढत विराट शेजारी आली.

अहो, 😒हसा पिहू त्याला कोपर मारून बोलते. विराट केस नीट करत तिच्या कमरेला विळखा घालत जवळ घेतो. पिहू चा गुलाबी झाला होता. विराट हसत तिच्या डोक्यावर डोक टेकवतो.


दुपार झाली तेव्हा सगळे एका ठिकाणी जेवणासाठी, रेस्ट साठी थांबले....पिहू तर पूर्ण थकून गेली गेली होती. पिहू ,प्रांजल , वीरा ,आलीशा सगळे एकसाथ जेवायला बसले होते .

विराट दुसर्‍या ग्रुपमध्ये जाऊन बसला होता.

प्रांजु अजून किती वेळ आहे.

दी , थोडाच वेळ मग आपण हिल टॉप वर पोहोचू...evening चा 🌇 sunset मिस करायचा नाहिये....खूप सुंदर दिसतो. प्रांजल exectid होत बोलली...नमन तिच्याकडेच बघत होता. तीच हसण ,अदा करत बोलणे मनाला स्पर्शून जात होते.

नमन विचार काय आहे...रिषभ नमनच्या कानात बोलतो...तसा तो भानावर येत त्याच्या कडे बघतो.

अम्म....आज तिला प्रपोज करायचा विचार आहे नमन डोळे मिचकावत बोलतो .

ह्म्म ,पण तुला काय वाटते ती काय बोलेल...नाहीतर रागात वरुन ढकलून देईल. रिषभ खीखीखी करत बोलतो. (नमन त्याला कोपर्‍याने मारतो. )ती पण लाइक करते पण मुली किती भाव खातात माहीत आहे ना.😜 नमन तिच्याकडे बघत हसत बोलतो.

ऑल द बेस्ट 😛 कही नाही झाल तर इथे अजून आहेत रिषभ बाकीच्या मुलींवर नजर टाकत बोलतो .

आलीशाला सांगू का,...

अरे ये बाबा... तोंड बंद कर.

थोड्या वेळ रेस्ट करून सगळे परत पुढच्या प्रवासाला निघाले.
विराट कलीग बरोबर बोलत बोलत पुढे गेला. पिहू प्रांजल बरोबर चालत होती. चार साडे चारच्या दरम्यान सगळे मुन्नार
च्या टॉप वर आले.....

सगळे relax झाले......

थोड्यावेळाने संध्याकाळ होणार होतो.....सूर्याचा तांबूस रंग सर्वत्र पसरायला चालू झाला होता.

पिहूचा चेहरा खुलला . दिवसभराचा क्षीण निघून फ्रेश वाटू लागले .....विराट मोबाइल रेंज कुठे मिळेल का तो त्यात गुंग होता .सकाळपासून तो पिहूशी नीट बोललाच नव्हता. चिडला की जो पर्यन्त त्याच मन होत नाही तो पर्यन्त तो बोलत नाही .माहित होत पिहूला तिने ही इग्नोर केल😠

प्रांजल पिहू जवळ आली दी sss चल ते बघ....ती पिहू चा हात धरून sunset दाखवायला घेऊन गेली....दोघी भान हरपुन बघत होत्या.



प्रांजु sss किती छान आहे ना...पिहू उद्या मारत बोलत होतो .विराटला रेंज काय मिळाली नाही तो परत आला.नमन पिहू कुठे तो सगळी कडे नजर फिरवत बोलतो....

नमन डोळ्याने तिकडे बोलतो. विराट नजर फिरवतो.दोघी जणी sunset एन्जॉय करत होत्या. पिहू च्या चेहर्‍यावरचे हसू बघून दिवसभराचा कंटाळा निघून गेला होता...त्याचा ही चेहरा खुलला .

विराट तिच्या मागे येऊन थांबला. पिहू फोटो काढत होती. प्रांजल ला जाणवले ती विराटला बघून स्माइल करत निघून गेली.

विराट ने पिहू ला मागून मिठीत घेतले.दोन सेकंड ती दचकून मान वळवून बघू लागली विराट ला बघून ती relax होत पुढे बघू लागली.
दोघे ही काही न बोलता sunset डोळ्यात भरत होते....विराट ने तिच्या गालावर ओठ टेकवले .तशी पिहू च्या गालावर खळी पडली. सूर्याची तांबूस किरणे दोघांच्या चेहऱ्यावर पडली होती.

I LOVE YOU 💕 sweetheart ❤ विराट तिच्या कानावर ओठ फिरवत बोलतो .पिहू लाजून वळून त्याच्या कुशीत शिरते. बघू देत कशी लाजते विराट तिची हनुवटी वर करत बोलतो. पिहू हात काढत त्याच्या शर्ट मध्ये चेहरा लपवते .विराट हसत मिठी घट्ट करतो....तीच लाजणं त्याच्या हृदयाचा ठोका चुकवत होता. 🤩🥰😍 पिहू चेहरा वर करत त्याच्या कडे बघते. तो खाली झुकतं तिच्या ओठांवर ओठ ठेवणार ती दचकून परत त्याच्या कुशीत शिरते...विराट जोरात हसतो .पिहू फुगून त्याच्या दंडावर मारते....

माझ नुकसानभरपाई मी तुझ्या कडून वसूल करणार आहे तो रोमँटिक आवाजात बोलतो. पिहू लाजून मानेने नाही म्हणते.

प्रांजल कॅमेरा घेऊन फोटो काढण्यात मग्न होती. नमन तिच्या समोर येतो....

प्र...प्रांजल ....

ह..ह्...प्रांजल कॅमेरा मध्ये फोटो बघत एक नजर टाकत बोलते....


त्याने तिथले फ्लॉवर तोडून तिच्या समोर धरले.प्रांजल त्याच्या डोळ्यात बघत गालात हसून 💐 फ्लॉवर घेते.

नमन आणि प्रांजल नजर चोरून पुढे बघू लागतात....प्रांजल ला काही सुचत नव्हते. नमनला कुठून सुरुवात करायची ते कळत नव्हते. प्रांजल मन चलबिचल झाले होते...त्याने अलगद तिचा हात पकडला प्रांजल ने घट्ट डोळे मिटले...त्याने तिला स्वतःकडे वळवले....

प्रांजल डोळे उघडून त्याच्या डोळ्यात बघू लागली. नमन गुडघ्यावर बसला होता. . प्रांजल चमकून बघते .

प्रांजल मला आयुष्यभर तुझी साथ हवी देशील ना...तो तिच्या डोळ्यात बघत प्रेमाने बोलतो.

प्रांजलच हृदय ट्रेनच्या स्पीड ने धडधड करत होते. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता...एक अनामिक हुरहुर, लज्जा, सगळे भाव चेहर्‍यावर आले होते.प्रांजल त्याच्या हातातून हात काढून नजर चोरून दुसरीकडे बघते.. आज तिच्याकडे बोलायला शब्दच सुचत नव्हते .नमन ला ही तिची अवस्था कळत होती. तो गालात हसून तिच्या जवळ सरकतो.

तुझ उत्तर मला माहीत आहे. पण मला तुझ्या तोंडून ऐकायचे आहे....

म्हणजे, तुला काय माहीत आहे प्रांजल थोड चिडून म्हणते.

नमन हसतो. (इतक्या दिवसात तिचा स्वभाव त्याला चांगलाच माहीत झाला होता....) लाजण वैगरे तुला सूट होत नाही....म्हणून बोललो.....

तस प्रांजल स्वतःला सावरते...ते मी....कधी लाजण छे....

ओह्ह, मग आता तुझा चेहरा का blush झाला होता. नमन तिच्या खांद्यावर हात टाकून जवळ ओढतो. प्रांजल डोळे बारीक करून त्याच्या कडे बघते. दोघे ही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात...प्रांजल भानावर येत त्याला ढकलून देते. नमन स्वतःला सावरत हसतो. ये relpy....तरी दे....

प्रांजल त्याला जीभ दाखवत बोलते. माझ्या मूड नाही अस म्हणत हसत पळून जाते. नमन हसत तिच्या मागे जातो
प्रांजल मागे बघत पळत होती ती जाऊन वीरा ला धड़कते.

अग हो हळू, वीरा तिला नीट पकडत बोलते...प्रांजल दचकते...ओह सॉरी......नमन वीराला बघून दुसरीकडे वळतो.
.
.
.
सर्वत्र अंधार पसरत होता. टेंट रेडी झाले होते. मध्यभागी
शेकोटी पेटवली होती....थंडी ही भरपूर होती .....सगळे ग्रुप करून वेग वेगळे खेळ खेळत होते.

वीरा पिहू कुठे आहे....

दादा वहिनी टेंट मध्ये आहे...चल बोलले तरी येत नाही नाहिये....कंटाळा आला आहे म्हणते...

विराट आत गेला तर पिहू पांघरुन बसली होती.

पिहू बाहेर चल...

माझे पाय खूप दुखतात ....मला झोप पण आलीय ..

जेवण झाले की .मग झोप ,बाहेर बघ सगळे किती छान गेम खेळतात...तो तिची ब्लँकेट काढत उठवत बोलतो....

ती चक्क करत त्याला बिलगते....

खूप हौस ना....मला जायच मला जायच......तुला सूट होत नाही हे क्लायमेट म्हणून नको म्हणत होतो.... पण ऐकायचे नाही. विराट बड़बड़ करतच होता तर पिहू त्याला इग्नोर करत बाहेर येते.

काही जण डांस करत होते तर काही जण गिटार घेऊन गाण म्हणत होते....सगळे वातावरण संगीतमय झाले होते.थोड्यावेळाने,सगळे डिनर करायला बसले. ...

रात्र झाली तरी सगळे आपल्यात मग्न होते. मध्यरात्री कधीतरी सगळे झोपायला गेले.

पिहू, हे काय करते......😓😓पिहू ने तिचा अणि त्याचा हात एका स्कार्फ ने बांधला होता.

सेफ्टी ..😁😁पिहू हसत बोलते.

झोप, कुठे ही डोक लावते. ह्या स्कार्फ ची काही गरज़ नाहीये
विराट हातातून काढत तिला कुशीत घेत झोपतो.

अहो,तुम्हाला झोप लागली आणि चुकून तुमचा हात लूज़ झाला तर पिहू ब्लँक होऊन बोलते...

विराट गालात हसत तिच्या कपाळावर ओठ टेकवतो....अस कधीच होणार नाहीये...तो तिच्या डोक्यावरुन हात फिरवत डोळे झाकतो..
.
.

पिहू मगाशी किती झोप आली होती आणि आता झोपत का नाहिये....विराट तिच्या कडे बघत बोलला.

मला झोप येत नाहिये..पिहू ने त्याला घट्ट पकडले....

झोप मी तुझ्यावर वॉच ठेवतो..तो हसत बोलतो. ..त्याला आता लक्षात आले तिला साधी टेरेस वर झोप येत नाही..आणि आता ह्या जंगलात कधी झोप लागणार. 😂😂

पिहू शांत डोळे झाकून पडली . अहो ,sunrise 🌅 बघायचा

तू जागी असशील ना.😆😆...मला उठव आपण जाऊ

विराटला झोप लागली तो झोपून गेला. पिहूला ही थोड्यावेळाने डोळा लागला. काही वेळाने कसला तरी आवाज आल्याने तिचे डोळेच ताठ झाले. तिने विराट कडे बघितले तो शांत झोपला होता.

पहाटे पाचला सूर्याची किरणे दिसू लागली पिहू विराट ला उठवू लागली....अहो, चला ना...

विराट डोळे चोळत तिच्या कडे बघू लागला....पिहू ,झोप थोड्यावेळ त्याने तिला कुशीत घेत थोपटू लागला.

अहो, उठा ना....आपण 🌞 sunrise 🌅 बघू....

काही गरज़ नाहिये झोप...तो तिला ऑर्डर देतच बोलला. रात्रभर झोपली नसणार म्हणून विराट ने तिला ब्लँकेट नीट कव्हर केल....ती पण थंडी मुळे त्याला बिलगून झोपली...रात्रभर झोप नसल्याने तिला लगेच झोप लागली.

विराटला सात साडे सात ला जाग आली पिहू त्याच्या अंगावर येऊन झोपली होती. विराट हलका हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. जगावेगळी एंटीक पीस आहेस. ...त्याने तिला हळूच बाजूला केले आणि नीट ब्लँकेट ओढून बाहेर आला.
काही जण उठले होते...

आज ते पुढे जाणार होते...पण विराट ने पुढचा प्रवास कॅन्सल केला...कॉल करुन मुन्नारला विला बुक केला आणि इथून ब्रेकफास्ट करून निघायचा प्लॅन केला.

सगळे उठून फ्रेश होऊन ब्रेकफास्टला येतात. विराट ने नमन रिषभ ला सांगितले. थंडी भरपूर असल्याने सगळे ठीक बोलले.

दिsss अजून झोपली आहे....प्रांजल विराट कडे बघत बोलते.

ह्म्म, रात्रभर सगळ्यांवर वॉच ठेवत होती.विराट हसत बोलतो.
सगळे हसतात.

पिहू पण उठून फ्रेश होऊन त्यांना जॉईन झाली.

सगळे आवरून रिटर्न आले. टूर च्या सफारी होत्याच आता चालयचा नाही म्हणून पिहू खुश झाली.

पिहू आपण ईयर मधुर एकदा तरी येत जाऊ....विराट तिला चिडवत बोलला...

नाही sss😫😫 पिहू जोरात बोलली. सगळे पिहू वर हसू लागले. पिहू ला हसू येत होते...जाता जाता जवळचे स्पॉट बघायला गेले. ...

पिहू ची झोप नीट झाल्याने तिचा चेहरा पूर्ण सुकला होता . त्यात पिहूला बघून विराटची बड़बड़ चिडचीड चालूच होती. तिच्या हट्टामुळे तो आला होता. पिहू परत कोणाशीच बोलली नाही.फुगून बसली होती. विराटने लक्ष दिले नाही तो वीरा बरोबरच फिरत होता...पिहू प्रांजल एकत्र फिरत होत्या .
विलाला यायला रात्रीचे आठ वाजले सगळे खूप कंटाळले होते.

वॉव किती मस्त आहे विला वीरा सगळीकडे नजर टाकत excited होत विराटला बिलगत बोलली. विराट तिच्या केसावरून हात फिरवतो.

सगळे फ्रेश होण्यासाठी जातात....पिहू फ्रेश होऊन बाहेर आली .

विराट रूममध्ये येतो. तर पिहू छान ब्लँकेट पांघरुन शांत झोपली होती. विराट ने लाइट ऑफ करून डीम लाइट लावली.
फ्रेश होऊन आला. त्याचा फोन वाइब्रेट झाला. त्याने बाहेरून डोर लॉक करून कॉल रिसीव करत बाहेर आला.

सगळे फ्रेश होऊन हॉल मध्ये टीव्ही बघत बसले होते.

प्रांजल कुठे चालली....नमन ती उठलेली बघून बोलला...

आले दी ला बघून बाहेर आलीच नाही....प्रांजल ने डोर नॉक केला बाहेरून लॉक होता...तिने उघडला तर पिहू समोर झोपलेली दिसली...ती डोर लावणार की नमन ने तिचा हात ओढून मागे ओढले....

प्रांजल शॉक मध्ये ओरडणार की नमन ने तिच्या तोंडावर हात ठेवला .

It's me....तो हळू आवाजात बोलत तिला शांत करत बोलला....

प्रांजल त्याच्या पायावर पाय आपटते...नमन पाय पकडत बाजूला होता...you sss....(प्रांजल ओठ दाबून हसते...)

परत मला हात लाव मग सांगते...प्रांजल त्याला बोट दाखवत बोलते. नमन तिचा हात पकडून जवळ ओढतो...तशी ती त्याच्या अंगावर आदळते. प्रांजल पटकन तिचे हात त्याच्या छातीवर ठेवत अंतर ठेवत त्याच्या कडे बघते.

काय करणार ह...ह..ह... तो तिची हनुवटी बोटाने वर करत रोमँटिक आवाजात बोलतो. प्रांजल चा चेहरा गुलाबी झाला होता. नमन च लक्ष् पुढे गेले...तसा तो ब्लँक होत बघू लागला....प्रांज.....ल....

प्रांजल भानावर येत नमन कुठे बघतो म्हणून वळते....ती ही शॉक होत बघत होती....

पिहू झोपेत चालत जात होत होती .

प्रांजल....वहिनी डोळे झाकून बाहेर कुठे चालली....नमन विचार करत बोलतो....

दी ,...ते ...प्रांजलला काय बोलाव सुचतच नव्हते...ती पळत च सुटली. नमनाला तर काही कळतच नाही तो ही मागे जातो.

विराट कॉल संपवून येत होता तर पिहूला बघून दचकतो. पिहू स्टेप वरुन पाय खाली ठेवणार की विराट तिला पकडतो. पिहू अंग सोडून त्याच्या कुशीत शिरते. विराट तिला उचलून घेतो.
सगळे हॉल मध्ये होते सगळे तर शॉक लागल्यासारखे बघत होते....

वीरा हे काय होते आलिशा आवंढा गिळत बोलते....

वीरा पण शॉक मध्ये होती. तिला माहीत होते पण आज पहिल्यांदाच बघितले होते. 😂😂नमनाला तर सगळ डोक्यावरुन गेले होते.

विराट तिला रूम मध्ये घेऊन गेला....आणि परत बाहेर आला
डोर लॉक होत ...ना.?,...विराट थोड चिडून सगळ्यावर नजर टाकत विचारू लागला....

ह ..हा....ते....जीजू मी बघायला गेले...

प्रांजल तुला माहित असून इतकी केयर लेस कशी असू शकते. विराट तिला थोड ओरडूनच बोलतो.

ते...ते...जीजू मी प्रांजलला ही गिल्टी वाटत होते.....

It's okay, रिषभ टीव्ही ऑफ कर..Late झाला आहे.जाऊन झोपा.....विराट बोलून रूम मध्ये येतो....

प्रांजल नमनला एक लुक देत रागाने निघून जाते. नमन डोक्याला हात मारतो.

विराट पिहू च्या चेहर्‍यावरून हात फिरवत कपाळावर किस करतो....पहाटे पिहूला जाग येते....ती विराटच्या जवळ जाते विराटही डोळे उघडून तिला कुशीत घेत तिच्या गळ्यावर ओठ फिरवत तिच्या ओठांचा ताबा घेतो........पिहू ही त्याच्या स्पर्शात विरघळून जाते.....गुलाबी थंडीत दोघांच्या प्रेमाला बहार आला होता....

अलार्म वाजल्याने विराट मोबाइल घेऊन बंद करतो.

अहोss, पिहू त्याचा हात स्वतःभोवती घट्ट करत बोलते... त्याच्या उबदार कुशीतून तिला बाहेर यायच न्हवतं.विराट हसत तिला घट्ट मिठीत घेतो.

अहो,....

ह्म्म,

I LOVE YOU 😘😘 पिहू त्याच्या गालावर किस करत लाजून हळू आवाजात बोलते.

पिहू 😍

ह्म्म ☺

I want listen my name from you... please say it once na...

पिहू एकटक त्याच्या कडे बघते....🙄

तो डोळ्यानेच बोल बोलतो...पिहू नजर खाली घेऊन नाही म्हणून मान हलवत लाजते. ☺🙈

एकदा बोल....तो तिचा चेहरा वर करत बोलतो. 😉

अ...

शूss...विराट....ऐकायचे मला तो तिच्या ओठांवर बोट फिरवत बोलतो.

पिहूला आता नाईलाज होता.....अहो, उद्या

say viraat now . ....

पिहू वैतागून डोळे मिटून त्याच्या कानाजवळ येते....
विराट ही उत्सुक झाला होता .

पिहू एक नजर त्याच्या कडे बघत कानाजवळ येते
...I LOVE YOU 💗 वि...रा.....ट....🙈☺

विराट हसून डोळे झाकतो.

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED