ती__आणि__तो... - 38 Pratikshaa द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

श्रेणी
शेयर करा

ती__आणि__तो... - 38

भाग__३८


राधा आणि रणजीत दोघेही आजकाल खुप उदास असायचे..........रणजीत ही शांत असायचा.......हे घरातील सगळ्यांच्या लक्षात आल..........रात्री सगळे जेवायला बसले होते.........पण रणजीत खाली नव्हता आला.........राधाही विचारात हरवलेली होती......


महेश: राधाबाई....


राधा: आ हु..क़ाय झाल काका..पोळी हवीय का?


महेश: नाही बाळा...मी क़ाय म्हणत होतो..जीत कुठे आहे? आजकाल जेवायला खाली येत नाही तो...?अस का???


सदाशिव: हो ग जीत किती दिवस झाले खाली आलाच नाही...जेवन वर,नाश्ता वर...अस का ग? क़ाय झाल आहे का तुमच्यात?


आजी: हो ना,आणि चेहरा उतरला आहे ग माझ्या मुलाचा...


सुमन: तुमचा काही वाद झाले का?


राधा: (मनात)....बापरे...यांना आता क़ाय उत्तर देऊ...कस सांगू...क़ाय सांगू....


आ बाबा..ते र....


राहुल: (मधे बोलात).....क़ाय काका..बाबा तुम्ही विसरलात पण...KD Industries कडून खुप मोठा ऑर्डर आहे आपल्याला...आणि ती ऑर्डर किती मुश्किलने मिळाले महित आहे ना..ते काम तुम्ही जीतवर सोपवल आहे मग कसा येईल तो खाली आता बिझी होणारच ना तो...


महेश: अरे हो...


सदाशिव: हो हो..विसरलो...


सुमन: तरीपण,आहो जीत जरा उदास पण असतो आजकाल...जेवत नाही निट...वाळलाय कीती तो....😢


माधवी: हो ना..


रेवा: हो..भाई आधीसारखा वाटत नाही...


राधा: रेवु ग तस काही नाही..ते जीतला आता नवीन ऑर्डरच टेंशन आल आहे म्हणून..आ ते एकदा की मार्गी लागल मग झाल...


रेवा: हो ते ही असेल...


रम्या: क़ाय मंडळी...अरे जीत नाही आला?....(मागून येत)


माधवी: नाही ग काम करतोय तो खोलीत..


रम्या: हु...


माधवी: झोपला का ग वेद...


रम्या: हो..झोपला..अरे जीत आला...


रणजीत: (हलक हसत).....ह्म्म्म...आई जेवायला दे..


सुमन: हो बाळा बस...


राधा: (मनात)....आजुन ही उदास आहे जीत..त्याची उदासी सगळ्यांना सरळ दिसते....


राहुल: रम्या माझी पिल्लू कुठे..?


रम्या: हम्म तीं बसले रुसुन..क़ाय माहित क़ाय झाल आहे तिला..


राधा: का....ताई आहो ती जेवली पण नाही..दुपारी ही काही खाल्ला नाही तिने....


रणजीत: क़ाय...


सोनाक्षी: हो खरय..रुता आजकाल गप्प असते...कुणास ठाऊक क़ाय झालय...


माधवी: हो ना नुसती वैतागली असते ती..थांब बघते तिला जाउन..


राधा: नको काकू..मी बघते जाउन...


माधवी: हु...


राधा: एक काम करा...तुम्ही सगळे तिच्या खोलीबाहेर लपुन राहा...हम्म...ती क़ाय बोलते ते ऐका...


महेश: हु...चला


*********************


मग सगळे रुताच्या रूमबाहेर लपुन बसतात...आणि राधा तिच्या खोलीत जाते....तर रुता ड्रॉइंग काढत बसलेली....


राधा: पिल्लू....ए पिल्लू..कुठे गेली...अच्छा इकडे बसले का माझी पिल्लू....(बेडजवळ जात)


रुता: कशाला आली आहेस तू...तू पण जा आणि वेदजवळ बस...😡😒


राधा: नाही मला मझ्या रुताजवळच बसायच आहे...(तिचे गाल ओढ़त)


रुता: नको काकू अस करू...लांब हो...(बाजूला सरकत)


राधा: रुता क़ाय झाल?...बाळा का इतका त्रागा करतेस..?...जेवली पण नाहीस तू शोन्या..क़ाय झाल सांग मला...तुझ्या राधा काकूला नाही सांगणार का...काकू तुला प्रेम नाही करत का बाळा हु...मी कधी अस वागले का.....?


रुता: (रडत)...आ काकू....(मीठी मारून)


राधा: क़ाय झाल राजा...सांग ना मला...रड़तेस कशाला..अरे आमची स्ट्रॉन्ग गर्ल आज रड़ते का?


रुता: काकू...जेव्हा पासून वेद घरी आलाय तेव्हा पासून ना मम्मा,पप्पा, पंजी आजी,माधवी आजी,सुमन आजी,सदा आजोबा,महेश आजोबा,रेवा आत्तू...सगळे फक्त वेदला टाइम देता....त्याचे लाड़ करता....मला आता कोन विचारत पण नाय....😭मम्मा पण वेदला घेऊन झोपते.....नुसती माला ओलड़ते.....पप्पा पन वेदला लाड़ कलतात.....मला नाय.....फक्त तू आणि जीत काका आहेत जे मला आजुन पण लाड़ कलतात...नाहीतर सगळे खुप चेंज झालेय....खुप वाइट आहेत सगळे खुप🙁😕माझे मम्मा पप्पा पण खुप दुष्ट आहेत...


राधा: शुऊ...शांत हो पिल्लू...शांत हो...तुला एक सांगितल तर ऐकशील माझ...


रुता: हो काकू...


राधा: पिल्लू..सर्वात आधी तू आस गैरसमज मनातुन काढून टाक की सगळे फक्त वेदचे लाड़ करतात...बाळा सगळे तुम्हा दोघाना ही प्रेम करतात...जस मी आणि रणजीत करतो...फक्त फरक इतका की ऋग्वेदकड़े जास्त लक्ष देतात कारण वेदु आजुन लहान आहे ना बाबू..तो आजुन फक्त ९ महिन्याचा आहे..बाळा आजून त्यांला बोलता नाही येत....म्हणजे बग वेदुला भूक लागली..किवा कुठे तरी जख्म झाली,सर्दी झाली,बेडवरुन पडला नाहीतर काहीतरी तोंडात टाकला तर आता त्यांला काही समजत का सांग...तो जाउन मम्माला सांगू शकतो का...सांग..


रुता: नाही...


राधा: मग..समजा त्याने काही तोंडात टाकला आणि त्यांला क़ाय झाल तर..म्हणून सगळे त्याची फक्त जास्त काळजी करतात...आणि मम्मा पप्पा वेदुच्या बाजूला झोपतात कारण वेदु बेडवरुन पडू नए म्हणून..आणि बाबू तू झोपेत लात मारतेस तीं वेदुला लागली तर दुःखेल की नाही त्यांला म्हणून तुला सोबत घेऊन नाही झोपत..आणि तू अशी बेबी होतीस ना तेव्हा तुझी पण अशीच केअर केले सगळ्यानी...आता तू कस पिल्लू बोलू शकतेस ना मम्माला सांगू शकते तुला क़ाय पाहिजे,तुला कुठ लागल ते तस वेद नाही करू शकत म्हणून...हो पण प्रेम तेवढाच तुझ्यावर करतात ग...बग रुता आई आणि बाबा आंपल्या दोन्ही मुलांवर नेहमी सारखाच प्रेम करतात..सारख लाड़ करतात...उल्टा तू मम्मा आणि पप्पाला समजून घ्यायला पाहिजे ना..तू आता मोठी झालीस की नाही...


रुता: हो काकू...


राधा: मग,आणि रुता अस रुसुन परत बसायच नाही..जेवण सोडायचा नाही..तू गुड़ गर्ल आहे ना...आणि बाळा मम्मा पप्पाला समजून घे हु...ते सुद्धा तू जेवली नाही म्हणून काळजीत आहेत...दोघ किती काम करतात बाळा मग ते दमुन जातात ना म्हणून नाही तुझ्यासोबत जास्त राहता येत तेव्हा तू अस त्यांच्यावर रूसायच नाही....त्यांना समजून घ्यायचा घेशील ना?....दे प्रॉमिस.....


रुता: यस...रुतावाला प्रॉमिस...


राधा: गुड़😚माझा बच्चा...चल आवर आता आणि जेवायला ये हु...लवकर...


रुता: हो काकू...


मग राधा खोलीबाहेर येते....सगळ्यांचे डोळे पानवले होते.....त्यांना कळत होत की ते क़ाय करत होते.....आणि किती चुकत होते.......


राधा: समजल हा प्रॉब्लम होता रुताचा...तुम्ही सगळे अस कस करू शकता..थोड़ रुताकडे पण लक्ष दया ना..आजुन लहानच आहे तीं..आहो अस तुम्ही सगळे कराल तर तिला अस वाटना साहजिक आहे....आणि खुप काही शिकायच आहे तिला आजुन आपल्याकड़ून आपणच अस वागलो तर ती क़ाय शिकनार?.....नवीन बाळ आल म्हणून रुताकडे अस दुर्लक्ष करन योग्य नाही....दादा ताई जा..जाउन तिच्याशी बोला...हु


रम्या: thank u राधा...


राहुल: खरच आभारी आहे मी तुझा...एवढ चांगल समजवलास तिला....आम्ही तिचे आई वडील असून नाही समजू शकलो....


रम्या: हो ना..


राधा: दादा आभार नका मानू..ठिके होत अस...जाउन बोला तिच्याशी☺️


माधवी: राधा आम्ही पन सगळे जातो हु...तुम्ही जेवून घ्या..


राधा: हो...


मग सगळे रुताला जवळ घेतात...........तिच्याशी बोलतात.........आणि एकत्र जेवन करतात........रात्री राधा झोपते पण रणजीत त्यांच काम करत बसला होता...........तेवढ्यात राधा झोपेतच काहीतरी बड़बड़ करायला लागली..


राधा: बाळा...बाळा कुठे चाललीस तू..माझ बाळ..रणजीत आणि माझ बाळ...बाळ...आमच बाळ...अम्म्म....


रणजीत: (मनात)....राधा स्वप्नात सुद्धा बाळाचा विचार करतेय..माझ्यासाठी म्हणून ती हसत खेळत राहतेय...मला कळत नाही आहे क़ाय करू मी..नशीब चांगल म्हणून आजुन राधा समोर सत्य नाही आल..दोष माझ्यात आहे अस समजून तीं निदान गप्प तरी बसले..पण तिच्यात दोष आहे हे समजला असता तर तीं कशी react झाली असती क़ाय माहित..मला वाटत मी तिला स्वतःहुन सांगायला हवाय...कारण दुर्देवाने तिला सत्य समजल तर तीला जास्त धक्का बसेल..पण कस सांगू मी आणि कोणत्या तोंडाने...माझ मलाच कळत नाही आहे क़ाय कराव....


राधा ही बड़बड़ करतच झोपी जाते..........रणजीतला तिची अवस्था समजत होती.......पण तो काही करू शकत नव्हता...


************************


सकाळी रणजीत लवकरच ऑफिसला गेला..........राधाने आज हॉस्पिटलमधून सुट्टी घेतली...........तिच्या डोक्यात वेगळीच कल्पना आली होती.........मग फ्रेश होऊन ती खाली आली......


राधा: गुड़ मॉर्निंग......☺️


रम्या: गुड़ मॉर्निंग राधा...


सुमन: ये ग बाळा...


माधवी: गुड़ मॉर्निंग..आज इतकी आनंदी दिसतेस क़ाय खास???


राधा: अम्म्म...माझ्या डोक्यात चांगली कल्पना आले...रणजीत आज खुप खुश होणार आहे....


सुमन: का ग असा क़ाय प्लान आहे???


मग राधा तिचा प्लान सगळ्यांना सांगते..........प्लान ऐकून सगळे स्माईल करायला लागतात..........आणि राधा रणजीतवर इतका प्रेम करते त्याचा विचार करते हे ऐकुन सुमन आतूनच खुप आनंदी होत्या.........


रम्या: खुप छान प्लान केलास बग...रणजीत सुद्धा आज खुश तुझ्यावर...😌😉.....(डोळा मारत)


राधा: हो ना....(लाजत)


सुमन: खुप मस्त आयडिया आहे...राधा असाच माझ्या रणजीतवर प्रेम करत राहा....😊


राधा: हो आई,ही सांगायची गोष्ट आहे का😊


माधवी: बर आता जाउन तुझ्या प्लान ला लाग जा...


राधा: अरे ह्यो...आलेच....


(कॉल करून).....हेल्लो विनय...हा मी सांगते ते ऐक...तुला काही गोष्टीची अरेंजमेंट करायची आहे..हु ऐक**********.......(बाहेर जात)


रम्या: किती चांगली आहे राधा...सगळे रोल चांगले पार पाडते...ती चांगली मूलगी आहे,चांगली सुन आहे,उत्तम बायको आहे,बेस्ट काकू आहे आणि सर्वोत्कृष्ट आई सुद्धा असेल...सगळे गुण आहेत राधामध्ये..काल माझ्या रुताला पण सोप्या आणि चांगल्या शब्दात समजवला तिने...☺️


माधवी: हो ना नाहीतर रुताच्या मनात आंपल्या विषयी राग निर्माण झाला असता....


सुमन: राधाला सुन बनवन्याचा निर्णय हा मझ्या आयुष्यातला सगळ्यात उत्तम निर्णय होता....☺️


रम्या: हो न...


**********************


संध्याकाळी रणजीत घरी आला............खोलीत गेला तर लाइट्स बंद होत्या............तो बटन दाबत होता तरी लाइट्स ऑन होत नवहत्या............


रणजीत: शीट यारssss लाइट्स का लागत नाही आहेत.....राधाsss ए राधाss...कुठे गेली ही पन...शिईई...


रणजीतची चिड़चिड़ चालू होती............तेवढ्यात मागून राधा आली,रणजीत तिच्याशी बोलायला मागे वळला तर राधाने लगेच त्याच्या ओठांवर बोट ठेवला...........आणि त्याच्या एकदम जवळ येऊन उभी राहिली..........


राधा: (हळू आवजात)..........शुईईईई...चुप एकदम चुप...काहीच बोलू नकोस....फक्त शांत रहा...


रणजीत: ररर राधा हे हे क़ाय चालय तुझ...ए एकतर तुझ तोंड सस सुद्धा दिसत नाही आहे मला....


राधा: शुईईई सगळ सांगते....


मग राधा रणजीतच्या डोळ्यावर पट्टी बांधते............रणजीतला काही कळतच नव्हतं राधाच चालला क़ाय आहे😂..........तिला काही बोलायला जाव तर ती तिच्या मादक स्वरात त्यांला गप्प करायची मग बिचारा शांत व्हायचा😂............राधा रणजीतला तशीच घेऊन कार जवळ गेली............रणजीतला बाजूला बसवून ती ड्राइविंग सीट वर बसली...........रणजीतला जानवल तस तो घाबरला..........😂


रणजीत: राधा....राधा आपण कारमध्ये बसलोय का?


राधा: हो...अय्या पण तुला कस समजल,तुझ्या डोळ्यावर तर पट्टी आहे ना....


रणजीत: अग अर्धवट पट्टी डोळ्यावर बांधले हातावर नाही,स्पर्श करून समजतय मला...क़ाय लागेच अय्या....


राधा: ह्म्म्म बर😏


रणजीत: ह्म्म्म नाही तू सांग आपण कार मध्ये बसलोय म्हणजे...ओह नो तू तर ड्रायव्ह नाही करणार आहेस ना?


राधा: हो मीच करणार आहे ड्राइव्ह...😃


रणजीत: अरे देवा..बाप्पा,पळा रे.....(दरवाजा खोलत)


राधा: रणजीत.....रणजीतssssss दरवाजा लॉक आहे ट्राय करून उपयोग नाही😏आणि हात आतमध्ये घे विंडो च्या बाहेर हात काढून काही होणार नाही....😏


रणजीत: राधा राधा तू गाड़ी चालवु नकोस प्लीज...मला इतक्यात स्वर्ग नाही बघायचा ग...आपण शिवाला बोलवुया ना...हा आ आ शिवाssss शिवा बाबा कुठे गेलास रे...लवकर ये...


शिवा: हा आआ क़ाय झाल साहेब..अरे साहेब तुमच्या डोळ्यावर पट्टी का आहे...थांबा मी खोलतो.....(पट्टी खोलायला जात)


राधा: नाहीsssssss शिवा दादा..क़ाय करताय हे मी पण आहे ना इकडे मी सुद्धा खोलू शकते की पट्टी पण आपल्याला नाही खोलायची आहे समजल...


शिवा: का????


राधा: आहो दादा मी रणजीतसाठी सरप्राइज प्लान केलाय,म्हणून त्यासाठी मलाच त्यांला ड्राइव्ह करून घेऊन जायच आहे....पण रणजीत बघा ना नुसता ओरडत आहे...


शिवा: आआ ब ताई मी क़ाय म्हणतो या की तुम्ही बाहेर मी चालवतो गाड़ी....


राधा: नाही,नाही दादा मीच गाड़ी चालवनार...आता तुम्ही ताईच एकनार नाही का....


शिवा: नाही ते...ठीक हाय ताई..जस तुम्ही म्हणाल...


रणजीत: ऐ शिवा,क़ाय बबब बोलतोयस तू हे,तुम्ही म्हणाल तस म्हणजे...मला जीवंत परत यायच आहे समजल..शिवा,प्लीज तूच ये ना सोबत...प्लीज..नाहीतर सोडव मला यातून....ही तर मला आज स्वर्ग दाखवनारच बग...😣...बापरे स्वर्ग महंतोय तस काटा आला अंगावर...........(घाबरत)


शिवा: आहो साहेब जावा की आता ताई म्हणतायत तर..नाही क़ाय होत..😀😉


रणजीत: ए ताईच्या लाडक्या...आता तुला साहेब दिसत नाही का....😢


शिवा: तस नाही...


राधा: शुईईईईई रणजीत आपण निघतोय आता....


रणजीत: शिवा,शिवा$$$


राधा: बाय दादा.....चलो.......(गाड़ी स्टार्ट करून)


रणजीत: शिवा.....शिवा वाचलो तर भेटु उद्या........


शिवा: बाप्पा आता तूच रक्षा कर साहेबांची...😅


रणजीत: ररररर राधा गाड़ी निट चालव ग,तत तुला माहित नाही तर मला विचार.....


राधा: हो रे येते मला कार....डोन्ट वरि......


रणजीत: ह्म्म्म तुझ्या ड्राइविंग बद्दल बाबानी खुप सांगितलय,एकतर डोळ्यावर पट्टी बांधले कशी ड्राइव्ह करते कुणास ठाऊक....आता निट पोचलो म्हणजे झाल....😢


राधा: क़ाय काही बोलास का....?


रणजीत: नाही,तू तू समोर बघून चालव...आणि हळू हळू जाऊया हु,क़ाय घाई नाही आपल्याला....


राधा: हो रे...खूपच शांतता आहे नाही,थांब रेडियो ऑन करते....


रणजीत: माझ्या हृदयाचे वाढलेले ठोके ऐकु येत नाहीत का तुला....आणि म्हणे शांतता आहे....


राधा: गप रे....


सुहाना सफ़र और ये मौसम हसीं


सुहाना सफ़र और ये मौसम हसीं


हमें डर है, हम खो ना जाए कहीं


सुहाना सफ़र और ये मौसम हसीं


रणजीत: (मनात).........वा क़ाय गाणी लावलाय,सुहाना सफर म्हणे सुहाना नाही डरावना सफर आहे हा...इथे एवढा वारा सुटलाय तरी मला घाम फूटतोय....😢


ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना


यहाँ कल क्या हो किसने जाना


हो ज़िन्दगी एक सफ़र है सुहाना


यहाँ कल क्या हो किसने जाना


रणजीत: (मनात)........हे ख़र आहे,राधा ड्राइव्ह करत असताना कल क्या होगा किसने नही जा ना....😢बाप्पा वाचव मला....


रणजीत बिचारा पुरता घाबरला होता..........कारण मधेच राधाची गाड़ी धक्के खात होती😂.........पण राधा आज एकदम रोमांटिक मुड़ मध्ये होती..........एक दोन तासानी गाड़ी एका टेकड़ीवर थांबली..........आजुबाजुला फक्त झाड़ होती,मोकळ आकाश,गारा वारा होता...........राधाने रणजीतला गाडी मधून खाली उतरवल...........आणि थोड़ पुढे चालत घेऊन गेली..........मग त्याच्या डोळ्यावरची पट्टी खोली...........


पट्टी खोल्यावर रणजीत डोळे उघडून समोर पाहू लागला............तर समोर एक छोटा टेंट होता त्यांला फुलानी आणि लाइटिंगने सजवल होता............बाजूला छोटा टेबल होता त्यावर जेवन ठेवला होता आणि शापिंग ची बॉटल ठेवली होती.............रणजीतला काही कळतच नव्हतं.............हे सगळ पाहून रणजीतच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली............आता त्याची नजर राधाला शोधत होती.........


रणजीत: राधा......राधा......राधा कुठे आहेस.......प्लीज समोर ये ना.......


रणजीतने आवाज देताच मागून राधा आली...........आज तिने ब्लैक कलरची नेट साड़ी घातली होती...........त्यावर ब्लैक सिवलेस ब्लाउज...........लांब सरळ केस मोकळी सोडली होती.............ओठांवर लाल लिपस्टिक...........राधला पाहून रणजीतची विकेट गेली.........तो मागच सगळ विसरूनच गेला...........रणजीतने राधाच्या कमरेत हात घातला आणि तिला जवळ ओढल.........


रणजीत: राधा....You looking Hot in Black saree.....And You know,I can't control my self....When I looking you in Saree.....😍💋💖


राधा: मग नको ठेवूस ना कंट्रोल स्वतःवर....👀😉💋


रणजीत: जर तूच म्हणतेस तर......💋


राधा: अरेरे थांब क़ाय घाई आहे,आधी डिनर करूया...चल ना....


रणजीत: अम्म्म चल...


राधा: सगळ तुझ्या आवडीच बनवले आहे....


रणजीत: अरे वा वा!! धन्यवाद बायको...💖😉


राधा: हम्म...घे.....(घास भरवून)


रणजीत: हम्म...थैंक्यू यार....


राधा: बर,जेवून झाल की दोघ शापिंन पिऊया..


रणजीत: अग पन आपण कधी प्यायलो नाही मग?


राधा: असुदे आज ट्राय करूया ना प्लीज....


रणजीत: ओके बाबा..


त्या गार आणि रम्य वातावरणात दोघेही मस्त डिनर करतात............मग शामपिन प्यायला सुरवात करतात..........बऱ्याच दिवसांनी आज दोघे निवांत बसले होते.........दोघ ही खुप आनंदी होते.........


राधा: जीत गप्पा मारुया...आजकाल आपला संवादच नाही होत....


रणजीत: हो ते आहेच..बोल मग तू सुरवात कर😘


राधा: ह्म्म्म,जीत तुला आठवतय आपली पहिली भेट😀


रणजीत: ती भेट मी कधीच विसरू नाही शकत...😂आणि त्यानंतर आपण हॉस्पिटलमध्ये भेटलो होतो बापरे...कीती भांडलो होतो ना...


राधा: हो ना...त्यानंतर जेव्हा जेव्हा भेटलो भांडलोच फक्त...लग्नाच्या वेळी तर मी तुला नको एवढ्या शिव्या दिल्या असतील😂😅😅


रणजीत: तेव्हाच मला सारख्या उचकया लागयच्या...😂


राधा: लग्ना नंतर सुरुवातीला जेव्हा तू फ्रेश होऊन आल्यावर पसारा असाच ठेवून जायचास ना तेव्हा मला खुप राग यायचा...म्हणून एकदा मी रागात तुझा टॉवेल फाडला होता😅😅😝


रणजीत: ह्म्म्म तरी मी आल्यावर पाहिल म्हंटल फाटला कसा टॉवेल😅......ह्म्म्म बर हेच काही कमी नव्हतं तर तू रात्री मला झोपु दिल नव्हतं चंद्रमुखी,मंजुलिका आनल्या होत्यास आपल्या खोलीत😅😝😂😂😂आणि क़ाय तर शक्तिमान सुद्धा🤣🤣बापरे त्या दिवशी फास्ट टाइम मी घाबरलो बग😂


राधा: सॉरी रे...पन तू सुद्धा नंतर सिमरनला सांगुन चन्द्रमुखी माझ्या समोरच आनलीस ना😂😂मूर्ख मी तर भीतीने बेशुद्ध झाले😑🤣


रणजीत: हो खरच किती कट्टर दुश्मनी निभावले आपण ते ही एका छताखाली राहून😂😂


राधा: हो...मला कधीच वाटल नव्हतं की मी ज्याच्या तोंडाकड़े ही बघायला तयार नव्हते त्याच्याशिवाय जगण मुश्किल होइल माझ....माझां जन्मोजनमीचा तो साथी बनेल..


रणजीत: हो मला ही....


राधा: मला अजूनही तू लव्ह यू बोलेला दिवस आठवतो...लग्ना नंतर प्रपोज करणारा तू पहिला नवरा अशील😂


रणजीत: ह्यो...खुप साऱ्या गोड़ आठवणी आहेत आंपल्या..😀


राधा: हो..मला खुप समजून घेतोस तू जीत...तुझ्यासारखा पार्टनर भेटला मला मी यातच धन्य झाले...☺️


रणजीत: हो,तू तर खुप समजून घेतलास मला,मझ्या पास्टला,फॅमिलीला...यू आर ग्रेट राधू....मी शब्दात व्यक्त नाही करू शकत.....I love You...💋❤️


राधा: लव्ह यू टु...💖❤️


रणजीत: काही सुंदर ओळी फक्त तुझ्यासाठी.....


"गोड़ आठवणी आहेत तेथे हळूवार भावना आहेत...


हळूवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे...आणि


जिथे अतूट प्रेम आहे तेथे नक्कीच तू आहेस..."


राधा: वाव!!! खुप छान😍थैंक्यू जीत...😘


दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहतात.............रणजीत राधाला जवळ ओढतो आणि तिच्या कपाळावर किस करतो...........मग हळूच तिच्या ओठांजवळ येतो............तिच्या ओठांत स्वतःचे ओठ मिसळतो............तशी राधा शहारते आणि रणजीतला साथ देऊ लागते..........त्याचे हात तिच्या गोरया अंगावर फिरत होते............आणि राधाचे हात त्याच्या केसातून फिरू लागले.........आज पुन्हा नव्याने ते एकमेकांना भेटत होते..........रणजीत सगळ विसरून आधीसारखा हसत होता,तिच्यात समाहित होत होता..........आजची पूर्ण रात्र ते आनंदात घालवतात............


सकाळी सूर्याची किरण राधाच्या चेहऱ्यावर पडतात............तस राधा हळूच डोळे उघड़ते...........रणजीत एकदम शांत तिच्या कुशीत झोपला होता...........ती रणजीतच्या कपाळावर हळूच किस करते............तस रणजीत ही उठतो आणि राधाला मिठित घेतो...........


रणजीत: गुड़ मॉर्निंग स्वीटहार्ट...💋


राधा: गुड़ मॉर्निंग नवरोबा...😍


रणजीत: अम्म्म....थैंक्यू राधा काल माझ्यासाठी एवढा केलास खरच खुप बर वाटतंय आता....फ्रेश झालो आज....


राधा: हो ना...मला तेच हवा होता...😘


रणजीत: बर निघायच का आता घरी जायला...सगळे वाट पाहत असतील....


राधा: हो...


रणजीत: बर आता मी ड्राइव्ह करतो हु...तू आरमात बस


राधा: का मी करते ना...


रणजीत: नको...नको बग काल रात्र होती रस्त्यावर जास्त कोणी नव्हतं म्हणून मी काही बोलो नाही तरी तुझी गाड़ी कीती झटके खात आली मी पाहिल...आणि आता सकाळ झाले सो मॉर्निंगला खुप लोक असतात..नको मी रिस्क घेऊच शकत नाही .....


राधा: क़ाय रे जीत..नुसत ख़ुसपटया काढतोस माझ्या कामात...काल मी निट ड्राइव्ह करत आनल तुला एकदम सेफ..😎.........(attitude मध्ये)


रणजीत: क़ाय,क़ाय बोलीस..सेफ,सेफ🤣🙊बापरे अवघड आहेस तू...सेफ आनल म्हणे मला...एखादा हृदय विकाराचा रोगी तुझ्या बाजूला बसला असता ना तर झटक्यात अटैक येऊन मेला असता🤣डायरेक्ट स्वर्ग🤣🤣🤣


राधा: काहीही हं...😢


रणजीत: ओ ग माझ बाळ...चल आता निघू हम्म🤣


राधा: ह्म्म्म😏...........(तोंड वाकड करून)


रणजीत: राधा..यार स्माइल कर न🤣मस्करी केली मी...🤣


राधा: गप तू बटाटया😏


रणजीत: सॉरी ना बाबू,मेरा बच्चा,मेरा शोना,मेरा पिल्लू..स्वीट हर्ट..प्लीज स्माईल कर ना😘प्लीज..हस ना हस आ आ आ आ आ...........(गुदगुलया करून)


राधा: आ hahahahahaha 🤣🤣🤣🤣गप रे बस झाल......(हसत)


रणजीत: हा आता कस हसला माझा बाबू..बर आता तुझ्या आवडीचा सॉन्ग लावतो...


राधा: हं..☺️


गुस्ताख़ नजरो ने देखा है तुमको


खुशबू फिजा की करे बेकरार हमको


दिल की सुने तो रहा जाए ना


कह ना जो चाहु कहाँ जाए ना


जब तुमको देखु लगता है ये


कह के ही तुमको मिलेगा आराम


ह्म्म्म गुम है किसीके प्यार में


दिल सुबह शाम


पर तुम्हे लिख नही पाऊ मैं उसका नाम


हाये राम...हाये राम...


राधा हळूच रणजीतच्या खांद्यावर मान टांकते आणि डोळे बंद करते................आज ती आणि तो खुप आनंदी होते............दोघेही सगळ विसरून आनंदात घरी जात असतात.........


क्रमशः


(फाइनली दोघ पुन्हा आधीसारखे झाले............आणि खरच नवरा बायकोने असा एकांतात वेळ घालवावा.............खुप छान वाटत दोघे अजुन जवळ येतात.............त्यांच्यातील प्रेम वाढते............बिझी रूटीन मधून फक्त दोघासाठी वेळ काढावा.......आजचा भाग कसा वाटला कमेन्ट करा यार🙊😅)