नंदिनी - केस ऑफ ब्रुटल मेंटालिटी.? Khushi Dhoke..️️️ द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नंदिनी - केस ऑफ ब्रुटल मेंटालिटी.?





सकाळी......

सचिन जो की, एक पोलिस उप- निरीक्षक आहे. त्याला एक कॉल येतो. कॉल कॉन्स्टेबल ऐश्वर्याचा असतो. काहीतरी घडल्याची माहिती त्या देतात आणि एका पत्त्यावर लगेच पोहचायला सांगतात. सचिन तडक तिकडे जायला निघतो. तो एश्वर्याने दिलेल्या पत्त्यावर पोहचतो. एक स्त्री तिथं निर्वस्त्र पडून असल्याची माहिती त्याला कॉन्स्टेबल एश्वर्या देतात. तो येईपर्यंत कॉन्स्टेबल ऐश्वर्याने सगळं व्यवस्थित सांभाळलं असतं. इंक्वायरी केली असता, तिला तिथे कोणी तरी टाकून गेल्याचं समजतं. तिला लगेच उपचारासाठी रूग्णालयात रवाना केलं जातं.

तिचा क्रूरपणे सामूहिक बलात्कार करुन, तिच्या प्रायव्हेट पार्टला इजा करण्यात आल्याचं, डॉक्टर सचिनला सांगतात. सचिनच्या डोळ्यांपुढे बालपणीच्या अशाच एका घडलेल्या प्रकाराचे दृश्य येतात. जिथून तो प्रेरित होऊन, पुढे पोलिस विभागात एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या रूपात किती तरी गरजूंना मदत करायची असं मनाशी ठरवतो. पण, आज त्याच्या समोर तिच परिस्थिती असते आणि ती त्याला स्वतःशी ठरवलेल्या निश्चयांना आठवण करून, त्याच्या कर्तव्यांना खुणावत असते.

सचिन पोलीस स्टेशन निघून येतो. सचिनला त्या मुलीशी वेगळीच आपुलकी निर्माण झालेली असते. थोड्या वेळाने त्याचा फोन रिंग होतो. सचिन मोबाईल बघतो तर, जॉलीचे चार मिस्ड कॉल पडले असतात. डोक्याला हात लावत तो बाहेर येऊन, तिला कॉल करतो. ती त्याला जवळच्या सीसीडीत यायला सांगते. तो तिथे पोहचतो आणि तिला घडलेला प्रकार सांगून टाकतो. तिला सुद्धा किळसवाण्या मानसिकतेचा खूप राग येतो. दोघेही डिनर करून, आपापल्या घरी निघून जातात.

सचिन नंदिनी केसवर पूर्ण लक्ष ठेवून, तपास करणार असतो. सदाशिव माने यांना नंदिनीचे वकील नियुक्त करण्यात येते. माने नंदिनीची बाजू न्यायालयात मांडणार असतात.

उपचारानंतर नंदिनी सचिनकडे राहणार असते. तिला सचिन सोबत बघून, लोकं नको ते घाणेरडे तर्क लावतात पण, दोघेही लक्ष न देता झटत असतात.

न्यायालयाकडून एक तारीख देण्यात येते. ती तारीख नंदिनीच्या उपचारानंतरची असते. ती बऱ्यापैकी सावरली असल्याने सचिन तिला घेऊन, न्यायालयात पोहचतो. सदाशिव माने, नंदिनी कडून काही औपचारिकता पार पाडून घेतात आणि थोड्याच वेळात न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात होते. आत सगळे जमले असतात.

न्यायाधीश : "सदाशिव माने आपण सुरुवात करावी."

माने : "माय लॉर्ड, मी पहिला पुरावा म्हणून, मीस नंदिनीच्या आई श्रीमंती सविता यांना समोर बोलावण्याची परवानगी मागतो."

न्यायाधीश : "परवानगी आहे."

माने : "तर, सविता ताई आपल्या मुलीच्या बाबतीत जो काही क्रूर प्रकार घडला आहे. त्याविषयी आपण काय सांगाल?"

सविता : "साहेब, आम्ही काय सांगणार. हीच कुलक्षिनी. धंदा करायची साहेब ही धंदा."

स्वतः आपल्या जन्मदात्र्या आईने केलेले आरोप! तेही, इतक्या खालच्या पातळीचे! हे सर्व बघून नंदिनी गोंधळून जाते. तिला भोवळ येते आणि ती जागीच कोसळते. त्यामुळे, न्यायालयीन प्रक्रियेला त्या दिवसापुरतं थांबवण्यात येऊन, पुढची तारीख देण्यात येते.

पुढच्या दिलेल्या तारखेवर सचिन, नंदिनीला घेऊन परत न्यायालयात पोहचतो. न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात होते. आज आरोपींचे वकील, नंदिनिला प्रश्न विचारणार असतात.

खोब्रागडे : "तर, मिस नंदिनी. मला सांगा आपण मिस्टर राज यांना कशा आणि कधी पासून ओळखता?"

नंदिनी : "तो माझा आत्ते भाऊ आहे. बालपणापासून ओळखते पण, असं करेल वाटलं नव्हतं."

खोब्रागडे : "मग मला वाटतं माय लॉर्ड, ही ओपन अँड शट केस आहे. कारण, मिस नंदिनी मिस्टर राज यांच्या मामे बहीण आहेत आणि त्यांचे धागे - दोरे आधी पासूनच जुळलेले असावेत. त्यांचं प्रेम प्रसंग होतं आणि जे झाले दोघांच्या सहमतीनेच! असंच या पूर्ण प्रकरणावरून दिसून येत आहे."

नंदिनी : "नाही असं काहीच नाही. साहेब, मी त्याला ओळखणं आणि आमचं प्रेम असणं, याचा अर्थ त्याला माझ्या सोबत इतकं क्रूर वागण्याचं आमंत्रण देणं होत नाही.😡"

खोब्रागडे : "पण, प्रेम प्रसंगात आज - काल, काय - काय घडू शकतं हे वेगळं सांगायला नको. माय लॉर्ड माझ्या बाजूने तर ही केस कुठल्याही पुराव्याशिवाय सिद्धच होऊ शकत नाही आणि म्हणून, ही ओपन अँड शट केस असल्याचा निर्णय जाहीर करावा अशी माझी आपल्याला नम्र विनंती."

माने : "थांबा मिस्टर खोब्रागडे, इतकी कसली घाई आपल्याला. माय लॉर्ड, मी आपल्या समोर इथे काही तथ्य आधारीत मजबूत आणि खरे पुरावे सादर करण्याची परवानगी मागतो."

न्यायाधीश : "परवानगी आहे."

सदाशिव माने, तपासात हाती लागलेल्या व्हिडिओ क्लिप्स, ज्या की नंदिनिसोबत घडलेल्या ठिकाणच्या सीसीटीव्ही असतात आणि केस संबंधीत काही पुरावे जसे की, डी. एन. ए. रिपोर्ट्स, ब्लड रिपोर्ट्स, नंदिनीचे प्रायव्हेट काही रिपोर्ट्स जे की, तिच्या सोबत घडलेल्या प्रकाराची अचूक माहिती देत असतात हे सर्व न्यायालयासमोर सादर करतात ज्यावरून, नंदिनी सोबत घडलेल्या विकृतीत, राज आणि त्याच्या मित्रांचा हात असल्याचं सिद्ध होतं. तसेच नंदिनीच्या आईने पैशाच्या लालसेपोटी खोटे आरोप नंदिनिवर लावून, न्यायालयाची दिशाभूल करण्याचे चार्जेस त्यांच्यावर लावण्यात येतात. पुढे न्यायाधीश त्यांचा निकाल सूनावतात.

न्यायाधीश : "राज, विकी, मनसुख, विशाल आणि राहुल या पाच जणांनी मिळून, नंदिनी सोबत घाणेरडं कृत्य केल्याचं सदर पुराव्यांवरून सिध्द होतं असल्याचं समजत असल्याने, यांना आय. पी. सी. कलम ३७६ डी अंतर्गत जन्मठेप तसेच द्रव्यदंडाच्या शिक्षेची तरतूद न्यायालय सुनावत आहे याची दोन्ही पक्षांनी नोंद घ्यावी.✍️"

आज मानवाधिकार संस्था तसेच महिला व बाल कल्याण विभाग ज्या की, नंदिनिला न्याय मिळावा म्हणून, रात्रंदिवस झटत असतात आणि सचिन जो की, नंदिनीला बहिण मानून, तिच्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी म्हणून, झटत असतो सगळ्यांनाच खूप आनंद होतो.

आज प्रत्येक जण न्यायालयीन निर्णयाने खूप समाधानी असतो.

समाप्त.


✍️ खुशी ढोके


एक बाब उधृत करणं मला येथे गरजेची वाटते आहे ती म्हणजे, "नंदिनिवरील अत्याचारासारखं वाईट किंबहुना घृणास्पद क्रूर कृत्य तिच्याच ओळखीतल्या व्यक्तीकडून करण्यात आल्याने, तसेच नंदिनी त्या कृत्यानंतर स्वतः एक साक्ष असल्याने, या केस संबंधीत पुरावे मिळवण्यात जास्त उशीर लागत नाही." याची माझ्या अती प्रिय वाचकांनी नोंद घ्यावी.🙏✍️