My wife's husband books and stories free download online pdf in Marathi

माझ्या बायकोचा नवरा

"हॉर कॉम" प्रकारात पहिलाच प्रयत्न...... 🙏✍️

✍️ खुशी ढोके




प्रियांश : "आई जाऊ का व खेळाले....😁"

आई : "काय नाटकं ही नवीनच....🤨 नाळ मूव्ही बघितल्यापासून.....🤨"

प्रियांश : "मम्मा अग तो साँग किती क्यूट होता..... आई मले खेळाले जायचं जाऊ दे ना व.... नदी मंदी पवाले जायचं जाऊ दे न व....😁😁"

आई : "माझं डोकं नको दुखवू..... जा..... आणि हो, लवकर ये..... बाबा येतीलच इतक्यात....🤨 जास्त लांब जायचं नाही.....🤨 कळलं.....🤨"

प्रियांश : "यार मम्मा किती इंस्ट्रक्शन्स अग..... येतो ना खेळून.... आणि नाही जाणार लांब..... रजत सोबत खेळू ना....😬"

आई : "काय....😳😳😟 ये बाबा त्या रजतच्या लांब राहायचं समजलं ना..... वेडं आहे ते..... त्याच्यासोबत गेलास तर बघच तू....🤨 त्यापेक्षा तू बाहेरच जाऊ नकोस....."

प्रियांश : "नाही काही होत ना..... आणि नाही जाणार त्याच्या सोबत झालं मग..... चल जातो मी....😁"

हा प्रियांश साधारण बारा - तेरा वर्षाचा..... आई गृहिणी तर बाबा एक पोस्ट ऑफिस कर्मचारी.... छोटं पण, सुखी कुटुंब..... प्रियांश अभ्यासात हुशार पण, तितकाच खोडकर....😁 शाळेत तर अगदी गवळणींचा कृष्ण.....💕 बारा - तेरा वर्षातच गाजवली शाळा.... पुढे तर विचारूच नका.....😁

आईला सांगून घराबाहेर पडला..... घराबाहेर खेळता - खेळता त्याला जवळच्या विहिरीजवळ एक लहान मुलगा बसून रडताना दिसला.....

प्रियांश खोडकर असला तरी खूप दयाळू..... एकदा रस्त्यावर त्याला कुत्र्याचं लहान पिल्लू रक्ताने भिजून, जखमी अवस्थेत पडलेलं दिसलं होतं..... तेव्हा, आईचा ओरडा खाऊन त्याने त्या पिल्लाची मलमपट्टी केली होती....🤗 खरंय लहान मुलं देवाचंच रूप असतात....

तो नकळत त्या विहिरीजवळ जाऊन पोहचतो........ त्या मुलाला तो काळजीने त्याच्या खांद्यावर हात ठेवत, विचारतो.....

प्रियांश : "कोण रे तू..... रडतो का आहेस..... कोणी मारलं का तुला....🙄 की, रागावलं कोणी🧐"

तो मुलगा वळून प्रियांशकडे बघतो..... प्रियांश घाबरून जातो...... आणि मागे हटतो.....

प्रियांश : "अरे..... हे...... हे काय झालं तुला....😟"

त्याच्या तोंडाला विचित्र मार असतो..... हनुवटी रक्ताने माखलेली असते..... कानातून ही रक्त येत असतं..... एक डोळा रक्ताने माखलेला.... खूप विचित्र दिसत असतो तो.....🤢🤢 तरी ही प्रियांश न घाबरता त्याच्याशी काळजीने बोलतो.....

मुलगा : "मी पडलो खेळता - खेळता.....😭😭"

प्रियांश : "थांब मी तुला मलमपट्टी करून देतो.... रडू नको..... आलोच..... इथंच थांब.....😟 जाऊ नकोस कुठंच"

प्रियांश पळतच घरातून फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो...... येतो आणि बघतो..... तिथे तो मुलगाच नसतो..... प्रियांश गोंधळतो.....😣😣 खूप वेळ वाट बघून, तो मुलगा कुठेच न दिसल्याने, निराश होऊन, एका वेगळ्याच हावभावात घरी परततो....😈😈

आई : "कुठ होतास इतका वेळ..... ??? तुला मी बोलले होते ना... लांब जायचे नाही.... ऐकतोस का कधी..... आणि हा बॉक्स घेऊन कुठे गेला होतास.....?🤨?"

बॉक्स तसाच रॅकमध्ये ठेवत, तो त्याच्या रूममध्ये निघून जातो..... इकडे त्याची आई त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे चकित होऊन, बघतच बसते......... इतका बोलणारा तो आज शांत कसा? आणि त्याचे हावभाव ही विचित्रच.....? ती याच विचारात असता, त्याचे बाबा घरी येतात.....

बाबा : "का ग....? काय झालं?? तिकडे अशी काय बघतेस...??"

आई : "अहो...... याला काय झालं माहीत नाही..... बाहेरून खेळून आल्यापासून, शांत आहे आणि थोडा विचीत्र वागतोय...... कोणासाठी फर्स्ट एड बॉक्स घेऊन गेला होता काय माहीत....! विचारलं तर सांगितलं ही नाही.....😣"

बाबा : "असेल ग कोणी छोटू पिल्लू एखाद्या कुत्र्याचं.... तुमचं बाळ बसतं का शांत कधी.....😅"

आई : "हमममममम....😣"

बाबांनी समजूत काढली तरी, आईचं हृदय लेकरांच्या अबोल भावना बघताक्षणीच ओळखत असतं...... त्याची आई कशी - बशी कामाला लागते..... रुम मधून प्रियांश येतो..... काही तरी पुटपुटतच बाहेर निघून जातो..... त्याची आई घड्याळात बघते..... तर, सायंकाळचे सात वाजले असतात.... आई त्याला आवाज देते मात्र तो तिचं काहीच ऐकत नाही..... पळतच त्या विहिरीच्या ओट्यावर जाऊन बसतो.....

आई : "अहो..... बघा ना या वेळी हा कुठं गेला.....😟 काहीतरी पुटपुटत होता..... जाऊन बघूया का.....?"

बाबा : "येईल ग..... गेला असेल शिंदेकडे...... वाढदिवस ना आज मुलाचा त्याच्या......"

आई : "अहो पण सांगायला कोणीच आलं नव्हतं ना.....! विना इन्व्हीटेशन कसा जाईल हो....??"

बाबा : "गेला असेल ग मुलांसोबत...... जाऊदे ना..... जा स्वयंपाकाचं बघ.... जाम भूक लागली आहे....."

त्याच्या आईला त्याचं खूप टेन्शन येतं..... पण, स्वयंपाक ही करायचा म्हणून, त्याची आई जाते आणि स्वयंपाकाचं बघते..... पंधरा - वीस मिनिटांनी बाहेरून जोर - जोरात कोणाचा तरी भांडण्याचा आवाज ऐकु येतो...... प्रियांशचे आई - बाबा पळतच बाहेर जाऊन बघतात..... शिंदे, ज्यांच्या मुलाचा वाढदिवस असतो... ते आणि त्यांचे कुटुंबीय बाहेर कोणावर तरी ओरडताना, प्रियांशच्या आई - बाबांना दुरूनच दिसतात..... जवळ जाऊन हा आपलाच प्रियांश असल्याचं त्यांना समजतं.....

बाबा : "प्रियांश.... बाळा हे काय करतो आहेस तू.....😣😬"

शिंदे : "बघा हे..... तुमचं कार्ट.... घरात घुसून केक कट करण्याआधीच घेऊन पळत आलं बाहेर.....😠"

प्रियांश : "बे त इतकं चिडाले का झाला तुले.... टकल्या..... देतो न....... हे घे तुया केक खा तूच....😈"

तो केक शिंदेंच्या अंगावर फेकून देतो...... त्याचे असे विचित्र एक्स्प्रेशन्स आणि वेगळीच बोलीभाषा बघून, त्याचे आई - बाबाच नाही तर, आता प्रत्येकच जण घाबरतो....😟😟

बाबा : "बाळा असं बोलू नये.....🙂 मोठे आहेत ना ते....."

प्रियांश : "आता तू शिकवसिल का मले..... कसं बोलाचं अन् कसं नाही त.... होय तिकडं.... 😏😏"

तो धक्का देतच घरात निघून जातो...... त्याचे आई - बाबा सोबतच सगळे आता त्याच्याच पाठमोऱ्या आकृतीकडे चकित होऊन, बघत स्तब्ध असतात..... काही वेळाने सगळे आपापल्या घरी निघून जातात...... इकडे त्याचे आई - बाबा ही घरी येतात...... आई जेवायला वाढते..... थोड्या वेळाने प्रियांश रूम मधून बाहेर येतो....... त्याची आई त्याला रोज इतकंच जेवण वाढत असते..... तो चिडतो.....👿

प्रियांश : "हे का वाढून रायलीस.....👿 पोट तरी भरल का मायं..... अजुन वाढ.....😈 तुले मायित हाय न मले भात लागते..... इतकुसा रांदली त....😈"

त्याचे बदललेले हावभाव बघून, त्याची आई घाबरतच उभी होते.....😟😟

प्रियांश : "अव् त तू कायले उटते.... बस न..... तुले काई केलो का मिनं..... जा अजुन भात रांद..... मले भूक लागली हाय......😈"

बाबा तिला डोळ्यांनीच इशारा करून, जायला सांगतात...... आई अजुन भात बनवते आणि त्याला आणून देते..... तो सगळं जेवण वेगळ्याच पद्धतीने खाऊन संपवतो.....🤢🤢 दोघांना त्याचं नवलंच वाटतं.....🙄 आता दोघेही घाबरून असतात.... आपल्या मुलाला हे झालं तरी काय??.... असा प्रश्न त्यांना पडतो......

प्रियांश : "आतं खाता का मले..... मी तुमचा जेऊ खाल्लो त.... असे पाऊन रायल्या..... लई दुरून आलो म्हून भूक लागली हाय इतली..... पण, काकू तूनं मस्तच जेवण बनवली बाकी..... माना लागन.....😈😈"

आपल्याच आईला त्याने काकू म्हटलेलं बघून, दोघेही आश्चर्यचकित होऊन त्याच्याचकडे बघतात.....😳😳

प्रियांश : "खाऊ द्याल का मले.... का असेच पात राल आतं.......😈"

दोघेही थोडे घाबरतात आणि पट्कन हात - तोंड धुवून बाहेर येतात..... तो मात्र आत जेवतच बसतो.... अजुन ही तो खूप उपाशी असल्यासारखा जेवत असतो......

बाबा : "काय ग..... याला काय झालं असा का करतो आहे हा..... बोली ऐकलीस त्याची......😣 मला तर समजली पण नाही.....😣"

आई : "समजून काय त्याच्या वर पी. एच. डी. करणार आहात का आता....?? अहो काय झालं त्याला, तो असा का वागतो आहे..... सगळं बघायला नको का..... मगाशी आला तेव्हा ही शांतच होता..... नक्कीच तो गेला तिकडे काही झालं असेल.... मला तर भीती वाटत आहे बघा.....😟😟"

बाबा : "बघू थांब आजच्या दिवस उद्या जर असच असलं की, जाऊ डॉक्टरकडे....."

आई : "डॉक्टरकडे जायला, त्याची काय तब्येत बिघडली आहे का...😠 समजत कसं नाही ओ तुम्हाला..... जा आणि एखाद्या तांत्रिकाला घेऊन या.....😠"

बाबा : "अग.... मला अंधश्रद्धा निर्मुलनाच्या गोष्टी सांगणारी तू..... तांत्रिक काय तांत्रिक....??"

आई : "आपल्यावर आली ना.....😞😞 मग कुठले निती - नियम काम करत नाही......😟 जा आणि उद्याच घेऊन या...... माझं सोन्यासारखं पिल्लू असं का करत असेल......😟"

आतून प्रियांशमधलं जो कोणी असतो तो सगळं ऐकत असतो..... हात धुवून बाहेर येत......

प्रियांश : "जा - जा कोनाले आनाचं आना.... मी अजून तरी जाचा पिलॅन कराचा हाव......😈😂"

असं म्हणत, तो बाहेर येऊन ओट्यावर बसून विचित्र हसतो...... तिकडे त्याच्या आईचं काळीज धडधडायला लागतं......

प्रियांश : "काकू तू त लईच टेन्सन मंदी दिसून रायलीस..... कायले टेन्सन घेतं व...... आओ न मी आता..... मलेच घाल खाले आपला पोरगा समजून..... नॉट बिग डील व काकू....😈😈"

त्याचं हे विचित्र बोलणं एक तर त्यांना समजत नव्हतं आणि राहून - राहून तो आपल्या आईला काकू म्हणत होता...... हे मात्र खटकणारं होतं..... प्रियांशची आई आत जाऊन झोपायची तयारी करू लागते......

प्रियांश : "मायी सातरी नको हातरूस काकू..... मी इरिजवळंच पसरतो.....😈"

त्याची आई घाबरून त्याच्या बाबांना आवाज देते......

आई : "ओ आत येता का जरा.... 😟"

प्रियांशच्या बाबांना त्याच्या आईने दिलेली हाक ऐकू येत नाही..... कारण, प्रियांश उठून आता विहिरीच्या दिशेने जाताना बघून, त्याचे बाबा त्याच्याकडे भारावून बघत असतात..... त्यांना आतून आवाज ऐकु आला नसेल म्हणून तो......

प्रियांश : "बे टकल्या.... मले मंग पायजो.... जा तूयी बायको बलवते......😁😁"

बाबा : "अरे ये..... काय बरळतो हा मुलगा.... कुठे जातोय अरे ये थांब........ हो घरात.....😣😞😟"

प्रियांश : "बे मी नायी येत घरात..... मायी जागा ते होय..... दिसली का....😁😈"

त्याच्या बाबांचं लक्ष जिकडे तो बोट दाखवून खुणावतो तिकडे जातं...... ते तर घाबरून तिकडेच बघत असतात..... खूप विचित्र जागा असते ती..... ती जागा थोड्या कडेला असल्याने, आजवर तिकडे जाण्याचा प्रसंग आलाच नसतो..... ती जागा अशा ठिकाणी असते जिथं कोणी सहसा फिरकत सुद्धा नाही..... प्रियांशच्या मागे त्याचे बाबा लपत - छपत जाऊन बघतात...... तो मस्त पैकी जाऊन विहिरीच्या काठावर बसतो.... आणि क्षणातच आत विहिरीत पडतो..... त्याचे बाबा खूप घाबरतात..... जाऊन ते विहिरीत बघतात त्यांना प्रियांश तिथे दिसत नाही..... ते मोबाइलचा टॉर्च लावून बघतात तरीही तो त्यांना आत दिसत नाही..... आतून खूप घाण वास येत असतो..... तरी ही मुलाच्या काळजीपोटी त्याचे बाबा खूप आत वाकून बघत असतात..... तेवढ्यात.....

@@@ : "बे टकल्या मरतं का आतं.....😈😈😁"

ते दचकून मागे फिरतात.....😳😳 तिकडे प्रियांश विचीत्र हसत उभा असतो.....

बाबा : "बाळा तुला लागलं तर नाही ना..... आत पडला होतास तू..... अरे.....😟😟😟😟"

प्रियांश : "इतकी बी सूद्ध मराठी नको बोलू ना बे टकल्या..... मले समजन का..... साला तुमचा मोंबई, पून्याचा लोकाचा हाच त टेन्सन हाय बे..... साला आमाले तुमचे सब्द नायी समजत न तुमाले आमचे....😬 च्या बईन हाय न पंचायत.... जा आता काकू वाट पात असल न.... कायले सतवतं तीले.... जा न.... मले बी झोपू दे आतं चुपचाप....🥴"

त्याचे बाबा खूपच आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात..... कारण, थोडीफार बोली इतक्या वेळेपासून तो बोलत असल्याने, काही शब्द त्यांना समजतात...... त्या बोलिवरून ती इतक्या कमी वयात कोणाची असू शकते यावर त्यांचा विश्वासच बसत नाही...... नाईलाजास्तव त्यांना तिथून त्याच्याविनाच माघार घ्यावी लागते......😞😞 ते घरी पोहचताच......😞😞

आई : "कुठे आहे तो..... अहो........??😟😟"

बाबा : "अग तो तिथेच झोपला..... ऐक ना मी जाऊन आताच तांत्रिक घेऊन येऊ का..... मला ही आता त्याचं वागणं काही वेगळ्याच प्रकारचं वाटत आहे अग.....😞😣😣 कसली भाषा वापरतो बघ ना.... तुला काकू आणि मला टकल्या काका म्हणतो अग.....😞"

आई : "तुम्हाला टकल्या म्हणतो म्हणून घाबरलात ना तुम्ही..... आता इथं ही स्वतःला टक्कल पडली हे मान्य करायचं नाही का तुम्हाला.... 🥴"

बाबा : "अग विषय काय.... तू बोलतेस काय.....😣 तू आतून दार बंद करून घे.... मी येतो घेऊन कोणाला तरी....😣"

बाबा निघून जातात..... आई दार आतून बंद करून घेते..... बाबांना जाऊन साधारण वीस मिनिटं होत येतात...... दरवाज्यावर जोराची थाप पडते..... आत, नाही म्हंटल तरी प्रियांशची आई घाबरून असतेच..... आतून ती "बाहेर कोण आहे.....?" असं घाबरतच विचारते.....😟😟 तिने तसं विचारता बरोबर दरवाज्यावर मोठ - मोठ्याने कोणीतरी जोर - जोरात हात आदडल्याचा आवाज येतो..... सोबतच प्रियांशच्या रडण्याचा आवाज..... ते ऐकून मात्र आईचं हृदय ते..... कधी पर्यंत नाही पाझर फुटणार! ती जाऊन, दार भावनेच्या भरात उघडणार तोच, तिला लगेच क्लिक होतं आणि ती पिपहोल मधून बाहेर बघते..... ते बघून, तिला धक्काच बसतो.....😳😳😳😳 ती घाबरून मागे हटते..... तिला पलिकडे आवाज प्रियांशचा मात्र बाहेर असणारा प्रियांश नसून, कोणी तरी त्याच्यापेक्षा किती तरी वयाने मोठा असलेला माणूस उभा असल्याचं दिसतं.... तिला मनात खूप भिती दाटून येते.... ती त्याला ओळखत असल्याचे भास तिला होतात...... डोकं जड होतं...... ती पळतच देवघरात जाऊन, तिथला अंगारा आणते आणि स्वतःच्या कपाळावर लावते..... थोडा अंगारा घराच्या कोपऱ्यात टाकते आणि दारातून एक रेख ओढते..... थोडं धाडस करून दार उघडते...... तो समोरच किळसवाणा हसत उभा असतो..... रक्ताने माखून..... तिला त्याचा खूप घाण वास येतो..... तो हसतच.....

मुलगा : "अंगारे लावून आलीस म्हून वाचलीस....😁😁😈 नाहीतं आज् तुया नंबर होता.....😁😁😁😁😈"

असं म्हणत तो परत विहिरीच्या रस्त्याने माघारी वळतो..... प्रियांशची आई मात्र वेगळ्याच कोड्यात पडते...... हा जिवंत कसा???????.....😟 ती आतून दार लावून घेते..... अधून - मधून कधी प्रियांश तर कधी त्याचे बाबा आल्याचे भास तिला होतात..... मात्र, आता तिला कळून चुकतं की, हा खूप विचित्र आहे...... आधिसारखा तो राहिलेला नाही......

ती कसल्या तरी विचारात असताच, साधारण पाऊण तासाने परत दारावर हळूच थाप पडते.....😳 ती खूप घाबरली असते.... पण, आता ती थाप सौम्य असल्याने, ती दार उघडण्याचं धाडस करते...... बघते तर, फक्त प्रियांशचे बाबा एकटेच परतलेले दिसतात.....

आई : "अहो काय झालं...... भेटला नाही का कोणी.....😟😟"

बाबा : "नाही अग...... उद्या सकाळी येतो म्हणाला तो.... चल आत लवकर...... तो येईल नाही तर.....😣"

दोघेही आत येतात आणि प्रियांशचे बाबा दार लावून घेतात.....

बाबा : "चल झोप बघू.....🙂"

आई : "तुम्ही खरंच जाऊन आलात ना....🙄"

बाबा : "हो अग.....🙂"

प्रियांशच्या आईला काही तरी विचित्र वाटतं..... ती विचारच करत असते तर आतून प्रियांशच्या रडण्याची आवाज येते.... दोघेही तिकडे धाव घेतात...... जाऊन बघतात तर तो झोपेत रडत असतो......

आई : "हा इथे कसा.....?? हा तर बाहेर आणि त्याच्यात तो कोणी तरी.....😣😣😣😣😣"

बाबा : "अग काय बोलतेस.... हा इथेच तर आहे.....😁😁😁 आणि मी पण..... ते ही तुझ्या जवळ.....😈😈😈😈😈"

ते तिला एक किळसवाणा स्पर्श करतात....... प्रियांशची आई, त्याच्या बाबाचे असे रूप बघून बेशुद्ध पडते..... प्रियांशचे बाबा तिला उचलून रूम मध्ये घेऊन येतात आणि आतून दार बंद करतात.....

रात्री @०४:००......

दारावर मोठ - मोठ्याने दार ठोकल्याचा आवाज ऐकू येतो...... प्रियांश घाबरून आपल्या आईला आवाज देत असतो.... तिचा आवाज न आल्याने, तोच जाऊन दार उघडतो आणि बघतो तर त्याच्या बाबांसोबत एक तांत्रिक आलेला असतो..... तो जाऊन, बाबांना मिठी मारत जोर - जोरात रडतो......😭😭😭😭 खूप वेळचा रडत असल्याने, त्याच्या तोंडून शब्द ही बाहेर पडेना.....

बाबा : "काय झालं...... आई कुठे आहे बाळा....😣"

तो रुमकडे बोट दाखवत जोर - जोरात रडतो..... त्याचे बाबा धावतच तिकडे जातात..... मागून तांत्रिक ही येतो..... समोरचं दृश्य पाहून सगळ्यांच्याच पायाखालून जमिन सरकते...... प्रियांशचे डोळे हातानेच त्याचे बाबा बंद करतात.... कारण, खूप घाबरून जातो.... त्याचं रडणं थांबतच नाही.....😭😭 तांत्रिक रूम बाहेरच थांबायला सांगून, ते प्रियांशला रूम मध्ये घेऊन जातात आणि शांत झोपायचं सांगून, पळतच इकडे येतात.....

त्यांच्या रूम मधलं पुर्ण सामान अस्ताव्यस्त पडलेलं असतं..... प्रियांशची आई खूप वाईट अवस्थेत बेडवर पडून असते..... तांत्रिक बाहेर असल्याने, त्याचे बाबा जाऊन, लगेच तिच्या अंगावर बेडशीट ओढून घेतात..... नंतर तांत्रिकला आत बोलावून घेतात..... समोर त्यांना जे दिसतं ते बघून, त्यांचा विश्वासच बसत नाही..... समोरच्या भिंतीवर रक्ताने लिहिलं असतं..... "ते मायी होती, हाय अन् हमेशाच रायन..... तू तिले इसर....😈😈"

प्रियांशचे बाबा डोकं पकडुन खाली बसतात.....

बाबा : "हे काय झालं देवा......😭😭😭😭"

तांत्रिक : "आपण याचा इतिहास वाचू शकतो... माझ्याकडे आहे एक तंत्र..... चला....🤨🤨"

तांत्रिक सगळी तयारी करतो..... मधात काही तरी निशाण आखून मंत्रोपचार करतो.... लगेच त्या आत्म्याशी संवाद साधतो.....

तांत्रिक : "कोण आहेस तू.....🤨"

तो : "बे टकल्या आला मोटा, कोण हो मी विचाराले.... अबे सुखानं मरु त द्या बे..... जिवंत होतो तवा बी प्यार नायी भेटला माया.... आता त घेऊन जाऊ दे....👿"

तांत्रिक : "नाव काय तुझं......🤨"

तो : "बे तुले पयलेच म्हनलो.... इतली बी चांगली मराठी नोको बोला... समजत नाही ना बे मले...😣 जा माया भासेत बोलने वाला घेऊन ये.... मी उमरेडचा हो..... जा घेऊन ये...... एकादी झाडीपट्टी बोलने वाला.....😣 च्याबईन का बोलतेत मलेच समजत नायी...."

तांत्रिक : "बे त पयले सांगाचा ना बे.... मी बी त हो तिकडचाच....😁"

तो : "बे त तू कोटचा होस....😁"

तांत्रिक : "बे मी तितचाच नायी का बे..... भिवापूरचा हो न.....😁"

(उमरेड आणि भिवापूर नागपूर जिल्ह्यातील तालुके आहेत.... थोडक्यात इथे भुताचं प्रेमापोटी स्थलांतर झाल्याचं समजते....😂)

बाबा : "हे काय चालू आहे तुमचं कळेल का मला....😣"

तांत्रिक : "ओळखीतल्या भुताशी बोलतोय मी..... माणसं तर ओळखी दाखवणं विसरून गेलीत..... भूतांना तरी दाखवू देत....😞"

बाबा : "अहो तुम्हाला आणलं कशाला इथे हे विसरू नका....😠"

तांत्रिक : "हो हो ......🙄😣"

बाबा : "😠😠"

तो : "त्याचावर कायलं चिल्लवते बे......😁 मॉ ओळखीवाला हाय न थो....😁"

बाबा : "गप बस तू....😠"

तांत्रिक : "सांग बे.... अ.... म्हणजे सांग तू यांच्या पत्नीला का घेऊन गेलास..... कोण आहेस कोण तू.....🤨"

तो : "झाली का बे टकल्या नौटंकी चालू....😁 सांगतो... हे माई प्रेमिका होती..... मी रिकामचोट म्हून इच्या बापानं इचं लगन ह्या येडपटाशिन केलं.... मंग मी इरीत कुदलो.... मले वाटला मरत नसल कुदल्यानं.... काय सांगू भाऊ मेलो ना गा....😣 मंग इले हुडकत आलो इतं... पन मले ध्यानात आलं हे त एका पोट्ट्याची माय बनली... बनली पन का झालं माया प्यार त थोच होता न.... आमी पयलेच मंदिरात लगन केलो होतो..... पन इनं बी कोनाले सांगतलन नायी.... दिमागाची माय बईन.... च्याबईन....😣 मंग मले ऊमगलं मेल्यावर जास्त सक्ती भेटते...... आपन आपला प्यार नेऊ सकतो.... पीच्चर मंदी पायलो हाव मिनं....... म्हून आलो इकडं.... त मले बी दिमाग पाहिजेल होता न कोनात धसाव.... च्याबईन इच्या पोरात घुसलो..... तो मले फिट नाय बसला....👿 अन् ईले काकू मना लागलं.....👿 जिले बायको मनाच तिले काकू......👿👿 कोनत्या भावात खपलं असतं थे मले..... सांग बे टकल्या..... म्हून मंग हा तिकडं जातानी दिसला तवा मंग याचा आंगात घुसलो....... इकडं येऊन इलं परेम करून संपवली.....😈😈😈 अन् आता इची आत्मा घेऊन जातो..... दोगच राऊन मस्त आमी....😈😈😈😈😈"

तांत्रिक : "तुला तिला घेऊन जाता येणार नाही...... थांब....😠"

तो : "बे टकल्या घेऊन जात हाव.... निंग....😈😈"

तांत्रिक काही मंत्रोपचार करतो..... तसा - तसा तो भूत जोर - जोरात ओरडू लागतो...... विव्हळत असतो.....

तो : "बे नको न बे टकल्या...... सुखानं मेल्यावर जगु त दे बे....👿👿 कायले करुन रायला बापू तू हे.... तुले नवती का बे गल फरेंड..... माया प्यार होय ना बे हे.....😈 जाऊदे न आमाले....👿👿"

तांत्रिक जोर - जोरात मंत्रोपचार करतो आणि शेवटी एकच राख त्या आवाजाकडे भिरकावतो..... तसंच काहीतरी फुटल्यासारखा आवाज होतो....... थोड्या वेळाने प्रियांशची आई रूम बाहेर येते.....

आई : "काय हो प्रियांश कुठे आहे.....😣"

त्याचे बाबा आणि तो तांत्रिक सुटकेचा निःश्वास सोडतात.....😤😤

मात्र आता प्रियांशचे बाबा त्याच्या आईकडे संशयास्पद बघतात.... कारण, लग्नावेळी तिच्या घरच्यांनी त्यांना अंधारात ठेऊन हे लग्न लावलं असतं......

.
.
.
समाप्त....


✍️ खुशी ढोके


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED