अपूर्ण..? - 13 Akshta Mane द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपूर्ण..? - 13





Past



कैंटीनमधे बरासचा गोंधळ चालू होता , स्वरा लैबमधून डायरेक्ट कैंटीनच्या दिशेने वळली त्याच् वेळेस कैम्पसमधे अर्णव कोणत्या तरी मूली सोबत बोलत उभा होता😴.
उभा काय तिचे डोळे पुसत होता 😯 स्वराने ते पाहिल.



झाल वाटत घ्याच परत सुरु🙄.... आणि म्हणतो मी त्यातला न्हवे😆 स्वरा थोड़ हसुन नुघुन गेली .



गेले बरेच दिवस अर्णव आणि ती मुलगी कधी क्लासरूम कधी पार्किंग लॉट तर कधी कैम्प्स मधे दिसायचे हा तीचे डोळे पुसत असायच तर कधी मीठी मारत.



बघणाऱ्याल काय हो काहीही दिसत खर काय ते आपल्याला आपलच माहीत असत....



बाकीच्या मूली जेलोस व्हयाच्या😂 आणि का नाही होणार म्हणा ... असो.



स्वराच्या पाठोपाठ अर्णवही आला, आत शिरतो ना शिरतो तोच भुमी कोणावर तरी धावून गेली,.... भूषण कानात बोट घालुन बसलेला ....., तर त्याच्या बाजूला सिड शांतपणे उभा होता ना चेहऱ्यावर कसले भाव नी काय😪.



आजुबाजुला स्टूडेंट्सची गर्दी जमा होती. त्यांच्याच समोर काही चार मुलिंची गैंग हो गैंगच म्हणा उभी होती.



तुझी हिम्मत कशी झली बोलायची😡.... ये हेलो हे तुझ आलीशान घर नाही आहे नखरे करायला ते सर्व तिथे इथे नाही. तुझा जो माज आहे ना तो तुझ्या घरच्यांसमोर माझ्या समोर नाही करायचा😤 ...भुमी चुटकी वाजवत म्हणाली🤘



स्वरा तर पहातच बसली🤐 .... योय होय चिल bea , काय झाल ? .....कूल डाउन कूल डाउन , म्हणत भुमी जवळ धावत गेली.



अरे आवरा रे हिला कोणीतरी😳..... ये स्वरा बर झाल आलिस .....ते बघ बोलतच सुटली आहे ही , शेवटी कंटाळून आम्ही बाजूला झालो 😩. आता फक्त सर् यायचे बाकी आहेत इथे. कर काहीतरी भूषण चिडून म्हणाला.



काय झालय काय नक्की 😕स्वराने सँशयाने विचारल.



या मिस दिवा क्वीन आलात तुमचीच कमी होती सारा म्हणाली ,आता ही सारा कोण? समजेल



ओय मेकअपच दुकान गप्प बसते का तू जरा😤... भूमा चालू झाली परत 🤦.



भुमी चुप... एकदम चुप😤. बोल ....का उगाचच भांडते आहेस 😕 .स्वराने वीचारल्यावर भुमी स्वराच्या पण अंगावरओरडली. तस स्वरा लांब झाली आणि भूषणने डोक्याला हाता लावला.



उगाचच उगाचच भांडते आहे..... मी उगाचच?😕 you really think?
......अरे ही ....ही बया आहे ना,.... हिने ही.. 😡आपल्या सिडला धमकी देते जर तू हो नाही म्हणालास तर पोलिसात जाइन ....नस कापून घेईन.... घरा समोर राडा करेन ....
blaa blaa literally blackmail केल आहे हीने😤
आणि हा महाशय..... बोलता बोलता भूमा सिड जवळ आली , ह्याला माहीत होत सर्व ह्याने लपव आपल्यापसुन 😶.



अरे नको नको 😫....भूषण इशारा करून भूमिला सांगायचा प्रयत्न करत होता . आता ही काय ह्या साराला सोडत नाय आधीच ही भुमी कमी होती, ती आता स्वरा आली आहे 😵भूषण मनात म्हणाला.



तस स्वराने सिडला पाहिल काय ..? 😳 ओह्ह come on सिड चॉइस तरी नीट ठेवयची😱😬 स्वरा हसत म्हणाली .



हिला कसल गांभीर्यच नाही अर्णव मनात म्हणाला.




सिड खाली मान घालुन उभा होता , स्वरा ते.. नवीन कॉलेज उगाचच राडा नको म्हणून..😓 .
सिडच वाक्य पुर्ण व्हयाच्या आता.. कधी तरी सुधर सिड खल्लीस ना माती🤦. स्वतासाठी at list stand घ्यायला शिक . स्वरा मान हलवत रागत म्हणाली .




एनीवे ! ओकय अस आहे तर ...., सारा प्रेम करतेस ह्यांच्यावर? स्वराने शांतपणे विचारल.




हो मग काय any dought 😕. उगाचच ही नस कापलि नाही आहे मी . ती हात दाखवत म्हणाली .मला जे हव ते मी मिळवते😏 and i love him .



तुला खरच वाटत तुझ हे प्रेम आहे ? आणि तुला खरच वाटत ह्याचही तुझ्यावर प्रेम असाव ? आणि चल... मानल, जर नसेल तर तर काय करशील? .....प्रेम मागून मिळत नाही ते व्हाव लागत .



अर्णवने लगेच मान वळवून तिच्याकड़े बघू लागला.



आणि हे अस नस कापून वैगरे नाही मिळत आणि ती जूनि पद्धत झाली ग... मी नवीन ट्रीक देउ का?




ये शाणे चल मला नको शिकवुस🙄.... हो बाजूला आणि मी म्हणाली ना मी काहीही करु शकते 👿.



कर ग तुला जे करायच आहे ते कर पण आता आपण एक काम करूया , तुला खुप हउस आहेना थांब .
भूषण ब्लेड असेलच ना तुझ्याकड़े नाही म्हणजे तू आज प्रोडक्ट म्हणून वपरणार होता दे मला जरा.



भूषणने डोक्याला हात मारला झाल कल्याण 😷.
काहीवेळ भूमा आणि अर्णवही स्वराला बघत बसले .
ये तू काय तीला ब्लेड देतोस आणि जर दिलासा तर बघ मी तुझ काय करेंन सिड भूषणला बुक्का दाखवत म्हणाला 😜



भूषण दे येंकायला येत नाही आहे का😏 ? ....दे रे म्हणत तीने साराचा हात पकडला.
आपण परत सर्वांसमोर करु हा आता ईथे काप हात😊... काप...ss 😠स्वरा जोरात ओरडली



अक्ख कैंटीन शांत झाल स्वराच हे रूप भुमी सिडला नवीन न्हवत पण अर्णव .... अर्णव तर तोंड उघड़ ठेऊन बघत होता.



कर तुझ प्रेम प्रूफ , काय झाल नाही हिम्मत म मोठ्या मोठ्या बाता पण मरायच्या नाहीत समजल😒 तेवढ्यात..



"सारा..." मागून आवाज आला ,
" तू आता आलिस कधीपासुन वाट बघतोय आम्ही वर्धा तुझी हे बघ ना😔 साराने बारीक तोंड केल."




काय झाल सारा रड़ते का आहेस.... परत घोळ घातला कोणी?... आणि इथे काय सर्कस चालु आहे नीघा ईथुन आणि ये तू मिस .....तुझी हिम्मत कशी झाली साराला रडवायची. येंकल आहे मी सर्व रैंगिग करता तुम्ही न्यू स्टूडेंट्सची 😤.
कंप्लेट केलिच पाहिजे तुमची वर्धा स्वराला म्हणाली



सारा तू बोल कोण तो मुलगा 😕....काल म्हणालेलीस तो? काय झाल त्याच दाखवा मला तस साराने समोर बोट केल.



वर्धा ने समोर बघितल तर हाताची घड़ी घेतलेली चेहऱ्यावर न कळण्या सारखे हावभाव ... सेट केलेले हेयर हाफ हैंडेड
टी -शर्ट ....ऊंच गोरापान . अगदी तीला शोभेल असा.



सिड तर वर्धाला एंट्री केल्याच क्षणी फ्रीज़ होऊन पहात होता 😍.....कर्ली हेयर, नॉट बांधलेले पिच कलरचा शर्ट... ब्राउन लिपस्टिक ....भरीब डोळे .



स्टाइल स्वरा सरखीच सेम होती थोड़ी , आता स्वभाव सारखे आहेत का ते बघू दोघिंचे .



सिडला बघून झाल्यावर अचानक वर्धाच लक्ष अर्णववर गेल
अरे सारा ह्याच्यापेक्षा हा बरा होता ग अर्णवला पॉइंट करून म्हणाली .



हो बरोबर .....हा खूपच बरा आहे . ह्याच्या मागे लागायला सांग हिला तसही ह्याला सवय आहे 🙄. स्वरा अर्णवला न बघताच म्हणाली तस अर्णवने तीला एक anger look 😡दिला😂..



हो एंड प्लीज.... we are engage already 😂🙆 स्वरा आणि भुमी एकदम म्हणाल्या सिडने तर त्यांना बघुन खाली मान घातली



😜स्वरा.. स्वरा.. आणि आता भुमी पण ...🤦😆. सिड हळू आवाजत गालातल्या गालात हसत म्हणाला 😬.
मी आता निश्चिंत हम्म !.. तो श्वास सोडत म्हणाला😆



काय😳... अरे सारा जरा बघुन प्रेमात पडायच ग वर्धा म्हणाली



Excuse me .... अस बघुन वैगरे प्रेमात पड़त नाही आणि मुळातच प्रेमात पड़त नाही प्रेम होत ओकय. मगास पासुन गप्प बसलेला सिड म्हणाला .



तशी वर्धा गप्प बसली.



क.. काय भुमी आणि सिड?? 😵भूषणला आता चक्कर यायची बाकी होती.....😂



तर इथे.. what स्वराली सिडची गर्लफ्रैंड आहे🤔.
हा तसही दोघ सोबत असतात आणि पार्टीच्या वेळेसही कपल म्हणूनच एंट्री केलेली अर्णवच जरा तोंड पड़ल.




स्वरा आणि वर्धाची तूतू में में सुरु झाली .
ये हे बघ आम्हला काय शौक नाही आहे तुझ्या मैत्रिनिच्या मागे मागे करायला हिलाच विचार हिने काय उपद्याप केले आहेत ते स्वरा आता टॉपिक बंद करत म्हणाली. तेवढ्यात तिची ट्यूब पेटली.



एंड सॉरी बट काय आहे iam media student त्यामुळे कैमरा आणि रेकॉर्डिंग सतत चालू असते माझ्या फोनची म्हणूनच मगाशी ही सारा जे काही म्हणाली ना ते सर्व रेकॉर्ड झाल आहे आता हे प्रिंसिपलकड़े आणि पोलिसात जायला वेळ नाही लागणार ओकय .
तसही पुलिस स्टेशनमधे जाणार होतिसना तू चल मीच घेऊन जाते . ब्लैकमेल आणि mental haracementच्या नावा खाली आत टाकते😕😈. आधी स्वतची चूक कबूल करायला शीका .




One more thing. वर्धा ना तू ? राइट . ही सारा आणि हिची गैंग तुला कस बीट करून कस ह्या वर्षी ...खाली पाडु शकतात घ्याच प्लान करत होते. स्वरा सिक्सर वर सिक्स मारत होती.



साराच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला तू.. काहीही काय बोलतेयस आता उगाचच माझ्यावर आरोप करतेय ही वर्धा .



मला कस समजल? yup ...... वाशरूम मधे अश्या गोष्टी कोण बोलत यार😴... आणि फुकटचे आरोप नाही हा मी इन जनरल म्हणाली आता आरोपिला ते आरोपच वाटतनार ना 😉.
.......Think it . माझ्या कड़े प्रूफ आहे स्वरा जिंकल्याच्या अविर्भावत म्हणाली.




काय आहे लास्ट ईयर ला तू फर्स्ट आलेलीस त्याचा राग होता हिच्या मनात सगळ्याच गोष्टित पुढे असायचीच म्हणून
सगळी प्लानिंग करून ठेवली होती हिने . आता अर्थात हे सर्व मी काय करु ठेऊन पण त्या दिवशी असच रेकॉर्डिंग चेक केल आणि सपोज गरज लागली तर🤔 म्हणून ठेवल .



आता तूच विचार कर तू जिची बाजू घेते आहेस तीच तुला बाजूला करायला लागली आहे .



वर्धाने सर्व येंकल्यावर within सेंकद साराच्या लावून दिली .



तुला खुप जवळच मानल होत मी😶 ....सांगायच ना एकदा मला .हे... हे..😣अस करणार होतीस तू शीईई .



आज पर्यन्त तुझ्या प्रत्येक गोष्टिवर पड़दा टाकत आले मी... आणि तू ..तू तर .. नाही ही जे काही म्हणतेय ते बरोबर आहे तू प्रेम करायच्य लायकिचिच नाही आहेस , मला खोट सांगितल की हा तुला त्रास देतो आणि इथे तू तु तर..😣



i .. Im sorry 😢 म्हणत वर्धा निघुन गेली ,जाताना एकदा सिडवर नजर टाकून गेली .



सो सारा सारा झाली ना पंचायत. एक सांगते प्रेम त्याच्यावरच कर जो तुझ्यावर करतो . आणि हे अस स्वताला त्रास करुन घेण म्हणजे प्रेम नाही ग...स्वरा तिच्या खांद्यावर ट्याप करत बोलली.



वेल आजच न्यान संपल आहे... चला कामाला लागा आपण निघू शकता. मिस सारा आणि प्लीज हे परत नको ग करुस उगाचच डेली सोप वाटत😴.... आणि जागा पण नीट शोध नेक्स्ट टाइम ओकय. बाय बाय..... भूमि रागत म्हणाली आणि सारा निघुन गेली.



सगळेजण कैंटीनमधे बसलेले . भूमि खुप झापत होती सिडला तर भूषण आणि अर्णव मज़ा घेत होते.



Come on यार .....सिड एवढा त्रास दिला तुला तीने आणि तू सांगाच तरी आणि भुमी आपण कैंटीन मधे आहोत बस झाल आता बाकीच घरी जाताना हम्म ! स्वरा रिलैक्स होत बसत म्हणाली



ये पण बाकी काहीही बोल तुम्ही दोघ प्रेमावर जे भाषण करता जबरदस्त भूषण फ्लयिंगकिस् देत बोलला .



ये भाषण काय ते मी आपल सहज म्हणाली.... i just heat love 🙄. स्वराच वाक्य पुर्ण व्हायच्या आता भूषणने अजुन एक प्रश्न टाकला ....का ग स्वरा तुला काय वाटत प्रेम म्हणजे काय.



तस भुमी हसु लागलि. तू कोणाला विचारतोयस परत परत😂



नाहीतर काय😅 ...हे प्रेम अस काही असत का जगात? निव्वळ स्वार्थ असतो. शौक असतो जो पुर्ण झाला की लोक सोडून देतात.
मला हे समजत नाही जी माणस प्रॉमिसेस निभाऊ शकत नाही त्यांना काय लाइफ पार्टनर बनवायाच .
मला तर खुप राग येतो प्रॉमिस देऊन पूर्ण करत नाही त्यांचा. अरे तुम्हाला जमात नाही तर घेतात का😤... स्वरा रागत म्हणाली. जाउदे मी बाइक काढ़ते माझी तुम्ही या म्हणत ती निघून गेली.



अर्णव तीचा शब्दोंन शब्द येंकत होता. अशीही आहे ही... कोणालच न समजण्या सारखी तो मनात विचार करत होता.



सिड मगास पासुन गप्प होता त्याला डोळ्यासमोर फक्त वर्धा दिसत होती .अस वाटल एक attchment झाली काही वेळासाठी तो मनाच विचार करत होता.



योय सिड चला काय कसला विचार करतोयस आणि प्लीज मगाशी जे झाल त्याबद्दल असेल तर खरच प्लीज हा 😏👊
भुमी पाठित धपटा टाकत निघुन गेली




**********




पुढचे काही दिवस शांततेत गेले, वर्धाची स्ट्रीम पूर्ण वेगळी म्हणून जेव्हा तीच कॉलेज टाइम असायच तेव्ध ह्यांचा ब्रेक.



वर्धा एकटीच कैंटन मधे बसलेली असायची आणि तिच्या समोर ही मंडळी , तीला बराच वेळा वाटायच जाऊन परत सॉरी बोलून याव पण हिम्मत व्हायची नाही.



जस वर्धाने कैंटीन मधे एंट्री केली समोर सिडला धड़कली नजर चोरन पुढे निघुन गेली तस सिड ने आवाज दिला.




"वर्धा..ss.. " तीने मागे वळून पाहिल.



अम्म.... look, listen तू त्या दिवशीसाठी खुप गिल्टी फील करते आहेस माहीत आहे मला . हे बघ डोन्ट फील बैड चुका माणस कडून होतात... तुला माहीत न्हवत एवढंच..



ती त्याच्याकडे पाहातच बसली😶 ...अ ....सिड सॉरी सिद्धार्थ मी तिची बाजू घ्यायला नको हवी होती सॉरी खरच.



हो मला माहीत आहे चिल ग..... आणि मी विसरलो आहे ते सर्व , इनफैक्ट सगळेच. आणि तु एक काम करतेस का चल सगळ्यांशी परत नव्याने ओळख करून देते चल😊



नाही नको.... अरे सिद्धार्थ😐... तू अस रियेक्ट करतो आहेस जस काही झालाच नाही आहे आणि परत गेली तर नकोच..😶
तू येतेस सिडने फक्त तीला लुक दिला आणि...



गाइज meet my new friend ☺️.
" कोण रे भूमाने वीचारल "



Here vardha ...☺️



सगळी जण डोळे फाडून बघत होते भूषण आणि अर्णव तर स्वरा आणि भुमीची रिएक्शन बघण्यासाठी एक्सइटेड झालेले😂



पण झाल उलटच सर्वानी तीच हसुन स्वागत केल. मग काय लेक्चर बंक मारण.... फिरायल जाण , मूवी, ट्रेकिंग ...बीच
सहा महिन्यात सगळ पालथ घातलेल ह्यांनी.


अस करता करता वर्धा सुद्धा ग्रुपचा पार्ट झाली वर्धाच तर स्वराशि चांगलच पटायच दोघी कधी कधी तर भर लेक्चरमधू एकमेकींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचे आणि ह्यांच्या बरोबरीला भूषण होताच.😂🙆🤷



वेल. कधी सोबतीला मग अर्णवची गिटार... स्वराची बाइक, भूषणचे पांचट जोक ....भूमाची ढीक भर पुस्तकं..... वर्धाचे ट्रैवलिंगचे किस्से आणि सिडचा पेंन्सन😂💁



एवढं सगळ असूनही जो स्पोट व्हायचा तो झालाच💥🙇




असच एक दिवस त्या दिवशीची कैम्पस मधली मुलगी आज परत दिसली अर्णव सोबत .



काय अर्णव साहेब new gf वाटत ही😜. घे बुक म्याम ने द्यायला सांगितली होती .
आणि काय रे इथे सांगत सूटतोस मला हव तस प्रेम मिळाल नाही अजुन आणि भर कॉलेजमधे काय मीठी मारत सूटतोस.
हे बघ सर् किंवा मिस बघतील म्हणून सांगतेय आणि प्लीज तू..



Shut up swarangi... shut up. तोंड दिल आहे म्हणून काहीही बोलत सुटायच का .अर्ध्या जगाची काय माहिती नाही आणि..😣
तू जा ग आणि तू काय बोलते आहेस तुला तरी माहीत आहे का? उचली जीभ लावली टाळयला.
ती ....ती काय करतेयस? आमची सौंस्था आहे . तीला गरज आहे म्हणून मद्त करतोय मी आणि तीला एकटिलाच नाही अश्या बऱ्याचजणी आहेत . इडियट😒... शीटss 😡अर्णव निघुन गेला.



लिसेन ..अर्णव अरे मला ते न्हवत म्हणायच ....अर्णव...ss अर्ण..शिट मैन 😢, काय बोलून गेली मी स्वरा डोक्याला हाता लावत म्हणाली



इथे स्वरा कॉलेजमधून लवकर निघाली आणि रात्र उलटून जात होती तरी तीचा पत्ता न्हवता ही बातमी अर्णव पर्यन्त पोहचायला वेळ लागला नाही .



अर्णव जाउन खिड़कीमधे बराच वेळ उभा होता कुस बदलूनही झोप येत न्हवति .



अहह😣... ह्या स्वरांगीने डोक फिरवायची वेळ लावली आहे. आधी स्वतःच बोलते... नाय धड़ बोलायची पद्धर वरुन हे अस गायब झाली आहे . काय करु...... काय करु कोणाला वीचारु?





स्वरा..... स्वरा.... ये ग घरी लवकर 😣.
मी जरा जास्तच बोलों का? तीला...... पण.. नाही पद्धतच नाही आहे हिला , घरी आली असेल का? .. ओह्ह गॉड.
विचार करत करत त्याला झोप लागली ते डायरेक्ट सकाळी उठला .



स्वरा कॉलेजला आली असेल बघु तीला एकदा म्हणून लवकर निघाला तर ती आलिच नाही. दहा वाजुन गेले तरी तिचा पत्ता न्हवता कोणाला विचारायच हे सगळ आपल्याचमुळे झाल आहे अस त्याला वाटत होत .



बाकी कोणी विचारतही न्हवत.... की तीच नावही काढत न्हवत. शेवटी त्याने हिम्मत करून सिडला विचार



अरे हो ती ना.... बाइक रेसिंगला जाते .आम्हांला माहीत होत हा भूषण आणि वर्धा रे , त्याना माहीत नाही ना म्हणून काळजी करत होते काहिनाही आली अकरा पर्यन्त . आणि आजच म्हणशील तर डोक दुखतय म्हणत होती सिड म्हणाला



अरे तू कुठे जातोयस आता?.... " अरे बाबांच काम आहे एक ते करायला जातोय चल बाय म्हणत अर्णव निघुन गेला "



अशी काय ही एकतर कालच ते तस आणि आज काय डोक दुखतय म्हणे ... हिच डोकेदुखी आहे😑 .
माधु म्हणतो ना ते बरोबर , उद्धट आहे जरा जाउदे म्हणत त्याने कार स्टार्ट करायला घेतली तर समोर...



पिंक ऑफ वाइट टॉप ऑफ शोल्डर ... वाइट जीन्स , ओपन हेयरमधे लावलेले क्यूट टिकटिक आणि हातात लिलीच्या फुलांचा बुके😍👀 त्याच्या समोर शांत उभी होती ती स्वरा .



सुंदर....🌼😍.... अर्णव गलातल्या गालत हसत म्हणाला पण कालच्या प्रसंगावरुन भानावर आला .



स्वरा त्याच्या जवळ चालत येत होती हे त्याला समजल तस हा इकडे तिकडे बघू लागला. काय करणार कारमधे बसायची हिम्मत होत न्हवति. तीला अस समोर बघुन त्याला हायस वाटल, राग खुप आलेला तिचा पण काळजीही तेवढिच वाटत होती ते त्याला मात्र उमजत न्हवत.



स्वरा त्याच्या पुढयात समोर जाऊंन हातातिल बुके पुढे करत उभी राहिली . " काय हे😕 अर्णव ने विचारल "



अर्णव सॉरी माझा तो इंटेंशन न्हवता माझ अस म्हणन होत की जरा जपून ... म्याम , सर् ... फिरत असतात कोणी बघितल तर म्हणून , ....तरीही सॉरी आणि माझ सॉरी एक्ससेप्ट असेल तर हा बुके घे .



अर्णव तर तीला पहाताच राहिला 😳..... ही चक्क सॉरी बोलतेय. पण मला नाही घ्यायच आहे हा बुके खुप चुकीच वागलिस तू स्वरा. पण नाही घेतला तर तुला वाईट वाटेल अर्णव मनात बोलत होता .



काही वेळ वाट बघुन स्वरा बुके ठेऊन तशीच निघुन गेली.


रात्रि मंद हवेचा झोत वाहत होता 🍃....चाँदण्याचा पडलेला शीतल प्रकाश आणि तिचे उडणारे केस ...



का एवढ गिल्ट फील होतय मला .... का तो समोर असला की फक्त हायस वाटत ? का त्याच्या त्या भरिव डोळ्यामधे त्याच्या हसू मधे हरवून जाते .



खरच खुप जास्त हर्ट झालाय तो ,..... पण माझ ते इंटेंशन न्हवत . कस सांगू त्याला. हेरवी त्याच्याशी प्रत्येक गोष्टीवरुन भांडत असते आणि त्याने आज सॉरी सुद्धा एक्सेप्ट केल नाही माझ 😔. नजरही मिळवू शकतं नाही तुझ्याशी मी अर्णव.




लाइफ मधे फर्स्ट टाइम अस झाल आहे की ह्या स्वराच सॉरी कोणी घेतल नाही आहे आणि हिला कोणाला मानवता आल नाही आहे ....... यरर मी उगाचच अस कधीच कोणाला बोलतच नाही. किंवा उगाचच भांडायला जात नाही .... शिट मैन..... स्वरा डोक्याला हात लावत बसली.




तेवढ्यात मागून विणाच्या तारा छेडल्याच्या आवाज आला.... कोणी तरी शास्त्रीय संगीत गायला लागल.
तस स्वराने कानावर हात ठेवला. अहह 🙉😤..... झाल परत ह्यांच सुरु . जरा सुखाने जगु देत नाही .
हट्ट रे 😣 ..... म्हणत फ़ोन बेडवर टाकून खाली गार्डन मधे गेली.




झालय अस की.... स्वराच्या आजोबानीं शास्त्रीय संगीताचे धड़े गिरवले आहेत त्यांची इच्छा होती हा वारसा पुढे त्यांच्या मुलाने म्हणजेच स्वराच्या बाबांनी चलवावा पण त्यांना काही ते जमले नाही.



म्हणून जिद्द करून स्वराच्या आजोबांनी स्वराला लहानपणा पासुनच शिकवनिची सुरवात केली..... त्यांनी स्वराच्या जन्मच्या वेळेसेच तीच नाव स्वरांगी ठेवल जी कोणत्याही सूरात सरेल रंगून जाईल .
आणि इथेही झाल उलटच , आजोबांच्या सततच्या बोलनिवरुन स्वराचा रस हळू हळू कमी झाला, त्यांच अस मत होत की मुलगा नाही तर निदान नातीने तरी ह्या क्षेत्रात काहीतरी कराव . ते एवढे परखी होते की त्यांना ठाऊक झालेल हिचा गळा खुप सुरेल आहे .




हळू हळू स्वरा मोठी होत गेली तस तीच चीड़चिड आणि उद्धट पणा वाढला. सततच्या बोलण्यावरुन कंटाळली होती. जस तीच शास्त्रीय संगीतातून रस कमी कमी होत गेला तस हिप हॉप पॉपिंग रैपकड़े कल वाढला ,
आता तिच्या आजोबांना कमी पणा दखवन्यासाठी न्हवे पण स्वतासाठी ती गात गेली. पण त्याच कौतुक मात्र कोणालच न्हवत ..... जेव्हाही कोणत बक्षीस किंवा ट्रॉफी घेऊन आलीकी तो आंनद तिच्यासाठी कधी आंनद नसायचाच आणि म्हणूनच की काय ही जी आज आहे जिला मरणाची भीति नाही ती निर्भिड झाली पण आतली पोकळी खोल होत गेली .



(कधी कधी पालकही जबाबदार असतात मुलांच्या बदलण्याच्या मागच कारण . पालक कधीच स्वतःची चुक दाखवून देत नाही तर ती पल्यावर लादतात स्पेस आणि अंडरस्टैंडिंग खुप महत्वाच आहे आजच्या काळात )




इथे अर्णवने गिटारची धुंन छेडली ..... चंद्राची शीतल किरणे थेट अर्णवच्या चेहऱ्यावर येऊन पड़त होती. त्यात त्याचे ते चमकणारे डोळे ....आहाहा!....😍


गिटार वजावता त्याने डोळे बंद केले .... त्याच्या नज़रे समोर स्वराचा आजचा चेहरा दिसत होता . पिच कलरमधे एकदम क्यूट वाटत होती . विचार करता करता त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले तेवढ्यात मोबाइल बीप झाला .




त्याच्या एका फ्रेंडने पार्टीमधले स्वरा आणि अर्णवचे कपल पीक पठावलेले . काही कैंडिड तर काही ट्रॉफी घेतनाचे.
अर्णव प्रत्येक फ़ोटो झुम करून पहात होता.
स्वराची स्टाइल तीच बोलण.... तीचा attitude.... तिच्यातला कॉन्फिडेंस, खूपच भारी होता . त्यातल्या त्यात सर्व मूल तर बघतच सूटलेले पण फर्स्टडे लाचा स्वराने केलेल्या करामाती पाहुन कोणाचीच हिम्मत होत न्हवति बोलायची.
ते सर्व आठवून ह्याला जाम हसायला येत होत.



तितक्यात मागून आवाज आला ..... काय रे अर्ण काही झाल का🤔.... नाही, मगास पासुन मी इथे उभी आहे , तुला आवाज ही दिला दोनदा पण तू तर मात्र हसतच सुटला आहेस काय नक्की काय शिजतय डोक्यात 😒😕.




काहीही काय आई..... मी कुठे हसतोय 😬....मी ते आपल... त्याच वाक्य तोडत आईने विचारल.
......." सांग ना रे कोण ती😉 .....आता आईनेच गुगली टाकल्यावर ह्याची बोलती बंद"



ये गप ग आई तुझ काय चालू आहे जा झोप तू



पहा ....आतही बोलताना तू चक्क लजतोयस



ये आई 🙈...... आता तू खेचते आहेस हा माझी चल गुड नाईट..



आई निघुन गेली आणि तेवढ्यात हवेच्या मंद झुलुके बरोबर लीलीच्या फुलांचा सुगंध आख्या रूमभर पसरला .
अर्णवने टेबल वर ठेवलेली फुले हातात घेत त्यांच्यावर अलगद हात फिरवला आणि.." स्वराली " अस हळू आवाजत म्हणाला




हो ही तीच फूल आहेत जी स्वराने दिलेली. स्वरा निघुन गेली आणि ह्यने तो बुके पटकन उचलून कोणी बघायच्या आता कार मधे ठेऊन निघुन गेला ....



खरच कधीतरी काही गोष्टीची सुरवातच अशी होते आपल्या हातात असूनही नसत किंवा नसुनहीँ असल्यासरख भासत..




क्रमशः

अक्षता माने.