समस्या_तरुणाईच्या Khushi Dhoke..️️️ द्वारा काहीही मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

समस्या_तरुणाईच्या




तरुणांमधील वाढते नैराश्य आणि आत्मघाती प्रवृत्तीला रोखण्यासाठी काय करता येईल?

#समस्या_तरुणाईच्या

चला यावर बोलूया....🙂


थोडक्यात नैराश्य म्हणजे काय? हे बघू :

नैराश्य म्हणजे, सगळीकडे नकारात्मकता वाटणे, भविष्यात समोर सगळं अंधकारमय आहे सतत हेच वाटत राहणे, स्वतः विषयीचा आत्मविश्वास डळमळीत होणे, माझं काहीच होणार नाही असा नकारात्मक भाव मनात येणे.

वरील सगळे मुद्दे हे नैराश्य येण्यात कारणीभूत ठरतात.

नैराश्याविषयी गैरसमज :

👉 मनाचा कुठलाही आजार म्हणजे, ती व्यक्ती मनोरुग्ण किंवा वेडी ठरवून मोकळे होणे.

👉 अशा व्यक्तीला उपचाराची गरज नाही, चांगले विचार केल्याने ती व्यक्ती बरी होईल हा समज.

महत्वाचे:

१४ दिवसांपेक्षा जास्त एखाद्या व्यक्तीचे मन उदास असले किंवा त्याला सगळीकडे निराशाच दिसत असेल आणि सगळंच संपल्याची भावना मनात येत असेल तर, त्या व्यक्तीची नैराश्यात जाण्याची शक्यता जास्त असते.

कारणीभूत घटक :

तसं बघायला गेलं तर, नैराश्य येण्यासाठी बरीच कारणे आहेत. मात्र एक कारण हे प्रकर्षाने जाणवते ते म्हणजे,
👉 एखाद्याची तान - तणाव सहन करण्याची क्षमता.

जागरुकता :

कुठल्याही गोष्टीविषयी संवेदनशीलता किंवा जागरूकता निर्माण होण्यासाठी गरजेची असते ती म्हणजे, माहितीची उपलब्धता. जितकी अपुरी माहिती तितकी विषयाची गांभीर्यता कमी! हे खूप भयानक आहे!

माहितीच्या आणि आरोग्य सुविधेच्या सोयी अभावी ग्रामीण भागात मानसिक आरोग्य जपण्याकडे तितकं गांभीर्याने बघितलं जातं नाही! परिणामी अंधश्रद्धा सारखे प्रकार घडून आलेले आपल्याला बघायला मिळते.

उपचार :

👉 नैराश्यावर उपचार म्हणजे, सर्वप्रथम "मी नैराश्यात आहे" हे मनाला सांगणे. कारण, मनाला जोपर्यंत एखादी गोष्ट पटत नाही तोपर्यंत त्यावर उपचार आत्मसात करायला मन तयार नसतं.

👉 योग्य आहार, चांगली जीवनशैली, दिनचर्येत प्राणायाम आणि योगा सारख्या पद्धतींचा अवलंब.

👉 सकारात्मक आणि सहिष्णू व्यक्तीमत्वांशी संवाद.

👉 स्व: गाजवणाऱ्या व्यक्तिंपासून लांब राहणे.

आता आपण बघुया आत्मघाती प्रवृत्ती म्हणजे नेमकं काय?

नैराश्यातून माणूस आत्मघाती प्रवृत्तीकडे वळतो हे जितकं खरं तितकंच जेव्हा, नैराश्याची भावना मनात यायला सुरूवात होते तेव्हा, आत्मघाती प्रवृत्तीचा सुद्धा थोड्या प्रमाणात का होईना जन्म झालेला असतो.

आता हे कसे? ते आपण उदाहरणांच्या माध्यमातून समजून घेऊया.

👉 एक मुलगा जो की, त्याच्या महाविद्यालयात अतिशय हुशार होता. प्रत्येकंच क्षेत्रात तो उत्साहाने सहभागी व्हायचा आणि मेहनतीने त्यात क्रमांक ही मिळवायचा. मात्र एक दिवस काही कारणास्तव तो एका स्पर्धेत हरला आणि या एका पराभवामुळे त्याचेच मित्र त्याला टाळू लागले! सतत त्याला स्वतःच्या गटापासून दूर करण्यात येत असल्याने, १५ दिवसानंतर त्याचं पंख्याला लटकतं शरीर त्याच्याच घरी आढळलं. आता असं का घडलं असावं? त्यात, त्याचा उपहास करणाऱ्या मुलांची चूक होती का? तर, आपण हे म्हणू शकत नाही. इथे चूक कोणाचीच नसून, अभाव होता तो संवादाचा! जर, त्या मुलाने या विषयी आपल्या शिक्षकांना किंवा घरच्यांना कल्पना दिली असती तर, इतके टोकाचे पाऊल घेण्याआधी त्याने थोडा तरी विचार केला असता.

👉 एक मुलगी अतिशय हुशार, वकृत्वात उत्तम, लिखाण अप्रतिम. मात्र, दुसऱ्यांच्या अहंकारापाई तिला संधीच मिळत नाही. एक दिवस ती या सर्वांपासून लांब जायचं ठरवते आणि.................................................
.................................................... २० दिवसानंतर जेव्हा, पोलिसांच्या तपासात तिचा कुठेही पत्ता लागत नाही तेव्हा, अचानक एक दिवस तिचा मृतदेह एका धरणाच्या काठावर आढळतो. इथे चूक कोणाची? कोणाचीच नाही. फक्त अभाव होता तो म्हणजे, संवादाचा!

तर मित्रांनो, आत्मघाती प्रवृत्ती निर्माण होण्यासाठी आजूबाजूच्या लोकांची वागणूक जरी अनुकूल असली! तरीही, त्यावर एकमेव उपाय "संवाद" हेच आहे.

आता तो संवाद जर तुम्ही परत त्याचं माणसांसोबत साधायला गेलात तर, तुम्ही अजूनच नैराश्यात जाल. म्हणून, जे तुमचं मन समजून घेतात असा विश्वास तुमचा ज्यांच्यावर असेल त्यांना तुम्ही मनातलं सांगू शकता. नक्कीच यातून बाहेर पडायला तुम्हाला मदत मिळेल.

संवाद कोणाशीही करा. पण, त्यात सकारात्मकता गरजेची. ज्यातून पुढचा मार्ग गवसेल. ☺️🙏


✍️खुशी ढोके