संत एकनाथ महाराज - पाषाणाच्या नंदीने गवताचा घास खाल्ला. Sudhakar Katekar द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

संत एकनाथ महाराज - पाषाणाच्या नंदीने गवताचा घास खाल्ला.

श्री संत एकनाथ महाराज” ५ पाषाणाच्या नंदीने गवताचा घास खाल्ला.

पैठण मध्ये एक गरीब ब्राम्हण श्री एकनाथ महाराजांचा शिष्य होता.त्याला सर्व प्राणिमात्रात परमेश्वर दिसत असे.रस्त्यात कोणी मनुष्य अथवा प्राणी दिसला की,तो त्यांना साष्टांग दंडवत घालीत असे.लोक त्याला कुचेष्टेने दंडवतस्वामी म्हणत असत.त्याने एकदा मेलेले गाढव जिवंत केले.गाढव जिवंत झाल्यामुळे गावात एकच चर्चेचा विषय झाला.एकनाथांना ही गोष्ट बरी वाटली नाही.म्हणून त्यांनी दंडवत स्वामींना जिवंत समाधी घेण्यास सांगितले.त्यांच्या त्या शिष्याने आसन मांडले आणि डोळे मिटले.क्षणात दंडवत स्वामींचे प्राण पंचत्वात

विलीन झाले.

दंडवत स्वामींच्या प्राण त्यागाची घटना सर्व गावभर पसरली.कुटाळ लोकांना व नाथांच्या निंदकांना ही एक चांगली संधी चालून आली.त्यांनी नाथांवर ब्रम्हहत्येचे पातक फोडले.त्यांनी प्रायश्चित्त

घेऊन पावन व्हावे म्हणून सांगितले.त्या कुटाळ कंपूने नाथांना सांगितले की,”ह्याच पैठण शहरात पूर्वी ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविले आणि आपले पावित्र्य सिध्द केले.तेव्हा तू आता देवालया समोरील

नंदीला गवताचा घास खायला लाव नाहीतर आम्ही सांगू ते प्रायश्चित्त घेण्यास तयार हो.नाथांनी पुढे होऊन नंदीची प्रार्थना केली की,”देवा,तूच दंडवतस्वामीला गाढव जिवंत करावयास लावले,तेव्हा त्याच्या पुण्याईने आणि सर्व भुदेवांच्या आज्ञेने आता हा गवताचा घास घ्यावा.”असे म्हणून नाथांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखा जवळ धरले. नाथांचा एक हात नंदीच्या मस्तकावर होता.नंदीने जीभ लांब करून.नंदीने जीभ लांब करून,नाथांच्या गवताचा एक खाल्ला.,नाथांनी नंतर त्या नंदीला कुटाळ लोकांचा त्रास होऊ नये म्हणून, नदीत जाऊन जलसमाधी घेण्यास सांगितले.त्या दगडाच्या नंदीने नाथांची आज्ञा मानून धावत जाऊन जलसमाधी घेतली. या प्रकारामुळे कर्मठ ब्राह्मणांची व कुटाळ कंपूची तोंडे काळी ठिक्कर पडली.आजही पैठणात दंडास्वामींची समाधी व पाषाणाचा नंदी पहावयास मिळतो.

लोकांची ती आज श्रध्दास्थाने आहेत.

श्री एकनाथ महाराजां ना गिरीजाबाई पासून तीन अपत्ये झाली.पहिली कन्या तिचे नाव गोदावरी,दुसरा पुत्र त्याचे नाव ,तिसरी कन्या तिचे नाव गंगा.

गोदावरीचे लग्न पैठण येथील विश्वंभरबोवा यांचेशी झाले.तिच्या पोटी कवी मुक्तेश्वर यांचा जन्म झाला.दुसरी

मुलगी कर्नाटकात एक जुना सोयरा होता त्याचे मुलास दिली.,तिला पुंडाजी नावाचा एक पुत्र होता.

नाथांचा मुलगा हरिपंडित हा मोठा बुध्दीमान व विद्वान होता.त्याचे शङशास्राचे अध्ययन अल्पवयात होऊन तो विद्वन्मान्य

झाला.तो संस्क्रुत भाषेचा मोठा अभिमानी होता.आपले वडील प्राकृत भाषेत ग्रंथ लिहितात,पुराणे सांगतात, कीर्तन करतात हे त्याला आवडत नव्हते.तो श्री एकनाथ महाराजांवर रागावून आपली पत्नी व दोन मुले घेऊन काशीक्षेत्री निघून गेला.एक राघव नावाचा पुत्र नाथांजवळ ठेवला.तो काशीस गेल्यानंतर श्री एकानाथमहाराज त्याला समजावून सांगण्यासाठी काशीस गेले. नाथांनी मराठी भाषेत पुराण सांगावयाचे नाही व परांन्न घ्यायचे नाही या अटी पत्करून हरिपंताला परत पैठण येथे आणले.आशा रीतीने नाथांचे व त्यांच्या मुलाचे सख्य झाल्यावर नाथांनी फाल्गुन शुद्ध ६ शके १५२१ या शुभ दिवशी गोदावरीत स्नान करून

कृष्ण भजन करीत परामानंदात निमग्न असता आपला देह ठेवला.

ज्ञानविज्ञानसंयुक्त आत्मभूतः शरीरिणाम्

अत्मानुभवतूष्टात्मा नान्तरायैर्विहन्यसे ॥१०॥

शास्त्रश्रवणें दृढ ज्ञान मननाभ्यासें होय विज्ञान

या दोंहींची जाणोनि खूण ब्रह्मसंपन्न तूं होईं ॥२॥

ऐसिया स्वार्थाचेनि लवलाहें अविश्रम भजावे तूझे पाये

म्हणसी वोढवतील अंतराये त्यासी काये करावें ॥३॥

सांडोनि दांभिक लौकिक त्यजोनियां फळाभिलाख

जो मज भजे भाविक विघ्न देख त्या कैंचें ॥४॥

त्याच्या विघ्ननाशासी देख करीं चक्राची लखलख

घेऊनि पाठिसी अचुक उभा सन्मुख मी असें ॥५॥

यापरी गा उद्धवा जो मज भजे निजभावा

त्यासी विघ्न करावया देवां नव्हे उठावा मज असतां ॥६॥

एवं ब्रह्मसंपन्न जाहलियावरी आत्मा तूंचि चराचरीं

जंगमीं आणि स्थावरीं सुरासुरीं तूंचि तूं ॥७॥

तूजहूनि कांहीं अणुभरी वेगळें नाहीं

तेथ विघ्न कैंचें कायी तूझ्या ठायीं बाधील ॥८॥

ब्रह्मादिकांसी जो ग्रासी त्या काळाचा तूं आत्मा होसी

पाठी थापटून हृषीकेशी उद्धवासी सांगतू ॥९॥

ऐशी बाध्यबाधकता फिटली संकल्पकल्पना तूटली

ब्रह्मानंदें पाहांट फुटली वाट मोडली कर्माची ॥१०।।

सुधाकर काटेकर

संदर्भ एकनाथी भागवत.